खर म्हणजे हा एक प्रयोग होता. आता कोणता?? तर.. कटलेट बनवणे. म्हणजे कटलेट असं नाही म्हणता येणार पण, पॅटीस, किंवा अगदी भजी सुद्धा म्हणता येईल.
एरवी, भाजी- आमटी उरली की त्याची थालीपीठे करायची हा ठरलेला नेम. पण यावेळी म्हंटलं थोडं वेगळं करावं. कारण जी भाजी उरली होती ती जर थालीपीठात घातली असती तर त्याचं नक्की काय झालं असतं हे जरा सांगणं कठीणच. ती भाजी होती, पालक्-पनीर. त्या वाह रे वाह शेफ संजय टुम्मा ष्टाईल मध्ये केलेली. ती भाजी जरी उत्तम होत असली चवीला तरी शेवटी ती कोण करतं यावरही बरचसं अवलंबून असतं. म्हणजे मी केलेली भाजी फार वाईट झाली होती असं नव्हे.. पण चांगली झाली होती. तरीही ती बाऊल भर उरलीच. मग त्याची थालीपीठं कशी करणार.
मग काय माझ्या सुपिक डोक्यात एक एक कल्पना अवतार घेऊ लागल्या. आणि त्यानंतर मी जो काही खाद्यपदार्थ केला.. तो कशाचा होता हे कोणाला सांगून पटलं नसतं इतका बेमालूम भन्नाट झाला होता. तर ही त्याची पा. कृ.
पालक पनीर (उरलेली भाजी)- १ बाऊल
बटाटा १ मोठा
ब्रेड ३-४ स्लाईस
आलं- लसूण पेस्ट
थोडी लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार
अगदी थोडे कॉर्न स्टार्च..
थोडि पुदिनाची पाने (नसेल तर स्वाद ची मिंट चटणी)
तेल तळण्यासाठी.
प्रथम पालक पनीर कुस्करून घ्यावे. त्यात तो एक बटाटा मायक्रोवेव मध्ये उकडून घेऊन, कुस्करावा( कुकरला शिजवला तर उत्तम). त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. मीठ थोडे घालावे. ब्रेडचे तुकडे करून मिसळावेत. मिरची पावडर, पुदिना पाने .. सगळं एकत्र करून पीठ मळतो त्याप्रमाणे घट्ट गोळा करून घ्यावा. घट्ट नाही झाले तर कॉर्न स्टार्च घालावे. आणि पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून तेलात ब्राऊन रंगावर तळून काढावे. यात पनीर, बटाटा आणि पुदीना यांची एकदम भन्नाट टेस्ट येते.
भाजी कोणतीही असली तरी हा प्रयोग करता येईल.
तुम्ही काय काय करता उरलेल्या आमटी भाजी चे.. मलाही सांगा.
- प्राजु
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 1:44 am | मीनल
काही तरी कठिण प्रश्न काय विचारतेस?
मी ?
सोप आहे
फ्रिज मधे टाकते.
दुस-या दिवशी राहिल डोक्यात तर ठिकं.
नाही तर ----
मीनल.
14 Aug 2008 - 1:55 am | चतुरंग
छान, आत्ता कळले!
ह्या पाकृला 'लेटकट पालक पनीर' असे म्हणता येईल का? ;)
चतुरंग
14 Aug 2008 - 2:25 am | भाग्यश्री
हेहेहे.. लेटकट पालक पनीर नाव मस्त आहे ! तेच ठेव.. :)
मस्त आहे रेसीपी.. आई भाज्या उरल्या की थालीपिठंच लावते. (माझ्यावर टाकूनच द्यायची वेळ येते..)
पण हा प्रकार सही आहे. करून पाहीन.. आजच मटर पनीर केलीय.. त्याचे होतील का? :?
मी एकदा पोह्यांचे वडे केले होते. पोहे भिजवून्,थोडा बटाटा,आलं लसूण पेस्ट, कांदा टाकून तळायचे.. मस्त लागतं तेही!
14 Aug 2008 - 4:55 am | ईश्वरी
प्रा़जू छान आहे तुझी रेसिपी. हे साधारण हराभरा कबाब प्रमाणेच वाटतायेत.
भाज्या उरल्यास मी खालीलप्रमाणे पराठे करते. (अर्थात मूड असेल तर नाहीतर फ्रीज मध्ये ठेवून दुसर्या दिवशी खाणे हेच मला सोपे वाटते.)
पालक पनीर वा इतर भाजी उरल्यास भाजी चांगली मॅश करून घेणे किंवा गरज वाटल्यास मिक्सर मधून काढून घेणे. भाजीच्या प्रमाणात कणीक घेऊन (गव्हाचे पीठ) त्यात गरजेनुसार मीठ , तिखट , आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मळून घेणे. (भाजी मुळातच तिखट आणि मसालेदार असेल तर हे सर्व घालण्याची गरज नाही.) भाजी कोरडी नसेल ..थोडा रस्सा असेल तर कणीक मळताना पाणी लागणार नाही किंवा अगदीच कमी लागेल.
मळलेला गोळा चिकट असता कामा नये त्यासाठी पीठ भाजीच्या दुपटीपेक्षा जास्त लागते. (मी अंदाजेच घेते) आणि नेहमीप्रमाणे पराठे लाटून खरपूस भाजून घेणे. भाजल्यावर तूप किंवा बटर लावावे.
ईश्वरी
14 Aug 2008 - 5:17 am | प्राजु
मी आधी हे पराठे करत होते. पण कधी कधी हे पराठे सुद्धा उरतात. म्हणजे एखादा जरी उरला तरी तो दुसर्या वेळेला खायला नको वाटतो. त्यापेक्षा अशी भजी किंवा लेटकट.. अथवा वडे म्हणा.. हे तळलेले असल्यामुळे पटकन संपून जाते. केचप, हॉट ऍण्ड चिली सॉस किंवा अगदी घरात असलेल्या कोणत्याही चटणी बरोबर छान लागते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Aug 2008 - 5:32 am | खरा डॉन
>>काहीही नाव द्या
'जंगल मे मंगल' हे नाव कस वाटतय?
खरा डॉन
बाकी सगळे क्लॉन...
14 Aug 2008 - 7:22 am | रेवती
पालक पनिरच्या प्रमाणात अंदाजे तांदूळ घेऊन अर्धा तास (धूवून) भिजवावेत. कमी पाणी व पालक पनिर एकत्र करून त्यात चवीपुरते मीठ घालून मऊ मोकळा भात शिजवावा. भरपूर दह्यातल्या कांदा व टोमॅटोच्या कोशिंबीरीबरोबर चांगले लागेल (असे वाटते).
रेवती
14 Aug 2008 - 7:25 am | सहज
हरियाली कोफ्ता आवडला.
आता हाटेलात असे काही मागताना शिळी भाजी खातोय असेच वाटणार :/
14 Aug 2008 - 7:46 am | हर्षद आनंदी
विविध प्रयोग करून अन्नधान्याची नासाडी आणि वैद्यबुवांचे खिसे भरण्याऐवजी तेवढेच शिजवावे.
तसे नविन पदार्थ खाणे मलाही आवड्ते
|| निर्लज्जम् सदा सुखी ||
14 Aug 2008 - 7:47 am | हर्षद आनंदी
विविध प्रयोग करून अन्नधान्याची नासाडी आणि वैद्यबुवांचे खिसे भरण्याऐवजी तेवढेच शिजवावे.
तसे नविन पदार्थ खाणे मलाही आवड्ते
|| निर्लज्जम् सदा सुखी ||
14 Aug 2008 - 7:55 am | सर्किट डांबीस (not verified)
किवा,
पप्रपाप, असे देखील म्हणता येईल.
शिळे तेच सोने, असे एकंदरीत पाककृतीततही प्रकटू लागले आहे तर हल्ली !
- सर्किट पटवर्धन
14 Aug 2008 - 8:43 am | विसोबा खेचर
'प्राजू'ज पेश्शल' हे नाव कस वाटतंय? :)
तात्या.
14 Aug 2008 - 4:43 pm | visshukaka
:? तात्या तुमचि कल्पना भन्नाट आहे.
14 Aug 2008 - 4:48 pm | स्वाती दिनेश
प्राजु,
तुझी पाकृ मस्तच दिसतेय.म्हणजे आता त्यासाठी आधी पालक पनीर (उरेल एवढं)करावं लागणार आणि मग कुठे हे तुझे प्राजुज पेश्शल लेटकट पालक पनिर करता येतील,:)
स्वाती
14 Aug 2008 - 7:30 pm | प्राजु
अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.. आणि जेणे करून ते चांगले असतानाच संपून जावे . टाकून देण्याची वेळ शक्यतो येऊ नये असाच माझा प्रयत्न असतो.
म्हणून हा सगळा खटाटोप.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Aug 2008 - 7:56 pm | मदनबाण
पनीर...च्या मारी आपला एकदम वीक पॉईंट...
असं काही वाचल ना की मला डोळ्यासमोर पनीरचे छोटे क्युब्स दिसायला लागतात..
कुठ भोजन समारंभ असेल आणि तिथ जर पनीर पदार्थ असेल तर माझ्या बाउल मधे जास्तीत जास्त पनीर कसे येतील याचा मी मन:पुर्वक प्रयत्न करतो..!!
(हवरट)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
14 Aug 2008 - 8:33 pm | राघव१
नाव ठेवण्याचे काम तुम्ही करा सवडीने.. मला तर खाण्याशी मतलब :D
पण हे काही योग्य नाही... हा आमच्यासारख्या "आपला हात जगन्नाथ" वाल्यांवर अन्याय आहे. तुम्ही सगळ्या सुगरणी अशा भन्नाट कल्पना घेऊन जबरदस्त मेन्यू बनवणार अन् आम्ही नुसतेच वाचणार... :W यह गलत है!! [(
(खादाड)राघव
14 Aug 2008 - 9:28 pm | प्रकाश घाटपांडे
जी भाजी मी व माझी मुलगी खात नाही त्या भाज्या उरल्या कि माझी बायको असा काही तरी पदार्थ करुन त्यात "ढकलून" देते. म्हणुन याचे नाव मी " ढकलेट " ठेवले आहे. ;)
प्रकाश घाटपांडे
7 Nov 2008 - 4:09 am | मिना भास्कर
:H =D> :-C या सारया प्रतिक्रिया वाचतना मला मेत्रिनि भेटल्याचा आनद झाला.