गाभा:
दिल्लिमध्ये उपोषण करित असलेले माननीय श्री किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा यांनी राजकारणात उडी घ्यायचे ठरविले आहे,हे त्यांचे पाउल बरोबर वाट्ते काय? कारण अगदी काल परवा पर्यंत ते व त्यांचा चमु आम्ही राजकारणी लो़कांच्या बरोबर नाही परंतु आमचा लढा फक्त ठरावीक व भ्रष्टाचार विरोधी आहे असे म्हणत होते,अचानक राजकारण बदलले कसे?
हे घुम जाव की--
अण्णांबद्दल जनतेला आदर आहे व तोच त्यांनी राहु द्यावा कारण राजकारणी लोकांचे रंग काही काळानंतर बदलु शकतात--
प्रतिक्रिया
3 Aug 2012 - 9:25 am | नितिन थत्ते
काही असले तरी त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष येऊन काम करणे चांगले.
त्यांनी पक्ष काढला आणि आमच्या मतदारसंघात उमेदवार उभा केला तर आम्ही मत देऊ सुद्धा कदाचित...
जे काय करायचे ते (घटनेत अभिप्रेत असलेल्या) लोकशाहीच्या कक्षेतच करायला हवे.
3 Aug 2012 - 9:45 am | मन१
हल्ली जे काय करायचे ते (घटनेत अभिप्रेत असलेल्या) लोकशाहीच्या कक्षेतच करायला हवे. हे संसदेचे पावित्र्य व राजकारणात प्रत्यक्ष येऊन काम करणे चांगले. अशा शब्दांच्या जाळ्यात टीम अण्णा अलगद अडकताना दिसते आहे. देव त्यांचे भले करो.
3 Aug 2012 - 10:14 am | अर्धवटराव
अलगद चालत येणारे कोकरु लांडगा ज्या सभ्य नजरेने बघतो तसच आता राजकीय पक्षांचे थींकटॅक्/इलेक्शन मॅनेजर्स टीम अण्णाकडे बघत असतील.
जर हे "राजकीय शहाणापण" खरच आत्ताच सुचलं असेल तर टीम अण्णा... त्यातल्या त्यात खासकरुन अण्णा, बलिदालाना सज्ज झाले म्हणायचे.
अर्धवटराव
3 Aug 2012 - 10:21 am | नगरीनिरंजन
पण गटार साफ करायला गटारात उतरणे आवश्यक आहे.
ज्या गटारात भलेभले बुडाले त्यात अण्णा कसे टिकतील ते 'पाहणे' (याच्याशिवाय आम्ही दुसरे करतो तरी काय?) रोचक ठरेल.
3 Aug 2012 - 10:30 am | नितिन थत्ते
१२० कोटी लोकांच्या पाठिंब्याची टेस्ट अशीच तर होणार....
आता ५० च कोटी लोकांनी मतदान केले आणि अण्णांची पार्टी बहुमताने निवडून आली तरी आम्ही त्यांना आमचे नेते समजू.
5 Aug 2012 - 2:35 pm | मन१
बहुमताचे गेम वेगळे असतात, हे आम्ही तुम्हाला सांगावं म्हणजे गंमतच आहे.
मी http://economictimes.indiatimes.com/opinion/columnists/swaminathan-s-a-a... ह्यावेळी स्वाअमिनॉमिक्स वाल्या काकांशी भयंकर सहमत आहे.
3 Aug 2012 - 11:57 am | रणजित चितळे
+१००
3 Aug 2012 - 10:39 am | वेताळ
अण्णा राजकारणात येणार म्हणुन चाचानी पक्ष बदलला की काय?
3 Aug 2012 - 11:27 am | नितिन थत्ते
अजून नाही...
पण संसदेत जाऊन आपल्याला हवे ते कायदे करून घेणे हाच लॉजिकल उपाय आहे.
3 Aug 2012 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्री अण्णा हजारेंचे राजकारणात सहभागी होणे काही पटले नाही. राजकारण काही सोपं नाही. सत्तेवर येणं तर महाकठीण आहे. अर्थात राजकारणात काही निश्चित नसते, नाही. स्वबळावर सत्तेवर येण्याचं स्वप्न कोणा श्री अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्याला पडत नसणार. राजकारणात जेव्हा संख्याबळ नसेल तेव्हा कोणाबरोबर तरी जावं लागेल. अन्य कोणत्यातरी पक्षाची मदत घ्यावी लागेल. आणि त्यामुळे मुळ अजेंड्यापासुन श्री अण्णा हजारेंची टीम दुर जाईल. पेक्षा, सत्तेबाहेर राहुन एक दबावगट म्हणुन कार्य करणे हा सोपा मार्ग वाटत होता. श्री अण्णा हजारेंनी देशभर एक हवा,केली एक अपेक्षा केली होती. ते पाहता एकुणच आंदोलन बुडाले असेच म्हणावे लागेल.
-दिलीप बिरुटे
3 Aug 2012 - 11:29 am | सुधीर
कठीणातून अधिक कठीण मार्गाकडे वाटचाल. मत देऊन संधी नक्की देवू. पण येत्या निवडणूकीत मतदार उभे करणं, पक्ष संघटना उभी करणं नक्कीच सोपं नाही. असं फक्त हिंदी चित्रपटातच (युवा) होतं.
पण असो, राजकारणात उतरण्या मागचा हेतू चांगला असल्यामुळे शुभेच्छा!
3 Aug 2012 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झी न्युज वाहिनीवर सबसे बडा कौल घेतल्या जात आहे. ”टीम अन्ना को चुनाव लढना चाहीये” आत्तापर्यंत म्हणे ३ लाखापेक्षा अधिक लोकांनी आपापली मतं पाठवली आहेत आणि त्यातल्या शहान्नव टक्के लोकांनी निवडणुकीत सहभागी झालं पाहिजे असं म्हटलं आहे. मला शंभर टक्के खात्री आहे, जेव्हा निवडणुक येईल तेव्हा ही जी वोटींग करणारी जनता आहे, ही पारंपरिकच मतदान करतील. भावनिक होऊन मतदान करणा-या भारतीय पब्लिकचं या बाबतीत काही खरं नाही.
-दिलीप बिरुटे
3 Aug 2012 - 11:29 am | कॉमन मॅन
आम्हाला यातला फोलपणा आधीच माहीत होता. आम्ही टीम अण्णावर आणि मेणबत्तीवीर आणि टोपीबाजावर येथे मिपावरच अनेकदा टीका केली होती.. पण तेव्हा लोकंनी आम्हाला गप्प बसवले होते..
बाय द वे, आता कुठे गेले ते सारे टोपीबाज आणि मेणबत्तीवीर..?! :)
"आता आरपारची लढाई.."
"आता जनलोकपाल आणि १५ मंत्र्यांविरुद्ध एस आय टी चौकशी झाल्याशिवाय आमरण उपोषण.."
"आता आमचे बलीदान..!"
या सार्या गप्पाच होत्या म्हणायच्या..! ;)
असो..
3 Aug 2012 - 12:20 pm | चिरोटा
राजकारणात न राह्ता ही रंग बदलता येतात. लोकांना टीम अण्णांनी राजकारणात उतरण्याबाबत भिती का वाटते आहे? काँग्रेसवाले अण्णांना संघाचे एजंट म्हणतील म्हणून?भाजपवाले अण्णांना ऩक्षल्/काश्मीरवाल्यांचे समर्थक म्हणतील म्हणून?
भारतिय राजकारणात/निवडणूकीत काळा पैसा खूप लागतो. सर्व पक्षीय राजकारण्यांना अशा काळे धंदेवाल्यांबरोबर जमवून घ्यावेच लागते. टीम अण्णा हे आव्हान कसे पेलते ते पहावे लागेल.
3 Aug 2012 - 12:26 pm | आत्मशून्य
अण्णांबद्दल कौतुक आहेच आहे ते त्यांच्या RTI च्या यशस्वी मागणीमुळे. तसेच जो धुरळा त्यांनी राजकीय पाठबळ नसताना उडवला व भल्याभल्यांना एका झटक्यात ट्यार्पीमधे मागे टाकले संपुर्ण भारतात एक चैतन्य पसरवले .. मजा आली. म्हणूनच त्यांच्या आंदोलनाला पांठिंबा देणे जास्त महत्वाचे वाटले, वाटते.
सर्वपक्षाच्या राजकारण्यानी त्यांना ज्या प्रकारे वाटाण्याच्या अक्षता दिल्या ते पाहता घटनेत राहुन राजकीय पाठबळाशिवाय आंदोलनाने बदल घडवणे अशक्य आहे याची जाणीव मुळतच सामान्य जनतेला त्वरीत झाली होती, व त्यांच्या उपोषणाला कमी भरणारी गर्दी त्याचेच ध्योतक होती. थोडक्यात राजकारणात शिरकाव करायचा निर्णय अतिशय योग्य आहे. ज्या आंदोलन व सिध्दांताच्या आधारे त्यांच्या पक्षाची स्थापना होइल तसे अधिष्ठान इतर पक्षांच्या स्थापनेत सध्यातरी आहे असं वाटत नाही. पण हे राजकारण आहे व बाबा रामदेव बहुदा महत्वाची भुमीका बजावणार असं वाटतयं...
बाकी कोणतेही मोठे बदल हे स्वछ्च चारीत्र्य, नैतीक जबाबदार्यांचे भान असणे वगैरे किरकोळ गोष्टींनी होत नसतात तर तिथे रक्तच सांडावे लागते, तरीही मांजराच्या गळ्यात खरच घंटा बांधली जाणार का व कोण बांधणार औत्सुक्य आहे.
सौ मे से निन्यानवे बेइमान, फिरभी मेरा भारत महान.
3 Aug 2012 - 4:46 pm | मन१
मांजराच्या गळ्यात घंटा
परिस्थितीस चपखल बसणारे वर्णन.
3 Aug 2012 - 5:35 pm | आत्मशून्य
It says, there is nothing we can do or there is nothing we won't do. Choice is yours.
3 Aug 2012 - 3:08 pm | चित्रेचा तारा
मला एक गोष्ट समजत नाही, लोक म्हणतात की जे करायाचे आहे ते संविधानाच्या कक्षेत राहून करा. मग भ्रष्टाचार करणारे कोणत्या कलमाचा आधार घेतात.
तसे पाहिले तर हे राजकारणी लोक आण्णांच्या लोकांना निवडून आल्यानंतर आपल्या पक्षामध्ये ओढून घेणार. आज मोह माये पासून कोणीही दूर राहू शकत नाही.
आणि हे जर दूर राहणारे असते तर यांनी पक्षच काढला नसता.
थोडक्यात आण्णांची हार झालेली आहे.
3 Aug 2012 - 3:58 pm | कॉमन मॅन
अहो पण अण्णांचा नव्हे, तर टीम अण्णाचा तोच तर हिडन् अजेण्डा होता. आंदोलनाच्या आड प्रामणिकपणाची झूल पांघरायची आणि "काय करणार? लोकांच्या आग्रहास्तव आता आम्ही राजकारणात उतरत आहोत, नव्हे आम्हाला उतरावे लागत आहे' - अशी बतावणी करायची हे सगळं आधीच ठरलेलं होतं..!
अण्णांना पुढे करून केजरीवाल, सिसोदिया, अत्यंत उर्मट असलेला कुमार विश्वास, अतीशहाणी शाजिया इल्मी, मयांक गांधी हा मुंबईतील एक अत्यंतचा सचोटी (!) असलेला बिल्डर या मंडळींनी अण्णांचं बाहुलं केलं आणि नाचवलं. पण काँग्रेसवाले यांचंही बारसं जेवलेले असल्यामुळे यावेळेस त्यांनी यांच्या उपोषण-नाट्याला कवडीचीही भीक घातली नाही..
मॅगसेसे सारखे परदेशी पुरस्कार मिळवणार्या अरविंद केजरीवाल आणि मंडळींना निवडणुकीकरता परदेशातूनच भरपूर फंडींग होईल ही आमची पुढची भविष्यवाणी आहे..!
(द्रष्टा) कॉमॅ.
3 Aug 2012 - 4:17 pm | चिरोटा
फंडिंग सनदशीर मार्गाने असेल तर गैर काय आहे?भारताला 'सूपर पॉवर'बनवण्याच्या काँग्रेस्/भाजपाच्या मार्गातले अण्णा अड्थळा आहेत असे आपणास म्हणायचे आहे का? की ज्यामुळे अण्णांना परदेशातून फंडिंग होईल?
3 Aug 2012 - 5:51 pm | आबा
"प्रामाणिकपणाची झूल पांघरणे", हा "राजकारणात न उतरणे" याचा विरुद्धार्थी शब्द्प्रयोग आहे का?!
3 Aug 2012 - 4:39 pm | विजुभाऊ
भ्रष्टाचार करणारे कोणत्या कलमाचा आधार घेतात.
ते कोणत्याच कलमात अडकू नये याची खबरदारी घेतात
3 Aug 2012 - 4:04 pm | चौकटराजा
माझ्या मनाची स्थिति अरे रे ! आ हा हा ! अशी आहे. म गांधी हे परकीयांविरूढ लढले त्यावेळी इतर मार्गातून ही ब्रिटीशांना जर्जर करणारे फॅक्टर्स ही होते. जयप्रकाश यांच्या वेळी त्याना श्रेय देण्यापेक्षा इंदिराजीनी एका वेळी एका पेक्षा अनेक शत्रू निर्माण करण्याची चूक केली याला दिले पाहिजे. म्हणूनच पर्यायी लोकांच्या चुका लक्षात येताच लोकानी मोरारजीना भिरकावून दिले.पर्यायाने कुणाला ? अण्णा हजारे याना मीडिया नावाचे अस्त्र लाभले. पण अण्णांचा लढा स्वकीयांशी होता.व इंदिरा गांधी इतके मनमोहन सिंग हे प्रमादशील दिसले नाहीत. त्यानी महत कल्याण केले आहे असा २० टक्के उपकृत वर्ग अण्ण्णांच्या बाजूने २०१४ मधे देखील उभा रहाणार नाही. पैशानी त्वरित विकला जाणारा अत्यंत गरीब वर्गाला भ्रष्ट्राचाराची समस्याच ठावूक नाही. असा २० ते २५ टक्क्काही अण्णांबरोबर येणार नाही.आता रहाता राहिला कनिष्ट मध्य वर्ग . यातले काही सुटी एन्जॉय करायला पानशेत ला जाणार .भ्रष्ट्राचाराचा मुद्दा घेतला तरी अन्नांच्या पक्षाला २७२ जागा प्रलयापर्यंतही मिळणार नाहीत. कारण behind every great success there is a crime ! तेंव्हा लोकपालासारखे काही आले तरी धुतल्या तांदूळासारखे स्वच्छ रहाणे हे अण्णा नाही जमणार नाही. सरकार लोकपाल आणेलही पण मी मारतो तुम्ही रडल्यासारखे क्ररा अशा स्वायत्त संस्था आजही आहेत. त्यात एकाची भर पडेल.
3 Aug 2012 - 4:25 pm | मनीषा
आंदोलनाच्या मार्गाने जे साध्य होऊ शकले असते (कदाचित), ते राजकारणातील प्रत्यक्ष सहभागाने होऊ शकेल असे वाटत नाही.
अर्थात तरीदेखील हा एक चांगला निर्णय आहे असेच वाटते. कारण त्या निमित्ताने काही ध्येयवादी, चरित्र्यवान लोक संसदेत गेले तर देशाचे भलेच होईल की.
3 Aug 2012 - 10:05 pm | शिल्पा ब
टीम अण्णा मधे नेमकं कोण ध्येयवादी अन चारीत्र्यवान आहे म्हणायचं?
अण्णा अन टीम अण्णा ह्या वेगळ्या एंटीटीज आहेत.
3 Aug 2012 - 10:32 pm | नितिन थत्ते
संसदेत जाणारे लोक ध्येयवादी आणि चारित्र्यवान असावेत ही पूर्व अट असू नये. ते तसे असले तर चांगलेच आहे.
ध्येयवादी लोकांचे ध्येय नको ते असण्याची शक्यता लक्षात घ्यायला हवी. अन्यथा कम्युनिस्ट पक्षात ध्येयवादी आणि चारित्र्यवान कमी नाहीत.
6 Aug 2012 - 10:48 am | विजुभाऊ
संसदेत जाणारे लोक ध्येयवादी आणि चारित्र्यवान असावेत ही पूर्व अट असू नये
चारित्र्य ही संकल्पना सापेक्ष आहे. एखादी देह विक्रय करुन आपल्या म्हातार्या आईवडिलाना आधार देणारी स्त्री अधीक चारित्र्यवान असू शकते
3 Aug 2012 - 4:36 pm | कवटी
एकंदर काय तर लोकांचा प्रतिसाद नाही हे बघुन मुंबै सारखेच जंतरमंतर वर देखील टिम व अण्णांनी शेपूट घातले....
भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील हवा या टिम अण्णांनीच पार घालवली...
जंतरमंतरवरचे पहिले यशस्वी आंदोलनाने लोकांच्या मनात साचलेल्या भ्रष्टाचारा विरुद्धच्या रागाला आउटलेट द्यायचे काम केले.... लोकं शांत झाली अन फुडची अंदोलने बोंबलली...
अता हे निवडणूकीला उभारणार.... पण यांचे रोजचे खेळ/ कोलांट्या उड्या बघून किती लोक मत देणार हे पण एक कोडेच आहे....
शेवटी निवडणूकीलाच उभारायचे होते तर पहिले आंदोलन निवडणूकीच्या आसपास घेउन लोकांच्या भावना तरी एन्कॅश करता आल्या असत्या.... अता सगळच मुसळ केरात....
3 Aug 2012 - 5:02 pm | इरसाल
समजा उद्या लोकपाल आले भ्रष्ट लोक सजा होवुन मधे गेले तर अण्णांचा काय फायदा.
१. ७५ वर्षे वयोमान त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील गरजा कमी.
२.लोकपालाने ज्याचा फायदा होइल तो काय पुडके आणुन देणार नाही अण्णांना
३.बरं हे ज्यांच्यासाठी चालले आहे त्याच लोकांना जर पडली नाही तर मी म्हणतो का अण्णा आपले गुड कोलेस्ट्रोल विनाकारण कमी करत आहेत.
४.स्वतःची पोळी भाजुन घेत आहेत असा आळ किबे किंवा अके वर लावता* येइल पण अण्णांवर .........
५.२०१४ अजुन बराच लांब आहे आणी भाजची स्मरणशक्ती फारच कमजोर आहे. त्यामुळे आता तापलेल्या तव्यावर तेव्हा पोळी भाजता येणं सर्वथा अशक्य आहे. त्यांनी पार्टी बनवली तरी तात्कालीक फायद्यासाठी तेव्हा** जे पैसे देतील त्यांना मत देवु हा भाजचा धारा आहे.
* तसा संशय लोक अण्णांवर ही घेतात
** निवड्णुकीच्या वेळेस.
3 Aug 2012 - 5:19 pm | pramanik
जे कोणी ह्याला विरोध करत आहे,त्यांनी अन्य कोणत्या मार्गाने उपयोगी लोकपाल बिल येईल ते सांगावे.
3 Aug 2012 - 6:17 pm | कॉमन मॅन
उद्या हा हुकुमशहावजा लोकपाल आल्यावर भ्रष्टाचार दुपटीने वाढेल असे बाळासाहेब म्हणाले होते. म्हणूनच संसदेतील लोकपालच्या चर्चेदरम्यान शिवसेनेने 'लोकपाल' या संकल्पनेलाच विरोध केला. आम्ही याचे समर्थन करतो..
3 Aug 2012 - 8:43 pm | शकु गोवेकर
जर जनतेला वाट्ले तर आम्ही निवड्णुका लढ्वु --ईति अण्णा
जनतेला अण्णांच्या कार्या बद्दल आदर आहे पण निवड्णुका लढ्वायच्या तर कुठ्लातरी पक्षात जायले हवे किंवा आपला पक्ष काढावा लागेल व या दोन्ही पर्यायाला पैसा व पाठबळ हवे कारण भारताची अर्थ व्यवस्था Beurocracy शिवाय चालत नाही भले कौग्रेस वा भाजपा व सेना किंवा ईतर पक्ष सत्तेवर येवो म्हणुन जसा श्री हजारे यांनी विचार केला तसा जनता देखिल विचार करुन त्यांना मत देईल किंवा ठोकरुन देईल कारण सर्व जनते च्या हाती आहे
3 Aug 2012 - 11:24 pm | अशोक पतिल
ह्या टिम अन्ना ने आर पार, मरे पर्यंत आमरण उपोशन अश्या बाता केल्या होत्या, व नतंर आमच्या सदस्यांची प्रक्रुति बिघडली, केजरीवाल यांना शुगर चा त्रास आहे वेगेरे गोष्टी केल्या व मे जनरल सिंग , लिगंडोह इ च्या आवाहनावर पड्त्या फळाची आज्ञा मानुन उपोषन सोड्ले . गर्दी रोडावलेली, सरकार ढुंकुंनही पहात नाही , ह्या गोष्टी अगोदर विचारात घेतल्या असत्या व उपोषन हे अंतिम हत्यार आहे हे समजुन घेतले असते तर ही अनावस्था आढवली नसती .
आता तर ही अवस्था झाली आहे की अगदी आपल्या महाराष्ट्रात अन्ना ची भ्रष्टाचारा विरुध्द उपोषन करण्याची हिम्मत होणार नाही. उपोषनाची नुसती घोषना करण्याचा अवकाश की मारे मंत्रीं संत्रीं , सचिव धावत येत . गेले ते दिवस ...
3 Aug 2012 - 11:29 pm | अर्धवटराव
अण्णा टीमची हि हालत पाहुन आनंद होत असेल तर तुम्हाला शेखचिल्ली म्हणायची फार इच्छा होत आहे.
अर्धवटराव
4 Aug 2012 - 7:05 pm | अशोक पतिल
अण्णा टीमची हि हालत पाहुन आनंद होत असेल तर तुम्हाला शेखचिल्ली म्हणायची फार इच्छा होत आहे.
का ख्दखद होतेय का ?
हा अन्ना पुर्वीचा राहीला नाहि,म्हणुन हे अपेक्षाभंगांचे उद्दगार होते .
4 Aug 2012 - 7:20 pm | अर्धवटराव
खुदखुद होतेय... शेखचिल्ली बघुन आणखी काय होणार..
अर्धाटाराव
4 Aug 2012 - 9:48 pm | अशोक पतिल
खुदखुद होतेय... शेखचिल्ली बघुन आणखी काय होणार..
+१०० % मी ही सहमत !
लेख वाचावेत, प्रतिक्रीया वाचाव्यात, आवडतील किंवा नाही..नाही आवड्ल्यात तर सोडुन पुढे जावे.
किंवा मुद्देसुध विचार माडांवेत. ते सोडुन व्यक्तिशः टवाळी करावी. माझी ही संस्कृती खचितच नाही .
4 Aug 2012 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या महाराष्ट्रात अन्ना ची भ्रष्टाचारा विरुध्द उपोषन करण्याची हिम्मत होणार नाही. उपोषनाची नुसती घोषना करण्याचा अवकाश की मारे मंत्रीं संत्रीं , सचिव धावत येत . गेले ते दिवस ...
सहमत गेले ते दिवस. श्री अण्णा जसजसे मोठे आणि प्रसिद्धीच्या झोतात येत गेले तसतशा अनेक नको त्या गोष्टी त्यासोबत येत गेल्या आणि श्री अण्णाचा दबाव कमी होत गेला.
आमच्या औरंगाबाद शहरात श्री अण्णांचे एक अधिकारी मित्र आहेत. आता सेवानिवृत्त झाले आहेत. सुरुवातीच्या काळात श्री अण्णांना राळेगणच्या परिसर विकासासाठी शासकीय पातळीवरुन मदत केली होती. यादव बाबाच्या मंदिरात अनेक दिवस त्यांनी मुक्कामही केला होता. पुढेही श्री अण्णांना समाजसेवेच्या कार्यात सतत सोबतही केली होती. श्री अण्णांनी काही घोषणा केली की यांचे औरंगाबादेत आंदोलन सुरु होते. अधुन मधुन भेटत असतात, पूर्वीचे दिवस आता राहीले नाही म्हणतात.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2012 - 11:05 pm | अर्धवटराव
>>पूर्वीचे दिवस आता राहीले नाही म्हणतात.
-- भ्रष्टाचार संपूर्ण समजाला उभा आडवा चिरत असताना त्याविरुद्ध एकट्या अण्णांनी लढावं अशी अपेक्षा का ठेवावी ? अण्णा जे काहि करताहेत, जे काहि त्यांनी केलय ते त्यांच्या शक्तीनुसार, वकुबानुसार. एक सामान्य माणुस या व्यवस्थेविरुद्ध लढु शकतो या उदाहरणावरुन आपापल्या परीने सर्वांनी लढ द्यायचा कि अण्णा कुठे चुकले, त्यांची फजिती कशि होईल या कडे डोळे लाऊन बसायचं ?
अर्धवटराव
5 Aug 2012 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भ्रष्टाचार संपूर्ण समजाला उभा आडवा चिरत असताना त्याविरुद्ध एकट्या अण्णांनी लढावं अशी अपेक्षा का ठेवावी ?
श्री अण्णा एकटे कुठे होते. व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला कंटाळलेले सर्वच सामान्य माणसं उत्स्फूर्तपणेच आंदोलनाच्या निमित्तानं श्री अण्णांच्या बरोबर होते. एकट्या श्री अण्णांकडुन काय होणार होतं ? श्री अण्णांची प्रेरणा नक्कीच सामान्य माणसाला होती. परंतु श्री शरद जोशी यांच्या प्रमाणे श्री अण्णा जी वाट चोखाळत आहे, ती वाट आत्मघाताच्या रस्त्याने जाते असे मला वाटतं.
बाकी, श्री अण्णांची फजिती आता राजकारणी लोक चविष्टपणे रवंथ करीत आहेत. एक तर आपल्या मागण्या मान्य करण्याचा मार्ग श्री अण्णांनी चुकीचा निवडला. लोकशाही श्री अण्णांना मान्य नाही. भारताचे संविधान श्री अण्णांना मान्य नाही. असे अनेक लोक म्हणत होते. टीम अण्णाकडुन अनेकदा संसदीय व्यवस्थेविरुद्ध बोलल्या गेले होते.
सामान्य जनताही द्विधा अवस्थेत होती. श्री अण्णांना सर्वांना पाठिंबा द्यायचा आहे, पण केवळ उपोषण करुन मागण्या पूर्ण होत नाही, हे जनतेच्या लक्षात येतं. श्री अण्णा आणि टीम निवडणुकीत कोणाला तरी पाठिंबा देईल. पण, ज्याला पाठिंबा दिला तो विश्वासार्हच असेल हे कशावरुन ठरवायचं ? म्हणुन आपणच एक सक्षम पर्याय द्यावा, असे टीम अण्णांना वाटायला लागले.
श्री अण्णांनी राजकारणात सक्रीय होऊन आपल्या मागण्या मान्य करुन घ्याव्यात असे जेजे म्हणत होते. त्या त्या सर्व लोकांना माहित आहे, श्री अण्णा टीम राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. टीम अण्णांचेच काही सदस्य सक्रीय राजकारणात सहभागाविषयी नकार देत आहेत.
श्री अण्णांच्या फजीतीचा व्यक्तिगत मला बिल्कुल आनंद नाही. श्री अण्णांच्या आजुबाजुला असलेली जी टीम आहे, ती श्री अण्णांची दिशाभूल करत आहे, असे मला वाटते. श्री अण्णा आणि त्यांचे कार्यकर्ते माहितीच्या अधिकाराचा वापर करुन न्यायालयात जाऊन दाद मागत होते त्याची भिती व्यवस्थेत असलेल्या लोकांना वाटत होती, तोच मार्ग उत्तम होता. एक जरब या टीमची होती. काही लोकांची चौकशी करा म्हणायचे आणि काही लोकांना सोडायचे असे श्री अण्णांकडुन अशात सुरु झाले,असा आरोप करतांना माझ्याकडे काही विदा नाही, पण असे होत गेले म्हणुन पूर्वीचा लढा आणि आत्ताचा लढा बदलत चालला असे ज्या कार्यकर्त्यांना वाटते तसेच मलाही वाटते, इतकेच मला म्हणायचे होते.
-दिलीप बिरुटे
5 Aug 2012 - 10:49 am | नितिन थत्ते
आर्थिक कनिष्ठ वर्गातील सामान्य माणसे भ्रष्टाचाराला कंटाळली होती हे मान्य आहे. कारण त्यांना भ्रष्टाचाराची खरोखरच "झळ" बसते. पण त्यांना जो शहरी मध्यमवर्गाचा फ़ेसबुकी पाठिंबा होता तो भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नव्हता.
शहरी मध्यमवर्ग भ्रष्टाचाराला कंटाळला आहे हे विधान धाडसी आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्यांत हाच शहरी मध्यमवर्ग आघाडीवर आहे. एकतर डे टु डे भ्रष्टाचाराची झळ मध्यमवर्गाला (पासपोर्टसाठीचा पोलीस क्लिअरन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोडून) मुळीच बसत नाही. ही जी झळ बसते त्याची किंमत त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत खूप कमी असते त्यामुळे ते आनंदाने या भ्रष्टाचारात सहभागी होत असतात.
हा सो कॉल्ड पाठिंबा हा काँग्रेसला खाली खेचायला कोणीतरी मसीहा मिळाला (आणि त्यामुळे बाय डिफॉल्ट त्याचा फायदा त्यांच्या स्वप्नातील पक्षाला होईल) अशा आशेने दिलेला होता. आता अण्णा राजकारणात उतरले तर ते भाजपचीच मते खातील अशा भीतीने आता हा वर्ग ग्रस्त झाला आहे आणि अण्णांवर टीका करत आहे.
5 Aug 2012 - 5:42 pm | बिपिन कार्यकर्ते
http://www.misalpav.com/node/3771
:)
5 Aug 2012 - 8:57 pm | नितिन थत्ते
:)
6 Aug 2012 - 7:30 pm | सोत्रि
थत्तेचाचांशी सहमत!
-(मद्रासी 'अण्णा') सोकाजी
5 Aug 2012 - 11:10 am | अर्धवटराव
मला नाहि वाटत कोणि अण्णांसारख्या लहानश्या गळाने काँग्रेसचा देवमासा पकडायची स्वप्न बघितले असतील...
अर्धवटराव
5 Aug 2012 - 11:26 am | नितिन थत्ते
मागच्या वर्षी अण्णा हा लहानसा गळ नाही असा भास निर्माण केला होता.
अण्णांच्या टीमलासुद्धा आपल्याला खरा पाठिंबा कोणाचा आहे हे ठाऊक होते. म्हणून ते "राईट नॉइजेस" करीत होते.
5 Aug 2012 - 11:57 am | अर्धवटराव
अण्णा टीमकडुन सरकार पाडण्याची वा नवीन सरकर स्थापन करण्याची अपेक्षा सामान्य जनतेने कधिच केली नाहि... संसदेत आकड्यांचा खेळ टीम अण्णाला अजीबात अनुकुल नव्हता. लोकांना अण्णांच्या लोकपालची भुरळ पडली होती. अण्णा टीमला पांठींबा मिळाला तो काळा पैसा, लोकपाल वगैरे मुद्द्यांवर. अर्थात, सरकारच्या भ्रष्टाचारावर संताप होताच.. त्यात कलमाडी, राजा, आदर्श वगैरे प्रकरणांची भर पडली. (बाबा रामदेव राजकीय मुद्यांवर बोलत, पण त्यांचा प्रोग्राम वेगळा होता)
अण्णा टीमला काँग्रेसेतर पक्षांनी पाठींबा दिला, अगदी राष्ट्रवादीने देखील. पण म्हणुन अण्णा टीम मधल्या कोणिही पर्यायी सरकारच्या बाता केल्या नाहि. त्यांना त्यांच्या मर्यादांची पुरेपूर जाणिव होती. अण्णा टीमने सर्वच राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवले. पण काँग्रेस कुठल्या तोंडाने त्यांना पाठींबा देणार होती? आणि विरोधी पक्षांनी हा मुद्दा जर कॅश करण्याचा प्रयत्न केला तर ते स्वाभावीक होते. टीम अण्णाकडुन काहि निवडक निवडणुक प्रचराची स्टंटबाजी देखील झाली, पण ते सर्व आंदोलनाचा भर ओसरल्यावर.
शहरी मध्यमवर्गाला भ्रष्टाचाराची झळ बसत नाहि, वा कमि बसते, हे विधान धाडसाचे आहे. नागरी सोयींच्या अभावाला (पायाभुत सुवीधा), दवाखाने - शिक्षण - पोलीस - न्याय वगैरे व्यवस्थेतील उणिवांना, वाढत्या बकालपणाला-झोपडपट्टी - अतिक्रमणे - महागाईला, आरक्षण वगैरे सेन्सेटीव्ह मुद्यांना, आतंकवाद - नक्षलवाद - इतर दादागिरी वगैरे गुन्ह्यांना... एव्हढच कशाला, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या कमजोर स्थितीला... या सर्व बाबींना मध्यमवर्ग भ्रष्टाचार हेच कारणा मानतो (त्यात तथ्य आहेच). तेंव्हा जरी हा मध्यमवर्ग भ्रष्टाचारात सामील असतो तरी ते आनंदात केलेले समर्थन नसते, तर पर्याय नसल्यामुळे गाडीला धक्का मारण्याचा तो प्रकार आहे बस्स.
अर्धवटराव
5 Aug 2012 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार
अण्णा मिपाकरांच्या सल्ल्याने न चालल्याने हे सगळे झाले आहे.
5 Aug 2012 - 2:24 pm | एम.जी.
मागच्या वर्षीचे उपोषण न करता डायरेक्ट पक्ष काढायची भाषा केली असती तर आत्ता आहेत तितके कार्यकर्तेही मिळाअले नसते...
आता किमान पदाधिकारी होण्याइतपत स्वयंघोषित नेते आणि किमान खुर्च्या मांडण्याइतपत कार्यकर्ते तरी जमलेत..
एम.जी.
5 Aug 2012 - 5:17 pm | सुधीर
नुसत्याच टिका करणार्या, दोष दाखवणार्या पंडितांपेक्षा कृती करणार्या माणसांबद्दल नेहमीच जास्त आदर वाटतो. माणूस जेंव्हा प्रसिद्धीच्या झोतात येतो तेंव्हा टिका करणारेही वाढतात अशा माणसांविषयी "अनेक नको त्या गोष्टी कधी कधी प्रचारात आणल्याही जातात". जिथे गांधीजी नाही सुटले तिथे अण्णांचं काय. असं नाही की गांधीजींचं काही चुकलंच नसेल, पण त्यांच्या प्रगती पुस्तकावर कडक लाल शेरा मारावा तो सावरकरांनी वा आंबेडकरांसारख्या माणसांनी. सर्वसामान्याने निदान आदराने मतभेद नोंदवावा. (असं आपलं माझं मत) पण कधी कधी शाळेत जाणारं शेंबडं पोर "टक*ने पाकड्याला १कोटी दिले" असं बोलतं तेंव्हा आपलीच बोलती बंद होते. हे खरं आहे की, "भ्रष्टाचाराची डायरेक्ट झळ बसली नसल्यामुळेच फेसबुकप्रेमी आणि इतर जनता यावेळेस जास्त सक्रिय नाहीत". पण प्रश्न तर आहेतचं आणि ते नेहमी दुर्दैवाने वर्तमान पत्रात वाचायला मिळतात. अलिकडेच वाचनात आलेली ही काही वाक्यं "लाच ही चेक ने घेतली जात नाही", "मंत्र्याच्या मुलांनी बिझनेस करू नये का?" "म्हशीपेक्षा रेडकू मोठं कसं होईल" आता हे भ्रष्टाचाराच्या व्याखेत येतं का नाही येत ते माझ्यासारख्या अडाण्याला कळत नाही पण येवढंच समजतं निदान असं व्हायचं प्रमाण तरी कमी झालं पाहिजे. त्यासाठी नेमका योग्य मार्ग कोणता यासाठी पंडित लाख खल करतील, पणं कुणीतरी त्यापैकी एक चोखाळला तरी पाहिजे. सध्या येवढच "दिसतंय/भासतंय" टिम अण्णा तो प्रयत्न करतेय. आता ते प्रामाणिक आहेत का नाही हे काळच ठरवेल.