ट्रेक - सुधागड

स्पा's picture
स्पा in भटकंती
18 Aug 2012 - 7:56 pm

अरे तुम्हाला साडेसात सांगितलेले ना.. अजून तू कल्याण लाच आहेस.. कधी घरी जाणार आणि निघणार?
माझ डोकच फिरलं होत. मी कसाबसा हापिसातून लवकर कट्लेलो होतो , आणि वेळेत तयार होतो, पण आमच मित्रमंडळ अजून घरीच पोचत होतं , पुण्याची टीम निघाली पण होती
खोपोलीत भेटायचं ठरलेल होतं . संध्याकाळी पनवेल किती प्याक असत हे अनुभवाने माहित होत .. आणि आम्हाला पालीला पोचायचं होतं , ८ इकडेच वाजले होते. कस काय होणार होतं ..
शेवटी दोघ मित्र एका बाईक वर. आणि मी एकटा माझ्या यमी (माझ्या यामाला मी लाडाने यमी म्हणतो ;) ) सोबत निघालो . रात्री जास्त पळवता पण येत नाही , कसे बसे ९.३० च्या दरम्यान पनवेल च्या पुढे आलो . टाईम टेबल बोम्बलेल होतं. खोपोली अजून ३८ किमी . पण रस्ता मस्त होता.. मजबूत रापत.. अर्ध्यातासात खोपोली टच. सूड अन्या आलेलेच होते . खोपोलीतच जेवलो.. तोपर्यंत ११ वाजून गेलेले होते.. खोपोली निपचित पडलेली होती.. अधून मधून पावसाची सर येत होती.. खोपोली - पाली रस्ता माहित नव्हता , एका पानवाल्याला विचारलं.. तो जरा हळू आवाजात बोलला .. जा राहे हो.. संभालके जाव.. रोड ठीक नही हे.. बर्र म्हटल.. थोड पुढे आलो. . परत एका हाटेलात एकाला विचारल.. त्याने तर बॉम्बच टाकला , म्हणाला.. नीट जा.. रस्त्यात थांबू नका अजिबात.. कोणीही आलं तरी.. हवतर उडवा सरळ.. कोण नाय पकडत तुम्हाला.. चायला म्हटल.. हि काय भानगड आहे.. असो जे काय होईल ते होईल.. ३ बाईक ५ जण निघालो
खोपोली मागे टाकल.. आणि सुमसान रस्ता सुरु झाला .. बेक्कार अंधार.. आणि रस्त्यावर एकही वाहन नही.. फक्त आमच्या ३ बाईक्स .. एकमेकांना कवर देत जात होतो.. रस्ता पण बेक्कार.. द्नही बाज्जूंना गर्द जंगल.. कोणी मधेच लुटलं तरी या कानाच त्या कानाला कळणार नही.. आता कळत होत कि ती माणसं का सूचना देत होती. . त्यात मी एकटा.. मागे बोलायला कोण नाहीं.. रस्ता अतिशय खराब . एका वळणावर.. खड्ड्कन काहीतरी माझ्या हेल्मेट मध्ये घुसलं.. एकदम बाईकचा कंट्रोलच गेला.. कशीबशी साईडला घेतली .. एक नाक्तोड्यापेक्षा मोठ्या आकाराचा काळा किडा आत घुसलेला होता.. नशीब मेल्याने चावलं नाहीं..... अजून जरा दुर्लक्ष झाल असत तर बाईक सकट रानात घुसलो असतो .. परत सावरून निघालो , मित्रमंडळ पुढे गेलेलं होत ..
कधीतरी एकदाचा तो भयंकर रोड संपला. आणि पालीत घुसलो .. बल्लाळेशवराच्या देवळापाशी आलो १ वाजून गेलेला होता.. आता पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता.. इथेच मुक्काम केलेला बरा.. भक्त निवासात जाग होती. तिथे विचारल.. सुदैवाने रूम मिळाली . मस्त अंग टेकवलं ..
सकाळी ५ ला उठलो.. आता उशीर करून चालणार नव्हत.. . पटापट अंघोळी उरकल्या ..बल्लाळेशवराच दर्शन घेतलं.. बाहेर चहा पोहे हादडले आणि निघालो...

ठाकूर वाडीत पोचलो , तेंव्हा तिथल्या छोटुश्या शाळेत लहानग्यांचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरु होता :)

१.
२.
अशी घर मला जाम आवडतात

३.

सुधागडाच पहिलं दर्शन
४.

५.

६.

गड चढाइला एकदम सोप्पा आहे. मध्ये मध्ये थोडे रॉक प्याचेस आहेत
७.

७अ.

८.

९.
१०.
गडावर एक मस्त तळ दिसल , तिकडेच जरा आराम केला. सोबतच्या न्याहारीवर ताव मारला आणि पुढे निघालो
११.

पाऊस इतका वेळ दाटून आलेला होता .. आम्ही पंतांच्या वाड्यात शिर्ल्यासोबत मजबूत पडायला लागला .. वेळेवर पोचलो म्हणायचो
हि त्या पडल्या वाड्यातली काही चित्रे
१२.
१३.
१४.
१५.
१६.

तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच होते..
किसन, विलास राव, अल्पेश आणि विमे
ते भेटले
तिथून थोडे पुढे भोराई देवीच देऊळ आहे ते पाहायला निघालो
१७.

१८.

देवळाच्या आसपासचे काही अवशेष , सती शिळा आणि विरगळ
१९.
२०.
२१.
२२.
२३.
पाउस परत भरून आला. आणि निळसर धुक्यातल हे दृश्य पाहून भान हरपून गेलं

२४.

गडाच्या टोकावरून काही घेतलेली प्रचि.

२५.
२६.
२७.
२८.
२९.
तिथून परत दुसर्या टोकाला थोड खाली उतरलो.. दिंडी दरवाज्यापाशी आलो.. हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या दरवाज्याची हुबेहूब प्रतिकृती आहे आहे. पण हि वाट आता वापरात नसल्याने भयाण रान माजलेल होत.. वाट कुठून वर येतेय हेही कळत नव्हत

३०.

"याचसाठी केला होता अट्टाहास."..
गड सर झाला कि हीच भावना असते :)
३१.

येताना भराभर खाली आलो. ४ वाजलेले होते , ४ .३० च्या आसपास निघालो.. फक्त पालीला एक चहाचा ब्रेक घेतला , तिथून जे सुसाट सुटलो
८० - ९० च्या स्पीड ने.. पनवेलात घुसलो. तेही अवघ्या दीड तासात .. तिथून एका तासात डोंबिवली ..
एकूण सुधागड करायला धमाल आली.. तरी बरंच पहायचं राहून गेल वेळे अभावी ,
पुढच्यावेळी रात्री मुक्कामालाच वर जाऊ .. म्हणजे फुरसतीत गड पाहता यील :)

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Aug 2012 - 8:30 pm | यशोधरा

जाळ्याचा फोटो सगळ्यात भारी!
छान :)

पैसा's picture

18 Aug 2012 - 8:33 pm | पैसा

वृत्तांत आणि फोटो नेहमीप्रमाणेच मस्त. प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच दिली आहे असं समजून घ्यावे.

शैलेन्द्र's picture

18 Aug 2012 - 11:45 pm | शैलेन्द्र

+१ अगदी असेच..

बाकी तो किड्याचा प्रकार बघता मी तुझ्याबरोबर नव्हतो ते बरच झाल म्हणायच.. आणी असतो तरीहि त्या पॅचला गाडी मीच चालवली असती. :)

सगळे फोटू आवडले पण त्यातले क्र. ६ व २४ जास्त आवडले.
अवांतर: यावेळी मादक नव्हता का आला? ;)

मोदक's picture

18 Aug 2012 - 9:04 pm | मोदक

कोण मादक..? ;-)

अवांतर म्हणून वैयक्तीक प्रश्न... समज द्यावी... वैग्रै.. वैग्रै.. :-D

मस्त काढलेत रे फोटो. आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू मस्त आणी वर्णन वाचनीय.... :)
त्या सुधागडावर २/३वेळा आणी पालित अनेकदा कामानिमित्त गेलेलो आहे. त्यामुळे सर्व काही परिचयाचे आहे,तसेच काहि जुन्या अठवणी जाग्या जाहलेल्या आहेत. ;)
त्या वरच्या पाट्यावरवंट्या समान दगडावर (फोटू क्र-१३) मी अर्धा किलो तांबड्या मिरच्या खडे मिठा सह वाटल्या होत्या,आणी तो दगड धुतल्यानंतर थोडास्सा ओलसर असताना,त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला एक बाब्ब्या(पंचासह) बसलावता...आणी मग २ मिनिटानी तो जे बोंबलत उठला,तो दुपारी खाली गावातुन कुणितरी गोपिचंदन आणल्यावर जमिनिवर बसू शकला होता.

@स्पांडू भयकथा मोड ऑन>>>>
>>>> तोपर्यंत ११ वाजून गेलेले होते.. खोपोली निपचित पडलेली होती.. अधून मधून पावसाची सर येत होती.. खोपोली - पाली रस्ता माहित नव्हता , एका पानवाल्याला विचारलं.. तो जरा हळू आवाजात बोलला .. जा राहे हो.. संभालके जाव.. रोड ठीक नही हे.. बर्र म्हटल.. थोड पुढे आलो. . परत एका हाटेलात एकाला विचारल.. त्याने तर बॉम्बच टाकला , म्हणाला.. नीट जा.. रस्त्यात थांबू नका अजिबात.. कोणीही आलं तरी.. हवतर उडवा सरळ.. कोण नाय पकडत तुम्हाला.. चायला म्हटल.. हि काय भानगड आहे.. असो जे काय होईल ते होईल.. ३ बाईक ५ जण निघालो
खोपोली मागे टाकल.. आणि सुमसान रस्ता सुरु झाला .. बेक्कार अंधार.. आणि रस्त्यावर एकही वाहन नही.. फक्त आमच्या ३ बाईक्स .. एकमेकांना कवर देत जात होतो.. रस्ता पण बेक्कार.. द्नही बाज्जूंना गर्द जंगल.. कोणी मधेच लुटलं तरी या कानाच त्या कानाला कळणार नही.. आता कळत होत कि ती माणसं का सूचना देत होती. . त्यात मी एकटा.. मागे बोलायला कोण नाहीं.. रस्ता अतिशय खराब . एका वळणावर.. खड्ड्कन काहीतरी माझ्या हेल्मेट मध्ये घुसलं.. एकदम बाईकचा कंट्रोलच गेला.. कशीबशी साईडला घेतली .. एक नाक्तोड्यापेक्षा मोठ्या आकाराचा काळा किडा आत घुसलेला होता.. नशीब मेल्याने चावलं नाहीं..... अजून जरा दुर्लक्ष झाल असत तर बाईक सकट रानात घुसलो असतो .. परत सावरून निघालो , मित्रमंडळ पुढे गेलेलं होत ..
कधीतरी एकदाचा तो भयंकर रोड संपला. आणि पालीत घुसलो .. बल्लाळेशवराच्या देवळापाशी आलो १ वाजून गेलेला होता.. आता पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता.. इथेच मुक्काम केलेला बरा..
<<<<< स्पांडू भयकथा मोड ऑफ...

स्पांडू बघ बघ ...अता नॅचरली करंट लागलाय ,त्यामुळे चांगली ५/६ भागाची भयकथा येऊ दे....

''काय बाकिची दोस्त मंडली,,,,मी बोल्तो ती गोष्ट सच्ची का नाय...? मंग द्या....द्या...अनुमोदन ;)

गोपिचंदन तुम्हीच लावलंत काय?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

तुम्हीच लावलंत काय? >>> दु....दु... हल्कत...बवल्त...अचरत
बंदुक-आत्मा<< >> अस्वल-वल्ली :-p

प्रचेतस's picture

18 Aug 2012 - 10:53 pm | प्रचेतस

दुष्टपणा काय यात?
मिरच्या तुम्हीच वाटल्यात ना? मग गोपिचंदन तुम्हीच लावायला हवे ना?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा

@मिरच्या तुम्हीच वाटल्यात ना? मग गोपिचंदन तुम्हीच लावायला हवे ना?>>> कैच्याकै

पण ती काय बसायची जागा होती का...? :-p

आणी हे अता बास.... नायतर अवांतरानीच शंभरी भरायची :)

प्रचेतस's picture

18 Aug 2012 - 11:06 pm | प्रचेतस

कैच्याकै
पण ती काय बसायची जागा होती का...

आता बसला एखादा चुकून त्यावर, मग त्यावर मलमपट्टी करायला नको का तुम्ही?

आणी हे अता बास.... नायतर अवांतरानीच शंभरी भरायची

ट्यार्पी वाढतोय ना.

वल्लीशी (नेहमीप्रमाणे) बाडीस...

त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला एक बाब्ब्या(पंचासह) बसलावता...

बसलावता की तुम्हीच बसवलावता...? :bigsmile:
आठ्वण तुम्ही ज्या आनंदात सांगितलीत त्यामुळे शंका आली... :tongue: बाकी गोपीचंदन लावायचा सल्ला नक्की तुमचाच असणार.. ;)

स्पा's picture

20 Aug 2012 - 3:27 pm | स्पा

आठ्वण तुम्ही ज्या आनंदात सांगितलीत त्यामुळे शंका आली... Tongue बाकी गोपीचंदन लावायचा सल्ला नक्की तुमचाच असणार

=)) =)) =))

(स्वानुभवी) सल्ला असे लिहायचे होते का? :-p

चौकटराजा's picture

19 Aug 2012 - 12:26 pm | चौकटराजा

अस्वलाच्या गळ्यात दुर्गदर्शनचा बायनाक्युलर आहे काय ? बाकी तब्बेत बरोबर निवडली आहे.फुलपॅन्टच्या जागी बर्म्युडा हवी .
आगाउ समीक्षक चौरा -

प्रचेतस's picture

18 Aug 2012 - 10:36 pm | प्रचेतस

फोटो छान.
पण अतिशय त्रोटक लिहिलंस.
गडाचे वर्णन हवे होते अजून.

गडाच वर्णन नेहमीप्रमाणे किसण द्येव लिहितीलच

एस's picture

19 Aug 2012 - 3:36 am | एस

१०. Exacum Lawii
२८. Begonia Crenata

असावीत.
२९. खूप शोधले पण नाव सापडले नाही. सर्वात छान प्रचि...

चौकटराजा's picture

19 Aug 2012 - 8:37 am | चौकटराजा

फोटो पाहून डोळे निवले. पॅनोरामिक मधेही मस्त आलेयत. वर्णानाची शैली भन्नाट पण हे गणपती विसर्जनाची डाळ खाल्यासारखं वाटलं . जास्त लिवा ना राव !

सुहास झेले's picture

19 Aug 2012 - 10:19 am | सुहास झेले

मस्त रे ...!!

पाऊस नव्हता जास्त आणि गर्दी नव्हती हे अतिशय बरंय... तरी खूप काही मिस केलंत रे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2012 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे. फोटोही झकास. १२,१४,१६, आणि २४ या छायाचित्रांना पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. बाकीच्या फोटोंनाही पैकीच्या पैकी गुण दिले असते पण ते बरं दिसत नाही म्हणुन थोडे कमी दिले आहेत. :)

ऑक्टोंबरात गेला असता तर मीही आलो असतो. मागे वर्षाभरापूर्वी ठाण्याहुन बाईकवर या खोपोलीला गेलो होतो. तिथे कुठे एक झेनिथ नावाच्या धबधब्याखाली आणि काठावर संपूर्ण दिवस काढल्याची साठवण आहे. :)

-दिलीप बिरुटे

सौरभ उप्स's picture

19 Aug 2012 - 4:30 pm | सौरभ उप्स

मस्त रे, तुझ्याकडचे फोटो इथेच बघावे लागले तर....
मस्त आलेत फोटू....

किसन शिंदे's picture

19 Aug 2012 - 8:55 pm | किसन शिंदे

सुधागड!!

भोर संस्थानाचे वैभव असलेला हा गड पाहायला जायचं जेव्हा नक्की केलं तेव्हापासूनच या गडाबद्दल माझ्या मनात खुप उत्सूकता होती. ऑफिसच्या भलत्या शेड्यूलमुळे मंगळवारी १४ तारखेला न निघता १५ ला सकाळी ४ वाजता निघायचं मी नक्की केलं, सोबत विमे, विलासराव आणि अलिकडेच आमच्या भटकंतीमध्ये छानपैकी रुळू लागलेला अल्पेशही होता.

सकाळी ५.३० ला विमे आणि विलासरावांना घेतलं आणि आमच्या दुचाकी पनवेलच्या दिशेने धावू लागल्या. साधारण ६.३०/७ ला पनवेलला पोहचलो आणि तिथून पुढे खोपोलीच्या अलिकडे येणार्‍या पाली-खोपोली रोडने ९.३० ला पाली गावात पोहचलो. नंतर थोडा गोंधळ उडाल्यामुळे पालीच्या पुढे असणार्‍या पाच्छापूर मार्गे ठाकूरवाडीत पोहचायला ११ वाजले.

असो. आता थोडी गडाविषयी माहिती -

सुधागडाच्या परिसरात असणारी ठाणाळे लेणी ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. पुराणात भृगु ऋषींनी या किल्ल्यावर वास्तव केल्याचा उल्लेख आढळतो. याच ऋषींनी गडावर भोराई देवीची स्थापना केली. या फार प्राचीन असणार्‍या किल्ल्याची उंची साधारण १८०० फुट असावी. शिवपुर्वकालात गडाचे भोपरगड असे नाव होते पुढे इ.स. १६४८ मध्ये स्वराज्यात आल्यानंतर शिवछत्रपतींनी याचे 'सुधागड' असे नामकरन केले.

औरंगजेबाच्या हुकूमशाहीला कंटाळलेला त्याचा मुलगा अकबर हा संभाजी राजांशी हातमिळवणी करण्यासाठी आला त्यावेळी संभाजी राजांचा मुक्काम सुधागडावर होता. या गडाच्या पायथ्याशी असणार्‍या 'पाच्छापूर' गावात त्याने तळ ठोकला आणि संभाजी राजांच्या भेटीची वाट पाहू लागला. त्यादरम्यान संभाजी राजांच्या 'कडक' शिस्तीच्या राज्यकारभाराला कंटाळलेले महाराज्यांच्या अष्ट्प्रधान मंडळातील काही मंत्री आणि राजारामाचा राज्याभिषेक करण्यास टपलेली सोयराबाई यांनी कटकारस्थान करून एक खलिता गडाच्या पायथ्याशी असणार्‍या अकबराकडे धाडला. पुढे संभाजी राजे आणि अकबराची भेट झाली असता त्याने तो खलिता असाच्या असा संभाजी राजांकडे सुपुर्द केला. त्यात असणार्‍या मजकुराने राजांना त्यांच्या विरोधात असणारी स्वराज्यातली कुटिल मंडळी कळाली. याचाच परिणाम म्हणजे शिवछत्रपतींच्या अष्ट्प्रधान मंडळात असलेल्या अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना संभाजी राजांनी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी गडाच्या पायथ्याशी असणार्‍या परली या गावात हत्तीच्या पायी दिले.

गडावर तशी पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत पण वेळेअभावी आम्हाला ती सगळीच पाहता आली नाहीत. या गडावर विस्तीर्ण असं पठार आहे आणि याचा घेराही मोठा आहे. गडावर पिण्याच्या पाण्याचे अनेक तलाव आढळतात. गडावर असणार्‍या पंत सचिवांच्या वाड्यात एका वेळी ५० जंणाची राहयची सोय होऊ शकते. गडावर जंगलही बर्‍यापैकी आहे या जंगल परिसरात बर्‍याच प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. दिंडीदरवाजा, भोराई देवीचे मंदिर, पंत सचिवांचा वाडा, भोरेश्वराचे मंदिर आणि तेथूनच थोडे पुढे असलेली चोर दरवाजाची विहिर, धान्यकोठार, हत्तीमाळ, हवालदार तळे आणि काही चोरदरवाजे हि गडावर पाहता येण्यासारखी काही ठिकाणं आहेत. गडावर असणारं एक टोक हे रायगडाच्या 'टकमक' टोकाची आठवण करून देतं. या टोकावर उभे राहून आपल्याला कोरीगड आणि तैल-बैला या दुर्गांच दर्शन होतं. गडावर जाण्यासाठी तसे तीन मार्ग आहेत, पैकी पालीहून १२ किमी असणार्‍या धोंडसे गावी आल्यास तेथून एक वाट गडावर जाते या वाटेने गडावर पोहचण्यासाठी ३ तास लागतात. वाट तशी सरळसोट आहे पण काही ठिकाणी चुकण्याचा धोका संभव आहे. धोंडसे गावतून येणार्‍या वाटेत आपल्याला गडाचा 'दिंडीदरवाजा' लागतो हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या महादरवाजाची प्रतिकृती आहे. या दरवाजाची रचना सुध्दा गोमुखी बांधणीची आहे. दुसरी वाट म्हणजे पालीहून ८-९ किमीवर असणार्‍या पाच्छापूर या गावी यावे आणि तिथून ठाकूरवाडीत यावे. ठाकूरवाडीतून गडावर जाणारी वाट हि त्यामानाने खुपच सोप्पी आहे. या वाटेने एक ते दिड तासात आपण गडमाथ्यावर पोहचतो. गडावर असणार्‍या वाड्यामागे एक चोरवाट विहिर आहे. तसेच ठाकूरवाडीतून गडावर येताना मध्येच एक पठार लागते त्या पठारावर उजव्या बाजूस एक चोर दरवाजा आढळतो(जाताना मी आणि अल्पेशने या चोरदरवाज्याने जाऊन तो कुठवर जातो याचा शोध लावला. ;) ) संकाटाच्या वेळी या चोरमार्गांचा वापर करण्यात येई.

आता हे आमच्याकडील काही फोटो -

तेज्यायला ह्या फ्लिकरवरून फोटो चढवायचं म्हणजे लय भानगडी कराव्या लागतात. आपलं पिकासा लय भारीय ब्वॉ!

चोरवाट.

गडावर असणार्‍या एका चोरवाटेचं हे शेवटचं टोक - दिड फुट बाय दोन फुटाची जागा!

हि गडावर जातानाची हिरवाई!!
DSC02379" width="500" height="375" alt="" />

हत्तीपागांमध्ये विश्राम करत असलेले मिपाकर. :D
DSC02384" width="500" height="375" alt="" />

हत्तीपागांमधून सरळ गेल्यानंतर 'टकमक' टोकासारखं एक टोक येतं तिथून सह्याद्रीचा दिसणारा नजारा केवळ अद्भूत आणि अवर्णणीय असाच!
DSC02388" width="500" height="375" alt="" />

त्याचा मनमुराद घेणारे आम्ही!
DSC02396" width="500" height="375" alt="" />

काही ठिकाणी उतरताना विमेंची अशी भंबेरी उडत होती. :D

अस्मादिक!
DSC02391" width="500" height="375" alt="" />

अल्पेश
DSC02397" width="500" height="375" alt="" />

दिंडीदरवाजा!
DSC02400" width="500" height="375" alt="" />

सरतेशेवटी निघताना घेतलेलं सुधागडाचं दर्शन.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Aug 2012 - 10:45 pm | अत्रुप्त आत्मा

किसन देव नंबर वन...एव्हरी फोटो,बिग फन....! :)

सचिनमय पाटील's picture

19 Aug 2012 - 10:46 pm | सचिनमय पाटील

१५ औगस्ट्च्या स्वातंत्र्यदिनी आम्हा ५ मित्रांचा ग्रुप देखिल सुधागडवरच होता..प्रचि १ मध्ये अंगणवाडीच्या समोर ज्या ३ बाईक्स पार्क केलेल्या आहेत,त्यातली बजाज डिस्कवर-१३५ (कडॆवर बाळ घेतलेल्या बाईच्या मागची) माझीच आहे.माझ्या अंदाजाने आम्ही दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गड उतरत असताना सुधागडच्या पठारावरील तलावाजवळ जो ग्रुप होता तो तुमचाच असावा..

सौरभ उप्स's picture

19 Aug 2012 - 11:26 pm | सौरभ उप्स

वा किसना वा...... मस्त लिहिलयस आणि फोटो पण मस्त आम्ही नाही पहिली चोरवाट पण इथे बघायला मिळाली.....

सौरभ उप्स's picture

19 Aug 2012 - 11:33 pm | सौरभ उप्स

सचिनभाऊ भेटलो असतो तर खरा योगायोग झाला असता की....

अन्या दातार's picture

20 Aug 2012 - 4:23 pm | अन्या दातार

ट्रेक छानच झाला; पण निवासी ट्रेक करायचाच या विचारास बळकटी देणारा झाला. वेळ खूपच कमी वाटला.
खोपोली-पाली रस्ता इतकाही भीतीदायक वाटला नाही. (बहुदा स्पा एकटाच बाईकवर असल्याने त्याला भिती वाटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही) तो रस्ता काही केल्या लवकर कटत नव्हता. (मिरज-सांगोला रस्त्याची आठवण झाली)
सूडसोबत पुण्यास येताना आम्हाला लवकर एन एच ४ मिळेना. एक रस्ता एक्स्प्रेसवेला जाऊन मिळाला. तिथल्या टोलनाक्यावर समजले की दुचाकी वाहने नेता येणार नाहीत. मागे फिरुन दुसर्‍या रस्त्याला लागलो तो पेणकडे जात होता. पुन्हा मागे वळलो, विचारत विचारत एकदाचा एन एच ४ ला लागलो. खालापूर-खोपोली करुन खंडाळा घाटात आलो. जरा आमचा जीव भांड्यात पडतो तोच नवे संकट! तिथून पुण्याला जाणारा रस्ता नेमका कोणता तेच कळेना. आमच्यासारखेच ४-५ बाईकस्वार सोबत असल्याने तितकी काळजी वाटली नाही.
जेंव्हा लोणावळा लागले तेंव्हा खात्री झाली की आता नक्कीच पुण्यात पोहचू. :) मग मात्र सणकत गाडी मारली व ८.३० ला निगडी चौकात येऊन थांबलो.

प्यारे१'s picture

20 Aug 2012 - 5:43 pm | प्यारे१

मस्तच ट्रेक, फोटो नि वृत्तांत....!

बाकी असोच. :)

'तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच होते..
किसन, विलास राव, अल्पेश आणि विम'' - मुळ धाग्यांत यांचे फोटो नाही दिसत का ? का माझाच सिलेक्टिव्ह गणेशा झालाय ?

असो, खरं सांगु तेच हिरवे डोंगर आणि पावसाचे फोटो पाहुन 'अति केलं अन हसं झालं' असं होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांनीच.

बाकी नेहमीचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचुन घ्या, फोटो छान, मजा केलेली दिसतेय वगैरे वगैरे.

आम्ही पण काल गेलो होतो फिरायला, इकडं पण आहेत डोंगर, पण पाउस नाही तेवढा, नांगरुन उलटणी मारुन ठेवलेल्या मरुन कलरच्या जमिनी, शेतांच्या मधुन जाणारा काळाकुट्ट रस्ता आणि हुलकावणी देणा-या पावसाची वाट पाहात त्या जमिनिच्या कडेला बसुन राहिलेली मालक मालकिणीची जोडी, त्या जोडीला त्याच रस्त्यावर येण्याची वेळ येउ नये एवढीच प्रार्थना.

प्रचेतस's picture

20 Aug 2012 - 8:15 pm | प्रचेतस

कर्‍हा नदीचा काठ, ऑगस्ट सरत आलेला, आणि नदीला टिपूसभरही पाणी नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2012 - 10:16 pm | अत्रुप्त आत्मा

टिपूसभरही पाणी नाही. +१

उजाड...कोरडे कोरडे सारे :(
कर्‍हेचे पाणी अटले हेच खरे :(

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Aug 2012 - 3:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे

किसन, विलास राव, अल्पेश आणि विम(?)'' - मुळ धाग्यांत यांचे फोटो नाही दिसत का ?

आम्हालाही आपले म्हणा, असे मी त्यांना म्हणणारच होतो, पण नाही म्हणालो. सगळी कंपूबाजी आहे झाले... जाऊ दे साला, आपण बरे आणि आपले काम बरे ;-)

मदनबाण's picture

20 Aug 2012 - 10:20 pm | मदनबाण

मस्त रे... :)

फोटो नं २४ कसला खत्रा आलाय!

सर्वांनी बरंचसं लिहीलं आहे,त्यामुळे चान चान म्हणून मी माझे चार शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Aug 2012 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे चान चान म्हणून मी माझे चार शब्द संपवतो.>>>

मस्त रे...
हुकला राव ट्रेक :(

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Aug 2012 - 4:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आम्हा चौघांचा ट्रेक मस्त झाला. गडावर गेल्यावर आणखीन ४-५ मिपाकर भेटले. (त्यातले काही डु आयडी होते असे किसन विलासरावांना सांगताना अल्पेश ने ऐकले म्हणे.) आम्ही आमचा डब्बा खाल्ला तेव्हा डल्ला मारायला ते ही होते. मग त्यातील एकाने उदारपणे आम्हाला शेंगदाणा लाडू खाऊ घातले आणि परतफेड केली.

या आधी मी काही जादूचे प्रयोग करून दाखवले होते. त्यातील चालता चालता अर्ध्या क्षणात खाली बसणे हा प्रयोग सर्वात हिट झाला. त्या प्रयोगात तेथील पठारावरील दगड, त्यावरील शेवाळ आणि माझ्या पायातील ग्रीप गेलेले बूट यांनी अनमोल सहकार्य दिले. विलासरावांनी त्या प्रयोगात खो घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अति चपळाई करून मी तो हाणून पाडला. पण नंतर हा प्रयोग परत करू नये असे एकूण सगळ्यांचे मत पडले. (उभरत्या रक्ताला वाव देत नाहीत लोक हल्ली) त्यामुळे गड उतरताना मी काही काळ घसपटत गड उतरणे हा अभिनव प्रयोग करून दाखवला. आता त्याला काही जण भंबेरी वगैरे म्हणू देत. जळकुटे कुठचे...

एकूण अनेक बाबतीत हा ट्रेक आगळावेगळा ठरला. सगळ्यांनी पाणी घेऊन येणे, एकमेकांबरोबर चालणे, नजरेच्या टप्प्यात राहणे, दमलेल्या मित्रांसाठी थांबणे असे क्षुद्र संकेत धुडकावत नवीन पायंडे आम्ही पाडले. अशा नवीन प्रथांच्या जन्माचा मी साक्षीदार होतो (आणि काहींचा जन्मदाता पण) याचा मला आनंद आहे :-)

क्रमशः

त्यातले काही डु आयडी होते असे किसन विलासरावांना सांगताना अल्पेश ने ऐकले म्हणे.) - असंच म्हणायचं होतं की,

त्याच्यातल्या काहींचे डु आयडी होते..... असं म्हणायचं आहे, नाही योगायोगाने बरेच मिपाकर, (कोणत्याहि फोटोत नसणारे सुद्धा,) त्यादिवशी गडावर होते म्हणुन विचारलं.

रायगडावर अध्यात्म , सुधागडावर जादुचे प्रयोग या पुढे जेंव्हा गडावर जाल तेंव्हा काय कराल याची कल्पना करतोय.

कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करायची कला माननीय विमेंनी माननीय पराकडुन अतिशय सुंदर पद्धतीने आत्मसात केली आहे ह्याबद्दल वाद नाही. =))

किसन शिंदे's picture

21 Aug 2012 - 5:05 pm | किसन शिंदे

:D

अरे व्वा!!

इथेही क्रमशः आहेच का??

५० फक्त's picture

21 Aug 2012 - 6:18 pm | ५० फक्त

इथेही क्रमशः आहेच का?? -

तुमचा खवचटपणा गडावरच्या वाडातल्या पत्र्यावरुन पडणा-या पावसाच्या पाण्यात धुवुन गेला नाही वाट्टं...

>>तुमचा खवचटपणा गडावरच्या वाडातल्या पत्र्यावरुन पडणा-या पावसाच्या पाण्यात धुवुन गेला नाही वाट्टं...
एकारान्त शहरात राहतात ते, खवचटपणा असा सहजासहजी जायचा नाही.

किसन शिंदे's picture

21 Aug 2012 - 5:06 pm | किसन शिंदे

:D

अरे व्वा!!

इथेही क्रमशः आहेच का??

गणेशा's picture

21 Aug 2012 - 7:32 pm | गणेशा

एक नं ट्रेक रे.

सहज's picture

24 Aug 2012 - 8:15 am | सहज

धमाल केलीत ना...मस्तच!!

अवांतराबद्दल क्षमस्व पण

माझी एक इच्छा आहे बॉ, सांगतोच. असेच दोन, तीन दिवस नॉनस्टॉप महाराष्ट्रात खाद्यट्रेक करायचा. तो देखील सारथी म्हणजे गवि, ५० फक्त अशी खाद्यतज्ञ मंडळी हवीत. आता वेगवेगळे खाद्यपदार्थ व त्या मिळणार्‍या जागा याची एक यादी तयार करायची व त्यातुन एक ट्रेकचा मार्ग आखायचा.
१) प्रत्येक ठिकाणी जाउन एखाद दुसरी डिश शेअर करायची सगळी कडे आडवेतिडवे हाणायचे नाही हे सूज्ञास सां.न.ल.
२) बेसीकली जितके जास्त वेगळे पदार्थ चाखता येतील तितके उत्तम
३) सहसा ज्या वाटांवर मुद्दाम जात नाही असा प्रवासही घडेल.
४) वेगवेगळ्या गावातील मिपाकरांना भेटायची संधी. जरी कोणी ट्रेक मधे सामील होउ शकले नाही तरीही त्यांच्या गावी आपण जाणार असु तर तेवढीच धावती भेट होईल.

बघा उदाहरणार्थ मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोवा असा काहीतरी मार्ग ठरवता. येईल

५० फक्त's picture

24 Aug 2012 - 8:34 am | ५० फक्त

नक्की नक्की नक्की, या हिवाळ्यातले पाच दिवस बुक माझ्यातर्फे...