गाभा:
आताच बघितलेल्या बातमी नुसार धर्मनिरपेक्ष पक्षानी काढलेल्या मोर्च्याला मुंबईत हिंसक वळण लागले. त्यात प्रक्षुब्द जमावाने गाड्या व वृत्तवाहीनीच्या ओम्बी गाड्या देखिल जाळल्या आहेत. ह्याबद्दल अधिकमाहिती असेल तर इथे लिहावी.मुंबईची अश्या आंदोलनातुन कधी मुक्तता होणार?आंदोलन कर्ता संघटनेकडुन ह्याची नुकसान भरपाई घ्यावी .
प्रतिक्रिया
17 Aug 2012 - 11:46 pm | शिल्पा ब
<<मग ह्या हजारो लोकाना विस्थापित करणार्या मुस्लिमांच्या टगेगीरिला काय म्हणायचे ?
धर्मनिरपेक्ष लोकांचा हिंदु दहशतवादाविरुद्ध लढा.
18 Aug 2012 - 4:38 am | राजघराणं
वरील प्रतिक्रियांचा सारांश असा आहे की -
पुण्यातून हजारो चिंकींचे पलायन
पुण्यातले सो कॉल्ड चिंकी - मिंकी जिव मुठीत धरून आसामात पळाले आहेत. रजा अकेडमी ने मुबईत पुकारलेल्या मोर्चानंतर दंगल झाली. पुढे दिवसाढवळ्या पुण्यात धमकीसत्र झाले. त्याचेच हे परिणाम.
ही दंगल का झाली? मुस्लिमांचा मुंबईतला ह्रुदयसम्राट अबू आझमी म्हणतो की - म्यानमार नावच्या परदेशात झालेली दंगलीतली मुस्लिमांची हानी भारतीय मिडियाने दाखवली नाही ..... म्हणून ही दंगल झाली. शाब्बास रे मर्दा....
मुस्लिम मूलतत्ववाद्यांचा तद्दन खोटा प्रचार -
म्यानमारचे अत्याचाराचे जे सपशेल खोटे फोटो सोशल मीडीयावरून दाखवले जातात ते तर नैसर्गिक आपत्तींचे फोटो आहेत.प्रेममय बौद्ध भिक्कूनी चीनच्या भूकंपात खूप सेवाभव दाखवला होता आणी भूकंपात मेलेल्या प्रेतांच्या राशिसमोर उभ्या असलेल्या सेवाभावी बौद्ध भिक्कूचे फोटोचा दुरुपयोग या धर्मांधांनी चालवला आहे. जणू याच भिक्कूनी मुस्लिमांची कत्तल केली अन मुस्लिमांच्या प्रेतांच्या राशीवर बौद्ध भिक्कू उभे आहेत- आणी हा फोटो म्यानमार मधल्या बौद्ध भिक्कूंचा आहे असा सगळाच तद्दन खोटा प्रचार अतिरेक्यांनी चालवला आहे. त्यांचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. हे मी म्हणत नाही. विचारजंत सुमार केतकरानेच त्याच्या दिव्य मराठीत १३ ऑगस्टच्या अग्रलेखात हे लिहिलेले आहे. जो एक स्वःताला पेटवुन घेतलेल्या तरुणाचा फोटो तर ....तिबेट्टीयन तरुणाने चीन राष्ट्राध्यक्षाच्या भारतभेटीच्या वेळचा फोटो आहे. त्या फोटोंचा आणी मुस्लिमांचा अक्षरशः काहीही संबंध नाही. समजुन न घेता अशिक्षित मुस्लिम भारताची सुरक्षा वेठिस धरत आहेत्.किंवा धर्मांध कावेबाज तसे घडवून आणत आहेत.
पण प्रश्न असा आहे की कुठल्यातरी परदेशातल्या ,,, कुठल्यातरी तद्दन खोट्या फोटोंवरून इथे दंगल का? तीही एकट्या दुकट्याने न्हवे तर पन्नास हजार माथेफिरूंच्या जमावाने ?
अजून एक खोटा फोटो -
म्यानमारी सरकारने त्यांच्या देशातील निर्वासित रोहिंग्यों मुस्लिमाना परत बांग्लादेशात पाठवायला सुरुवात केल्यावर्, हात झटकले बांग्लादेश सरकारने; त्याना लगेच बोटीतुन बसवुन समुद्रात अल्लाच्या भरोश्यावर सोडुन दिले आहे. त्या बोटीत उपासमारी ने मरणार्या रोहिंग्यों मुस्लिमानाचे हात जोडलेले फोटो बघितल्यावर भडकणारे इस्लामचे बंदे तुम्ही ,त्या बोटी खुदाच्या भरोश्यावर सोडणार्या बांग्लादेशावर गरळ का ओकत नाही?
त्यांना जर रमजान महिन्यात त्यांच्याच लोकाना उपाशी मारायला लाज वाटत नसेल तर इतरानी काय म्हणून सहिष्णू रहावे? आसाममधे तर स्थानिक बोडो लोकाना बांग्लादेशी मुस्लिम मारत असल्यावर ते तरी कसे गप्प बसतील? लोकसभेत गरळ ओकणार्या ओवेशीला निवडुन देणारे मुस्लिमच आहेत ना?आसामचा मुस्लिम खासदार दंगे करण्याची भाषा करतो त्याला निवडुन कोण देते? मग हिंदुंबद्दल बोलणार्या भाजप-शिवसेनेला निवडुन देण्यार्या देशी मतदारांवर तुमचा राग का?
प्रथमपासून भारतीय असलेले नागरिक आणि बेकायदेशीरपणे घुसलेले बांगलादेशी नागरिक (उपरे) यांच्यातली तेढच आसाममधील अशांतता आणि त्यातून झालेली हिंसा यांच्या मुळाशी आहे. याला हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप कुणीही देता कामा नये. बिल्कुल देता कामा नये. आणी हाय रे दुर्दैवा !! मुस्लिमातले धर्मांध नेमके हेच करत आहेत. आणी भारतातले पुरोगमी विचारजंत; जणू काही घडलेच नाही अशा थाटात खाका खाजवत आहेत. पण......या घुसखोरांनी आसामी लोकांच्या नोकर्या पटकावणे, कांहींही नागरी हक्क नसताना दादागिरी करणे वगैरे गोष्टी करून तेढ निर्माण केलेली आहे.
याच्या मुळाशी कॉंग्रेसच पक्षाचे १९४७ सालापासूनचे "गठ्ठा-मतपेटी"चे धोरण आहेच. अलीकडे या धोरणामुळे काँग्रेसला झालेला फायदा पाहून "हम किसीसे 'कॉम' नहीं" म्हणत ममता, लालू, मुलायम यांचे आणि असेच इतर पक्षही हे "गठ्ठा-मतपेट्यां"चे राजकारण करू लागले आहेत हे भारताचे दुर्दैवच. यावेळी मुलायम 'उत्तर प्रदेशा'त सत्तेवरही आले. देशाची पर्वा कुणाला आहे?
मुस्लिमांच्या मतांवर सत्तेवर आलेल्या टोणग्या समाजवाद्यांनी भारतत्न डॉ बाबासाहेब अंबेडकरांचा, महाराष्ट्राचे छत्रपती शाहू महाराजांचा उघड अपमान केला. उत्तर प्रदेशातल्या जिल्ह्यांची नावे बदलायची नव समाजवादी मस्ती दाखवली. देशाची पर्वा कुणाला आहे?
लादेन मारला गेल्यावर दु:खी होणारे लोक या देशात आहेत
सद्दाम हुसेन ला फासावर लटकवल्यावर लखनौमधे निषेध मोर्चा काढणारेही आहेत
बांगलादेशींना फटकवल्यावर आसू ढाळणारेही इथे आहेत
या वृत्ती वेळीच नियंत्रणात आणायला हव्यात
काश्मिरमधल्या भारतीयांवरच्या हिंसाचाराविरोधात रझा आकादामीने एक ब्र तरी काढला आहे का? निदान सच्चरचे नियम लावून इथल्या स्थानिक भारतीय मुस्लिमांचे भले करा म्हणून छोटासा तरी मोर्चा या नव रझाकरांनी काढला आहे का ? नसेल तर म्यानमारमधले मुस्लीम गेले तेल लावत, आणि आसाममधले सगळे गुंड हे बांगला देशातून घुसून पुन्हा तिथे अत्याचार करत आहेत म्हणून.... आणी म्हणूनच ... बोडोंनी त्यांना धुतले. तरीही घुसखोरांशी निष्ठा सांगायची असेल तर स्वत:ला भारतीयही म्हणवून घेऊ नये. सरळ चालते व्हावे माझ्या देशातून. आपली ओळख कोणती? निष्ठा कुठे आहेत? आणि हा चौदा ऑगस्टच्या पाकी स्वातंत्र्यदिनाच्या मस्तीचा जल्लोष आहे का? नेभळट्ट सरकार आणि माध्यमांनी स्वातंत्र्यदिनाला समोर ठेऊन रझा आकादमी आणि तिच्या समर्थकांना हे प्रश्न खडसावून विचारण्याची गरज आहे.
देशाच्या ६५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या आसपास -
कोणत्याही धार्मिक आधारावरचे पागलखाने सहन करण्याचा भारतीयांचा संयम आता संपलाय. देशाचा कायदा हातात घेण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही धार्मिक गटाला नाही.. अजिबात नाही.. हे बडग्यासहित सांगितले . ..शेपूट पिरगाळून सांगितले ... तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे यापुढे देशाच्या नेतृत्वाने शेपटी कुठेतरी आत घालून ...बुझगावण्यासारखे वागू नये एवढीच वाजवी अपेक्षा ...तुम्हीआम्ही ठेवू शकतो.... ज्याकडे आतातरी कान देऊन ऐकण्याची आणि कृती करण्याची धमक सरकारने दाखवावी.
ह्या दंग्यामधे अमुक इतक्या महिला पोलिसांना विनयभंगासारख्या लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असे वाचायला मिळाले. आता एक प्रश्न असा आहे की महिला पोलिस कशासाठी उपस्थित होत्या? मोर्चे, निदर्शने यात जर बायका उपस्थित असल्यास त्यांचा बंदोबस्त करायला महिला पोलिस असतात. आता ह्या रझाकरांच्या मूळ मोर्चामधे कुणी महिला दिसत नाहीत. निदान कुठल्या व्हिडियोत वा फोटोत तरी कुणी मुस्लिम महिला दिसत नाहीत. मग इतक्या मोठ्या संख्येने आमच्या महिला पोलिसांना आणायला कुणी सांगितले तुम्हाला? धार्मिक मुस्लिम मोर्चामधे मुस्लिम बायकांना स्थान नसते इतकी साधी उघड गोष्ट पोलिसांना ठाऊक नाही? नमाज पढायला मशिदितही मुस्लिम स्त्रियांना इस्लाम धर्मानुसारच प्रवेश नसतो. हे ही पोलिसांना माहित नाही ??? हा काय मूर्खपणा आहे का निष्काळजीपणा आहे? मुंबई पोलिस दलातील स्त्रियांना धर्माधांनी बदडले. काय अब्रू राहिली आमच्या पोलिस दलाची ??? लाज वाटली पाहिजे पोलिस कमिशनराना अन शेपूट पिर - गाळू नेत्याना!
रजा अॅकेडमी चा ह्या मोर्च्यात पुढाकार होता. काहि वर्षापूर्वी भिवंडीत जगताप आणी गांगुर्डे नावाच्या दोन पोलिस शिपायाना दगडांनी ठेचून - ठेचून मारणारी हीच ती भिवंडीतली नीच धर्मांध रजा एकेडमी. मुस्लिम तरुणांची माथी भडकवून त्याना बांग्लादेशी घुस्खोरांच्या बाजूने दगडफेक करण्यास प्रव्रुत्त करणार्या रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ?
सरकारपेक्षाही खरा कळवळा वाटतो तो हिंदूतल्या विचारी अन पुरोगामी महामानवांबद्दलच ..
अरे पुरोगाम्या - बांगलादेशींचा फार कळवळा असेल तर तुमच्या घरातील २ खोल्या का देत नाहीस त्यांना...
असा कुठला बर छळ या बांगलादेशी मुसलमानांचा - त्यांच्या देशात होतो म्हणून - त्यांना इकडे निर्वासित व्हावे लागते? हे तरी कळू द्या ना ? ते गरीबीमुळे इथे येत असतील तर ...त्या देशाचा धर्मांधपणा हेच गरीबीचे कारणमात्र आहे हे नागडे सत्य तरी जनतेला कळू द्यात.
इथल्या (सर्वधर्मिय) नागरीकांना त्रास देणार्या बांगलादेशीं मुसलमानांना रेशनकार्डे देते हे कोंगी सरकार. आणि पाकिस्तानातून मुस्लिम धर्मांधाना घाबरून , बलात्कार, अपहरण आणी सक्तीच्या धर्मांतराला टरकून, जीव मुठीत धरून , भारतात पळून आलेल्या हिंदूना अटी आणि शर्ती ? व्हीसाची मुदत ? भारत सरकार हिंदूच्या बाबतीत आकसाने वागतेय असे वाटत नाही का?
आझाद मैदानाच्या धर्तीवर ... त्या तिथे पाकिस्तानात - कराचीत् / इस्लामाबाद मधे हजारो अल्पसंख्यांक हिंदूनी मोर्चा काढून जाळपोळ केली अशी एखादी बातमी कोणी दाखवू शकेल काय? अन समजा तसे झालेच तर त्याचा परिणाम पाकिस्तानात काय होईल ?
मी काही वर्षापासुन शिवसेना आणी हिंदुत्व सोडून कपाळावर पुरोगामी टिळा लवला आहे. हिदुत्ववाद्यात फक्त सनातनी हलकटांचा , प्रतिगामी अंद्धश्रद्धाळूंचा , जातीवादी उच्चवर्णीयांचा आणी संधीसाधू लबाड राजकारण्यांचा भरणा आहे असे लक्षात आल्यामुळे मी असे केले होते.. पण परवा टीव्हीवर दंगा बघितल्या नंतर मुंबईला शिवसेनेची किती गरज आहे हे लक्षात आले. आपण किती ही समजुतदार असलो तरी ज्यावेळी अशी हिंस्त्र दंगल आपल्या दाराशी येते तेव्हा शहाणपणा आपोआप फोल ठरतो.फाळणीच्या काळात घडलेल्या दंगलीत सापडलेल्या लोकाची हालात किती वाईट झाली असेल्? आणी अशा दंगली माझ्या घरात येईपर्यंत. पुरोगामित्वाचा टिळा लावून मानवतेच्या माळा जपत बसायला मी मतिमंद नाही.
म्यानमारी मुस्लिमांसाठी धर्मांधांनी भारतातले अमर जवान चे स्मारक फोडले
बांग्लादेशी मुस्लिमांसाठी शिकले सवरलेले धर्मपरायण मुसलमान मंत्री (दलवाई) टीव्हीवर गळे काढत आहेत
पाकमधले हिंदू विस्थापित होत आहेत
पुण्यातल्या अन बंगलोरमधल्या ईशान्य भारतीय हिंदूना (चिंकीना) पळून जावे लागत आहे.
पकिस्तानातही धर्मांधाना घाबरून हिंदूनीच पलायन करायच... आणी भारतात पण ... काय म्हणून ?
शांतीची - विवेकाची भाषा कोणाला कळत नसेल तर पुरोगामित्वाचे कुंकू पुसून उघड्या बोडक्याने मैदानात उतरावेच लागेल.
आज मात्र मला लाज वाटते आहे.
काल पुण्यातून २००० इशान्य भारतीय पळून गेले. आज १००० पळून गेले.
इतकी वर्षे त्याना चिंकी - चिंकी म्हणून आमच्याच लोकानी हिणवले. जातीपातीचा आणी चेहेरेपट्टीचा उल्लेख करत आपणच त्याना एलियन ठरवले.
आज पी ए इनामदारच्या कॉलेजातले - दीड दमडीचे भिकार मुस्लिम गुंड त्याना धमक्या देत आहेत.
त्या ईशान्येतल्या हिंदूना जिवाची भिती वाटली आणी पुण्याचे तथाकथित सदाशिवपेठी भट देशभक्त इतक्या वर्षात त्यांच्या मनात रक्षणाचा साधा विश्वास निर्माण करू शकले नाहीत. ब्रिगेडी मावळे अन पुरोगामी कावळे देखिल त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकले नाहीत हेही सत्यच. मनसेच्या स्थनिकीय अतिरेकामुळे तुटातुटीला बळ मिळाले हे कोण नाकरेल ?
६५ वर्ष झाली देश स्वतंत्र होउन. अजुनही दीड दमडीच्या भिकार गुंडामुळे भारतीय नागरीकांना आपल्याच देशात स्थलांतर करावे लागते.
मान खाली गेली. लाज वाटली स्वत:चीच
राज ठाकरेंचे आंदोलन मिडियाने चघळ चघळ चावले. त्यात १० लोक सुद्धा प्रत्यक्षात विस्थापित झाले नसतील. राजना फॅसिस्ट हिटलर वगैरे ठरवले... फिरररर उगला जहर ..राजच आंदोलन राजकीय फायद्यासाठी होतं. बर ठीक आहे.. मग ह्या हजारो निरपराध चींकी लोकाना विस्थापित करून पुण्याबाहेर ढकलणार्या मुस्लिमांच्या टगेगीरिला काय म्हणायचे ?
धर्मनिरपेक्ष लोकांचा हिंदु दहशतवादाविरुद्ध लढा ???????????????????
आणी खरा प्रश्न असा आहे की चींकीं हिंदूं नंतर कोण - कोण हिंदू , कुठून - कुठून , कुठे- कुठे , कसे - कसे पळणार आहेत ? पुढचा नंबर कोणाचा ??
छे - छे - छे - छे हे महत्वाचे नाहिच - आपली तथाकथित जात,आपला तथाकथित इतिहास , आपली संस्क्रुती , भाषा, आमची राजकीय महत्वाकांक्षा ; पैसे मिळवणाच्या संधी हेच खरे महत्वाचे विषय आहेत. नाही का ?
18 Aug 2012 - 8:43 am | llपुण्याचे पेशवेll
अरे आपल्या देशात उद्या दुष्काळ पडला तर याच सरकारचे अन्न खाणार ना! का देणारेत का ते बांग्लादेशी ,पाकीस्तानी,, सौदीतले मुसलमान.
18 Aug 2012 - 2:53 pm | आंबोळी
सगळ्यांचे प्रतिसाद एकत्र करून प्रतिसाद द्यायचे कारण कळाले नाही...
19 Aug 2012 - 9:26 pm | गोंधळी
परत एकदा.काय ते समजुन घ्या.
19 Aug 2012 - 9:53 pm | आशु जोग
लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या
असं सावरकर का म्हणाले असतील बरे !
19 Aug 2012 - 10:03 pm | हुप्प्या
http://www.youtube.com/watch?v=VnmNMEvTb7I
ह्या दंगली चालू असताना काही पोलिस (ज्यात हे दुर्भागी डीसीपीही होते), आपल्या परीने गुंडाना पकडायचा प्रयत्न करत होते. पण ह्या चित्रफितीत दिसते की खुद्द कमिशनर त्या डीसीपीवर गुरकावले आणि त्याने पकडलेल्या गुंडाला सोडून द्यायचा आदेश दिला. जर परत असा वागलास तर सस्पेण्ड करीन अशी उर्मट धमकीही दिली. मी कमिशनर आहे आणि मी सांगेन तसेच झाले पाहिजे असा दम दिला.
योग्य जागी अधिकार दाखवणे ठीक पण इथे त्याचे प्रयोजन काय? पोलिसांना त्यांच्या लायनीपरमाने जाऊ न देण्यामागे काय कारण ? वरुन प्रेशर आले होते का पटनाईकांना दंगलीची भीती होती?
इतकी भीती होती तर ह्या मोर्चाला परवानगी का दिली? एकदा परवानगी दिली की कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. मग संयम वगैरे गप्पा फालतू वाटतात.
20 Aug 2012 - 8:59 pm | राजघराणं
फेसबूक, सोशल मिडियावरून पुन्हा धुमाकूळ चालू आहे. ईट का जवाब पत्थर से. घेता मिटवून की देवू पेटवून अशी हिंदू दमबाजी चालू झालेली आहे. धार्मिक दंगलीतून काहिच साध्य होत नाही. उद्याचा मोर्चा शांततेत पार पडायला हवा. तोडफोड , दगडफेक, हाणामारी आणी जाळापोळ न करताही विरोध करता येतोच.
20 Aug 2012 - 10:34 pm | मदनबाण
उद्या राज ठाकरे कसा आक्रमक पवित्रा घेतात ते पहायचे आहे !
आर ठाकरेंसाठी ही मोठी संधी आहे,त्याचा ते कसा उपयोग करतात ते कळेलच उद्या.
20 Aug 2012 - 10:28 pm | शिल्पा ब
<<<तोडफोड , दगडफेक, हाणामारी आणी जाळापोळ न करताही विरोध करता येतोच.
अगंबै ! खरं की काय ?
20 Aug 2012 - 11:41 pm | अर्धवटराव
शिवसेना आता कायम राज च्या दोन स्टेप मागेच राहाणार असं दिसतय....
पण "ईट का जवाब पत्थरसे" ची ताकत अजुन राज मध्ये आलेली नाहिए. त्याला सेनाच पाहिजे.
अर्धवटराव
20 Aug 2012 - 11:48 pm | आशु जोग
>>शिवसेना आता कायम राज च्या दोन स्टेप मागेच राहाणार असं दिसतय....
म्हातारपण ! दुसरं काय ...
21 Aug 2012 - 7:51 am | हुप्प्या
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15578973.cms
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी आझाद मैदानात झालेल्या मुस्लिम लोकांनी घडवून आणलेल्या दंगलींविरुध्द आणि ती आटोक्यात न आणणार्या पोलिस व गृहखात्याविरुद्ध जोरदार टीका केली तर ह्याचा अर्थ आता ह्या दोघांत साटेलोटे आहे वगैरे. म्हणजे मूळ मुद्याकडे दुर्लक्ष. आता कुठलाही विरोधी पक्ष ह्या सरकारी षंढ, निष्क्रियपणावर तुटून पडेलच. खरे तर काँग्रेस व राष्ट्रवादीतील लोकांनीही ह्या घटनेचा निषेध करायला हवा होता. कडक कारवाई करुन दाखवायला हवी होती. पण ते होत नाही.
गुजराथेतील खर्या खोट्या दंगली, अण्णा हजारे, त्यांची टीम, मग त्यातल्या किरण बेदीने जास्त हवाई भाडे घेतले का? घेतल्यास तो किती मोठा गुन्हा? वगैरे बाबतीत चर्चांचे गुर्हाळ अनेक महिने चालू ठेवणारी चॅनेल्स ह्या बाबतीत अळीमिळीगुपचिळीचे धोरण स्वीकारतात की काय असे वाटते. तुलनेने अगदीच थोडे कार्यक्रम दिसले ज्यात ह्या घटनेवर चर्चा झाली. सरकारचे प्रतिनिधी, आमदार, मंत्री वगैरे कुणाला त्यांची बाजू मांडायला बोलावले नाही. एकाच कार्यक्रमात आबा पाटील येऊन (तेही फोनवर) थोडावेळ जुजबी बोलून त्यांनी फोन कट केला.
हे काय जाणून बुजून हा प्रकार दुर्लक्षित करण्याचा प्रकार आहे का? कदाचित असे कव्हरेज कमी ठेवण्याकरता वरुन प्रेशर येत असावे.
बघू राजसाहेबांच्या मोर्चातून काय निष्पन्न होते ते.
21 Aug 2012 - 4:54 pm | राजघराणं
मोर्चा शांततेत पार पडला. हुश्श. बर झाल. राज ठाकरेंच भाषण मुद्दे आणी वक्तृत्व केवळ बिनतोड. राज नी शिवसेनेला धोबिपछाड तर मारलीच. पण बराच राजकीय फायदा मिळवला... तेही कुठेही धार्मिक भावनेला हात न घालता. लई भारी.
21 Aug 2012 - 5:27 pm | पुष्करिणी
भाषणाची ऑडिओ लिंक वगैरे असेल तर इथे द्याल का?
21 Aug 2012 - 6:34 pm | राजघराणं
http://www.ibnlokmat.tv/showvideo.php?id=251502
24 Aug 2012 - 11:58 pm | आशु जोग
राज यांची मागणी अर्धी मान्य झाली तरी
मूळ मुद्दा शिल्लक राहतोच.
कायद्याच्या रक्षकांचे हात बांधलेले असतील तर
दहशतवादाचा सामना कसा करणार ?