प्रबळ सौन्दर्य

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in भटकंती
28 Jul 2012 - 2:17 am

http://www.misalpav.com/node/२२३४३

वरील धाग्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

प्रबळ ला ट्रबल करत चाललेल्या प्रवासात कही सुन्दर असे फोटोस टिपन्याची संधि मिळाली...
खरतर फोटोग्राफी ची आवड जपताना ट्रेकिंग ची आवड कधी लागली कळलच नाही म्हणून ट्रेकिंग चे काही मी काढलेले फोटोस
वरच्या धाग्यात स्पा ने टाकले आहेत...
मुद्दामून काही ख़ास असे निसर्गाचे फोटोस वेगळ्या धाग्यात टाकत आहे...

Camera साधा - sony cybershot DSC-W510 वापरला आहे...

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

२५.

प्रतिक्रिया

सिद्धार्थ ४'s picture

28 Jul 2012 - 4:16 am | सिद्धार्थ ४

सगळे फोटो एक नबर ....

चौकटराजा's picture

28 Jul 2012 - 4:27 am | चौकटराजा

मानवाच्या भंवतालचा सूक्ष्म निसर्ग कल्पकतेने टिपलाय. सारेच फोटू मस्त . १६ नंबरच्या फोटोत घुसून सरळ ती पाउलवाट जवळ करावी असे लगेचच वाटते. ज्या चित्रात घुसावेसे वाटते ते उत्तम चित्र असे काही
मोठे छायाचित्रकार म्हणून गेलेत. वारूळाच्या मागची गूढ रानवाट बेस्ट ! सौरभ, वाउ !

आता एक DSLR घेउन टाक रे. एक णंबर फोटु आलेत :-)

चित्रगुप्त's picture

28 Jul 2012 - 7:42 am | चित्रगुप्त

सर्व फोटो उत्तम.
( बघताना कॉपीराईटच्या खुणेमुळे रसभंग होतो... यावर काही इलाज करा: अगदी शेवटल्या फोटोत फूल आणि किडे खूप ठसठशीत असल्याने कॉ.रा. कडे एवढे लक्ष जात नाही, पण तेच तुटक्या झाडाच्या फोटोत झाडापेक्षाही कॉ.रा.च जास्त नजरेत भरतो... जणू आकाशातून एकादे यान अवतीर्ण होत आहे, असे वाटते.
'फोटोग्राफ बाय' सुद्धा पारदर्शक करून, एकूणच आकार लहान केल्यास बरे).

प्रचेतस's picture

28 Jul 2012 - 8:20 am | प्रचेतस

मस्त फोटो रे.
धुकटातले गूढगर्भी वातावरण सुरेखच टिपले गेलेय.

वॉटरमार्कबद्दल चित्रगुप्तांशी सहमत.

स्पा's picture

28 Jul 2012 - 9:26 am | स्पा

धुकटातले गूढगर्भी वातावरण
उच्च दवणीय प्रतिसाद :)

कपिलमुनी's picture

30 Jul 2012 - 2:43 pm | कपिलमुनी

जी. ए. प्रतिसाद

लीलाधर's picture

28 Jul 2012 - 8:30 am | लीलाधर

१ नंबर हो फटू आलेत लाजवाब :)

मदनबाण's picture

28 Jul 2012 - 10:01 am | मदनबाण

सर्वच फोटो फार आवडले ! :)
तो वारुळवाला फोटो विशेष आवडला...
लगे रहो ! :)

अर्धवटराव's picture

28 Jul 2012 - 10:10 am | अर्धवटराव

अप्रतीम फोटो.
ते दुभंगलेलं झाड तर अक्षरशः अंगावर येतं.

अर्धवटराव

सर्वच फोटो छान आहेत. बाकी कॅमेरा कसा का असेना, फोटो काढण्याचे कसब अंगात असणे महत्वाचे, जे तुझ्यात आहे.

जाई.'s picture

28 Jul 2012 - 11:15 am | जाई.

छान आहेत फोटो

मृत्युन्जय's picture

28 Jul 2012 - 1:06 pm | मृत्युन्जय

अप्रतिम. साध्या कॅमेर्‍याने पण एवढे सुंदर फोटो टिपले आहेस तर मग डी एस एल आर ने तर कमाल करशील की. घेउन टाकच एक आता.

पुफोशु :)

स्मिता.'s picture

28 Jul 2012 - 1:53 pm | स्मिता.

अप्रतिम फोटो आहेत. सगळेच आवडले.

सुधीर's picture

28 Jul 2012 - 2:10 pm | सुधीर

सुंदर फोटोग्राफी!

sneharani's picture

28 Jul 2012 - 2:13 pm | sneharani

सुंदर आलेत फोटो.

झकासराव's picture

28 Jul 2012 - 3:12 pm | झकासराव

मस्त आहेत सर्वच फोटो. :)

विशाखा राऊत's picture

28 Jul 2012 - 4:48 pm | विशाखा राऊत

:)

स्वानन्द's picture

28 Jul 2012 - 4:59 pm | स्वानन्द

एकदम बढीया!! खेकड्याच्या फोटोत तर अगदी क्लास टायमिंग जमलंय!

सुकामेवा's picture

28 Jul 2012 - 6:24 pm | सुकामेवा

अप्रतिम फोटो या किल्याच्या भ्रमंतीच्या आठ्वणी जाग्या झाल्या.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2012 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा

सगळ्या फोटूंना सुप्पर लाइक करणेत येत आहे...!

अप्रतिम शॉट्स. --^--^--^--

फोटो कशाचा टिपायचा आणि कसा टिपायचा यात फोटोग्राफीच खर गमक आहे अस मला वाटत. तुमच्या फोटोच content तर उत्तमच आहे पण ते उत्तम प्रकारे टिपले आहेत ते जास्त महत्वाच . वरून तिसरा फोटो मस्त angal ने टिपला आहे. माझ्या दृष्टीने तरी तो या सगळ्या फोटोत NO 1 . पाण्याचे थेंब अप्रतिम, माझ्या कडे पण cybershot च आहे S series चा साधाच camera आहे. पण तो पण या सारखाच भन्नाट काम करतो.

वेल आणि कोळ्याच्या जाळ्याचे फोटो विशेष आवडले.

५० फक्त's picture

30 Jul 2012 - 8:14 am | ५० फक्त

जबरा जबरा आणि जबराच फोटो, बाकी काही बोलायचं काम नाही..

तो खेकडा कॅमेरा मागुन राह्यला का रे? दिलास का?

सार्‍या फोटोंमध्ये एक प्रकारचा मार्ग दिसतो आहे मला तर. म्हणजे त्या गर्द गवतावर भोपळ्याच्या पानांची पाउलवाट, जणु एखादी फुलराणी त्यावरुन विहरणार आहे अस काहिस ..जाउ दे उगा दवणिय होइल. पण खासच रे!

नरेंद्र गोळे's picture

30 Jul 2012 - 11:07 am | नरेंद्र गोळे

वा! उत्तम!!

मन प्रसन्न करणारे निसर्गचित्रण! आवडले.

चित्रचौकटींची निवड, चित्रातले केंद्रबिंदू, त्यांचेवरील प्रकाशसाधन, सुंदरता शोधण्याची आणि तीस आणखी सुबक पेश करण्याची आपली कला प्रशंसनीय आहे. अशाच उत्तमोत्तम चित्रणासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा!

प्यारे१'s picture

30 Jul 2012 - 2:10 pm | प्यारे१

सगळेच फटु क्लास्स्स्स्स!

खेकडा 'मला कडेवर घे ना' असं म्हणत असल्यासारखा क्युट आलाय!
बाकी वर कुणी म्हटल्याप्रमाणं ते वॉटरमार्क कमी साईझचा कर रे!

किसन शिंदे's picture

30 Jul 2012 - 2:42 pm | किसन शिंदे

तिथल्या वातावरणावरुन कल्पना आली होतीच तुझ्या फोटोंची. :)

किश्ण्या मेल्या.. ह्यांच्या फोटू काढण्याच्या नादात आपल्याला उशीर झाला कि राव ;)

कपिलमुनी's picture

30 Jul 2012 - 2:46 pm | कपिलमुनी

आवडले

किणकिनाट's picture

31 Jul 2012 - 11:49 am | किणकिनाट

सर्वच फोटो अप्रतीम.

जाळ्याचा विशेष उल्लेखनिय.
खेकडा एकदम जिवन्त. खरे सान्गतो, स्क्रीनवर आला आणि खुर्चितच थोडा मागे सरकलो.

किणकिनाट
प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो
पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

अनिल आपटे's picture

31 Jul 2012 - 12:40 pm | अनिल आपटे

सर्व फोटो अप्रतिम
कोळ्याचि कलाकारि सुन्दर टिपली आहे

michmadhura's picture

2 Aug 2012 - 1:06 pm | michmadhura

सुंदर फोटोग्राफी!

सौरभ उप्स's picture

2 Aug 2012 - 1:24 pm | सौरभ उप्स

धन्यवाद सर्वांचे......

वेताळ's picture

2 Aug 2012 - 1:44 pm | वेताळ

कॅमेर्‍यात फोटोग्राफरचे नाव देखिल प्रिण्ट छान होते आहे. ते कसे काय सेट केलेत?

सौरभ उप्स's picture

3 Aug 2012 - 12:29 am | सौरभ उप्स

माफ़ करा.. ते वाटरमार्क्स जरा जास्तच मोठे आणि नको तसे चयाचित्रना त्रास देत आहेत.. माला उशिरा म्हणजे जेव्हा सगळा लेख प्रकाशित केला त्यानंतर लक्षात आल ते.. मग म्हटल जाऊ दे पुध्च्यावेलेस ही चुक पुन्हा करायची नाही..
सो, पुड्च्या वेळेस त्याची खबरदारी घेतली जाइल... तरी ज्याना पण फोटोस आवडले त्यांचे परत आभार.....

खादाड's picture

10 Aug 2012 - 6:43 pm | खादाड

:)

सौरभ उप्स's picture

11 Aug 2012 - 1:51 am | सौरभ उप्स

ढगांमधून डोकावनारा प्रबळवरुन दिसणारा कलावंतीण.

गोरख गडाच्या समोरील गड आहे ना हा,? फोटो अप्रतीम आहेत.. ट्रेकींग च्या आठवणी जाग्या झाल्या.

इनिगोय's picture

15 Aug 2012 - 9:37 am | इनिगोय

खूपच भारी आहेत फोटो तुझे..
एखादी गूढकथा वाचत असावं तसं वाटलं, विशेषतः तो वारूळाचा, दुभंगलेल्या झाडांचा आणि रानाच्या पार्श्वभूमीवर अगदीच खतरनाक आणि एकदम सूचक दिसणार्‍या घंटांचा फोटो बघून. मान गये.

पैसा's picture

15 Aug 2012 - 1:35 pm | पैसा

सुपरलाईक! फक्त ते नाव जरा छोटं करायचं त्यवडं बगा!

प्रास's picture

15 Aug 2012 - 3:56 pm | प्रास

लई भारी!
झक्कास....