किंगमेकर की --

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
23 Jul 2012 - 9:53 pm
गाभा: 

किंगमेकर कि -- किंगफिशर
श्री. विजय मल्ल्या हे तसे भारदस्त (कि वादग्रस्त ?) व्यक्तिमत्व्,यांनी वयाच्या २८ व्या वर्षी १९८३मध्ये वडीलांनी काढ्लेली युनायटेड ब्रेअरिज ही कंपनी चालवुन फायद्यात आणली व नंतर किंग फिशर एअर लाईन्स ही कंपनी व ईतर उद्योग केले
परंतु सध्या या कंपनीच्या कर्जा मुळे ते प्रकाशात आहेत व त्यान्च्या गोव्या तील आलिशान घरावर आयकर विभागाने नजर ठेवली आहे.पण माझ्या मते त्यानी चांगल्या गोष्टी देखील केल्या आहेत
१) म्हैसुर चा प्रसिध्द राजा टीपु सुलतान यांची प्रसिध्द तलवार २००४ मधे ईन्ग्लड मधुन लिलावात खरेदी करुन भार तात आणली
२)तसेच २००९ मध्ये महात्मा गांधी यांचा चश्मा व ईतर गोष्टी अमेरीके तुन लिलावात १८ लाख डालर्स ला खरेदी केल्या
त्यामुळे ते किन्गफिशर चे किन्गमेकर वाट्तात व या आय कराच्या मळभा तुन बाहेर येतिल
तुम्हाला काय वाट्ते ?

संपादितः कृपया राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उल्लेख एकेरीत करू नये.

प्रतिक्रिया

सुनील's picture

23 Jul 2012 - 10:22 pm | सुनील

नंतर किंग फिशर एअर लाईन्स ही कंपनी व ईतर उद्योग केले

हे इतर उद्योग कोणते? ;)

असो, आम्ही त्यांच्या बियर आणि कॅलेंडरवर फिदा आहोत. त्यांनी फक्त हे दोनच उद्योग करीत रहावेत. बाकी ते एअरलाइन वगैरे गेले चुलीत ;)

चित्रगुप्त's picture

24 Jul 2012 - 2:48 am | चित्रगुप्त

त्यांच्या ईतर उद्योगांविषयी धागा काढ्ल्यास बरे.

त्यांच्या ईतर उद्योगांविषयी धागा काढ्ल्यास बरे.

आय पि एल क्रिकेट स्पर्धा चालु असताना त्यांचे चिरंजीव पण बरेच उद्योगांत मग्न असतात..... ;)

शकु गोवेकर's picture

24 Jul 2012 - 2:17 am | शकु गोवेकर

डा.मल्ल्या यांचे ईतर उद्योग आहेत ईजिनिरिंग रियल ईस्टेट (घर बांधणी) खते बाओटेक्(जैव तंत्र) फार्मा (औषधे) वगैरे व डा.विजय मल्ल्या हे सर्व मल्ल्या समुह (मल्ल्या ग्रुप) प्रमुख म्हणुन पहातात

चिंतामणी's picture

25 Jul 2012 - 2:55 pm | चिंतामणी

नावामागे "पद्मश्री" लिहायचे राहून गेले की हो शकूताई.

बाकी पद्मश्री डॉ. विजय मल्ल्या यांच्या कर्तृत्वाच्या मानाने धागा फारच तोकडा वाटला.

अर्धवटराव's picture

24 Jul 2012 - 2:29 am | अर्धवटराव

>>२००९ मध्ये मोहनदास गांधी यांचा चश्मा
-- तो चश्मा मोहनदास गांधीचा नसुन महत्मा गांधींचा होता.

अर्धवटराव

श्रीरंग's picture

24 Jul 2012 - 9:29 am | श्रीरंग

तेच ते नाहीत का?

पक पक पक's picture

24 Jul 2012 - 1:37 pm | पक पक पक

तेच ते नाहीत का?

ते तेच आहेत.पण कसं आहे ना रंगाण्णा ,आपण आपल्या वडीलांचे नाव घेत नाही .तशी पद्धत आपल्या कडे नाही .अन ते तर सा़क्षात राष्ट्रपिता आहेत .. :)

अर्धवटराव's picture

24 Jul 2012 - 6:37 pm | अर्धवटराव

मुल्यात्मक फरक आहे.

अर्धवटराव

इरसाल's picture

24 Jul 2012 - 9:24 am | इरसाल

१) म्हैसुर चा प्रसिध्द राजा टीपु सुलतान यांची प्रसिध्द तलवार २००४ मधे ईन्ग्लड मधुन लिलावात खरेदी करुन भार तात आणली
२)तसेच २००९ मध्ये मोहनदास गांधी यांचा चश्मा व ईतर गोष्टी अमेरीके तुन लिलावात
१८ लाख डालर्स ला खरेदी केल्या

तेवढा पैसा आता नसता कामात आला.

हे मुळचे किसान जाम, सॉस बनविणार्‍या कंपनीचे मालक. तो धंदा विकला व दारुचा धंदा चालु केला. दारु विकुन मिळालेला (व इतर बरेच धंदे आहेत?? ) नफा टिकत नसतो.

दारु विकुन मिळालेला (व इतर बरेच धंदे आहेत?? ) नफा टिकत नसतो.

स्कॉच, टकीला वैग्रेंच्या अनेक जगप्रसिद्ध युरोपियन/अमेरिकन कंपन्या कशा काय ब्वॉ टिकल्या मग? त्यांचा नफा कसा काय टिकला? की वरचे वाक्य फक्त भारताला लागू आहे? तसे असेल तर देशीची इतकी दुकाने कशी काय टिकली? की त्यातसुद्धा देशीच्या नावाखाली त्रिफळाचूर्ण , द्राक्षासव इ. पाजले जाते?

चित्रगुप्त's picture

24 Jul 2012 - 12:11 pm | चित्रगुप्त

इंग्रज काय ते दुष्ट, जुलुमी शत्रू, आणि त्यांच्या राजवटीविरुद्ध जे होते वा लढले, ते परम देशभक्त, स्वतंत्रता सेनानी, वगैरे प्रचार हल्ली सरकारी पातळीवर केला जात असतो. मलासे वाटते त्याकाळी तथाकथित देशभक्ती वगैरे प्रकार काही नव्हता, जो तो स्वार्थासाठी लढायचा, आज याच्या बाजूने, तर उद्या त्याच्याच विरुद्ध. पैसा, लूट मिळणे हा हेतू. टिपू सुलतानाने हिंदूंना जिवंत जाळले वगैरे घटनांमुळे मराठ्यांनी टिपूला नेस्तनाबूद करण्यात इंग्रजांना मदत केली, वगैरे वाचल्याचे आठवते. कुणाला हे नीट ठाऊक असल्यास लिहावे.
बाकी हल्ली हिंदू, मुसलमान इ. शब्द वापरणे हेही कठीणच.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2012 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हाला काय वाट्ते ?

येवढा सुंदर माहितीपूर्ण धागा काढल्याबद्दल आम्हाला तुमचे कौतुक वाटते.

नाही म्हणजे नेहमीच अश्या पेटते, धगधगीत, प्रखर, विस्फोटक धागे काढता म्हणून विचारले ब्वॉ..

हायग्रोस्कोपिक तसे फायग्रोस्कोपिक

नाना चेंगट's picture

24 Jul 2012 - 7:25 pm | नाना चेंगट

>>>>तुम्हाला काय वाट्ते ?

पोटात गुड गुड झाल्यासारखं वाट्ते.

हे असं काही वाचला कि खरच वाटत कि जर जुने चांगले लेख माहिती असतील तर वर काढा प्लीज :(

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2012 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

हे असं काही वाचला कि खरच वाटत कि जर जुने चांगले लेख माहिती असतील तर वर काढा प्लीज

शक्यतो संपादकांचे जुने लेख वर काढाल तर अजून उत्तम. लेख पण वर येतात आणि गुड बुकात नाव पण जाते. एका दगडात दोन पक्षी.

नाना चेंगट's picture

25 Jul 2012 - 1:33 pm | नाना चेंगट

सहमत आहे.
त्याचबरोबर जे आता संपादक नाहीत त्यांचे सुद्धा लेख वर काढावेत. जेणेकरुन त्यांना सुद्धा बरे वाटेल आणि कदाचित ते संपादक असण्यापूर्वी जशा उमेदीने लेखन करायचे तसेच लेखन करतील.

कवटी's picture

25 Jul 2012 - 2:26 pm | कवटी

आयला... हे माहित नव्हते.... धन्यवाद पराशेठ!
तेवढ अत्ताच्या घडीला कोन कोन संपादक आहे याची लिश्ट मिळेल का?

इरसाल's picture

25 Jul 2012 - 2:45 pm | इरसाल

कोणाच्यातरी (इथे काही नाहीये) पाय देताय.
राहुद्या काही काळ सुप्तावस्था उपभोगु द्या आरामाने.

नाय, गोवेकर आहात म्हणून विचारलं.

शकु गोवेकर's picture

26 Jul 2012 - 1:10 am | शकु गोवेकर

दोन गोष्टि - १)संपादकानि गांधीचा उल्लेख एकेरित न करता दुहेरी केला आहे ,ठिक आहे -- २)संजयजी,मल्ल्यासाहेबांचा गोव्यातिल बंगला अजुन लिलावात आला नाही व त्यावेळी वाट्ले तर माझ्या प्रमाणे तुम्ही देखील बोली लावु शकाल ,तयारी आहे का?

नितिन थत्ते's picture

27 Jul 2012 - 7:24 pm | नितिन थत्ते

त्या मल्ल्याचं भारतात का इतकं कवतिक चालतं काय माहित.

आणून आणून @#$% टिपूची तलवार आणली आणि @#$%च्या चोळणार्‍यांचा चष्मा आणला.

इरसाल's picture

27 Jul 2012 - 7:27 pm | इरसाल

.

मदनबाण's picture

27 Jul 2012 - 7:48 pm | मदनबाण

हॅहॅहॅ...
तिकडचा * संपादित झाला म्हणुन चाचांनी आपला * संपादित केला.

*:- प्रतिसाद