धर्म आणि हिंसा

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
18 Aug 2012 - 12:05 am
गाभा: 

धारयति इति धर्म: असे म्हणतात.

धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. सर्वव्यापी आहे.
पण
धर्म आणि पंथ यात आपण गल्लत करतो असे वाटते.

पंथ म्हणजे संप्रदाय - हा केवळ आपल्यापुरते पाहणारा असतो.
आमचा पंथ मानणारे किंवा इतर अशी जगाची विभागणी पंथवाले करतात.

पंथ संकुचित असतो. धर्म व्यापक असतो.

आमच्यात आलात तरच सद्गति मिळेल, भले होइल हा भाव धर्मात नसतो.

तो भाव पंथात असतो.

धर्म या शब्दाचे भाषांतर कोणत्याच भाषेत नाही असे भारतरत्न पां वा काणे म्हणतात.

पंथामधे पवित्र म्हटलेल्या गोष्टी पंथाच्या दृष्टीने फायद्याच्या असतील पण खर्‍या अर्थाने पवित्र असतीलच असे नाही.

पंथ हा पंथाबाहेरील लोकांविषयी ममत्व बाळगत नाही.

धर्म हा आपला हा परका हा भेद करीत नाही
त्यामुळे धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही

त्यामुळे धार्मिक हिंसा इ. गोष्टींना अर्थच उरत नाही.
हिंसा रक्तपात या गोष्टी पंथात शक्य आहेत

आपण धर्म आणि पंथ यामधे गल्लत करतो नि फसतो.

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

18 Aug 2012 - 12:10 am | आनंदी गोपाळ

असा एक लेखक आहे.
धर्माने/साठी/मुळे/इ. जितकी हिंसा आजतागायत झाली तितकी दुसर्‍या कोणत्याच कारणाने झाली नाही असे त्याचे एक पॉस्चुलेट आहे.
द गॉड डील्युजन असे एक पुस्तक वाचनात आले होते. अर्धवट वाचले होते असे आठवते. जमल्ञास वाचून पहा.

सुनील's picture

18 Aug 2012 - 12:13 am | सुनील

तांबडा रस्सा भुरकण्याच्या आशेने धागा उघडला .... भेंडीची मिळमिळीत भाजी निघाली :(

नितिन थत्ते's picture

18 Aug 2012 - 11:29 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो. मी पण रस्सा किती तिखट होऊ शकतो ते पहायला आलो. पण कसचं काय !!!

आणि प्रतिसादक सुद्धा काही तेले, मसाले, मिरच्या टाकत नाहीयेत. :(

नाना चेंगट's picture

18 Aug 2012 - 11:36 am | नाना चेंगट

सहमत आहे. सुनील आणि थत्तेचाचांकडून फार अपेक्षा होत्या. ;)

आशु जोग's picture

18 Aug 2012 - 12:21 am | आशु जोग

धर्माला प्रचारकाची गरज वाटत नाही

पंथाला प्रचाराची गरज वाटते.

धर्म मनुष्याला आहे तसा स्वीकारतो.
पंथ तसे स्वीकारीत नाही,

विकास's picture

18 Aug 2012 - 12:43 am | विकास

धर्म मनुष्याला आहे तसा स्वीकारतो.

पण मग हिंदू हा धर्म होतो का पंथ?

आनंदी गोपाळ's picture

18 Aug 2012 - 12:59 am | आनंदी गोपाळ

ती जीवनपद्धती आहे ना? सुप्रीम कोर्टाने की कुणीतरी सांगितले आहे ते?

विकास's picture

18 Aug 2012 - 1:11 am | विकास

मला वाटते सुप्रिम कोर्टाने धारयते इति धर्मः या अर्थाने हिंदूइझम ला way of life असे म्हणले होते. म्हणूनच "धर्म मनुष्याला आहे तसा स्वीकारतो." हे वाक्य एकदा का मान्य केले की हिंदूइझम धर्म ठरतो का? का, मनुष्यास आहे तसे न स्विकारणार्‍या हिंदू धर्मातील चुकीच्या रुढी-परंपरा या वेगळ्या?

आनंदी गोपाळ's picture

18 Aug 2012 - 1:22 am | आनंदी गोपाळ

उत्तर तुमच्या चश्म्यावर अवलंबून आहे.
हिंदू धर्मात चुकीच्या रूढी परंपरा आहेत, इतके मान्य केलेत तरी पुरे ;) मग तुमचा माझा चष्मा एक होतो.
असो.
धागा जरा म्याचुअर होऊ द्या, मग पुढे बोलूच.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Aug 2012 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार

ती जीवनपद्धती आहे ना? सुप्रीम कोर्टाने की कुणीतरी सांगितले आहे ते?

कोर्ट आजकाल पैसे घेऊन निकाल देते असे एक राजकारणी काकू परवा जाहिर सभेत म्हणाल्या.

महत्त्वाचे :-

भारतरत्न पां वा काणे

कोण हो, कोण हे ?

तुम्हाला स.त. कुडचिडकर माहीती आहेत का?

बाकी बर्‍याच वर्षांपुर्वी बाळासाहेब सुद्धा असंच कैतरी बोलले होते न्यायालयं अन न्यायाधिशांबद्दल अशी एक बारीक आठवण आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Aug 2012 - 1:48 pm | परिकथेतील राजकुमार

"प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असं 'केतकी पिवळी पडली' मधे लिहिणारे ना ?

ते बहूदा 'कुडचेडकर' असे आहे. जाणकार आणि 'भाईप्रेमी' अधिक उजेड पाडतीलच.

माहिती नसेल तर उग्गीच जोक्स नका मारू.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Aug 2012 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार

अरे रे माफ करा हां. तुम्ही दिलेला संदर्भ उघडायला उशीर झाला.

आम्ही आमचा बावळट प्रश्न मागे घेत आहोत.

बाकी..

विशिष्ठ जातीचा गौरव करायला काढलेला धागा.

असो...

तो प्रतिसाद तुम्हाला नव्हता. मी ज्या काण्यांबद्दल लिहिलेय तेच काणे भारतरत्न होते. तेव्हा राधाकृष्णन राष्ट्रपती असल्याने धर्मशास्त्र रिलेटेड कामाबद्दल त्यांना भारतरत्न मिळाले.

बाकी माझे पोट भरलेले असल्याने तत्वज्ञानाचा पुरस्कार तर मी करणारच ;)

शिल्पा ब's picture

22 Aug 2012 - 2:06 pm | शिल्पा ब

हे पहा, माहीती नसताना "हे कोण?" , "ते कोण?" असले फालतु प्रश्न का विचारता हो? आधी माहीती करुन मग विचारत जा !
कै कळतंच नै बै लोकांना !

परिकथेतील राजकुमार's picture

22 Aug 2012 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार

माहिती नाही म्हणूनच "हे कोण?" , "ते कोण?" असे विचारावे लागते ना. माहिती असेल तर कशाला कोण विचारेल ?

जरा कुठे आम्ही धर्म , संस्कृती, अहिंसा ह्यांची माहिती करून घ्यायला लागलो, की तुमच्या सारखे उच्चवर्णिय प्रस्थापीत अंगावरती धावूनच येतात.

>> तुमच्या सारखे उच्चवर्णिय प्रस्थापीत अंगावरती धावूनच येतात

मला कल्पना आहे तुम्ही हे उपरोधाने लिहीले आहे.

पण

जातीवाचक उल्लेख टाळावेत.

चालक मालक देखील त्याबाबत अति काटेकोर आहेत.

बाकी

सुज्ञास अधिक सांगणे ...

बॅटमॅन's picture

22 Aug 2012 - 1:54 pm | बॅटमॅन

हे बघा. त्यांनाच महामहोपाध्याय काणे असेही म्हटल्या जाते-किंबहुना त्याच नावाने ते अधिक फेमस आहेत. हिष्ट्री ऑफ धर्मशास्त्र हा ५-६ हज्जार पानी ग्रंथ लिहून धर्मशास्त्र म्हंजे काय, त्यात काय चालीरीती, वैग्रे वैग्रे सर्व हिंदू धर्मग्रंथ पिंजून इतके डीट्टेलवारी लिहिले की ती ग्रंथमाला आजदेखील प्रमाणभूत मानतात. मुंबै कोर्टात वकील होते. सर्व खर्च/कटकट स्वतःच्या खिशातून केली. डैबेटीस झाला असतानादेखील व्हॉल्यूममागून व्हॉल्यूम निघतच होता. पहिला व्हॉल्यूम १९३० ला तर शेवटचा १९६२ ला निघाला. इंग्लंड, जर्मनी वैग्रे देशांतून त्या त्या फील्डमधले पहिल्या दर्जाचे विद्वान त्यांचे मत विचारायला येत असत. त्यांचे ग्रंथ फेमस होते पण ते कुठेही प्रोफेसर नसल्यामुळे परदेशस्थ विद्वानांना महदाश्चर्य वाटले की कुणी वकील स्वतःचे काम सांभाळून इतका कामाचा डोंगर कसा उपसू शकतो ते. जुन्या पिढीतल्या अतिअव्वल स्कॉलर्सपैकी ते होते. गरीब कुटुंबातून वर आले निव्वळ अविरत कष्टांनी. त्यांचे आत्मचरित्र -चरित्र कसले, इतरांच्या आग्रहाखातर त्यांनी लिहिलेली चरित्रात्मक नोंद इथे पहा.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा

पंथीय कागदाच्या पुडित धार्मिक पॉप-कॉर्न घेऊन बसलेलो आहे. बघु या आता,,,
हा धागा धर्म बनतो, का पंथ! ;-)

आशु जोग's picture

18 Aug 2012 - 12:37 am | आशु जोग

काय राव तुम्ही सारे प्रतिसादक

आम्ही विचारांची लढाई विचारांनी खेळतोय दिसत नाही का...

वैचारीक भर घालायची सोडून ... हे काय भलतेच

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2012 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

वैचारीक भर घालायची सोडून ... हे काय भलतेच

तुम्हाला 'वैचारीक जुलाब' असे म्हणायचे आहे का ?

बाळ सप्रे's picture

18 Aug 2012 - 12:39 am | बाळ सप्रे

त्यामुळे धार्मिक हिंसा इ. गोष्टींना अर्थच उरत नाही.

पांथिक हिंसा म्हणा धर्मयुद्ध म्हणा किंवा जिहाद म्हणा.. काय फरक पडतो..
हिंसा ती हिंसा..

शेवटी धर्म/ पंथ सारखेच.. धर्माची शिकवण ग्रेट.. पण लोकांची मानसिकता तीच .. माझा धर्म तो श्रेष्ठ.. बाकीचे हिंसा करतात..

धर्म वरचा .. पंथ खालचा..
आमचा तो धर्म.. बाकीचे ते पंथ.. हे देखिल तसेच पालुपद..

चिरोटा's picture

18 Aug 2012 - 11:53 am | चिरोटा

गोंधळ आहे.
पंथ हा धर्माचा subset आहे की नाही तेवढे सांगा.

सोत्रि's picture

18 Aug 2012 - 12:04 pm | सोत्रि

पंथ म्हणजे संप्रदाय - हा केवळ आपल्यापुरते पाहणारा असतो.
आमचा पंथ मानणारे किंवा इतर अशी जगाची विभागणी पंथवाले करतात.

धर्मात असे नसते? असे असते तर धर्माच्या नावावर फाळणी झाली नसती.

पंथ संकुचित असतो. धर्म व्यापक असतो.

म्हणजे नेमके काय?

आमच्यात आलात तरच सद्गति मिळेल, भले होइल हा भाव धर्मात नसतो.

नेमक्या ह्याच भावाचे अमिष दाखवून मिशनरीज भारतातल्या दुर्गम खेड्यापाड्यात धर्मांतरं घडवून आणत आहेत.

धर्म या शब्दाचे भाषांतर कोणत्याच भाषेत नाही असे भारतरत्न पां वा काणे म्हणतात.

खुप विचार केला ह्या 'विचारा'चा, वैचारिक लढाई करायला, पण काही कळलेच नाही.

पंथामधे पवित्र म्हटलेल्या गोष्टी पंथाच्या दृष्टीने फायद्याच्या असतील पण खर्‍या अर्थाने पवित्र असतीलच असे नाही.

का? म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत?

पंथ हा पंथाबाहेरील लोकांविषयी ममत्व बाळगत नाही.

वारकरी हा पंथ आहे आणि त्यांना पंथाबाहेरील लोकांविषयी ममत्व नाही असे कुठेही आणि कधीही जाणवत नाही.

धर्म हा आपला हा परका हा भेद करीत नाही
त्यामुळे धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही

त्यामुळे धार्मिक हिंसा इ. गोष्टींना अर्थच उरत नाही.
हिंसा रक्तपात या गोष्टी पंथात शक्य आहेत

जिहाद म्हणजे काय हो? चर्चचा इतिहास जरा वाचा म्हणजे ह्या विधानांतला फोलपणा लक्षात येईल.

आपण धर्म आणि पंथ यामधे गल्लत करतो नि फसतो.

म्हणजे नेमके कोण?

- (धर्म न मानणार्‍या पंथातला) सोकाजी

अन्या दातार's picture

18 Aug 2012 - 2:01 pm | अन्या दातार

मार्मिक प्रतिसाद. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 3:39 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2012 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> हिंसा रक्तपात या गोष्टी पंथात शक्य आहेत
काही उदाहरणं सांगा बरं तेवढीच माहितीत भर पडेल.

-दिलीप बिरुटे

राजघराणं's picture

18 Aug 2012 - 2:49 pm | राजघराणं

१) धर्म म्हणजे हिंदू आणी ईस्लाम म्हणजे पंथ असे धागाकर्त्या ला म्हणायचे असावे. (संपादित) शिळ्या कढीला उत आणण्याच केविलवाणा प्रयत्न

२) काय विषेश नाय या धाग्यात; जमाते इस्लामीची मत पण अशीच आहे.त - आपला तो बाब्या अन दुसर्याचा तो कार्टा

३) जर आपण दुसर्या कोणत्या पंथात जन्माला आलो असतो तर धर्माचा एवढा पुळका घेतला असता का? समजा घेतला असता तर पंथ कशाला म्हटले असते आणी धर्म कशाला? याचा विचार धागाकर्त्यानेच करावा.

ओ मिष्टर,
संघाचा काय संबंध ह्याच्यात ? काय शिळे आणि कसली कढी ? संघाने काय धर्माला जन्म दिला की पंथाला?
का आपली उचलली जिभ आणि लावली टाळ्याला?
कोठून तरी संघाचा बादरायणी संबंध आणायचा आणि बदनामी करायची?
यांतून तुम्ही सेटलवाडी पंथाचे आहात इतकेच सिद्ध होते ...

" काय विषेश नाय या धाग्यात; जमाते इस्लामीची मत पण अशीच आहे.त - आपला तो बाब्या अन दुसर्याचा तो कार्टा"

तुम्ही असे म्हणून हिंदू संघटना आणि जमाते - इस्लामी यांना एकाच पातळीवर आणले आहे .
सूज्ञ मिपाकर , हे आपल्याला मान्य आहे ?
ऊठसुट निरापराधी जनतेची कत्तल करणारे कोठे आणि लाखो सेवाकार्यांचे जाळे उभे करून , हजारो नि:स्वार्थी कार्यकर्त्याना उभे करून आपले देशप्रेम व्यक्त करणार्‍या हिंदूत्ववादी संघटना कोठे ? हिंदुत्ववाद्यांनी कोणत्या हुतात्मा स्मारकाची तोड्फोड्केली ?
"अरे ला कारे" केले तरी तो गुन्हा ? हिंदूनी कायम मारच खात रहावे की काय ? देशाचे तुकडे झाले , पुन्हा होऊ घातले आहेत .. तरी शांतच बसावे ? हिंदूनी आपल्या संरक्षणार्थ प्रतिकार केला की संघ दोषी ? व्वा , काय पुरोगामी विचार आहेत आपले ..! असल्या विचारसरणीमुळे तर हिंदू अल्पसंख्यांक होण्याचा धोका निर्माण झाला आहे .. !

जर आपण दुसर्या कोणत्या पंथात जन्माला आलो असतो तर धर्माचा एवढा पुळका घेतला असता का? समजा घेतला असता तर पंथ कशाला म्हटले असते आणी धर्म कशाला?<

घेतलाच असता .. कारण इतर पंथियांचा तोच तर मोठ्ठा प्रोब्लेम आहे .. गोची आहे ती तीच तर आहे .. हिंदू ही एक जीवन पद्धती आहे ज्यामध्ये अनेकानेक उपासना मार्ग सामावले आहेत . आणि कोणत्याही उपासना मार्गाने त्या परमतत्वा पर्यन्त जाता येते ही हिंदूंची मान्यता आहे .. ( या धार्मिक सहिष्णूतेमूळेच तुम्ही असली मुक्ताफळे येथे उधळू शकता.. अन्यथा....) आता तुम्हाला ज्यांचा पुळका आला आह्र त्यांना एकदा हे विचारून पहा .. त्यांना दुसर्‍या उपासना पद्धतीने गेले तर चालते का ते ?
जाऊ दे , तुम्हाला सांगण्यात काही हशील नाही.. काविळ झालेल्या जग पिवळेच दिसणार ..

मा. संपादक ,
असल्या खोड्साळ आणि अविवेकी प्रतिसादांना मिपावर स्थान असू नये , ही विनंती .
विनाकारण संघाचे नाव या धाग्याच्या प्रतिसादात गोवले गेले आहे, त्याचा मी निषेध करतो आणि वरील अश्लाघ्य प्रतिसाद त्वरित उडवावा ही रास्त मागणी करतो.

- विटेकर

नितिन थत्ते's picture

19 Aug 2012 - 12:44 pm | नितिन थत्ते

>>तुम्ही सेटलवाडी पंथाचे आहात इतकेच सिद्ध होते

हो हो. पूर्वी एक अनंत सेटलवाड म्हणून क्रिकेट समालोचक होते. चांगली कॉमेण्टरी करायचे. पण भेंडी ते भारताच्या (फालतूच असलेल्या) प्लेयरना नेहमी फालतू म्हणायचे. आम्हाला लै राग यायचा. आम्हाला सुशील दोशी आवडायचे.

आशु जोग's picture

18 Aug 2012 - 3:15 pm | आशु जोग

भगवद गीता ही सर्वानाच अ‍ॅप्लिकेबल आहे

कोण कुठल्या पंथाचा हा विचार तिथे नाही

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा

कोण कुठल्या पंथाचा हा विचार तिथे नाही>>> ख्याक.........!
अहो पण दुसरे लोक हा विचार करतात,त्याचे काय...?

स्पा's picture

18 Aug 2012 - 3:47 pm | स्पा

सर्व धर्मीय, आणि सर्व पंथीयांना आवडणाऱ्या कुरकुरीत जिलब्या/इमर्त्या
तुमी बी घ्या :)

विटेकर's picture

19 Aug 2012 - 8:52 am | विटेकर

इथे कंपूबाजांची चलती आहे .. आपल्या धाग्याला योग्य प्रतिसाद अथवा निपक्षपाती चर्चा हवी असल्यास आधी आपला कंपू निर्माण करावा लागतो.. नाहीतर पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्यला मणिहार . अशी वेळ येते.
संजय क्षीरसागरांचा मिपावरील वैचारिक खून तू पाहीला नाहीस का? अशीच कथा भटकंती वरील नर्मदा परिक्रमेवरच्या मालिकेची झाली.
मिपाचे मालक /चालक / संपादक अतिशय अनासक्त वृत्तीने हे व्रत चालवतात पण मराठ्यांचा दुहीचा शाप थोरल्या महाराजांना ही चुकला नाही .. माझीच / माझ्याच कंपूची लाल .. करताना इतरांच्या वयाचा, त्यातील विचारांचा , धागाकर्त्याम्च्या वकुबाचा अजिबात विचार केला जात नाही...तेव्हा तुमची अपेक्षा गैर आहे एवढेच म्हणेन !

अस्तु.

चौकटराजा's picture

19 Aug 2012 - 8:55 am | चौकटराजा

धर्म हा शब्द कर्तव्य( duty )या अर्थाने वापरला जातो .
धर्म हा शब्द गुणदोष ( attribute) या अर्थानेही वापरला जातो.
ज्या रूढ प्रमुख अर्थाने धर्म समोर येतो. त्या धर्माची मानवाच्या जीवितासाठी काहीही आवश्यकता नाही.
जे आवश्यक नाही ते काळाच्या ओघात मागे पडते. आज ना उद्या धर्माचे तेच होणार .तो पर्यंत् या अर्थाचा
आधार घेऊन सुदोपसुंदी आली व मानवाचा अंत झालाच तर उरलेली जीव सृष्टी म्हणेल " God is great !
उत्पती , स्थिति व लय साधण्यासाठी काय भन्नाट आयडिया लढवलीय त्याने ! "

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Aug 2012 - 5:34 pm | llपुण्याचे पेशवेll

ज्या रूढ प्रमुख अर्थाने धर्म समोर येतो. त्या धर्माची मानवाच्या जीवितासाठी काहीही आवश्यकता नाही.
जे आवश्यक नाही ते काळाच्या ओघात मागे पडते. आज ना उद्या धर्माचे तेच होणार .तो पर्यंत् या अर्थाचा

छान कल्पनाविलास.

धर्म या विषयावरील http://www.misalpav.com/node/21575 येथे झालेले मंथन श्री रणजित चितळे यांच्या परवानगीने डकवत आहे . विषयानुषंगिक आहे म्हणून पुनुरुक्तीचा दोष पत्करुन लिहित आहे ...
जिज्ञासूनी चौकट राजा यांचा हा पूर्ण धागा पुन्हा पहावा..

माझा प्रतिसाद

१. धर्म हा शब्द फक्त हिंदू धर्मालाच लागू होतो..
कारण मुस्लिम, ईसाइ , यहुदी ..हे उपासना पंथ (म्हणजे इंग्रजीत ज्याला "रिलिजन" असे म्हणतात) आहेत, अश्या अनेक उपासना पद्दधती ( शैव, वैष्णव, शाक्त, मध्व, शीख , जैन , बौद्ध ...इत्यादी ) सामावून घेऊ शकणारी " हिंदू " ही एक "जीवनपद्दती " आहे. रुढार्थाने एक देव , एकच धर्मग्रन्थ आणि एकाच पद्दतीची उपासना हिंदू धर्म सांगत नाही.. म्हणजे.. तुम्ही जानवे घातले अथवा नाही तरी हिंदू, मंदिरात गेला अथवा नाही तरी हिंदू. जाळले तरी हिंदू पुरले तरी हिंदू.. देव मानला तरी हिंदू नाही मानला तरी हिंदू, ... अशी अनेक उदाहरणे देता येतील . हजारो वर्षांच्या काल कसोटीवर घासून घासून सिद्ध झालेली ती एक सर्व समावेशक, वैविध्याने नटलेली , अत्यंत लवचिक आणि नाविन्याला कालानुरुप सामावून घेणारी अशी परिपूर्ण जीवनपद्दती आहे .. तेव्हा " धर्म " या संकल्पनेचा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर असा विशाल कानव्हास असायला हवा.
२. धर्माची व्याख्या काय ?

धारणादधर्म नित्याहु : धर्मो धारयते प्रजा: |
यस्याद धारण संयुक्त स धर्म इति निश्चयः ||
पूर्ण अर्थ डकवत नाही पंण सारांश असा की " जे समाजात ( प्रजा) धारण केले जाते ..जे लोकांना एकत्रित ठेऊ शकते ,, अशी जी धारणा त्याला धर्म " असे म्हणावे. ( कोणतीही उपासना पद्दती लोकांना एकत्र ठेऊ शकत नाही ..किंबहुना उपासनापद्दह्तीमुळेच फूट पडते .. त्यामुळे उपासना पद्धतीला धर्म म्हणता येत नाही. )

३. धर्माची आवश्यकता काय ?

आहारनिद्राभय मैथुनंच सामान्यमेतम पशुनिर्भराणाम |
धर्मोहीतेषाम अधिकोविशेषो धर्मेणहीना: पशु भि: समाना: ||

आहार , निद्रा, भय आणि मैथुन ह्या मूलभूत गरजा मनुष्य आणि प्राणी यांच्यात सारख्याच असतात ! धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.

४. धर्माचे पालन
धर्म यां बांधते धर्मो न स धर्मः कुधर्मंकः|
अविरोधात्तु यो धर्म: स धर्म : सत्य विक्रमं ||

जो धर्म दुसर्याच्या धर्मपालनामध्ये अडथळा निर्माण करतो , तो खरा धर्म नव्हे !
उलट दुसर्याच्या धर्माला विरोध न करणाराच खरे धर्माचे पालन करतो .

शुद्धलेखन - चूक भूल द्यावी घ्यावी.. शक्य झाल्यास चुका दुरुस्त कराव्यात !

आपणांस आहे मरण! म्हणोन राखावें बरवेपण!!
-----------------------------.-----------------------

श्री रणजित चितळे यांचा प्रतिसाद :--

.
धर्म ही जीवन पद्धतीवर आधारीत संकल्पना आहे . आज धर्म कॅन्सल केले तरी कोणत्या तरी दुस-या नावाने जीवन पद्धती सुरु राहील. देव व धर्म कॅन्सल कोण करणार. तो नजिकच्या काळात तरी होऊ शकणार नाही. तेव्हा आहे त्याच व्यवस्थेत सुधार करुन जगले पाहीजे.

-.... धर्मनिर्देश, धर्मशास्त्रे, घालून दिलेली धर्मसूत्रे ही आपल्या पूर्वजांने त्यांच्या अनुभवातून आनंदाने आयुष्य जगण्याच्या दृष्टीने दिलेली समाजाला एक दिशा आहे (कोणत्याही धर्मात कमी अधीक पद्धतीने हे आढळेल). ह्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रगती होण्यास मदत होते. आपली चित्तशुद्धी होते, सचेतन बुद्धी वाढीस लागते. हे सगळे आपले मन व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न बनवण्याच्या हेतूने तयार केली होती व तशी बंधने घातली गेली होती. सामाजिक सौहार्द्रता व समरसता टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तयार केली गेली होती. त्याला देश, काल पात्राच्या मर्यादा होत्या व अजूनही आहेत. त्या मुळेच प्रत्येकाने हल्लीच्या काळी ही सूत्रे विचार करून अमलात आणली पाहिजेत. आजच्या देशाच्या गरजा, कालाच्या मर्यादा व पात्रता ह्याचा विचार करून प्रसंगी त्या सूत्रात यथार्थ बदल करून त्या त्या सूत्रांचे पालन केले पाहिजे. सतीची प्रथा एकेकाळी चालू होती आता ती कालबाह्य झाली व आपण ती टाकून दिली. तीच गोष्ट बाकीच्या चालीरुढींबाबत लागू आहे. ह्याचा विचार करून आपल्या धर्माच्या चौकटीत आपण वागले तर आपल्याला मानसिक सुरक्षितता लाभेल. त्याच बरोबर धर्मात सांगितल्या प्रमाणे जो वागतो त्याला कठीण परिस्थितीत मार्ग काढायला शक्ती व बुद्धी मिळते, कारण धर्म, सामान्य माणसाच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संभ्रमांवर तोडगा देत असतो. आपल्या धर्मात, आपल्या समोर ठाकणाऱ्या सगळ्या द्विधा मनस्थितींवर उहापोह करून ठेवलेला आहे. आपल्या आयुष्याच्या मार्गावरून आपण जेव्हा घसरायला लागतो तेव्हा धर्म आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. म्हणूनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा असू द्यावी त्यावर पण अंधश्रद्धा टाळावी.

धृतिः क्षमा दमो अस्तेयं शौचं इन्द्रिय निग्रहः । धीर विद्या सत्यम अक्रोधो दशकं धर्म लक्षणं.

ह्यात माणसाला चांगले जगण्याचेच नियम दिलेत ना. मग असेला धर्म (काही चांगल्या गोष्टी त्यात नाहीत म्हणून मोडकळीला काढायचा व दुसरा कोठचा तरी आणायचा त्या पेक्षा तोच सोपा करुन आपल्या परीने वापरा ना)

ह्यात काय वाईट आहे मला तरी समजेना.

माझे ब्लॉग्स्
www.bolghevda.blogspot.com (मराठी)
www.rashtrarpan.blogspot.com
www.rashtravrat.blogspot.com

रणजित चितळे
.

वर उल्लेख केलेला धागा श्री . पुण्याचे वटवाघूळ यांचा आहे ..
चुकीबद्दल क्श्मम्स्व! पण चौकट राजा याण्चे त्याच धाग्यावरील प्रतिसाद ही पहावेत .

आनंदी गोपाळ's picture

19 Aug 2012 - 11:26 am | आनंदी गोपाळ

तो धगा वटवाघूळांचा असेल तर त्यासाठी चितळेंची परवानगी कशी काय घेतलीत?
वरील प्रतिसादास बूच लागले नसल्याने स्वतःच संपादित करून योग्य ते बदल करावे.

विटेकर,

आपले प्रतिसाद वाचले.

एक गोष्ट सांगतो

फार फार वर्षापूर्वी एक राजा होता. त्याने आपल्या दरबारातील विद्वानाला विचारले "माझे राज्य श्रेश्ठ की भगवंतांचे ?"

तेव्हा विद्वान म्हणाला 'आपलेच महाराज'

राजा म्हणाला 'ते कसे काय ?'

विद्वान म्हणाला 'आपल्या राज्यात हद्दपारीची शिक्षा देता येते, भगवंताच्या राज्यात नाही'

याचा अर्थ असा, 'भगवंताचे राज्य, त्याची हद्द कधीही कुठेही संपत नाही.'

थोडक्यात धर्म हा सर्वव्यापी असतो. त्यात काफर असा कुणीच नसतो.

आनंदी गोपाळ's picture

19 Aug 2012 - 11:29 am | आनंदी गोपाळ

तेच तर यांचे म्हणणे आहे.
अहो धर्म असा तो एकच. हिंदू. सगळे जग हिंदूच आहे. त्यात पैगंबरवादी, चार्वाकवादी, ख्रिस्तवादी, महावीरवादी इ. पंथ फक्त आहेत.
हाकानाका.
गहिरं डेंजर लॉजिक हे भो! नीट समजी ल्या पहिले मंग बोला.

चौकटराजा's picture

19 Aug 2012 - 7:45 pm | चौकटराजा

माझ्या एका मुसलमान मित्राने विचारले " एक कोटी मिळाले तर इस्लाम स्वीकाराल का "? मी म्हणालो
" बिलकुल नाही ? त्याचे विचारले " तुम्ही गर्व से हो मध्ले आहात काय" मी म्हणालो बिलकुल नाही.
" मग कारण काय आमच्याकडे न येण्याचे ? " आम्हाला मशीदीत नमाज पढण्याचे व चर्च मधे मास ऐकण्याचे स्वातंत्र्य आहे. व त्याची किमत कशातच होउ शकत नाही ! "

नावातकायआहे's picture

19 Aug 2012 - 11:14 pm | नावातकायआहे

__/\__

धर्माचा अर्थ समजून घेण्यासाठी

यदा यदा हि धर्मस्य चा अर्थ ध्यानात घ्यावा.

--

धर्मामधे भाषेची सक्ती, आग्रह नसतो.
भक्ती भाव महत्वाचा...

जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण.
ये यथा मां प्रपंद्यंते....

भगवद गीतेतील या गोष्टी सगळ्यांनाच लागू आहेत.
पाकिस्तानपासून सौदी पर्यंत सर्वांना

ज्याला लागू नाहीत असा भगवंताच्या राज्याबाहेरचा अजून मी कुणी पाहिलेला नाही.

आनंदी गोपाळ's picture

22 Aug 2012 - 12:24 pm | आनंदी गोपाळ

समजले नाही.

भगवद गीतेतील या गोष्टी सगळ्यांनाच लागू आहेत.
पाकिस्तानपासून सौदी पर्यंत सर्वांना

म्हणजे नक्की कोणत्या भूप्रदेशाला??
(संपादितः पाकव्याप्त काश्मिर भारताचा भाग म्हणून न दाखवल्याने प्रस्तुत केलेला नकाशा चूक ठरतो.)

बॅटमॅन's picture

22 Aug 2012 - 12:45 pm | बॅटमॅन

भारताला हिरव्या रंगाने रंगवलेला नकाशा अपलोडवल्याबद्दल निषेध ;)

(गर्विष्ठ) बॅटमॅन.

आनंदी गोपाळ's picture

23 Aug 2012 - 9:18 pm | आनंदी गोपाळ

पाकव्याप्त काश्मीर काय अन हिरवा भारत काय!!.
धन्य आहात लोकहो!

(रंगांधळा) आनंदी गोपाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Aug 2012 - 10:20 pm | बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

20 Aug 2012 - 10:56 am | नितिन थत्ते

+१

बॅटमॅन's picture

20 Aug 2012 - 11:48 pm | बॅटमॅन

+२

आशु जोग's picture

20 Aug 2012 - 11:39 pm | आशु जोग

मा. मालक व चालक

जे गमतीचे धागे आहेत तिथे आपल्या वकुबा प्रमाणे सदस्यांनी घाण केली तर मी समजू शकतो

पण जिथे मुद्द्यांना उत्तर देता येत नसेल तिथे प्रतिसाद म्हणून अशी घाण का करावी

---

त्यातही काही सदस्यांना आवर घालण्याची गरज आहे

ते लोक सवयीचे गुलाम बनून ठराविक प्रकारचे प्रतिसाद टाकत राहतात.

--

मालक
आपण लक्ष घाला अन्यथा चालू द्या