" width="700" height="1200" alt="left" />
या आजच्या सुधारक च्या मुखपृष्ठावरील मजकूरावर माझी बायको मंजिरीने "आजचा सुधारक नोव्हेंबर २००७" मध्ये लिहिलेले पृष्ठ क्रं ३८३ वरिल पत्र
तिच्या वतीने मी चर्चेच्या प्रस्तावासाठी जसेच्या तसे उधृत करत आहे.
अवांतर - यातील मजकूराचा माझ्याशी अवाक्षर ही संबंध नाही.
प्रतिक्रिया (२)
मंजिरी घाटपांडे डी २०२, कपिल अभिजात, डहाणुकर कॊलनी, कोथरुड पुणे ४११०३८ फोन: ९४२२३०२२८७
ऑक्टोबर ०७ च्या मुखपृष्ठावर ज्या शहाणपणाचा आदिवासी आणि रानटी टोळयांच्या संदर्भात उल्लेख आलेला आहे, ते शहाणपण आजकालची
सामान्या माणसे तर सोडाच, पण मोठमोठया डॉक्टर्सकडेही आहे की नाही, याची शंका घ्यावी, अशी परिस्थिती सभोवार दिसते. नाहीतर
पंच्याहत्तराव्या वर्षी बायपास ऑपरेशन्स आणि ऐंशीव्या वर्षी ऑक्सिजनवर कोम्यात जगणारे दम्याचे पेशंटस् दिसलेच नसते.
त्याच लेखात आपल्याकडच्या `देह ठेवण्याच्या` परंपरेचा उल्लेख आहे. ही परंपरा का व कधी खंडीत झाली असावी यावर आता जाणकारांली प्रकाश
टाकण्याची व चर्चा करण्याची वेळ आली आहे. `इच्छामरण` कायद्यासाठी एक व्यापक वैचारिक अभिसरण सुरू होण्याची वेळ खरे तर टळून चालली
आहे. त्याऐवजी वृध्दत्वशास्त्र आणि वृध्दांच्या मानसिक समस्या यांवरच चर्चासत्रे झडताना दिसतात.
प्रश्न घरातले वडील माणूस निरूपयोगी झाले की त्याच्या उशाशी दिवा लावून ठेवण्याचा नाही - हे आजच्या, निदान मध्यमवयीन पिढीने तरी
लक्षात घेतले पाहिजे. प्रश्न `आपण` निरूपयोगी झाल्यावर काय करायचे, याचा आहे. आणि हे निरूपयोगी होणे हे स्वत:च्याच दृष्टीकोणातून असणार
आहे, हे आणखी महत्वाचे!
निरूपयोगी आणि निरूद्देश या पुन्हा दोन वेगळया गोष्टी आहेत. निरूद्देश होणे हे आणखीच भयानक आहे. लहानपणी माणसाला मोठे व्हायचे असते.
जगातले अनेक अनुभव घ्यायचे असतात, अनेक सुखे भोगायची असतात, तरूणपणी काहीतरी नवनिर्माण करायची जिद्द असते, त्यानंतर थोडा काळ
शांतपणे आयुष्या घालवायची, समाधान उपभोगायची इच्छा असते, तसे म्हातारपणी काय? तेव्हा प्रत्येकाला शांतपणे, वेदना न होता मरायची इच्छा
असते. मात्र या इच्छेच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्याची वैधानिक मुभा नसते. हीच खरी शोकांतिका आहे! त्यामुळेच आध्यात्मिक व्यक्ती, जेवढे भोग
असतील ते भोगल्याशिवाय सुटका नाही या वाटेकडे वळतात आणि काही थोड्या नास्तिक व्यक्ती जगण्याबद्दलची नसलेली / न उरलेली असोशी
दाखवण्याच्या निष्फळ प्रयत्नांना लागतात. वास्तविक माणसाच्या इतर सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जशी आधुनिक विज्ञानाने कंबर कसली आहे, तशी
इच्छामरणाच्या बाबतीतही निकराने प्रयत्न करण्याची जरूरी आहे.
पूर्वी यासाठी 'जन्म` ही काही आपल्या हातातली गोष्ट नाही असा युक्तिवाद असायचा. पण आता कुटुंबनियोजनाच्या काळात जन्म ही निदान आपल्या
माता-पित्यांच्या हातातलीच म्हणजे मानवी इच्छेनुरूपच घडणारी गोष्ट आहे हे तरी सर्वमान्य होण्यास हरकत नसावी. अशा आधुनिक काळात, खरे तर
कुटुंब नियोजनाचीच व्याख्या अधिक व्यापक करून, त्यात 'इच्छामरणाचा` अंतर्भाव केला पाहिजे. प्रचलित आहे ते 'जन्माचे नियोजन` आणि मी मांडते
ते 'मृत्यूचे नियोजन`! पण शेवटी नियोजनच. आणि कोणत्याही प्रगत शहाण्या माणसाने नियोजनास विरोध करण्याचे कारण नाही. नियोजनाविना
प्रगती असाध्य आहे.
हॉस्पिटलात जन्मलेली आमची आजची पिढी मरण्यासाठी हॉस्पिटलातच जाईल याला खरेतर कोणाचाच विराध असता कामा नये. उलट जन्मताना,
जन्म सुकर करण्यासाठी ज्या त-हेने डॉक्टर्स मदतीला तत्पर असतात, त्याच पध्दतीने शेवटही शांत होण्यासाठी मदत करण्याची तत्परता
दाखवण्याची कायदेशीर मुभा त्यांना असलीच पाहिजे.
शेवटी आजचा सुधारक कारांना एकच विनंती आहे की प्रगत महाराष्ट्ाच्या वैचारिक वर्तृळात तरी त्यांनी हा विषय नेटाने लावून धरावा.
प्रतिक्रिया
12 Nov 2007 - 3:18 pm | ध्रुव
वरील विषय खरं सांगायचा तर काही कळलाच नाही. नक्की कोणत्या विषयावर चर्चा हवी आहे हे कळले तर विचारांना तशी दिशा देता येईल.
विषय जर फक्त मलाच कळलेला नाही असे वाटत असेल तर क्षमस्व! परत वाचुन बघेन.
--
ध्रुव
12 Nov 2007 - 5:38 pm | प्रकाश घाटपांडे
<<वरील विषय खरं सांगायचा तर काही कळलाच नाही. नक्की कोणत्या विषयावर चर्चा हवी आहे हे कळले तर विचारांना तशी दिशा देता येईल.
>>
वरिल विषय इच्छामरण या संकल्पनेशी निगडीत आहे. ती आजचा सुधारक आक्टोंबर २००७ च्या मुखपृष्ठावरील मजकूराशी संबंधीत आहे म्हणून ते ही टाकले आहे.
प्रकाश घाटपांडे