देशाबाहेरील काळा पैसा, भ्रष्टाचार या विषयांकरता बाबा रामदेवांचे आजपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन सुरू झाले आहे.. मैदानात ठिकठिकाणी त्या संदर्भातील फलक लागले आहेत. त्यातील एका फलकावर भगवान श्रीकृष्ण, सीतामाई, म. गांधी, सुभाषबाबू, वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, शिवछत्रपती या थोर राष्ट्रपुरुषांची चित्रे आणि त्या सर्वांच्या मधोमध थोडे मोठ्या आकाराचे रामदेवबाबांचे चेले असलेले आचार्य बाळकृष्ण यांचेही चित्र असलेला एक फलक लावला आहे..
"वरील सर्व मंडळींसारखेच आचार्य बाळकृष्णही तूर्तास तुरुंगात गेले आहेत, पण तेही इतर सर्व मंडळींप्रमाणेच देशाकरता तुरुंगात गेले आहेत, त्यामुळे देशाकरता तुरुंगात जाणे हे आचार्य बाळकृष्णांकरता भूषणावहच आहे.. " असा काहीसा सूर असलेले निवेदन सदर फलकावर आहे..
हा फलक पाहून आमची खूपच करमणूक झाली.. खोट्या पारपत्राच्या संदर्भात, खोट्या पदव्यांच्या संदर्भात आणि नेपाळी नागरिकत्वाच्या संदर्भात कैदेत असलेले आचार्य बाळकृष्ण हे शिवछत्रपतींच्या रांगेत बसण्याइतकेच थोर आहेत हे आम्हा पामराला माहीत नव्हते..!
यातला करमणुकीचा भाग सोडून दिल्यास आमच्या मते सदर फलक हा शिवछत्रपतींसारख्या, भगतसिंगांसारख्या प्रखर राष्ट्रपुरुषांचा धडधडीत अपमान असून हे कृत्य राष्ट्रदोहाच्या शिक्षेस पात्र आहे असे आमचे मत आहे..
या छोटेखानी लेखाद्वारे लोकशाही मार्गाने आम्ही या फलकाचा आणि फलक लावणार्यांचा तीव्र निषेध करतो..
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
9 Aug 2012 - 11:48 am | विजुभाऊ
भगवान श्रीकृष्ण, सीतामाई, म. गांधी, सुभाषबाबू, वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, शिवछत्रपती या थोर राष्ट्रपुरुषांची चित्रे आणि त्या सर्वांच्या मधोमध थोडे मोठ्या आकाराचे रामदेवबाबांचे चेले असलेले आचार्य बाळकृष्ण यांचेही चित्र असलेला एक फलक लावला आहे..
यात नवे काय आहे.
कोणत्याही शिक्षण संस्थेत /सहकारी ब्यांकेत असेच चित्र दिसते. बाळकृष्ण्च्या ऐवजी सत्य साईबाबा /संस्थेचे चेअरमन त्यांच्या मातोश्री / श्वशुर वगैरे वगैरे दिसतातच
9 Aug 2012 - 11:53 am | कॉमन मॅन
>>बाळकृष्ण्च्या ऐवजी सत्य साईबाबा /संस्थेचे चेअरमन त्यांच्या मातोश्री / श्वशुर वगैरे वगैरे दिसतातच
अहो पण मंडळी खोट्या पारपत्राच्या आरोपात तुरुंगात तर गेलेली नसतात..!
9 Aug 2012 - 2:27 pm | काळा पहाड
कारण यांचे लागेबांधे असतात. राहुल गांधी कडे डिग्री नाही तरी तो तसे शपथपत्र देतो ते चालते का?
9 Aug 2012 - 10:21 pm | दादा कोंडके
आवरा! एका मुख्याद्यापकाच्या खोलीत गांधी, आंबेडकरांच्या रांगेत एका मा. शिक्षणमहर्षाचा फोटो बघितल होता. त्यांच्यावर शाळेतल्याच एका शिक्षिकेवर बलात्काराचा आरोप होता.
अर्थात हे चालतं म्हणून ते चालवून घ्यायला पाहिजे असं होत नाही, पण तुम्ही अण्णा टीमवर एव्हडं खार खाउन का असता? :)
9 Aug 2012 - 11:50 pm | आनंदी गोपाळ
अहो, रामदेव बाबा टीम अण्णाचे मेंबर कधीपासून?
अन अण्णांनी टीम ऑलरेडि बरखास्त केली आहे ना?
मग इथे अण्णांवर खार खाण्याचा प्रश्न कसा आला बरे?
9 Aug 2012 - 11:58 pm | दादा कोंडके
म्हणजे शब्दशः टीम मेंबर नाही हो. एकुणच भ्रष्टाचाराप्रकरणी अण्णांच्या आंदोनलाना पाठींबा देणारी लोकं म्हणायचंय मला.
9 Aug 2012 - 12:20 pm | अभ्या..
कुणाबरोबर, कुणाचा फोटो/चित्र, कुणी, कुठे आणि कधी लावावा. म्हणजे राष्ट्र्प्रेम वा राष्ट्र्द्रोह होतो याचा प्रोटोकॉल असावा का? वाईट आम्हाला पण वाटते पण यापेक्शाही दुर्देवी चित्रे बघायला मिळतात.
9 Aug 2012 - 12:46 pm | अँग्री बर्ड
9 Aug 2012 - 12:46 pm | llपुण्याचे पेशवेll
मला यात काही वाईट वाटले नाही. वरील सर्व आरोप हे काँग्रेस इव्हीस्टीगेश ब्युरो (CBI) मुद्दामहून ठेवले आहेत हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. पण रामदेवबाबांच्या या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर बर्याच प्र कारे त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न चालवला गेला हे निश्चित.
बाकि अजितदादाचा संत तुकारामांच्या अवतारातला फोटो पालखीचे स्वागत करण्याच्या बोर्डावर पाहीला असता तर सदर गोष्टीचे अप्रूप वाटले नसते.
9 Aug 2012 - 2:16 pm | आनंदी गोपाळ
9 Aug 2012 - 2:59 pm | श्रावण मोडक
कशासाठी? तुम्हाला एक... असो. ;-)
9 Aug 2012 - 4:05 pm | आनंदी गोपाळ
इस्कटून सांगा. काय कल्ला नाय
9 Aug 2012 - 9:15 pm | सुनील
मारलत बूच ? ;)
9 Aug 2012 - 9:57 pm | आनंदी गोपाळ
आप्ल्याकडे भर्पूर रुमाल हायेत ;) नवा टाकू दुसरी कडे
9 Aug 2012 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''जेल आंदोलनकारियो का तीर्थ है'' असे म्हणत राष्ट्रपुरुषांच्या रांगेत आचार्य बाळकृष्णांना टाकणारा ज्या कोणाला अशी भव्य कल्पना सुचली असेल त्याच्या प्रतिभेला आपला बॉ नमस्कार आहे. :)
(चित्र जालसौजन्य)
-दिलीप बिरुटे
9 Aug 2012 - 10:24 pm | अर्धवटराव
बालकृष्ण साहेब आणि आपल्या युवराजांच्या चेहेर्यात काहि साम्य दिसतय का हो? ( खासकरुन मठ्ठपणाचा भाव )
"ओसामा इज ओबामा" या धर्तीवर "बालकृष्ण इज राहुलबाबा" हे कसं वाटतय ;)
अर्धवटराव
10 Aug 2012 - 9:10 am | इरसाल
ह्या गहन चर्चेला घाबरुन रामदेव बाबांनी तो फोटो काढुन टाकला आहे.
10 Aug 2012 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार
कोण आपण ?
13 Aug 2012 - 6:11 pm | टवाळखोर
कॉमन मॅन महाराज, तुमच्या लेखाचे शीर्षक तपासा: "आचार्य बाळकृष्ण आणि इतर थोर राष्ट्रपुरुष आता एकाच रांगेत..!" शीर्षक असे पाहीजे: "आचार्य बाळकृष्ण आणि थोर राष्ट्रपुरुष आता एकाच रांगेत.." शीर्षकातून "इतर" काढा म्हणजे आचार्य बाळकृष्णांची रांग वेगळी होईल