काल सकाळी ऑफिसमध्ये ध्वजवंदन करून हिंजवडी-माण-घोटावडे-अंबडवेट-पौड मार्गे मुळशी ताम्हिणीत भटकंती करून आलो. त्यादरम्यान टिपलेले काही फोटो.
१. चाचिवली गावाजवळून दिसणारा मुळशी जलाशय
२. दावडीचे उपकेंद्र
३. मुळशी जलाशय
४. ताम्हिणी घाटाकडे सळसळणारा चिंब रस्ता
५.
६. प्लस व्हॅली
ताम्हिणी घाटाकडे जाताना निवे गावाच्या थोडे पुढे एक फाटा उजवीकडे लोणावळ्याकडे वळतो. त्या रस्त्यावर ३/४ किमी अंतरावर नितांतसुंदर अशी एक दरी आहे.
७. कोसळत्या जलधारा
८.
९.
१०.
११. ही दरी म्हणजे कुंडलिका नदीचा उगम
१२.
१३.
१४. दरीच्या काठावरचे पठार
१५.
१६. कुंडलिका दरीच्या थोडे पुढेच असणारा पिंपरी जलाशय
१७. पिंपरी जलाशय व पाठीमागील सिनेर खिंड
१८.
१९. हाच ओढा पुढे धबधब्याच्या रूपाने कुंडलिका दरीत कोसळतो.
२०. पिंपरी तलावापासून दिसणारे आकाशावेरी घुसलेले सुळके
२१.
२२. झाडीभरल्या वाटा
२३. परतीच्या वाटेवर
२४.
२५.
२६.
२७. भाताची खाचरं
२८.......
२९. ताम्हीणी घाट आणि कुंडलिका दरीकडे जाणारा रस्ता दर्शवणारा गूगल नकाशा
View Larger Map
प्रतिक्रिया
16 Aug 2012 - 11:51 am | कपिलमुनी
लैच भारी फोटो आहेत ..
प्रवासाच्या रस्त्याचा गूगल मॅप द्यायचा होतास ...
आम्हाला बरा पडला असता ..पुढच्या ट्रिपला ;)
16 Aug 2012 - 2:52 pm | कपिलमुनी
:)
16 Aug 2012 - 11:58 am | लीलाधर
घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा, कोसळती धारा !
असेच म्हणावे लागेल ओ वल्लीदा १ नंबर आले आहेत हो फोटो :)
16 Aug 2012 - 12:11 pm | गवि
झक्कास. ताम्हिणी घाटातून पहिल्यांदाच प्रवास या मे महिन्यात केला तेव्हा मधला काही सदहरित जंगलाचा भाग वगळला तर रखरखाट होता.
पावसाळ्यात एकदम ट्रान्स्फर सीन दिसतो आहे. सुंदर...
16 Aug 2012 - 12:19 pm | उदय के'सागर
व्वा... काय छान वाटलं फोटो पाहून ...:)
मागच्या वर्षी पावसाळ्यात ताम्हीणी ला गेलेलो... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि हे फोटो पाहून ह्या वर्षी जाण्याचं पक्कं करतोय :)
16 Aug 2012 - 12:40 pm | michmadhura
धुक्याने पांघरलेले दरीखोर्याचे फोटो, एकदम बेस्ट.
16 Aug 2012 - 12:42 pm | मूकवाचक
मस्त!
16 Aug 2012 - 12:45 pm | ५० फक्त
फोटो मस्त,
अवांतर - आमच्या क्षेत्रात फुकटची घुसखोरी खपवुन घेतली जाणार नाही, फोटो क्र. २ मध्ये उपकेंद्र कुठं आहे सिद्ध करा नाहीतर नाव बदला, फोटोचं. तुमच्या माहितीसाठी दावडीला जे उपकेंद्र आहे तिथंपर्यंत सामान्यपणे कुणीही पोहोचु शकत नाही, टाटा पॉवर म्हणजे महाराष्ट्र शासन नव्हे, कुणालाही कुठंही येउ द्यायला.
16 Aug 2012 - 12:49 pm | गवि
मला या घाटात अगदी रस्त्याला लागून टाटाचे असंख्य सोलर पेनेल्सचे मोठे प्लॉट्स दिसले. तेच का पॉवर स्टेशन? की ते आणि काही?
टाटा पॉवर: अमुक मेगवॅटचा सोलर पॉवर प्रोजेक्ट असं तिथे लिहिलं होतं.
16 Aug 2012 - 12:51 pm | प्रचेतस
अहो ते उपकेंद्र झाडीत दडलंय. पल्याडच्या बाजूनं फोटो काढल्यामुळे दिसत नाहीये नीटसं. :)
16 Aug 2012 - 4:43 pm | ५० फक्त
@ गवि,
नाही, ते उपकेंद्र नाही ,तो सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट आहे टाटाचा. दावडीला टाटाचा भिरा पॉवर जनरेशनचा पाण्याचा इनटेक आहे. त्या साठीचं उपकेंद्र आहे तिथं.
पहिल्या फोटोत दिसतात ते प्रचंड टॉवर टाटाची स्वताची वीज, टाटाच्या माले गावातील गेस्ट हाउसला आणण्यासाठी टाकलेल्या लाईनचे आहेत.
16 Aug 2012 - 1:13 pm | मेघवेडा
गार्गार वाटलं. झकास फोटो! :)
16 Aug 2012 - 1:21 pm | सुहास झेले
लई लई भारी फोटो आहेत. पावसात ताम्हिणी घाट म्हणजे स्वर्गानुभव.
काल अवचितगडावर होतो, तिथून कुंडलिका जबरदस्त दिसते :) :)
16 Aug 2012 - 6:57 pm | मोदक
>>>काल अवचितगडावर होतो
लेख आणि फोटो..?
अन्यथा वरील विधान बिनशर्त मागे घेणे.
16 Aug 2012 - 1:26 pm | गणेशा
नेहमी प्रमाणे मस्त फोटो..
16 Aug 2012 - 6:59 pm | मोदक
गणेशा.. फटू दिसले..?? ;-)
16 Aug 2012 - 1:35 pm | मन१
मस्तच.
कधी मधी वाटेल तेव्हा, लहर येइल तेव्हा मीही असाच ताम्हिनी घाटात पोचायचो.
पण अर्थात तुम्हा मंडाळींसारखे गड किल्ले अजिबातच पाहिलेले नाहीत, ट्रेकिंग म्हणावं तसं कधीच केलं नाही.
नुसतं जायचो. आणि पायी भटाकत सुटायचो. कुठंही....कसंही.......
अल्लाद अल्लाद एक नशा चढायची हवेची. त्याच धुंदीत काहिसं हल्कं हल्कं वाटयला लागलं की परतीला लागायचो.
बहुतेकदा सोबत फारसे कुणीच नसायचे. कॅमेरा तर कधीच नेला नाही. स्वतःला शब्दःश अगणित क्षण देता यायचे.
लव्हली.
16 Aug 2012 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा
अनेकदा..अनेकवेळी...आणी हरएक ऋतुमधे या घाटातून गेलेलो आहे...पण पावसाळ्यातली मजा काहि और असते. वल्ली...फोटू मस्त आलेत हो...
अ-वांतर---- बाइक रिफ्रेश केलीत काय..? ;-)
16 Aug 2012 - 2:57 pm | सूड
गारगार वाटलं !!
16 Aug 2012 - 3:08 pm | चौकटराजा
सह्य गिरी दावितसे झाडे, आणिक नाना वल्ली
कुंडलिकेच्या उगमाची निर्झरे ,सापडली एका किल्ली
गावकरी एकूणात खरेचि ,फार हिंडतो हल्ली
कारे गुपचुप जात फिरतोसी , उत्तर द्रे रे वल्ली !
काय राव त्या पिल्यन सीटला हक्काचं माणूस आणा नायतर म्हातुर्याला
तरी बोलवा !
16 Aug 2012 - 3:18 pm | मदनबाण
आहाहा... सगळ कसं हिरव गार ! :)
त्या ए़कट्याच चरणार्या वासराकडे लक्ष गेल,गावाकडे गेलो तर,किंवा शहरात जेव्हा चुकुन एखादे वासरु दिसले तर त्याला हात लावुन गोंजारायला मला फार फार आवडते... त्यांचा गळ्यावरुन हात फिरवताना फार मस्त वाटत ! कसं अगदी कोवळ पाडस ! :) ते प्रेमाने चाटतात तेव्हा त्यांच्या जिभेचा खरखरीत स्पर्श देखील चित्ताला शांतता देउन जातो. :)
16 Aug 2012 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर
ताम्हिणी घाट मस्तच आहे. पावसाळ्यातील भटकंती अतिशय आल्हाददायक. नयनरम्य निसर्गचित्रं.
स्वातंत्र्य दिनी निसर्गाच्या,पशू-पक्ष्यांच्या सानिध्यात जितका 'स्वातंत्र्याचा' अनुभव येतो तितका शहरात येत नाही.
छायाचित्रण कलेतील एक वाचलेले वाक्य आहे: Nature never deceives. निसर्ग कधी फसवत नाही. नवशिक्या छायाचित्रकाराने छायाचित्रणाला सुरुवात सुंदर निसर्गापासून करावी. येणारी सुंदर छायाचित्रं छायाचित्रकाराचा हुरूप वाढवितात. स्वानुभव.
16 Aug 2012 - 4:21 pm | नि३सोलपुरकर
फोटो मस्त आलेत मित्रा.
वल्ली - ताम्हिणी घाटातून खाली पाली गावात उतरायला मार्ग आहे वाटतो ?
16 Aug 2012 - 10:09 pm | प्रचेतस
पालीला जायचे म्हटले तर ताम्हिणी गाडीमार्गाने घाट उतरून माणगाव किंवा कोलाड ते वाकण फाटा. पायी जायचे असेल तर ताम्हिणी घाट-तैलबैला २० किमी-तिथून सवाष्णी किंवा वाघजाई घाटाने घाट उतरून बैरामपाडा-धोंडसे आणि तिथून पाली गाठता येईल पण दोन्ही खूप लांबचे पल्ले आहेत.
16 Aug 2012 - 4:40 pm | मी_आहे_ना
मस्त फोटो, आणि लोणावळ्याच्या मार्गाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या ट्रिपला नक्कीच 'राईट' मारण्यात येइल :)
16 Aug 2012 - 4:46 pm | अक्षया
मस्तच आहेत सगळे फोटो.. :)
16 Aug 2012 - 5:05 pm | सौरभ उप्स
मस्त रे, मस्त आलीये हिरवळ, आणि कोसळत्या जलधारा
16 Aug 2012 - 5:34 pm | पैसा
कोणत्या फोटोला सर्वात छान म्हणू? सगळेच आवडले. पावसाने धुवून स्वच्छ झालेला रस्ता कधी कधी चांदीसारखा चकाकतो. अगदी तोच अनुभव या फोटोतला रस्ता पाहताना आला! मस्त! मस्त!! मस्त!!!
16 Aug 2012 - 6:55 pm | निशदे
एक फोटो आवडेपर्यंत पुढचा जास्त आवडतोय....... शेकडो आठवणी जाग्या केल्यात. कॉलेजमध्ये आणि नंतर असंख्य वेळा ताम्हिणीमध्ये गेलो आहे.
सुंदर फोटो
16 Aug 2012 - 7:24 pm | गणामास्तर
मस्त फटू रे.. घाट सुरु होण्याआधी एक धबधबा आहे, तिकडे गेला नाहीस काय?
आणि त्या माण गावा पुढच्या लेण्या पाहील्यास का?
16 Aug 2012 - 10:12 pm | प्रचेतस
अबे ताम्हिणी घाटात येणारे ७५% लोक त्या धबधब्यापाशी असतात. तिथेच जाम गर्दी असते. पुढे फारसे कोणी जात नाहीत.
माणच्या लेण्या दिसल्या. लेण्या कसल्या, एक विहार आहे फक्त. जाईन आता लवकरच तिथे.
@अत्रुप्त आत्मा: बाईक रिफ्रेश केली होती. :)
16 Aug 2012 - 9:36 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच रे वल्ली...जबरदस्त फोटो.
ताम्हीणी एरीया ट्रेक करायला जबरदस्तच आहे.. कैलासगड, सिनेरखिंड, अंधारबन, पिंपरीचा घाट, गाढवलोट घाट आणीक बरेच काही... ह्या भागातले दुर्लक्षित किल्ले आणी घाट वाटा हिंडायला मस्त मजा येते..
आम्ही पहिल्यांदा ४ वर्षांपुर्वी घनगडावरून बाईकने ह्याच एरीयात फिरून निव्याला गेलो होतो तेचा पासूनच ह्या एरीयाच्या प्रेमात पडलोय...
अवांतरः हाच एरीया अजून ६-७ महीन्यांनी पुर्णपणे वेगळे रुप दाखवेल..
16 Aug 2012 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा वल्लीशेठ. लंबर एक फोटो.
-दिलीप बिरुटे
16 Aug 2012 - 10:37 pm | स्पा
फोटो लैच कहर आलेत वल्या .
हिरवेगार .........
बायको पण नटून आलेली दिसतेय :D
16 Aug 2012 - 10:49 pm | प्रशांत
सगळे फोटो मस्तच...
16 Aug 2012 - 10:50 pm | प्यारे१
एकटाच ;) गेलेलास????
17 Aug 2012 - 10:10 am | प्रशांत
प्यारे भाऊ शेवटचा फोटो नाहि दिसत काय तुझ्याकडे
17 Aug 2012 - 11:17 am | मोदक
फटू नं २७ मध्ये कोणीतरी आहे, त्याबद्दल बोलता आहात का आपण?
17 Aug 2012 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा
@फटू नं २७ मध्ये कोणीतरी आहे>>> या वरुन आंम्हाला...''कुणितरी आहे तिथे'' नावाचे नाटक अठवले... ;-)
तिथे मध्य भागी १ हिरवट पुतळा दिसतोय.... हम्मम्मम्म.... काय असावं बरं ते? ;)
16 Aug 2012 - 11:08 pm | मराठे
मस्त आले आहेत सगळेच फोटो.
17 Aug 2012 - 6:28 am | स्पंदना
17 Aug 2012 - 7:39 am | रेवती
सगळे फटू लै म्हंजे लैच भारी!
क्र.५ आणि क्र. १५ हे खोटे वाटावेत इतके चांगले आलेत.
18 Aug 2012 - 9:35 pm | कवितानागेश
त्या गवतावर लोळावसं वाटतंय लगेच. :)
17 Aug 2012 - 10:17 am | दिपक
झकास फोटो.
18 Aug 2012 - 10:18 pm | गणपा
वाह !!
एक से बढकर एक फोटो आहेत.
22 Dec 2012 - 7:22 pm | मयुरपिंपळे
वल्ली फोतु
22 Dec 2012 - 7:26 pm | यशोधरा
फोटो नंबर १७ खूप आवडला!
21 Dec 2015 - 8:51 am | अत्रुप्त आत्मा
आगुब्बा चा धागा!
21 Dec 2015 - 8:51 am | अत्रुप्त आत्मा
आगुब्बा चा धागा!
21 Dec 2015 - 10:19 am | सतिश गावडे
खुपच छान. कसे जायचे ईकडे?
21 Dec 2015 - 5:19 pm | जव्हेरगंज
HOW TO GO? FROM PUNE?
PLEASE टेल टेल.
21 Dec 2015 - 6:04 pm | प्रचेतस
गावडे सर मुद्दाम विचारायलेत.
बाकी रस्ता एकदम साधा सोपा सरळ -
पुणे-भूगाव -पिरंगुट- पौड- मुळशी धरण - माले- वारक- ताम्हिणी
ताम्हिणी चे इथे मुळशीचं ब्याकवाटर हेयरपिन वळण घेतं. त्यापुढे दावडी मग निवे पार केलं उजवीकडे लोणावळा फाटा लागतो. तिथे पिंपरीचं लहानं धरण आहे आणि पलिकडे कुंडलिका दरी. ह्या फ़ाट्यावरुन न वळता सरळ गेल्यास कुंडलिका प्लस दरी आणि मुख्य ताम्हिणी घाट. मुख्य ताम्हिणी घाटात डोंगरवाडी आणि आदरवाडी आहेत. डोंगरवाडीत टाटा वीजप्रकल्प आहे. खाली भिऱ्याला जायला आधी हाईस (डोंगरउतारावरुन रुळांवरुन जाणारी ट्रोली) तिने एकदा भिऱ्याला उतरलो होतो. आता रस्ता झाल्याने हाईस बंद आहे. मात्र हे रूळ अजूनही दिसतात.
21 Dec 2015 - 10:20 am | यशोधरा
मस्त!
21 Dec 2015 - 10:21 am | सस्नेह
डोळे निवले फोटो पाहून. एकदम प्रसन्न !
21 Dec 2015 - 10:35 am | अभ्या..
जबरदस्त हो प्रचेतसराव. काढ़ा अजून एखांदी ट्रिप. यताव.
21 Dec 2015 - 10:45 am | नीलमोहर
डोळ्यांना थंडावा मिळाला..
21 Dec 2015 - 6:41 pm | पद्मावति
खूपच मस्तं!
8 Jan 2016 - 6:11 pm | स्वच्छंदी_मनोज
हा धागा पुन: बोर्डावर आणल्याबद्दल अआ ह्यांचे आभार.
ह्या २०१५ च्या पावसाळ्यात पण ह्या भागात ट्रेकींगला जाणे झाले पण गेल्या पावसाळ्यात मनासारखा पाऊस ट्रेक झाला नाहीच :(. उलट अंधारबन, हिरडी भागात ऐन पावसाळ्यान कमी पावसाने चक्क उन्हाने दमणूक केली :(
तसेच गेल्या काही वर्षात इथे बरेच प्लॉटींग झालेय आणी ज्या रस्त्यावरून काही वर्षांपुर्वी एखाद दुसरी एस्टी, बैलगाडी किंवा गेला बाजार बाईक्स दिसायच्या तिथे आता सर्रास फॉर्च्युनर, ऑडी, बेंझ अश्या गाड्यांची वर्दळ वाढलीय.
तसेही मुळशी बॅकवॉटर हा भाग अॅम्बीव्हॅली, लवासा या नंतर तिसरे प्लॅन्ड हीलस्टेशन मंजूर झालेच आहे आणी ह्या पट्ट्यातली बहुतांशी जमीन "महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू" ह्या कंपनीनी खरेदी केलीय. त्यामुळे येत्या काही वर्षात हा भाग सामान्यांसाठी प्रतीबंधीत झाला तर आश्चर्य नको.
8 Jan 2016 - 6:31 pm | प्रचेतस
अगदी खरंय.
ह्या परिसराची आता वाट लागायला सुरु झालीय. ८/१० वर्षापूर्वी ताम्हिणी मार्गे निवे- पिंपरी - भांबर्डे - सालतर अगदी अनाघ्रात परिसर होता. आता मात्र तो रस्ता जवळपास ओळखू येईनासा झालाय.
9 Jan 2016 - 12:35 pm | काळा पहाड
पवार सगळा पस्चिम महाराष्ट्र विकून टाकणार असं दिसतंय.
-संपादित-
11 Jan 2016 - 2:38 pm | स्वच्छंदी_मनोज
त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. वरती मी म्हटलेली MAharashtra Valley View Pvt Ltd. ह्या कंपनी बोर्डावर सुनील तटकरे आहेत असे म्हटले जाते. खखोदेजा.
10 Jan 2016 - 6:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला त्या जलाशयात फिशींग करता येईल काय ?
-दिलीप बिरुटे
11 Jan 2016 - 2:40 pm | स्वच्छंदी_मनोज
बिरुटे सर, नक्कीच जाण्यासारखा आहे हा भाग पण ह्याचे खरे सौंदर्य पावसाळ्यात. जुलै-ऑगस्ट मध्ये हा भाग म्हणजे अहाहा!
फिशिंगबद्दल माहीत नाही.
11 Jan 2016 - 4:42 pm | प्रचेतस
मुळशी तलाव टाटाच्या खाजगी मालकीचा असल्याने त्यात फ़िशिंग करू देत नाहीत. मला तरी इतक्या वर्षात एकही नाव जलाशयात दिसली नाही.