गुवाहाटीच का बरे --

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
15 Jul 2012 - 8:30 am
गाभा: 

गुवाहाटी व बागपत पाठोपाठ गुजरात व छ्त्तीसगड येथे कालच घडलेल्या या घटना --
विडीओ नेट वर
१) गुजरात मधील धाओड भागात एका नराधमाने महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करुन त्याचा विडिओ नेट वर अपलोड केला व सीडी काढुन त्या वितरित केल्या
२) छत्तीसगड मधिल विलासपुर ते रतनपुर मार्गावरिल खुन्टाघाट येथे फिरावयास गेलेल्या जोड्प्याना बंदुकिच्या धाकाने कपडे काढावयास लावुन नग्न होण्यास भाग पाड्ले व तश्या अवस्तेत एस एम एस काढ्ला गेला व हा एस एम्स वितरीत केला
३) बंगलुरु येथे सात वर्षाच्या मुलीचे मंजुनाथ नावाच्या युवकाने शील अपहरण केले
या व अशा बातम्या वाचुन मन विषन्न होते
रामदास फुटाणे यांनी एका कवितेत म्हट्ल्या प्रमाणे (वाट्त नाही ?--)
कधी कधी वाट्ते की भारत माझा देश आहे

प्रतिक्रिया

आचारी's picture

15 Jul 2012 - 10:45 am | आचारी

आता तर ''कधी कधी वाटणे'' सुध्दा ब॑द व्हायचा मार्गावर आहे !! एवढी भयानक परिस्थिती आहे या देशात !!

अर्धवटराव's picture

15 Jul 2012 - 11:17 am | अर्धवटराव

परिस्थिती आपण म्हणतो त्यापेक्षाही वाईट असु शकते. हि सर्व सभ्य, सज्जन, सुसंस्कृत समाजाच्या पापाची फळे आहेत. ते पाप म्हणजे निर्बलता.

अर्धवटराव

शकु गोवेकर's picture

15 Jul 2012 - 9:44 pm | शकु गोवेकर

अर्धवटराव जी,उतर देतोच म्हणताय पण अहो आता उत्तर देण्याची वेळ आली आहे
वरिल ३ घटने पाठोपाठ महाराष्ट्र सुद्धा मागे नाही
घटना ४) उस्मानाबाद जवळ गड्देवदरि येथे गावातील एका तरुणाकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून पेटवून घेतलेल्या चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा अखेर शनिवारी (दि.१४जुलै २०१२) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.आम्रपाली हजारे (वय १४) ही गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरी होती. त्या वेळी या गावातील नात्याने सावत्र मामा असलेल्या लखन आढाव (वय २०) याने तिच्या अंगावर खिडकीतून काहीतरी लिहिलेली चिठ्ठी फेकली. नात्यातीलच रेश्‍मा ननवरे हिने या प्रकरणी मदत केली. हा प्रकार सहन न झाल्याने आम्रपालीने गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांना दिलेल्या मृत्युपूर्व जवाबात तिने लखन व रेश्‍माचे नाव घेतले आहे. बदनामी झाल्याचा राग सहन न झाल्याने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी लखन आढाव, रेश्‍मा ननवरे या दोघांविरोधात उस्मानाबाद ग्रामीण पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.
आता सांगा,भारतात हे सर्व चालु आहे ते वाचुन काय वाट्ते

अर्धवटराव's picture

16 Jul 2012 - 12:39 am | अर्धवटराव

>>अर्धवटराव जी,उतर देतोच म्हणताय पण अहो आता उत्तर देण्याची वेळ आली आहे
-- म्हणजे काय?

श्री गावसेना प्रमुख's picture

16 Jul 2012 - 9:00 am | श्री गावसेना प्रमुख

सौदी सारखा लोकांसमोर शिरच्छेद हाच एक उपाय राहीलाय्,
बाकि पोलीसांना कुत्र सुध्धा घाबरत नसल्या सारखी परिस्थिती आहे आता.

रणजित चितळे's picture

16 Jul 2012 - 9:07 am | रणजित चितळे

कठोर शिक्षा व ती सुद्धा वेळेत हाच काय तो पर्याय आहे.

कुणालमिसळ's picture

16 Jul 2012 - 3:48 pm | कुणालमिसळ

कलियुगाचा अन्त जवळ येतोय.