गाभा:
राम राम मंडळी,
सदर संकेतस्थळ सुरू होऊन अवघे दोन-तीन दिवसही झाले नसताना, विसोबांना काही एक ब्रिदिंग टाईम घेऊ न देता, काही गोष्टी ठरवण्याआधीच त्याची खेटरांनी पूजा बांधणार्या सर्व पूजकांचे येथे हार्दिक स्वागत आहे! :)
आता हाणा त्यांना बिनधास्त! :)
आपला,
विसोबा खेचर!
प्रतिक्रिया
18 Sep 2007 - 10:34 am | कोलबेर
तात्या, झाला प्रकार काहिसा अपेक्षितच होता..अपेक्षेपेक्षा फारच लवकर घडला इतकाच. बहुसंख्य सदस्यांचे मत काय आहे हे स्पष्ट झालेच आहे (आणि अजुनही सर्वांना तशी संधी उपलब्ध आहे).. तेंव्हा लोकशाहीवर आधारीत ह्या स्थळावर जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे असे समजुन आता आपण सगळेच पुढे सरकुया.
गणपती बाप्पा मोरयाऽऽ
18 Sep 2007 - 10:58 am | सर्किट (not verified)
खेटरांनी पूजा बांधली आहे खरीच. पण ती विसोबा ह्या व्यक्तीची नाही. विसोबा ह्या प्रवृत्तीची आहे. आणि ह्यांचा आक्षेप व्यक्त होतो, तरी कुठल्या गचाळ कारणासाठी, हे आपल्याला कळलेलेच आहे. वारंवार पारदर्शकतेची मागणि करणार्या विसोबांची खरी पूजा बांधली होती कुणी, आणि त्यांच्या हुकूमशाहीपुढे मूग गिळून गप्प कोण बसले होते, हे सर्वांना माहिती आहेच. तीन दिवसात शंभराहून जास्त माणसे आपल्या भोवती गोळा करू शकण्याची कुणाचीही क्षमता नाही, हे येथे नमूद करावेसे वाटते.
माफ करा, पण अशा लोकांची पर्वा आपण करू नये असे वाटते.
- सर्किट
18 Sep 2007 - 11:03 am | सहज
हुशार व कंजूष तात्या. लोक खेटर फेकतील मग आपल्या मापाची दोन मिळाली की नवीन घ्यायला नको, नाही म्हणायला आत्ताच खूप खर्च झालाय आता थोडा खर्च वाचला कसे. :-)
आले लक्षात आमच्या, जा नाही फेकणार.
18 Sep 2007 - 11:09 am | सर्किट (not verified)
:-) :-)
मस्त. आम्ही हा विचार केलाच नव्हता.
- (ट्यूबलाईट) सर्किट
18 Sep 2007 - 2:44 pm | झकासराव
तुम्ही कितीबी पळुन गेलात तरी मी हाय मागावर.
ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय.
अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय.
आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :)
तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला.
ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर.
आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :)
18 Sep 2007 - 3:16 pm | विसोबा खेचर
कसा आहेस रे सायबा? :)
ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय.
अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय.
अरे जरा आंतरजालीय राजकारणात लय बिजी होतो! :)
आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :)
अवश्य येत रहा..!
तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला.
ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर.
बास काय! वळखलं की! ठाण्याच्या बीबीवरची वळख इसरलो नाय अजून!
आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :)
जरूर जरूर..
बाय द वे झकासरावा, तुझी प्रतिसाद देण्याची जागा चुकली बघ! तू मला पोष्टकार्ड पाठवायला हवे होतेस. हे सदर मी फक्त इसोबा खेचराला जोडे मारणार्यांच्याकरता खास उघडले आहे. तुकोबा म्हणतात, 'निंदकाचे घर असावे शेजारी'! म्हणूनच आम्ही आमच्या निंदकांकरता हे खास चर्चासदर सुरू केले आहे! :)
असो..
तात्या.
18 Sep 2007 - 3:49 pm | झकासराव
तुम्हाला खरड वहित लिवलय की.
18 Sep 2007 - 4:21 pm | सुरेखा पुणेकर
ख्याटर कशाला वो. आसं न्हाइ करायचं बगा. हिथ ठेवा की माजी बैटकीची लावनी मिस्साळपाववर्ती.
18 Sep 2007 - 4:42 pm | प्रकाश घाटपांडे
होउन जाउंद्या सुरेखाबाई, बैठकीची लावनि, 'सुंदरा मनामध्ये भरली' आपल्याला लई आवडलेला कार्यक्रम.
प्रकाश घाटपांडे
11 Jan 2009 - 7:58 pm | सखाराम_गटणे™
स्वागताबद्दल आभार
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
11 Jan 2009 - 8:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गटणे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याबद्दल लिहिलेला येथील वैयक्तिक मजकूर काढून टाकत आहे..
कृपया गटण्यांबद्दल यापुढे कुणीही काहीही वैयक्तिक लिहू नये. त्यांच्या माझ्याकडे सततच्या तक्रारी असतात आणि त्यांच्या प्रत्येकच तक्रारीकडे लक्ष पुरवण्यात माझा खरंच खूप वेळ मोडतो..
तात्या.
अवांतरः छोटा डॉन यांच्या खालच्या प्रतिक्रियेशी १००% सहमत.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
11 Jan 2009 - 8:14 pm | अनंत छंदी
:?
11 Jan 2009 - 8:23 pm | छोटा डॉन
एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत.
चालु द्यात.
बाय द वे, अगदी खरचं "वर काढण्यासारखा" धागा असेलच तरच हे व्हावे. आमचा वैयक्तीक कसलाही राग/लोभ नाही पण ह्यातुन नक्की काय साधले जात आहे हे कळेना.
शिवाय काही ताजे व वाचनीय धागे खाली चाल्ले आहेत.
एखादा जुन धागा जर खरेच अजुन चर्चा करण्यासारखा असेल तर तो नक्की वर काढावा, आमचा काहीही आक्षेप नाही. पण नुसता "उत्तम, आवडाले, आभार" ह्या सारख्या प्रतिक्रीया त्या लेखकाच्या पर्सनल खरडवहीतही देता येतील.
अजुन एक , हे आमचे वैयक्तीक मत आहे, कुणावर हल्ला नाहीच. संपादक मंडळाला न पटल्यास हा प्रतिसाद उडवला तरी हरकत नाही.
आम्ही आमचे प्रामाणीक मत सांगितले.
ह्या मताबद्दल स्पष्टीकरण देण्यास व जादा वाद घालण्यास आम्ही बांधील नाही, जास्त आक्षेप असतील तर बिनधास्त उडवा हा प्रतिसाद.
फक्त उगाच जुने उकरुन का काढले जात आहे ह्या हेतुमागची शंका आल्याने एवढे खरडले.
वर काढायला विरोध नाही, पण एकाच दिवसात किती धागे वर काढले हे पाहुन अंमळ आश्चर्य वाटले, तसेच त्यावर काही "नवी चर्चाही" घडत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले.
असो.
------
छोटा डॉन
11 Jan 2009 - 8:47 pm | ऋषिकेश
छोट्या डॉनशी १००% सहमत.
हे काय चाललंय? कीतीतरी लिखाण वाचायच्या आधीच इतकं वेगात मागे चाललंय की मिपावर नवीन वाचायला आहे की नाहि संशय यावा.
-(गोंधळलेला) ऋषिकेश
11 Jan 2009 - 8:53 pm | घाटावरचे भट
ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत.
11 Jan 2009 - 9:13 pm | टारझन
वा ! भट राव, काय मार्मिक लिहीलंय ! मला आपल्या प्रतिक्रीयेत खेचरराव दिसले !
- घाटावरचा बाटा
आमच्या परवाणगीशिवाय आमच्या पादुका चोरू णयेत .
12 Jan 2009 - 12:08 am | विसोबा खेचर
ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत.
भटांशी सहमत आहे..
एखादा जुना धागा वाचनात आला, त्याला प्रतिसाद दिला गेला आणि तो वर आला हे समजू शकतो. पण गटण्या हे उद्योग मुद्दामून का करतो आहे ते समजत नाही..
तात्या.
12 Jan 2009 - 12:08 am | विसोबा खेचर
एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत.
खरं आहे! हा गटण्या लेकाचा जुने धागे मुद्दामून का वर आणतो आहे ते समजत नाही!
असो..
तात्या.
12 Jan 2009 - 1:35 am | नंदन
डॉनरावांशी सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
12 Jan 2009 - 12:34 am | बिपिन कार्यकर्ते
डॉन्या, अदिती इ. माण्णीय सभासदांशी १००% सहमत.
बिपिन कार्यकर्ते
12 Jan 2009 - 2:44 am | ब्रिटिश टिंग्या
लेख प्रकाशित होउन दीड-एक वर्ष झाले असताना, वाचकांना काही एक ब्रिदिंग टाईम घेऊ न देता, भराभरा जुने लेख उकरुन काढुन त्याची खेटरांनी पूजा बांधणार्या सर्व पूजकांचे येथे हार्दिक स्वागत आहे! :)
आता हाणा त्यांना बिनधास्त! :)
आपला,
टिंगोबा खेचर!
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!