Canon EOS 550 D कि Nikon D 5100 ??

राजो's picture
राजो in काथ्याकूट
20 Aug 2012 - 10:34 am
गाभा: 

नमस्कार मिपाकर मित्रहो...

मिपावरील कलादालन्/भटकंती या सदरांमधील छायाचित्रे पाहून Photography किडे करण्याचा मोह आवरेना.. तेव्हा एक Entry level DSLR घेऊ इच्छित आहे. (किंमत ३० ते ३५ हजार पर्यंत, याआधी कधीच DSLR वापरण्याचा अनुभव नाही.)
गुगलून गुगलून हे २ पर्याय निवडले आहेत
1. Canon EOS 550D
2. Nikon D5100
यापैकी कोणता घ्यावा? या दोन्ही व्यतिरिक्त आणखी एखादा चांगला पर्याय आहे का? DSLR Rookies साठी काही सोप्या भाषेत मदत करू शकणारी पुस्तके/websites आहेत का?

मिपावर चे तज्ञ मदत करतील अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया

स्पा's picture

20 Aug 2012 - 10:42 am | स्पा

Canon EOS 550D

सानिकास्वप्निल's picture

20 Aug 2012 - 3:54 pm | सानिकास्वप्निल

Canon EOS 550D

वैनतेय's picture

27 Aug 2012 - 3:12 pm | वैनतेय

+१

Nile's picture

20 Aug 2012 - 10:54 am | Nile

दोन्हीही कॅमेरे आता "बरेच" जुने झालेले आहेत. तेव्हा नविन कॅमेरा घ्यायचा असेल तर नवी मॉडेल्स (याच कॅटेगरीतली) शोधा.

तुर्तास, निकॉन डी ३२०० बद्दल माहिती काढून पहा. एक उदाहरणः http://www.dpreview.com/reviews/nikon-d3200
स्पेक्स पाहता एंट्री लेव्हलकरता आज मी कदाचित डी ५१०० पेक्षा हा निवडेन. खरंतर डी ५२०० ची वाट पाहीन. :-)

सागर's picture

20 Aug 2012 - 11:01 am | सागर

नाईल्या हा या विषयातला तज्ज्ञ आहे, तेव्हा माझे त्याच्या पर्यायास अनुमोदन आहे :)

धन्यवाद.. डी ५२०० येणार आहे का लवकरच?

शैलेन्द्र's picture

20 Aug 2012 - 12:23 pm | शैलेन्द्र

डी ५१०० अवघा एक वर्ष जुना आहे.. त्यामुळे डी ५२०० इतक्यात येइल असे वाटत नाही.

निकोन ५१०० जास्त चांगला आहे, कारण तुम्ही जेंव्हा कमी प्रकाशात हायर आय एस ओ ला फोटो घेता तेंव्हा निकॉन जास्त चांगल चित्र देतो.

कॅननचे अ‍ॅडवान्टेज म्हणजे इंटर्नल्ली बिल्ट फोकस मोटर..

तुम्हाला नक्की कसले फोटो काढायचेत? कोणत्या लेन्स वापरणार आहात?

http://snapsort.com/compare/Canon_EOS_550D-vs-Nikon-D5100

राजो's picture

20 Aug 2012 - 1:57 pm | राजो

आतापर्यंत compact camera वापरत आलो आहे. DSLR बद्दल जास्त माहिती नाही. सर्व प्रयोग करून बघायचे आहेत. लेन्स जरूरीप्रमाणे try करेन. Built-in autofocus नसेल तर lenses महाग पडतील का? किती फरक पडेल??

सर्वसाक्षी's picture

20 Aug 2012 - 2:36 pm | सर्वसाक्षी

क्यामेरा कुठलाही घ्या, पण १८-५५ किट लेन्स घेऊ नका, ती लेन्स सुमार असते.
लेन्सेस क्यामेरावाल्यांच्याच घेतल्या तर महाग असतात. टॅमरॉन, टोकिना, सिग्मा स्वस्त असतात. टॅमरॉन झकास, सिग्माचा अनुभव फारसा चांगला नाही.

राजो's picture

21 Aug 2012 - 11:11 am | राजो

मग कॅमेरा घेताना फक्त बॉडी च घेउ का? लेन्स कोणती घ्यावी जी regular use साठी उपयोगी पडेल?

सर्वसाक्षी's picture

21 Aug 2012 - 1:24 pm | सर्वसाक्षी

बॉडी घेणे उत्तम. १७-५५ किट लेन्स नवी कोरी ६-७००० ला मिळते आणि सुमार असते. साधा ग्रुप फोटो घेतला तरी हलका दर्जा जाणवतो. दोन - तीन वर्ष वापरल्यावर मी २००० ला विकली आणि तिच्या बदल्यात टॅमरॉन १७-५० (२.८) घेतली. मला चित्राच्या दर्जात खूप फरक जाणवला. हेच लेन्स निकॉन मध्ये खूपच महाग आहे. अर्थात हा माझा अनुभव आहे, पण मला फारसे ज्ञान नाही. इथे अनेक तज्ञ मंडळी आहेत त्यांचा सल्ला घ्या.

दुसरा पर्याय वापरलेल्या जुन्या लेन्सेस्चा. पण बहुतेक करुन लेन पडली वा फंगस लागले, साफ करावी लागली आणि शार्पनेस कमी झाला कीच लेन्स विकली जाते. क्वचित असे होते की एखाद्याला अधिक चांगली नवी लेन्स घ्यायची आहे आणि त्याला दोन लेन्स ठेवायची नाहीत म्हणुन तो निर्दोष लेन्स काढतोय. तसे असेल वा ओळखित कुणाची खात्रीची अशी वापरलेली लेन्स असेल तर घ्यायला हरकत नाही.

इरसाल's picture

20 Aug 2012 - 12:25 pm | इरसाल

कॅमेरे म्हणजे फक्त बॉडी की लेन्ससकट याचा आधी नीट तपास करुन घ्या.
मदतीसाठी हे बघु शकता.
http://www.flipkart.com/cameras/all-slr

मैत्र's picture

20 Aug 2012 - 2:39 pm | मैत्र

नाईल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही मॉडेल्स आता जुनी झाली आहेत.
५१०० D मी सुमारे दोन वर्षांपूर्वी 500D घेताना पाहिला होता आणि तो तुलनात्मक दृष्ट्या इतका पटला नाही.
निकॉन मध्ये हायर ISO ला ग्रेन कमी येतो आणि image जास्त फाइन असते.

कॅनन हा अल्पमोली बहुगुणी म्हणता येईल.

मुद्दा हा आहे की पुढे किती व्यासंग वाढवायचा विचार आहे. कारण नंतर बॉडी नाही तर लेन्सचा सेट तुमचं भविष्य ठरवतो. २ पेक्षा जास्त लेन्स घेतल्यावर तुम्ही नंतर मेक बदलणं श्रेयस्कर होत नाही.

हौस म्हणून घेऊन नंतर थोडं पुढे जायचं असेल तर कॅनन किंमत आणि परतावा या दृष्टीने उत्तम आहे.
६०० डी पहा. सध्याची किंमत मला माहीत नाही. किट लेन्स (१८-५५) बरोबर एक झूम / टेलिफोटो (५५-२५०) आणि एक प्राईम (५०) असा सेट उत्तम. खूप तयारी असेल भविष्यात तर आत्ता निकॉनच्या किंमतीत आणि लेन्स मध्ये गुंतवणूक करा. सर्वात उत्तम संदर्भ -- www.dpreview.com

कॅनन ५००डी वर अप्रतिम फोटोग्राफी करणारे अनेक पाहिले आहेत आणि डी९० घेऊन Auto मोड वर Point and Shoot काढणारेही. त्यामुळे फोटो मध्ये कॅमेरा नाहि तर मागचा हात किंवा डोळा (Eye behind the viewfinder) हा महत्त्वाचा.
एकदा जम बसला की मग लेन्स आणि सेट अप यावर अनेक गोष्टी ठरतात.

शैलेन्द्र's picture

21 Aug 2012 - 12:34 am | शैलेन्द्र

"५१०० D मी सुमारे दोन वर्षांपूर्वी 500D घेताना पाहिला होता आणि तो तुलनात्मक दृष्ट्या इतका पटला नाही."

मी ५१०० एक वर्षापुर्वी घेतला, तो तेंव्हा तो नुकताच लाँच झाला होता, तुम्ही जेंव्हा घेतलात तेंव्हा बहुदा डी ५००० असावा.. २०११ च्या सुरवातीला ५१०० लाँच झाला होता.. निकॉनच्या अतिशय यशस्वी डी ९० जवळ जाणारे स्पेक्स असलेला हा कॅमेरा आजही उत्कृष्ट खरेदी म्हणता येइल.. कॅनन ५०० डी बरोबर त्याची तुलना बघा.

http://snapsort.com/compare/Canon_EOS_500D-vs-Nikon-D5100

किट लेन्स न घेता, वापरलेल्या मॅक्रो, आणी वाईड अँगल लेन्स घ्या.. पण निकॉन्ची ५५-३०० सुरवातीच्या झुम्साठी छान लेन्स आहे.. १८ के मधे इतकी चांगली लेन्स क्वचीतच मिळेल..

या लेन्स्ने आजच घेतलेले काही फोटु..

रेड स्पर फावुल..

स्पॉटेड डव्ह..

बहुगुणी's picture

21 Aug 2012 - 12:47 am | बहुगुणी

सुंदर फोटो!

सुंदर फोटो... :)
२ आणि ३रा फोटो वॉटर लिलीचा आहे काय ?

आनंद भातखंडे's picture

22 Aug 2012 - 9:33 am | आनंद भातखंडे

तो फोटो वॉटर लिलीचा नाही. त्याला पिस्तिया म्हणतात.

शैलेन्द्र's picture

22 Aug 2012 - 9:33 pm | शैलेन्द्र

बरोबर, डोंबिवलीजवळच्या शिळफाट्याच्या खिंडीत वरती एक गणपती मंदीर आहे..तिथल्या साधूंनी एका मोठ्याशा प्लास्टीक टबात हे भरुन ठेवलेत.

मैत्र's picture

21 Aug 2012 - 9:50 am | मैत्र

दुरुस्ती बद्दल धन्यवाद. २ वर्षांपूर्वी डी ५००० असावा ज्याला - Rotating flexible - Tilt/Swivel LCD screen होता.
जो डी ६० च्या जास्त जवळ होता हा नवा स्क्रीन वगळता. फार उत्तम पर्याय नव्हता ५०० किंवा ५५० डी ला. कदाचीत त्यामुळेच ५१०० एक वर्षाने आला.
सुमारे ३५हजार किंमतीत ५०० किंवा ५५० डी हा जास्त चांगल पर्याय होता.

निकॉन डी९० हा आजही सर्वोत्तम कॅमेरा आहे. पण प्रोफेशनल क्षेत्रात कॅनन ५डी / ७डी यांच्यावर जास्त विश्वास दिसतो.
किट लेन्स फार काही उत्तम नसते हे खरं. पण एकत्र डिल मध्ये सुरुवात करण्यासाठी वाईड अँगल याहून स्वस्त काय मिळणार. निकॉन ५५-३०० प्रमाणेच कॅनन ५५-२५० उत्तम काम करते. अर्थात ३०० हा अजून पुढचा पल्ला Bird Photography आणि इतर गोष्टींना जास्त उपयोगी आहे. पण कॅनन १० -११ हजारात येते.

एकूणात काय आणि किती उपयोग करायचा आहे - कशा स्वरुपाची फोटोग्राफी करायची आहे. पुढे किती जायचा विचार आहे त्यावर सुरुवातीचा कॅमेरा ठरवावा.

ही तुलना पाहिली तर खूप फरक दिसत नाही तांत्रिक दृष्ट्या - पण प्रत्यक्ष review मध्ये निकॉन काकणभर तरी सरस आहे असं दिसतंय.

काही प्रमाणात निकॉन चांगल्या लेन्स बरोबर फास्ट आहे कॅनन पेक्षा. कॅनन थोडा sluggish आहे consumer models मध्ये.

मैत्र's picture

21 Aug 2012 - 10:14 pm | मैत्र

प्र. का. टा. आ.

मी निकॉन वापरतो आणि आता निकॉन डी-५१०० वापरतो आहे. कॅनन वापरला नाही त्यामुळे त्याबद्धल सांगता येत नाही.
डी-५१०० चा सेंसर (APS-C 23.6x15.6m)जवळ जवळ डी-७००० च्या सारखाच आहे.हाय आयएसओला उत्तम क्वालिटी देतो. यान इनबिल्ट मोटर नसल्याने वजनास हलका आहे,पण त्यामुळे मोटरलेस लेन्स यात वापरता येणार नाही.(ऑटो-फोकस करता येणार नाही.)
मला तरी याचा परफॉर्मन्स आवडला. :)
अधिक माहितीसाठी :---
http://www.dxomark.com/index.php/Publications/DxOMark-Reviews/Nikon-D510...

http://www.engadget.com/2011/04/27/nikon-d5100-impressions-head-to-head-...

मी कॅमेरा घेण्याआधी एका पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळत होतो तेव्हा एक फॉटोग्राफर बाजूला येऊन उभा राहिला. त्याने विचारले कोणता कॅमेरा आहे तुझ्याकडे. म्हटले अजून घेतला नाहीये पण बहुतेक 60D घेणार आहे (Canon). त्याला D 60 वाटले आणि Nikon चे model no. D पासून सुरू होत असल्याने त्याला वाटले मी Nikon घेणार आहे. त्यामुळे मला गंमतीत म्हणाला "At least you are on the right track by going with Nikon". नंतर त्याला म्हटले बाबा रे Canon घेणार आहे, now don't hate me ;).

त्याने मला एक खूपच सरळ आणि सोपा विचार सांगितला. Canon आणि Nikon दोन्ही चांगले आहेत, दोघांचेही आपले pros n cons आहेत. त्यामुळे तो camera घे जो जास्तीत जास्ती मित्रांकडे आहे. कारण lenses भयंकर महाग असतात त्यामुळे तुम्ही मित्र plan करून lenses घेऊ शकता आणि मग गरजेप्रमाणे exchange करू शकता.

बाकी वर बर्‍याच जणांनी Nikon आणि Canon बद्दल माहिती दिलीच आहे. Canon घेणार असाल तर 550D पेक्षा 60D घ्या एवढेच सांगेन. मीही आधी 550D ज्याला इथे T2iम्हणतात तो घेणार होतो पण जवळ जवळ एक वर्ष थांबून थोडे पैसे जास्ती देऊन 60D घेतला.

येथे तुलना दिसेल

http://www.digitalrev.com/article/canon-eos-60d-vs-550d/NjUwOQ_A_A
http://snapsort.com/compare/Canon_EOS_550D-vs-Canon_EOS_60D

काळा पहाड's picture

20 Aug 2012 - 7:16 pm | काळा पहाड

कुणी तरी एखादा लेख बिख लिहील का ही आय एस ओ वगैरे काय भानगड आहे ते? तसेच हे आकडे ५१०० ५२०० वगैरे गोंधळवतात. सर्वात नविन व स्वस्त कॅमेरा कसा शोधायचा?

जेनी...'s picture

20 Aug 2012 - 7:20 pm | जेनी...

Canon EOS 550D

टवाळ कार्टा's picture

20 Aug 2012 - 8:48 pm | टवाळ कार्टा

Nikon 5100

मी एकही ऑटोफोकस लेन्स वापरत नाही (सरळ स्वच्छ कारण म्हणजे मला त्या परवडत नाहीत.) मी (अतिशय) जुन्या, वापरलेल्या (युझ्ड), ई-बे वगैरे वरुन मॅन्युअल फोकस लेन्सेस घेतो. ऑलिंपस, निकॉन, पेंटॅक्स, विविटार वगैरे. ह्या सगळ्या लेन्सेस फक्त कॅनन च्याच कॅमेर्‍यावर (अ‍ॅडाप्टर) लावून वापरता येतात. निकॉन च्या येत नाहीत. (ह्याचे कारण म्हणजे flange distance, which focuses the image circle on camera sensor, is much larger in case of nikon than pretty much any other maker so those lenses can not be used on nikon)
म्हणून माझे मत कॅनन ला. आता ५५०D का ६०ड घ्यायचा ते तुम्ही बघा, दोन्ही crop sensor च आहेत, पण एक consumer (550D) तर दुसरा prosumer (60D) मानला जातो.

तुमच्या गरजा काय आहेत, कॅमेराचे इतर कोणी वापरकर्ते असणार आहेत का? (पत्नी, कुटुंबिय), वजन, असलेले फिचर्स ह्यावरुन ठरवता येइल.

एस's picture

24 Aug 2012 - 12:00 am | एस

फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स म्हणजे लेन्स माउंट च्या माउंटिंग फ्लॅन्ज आणि सेन्सर प्रतल यामधील अंतर. हे अंतर एका ब्रॅण्डच्या कॅमेर्‍याला दुसर्‍या ब्रॅण्ड्सच्या लेन्सेस अ‍ॅडॉप्टर वापरून लावता येतील की नाही हे ठरवते. हे शक्य होण्यासाठी ह्या लेन्सेसचे सर्वात योग्य फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स हे कॅमेर्‍याच्या फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स पेक्षा जास्त हवे. निकॉन च्या एफ्-माउंटचे फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४६.५० मिमी तर कॅननचे (इएफ-एस माउंट) फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४४ मिमी आहे. फारसा फरक नाही. (सोनी व लायकाचे अंतर जास्त आहे.)

फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स जास्त असण्याचा फायदा हा की अशा माउंटवर त्याच ब्रॅण्डच्या जास्त लेन्सेस लावता येतात, तर कमी असण्याचा फायदा हा, की अशा माउंटवर जास्त अ‍ॅडॉप्टर्स लावून वेगवेगळ्या लेन्सेस लावता येतात. म्हणूनच निकॉनचा एफ्-माउंट १९५९ पासून बदललेला नाही तर कॅननने १९८७ मध्ये इओएस माउंट आणून आधीच्या लेन्सेसची कंपॅटिबिलिटी संपवून टाकली.

कॅननच्या कॅमेर्‍याना निक्कॉर लेन्सेस लावता येतात, पण निकॉनच्या कॅमे-यांना कॅननच्या (किंवा इतर काही ब्रॅण्ड्स च्या) लेन्सेस लावता येत नाही याचे हेच कारण आहे. अर्थात, ही कमतरता निकॉनच्या टाइमलेस एफ्-माउंटमुळे चांगलीच भरून निघते, कारण तुम्हाला तुमच्या खूप जुन्या मॅन्युअल निक्कॉर लेन्सेस टाकून द्याव्या लागत नाहीत. अर्थात हा सगळा शेवटी वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे.

राजो's picture

21 Aug 2012 - 11:27 am | राजो

सर्व प्रतिक्रियांबद्दल..

उपयुक्त माहिती मिळते आहे. आतापर्यंत कल डी ५१०० कडे च आहे..

auto focus motor वाल्या लेन्सेस कितपत महाग असतात? इतर लेन्सेस पेक्षा?

मी कॅमेरा घेण्यापूर्वी खूप रिसर्च केला होता. http://www.amazon.com मध्ये माहिती वाचली, दुकानात जाऊन कॅमेरा compare केले आणि हाताळले. मला http://www.kenrockwell.com ही साईट उपयुक्त वाटली होती. अखेरीस मी निकॉन डी-५१०० घेतला आणि मला तो आवडतो.
इथे पण उपयोगी माहिती मिळेल.
http://www.kenrockwell.com/tech/nikon-vs-canon.htm

खुप उपयुक्त माहीती मिपा मधुन मिळाली, धन्यवाद!

कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण

कॅनन आणि निकॉन-
कॅनन आणि निकॉन दोन्ही मल्टि-बिलियन डॉलर ऑप्टिकल कंपन्या आहेत आणि या दोन्ही कंपन्या गेल्या कित्येक दशकांपासून असंख्य ग्राहक, सुरक्षादले व औद्योगिक उपयोगांसाठी जगातले सर्वात उच्च दर्जाचे ऑप्टिकल साहित्य बनवत आल्या आहेत. नेहमीच्या फोटोग्राफीसाठी लागणा-या अचूकतेपेक्षाही कितीतरी वरच्या दर्जाचे ऑप्टिक्स आणि स्टेपर्स सारखी उत्पादने या कंपन्या बनवतात आणि त्यांची किंमत लाखो डॉलर्समध्ये असते. याच अत्युच्च दर्जाच्या उत्पादनांबरोबरच त्या कॅमेरे व लेन्सेस वगैरे बनवतात. व्यावसायिक प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणा-या सूक्ष्मदर्शकांमध्ये जे लेन्सेस, यांत्रिक स्टेपर्स इ. वापरले जाते त्यात निकॉनचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ३७% आहे. (झाइस व लाइट्झ पेक्षाही जास्त). कॅननचा वाटा आहे २०%. केवळ नमुन्यादाखल या उपकरणांची क्षमता पाहिली तर थक्क व्हायला होते. (४५ नॅनोमीटर्सपर्यंत). कॅनन आणि निकॉन दोन्ही मुळात ऑप्टिकल कंपन्या आहेत - इलेक्ट्रॉनिक किंवा सॉफ्टवेअर कंपन्या नव्हेत. त्यामुळे आधी यांचा चांगला कॅमेरा घ्यायचा आणि मग पैसे वाचविण्यासाठी कुठलीतरी थर्ड पार्टी लेन्स त्यावर लावायची याला माझ्या मते काहीच अर्थ नाही. या दोन्ही कंपन्यांची ऑप्टिकल उत्पादने अक्षरशः लाखो डॉलर्सला विकली जातात. त्या तुलनेत आपण छायाचित्रकार जे लेन्सेस, कॅमेरे, स्पीडलाइट्स इ. विकत घेतो ते फार फार तर दोनशे ते दहा हजार डॉलर्सपर्यंत जाते. कॅनन आणि निकॉन दोन्हींच्या दृष्टीने चिल्लर...

सरळ आहे. छायाचित्रण म्हणजे प्रकाश, ऑप्टिक्स. मग त्यासाठी ऑप्टिक्समधील बाप कंपन्यांकडेच जावे. उदा. निकॉन, कॅनन, लाइका, झाइस, पेन्टॅक्स, इ. हे झाले लेन्स बद्दल. आणि आधी लेन्सेस चा विचार करावा व मग त्यांना सूट होईल असा कॅमेरा विकत घ्यावा.

मी निकॉन का घेतला -
फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स म्हणजे लेन्स माउंट च्या माउंटिंग फ्लॅन्ज आणि सेन्सर प्रतल यामधील अंतर. हे अंतर एका ब्रॅण्डच्या कॅमे-याला दुस-या ब्रॅण्ड्सच्या लेन्सेस अडॉप्टर वापरून लावता येतील की नाही हे ठरवते. हे शक्य होण्यासाठी ह्या लेन्सेसचे सर्वात योग्य फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स हे कॅमे-याच्या फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स पेक्षा जास्त हवे. निकॉन च्या एफ्-माउंटचे फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४६.५० मिमी तर कॅननचे (इएफ-एस माउंट) फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४४ मिमी आहे. फारसा फरक नाही. (सोनी व लायकाचे अंतर जास्त आहे.)

फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स जास्त असण्याचा फायदा हा की अशा माउंटवर त्याच ब्रॅण्डच्या जास्त लेन्सेस लावता येतात, तर कमी असण्याचा फायदा हा, की अशा माउंटवर जास्त अडॉप्टर्स लावून वेगवेगळ्या लेन्सेस लावता येतात. म्हणूनच निकॉनचा एफ्-माउंट १९५९ पासून बदललेला नाही तर कॅननने १९८७ मध्ये इओएस माउंट आणून आधीच्या लेन्सेसची कंपॅटिबिलिटी संपवून टाकली.

कॅननच्या कॅमे-यांना निक्कॉर लेन्सेस लावता येतात, पण निकॉनच्या कॅमे-यांना कॅननच्या (किंवा इतर काही ब्रॅण्ड्स च्या) लेन्सेस लावता येत नाही याचे हेच कारण आहे. अर्थात, ही कमतरता निकॉनच्या टाइमलेस एफ्-माउंटमुळे चांगलीच भरून निघते, कारण तुम्हाला तुमच्या खूप जुन्या मॅन्युअल निक्कॉर लेन्सेस टाकून द्याव्या लागत नाहीत. अर्थात हा सगळा शेवटी वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे.

सुरुवातीच्या कॅनन कॅमे-यांना निकॉनच्या लेन्सेस असत.

निकॉन आधी फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी महागडे व्यावसायिक कॅमेरे बनवी, तर कॅनन आधी फक्त हौशी लोकांसाठी स्वस्त कॅमेरे बनवी. सुरुवातीला कॅननची स्पर्धा लायकाबरोबर होती. निकॉनने स्वस्त आणि कॅननने महाग कॅमेरे बनवण्यास सुरुवात केल्यापासून म्हणजे दुस-या महायुद्धानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली.

निकॉनच्या लेन्सेसच्या फिल्टर साइजेस बहुतांशी ठरलेल्या आहेत व तुम्हांला दरवेळी नवीन फिल्टर घ्यावे लागत नाहीत.

लायकाने ऑटोफोकसचा वापर करता येईल असे तंत्रज्ञान शोधले. १९८५ मध्ये आधी मिनोल्टाने व नंतर कॅनन व निकॉन ने असे कॅमेरे बाजारात आणले. पण आधी सांगितल्याप्रमाणे कॅननने आपली माउंटिंग सिस्टिम अद्ययावत केल्यामुळे निकॉनपेक्षा त्यांचे कॅमेरे ऑटोफोकस जास्त लवकर करू लागले. स्पोर्टस् फोटोग्राफर्सना ही बाब सोयीची वाटल्यामुळे कॅननचे कॅमेरे व लेन्सेस त्यांच्यात लोकप्रिय झाले. व एकदा आख्खी सिस्टिम एका ब्रॅण्डमध्ये उभी केल्यावर ब्रॅण्ड बदलणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने कॅननचा दबदबा कायम झाला तो २००० पर्यंत. अजूनही एखाद्या फुटबॉल सामन्यात वगैरे सर्वत्र पांढ-या लेन्सेस दिसतात ते याच कारणामुळे.

२००० नंतर ही परिस्थिती हळूहळू बदलू लागली ते निकॉनने तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात आघाडी घेतल्यामुळे. आता निकॉनच्या लेन्सेससुद्धा कॅननच्या लेन्सेसइतक्याच वेगाने फोकस शोधू शकतात. ही आघाडी कॅमे-यांच्या तंत्रज्ञानातही डी८०० च्या रूपाने दिसून येते. निकॉनचा हा कॅमेरा थेट मीडियम फॉरमॅट कॅमे-यांना आव्हान देणारा ठरत आहे.

निकॉन घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची सीएल्एस् ही फ्लॅश यंत्रणा. कॅननकडे अजूनतरी त्याची तोड नाही. कॅननचे प्री-फ्लॅशेस इतके तीव्र असतात की सब्जेक्ट्सना ते थोड्या वेळाने नकोसे वाटते. याउलट निकॉनचे प्री-फ्लॅशेस कधी पडले ते कळतही नाही. तरीही निकॉनचे फ्लॅश एक्स्पोजर पहिल्यावेळी आणि दरवेळी अचूक येते. कॅननच्या प्रोग्रॅम मोडमध्ये फ्लॅश सेटिंग्ज खूपच जास्त ऑटोमॅटिक होतात व निकॉनच्या तुलनेत आपल्याला पाहिजे तसे सेट करता येत नाहीत.

निकॉनचे व्हाइट बॅलन्स खरोखर न्यूट्रल येतात, तर कॅनन किंचित फ्लॅश सेटिंग्जकडे झुकतो. निकॉनचे कलर रेन्डिशन बाय डिफॉल्ट न्यूट्रल आहे तर कॅननमध्ये कन्झ्युमर कॅमे-यांप्रमाणे बाय डिफॉल्ट कलर रेन्डिशनमध्ये कॉन्ट्रास्ट जास्त येतो. असे फोटोज जर त्यांमध्ये हिरवाई टिपली असेल तर जास्त चांगले वाटतात, पण आपल्या डोळ्यांना दिसणारे दृश्य आणि फोटो यात फरक लगेच कळतो. कॅननमध्ये अचूक कलर रेन्डिशन मिळवणे नवख्या छायाचित्रकारास अवघड आहे. पेन्टॅक्स सुद्धा याबाबतीत कॅननपेक्षा जास्त अचूक आहे.

निकॉनच्या लेन्सेसचे डायफ्रॅम विषम संख्येने असतात (७ किंवा ९) तर कॅननचे डायफ्रॅम सम संख्येत असतात (६ किंवा ८).

निकॉनची बटने संख्येने जास्त तर मेन्यूंमधील सबमेन्यू लेवल्स कमी असतात. कॅननचे नेमके उलटे आहे.

जास्त आय्एस्ओ ला निकॉनचा परफॉर्मन्स किंचित जास्त चांगला आहे. नॉइज निकॉनमध्ये कमी येतो.

निकॉनचे ऑटोफोकसिंग कॅननच्या तुलनेत जास्त सायलेंट आहे. विशेषतः एन्ट्रीलेवल लेन्सेसमध्ये तुलना केली असता.

अंधारात ऑटोफोकस करण्यासाठी कॅनन पॉपअप फ्लॅश वापरते. निकॉनच्या नवीन मॉडेल्समध्ये त्यासाठी ऑटोफोकस असिस्ट बीम वापरली जाते, जी बंद करूनही निकॉनचा ऑटोफोकस जास्त अचूक व लवकर फोकस शोधतो.

कॅनन सेन्सर्सच्या तीन साइजेस वापरते (१, १.३, १.६), त्यामुळे दरवेळी कुठली लेन्स कुठल्या मॉडेलवर प्रत्यक्षात किती फोकल लेन्ग्थची ठरेल हे काढत बसणे जास्त अवघड ठरते. निकॉन फक्त १ आणि १.५ वापरते. त्यामुळे आख्खी आणि अर्धी असे पटकन सांगता येते.

निकॉनची बिल्ड क्वालिटी कॅननच्या तुलनेत सरस आहे.

फोटो प्लेबॅकमध्ये पाहताना झूम-इन करून फक्त तेवढ्याच भागापुरता हिस्टोग्रॅम पाहता येणे फक्त निकॉन व लायकामध्येच शक्य आहे.

निकॉनच्या प्रो लेन्सेस अगदी कॉर्नर्सपाशी सुद्धा शार्प असतात.

कॅननच्या प्रोग्रॅम्ड ऑटो, अपर्चर व शटर प्रायोरिटी मोडमध्ये स्पॉट मीटरिंग वापरता येते की नाही हे आठवत नाहीये. नंतर शोधून सांगतो.

डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण -
जेव्हा एखादी नवखी छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवते तेव्हा बाजारात अक्षरशः ढिगाने उपलब्ध असलेल्या पर्यायांमुळे गोंधळून जाते. इथे सर्वात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे की छायाचित्रण महत्त्वाचे आहे. तुमच्या हातातील साधने नंतर. तुम्ही फोटो काढता, तुमचा कॅमेरा नाही. मग या दर्जाचे छायाचित्रण करण्याचे ठरवल्यानंतर आधी हे ठरवा की तुम्हाला सुरुवातीला कोणत्या प्रकारचे छायाचित्रण करायचे आहे. पोर्ट्रेट्स, वाइल्डलाईफ, मॅक्रो, प्रॉडक्ट्स, आर्किटेक्चरल, इंडस्ट्रियल, वेडिंग्ज व इव्हेंट्स, बर्डिंग, लॅण्डस्केप्स, इ.... मग त्यातही पुढे तुम्ही किती प्रोफेशनल होणार, तुमचा प्रकाशचित्रे विकण्याचा मनोदय आहे का, की फक्त हौशी. तुम्हाला स्टुडिओ फोटोग्राफी करायची आहे की आउटडोअर. ह्यातला एक प्रकार निश्चित केला की त्याला कुठल्या प्रकारचे साहित्य लागते ते शोधावे. उदा. पोर्ट्रेट्स ला स्टुडिओ, स्पीडलाइट्स, सॉफ्टबॉक्सेस, रिफ्लेक्टर्स, बॅकग्राउण्ड्स इ. घ्यावे लागेल तर वाइल्डलाईफ साठी यातले काहीच लागणार नाही. पण वाइल्डलाईफला जास्तीत जास्त फोकल लेंग्थवाल्या लेन्सेस आणि फास्टेस्ट एफ्. पी. एस्. (फ्रेम्स पर सेकंड्स) देणारा अत्युच्च दर्जाचा कॅमेरा लागेल, तर पोर्ट्रेट्स साठी अगदी एपीएस् साइजचा (१.६ किंवा १.५ क्रॉप फॅक्टरवाला) कॅमेरा व ५०, ८५ वा ७०-२०० एमएम लेन्सेस पण चालतील. मॅक्रोसाठी विशेष मॅक्रो (निकॉनच्या भाषेत माइक्रो) लेन्सेस व खास मॅक्रो स्पीडलाइट्स लागतील. तर बर्डिंग साठी सर्वात जास्त फोकल लेंग्थवाल्या प्राइमच वापराव्या लागतील.

आता एकदा आपल्याला काय काय साहित्य आत्ता किंवा पुढे लागू शकेल याची ढोबळ यादी बनविल्यानंतर त्यात सर्वात उत्तम दर्जा, सर्वात जास्त व्हरायटी, सर्वात जास्त कंपॅटिबिलिटी, सर्वात जास्त उपलब्धता व वापर, ब्रॅण्डची विश्वसनीयता व लॉन्जेविटी आणि शेवटी तुमची आवड व ब्रॅण्ड एकनिष्ठता या गोष्टींचा विचार करावा.

शक्यतो सर्वच छायाचित्रकार वापरलेल्या लेन्सेस वगैरे घेत राहतात व आपले आर्सेनल समृद्ध करतात. त्यामुळे लगेचच सर्व काही व सर्व काही नवीन घेण्याचा अट्टाहास करू नये. मिळाल्यास आधी लेन्स, कॅमेरा वगैरे भाड्याने वापरून पहावे व मगच विकत घ्यावे. आता एकदा का तुम्ही एका ब्रॅण्डचा कॅमेरा घेतला की मग त्याच ब्रॅण्डच्या लेन्सेस किंवा त्याला कंपॅटिबल लेन्सेस, स्ट्रोब्ज इ. घेत राहाल. त्यामुळे काही काळाने ब्रॅण्ड स्विच करणे फार अवघड होऊन बसते.

मी निकॉनियन आहे, तर माझे मित्र कॅननियन्स. त्यांना कॅनन ७ डी आणि कॅनन ५५० डी हे कॅमेरे मी रेकमेण्ड केले, तसेच अजून काहींना निकॉन डी५१००, डी३२०० सुद्धा रेकमेण्ड केले. आणि कोणी मला कंझ्युमर कॅमे-यांबद्दल विचारले तर त्यांना सोनीचे फीचररिच कॅमेरे पहायला सांगतो. येथे कुठल्या अमुक ब्रॅण्डचा प्रश्न नाही तर त्या व्यक्तींना काय सोईचे आहे व काय आवडते ते महत्त्वाचे मानूनच सल्ला दिला.

तुमचे या क्षेत्रात स्वागत... तुम्ही काढलेले फोटोज् लवकर येऊ द्यात.

अत्यंत उपयुक्त प्रतिसाद. खूप खूप धन्यवाद..
मी सुद्धा "निकॉनियन" होतो आहे.. (डी ५१००)

शैलेन्द्र's picture

24 Aug 2012 - 12:25 pm | शैलेन्द्र

वेल्कम. :)

एस's picture

24 Aug 2012 - 11:21 pm | एस

डी-५१०० च्या फक्त दोनच मर्यादा मला जाणवल्या त्या म्हणजे

१. इनबिल्ट फोकसिंग मोटर नसणे. त्यामुळे AF-S व AF-I लेन्सेस वगळता इतर लेन्सेसवर ऑटोफोकस करता येत नाही. त्यामुळे उदा. जर ५० मिमी लेन्स घ्यायची झाली तर ६२९० वाली AF NIKKOR 50mm f/1.8D सोडून १३५०० वाली AF-S NIKKOR 50mm f/I.8G घ्यावी लागते.

२. पॉपअप फ्लॅश हा i-TTL commander म्हणून वापरता येत नाही. त्यासाठी स्वतंत्र SU-800 सारख्या स्पीडलाइट्स/कमांडर युनिट्स वगैरे घ्याव्या लागतात.

दोन-दोन मेमरी कार्डस्, दोन U1 व U2 मोड्स वगैरे अजून काही गोष्टी आहेत ज्या डी-७००० मध्ये आहेत पण डी-५१०० मध्ये नाहीत. पण इमेज क्वालिटी दोघांची सारखीच आहे कारण दोघांचा सेन्सर एकच आहे. (सोनीने बनवलेला. :) )

स्वॅप्स

बोका's picture

26 Aug 2012 - 1:20 pm | बोका

तुम्ही हा छंद वाढवणार हे गृहित धरतो.
भविष्यातील खरेदी अशी असेल.

कॅनन ५०० डी घेतल्यास ....

कॅनन ५०मीमी १.८ - रु. ६७८०
कॅनन ५५-२५०मीमी ३.५-५.६ - रु. १६४८०
कॅनन १००मीमी २.८ मॅक्रो - रु. ३२६००

निकॉन डी५१०० घेतल्यास . . .

निकॉन ५०मीमी१.८ जी - रु १३४५०
निकॉन ए एफ एस ५५-३००मीमी जी - रु १९५००
निकॉन ए एफ एस १०५मीमी मॅक्रो २.८ जी - रु ४८९००

कॅनन पेक्षा निकॉन च्या लेन्सेस कदाचीत चांगल्या असतील, पण त्या महाग सुध्धा आहेत.
हव्या असल्यास कॅनन च्या महाग आणि चांगल्या लेन्सेस उपलब्ध आहेत.

संपत's picture

24 Aug 2012 - 11:37 am | संपत

हा प्रतिसाद खर तर स्वतंत्र लेख म्हणून आला पाहिजे होता. कृपया अजून असे लेख येऊ द्यात. पोईंट एंड शूट बद्दल हि असेच लेख लिहू शकलात तर उत्तम..

सर्वसाक्षी's picture

24 Aug 2012 - 1:55 pm | सर्वसाक्षी

माहितीपूर्ण लेख.

धन्यवाद

अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद - संपादकांना विनंती आहे की त्यांनी स्वॅप्स यांचा हा प्रतिसाद 'डिएसएलार कॅमेरा आणि लेन्सेस' या शीर्षकाखाली वेगळा नवा लेख म्हणून प्रसिद्ध करावा.
कृपया विनंतीचा विचार व्हावा.

एस's picture

24 Aug 2012 - 11:51 pm | एस

कॅनन आणि निकॉन-

वरच्या लेखात काही मुद्दे राहून गेले. त्यापैकी एक मला सर्वात महत्त्वाचा वाटणारा मुद्दा इथे देत आहे.

कॅननचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे कॅननचा व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांमधला भेदभाव. कॅननची एन्ट्रीलेवल मॉडेल्स व लेन्सेस इ. स्वस्त आहेत. पण त्याचबरोबर त्यांचा दर्जादेखील तितकाच तुलनेने कमी करण्यात आला आहे. उदा. कॅननच्या लाल रिंग असणा-या एल सिरीज यूएसएम लेन्सेस सर्वात दर्जेदार आहेत पण नॉन-एल सिरीज लेन्सेसच्या तुलनेत त्यांच्या दर्जा व किंमतीतील तितकाच फरक मला खटकतो. म्हणजे कॅनन तुम्हाला आधी निश्चित करायला लावते की तुम्ही प्रो आहात की अमॅच्युअर आहात. निकॉन असा उघड उघड भेदभाव करत नाही. त्यांच्या कुठल्याही लेन्समागे प्रो वगैरे लेबल लावलेले नसते तसेच फक्त प्रोफेशनल्ससाठी म्हणून त्यांची कुठलीही वेगळी खास सिरीज नाही. माझ्या 'Everyone can take good photographs' या तत्त्वाशी हे सुसंगत आहे.

तसेच मॅक्रो फोटोग्राफीबद्दल मला विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाचे दिलेले उत्तर इथेही उद्धृत करत आहे -

मॅक्रोच्या बाबतीत -

मॅक्रो आणि क्लोजअप फोटोग्राफी यांच्यात मूलभूत फरक आहे. तो म्हणजे मॅक्रोचे मॅग्निफिकेशन (विशालन) लाइफ-लाइक म्हणजेच अचूक १:१ किंवा १:२ असते. तर क्लोजअप मध्ये हे विशालन १:५ पासून पुढे असू शकते. उदा. फुलांचे विविध भाग हे क्लोजअप झाले तर फुलाच्या पुंकेसराचा दांडा हे मॅक्रो झाले. मॅक्रो म्हणजे क्लोजअप नव्हे, मॅक्रो शॉट्स साठी ऑब्जेक्ट्सच्या खूप जवळ जाणे नेहमीच आवश्यक असते असे नाही. ट्रू मॅक्रो म्हणजे समजा तुम्ही एका १ सेंमी नाण्याचा फोटो काढत असाल तर त्याची इमेज सेन्सरवर पडणारी प्रतिमादेखील १ सेंमीचीच असते. त्यात कुठलेही डिस्टॉर्शन नको, कलर अबरेशन नको, अशा रिक्वायरमेंट्स असतात. हे झाले अगदी खरे मॅक्रो. अत्युच्च दर्जाची मॅक्रो लेन्स बनविणे आणि अत्युच्च दर्जाची वाइड अँगल लेन्स बनवणे ऑप्टिक्सच्या विश्वात सर्वात अवघड यासाठीच मानले जाते. त्यामुळेच अशा लेन्सेस महाग असतात. बाजारात ज्या थर्ड पार्टी मॅक्रो लेन्सेस मिळतात त्या खरेतर क्लोजअप लेन्सेस असतात.

मॅक्रो लेन्स च्या नाभीय अंतराविषयी -
मला स्वतःला किडे किंवा फुलपाखरांच्या जितके लांबून त्यांचे फोटो काढता येतील तेवढे आवडेल. म्हणून मी ६० मिमी मॅक्रोपेक्षा १०५ मिमी मॅक्रोला प्राधान्य देईल.

मॅक्रो व क्लोजअप फोटोग्राफीच्या ६ वेगवेगळ्या पद्धती (तंत्रा) विषयी -
१. लेन्सच्या पुढे मोठे भिंग धरणे
२. मॅक्रो फिल्टर्स वापरणे. (हे म्हणजे फक्त असे भिंग लेन्सच्या पुढे त्याच्या रिंगचा वापर करून लावता येते. बाकी काही नाही.)
३. लेन्स आणि कॅमेरा यांच्यात एक्स्टेंशन ट्यूब वापरणे.
४. बेलोज वापरणे. (एक प्रकारची अडजेस्टेबल एक्स्टेंशन ट्यूब.)
५. रिवर्स लेन्स फोटोग्राफी
६. मॅक्रो लेन्स

इरसाल's picture

24 Aug 2012 - 10:07 am | इरसाल

तुमचा अभ्यास दांडगा आहे कॅमेर्यांचा.
सोनी कॅमेर्‍यांबद्दल तुमचे काय मत आहे.

एस's picture

24 Aug 2012 - 11:03 pm | एस

सोनी खूप वर्षांपासून कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आहे. डिजिटल कॅमेर्‍यांचा सोनीचा अनुभव चांगला आहे, पण प्रोफेशनल डिजिटल कॅमेर्‍यांसाठी लागणारे ऑप्टिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि अनुभव सोनी कडे नाही. सोनीला जेव्हा डीएसएलआर क्षेत्रात प्रवेश करायचा होता, पण त्याचबरोबर अगोदरपासून यातील कॅनन व निकॉन सारख्या दादा कंपन्यांना टक्कर द्यायची होती. तेव्हा सोनीने एक सोपा मार्ग निवडला, तो म्हणजे सोनीने डबघाईला येऊ पाहणार्‍या कोनिका मिनोल्टा या जपानी कंपनीशी करार करून त्यांच्याकडून सोनी ब्रॅण्डचे डीएसएलआर बनवून घेतले.

जानेवारी २००६ पासून कोनिका मिनोल्टाने छायाचित्रण क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. या अतिशय नावाजलेल्या व आपला स्वतःचा असा एक खास चाहतावर्ग असणार्‍या कंपनीचे तंत्रज्ञान, माहिती, वगैरे सर्व सोनीकडे आले. सोनीचे जगभर पसरलेले विपणनजाळे पाहता सोनीने डीएसएलआर क्षेत्राचा बराच हिस्सा काबीज केला तर नवल नाही.

मिनोल्टा ही अतिशय थोड्या जपानी कंपन्यांपैकी एक होती जी स्वतःचे ऑप्टिक्स स्वतः बनवत असे. त्यांचे Maxxum डीएसएलआर सर्वात अनोखे यासाठी होते की त्यांचे सेन्सर हे फिक्स नसून गिंबल वर लावलेले असत व फोटो काढताना झालेली हातांची हालचाल किंवा थरथर ही सेन्सर किंचित हलवून भरून काढली जात असे. आताच्या सोनी डीएसएलआर मध्ये बॉडी-इनबिल्ट इमेज स्टॅबिलायझेशन असण्याचे मूळ इथे सापडते. (बाकी सर्वच ब्रॅण्डच्या बाबतीत प्रतिमा स्थिरीकरण मॉड्यूल लेन्सेस मध्ये असते.) त्यामुळे जुन्या मिनोल्टा लेन्सेस, तसेच स्वस्त सोनी लेन्सेस वापरणे शक्य आहे.

सोनीच्या पॉइंट एंड शूट मॉडेल्स बद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा वापरण्यातील सोपेपणा व ठासून भरलेली वैशिष्ट्ये उदा. स्वीप-पॅनोरामा. पण सोनीचे कलर रेन्डीशन मला अजिबात आवडले नाही. खूपच कॉन्ट्रास्ट असतो व तो न्यूट्रल करता येत नाही. उदा. दरवाजाचा काहीसा तपकिरी रंग सोनीच्या HXV-100 मध्ये चक्क लाल आला.

पण मी वर सांगितल्याप्रमाणे कंझ्यूमर मॉडेल्ससाठी मी सोनी जास्त रेकमेण्ड करतो.

स्वॅप्स

इरसाल's picture

25 Aug 2012 - 11:50 am | इरसाल

धन्यवाद

शैलेन्द्र's picture

26 Aug 2012 - 1:45 pm | शैलेन्द्र

सुंदर प्रतिसाद..

बॉस, पुढच्या वेळी कॅमेरा घेताना अगदी कंसल्टन्सी देवुन तुमचा सल्ला घेतला पाहीजे.

Nile's picture

28 Sep 2012 - 12:47 am | Nile

नुकतेच निकॉनने रिटेलर्सना डी ५१०० चे उत्पादन बंद केली असल्याचे कळवले. बहुतेक डी ५२०० वर्षाअखेरीसपर्यंत यावा असे अंदाज आहेत.

धागालेखकाने कॅमेरा घेतला असेल पण इतर ज्यांना हाच प्रश्न पडला असेल त्यांच्याकरता म्हणून प्रतिसाद देत आहे.

नमस्कार मिपाकर मंडळी... मध्यंतरी बरेच दिवस मिपावर येणे जमले नाही.. (मिपा ही बंद होते काही दिवस)

शेवटी Nikon D5100 घेतला आहे आणि Photography प्रयत्न चालू आहेत.
35mm 1.8d लेन्स ही घेतली आहे..

फोटो अपलोड करण्याची इच्छा आहे.. दुरूस्ती व सुधारणेसाठी मिपाकर मार्गदर्शन करतील ही अपेक्षा आहेच :)

धन्यवाद

केदार-मिसळपाव's picture

9 Oct 2013 - 7:19 pm | केदार-मिसळपाव

का हो तज्ञ मंडळी,
जर आमच्या मोबाइलच्या ५ मेगापिक्सेल क्यामेर्यासमोर दुर्बीण ठेवली आणि फोटो काढला तर.. म्हणजे एकदा असा प्रयत्न केला आहे आणि बर्यापैकी होता म्हणायचा. फक्त दोन्ही हात स्थीर ठेवता आले पहिजेत.