Inspiring सिनेमांची नावे

Madhavi_Bhave's picture
Madhavi_Bhave in काथ्याकूट
31 Jul 2012 - 11:18 am
गाभा: 

मध्यंतरी "अनुरोध" ह्यांनी "The Blue Umbrella" ह्या सिनेमाबद्दल लिहिलेला लेख वाचला होता.

मुक्त विहारि केलेल्या मार्गदर्शनानुसार मी हा सिनेमा download केला व मला तो खूप आवडला. बरयाचदा आपल्याला अश्या सिनेमांची माहितीच नसते. कधीतरी कोठूनतरी माहिती मिळते व मग अशी एखादी कलाकृतीचा आनंद घेता येतो.

आजचा हा धागा मी मुद्दाम अश्या कलाकृतींची माहिती करून घेण्यासाठी लिहित आहे.

आपण पाहिलेला असा एखादा सिनेमा जो आपल्याला खूप आवडला व आपल्याला खूप प्रभावित करून गेला असेल तर कृपया कळवावा जेणेकरून इतरानाही त्याची माहिती मिळेल व त्याचा आनंद घेता येईल. शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील, माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईल असा सिनेमा आपल्याला माहिती असेल तर कृपया त्याची माहिती द्यावी.

सिनेमा हिंदी, मराठी किंवा इंग्लिश किंवा एखाद्या परकीय भाषेतला (म्हणजे जर फक्त चित्र बघूनही कळू शकत असेल तर) चालेल.

उदाहरणार्थ मला खूप आवडलेल्या जे काही सिनेमा आहेत त्यात "'The Pursuit of Happyness" किंवा टोम हैंनक्सचा "Cast away", "The Terminal " आहेत. थोडाफार नाटकीपणा जर बाजूला ठेवला तर आपला "३ Idiots" देखील त्या category मध्ये गणता येईल.

मग कृपया सांगता का नावे?

माधवी

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Jul 2012 - 11:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

दो आंखे बारह हाथ

-जो जीता वोही सिकंदर. ऑल टाईम ग्रेट..
-कभी हां कभी ना.. लाईफमधे "ना" स्वीकारायला शिकवणारा..
-स्वदेस..अनरियालिस्टिक पण शक्य असलेला शेवट.
-लगान..
-ध्यासपर्व.

स्पा's picture

31 Jul 2012 - 11:37 am | स्पा

the secret

अरुण मनोहर's picture

31 Jul 2012 - 11:46 am | अरुण मनोहर

एक कप च्या

प्रबोधनकारी, पण मनोरंजक.

In to the wild जरा जपुनच इंन्सपायर व्हा यावर.

Goal इंग्रजी बरका हिंदी न्हवं, फक्त पहीला भाग बघा. अप्रतील फुटबॉल मोवी.

Social Network बिहाइंड एव्हरी बिग सक्सेस.. देर इज क्राइम.

Second in command जिन क्लॉड वॅन डॅमचा हा चित्रपट आहे, पिटातले अ‍ॅक्शन चित्रपट आवडत असतील तर इंन्सपायरींगही वाटेल.

Seabiscuit घोड्याची रेस, महामंदी वगैरे.

Cinderella Man सत्य कथेवर आधारीत महामंदी व बॉक्सिंग वगैरे

Rocky balboa 5 बॉक्सिंग वगैरे excellent philosophical stuff for fighter.

A Beautiful Mind टर्निंग विकनेस इंटु स्ट्रेंथ

Jerry Maguire टॉम क्रुझचा मस्त अभिनय स्पोर्ट एजंटच्या आयुष्यावर मस्त कथा

Day of thunder टॉम क्रुझचा मस्त अभिनय कार रेसींगचे सुंदर चित्रण कोणतेही स्पेशल इफेक्ट नसताना खरोखर सर्व रेस थरारक व स्टोरीही मस्त.

जो जीता वही सिकंदर ************************

Pirates of Silicon Valley स्टीव्ह जॉब व बिल गेट्स

Blow पेनेलोपी क्रुज व जॉनी डेपचा मस्त अभिनय. ड्र्ग विक्रेता बनायला प्रेरीत करणारा चित्रपट.

The Aviator डिकॅप्रिओ, मस्त चित्रपट... इट्स ऑल अबॉट पॅशन एंड बिझनेस.

Dead Poet Society याची भ्रश्ट नक्कल म्हणजे मोहब्बते.

Enemy at the gates मस्त स्नायपर मोव्ही , विषेशतः दुसर्‍या महायुध्दात रशीयन्सनी जो पराक्रम गाजवला त्यावर फार कमी चित्रपट मी पाहीले आहेत हा त्यातला सगळ्यात आवडीचा. जिद्द, चिकाटी, परिश्रम व एकाग्रतेची महती पटवुन देणारा.

बाकी फॉरेस्ट गम्प वगैरेही आहेत पण तो स्लमडॉग मिलीयनेर तेव्हडा बघु नका... आपलच अंगण आहे त्यामुळे उगाचच कचरा व गलिच्छपणा जवळुन दिसेल. आणी ज्या घटकावर इन्सपायर झालं पाहीजे ते आपसुकच दुर्लक्षीत होइल.

स्वानन्द's picture

31 Jul 2012 - 12:03 pm | स्वानन्द

ग्रेट!! काही काही नवीन चित्रपटांची माहीती मिळाली!

अनिमेशनमध्ये 'Finding Nemo' मस्त आहे. हिंदी डबिंग पण एकदम सुरेख.
Million Dollar Baby पण आवडला होता. अर्थात शेवट तसा 'सो कॉल्ड इन्स्पायरिंग' नाही. पण एक वेगळा अनुभव देतो.
हिंदीतला 'आमीर' पण आवडला होता. अर्थात हाही अगदी नेहमीच्या धाटणीचा 'इन्स्पायरींग' नाही.

आत्मशून्य's picture

31 Jul 2012 - 12:28 pm | आत्मशून्य

Million Dollar Baby आवडलाच पण मी इन्सपायरींग म्हणत नाही कारण Clint Eastwoodची एक सवय आहे... त्याच्या बर्‍याच चित्रपटात कथानक एक व त्यातुन चित्रपटाचा संदेश छुप्या स्वरुपात काहीतरी वेगळाच देण्याचा प्रयत्न असतो. उदा Million Dollar Baby हा एक नक्किच उभरत्या बॉक्सरच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे असं म्हणता येतं पण Clint Eastwoodला मुख्यत्वे त्यातुन पॅरॅलिसीस झालेल्या रुग्णांच्या व्यथा माडायच्या होत्या असं म्हणतात.... चित्रपटाचा शेवट बरच काही स्पश्ट करतो.

अरे हो तो श्वशांक रिडम्शन नावाचा स्टीफन किंगच्या कथेवर आधारीत एक भुक्कड चित्रपट चुकुनही बघु नका अनावश्यक हाइप झाली आहे त्याचे त्यापेक्षा स्टीफन किंगच्या कथेवर आधारीत पुढील चित्रपटही मस्त.

रायडींग दी बुलेट - मानसीक भितीदायक विचारांचे मस्त प्रतिबींब

द मिस्ट - एखाद्या अस्मानी संकटातुन सुटकेसाठी माणसांचा समुह कसा रिअ‍ॅक्ट करतो सुरुवात २०१२ सारखी वाटेल पण शेवट अप्रतीम.

१४००१ - भुते असतात की नसतात ? चित्रपट बघुन ठरवा.

स्टँड बाय मी - इट्स अ किड्स स्टोरी, विषेशतः तुम्ही ट्रेकींगला ५-६ व्या इयत्तेत असतानाच सुरुवात केली असेल तर विशेष आवडेल असा चित्रपट. एक डेडबॉडी बघायला ४ लहान मुले सहलीला निघतात अशी कथा आहे. चित्रपट मस्त डॉयलॉग्ज पण विषेश संथ असल्याने (क्लासीक) दर्दी लोकांसाठीच आहे.

बाकी अर्नॉल्डच्या रनींग मॅन पासुन ते ड्रिमकॅचर पर्यंत अनेक चित्रपट (काही चुकवावेत असे तर काही चुकवु नयेत असे )स्टीफन किंगच्या कथांवर आहेत पण वरील चार चित्रपट इन्सपायरींग सदरातही मोडतात.

स्वानन्द's picture

31 Jul 2012 - 12:58 pm | स्वानन्द

येस्स. म्हणूनच तो सो कॉल्ड इन्स्पायरींग क्याटेगरीतला नाही म्हणता येत. अर्थात, क्लिंट इस्टवूड ला पॅरॅलिसिस झालेल्यांची समस्या मांडायची होती असे वाटले नाही. कदाचित त्याने एक केस दाखवली. whole picture. ज्यात जिद्दीने लढणे ही आहे. काही काळ प्रयत्नांना मिळणारे यश सुद्धा. आणि 'हॅप्पी एंड' होतो आहे असं वाटत असतानाच पुन्हा परीस्थितीचे पलटलेले फासे. पुन्हा नवीन संघर्ष. पुन्हा नवीन निर्णय... वगैरे.

इष्टुर फाकडा's picture

31 Jul 2012 - 1:48 pm | इष्टुर फाकडा

१४००१ ???
अधीक माहिती मिळेल काय?

प्रतीसाद टाइपताना मिस्टेक झालीय 1408 असं नाव आहे.

संपत's picture

31 Jul 2012 - 2:05 pm | संपत

त्यांना १४०८ म्हणायचे असावे.. पण निदान मला तरी तो inspiring वाटला नाही. शशांक रिडम्प्शन मात्र माझा अत्यंत लाडका inspiring चित्रपट आहे.

आत्मशून्य's picture

31 Jul 2012 - 2:09 pm | आत्मशून्य

पण निदान मला तरी तो inspiring वाटला नाही. शशांक रिडम्प्शन मात्र माझा अत्यंत लाडका inspiring चित्रपट आहे.

शक्य आहे.. या जगात काहीही घडणे शक्य आहे. तुमच्याच बाबतीत न्हवे कोणाच्याही बाबतीत.

संपत's picture

31 Jul 2012 - 2:21 pm | संपत

1408 हा भयपट म्हणून माझा आवडता आहेच.. तो inspiring वाटला नाही एवढेच..

मी पडलो एकदम पिटातला पब्लीक, ढिशुम -ढिशुम क्याटेगरीचा चाहता. म्हणूनच रसग्रहण वगैरे आपल्यला तसं जमतही नाही, पण तिथले चित्रपट तेच बोर वाटु लागले म्हणुन उच्च - हुच्च डायलॉग बेस्ड चित्रपटांकडे कुतुहल म्हणुन वळलो. नशीबाने आवडही लागली म्हणुन बरेच आपोआप न ठरवता बघीतले गेले.... पण या सगळ्यात हा श्वशांक (की शव्शांक) रिडीम्शन "इन्सपायरींग म्हणून" डोक्यावरुन गेला. त्यातच माझ्या काही जवळच्या मित्रांना तो चित्रपट फार आवडला असे सारखे सारखे सांगणे म्हणजे फार हुच्च अभिरुची दाखवणे वगैरे आपोआप वाटु लागले असं माझं निरीक्षण आहे.... मनापासुन सांगतो आपण या चित्रपटाचं रसग्रहण वगैरे लिहाल काय ? मला तो बहुदा कळला नसावा. मला तर Flashback of a fool सुध्दा इन्सपायरींग वाटला होता.. असो.

1408 मस्त थ्रिलर (की हॉरर) आहेच नो डाउट पण मला त्यात नायकाचा सर्व्हायवल स्ट्र्गल फार सॉलीड वाटला अगदी त्याचा शेवट धरुन. डिफरंट टेक बाय स्टिफन किंग.

ता.क. :- नुकताच द ग्रे नावाचाही एक मस्त चित्रपट पाहण्यात आला. तो ही सर्व्हायवल स्ट्र्गलचाच आहे पण माहीत नाही शेवट किती जणांना आवडेल...

संपत's picture

31 Jul 2012 - 3:09 pm | संपत

मी शौशंक बघण्या आधी त्याबद्दल विशेष ऐकले नवते म्हणूनच कदाचित एवढा आवडून गेला. हाईप मुळे आपल्या मनात काही एक प्रतिमा निर्माण झाली असते तिच्याशी मेळ न खाल्ल्याने असे बहुधा होत असावे. अनेकांचा लाडका चित्रपट Dr. Strangelove बहुधा म्हणूनच मला बिलकुल झेपला नाही.. पीटर सेलर्स चा पंख असून हि...
मला स्वताला 1408 मधल्या खोलीतली भुते आणि नायकाच्या मनातील भुते ह्यांचा खेळ आवडला.
बाकी चित्रपटांचे रसग्रहण करण्या इतपत अक्कल मला नाहीच आहे..

संपत's picture

31 Jul 2012 - 3:13 pm | संपत

मी शौशंक बघण्या आधी त्याबद्दल विशेष ऐकले नवते म्हणूनच कदाचित एवढा आवडून गेला. हाईप मुळे आपल्या मनात काही एक प्रतिमा निर्माण झाली असते तिच्याशी मेळ न खाल्ल्याने असे बहुधा होत असावे. अनेकांचा लाडका चित्रपट Dr. Strangelove बहुधा म्हणूनच मला बिलकुल झेपला नाही.. पीटर सेलर्स चा पंख असून हि...
मला स्वताला 1408 मधल्या खोलीतली भुते आणि नायकाच्या मनातील भुते ह्यांचा खेळ आवडला.
बाकी चित्रपटांचे रसग्रहण करण्या इतपत समज मलाही नाही..

१४००१ - भुते असतात की नसतात ? चित्रपट बघुन ठरवा.

ISO 14001 आठवून डोळे पाणावले.

आत्मशून्य's picture

1 Aug 2012 - 11:37 am | आत्मशून्य

8)

sagarpdy's picture

1 Aug 2012 - 6:53 pm | sagarpdy

+१००००००००००००००

प्रेरणा पित्रे's picture

31 Jul 2012 - 12:01 pm | प्रेरणा पित्रे

आणखी काही ...
- इक्बाल
- गुरु
- चक दे इंडिया
- नायक
- रंग दे बसंती
- स्लमडॉग मिलेनियर

इंग्लिश मुविज जास्त बघत नाही म्हणुन सांगता येणार नाही..

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2012 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील, माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईल असा सिनेमा आपल्याला माहिती असेल तर कृपया त्याची माहिती द्यावी.

हे सगळे चित्रपट पाहून मिळते ?

मुळात एखाद्याला inspiring वाटलेला सिनेमा हा दुसर्‍याला भिकार वाटणार नाही कशावरुन ?

मुख्य म्हणजे चित्रपट हा समाजाचा आरसा असेल, तर चित्रपट बघण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांकडून, त्यांच्या वर्तनाकडे बघून inspire व्हायला काय हरकत आहे ? बाबा आमटे आहेत, आमटे परिवारातील इतर सदस्य आहेत, अभय आणि राणी बंग आहेत. खरेतर शोधायला जावे तर अजून खूप लोकं मिळतील.

तीन तास डॉक्याला विश्रांती मिळावी, अंधारात सर्व चिंता हरवून खदखदून हसायला मिळावे येवढीच माफक अपेक्षा आपली चित्रपटाकडून असते बॉ.

परांतर :- वरच्या सगळ्या इच्छा 'टारझन द एप मॅन' देखील पूर्ण करून शकेल ही गॅरेंटी.

नाना चेंगट's picture

31 Jul 2012 - 1:00 pm | नाना चेंगट

+१

परीकथेतील राजकुमार, आपले म्हणणे अगदी खरे आहे.
Inspire होण्यासाठी आजूबाजूला देखील नक्कीच खूप जण आहेत.

सिनेमांबद्दल बोलायचेच झाले तर शेवटी सर्व सापेक्ष आहे आणि म्हणूनच एखाद्याला आवडणारा सिनेमा दुसर्याला अगदी टुकार वाटू शकतो पण म्हणून सिनेमा पाहून आपण काहीच शिकू शकत नाही किंवा त्याचा आपल्यावर चांगला परिणाम होऊ शकत नाही हे मी मान्य करू शकत नाही.

"आनंद" सिनेमा पाहून कितीतरी जण नक्कीच inspire झाले असणारच जीवनातील संकटाना सामोरे जाण्यासाठी. "A Beautiful Mind" हा नितांत सिनेमा तरी काय वेगळे शिकवतो. शेवटी "रुसेल क्रोवे" नोबेल पारितोषिक मिळवताना जे भाषण करतो त्याने आपण काहीच शिकत नाही असे वाटते का?

आनंद, "Life is Beautiful" किंवा "The pursuit of Happyness" बघताना आपल्या डोळ्याचा कडा पाणावत नसतील तर एक तर आपण पाषाण हृदय असलो पाहिजे किंवा संत तरी असलो पाहिजे. अर्थात कोणी कशाने inspire व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या सारखी अल्पमती असलेली माणसे कदाचित अश्या सुमार सिनेमानीच inspire होत असतील कदाचित.

बाकी आपण अगदी योग्य सांगितले आहे कि inspire होण्यासाठी बाबा आमटे इत्यादी खूप उदाहरणे नक्कीच आहेत. पण आमच्यासारखी सर्व सामान्य माणसांसाठी हि फार मोठी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा देखील नक्कीच प्रभाव असतो आपल्यावर. त्यांच्या सारखे बनण्यासाठी फार त्याग आणि उंच ध्येय पाहिजे जे बर्याचदा माझ्यासारख्या सामान्य लोक्नाकडे असेलच असे नाही ना. म्हणून कधी चांगली पुस्तके वाचून, कधी चांगले लेख वाचून आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो असे मला वाटते.

ज्यांनी मागच्या रविवारचा "सत्यमेव जयते" पाहिला असेल त्यात देखील खूप उदाहरणे दाखवली होती inspire होण्यासाठी आणि नक्कीच आपल्या मनावर त्याचा चांगला परिणाम होत असतोच. पण म्हणून चांगल्या सिनेमा वरून आपण काहीच शिकू शकत नाही किंवा inspire होऊ शकत नाही हे काही मला तरी पटत नाही. बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माधवी

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2012 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

मात्र,

"आनंद" सिनेमा पाहून कितीतरी जण नक्कीच inspire झाले असणारच जीवनातील संकटाना सामोरे जाण्यासाठी.

भारत सोडून अजून किती देशातल्या किती लोकांनी आनंद 'अनुभवला' असेल ? उलट 'लान्स आर्मस्ट्राँग' मुळे नक्कीच जगातल्या एका मोठ्या संख्येला Inspiration मिळाले आहे.

अर्थात चित्रपटाकडे 'मनोरंजन' सोडून इतर कुठलेही माध्यम म्हणून सहसा बघू नये असे आपले माझे मत आहे. इतर विरुद्ध मतांचा देखील आदर आहेच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Jul 2012 - 1:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

भारत सोडून अजून किती देशातल्या किती लोकांनी आनंद 'अनुभवला' असेल ? उलट 'लान्स आर्मस्ट्राँग' मुळे नक्कीच जगातल्या एका मोठ्या संख्येला Inspiration मिळाले आहे.

का बुवा, त्याने काय फरक पडतो? समजा आनंद मुळे क्ष लोकांना प्रेरणा मिळाली असेल आणि लान्स आर्मस्ट्राँग मुळे १०क्ष लोकांना मिळाली असेल तर त्याने आनंद चे महत्त्व कसे कमी होते ? हा युक्तिवाद काही खास पटला नाही बुवा.

मुळात कुणाला कशामुळे प्रेरणा मिळाली हे कसे मोजणार? तरीही quantity च हवी असेल तर आनंद ऐवजी तत्सम इंग्रजी सिनेमाचे उदा घ्या ना.

स्पा's picture

31 Jul 2012 - 2:02 pm | स्पा

विमेशी बाडीस

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2012 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार

मेहेंदळे का ?

छान छान. :)

तुमचे मत देखील आदरणीयच आहे.

प्यारे१'s picture

31 Jul 2012 - 3:21 pm | प्यारे१

का हो?
वेगळे हवे होते काय आडनाव?

स्पा's picture

31 Jul 2012 - 3:22 pm | स्पा

प्यारेशी बाडीस

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2012 - 3:44 pm | परिकथेतील राजकुमार

ब्राह्मण आडनाव आहे तेवढे पुरेसे आहे.

अजून काही शंका ?

प्यारे१'s picture

31 Jul 2012 - 4:02 pm | प्यारे१

>>>ब्राह्मण आडनाव
मेहेंदळे हे ब्राह्मण आडनाव आहे. ह्यात एक 'पूर्ण' समुदाय अपेक्षित होता की समुदायाचा गट की आणखी काही?
>>>पुरेसे
ह्याबद्दल थोडंसं विवेचन.... ह्या ह्या ह्या!

- शांती प्रिय प्यारे१
(डिस्क्लेमर : धाग्याचे काश्मीर झाल्यास निव्वळ योगायोग वगैरे....)

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2012 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

ज्याची त्याची जाण.. समज.. वैग्रे.. ह्या ह्या ह्या!

संपत's picture

31 Jul 2012 - 1:38 pm | संपत

+१

चावटमेला's picture

31 Jul 2012 - 1:55 pm | चावटमेला

कभी हा कभी ना

संपत's picture

31 Jul 2012 - 2:16 pm | संपत

1. Shawshank Redemption - प्रतिकूल परिस्थितीत आनंदी कसे राहावे
2. Remember the Titans - वंशभेदाच्या पार्श्वभूमीवर खेळ आणि स्पर्धा
3. Motorcycle diaries - चे गावेरावर सुंदर चित्रपट
4. My left foot - Daniel day Lewis चा सुंदर अभिनय

विजुभाऊ's picture

31 Jul 2012 - 2:17 pm | विजुभाऊ

मला " जब वी मेट " आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2012 - 2:37 pm | प्रभाकर पेठकर

दो आँखे बारह हाथ, मेरा नाम जोकर, शोले, लज्जा, जंजीर, दोस्ती (फार जुना), आनंद, एक रुका हुवा फैसला, न्यू देल्ही टाईम्स, मुघल्-ए-आझम, शोर, एक धागा सुखाचा, सामना, श्वास, सिंहासन, हरिश्चंद्राची फॅक्टरी, मी सिंधूताई सपकाळ, बालगंधर्व, बाजार, नटरंग, दोघी इ.इ.इ.

तसेच नाटकांत, नटसम्राट, मला काही सांगायचे आहे, वाहतो दुर्वांची जुडी, पुरुष, डॉ. लागू, मित्र, ती फुलराणी, गारंबीचा बापू, तो मी नव्हेच अशी अजून बरिचशी नाटके आहेत.

ह्या सर्व चित्रपटांचा आणि नाटकांचा प्रभाव माझ्यावर आहे.

स्वप्निल घायाळ's picture

31 Jul 2012 - 2:42 pm | स्वप्निल घायाळ

forrest gump -
फिलाडेल्फिया
हे दोन्ही चित्रपट टॉम हँक्स चे मस्त आहे..

कवितानागेश's picture

31 Jul 2012 - 3:04 pm | कवितानागेश

रंग दे बसंती

क्लिंटन's picture

31 Jul 2012 - 3:19 pm | क्लिंटन

फ्रॅन्क कॅप्रांची दुसर्या महायुध्दावर Why we fight नावाची ७ भागांची प्रपोगांडा सिरिज आहे. त्यातील "बॅटल ऑफ रशिया" हा माझा अत्यंत आवडता भाग आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रशियन लोकांनी जर्मन सैन्याविरूध्द कसा लढा दिला याचे यथार्थ चित्रण त्यात आहे. विशेषतः लेनिनग्राडचा वेढा आणि स्टॅलिनग्राडची रस्त्यारस्त्यात/ चौकाचौकात/ घराघरात आणि खोलीखोलीत झालेली लढाई बघून अंगावर शहारा येतो. ही प्रपोगांडा सिरिज असल्यामुळे थोडी नाट्यमयता त्यात जरूर आहे. पण अशा परिस्थितीत रशियनांनी दिलेला लढा बघून आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न सोडवायलाही जरूर प्रेरणा मिळेल यात शंका नाही. सध्या ऑफिसात आहे आणि इथे युट्यूब दिसत नाही. संध्याकाळी घरी गेल्यानंतर लिंक देतोच.

आबा's picture

31 Jul 2012 - 3:55 pm | आबा

ही माझीही आवडती सिरिज...

१. द शॉशॅन्क रीडेम्प्शन
२. लगान
३. १२७ अवर्स
४. पर्स्युट ऑफ हॅप्पिनेस
५. स्पर्श (सई परांजपेंचा)
६. अ ब्युटिफुल माईण्ड
७. कास्ट अवे.
८. द टर्मिनल
९. तारें जमिन पर
१०. स्टॅनली का डब्बा
११. ग्लॅडियेटर

आणि ईतरही बरेच

विनीत संखे's picture

31 Jul 2012 - 3:38 pm | विनीत संखे

ह्यात

ब्लॅक, चक दे इंडिया आणि नटरंगही टाकावेत.

;)

आबा's picture

31 Jul 2012 - 3:54 pm | आबा

अलका काकूंच्या चित्रपटांना पर्याय नाही...

आबा's picture

31 Jul 2012 - 3:52 pm | आबा

तसे बरेच आहेत, पण नुकताच पाहिलेला, "पाथ्स ऑफ ग्लोरी" खुप सुरेख होता !
शेवटी जर्मन भाषेमध्ये एक गाणं आहे, एक शब्द सुद्धा न कळता डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः !
त्याच चित्रपटातील एक प्रसंग,

गुंडा, लोहा, इंद्रा द टायगर, पळवा-पळवी, माहेरची साडी, इंग्रजी व हिंदी Wanted, आंटी नं १, महेश भट्ट यांचे सर्व चित्रपट ई ई

इ इ म्हणायचे आहे की ते पिक्चर पाहून ई ई होतंय असे म्हणायचे आहे ;)

नाही हो दादा. हे चित्रपट खरोखरच एक मौलिक धडा देतात. हे चित्रपट आपल्याला सांगतात कि वेळेचा चांगला वापर करा, भिक्कार चित्रपट बघण्यात वाया घालवू नका.

sanjivanik१'s picture

31 Jul 2012 - 6:20 pm | sanjivanik१

3 IDIOTS माझ्यासाठी सर्वात प्रेरणादायक

नुकताच रॉबिन विल्यम्स आणि रॉबर्ट डि-नीरो चा जुना 'अवेकनिंग' पाहिला. मस्त आहे. आजारामुळे वेजीटेटिव अवस्थेत गेलेले पेशंट आणि त्यांना पुन्हा माणसांत आणू पाहणारा डॉक्टर असा विषय आहे. दोघांच्या अभिनयाची चांगली जुगलबंदी आहे. रॉबिन विल्यम्सचाच 'पॅच अ‍ॅडम्स' पण खूप छान इन्स्पायरिंग चित्रपट आहे.

अर्धवटराव's picture

31 Jul 2012 - 9:15 pm | अर्धवटराव

राजेश खन्नाचा चा बावर्ची - इट्स सिम्पल टु बी हॅपी बट डिफिकल्ट टु बी सिम्पल. खुषीया तो फुलझडी कि तरह होती है... थोडी देर चमकती है फीर बुझ जाते है... दुख अगरबत्ती कि तरह सुलगता रह्ता है.... असं बरच काहि

अर्धवटराव

तुषार काळभोर's picture

31 Jul 2012 - 10:42 pm | तुषार काळभोर

प्रेरणादायी....पिच्चर बघून तसं काहीतरी करावं असं वाटायला पाहिजे ....
धूम, स्पायडरमॅन, प्रोजेक्ट एक्स, युरोट्रिप, पुणे-मुंबई-पुणे

बन्याबापू's picture

31 Jul 2012 - 11:31 pm | बन्याबापू

जन्नत :)

गुळाचा गणपती's picture

1 Aug 2012 - 12:03 am | गुळाचा गणपती

लक्ष्य by Farhan Akhtar

मोदक's picture

1 Aug 2012 - 1:06 am | मोदक

Taking Chance.
Children of Heaven.

पिवळा डांबिस's picture

1 Aug 2012 - 2:09 am | पिवळा डांबिस

गांधी (इंग्रजी)
अपोलो १३
अ लीग ऑफ देअर ओन
पॅपिलॉन
कास्ट अवे
पॅटन
अ ब्यूटिफुल माईंड
मेडिसिन मॅन

टिलू's picture

1 Aug 2012 - 3:12 pm | टिलू

मला आमीर खानचा 'सरफरोश' बराच inspiring वाटला.

स्पंदना's picture

2 Aug 2012 - 5:02 am | स्पंदना

हायला!!

कुणीपण Enough नाही पाहिला? अजिबात नाव नाही कुठेही ते?
जेलो चा आहे, अन जेलो त्यात नैसर्गिक दिसते. म्हणजे जशी होती तशी...गोड.
अर्थात पिक्चर स्त्रीवादी वगैरे वाटायची शक्यता आहे, पण पहाच.
you have a basic animal right to protect your and your offspring's life

अरे हो, King's speech पण पहा.

आणखी एक पिक्चर मला कायम आवडतो तो म्हणजे 'खुशबु' हेमामालिनी, जितेंद्र, असराणी, फरिदा जलाल, दुर्गा खोटे.....डायरेक्टर..ह्रषिकेष मुखर्जी.

कॉमन मॅन's picture

1 Aug 2012 - 6:56 pm | कॉमन मॅन

द वन अँड ओन्ली.. - शोले..!

शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील,

एक दोन्ही हात तुटलेला माणूसदेखील हिंमत न हारता शत्रूचा पराभव करू शकतो..

माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईल

जेव्हा जय आणि विरूला हे कळतं की ठाकूरची सगळी फॅमिली गब्बरने ठार मारली आहे आणि त्याचे दोन्ही हात तोडले आहेत तेव्हा ते ठाकूरने दिलेले पैसे परत करतात व तरीही त्याचं काम मात्र विनामूल्य करण्याचं ठरवतात..

रंगोजी's picture

1 Aug 2012 - 7:13 pm | रंगोजी

कूल हँड ल्यूक
द वे बॅक
फॉरेस्ट गम्प
इक्बाल
एनिमी अ‍ॅट द गेट्स
द एव्हिएटर
द ब्लाईंड साईड

अतुल पाटील's picture

1 Aug 2012 - 7:45 pm | अतुल पाटील

द वे बॅक - ह्या चित्रपटात सायबेरिया मधुन पळालेले युद्ध कैदी - ४००० मैल पायी प्रवास करुन (सायबेरिया - मन्गोलिया - चीन - तिबेट - हिमालय मार्गे) भारतात पोहचतात.

Madhavi_Bhave's picture

2 Aug 2012 - 10:26 am | Madhavi_Bhave

"Inspiring सिनेमांची नावे" ह्या धाग्यासाठी आपण जी माहिती दिली त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार. लवकरात लवकर व जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे हे सर्व सिनेमा बघायचा प्रयत्न करेन. सध्या मी संत तुकाराम (जुना) download करत आहे.
पून्हा एकदा सर्वांचे आभार.

माधवि

Madhavi_Bhave's picture

2 Aug 2012 - 10:28 am | Madhavi_Bhave

"Inspiring सिनेमांची नावे" ह्या धाग्यासाठी आपण जी माहिती दिली त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार. लवकरात लवकर व जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे हे सर्व सिनेमा बघायचा प्रयत्न करेन. सध्या मी संत तुकाराम (जुना) download करत आहे.
पून्हा एकदा सर्वांचे आभार.

माधवि

Pearl's picture

2 Aug 2012 - 6:39 pm | Pearl

माधवी, हा धागा काढल्याबद्दल आभार. आणि त्यावर दिलेल्या माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
धाग्यावरची माहिती वाचून मी नुकतेच हे २ चित्रपट पाहिले. दोन्ही खूपच आवडले...

१) The Pursuit Of Happyness
http://www.youtube.com/watch?v=P0IMQDAMYv8

२) Enough
http://www.youtube.com/watch?v=MMU3giNgGRU

khadaad's picture

3 Aug 2012 - 9:06 am | khadaad

amistad, invictus,the bucket list,lean on me- morgan freeman ( invictus is must watch)
green mile,papillon,the last king of scotland,raid on entebbe,road to perdition,ratatouille.ransom,mai azaad hun
fellows here have covered most of the gud movie in the thread ...