दारिद्र्याचे सोंग!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
6 Sep 2012 - 6:24 am
गाभा: 

अमेरिकेत यंदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार्‍या या निवडणूकीकरता रणधुमाळी चालू आहे. अमेरिकेत दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन गेल्या आठवड्यात झाले. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे चालू आहे.
दोन्ही पक्षाचे उमेदवार आपण कसे साधे आहोत, कसे आपण हलाखीच्या परिस्थितीतून वर आलो ह्याचे खर्‍याखोट्याची सरमिसळ असणारे वर्णन करत आहेत. विविध प्रकारे आम्ही तुमच्यातलेच आहोत असे बिंबवण्याचा हा प्रयत्न. गेल्या आठवड्यात मिट रॉमनीच्या पत्नीने आपल्या भाषणात सुरवातीला आम्ही कसे साधेपणाने रहायचो वगैरे सांगायचा प्रयत्न केला. इस्त्रीचे टेबल हेच आमचे डायनिंग टेबल होते (आता यात काय विशेष असे आम्हा भारतीयांना वाटेल!) पण हा गृहस्थ अफाट श्रीमंत आहे. आत्ता तो तसा झाला असे नाही तर अफाट वडिलोपार्जित श्रीमंती ह्याला लाभली आहे. अनेक घरे, अनेक गाड्या, कंपन्या, जमिनी ह्याच्याकडे आहेत. पण तरी त्याबद्दल फुशारक्या न मारता उलट दारिद्र्याचे सोंग करावे असे यालाही वाटते. होय मी श्रीमंत आहे आणि तुम्हीही व्हावे अशी मी धोरणे बनवेन असे काही ह्याला म्हणवत नाही. कारण तसे केल्याने बहुधा पुरेशी मते मिळणार नाहीत.

काल सौ. ओबामांनी यावर कडी करुन बराक ओबामा कसा गरीब आहे. सुरवातीच्या काळात त्याच्याकडची सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे कचरा कुंडी धुंडाळून मिळालेले एक टीपॉय सदृश टेबल. परिस्थितीमुळे एक साईझ छोटा असणारे पण ओबामाला परमप्रिय बूट. तसे पाहिले तर ओबामा वा त्याची सौ. काही फार गरिबीत वाढलेले नाहीत. अगदी रॉमनी नाही पण बर्‍यापैकी चांगली सांपत्तिक परिस्थिती.
पण तरी रॉमनीसारखा अतिश्रीमंत जर गरिबीच्या फुशारक्या मारतो तर मी का मागे राहू असे यांना वाटत असेल.
सामान्य लोक श्रीमंतीचे सोंग करतात तर हे असामान्य गरीबीचे!
एका श्रीमंत घरातल्या मुलाला गरीबी ह्या विषयावर निबंध लिहायला सांगितला तेव्हा त्याने लिहिले होते की आमच्या घरी सगळे गरीब आहेत. मी, माझी आई, बाबा, माझी बहीण, माझा कुत्रा, आमच्या बागेत काम करणारा माळी गरीब आहे. आमच्या पाचही गाड्यांचे ड्रायव्हर गरीब आहेत, दोन्ही स्वैपाकी गरीब आहेत. आमच्या खंडाळ्याच्या बंगल्याची साफसफाई करणारा रामूही गरीब आहे! वगैरे वगैरे. ह्या लोकांची गरीबीची सोंगे पाहून अशा निबंधाची आठवण येते इतकेच.

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

6 Sep 2012 - 6:36 am | जयंत कुलकर्णी

अमेरिकेतील राजकारणाची एकंदरीत दिशा बघता, तेथे भारतीयांची संख्या मजबूत वाढली आहे अशी शंका घ्यायला जागा आहे...........

विसुनाना's picture

6 Sep 2012 - 10:55 am | विसुनाना

असेच काहीसे म्हणायचे आहे. अमेरिकेतली भारतीयांची संख्या वाढली असे न म्हणता अमेरिकन राजकारण्यांची भारतीय मानसिकता वाढली असे म्हणतो.
निवडणुकीच्या निमित्ताने एक धोकादायक वळण अमेरिकेतले राजकरण घेत आहे. आजवर अमेरिकेच्या राजकारणातून कधीही ऐकू न आलेला 'मायनॉरिटी' हा शब्द मिशेल ओबामा आणि आज बिल क्लिंटन यांनीही उच्चारला आहे. याला गोरे विरुद्ध काळे असाही रंग येत आहे. नव्याने स्थलांतरीत झालेल्या लोकांना चुचकारणे सुरू झाले आहे. हीच ती 'फोडा आणि झोडा' नीती - भारतातल्या निवडणुका जिंकण्याच्या तंत्रावरून अमेरिकाही धडे घेत आहे असे दिसते.

नंदन's picture

6 Sep 2012 - 1:52 pm | नंदन

प्रकाटाआ

पिवळा डांबिस's picture

7 Sep 2012 - 9:38 pm | पिवळा डांबिस

नंदनचे अभिनंदन!!!!
:)

सिद्धार्थ ४'s picture

6 Sep 2012 - 6:58 am | सिद्धार्थ ४

ते काहीही असो, पण ह्या ओबामा आणि आणि DNC मुळे आमचे जगणे charlotte मध्ये कठीण झाले आहे. पूर्ण downtown security मुळे बंद आहे.

सोत्रि's picture

6 Sep 2012 - 8:05 am | सोत्रि

स्वारी, ह्यावेळी माफ करा!

पुढच्या वेळी तुमची सोय बघून ओबामाच्या सेक्युरीटीची सोय करण्यात येइल. काय आहे ना तुम्ही एका लोकशाही असलेल्या देशातुन इथे आलात हे आमच्या ध्यानतच नाही आले.

- (CIA Security Head, Charlotte ) सोकाजी

रमेश आठवले's picture

6 Sep 2012 - 1:55 pm | रमेश आठवले

अमेरिकेच्या अध्यक्षास म्हणजे प्रेसिडेंट ऑफ द united स्टेट्स याना त्यांच्या नावाच्या अद्याक्षरावरून सुरक्षा विभागात potus अशा टोपण नावाने उल्लेखतात, असे तेथील काही पुस्तकात वाचले आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे स्वताःचे एक सुरेक्षा कवच दल कायम आणि कुठेही असते.
त्यानंतर fbi चे कवच असते व त्यानंतर स्थानिक पोलिसांची खास व्यवस्था असते . cia ही संस्था देशाबाहेरील विरोधी शक्तींवर नजर ठेऊन असते.
अर्थात या सर्व संस्था एकमेकांशी समन्वय ठेऊन काम करीत असतात.

दारिद्र्याचे सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही कधी.
भारत असो वा अमेरिका राजकारणी लोक सगळे सारखेच!

पैसा's picture

6 Sep 2012 - 11:58 pm | पैसा

बघा बघा! तरी आम्ही सांगत होतो, भारत हा सगळ्या जगाच्या गुरुस्थानी आहे! ;)

यकु's picture

7 Sep 2012 - 12:27 am | यकु

बोगसपणा आहे झालं !

या प्रचारतंत्रावरुन एक विनोद आठवला.

सोनिया राजकारणात उतरल्या तेव्हा सुरुवातीला प्रचारात त्यांचं एक पालुपद असायचं , ' मै विधवा हूं.. मुझे वोट दो'
त्यावर चौकार लावताना अटल बिहारी बोलले -'वो कहती है मै विधवा हूं मुझे वोट दो - तो अब क्या मै भी कहुं, मै कुवाँरा हूं.. '
अर्थात एवढाच अश्लाघ्य जोक मारतील ते अटल बिहारी कसे असणार. 'अब प्रचार क्या इतने निचले स्तर पर चलेगा ' वगैरे वाक्यातून पुढे ते गुंडाळून घेणारच.

दादा कोंडके's picture

7 Sep 2012 - 12:38 am | दादा कोंडके

शेवटी आमच्या शंकर्‍याची मुंज आणि चाळमालकाच्या मुंजीत फरक असायचाच!

हुप्प्या's picture

7 Sep 2012 - 1:55 am | हुप्प्या

एका स्टँड अप कॉमेडियनचा विनोद.
तुम्ही जसे बिग बाझारमधे* खरेदी करायला जातो तसाच रॉमनीही जातो. गेल्याच आठवड्यात
त्याने दोन बिग बाझार खरेदी केले!

रॉमनी फक्त १३ टक्के दराने कर भरतो (बाकी मध्यमवर्गीय ३०-५० टक्के दराने). आता हे बरोबर आहे का? हो आहे. कारण त्याच्या सम्पत्तीचा १३ टक्के हिस्सा अमेरिकेत आहे (उरलेला परदेशी!).

रॉमनीचे अभिनंदन केले पाहिजे. त्याने असे दाखवून दिले आहे की एका लक्षाधीशाचा अब्जाधीश मुलगाही आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडून राष्ट्रपतीपदाचे नामांकन मिळवू शकतो!

प्राथमिक निवडणुका चालू असताना आपल्या प्रतिस्पर्ध्याशी रॉमनीने दहा हजार डॉलर्सची पैज लावली. असल्या रकमांच्या पैजा लावणे हे सामान्य अमेरिकन लोकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पत्रकारांनी त्याला याबद्दल छेडले असता तो म्हणाला, "माफ करा, तेव्हा माझ्या खिशात फक्त १०००० डॉलर्स होते म्हणून चुकून बोलून गेलो!".

* सोयिस्कर भारतीयीकरण!

रणजित चितळे's picture

7 Sep 2012 - 9:17 am | रणजित चितळे

त्याने करो सोंग किंवा नाकरो

नाना चेंगट's picture

7 Sep 2012 - 6:28 pm | नाना चेंगट