साहित्यः-एक वाटी जाडे तांदूळ(शक्यतो जुने असावे)
एक वाटी आंबट ताक
मूठभर पोहे
एक वाटी खवलेला नारळ
पाव चमचा हळद
अर्धा चमचा मेथी दाणे.
गूळ चवीप्रमाणे
मीठ
तूप.
कृती :- तांदूळ धुऊन घ्यावे.मेथी व ताक घालून ४-५ तास भिजत घालावे.बारीक वाटून घ्यावे. नंतर त्यात खवलेले
खोबरे,पोहे,मीठ्,हळद व गूळ घालून १०-१२ तास झाकून ठेवावे.तव्याला अथवा फ्राय पॅनला तूप लावून
जाडसर पीठ पसरावे.जाळीदार सुरनळ्याच्या कडा तांबूस झाल्या की न उलटता काढाव्या.पीठ तव्यावर
पसरले की वर झाकण ठेवावे म्हणजे वरील बाजू पण शिजेल. गरम असतानाच तुपाबरोबर खायला द्यावे.
(ह्याचप्रमाणे उसाच्या रसाच्या सुरनळ्या पण करतात्.त्यात ताकाऐवजी तांदुळ रसात भिजत घालावे.बाकी
कृती वरिलप्रमाणे).
प्रतिक्रिया
2 Sep 2012 - 4:54 pm | मन१
घरगुती चवीची पाकृ आवडली.
2 Sep 2012 - 5:01 pm | रेवती
हेच म्हणते.
वेगळा पदार्थ आहे हा.
2 Sep 2012 - 5:56 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा,,,,व्वा....! मस्त मस्त हाय. :)
2 Sep 2012 - 7:20 pm | गणपा
चला न्याहारीसाठी अजुन एक पदार्थ मिळाला. :)
2 Sep 2012 - 8:11 pm | सानिकास्वप्निल
सुरनाळी बघून भूक लागली आहे :)
झक्कास एकदम
2 Sep 2012 - 9:08 pm | शुचि
फारच छान.
2 Sep 2012 - 9:27 pm | सस्नेह
जरा हटके दिसतेय स्वीट डिश ! छान .
2 Sep 2012 - 9:28 pm | सुहास झेले
मस्त मस्त.... :) :)
इतक्या खादाडी धाग्यांवर प्रतिक्रिया दिलीय... शब्दसंपदा खुंटली ;-)
2 Sep 2012 - 9:41 pm | पैसा
मस्त आवडता पदार्थ! जाळी पण अप्रतिम पडलीय आणि या सुरनळ्या अशा जरा खरपूस मस्त लागतात. तुपाऐवजी नारळाच्या रसात गूळ घालून त्याबरोबर पण चांगल्या लागतात.
4 Sep 2012 - 6:44 am | स्पंदना
पहिल्यांदा ऐकला हा प्रकार. मस्तच असणार.