गाभा:
सर्व मिपाकरांना विनम्र अभिवादन!
१)मला माझ्या व्य्वसायानिमित्त एक मोठी फाइल पाठवायची आहे. फाइल पिडीएफ आहे साइझ ६ एम्बी.
२)माझे file factory वर account तिथे मी ती फाईल अपलोड केलेली आहे. ज्या संस्थेला ती पाठ्वायची आहे त्यांना मी जर लिन्क पाठवली तर ते डाउन्लोड कसे करतील अशी शंका आहे.
३) रिसिपिएन्ट ला पण तिथे अकौन्ट काढावे लागेल का?
समजा त्याना एक्सेस मिळाला नाही तर पोपट होउ नये म्हणून हे लिहीत आहे.
आपल्या मिपा कुटुंबातील टेक्नोक्रॅट मला मदत करतील अशी आशा आहे.
तसेच जर आणि काही ऑपशन्स असतील तरी सर्व सुचनांचे स्वागत आहे.
कृपया मदत करावी ही विनंती.
http://www.filefactory.com
प्रतिक्रिया
20 Aug 2012 - 8:26 am | बटाटा चिवडा
तुम्हास देखील विनम्र अभिवादन!
ओके
शंका रास्त आहे. तुम्ही file factory account sign out करून मग त्या लिंक वर टिचकी मारून स्व:ता ती file एकदा डाऊन लोड करून पाहा.
अकौंट काढावे लागू शकते........वर नमूद केलेला उपाय करून पाहावा, शंका दूर होईल अथवा पक्की होईल ...
उत्तम केले..पोपट होऊ देऊ नका..पूर्ण खात्री करून मगच लिंक पाठवा.
टेक्नोक्रॅट नक्की मदत करतील अशी मलाही आशा आहे...
अहो आहे न १ ऑप्शन... ईमेल करा ती file .. जीमेल किंवा याहू मेल वरून २५ mb फाईल पाठवू शकता..ही सूचना नसून सुचवणूक आहे...
प्रयत्न केला आहे..
कळावे, लोभ असावा ...
20 Aug 2012 - 9:31 am | माझीही शॅम्पेन
फक्त साइझ ६ एम्बी ?
सरळ gmail मध्ये Attachment करुन त्यान्च्या email adress वर पाठ्वा
20 Aug 2012 - 4:46 pm | कापूसकोन्ड्या
@ बटाटा चिवडा
आपल्या मुद्देसुद खुलाशाबद्दल शतशः धन्यवाद.
मला जिमेलचा संदेश आला त्याप्रमाणे ती लिमीट फक्त ५ एम बी आहे. तरीही परत एकदा चेक करतो.
परत एकदा धन्यवाद.
@ माझीही शॅम्पेन
वरचेच कमेंट.
दोघानाही धन्यवाद.
20 Aug 2012 - 9:01 pm | अनिता
www.yousendit.com वापरुन पहा..
21 Aug 2012 - 12:08 am | नेत्रेश
www.yousendit.com
हाच प्रतिसाद देणार होतो.
20 Aug 2012 - 10:13 pm | तुषार काळभोर
गुगलचं खातं असलं तर त्यांच्या ड्राइव वर चढवून शेअर करता यील.
(६ यम्बी....आगं बाबौ!!)
अवांतरः मी पहिल्यांदा रेडीफचं खातं काढलं तवा टोट्टल ५ यम्बी जागा व्हती!!
20 Aug 2012 - 11:26 pm | अभ्या..
एक मोठी फाइल पाठवायची आहे. फाइल पिडीएफ आहे साइझ ६ एम्बी.
ड्रॉपबॉक्स मधे ६०० एमबी च्या फायली आल्या होत्या. ते पन गुगल च २५ एमबी लिमिट म्हणुन. पण दोघांकडे ड्रॉपबॉक्स install लागतो.
21 Aug 2012 - 1:46 am | अविनाशकुलकर्णी
सरळ प्रिन्ट आउट मारा अन कोरिअर करा .फोटो असतिल त्यात तर ते पण पाठवा .२-४ दिवसात पोहोचेल पण
..हाय काय अन नाय काय
अर्थात फाईल परदेशात पाठवणार असला तर शब्द मागे घेतो..
21 Aug 2012 - 11:57 am | निनाद
सेव्ह फॉर वेब करून आकार कमी नाही का करता येणार?
अर्थात उत्तम छपाईला जरा प्रश्न येऊ शकतो.
शिवाय चित्रे असली तर जरा कमी आकाराची चित्रे वापरा.
त्यामुळेही आकार कमी होईल असे वाटते.
तसेच भाग १ आणि भाग २ असे दोन तुकडेही करता येतील.
जी-मेल ला २५ एम्बी पर्यंत नक्कीच फाईल पाठवता यावी...
21 Aug 2012 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार
येवढी मोठी फाईल पाठवल्याने कदाचीत सर्व्हरवरती ताण येऊ शकतो. उगाच सर्व्हर डाऊन वैग्रे झाल्यास; सायबर क्राईम डिपार्टमेंटचे लफडे मागे लागण्याची शक्यताच जास्ती आहे. तरी जे कराल ते काळजीपूर्वक करा.
23 Aug 2012 - 6:37 pm | कापूसकोन्ड्या
प्रिय परा,
तुमची कळकळ समजली. खरं तर याच साठी मिपावर यायचे
मला एका पदवी साठी इस्टिटयुट ऑफ इन्टर्नल ऑडीटर्स या संस्थेकडे अर्ज म्हणून एक पिडीएफ पाठवायची होती. संस्थेची च मर्यादा ५ एम बि होती. मग शेवटी मी ती फाइल तोडून पाठवली. काम फत्ते झाले.
धन्यवाद.
23 Aug 2012 - 6:39 pm | कापूसकोन्ड्या
प्रिय परा,
तुमची कळकळ समजली. खरं तर याच साठी मिपावर यायचे
मला एका पदवी साठी इस्टिटयुट ऑफ इन्टर्नल ऑडीटर्स या संस्थेकडे अर्ज म्हणून एक पिडीएफ पाठवायची होती. संस्थेची च मर्यादा ५ एम बि होती. मग शेवटी मी ती फाइल तोडून पाठवली. काम फत्ते झाले.
धन्यवाद.
24 Aug 2012 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार
वरिल प्रतिक्रिया मी गंमत म्हणुन दिली होती. जोवर तुम्ही इंटरनेटवरील कुठल्याही सुविधेचा गैरवापर करत नाही तोवर कसलीही काळजी नाही.
५mb फाईल अतिशय नगण्य आहे. काही काही सर्वर वरुन याच्या १००० पट मोठ्या फाईल्स फुकटात आणि सहजपणे कायदेशीर रित्या पाठवता येतात. गुगल ची मदत घेतलीत तर अजुनही बर्याच सुविधा सापडतील.
23 Aug 2012 - 6:53 pm | मदनबाण
मग शेवटी मी ती फाइल तोडून पाठवली. काम फत्ते झाले.
कधी गरज भासलीस तर मी सुद्धा हेच करतो...
काही दुवे:---
www.download.cnet.com/Split-and-Join/3000-2248_4-10485983.html
www.hjsplit.org
hjsplit.en.softonic.com
24 Aug 2012 - 5:56 am | कापूसकोन्ड्या
उपयुक्त माहिती आणि लिन्का बद्दल धन्यवाद