गाभा:
आजच्या वर्तमानपत्रात 'आपला संगणक सुरक्षित आहे की बाधीत?' अशी बतमी वाचली. डी एन एस सर्वर बदलुन टाकणारे खलयंत्र जर आपल्या संगणकात शिरले असेल तर सोमवारपासून असे बाधित लोक जालावर दाखल होण्यास मुकतील, त्यांना आपल्या सेवादात्याशी संपर्क साधुन नव्याने जुळणी करावी लागेल असे म्हटले आहे. आपला संगणक बाधीत झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काही संकेतस्थळांची नावेही दिली आहेत. सोमवारी जेव्ही एफ बी आय लुच्चे सर्वर बंद करुन टाकेल तेव्हा बाधीत संगणकाला जालावर प्रवेश मिळणार नाही.
नुकत्याच एका स्थळावर गेलो असता माझा संगण़क व जाल सुरक्षित असल्याचा निर्वाळा मिळाला. (www.dcwg.org/detect ). हे कितपत विश्वासार्ह असू शकते?
मिपावरील संगणक क्षेत्रातल्या माहितगारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
प्रतिक्रिया
8 Jul 2012 - 9:53 am | नितिन थत्ते
खरे तर आपला संगणक सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी अश्या कुठल्या साईटवर क्लिक करणे हेच धोकादायक असू शकते. :(
8 Jul 2012 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्याही मनात असाच विचार आला पण मीही माझं नेट सुरक्षित आहे की नाही आणि नऊ जुलैला नेट बंद होऊ शकतं अशा भीतीमुळे मटाच्या या बातमीमुळे मटाने दिलेल्या सायटीवर नेट चेक करुन आलो. हिरव्या बॅनरमुळे माझं नेट सुरक्षित आहे, असं बातमीतल्या तपशिलावरुन वाटले.
कोणत्याही जाणकाराशिवाय सायटीवर असा उद्योग करु नये असं मलाही वाटतं. बाकी, जवाबदारी आपापली. या विषयांवर जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
8 Jul 2012 - 10:54 am | मदनबाण
अधिक माहिती इथे मिळेल :--- http://en.wikipedia.org/wiki/DNSChanger
या साईटवर जाऊन तुम्ही लगेच इन्फेक्शन चेक करु शकता :---
http://www.dns-ok.us/
डीएनएस रिपेअर टुल इथे उपलब्ध आहे :--- http://www.avira.com/files/support/FAQ_KB_Download_Files/EN/AviraDNSRepa...
इंटरनेटचा वापर करताना,तुमचे अॅन्टीव्हायरस सॉफ्टवेअर सतत अपडेट करत रहा.
मॅलवेअर /स्पायवेअर /ट्रोजन /रुटकिट (Rootkit) रिमुव्हर सॉफ्टवेअर नेहमी वापरात ठेवावे,व वेळोवेळी या सॉफ्टवेअरनी पीसी स्कॅन करावा.
काही उपयोगी लिंक्स :---
Avira Free Antivirus :--- http://www.avira.com/en/avira-free-antivirus
Malwarebytes Anti-Malware :--- http://download.cnet.com/Malwarebytes-Anti-Malware/3000-8022_4-10804572....
Spybot-S&D :--- http://www.safer-networking.org/en/mirrors/index.html
SuperAntiSpyware Free Edition :---
http://download.cnet.com/SuperAntiSpyware-Free-Edition/3000-8022_4-10523...
8 Jul 2012 - 12:14 pm | सुहास झेले
धन्स रे बाणा.... एकदम सोप्या शब्दात सांगितलेस. माझा आयपी बरोब्बर आहे :) :)
8 Jul 2012 - 9:40 pm | प्रभाकर पेठकर
DNS resolution = GREEN............. हुश्श..!
धन्यवाद श्री. मदनबाण आणि श्री. सर्वसाक्षी.