साहित्यः
१ वाटी तांदूळ (उकडे तांदूळ मिळाले तर उत्तम)
१/२ वाटी चणा डाळ
१/४ वाटी उडदाची डाळ
१/४ वाटी मुगाची डाळ
१/४ वाटी तुरीची डाळ
३ लाल सुक्या मिरच्या
२ हिरव्या मिरच्या
आल्याचा छोटा तुकडा
कढीपत्ता
१/२ टीस्पून मेथीदाणे
१/२ टीस्पून काळीमिरी
१/२ टीस्पून हींग
मीठ चवीनुसार
तीळाचे तेल
पाकृ:
सर्व डाळी व तांदूळ स्वछ धुवून मेथीदाण्यासकट ३-४ तास भिजवून ठेवणे.
३-४ तासांनी पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यात डाळ+तांदूळ घालावे.
त्यात कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या , काळीमिरी, आले घालून, थोडे पाणी घालून डोश्याच्या पीठाप्रमाणे वाटणे.
वाटलेल्या पिठात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावे.
नॉन-स्टीक तवा तापवून त्यावर डावाने मिश्रण ओतून पसरावे.
कडेने तीळाचे तेल (नसल्यास रोजचे तेल वापरावे) सोडावे.
एक बाजू झाली की उलटवून दुसरी बाजु ही होऊ द्यावी.
गरमा-गरम अडई डोसा नारळाच्या चटणी बरोबर किंवा मिलगाई पोडी (मिश्र डाळींची चटणी) बरोबर सर्व्ह करावे.
आवडत असल्या ह्यात कांदा ही घालू शकता.
प्रतिक्रिया
31 Jul 2012 - 1:42 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम बहारदार डोसा.
बाकी, तव्याला न चिकटता आणि तुकडे होऊ न देता डोसा कसा करावा ह्याबद्दल कोणी अमूल्य मार्गदर्शन करेल काय ?
31 Jul 2012 - 2:00 pm | सानिकास्वप्निल
डोसा तव्याला चिकटु नये म्हणून मी आधी तवा तापवून घेते , मग त्यावर थंड पाण्याचा हबका मारून गार करते व लगेच डावाने मिश्रण घालून पसरवते :) कडेने तेल सोडावे...त्याने डोसे चांगले सुटतात अजिबात चिकटत नाही.
काही लोकं कांदा फिरवून घेतात तर काही मीठाच्या पाण्याचा हबका मारतात.
31 Jul 2012 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार
सानिकातै. :)
@शेख कुंदन :- मेल्या माझ्या चार पाच भयाण डोसे पाकृ च्या प्रयत्नांनंतर त्या तव्याने आपला नॉन स्टिक धर्म सोडून दिला आहे. आता तिकडून येताना मला उंटाच्या ऐवकी २ नॉन स्टिक तवे घेऊन ये.
31 Jul 2012 - 3:12 pm | कवितानागेश
किंचित तेल टाकून ते कांद्यानी पसरायचे, मग ते एकसारखे पसरते.
त्यानंतर मीठाचे पाणे किंचित शिंपडायचे.
मग दोश्याचे पीठ पसरायचे. ते पसरण्यासाठी सपाट तळ असलेले डाव मिळतात.
31 Jul 2012 - 2:28 pm | कुंदन
नीट वाचत जा रे
"नॉन-स्टीक तवा तापवून त्यावर डावाने मिश्रण ओतून पसरावे."
तुला लेका फारच घाई.
31 Jul 2012 - 2:00 pm | उदय के'सागर
-^- नमस्कार देवी अन्नपूर्णा -^-
नेहमी प्रमाणेच 'एक नंबर' पाकृ....
आणि ' मि.पा. साऊथ-इंडियन पदार्थ मोहोत्सव' चालू ठेवल्याबद्दल आनंद वाटला, सलग चैथा धागा :D
नक्कीच करुन बघणार...नवीनच 'HARD ANODISED तवा घेतलाय (जाहिरातच ;))
31 Jul 2012 - 2:04 pm | Mrunalini
मस्तच गं.... पण म्हणजे ही पीठ आंबवायला नाही लागत का???? अस असेल तर चांगल आहे... दुपारी ठरवले की लगेच रात्री करता येतील. ;)
31 Jul 2012 - 2:23 pm | सानिकास्वप्निल
नाही हे पीठ आंबवायला नाही लागत....त्यामुळे केव्हाही करता येतात :)
31 Jul 2012 - 3:55 pm | सूड
आंबवून केलं तर आणखी छान व्हायची काही शक्यता ?
31 Jul 2012 - 2:05 pm | जाई.
_/\_
31 Jul 2012 - 2:11 pm | सूड
र्होंबा नल्ला इरकं !!
31 Jul 2012 - 2:41 pm | स्मिता.
फोटो कसले झक्कास दिसत आहेत. मस्त!
31 Jul 2012 - 2:57 pm | स्वाती दिनेश
झकास दिसत आहेत डोसे..
स्वाती
31 Jul 2012 - 2:58 pm | मृत्युन्जय
झक्कास. बाकी परत परत त्याच त्याच प्रतिक्रिया काय द्यायच्या? तुमच्या सगळ्याच पाकृ अगदी "मार डाला " टाइप्स असतात :)
31 Jul 2012 - 5:36 pm | निवेदिता-ताई
+१
31 Jul 2012 - 3:33 pm | मन१
यम् यम्...
ल्यप ल्यप...
31 Jul 2012 - 4:28 pm | सुहास झेले
मरण्यापूर्वी खाण्याच्या यादीत स्थान मिळालेला हा पदार्थ, निव्वळ अल्टिमेट आहे आणि ह्यात असलेली विविधता तर काय सांगावी... इथे तर सादरीकरणाने त्यास चारचांद लागलेत :) :)
31 Jul 2012 - 4:31 pm | sneharani
झकास, मस्त आलेत फोटो!!
:)
करुन बघावे म्हणते.
:)
31 Jul 2012 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा
नेहमी प्रमाणे येक नंबर............. :-)
31 Jul 2012 - 6:31 pm | रेवती
वेगळा दोश्याचा प्रकार आवडला.
आजकाल मिपावर सौधिंडीयन खाद्य महोत्सव असल्यासारखे वाटत आहे. ;)
31 Jul 2012 - 6:33 pm | प्रभाकर पेठकर
व्वा.... मस्त डोसाकृती. विविध डाळींच्या वापराने डोसे अधिक चविष्ट आणि पौष्टीक बनणार ह्यात शंका नाही.
डोश्यांसाठी तवा जास्त तापलेला असता कामा नये तसेच थंडही असता कामा नये. हे साध्य होतं, प्रत्येक डोश्यानंतर तव्यावर पाण्याचा हबका मारून संपूर्ण तवा पुसून घेतल्याने. ह्या कूतीची आणि मिश्रणातील मेथीची, डोशे तव्याला न चिकटता सुटून यायला, मदत होते.
31 Jul 2012 - 6:43 pm | बॅटमॅन
वा वा वा....मस्त पौष्टिक पाकृ :)
यावरून आंध्रात पेसरट्टु नामक मूगडाळ डोसा करतात असे आठवले. डिशचे नाव "पेसरट्टु-पप्पु".
पप्पु=डाळ.
9 Aug 2012 - 11:40 am | मैत्र
पेसरट्टू नाव बरोबर आहे -- आख्खे मूग नुसते भिजवून आणि नंतर वाटून घेऊन ( त्या डोसा रगड्याने)
त्याचा डोसा करतात.
डाळ = पप्पू बरोबर आहे. म्हणूनच मूग डाळ = पेसर पप्पू
पेसरट्टू पप्पू हे तुळशी वृंदावन झालं :)
अडई डोसा हा तमीळ असावा. आंध्रामध्ये अशा डोशाची पद्धत नाही.
मस्त डोसा आहे. आंबवण्याची गरज नाही हे एकदम बेष्ट !!
अति अवांतरः हैद्राबादेस भेट देण्याचा योग आला तर : पंजागुट्टा - नागार्जुना हिल्स इथे किंवा ज्युबिलि हिल्स इथे चटनीज हे रेस्टॉरंट चुकवू नये असे काही सदरात येते. चार प्रकारच्या अनलिमिटेड चटण्या आणि पाण्या पेक्षा तत्परतेने भरली जाणारी सांबाराची वाटी या जोडीने येतो "एम एल ए पेसरट्टू" -- उत्तम पातळ पेसरट्टू ज्याच्या आत बटाट्याच्या डोसा भाजी ऐवजी परंपरागत आंध्रा उपमा असतो. ऐसपैस प्रमाणात भरलेला आणि अगदी आंध्रा पद्धतीने वरती दणकून मिरच्यांचे तुकडे. ते आवडी प्रमाणे खावेत. पण बाकी सर्व कॉम्बिनेशन (मराठी ?) केवळ अप्रतिम !
31 Jul 2012 - 6:44 pm | मदनबाण
झकास... :)
(मैसुर मसाला डोसा प्रेमी) :)
31 Jul 2012 - 8:52 pm | अर्धवटराव
लहानपणी "शिवा का इन्साफ" नावाचा थ्री डी सिनेमा बघितला होता. त्यात एका गाण्यात गुलाबजाम वगैरे पदार्थ अगदी हाताशी आल्यासारखे वाटुन झडप घातली होती. आज बिना थ्री डी चश्मा तशीच झडप घालावीशी वाटली पहिल्या फोडु वर :)
अर्धवटराव
1 Aug 2012 - 2:32 am | पिवळा डांबिस
फोटो व रेसेपी छान.
बट व्हॉट इज "अडई"?
1 Aug 2012 - 2:53 am | मोदक
सविस्तर प्रतिक्रिया आणखी एका सौधींडीयन पाककृतीनंतर दिली जाईल.. :-p
1 Aug 2012 - 9:25 am | शिल्पा ब
अरे वा!! उद्याच करते. सोप्पं अन हेल्दी.
1 Aug 2012 - 3:27 pm | स्पंदना
मस्तच!!
4 Aug 2012 - 12:03 am | शेफ
करुन पाहीन....
4 Aug 2012 - 2:13 am | पिवळा डांबिस
अरे समद्या सुगरण आया-बायांनो आनि शेफा-बाप्यांनो,
ते 'अडई' म्हंजे काय ते कुनी जरा सांगल का?
त्यो येक किडा उगीच घुसून र्हायलाय डोचक्यात आमच्या!!!!!
4 Aug 2012 - 9:36 am | प्रभाकर पेठकर
विकिपिडिआ वरील 'डोसा' ह्या पदार्थाच्या विविध प्रकारात अडई डोसासंबंधी खालील माहिती दिली आहे.
Adai: a dosa-like dish prepared from a combination of dals, namely urad, channa and moong dal.
म्हणजेच, मला वाटतं, वेगवेगळ्या डाळी (उडिद, चणा, मुग) वापरून केलेले धीरडे.
चवीनुसार आणि आवडीनुसार डाळींमध्ये बदल, नविन सामग्रीचा (आले, लसूण, कांदा इ.इ.) समावेश करून सुद्धा अडई बनवितात.
4 Aug 2012 - 5:37 am | वीणा३
छान दिसतोय डोसा आणि सोपा पण वाटतोय बनवायला. नक्की करून बघेन. धन्यवाद.
अवांतर : ज्यांच्या कडे ओवन आहे अशांसाठी - इडलीच पीठ वाटून झालं कि ओवेन चा लाईट लावून आत ठेवून द्यायचा(ओवन चालू ठेवायचा नाही.) ३-४ तासात नक्की फुगत.
5 Aug 2012 - 3:56 pm | पियुशा
च्यायला नावच इतक कठिण तर मला बनवायला कधी जमायचा ;)
डोसा भारिये ग सानिका ,इकडे पाठवूण देणे ;)
5 Aug 2012 - 3:59 pm | पैसा
आवडले. करून पाहण्यात येईल.
22 Aug 2012 - 7:09 pm | रेवती
अडई दोसा केला होता. चव चांगली होती पण भरपूर प्रोटीनयुक्त असल्याने एकापेक्षा जास्त खाऊ शकले नाही. त्याबरोबर पोडी तयारच होती ती चांगली लागली पण पुढच्या वेळी नारळाची चटणीही करणार आहे.
25 Aug 2012 - 7:35 am | ऋषिकेश
आमच्याकडे न्याहारीला असतो हा..मुख्य फायदा मिक्सरवर वाटले जाते.. त्यामुळे ग्राईंडरची कटकट वाचते :)
3 Nov 2012 - 11:25 am | पिलीयन रायडर
इथे काहीच दिसत नाहीये...
मसाला अप्पे याही पाकक्रुतीमध्ये काही दिसत नाही...