गाभा:
टोरेंट नेमके काय असते असा प्रश्न पडलाय.
यु टोरेंट, बिट टोरेंट हे वापरून काही डाऊनलोडही आम्ही केलेले आहे.
पण हा सारा काय खेळ आहे हे लक्षात आलेले नाही.
एखाद्या सर्व्हरवरून डाऊनलोड करणे समजण्यासारखे आहे.
पण टोरेंट काय प्रकार आहे.
हे P2P काय असते.
एखादा पिक्चर डाऊनलोड करीत असताना अपलोडही काही होत असते.
काहीवेळा अपलोड जास्त डाऊनलोड कमी असा प्रकार पहायला मिळतो.
म्हणजे जणू आमचा कंप्युटरच सर्व्हर आहे.
बरं हा टोरेंट प्रकार सुरक्षित आहे का...
की पर्सनल माहिती पाठवतो.
आम्ही टोरेंट वापरतो पण पूर्ण माहिती नाही
कुणी जरा नेमकी माहिती दिली तर बरे होइल
प्रतिक्रिया
2 Jul 2012 - 10:31 pm | गणपा
राजे/(मिपाकर) दशानन यांनी इथे सोप्या मराठीत समजवण्याचा प्रयत्न केलाय.
2 Jul 2012 - 10:41 pm | सुनील
एखादा पिक्चर डाऊनलोड करीत असताना अपलोडही काही होत असते.
हॅ हॅ हॅ
हे म्हणजे एखाद्याचा रक्तगट एकाचवेळी AB (कायमचा घेता) आणि O (कायमचा दाता) असल्यासारखे आहे ;)
बरं हा टोरेंट प्रकार सुरक्षित आहे का
महाजालावर काहीच सुरक्षित नसतं भौ :) अगदी व्यनिसुद्धा सुरक्षित नसतात बर्रका ;)
की पर्सनल माहिती पाठवतो
काय म्हाईत नाय बॉ! तुमचं my Documents मधलं Downloads कडे लक्ष द्या!
आम्ही टोरेंट वापरतो पण पूर्ण माहिती नाही
चालायचच!
टीप - मी टंकेपर्यंत गणपांचा प्रतिसाद पाहिला नव्हता. दुव्याबद्दल धन्यवाद.
2 Jul 2012 - 10:45 pm | नर्मदेतला गोटा
गणपा यांनी दिलेला दुवा फारच माहितीदार आहे
साधं सोपं सुटसुटीत दिलेले आहे
3 Jul 2012 - 2:11 pm | अविनाशकुलकर्णी
गणपा यांनी दिलेला दुवा फारच माहितीदार आहे
साधं सोपं सुटसुटीत दिलेले आहे
अगदी ...मस्त रे गणपा भाऊ
3 Jul 2012 - 2:23 pm | गणपा
अहो अकु धन्यवाद त्या दशाननाला द्या ज्याने हा लेख लिहिलाय.
मी केवळ पोष्टमनचं काम केल. :)
3 Jul 2012 - 5:20 pm | डावखुरा
टोरंट म्हणजे 'फुपिडा'
3 Jul 2012 - 5:33 pm | बॅटमॅन
एक लिंक टोरेंटकी कीमत तुम क्या जानो पैसेवाले बाबू...
स्टुडंट्स का भगवान होता है टोरेंट,
लुख्खोंका अन्नदाता होता है टोरेंट,
पायरेट्स का कंपास होता है टोरेंट,
सिर्फ एक लिंक टोरेंट ;)
3 Jul 2012 - 5:56 pm | श्रीरंग_जोशी
अगर दिल से किसी मूव्ही को डाऊनलोड करना चाहो
तो पूरा इंटरनेट तुम्हे उस से मिलाने में जूट जाता हैं....
और अगर, एक पिक्चर को डाऊनलोड करते करते
डाऊनलोडर या पूरा पि सी ही हॅन्ग हो जाये,
तो पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त!!
3 Jul 2012 - 6:03 pm | बॅटमॅन
माशाल्ला जनाब, इस नाची़ज़ का सलाम कुबूल कीजिये :)
مسلاپاؤ پر ایسا ماجہ بہت ملتا ہیں
:)
3 Jul 2012 - 7:22 pm | श्रीरंग_जोशी
मेरे पास नेटफ्लिक्स हैं, ब्लॉकबस्टर हैं, डिश मूव्ही ऑन डिमांड हैं, क्या हैं तुम्हारे पास? उं क्या हैं तुम्हारे पास?
~~~~ मेरे पास टोरेंट हैं!!
4 Jul 2012 - 9:34 am | घाशीराम कोतवाल १.२
हमारे पास टोरंट है |
वहा सब मुफ्त मै मिलता है|
4 Jul 2012 - 9:40 am | चौकटराजा
टोरेंट म्हणजे नर्मदेतील अनेक गोटे एकत्र जोडून नर्मदेवर पूल बांधायचा ! व तो सवडी सवडीने बांधायचा
आणि समद्यानी मिळून बांधायचा !
4 Jul 2012 - 9:45 am | श्रीरंग_जोशी
चौरा - पहिला दगड तुम्ही टाकलाय म्हंटल्यावर पूल बनायलाच हवा ;-).
9 Jul 2012 - 11:15 am | शिल्पा ब
अमेरीकेत टोरेंट डाउनलोडींग बेकायदेशीर आहे असं गुगलुन समजलं.
http://money.cnn.com/2011/06/10/technology/bittorrent_lawsuits/index.htm
थोडक्यात कॉपीराईट मटेरीयल असेल तर डाउनलोडींग बेकायदेशीर आहे.
माझ्या मते भारतातही हाच कायदा आहे पण...असो.