गाभा:
राम राम मंडळी
अधुन मधून कुणीतरी काहीतरी माहिती इमेलवर देत असतं.
कुठल्या तरी लिंका असतात.
काहीतरी अनुमान, निष्कर्ष असतात,
काही मजेशीर असतात.
काही गंभीर असतात.
अशीच एक लिंक नुकतीच मिळाली.
वेगवेगळ्या फास्टफुड रेस्टॉरंटबद्दल काही माहिती त्यात दिली आहे.
मिपावर अनेक सदस्य या विषयाबद्दल बरेच काही जाणून असतात अशी खात्री आहे.
तेव्हा या लिंकमधे असलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबद्दल विचारावे म्हणून धागा काढला आहे.
(एकोळी धागा समजून संपादकीय कारवाई होऊ नये म्हणून दोन चार ओळी सुद्धा टंकल्या आहेत ;) )
तर ही घ्या लिंक : http://articles.mercola.com/sites/articles/archive/2012/07/25/fast-food-...
:)
प्रतिक्रिया
28 Jul 2012 - 1:53 pm | चित्रगुप्त
हाटेलातील भजी वगैरे त्याच त्याच तेलात तळलेली असतात, म्हणून हल्ली लोक चकचकीत, महागड्या फास्ट फूडच्या जागी जातात. तिथली अंदरकी बात उजेडात आणल्याबद्दल आभार.
28 Jul 2012 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार
नक्कीच आहे.
आमच्या हाटेल व्यवसायाशी संबधित एका मित्राने एकदा आम्हाला 'मिक्स व्हेज' म्हणजे काय आणि पनिरच्या कुठल्याही उरलेल्या भाजीचे पुढे काय होते हे साग्रसंगीत दाखवले होते.
आता लेखकुसाठी काही सूचना :-
१)
सध्या धागा एकोळी आहे, का आख्यान आहे ह्याला महत्व नसून, तो कोणी लिहिला आहे हे महत्वाचे.
२) ह्यापुढे असे धागे न टाकता, सरळ मिळालेल्या माहितीचे मराठीकरण करून स्वतःच्या नावे खपवून द्यावे. एखाद्या पंडिताने शंका काढलीच, तर "अरे ह्याचे इमेल्स पण यायला लागले का? मी ह्यातले काही संदर्भ दोन / चार वेबसाइट वरुन घेतले आहेत" असे सांगावे.
३) एकाच धाग्यात सगळे न उरकता, कमीत कमी ३/४ भाग करावेत. तसेच लेखनाशी संबधीत फोटो देखील द्यावेत.
४) लेखनात आपली विद्वत्ता दाखवणे सोडू नये. दर चार-पाच वाक्यांनंतर आपले मत, अनुमान, निष्कर्ष हे ठोकत रहावे.
५) लिखाणाच्या अधे मध्ये तुमचे आगामी लिखाण काय असेल ह्याची देखील हिंट देत रहावी.
धन्यवाद.
29 Jul 2012 - 10:47 pm | पांथस्थ
देवा असे अर्धवट नका सोडू. आता गुढ निर्माण केले आहे तर उकल पण करा!
28 Jul 2012 - 2:02 pm | sneharani
जाणकार लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!
28 Jul 2012 - 2:25 pm | छोटा डॉन
राम राम नान्याबा, जेवण वगैरे झाले का ?
खरं आहे, सध्या प्रत्येकालाच त्याच्याकडे काही खास माहिती आहे असे वाटत असल्याने त्याने ती इमेलवर देणे आश्चर्यकारक नाही. इनफॅक्ट तुम्हाला घसबसल्या विनाकष्ट असे इमेल मिळतात ह्याबद्दल तुम्ही संबंधीतांचे आभार मानायला हवेत.
चालायचंच, कित्येकदा भरमसाट माहिती लिहण्यापेक्षा लिंका चिटकवणे सोपे असते.
शक्य आहे. एखादी माहिती आली की त्याच्या अनुषंगाने अनुमान निष्कर्ष हे आलेच. त्यात माणुस हा समाजशील प्राणी असुन तो विचारही करु शकतो, त्यामुळे अनुमान निघणे अशक्य नाही.
ऑ ? गंभीरपणे काढलेले अनुमान तुम्हाला मजेशीर वाटतात ? मजाच आहे राव तुमची.
तुम्ही वरच तुमचा मजेशीर मुड दाखवला असल्याने हे विधान गंभीरपणे घ्यावे असे वाटत नाही.
अभिनंदन !
बरीच माहिती इंग्रजीत होती, शनिवारी दुपारी जेवण झाल्यावर इंग्रजी वाचणे त्रासदायक आहे.
शिवाय आम्हाला वाटले की फास्टफूड रेस्टॉरंटबद्दल पत्ते, मेन्यु, फीडबॅक्स वगैरे माहिती आहे म्ह्णुन आम्ही लिंक उघडली, असो बदलेन आता.
अत्यंत अचूक अनुमान आहे. अभिनंदन.
काय फरक पडणार आहे ?
समजा माहितीत तथ्य असेल तर आपण ( सर्वनाम आहे, स्पेसिफिकली तुम्ही किंवा मी नव्हे,भांडायला येऊ नये) तिकडे जाणे बंद करणार आहे का ? बादवे, घरोघरी मातीच्या चुली ही म्हण ऐकली असेलच.
पुन्हा एकदा अभिनंदन
- छोटा डॉन
28 Jul 2012 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा
यात नवे काय? एकदा आमच्या आचारी मित्राने ग्रेव्ह्यांचे प्रकार तीनच,पण मेनु'त भाज्या साठ! हा प्रकार दाखवला,तेंव्हापासुन सत्व/रज/तम हे तीनही स्तर आध्यात्मिकापेक्षा आधिभौतिकाला जास्त लागू पडतात,असे अमचे मत झाले आहे. ;-)
28 Jul 2012 - 3:35 pm | रमताराम
यात नवे काय? एकदा आमच्या आचारी मित्राने ग्रेव्ह्यांचे प्रकार तीनच,पण मेनु'त भाज्या साठ!
करेक्ट. अहो सादा कामणसेन्स हाय ओ. हाटिलात तुमा-आमाला खायाला मेन्यू पर्याय किती तीनशे ते साडेतीनशे आणि ते सारं तयार करायला वट्ट दोन किंवा तीन लोक अंदाजे दहा बाय पंधराच्या जागेत कोंडलेले. मग हे असे मिक्स्-अँड्-मॅच होणारच की.
30 Jul 2012 - 11:49 am | बॅटमॅन
"पिजनहोलून" बशिवलेले लोक्स हो सगळे ;)
28 Jul 2012 - 3:38 pm | रमताराम
हाटेलात जेवायचं तर एक म्हण नेहमी लक्षात ठेवावी 'दृष्टीआड सृष्टी...' बाकी मग नाना म्हणंल त्येला +१ हैच आमचं.
28 Jul 2012 - 4:07 pm | जाई.
ररांशी सहमत
28 Jul 2012 - 5:56 pm | बिपिन कार्यकर्ते
जाईशी सहमत.
30 Jul 2012 - 7:13 am | स्पंदना
बिकांशी सहमत.
30 Jul 2012 - 9:38 am | इरसाल
अपर्णाशी सहमत आणी अक्षयशीही सहमत ;)
28 Jul 2012 - 3:43 pm | कुंदन
फास्टफुड रेस्टॉरंट मध्ये महागडे खाणे परवडत नसल्याने तिथे जात नाही.
अन त्यामुळे घरच्या घरी भाजी-पोळी बनवुन खातो.
सो.. आमचा पास.
28 Jul 2012 - 3:51 pm | स्पा
फास्टफुड रेस्टॉरंट मध्ये महागडे खाणे परवडत नसल्याने तिथे जात नाही.
अगदी खरे आहे
- (मौ भात प्रेमी) स्पा
28 Jul 2012 - 4:07 pm | सोत्रि
हत तिच्यायला....
आजकाल लिंका आल्या आणि त्या उघडल्या की काहितरी ओंगळवाणे बघायला मिळण्याचा दौर आहे. नविन धागा, त्यातही नान्याचा*, तोही लिंक असलेला म्हणून मोठ्या उत्साहाने उघडला तर तो चक्क शब्दाळलेला निघाला आणि घोर निराशा झाली. डॉन्राव म्हणाले तसे दुपारी जड झालेल्या पोटाने आणि डोळ्यांनी हे सगळे वाचायची काही इच्छा झाली नाही.
बाकी मिपाकर वाचायचे कष्ट घेऊन उजेड पाडतीलच म्हणा :)
* चार थोर लोक जसे वागतात त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करतो त्यामुळे नान्या म्हटले आहे अन्यथा 'श्रियुत नाना' असे लिहीले असते.
- (तथ्य शोधण्याचे पथ्य न पाळणारा) सोकाजी
28 Jul 2012 - 4:03 pm | विनायक प्रभू
नान्या वरण भात खावे आणि निपचीत पडुन घ्यावे.
निपचीत पडुन घ्यायला प्रत्येकाची कारणे वेगवेगळी.
28 Jul 2012 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकाटाआ
-दिलीप बिरुटे
28 Jul 2012 - 6:47 pm | मन१
हाटेल वगैरे जाउ द्यात हो. तुमच्या आमच्या घरात येणारी साखर बनण्यासाठी प्रक्रियेदरम्यान हाडं मिसळली जातात हे ठाउक आहे की नाही ते बोला. मी तर म्हणतो साखरेचा हरेक पदार्थ सोडूनच दिला पाहिजे.
आणि हो, कित्येक जण सकाळी पिशव्यातून मिळणार्या पांढर्या द्रवाला दूध समजताहेत. ते त्यांनी तसेच समजणे त्यांच्या भल्याचे आहे. त्यात साधारणतः १५% दूध असते म्हणतात, उरलेले सर्व युरिया वगैरे. ह्यामुळे कुणाला कसली अॅलर्जी होउ शकते तर कुणाला चक्क कॅन्सर. तरी घरोघरी अज्ञानी लोक हे वापरतातच.
केळी, लिंबू, आंबा ह्या गोष्टी पिवळसर छान पिकलेल्या दिसल्या म्हणून तुम्ही आम्ही घेतो. भारतात योग्य त्या पद्धतीने पिकवण्यात आलेले असे हे अत्यल्प आहे. बाकी भारतभर सर्वत्र इथाइल कार्बाइड का काहीतरी वापरतात. हे ही कार्सिओजनिक म्हणून ओळखले जाते.म्हणजेच ह्यामुळे आतड्यांचे विकार होउ शकतात, तसेच कॅन्सरसुद्धा.
गाजर, कद्दू ह्याबद्दल न बोललेच बरे.
ब्रेड -पाव कसा बनतो हे बेकरित जाउन पाहून याल तर पुन्हा जन्मात खाणं तर सोडा ब्रेड - बिस्किट- पेस्ट्री ह्या वस्तूंचे दर्शन घ्यायचीही हिम्मत होणार नाही.
हल्ली मागणी खूप आणि पुरवठा कमी असतो दिवाळीला, दहावी-बारावी निकालाच्या वेळेस खव्याचा. सर्वांनाच मिठाई हवी असते. त्यातला कित्येक भाग म्हणे मलमूत्रापासून ते कसल्या कसल्या रसायनांनी बनलेला असतो.(ह्याच्या तपशिलाबद्द्दल खात्री नाही.)
बहुतांश वेळी तुम्ही जे खाता, ते तुम्ही जे खाताय असे तुम्ही समजता, त्याहून बरेच भिन्न असते; बहुतांश वेळी अत्यंत हानिकारकही असते.
28 Jul 2012 - 7:00 pm | आनंदी गोपाळ
आणि मग खाण्यासारखे काय उरले? तुम्ही काय खाता याच्या काहि हिंट्स?
29 Jul 2012 - 10:00 am | मन१
आणि मग खाण्यासारखे काय उरले
हेच बोल्तो.
तुम्ही काय खाता याच्या काहि हिंट्स?
अन्नाची आवड्-निवड करण्याचे स्वातंत्र्य गरिबांस नसते. मिळते ते गपगुमान प्वाटाखाली ढकलतो. कार्सिओजनिक असुं देत नाही तर अॅसिडिटी वाढवणारे; भूक मिटवते हे महत्वाचे.
30 Jul 2012 - 11:33 am | विजुभाऊ
ब्रेड -पाव कसा बनतो हे बेकरित जाउन पाहून याल तर पुन्हा जन्मात खाणं तर सोडा ब्रेड - बिस्किट- पेस्ट्री ह्या वस्तूंचे दर्शन घ्यायचीही हिम्मत होणार नाही.
हे तुम्ही सर्वसाधारण ( जेनेरीक्/इन जनरल) विधान कसे करता. माझ्या एका मित्रांची बेकरी आहे. मैदा मिसळण्यापासून पॅकेजिंग पर्यन्त कुठेच मानवी स्पर्श होत नाही. संपुर्ण स्वच्छ प्रक्रीया आहे.
30 Jul 2012 - 12:03 pm | मन१
विधान मागे घेत आहे.
28 Jul 2012 - 6:45 pm | कवितानागेश
यापुढे कुणाच्यातरी घरीच कट्टे करुयात! :P
30 Jul 2012 - 9:05 am | पिंगू
मग पहिला कट्टा तुझ्याच घरी करु म्हणतो.. ;)
31 Jul 2012 - 12:36 pm | सुहास..
हल्ली नाना खुप पियाला लागला आहे ;)
31 Jul 2012 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार
हे कोणी सांगीतले ह्याचा उल्लेख नसल्याने सदर प्रतिक्रिया बाद ठरवण्यात यावी.
धन्यवाद.