अंड

गोंधळी's picture
गोंधळी in काथ्याकूट
1 Jul 2012 - 3:42 pm
गाभा: 

मी तसा जन्मतः च शाकाहारी.लहानपनी मला मांसाहारी पदार्थांचा वास ही सहन होत नसे.घरात ज्यावेळी असे पदार्थ बनवले जात त्यावेळी मी वेगळा जेवत असे किंवा आधिच जेवुन घेत असे.
पण कालांतरने व्यायाम शाळेत जावे असे वाटु लागले व ईतर मित्रांबरोबर मी ही जिम जॉईन केली.
पहील्या दिवशी सरांनी माझी शरीरयष्टी पाहुन मला रोजचा खुराक लीहुन दिला.त्याप्रमाणे मला दुधातुन कच्च अंड रोज खावे लागणार होते.बापरे अंड खावे लागणार यामुळे मी थोडा अस्वस्थ होते पण मित्र व घरचे म्हणु लागले की अंड तर शाकाहारी असते.त्यांच्यावर विश्वास ठेवुन मी एकदा देवाचे नाव घेवुन ते कच्च अंड घातलेले दुध नाक डोळे बंद करुन अजिबात उलटी न करता कसे बसे पोटात ढकलले.त्याच दिवशी माझ्या एका दुश्मन मित्राने मला खाली दिलेल्या चित्रांचा मेल पाठवला.
आणि त्यादिवसापासुन जिम ही सूटली व अंड ही सूट्ले ते कायमचेच.

पण मला अजुनही समलेले नाही कि अंड हे शाकाहारी असु शकत का? कारन अजुनही काही माण से ते शाकाहारी असत असेच म्हणतात.

From
From
From
From
From
From
From
From
From
From
From
From

प्रतिक्रिया

हम्म..
मी देखील ऐकले आहे की कोंबडीने दिलेल अंड २४ तासाच्या आत खाल्ल तर ते शाकाहारी असत ,लोक कै च्या कै बोलतात ;)
तुम्हाला नाही आवडत तर नका खाउ , शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे ;)

अवांतर : तुमची फोटोमाला बघुन ,काही जण आजपासुन अंड खावयाचे बंद करतील नक्की ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2012 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंड हे शाकाहारी असु शकत का ?

म्हैती नै. पण, अंड्यात असं काही दिसलं तर माझं अंडं खानं सुटेल यात काही वाद नाही.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

1 Jul 2012 - 4:05 pm | कुंदन

पियुशा चे वरील मत वाचा.
आम्ही पियुशा च्या शब्दा बाहेर नाही.

अंड नाही तर नाही , आपण मस्त चिकन बनवुन खाउयात.
उस्मान , प्रा डॉ के लिए एक प्लेट चिकन लगाव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2012 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पियुशा म्हणते, चोवीस तासाच्या आत अंडं खायचं. आता आपल्याला कसं कळायचं कोंबडीने अंडे देऊन किती तास झालेत ते ? आणि चिकन करुन खायला ’अंडे टू कोंबडी” असा बराच काळ जावा लागेल. तेव्हा, अंडं नको आणि ते चिकनही नको. :)

अंड्याचं चवीचं किंवा अंड्याचं काही तरी कंटेंट टाकुन असा एखादा शाकाहारी पदार्थाचा शोध लागला की अंडंपदार्थ खाऊ तो पर्यंत आता अंडी बंद. :)

-दिलीप बिरुटे
(माळकरी)

नाना चेंगट's picture

1 Jul 2012 - 4:16 pm | नाना चेंगट

चला आता अंड्याचिकनचे भाव कमी होतील जरासे

@ बिरुटे
पियुशा म्हणते, चोवीस तासाच्या आत अंडं खायचं.
मी नाही लोक म्हणतात असे ;)

आता आपल्याला कसं कळायचं कोंबडीने अंडे देऊन किती तास झालेत ते ?
त्यासाठी मग स्वतः कुक्कुट पालन करावे लागेल ;)

आणि चिकन करुन खायला ’अंडे टू कोंबडी” असा बराच काळ जावा लागेल. तेव्हा, अंडं नको आणि ते चिकनही नको
१०० टक्के सहमत ;)

(१०० % शाकाहारी पियु ) :)

नाना चेंगट's picture

1 Jul 2012 - 4:22 pm | नाना चेंगट

>>>@ बिरुटे

हा हंत ! @ प्रा डॉ बिरुटे असं म्हणावं थोर मंडळींना !

कधी समज येणार?
अंडा खाओ अकल बढाओ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2012 - 4:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाना, थोर-बीर असे काही उल्लेख करायचा असल्यास खरडवही-खरडफळ्याचा वापर करावा.
एक प्रतिसाद लिहुन त्याला पंचवीस उप्रप्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये, धन्यवाद. :)

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

2 Jul 2012 - 11:23 am | नाना चेंगट

सल्ल्याबद्दल आभारी आहे. यापुढे लक्षात ठेवेन. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2012 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मी नाही लोक म्हणतात असे
लोक म्हणतात होय. मला वाटलं आपलं कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे की काय ? [हलकेच घ्या]

बाय द वे, खरं सांगतो. मलाही या कुक्कुट पालनाचा व्यवसाय केला पाहिजे असा विचार अनेकदा येऊन गेला आहे. पण, कोंबड्यांना रोग आला की कोंबड्या पटापटा माना टाकतात. मग गुंतवलेलं भांडवलही गेलं. तर यावर एकानं असा तोडगा काढला होता की, विमा काढायचा. मग आपले पैसे डबल वसुल होतात. मग पुढे अशाही सूचना येत गेल्या की कुक्कुट पालन न करता नुसतं खोटेपणा करुन कोंबड्या मेल्या असं खोटं दाखवुन नुसते पैसे कमवायचे. आणि मग लक्षात आलं आपल्याला यातलं काहीच जमणार नाही. असो.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

1 Jul 2012 - 4:35 pm | कुंदन

कुठे कुक्कुट पालनाचा व्यवसाय करताय, प्रा डॉ.
त्यापेक्षा वायनरी टाका एक.

@ डॉ.बिरुटे

हो आम्ही पाळल्या होत्या कोंबडया फार्म-हाउसवर :) पण त्या १०-१५ च असतील .

कोंबड्यांना रोग आला की कोंबड्या पटापटा माना टाकतात
हम्म हे खरय त्याना डॉ. नी दिलेल औषध चमच्याने पाजाव लागत असे तरीदेखील ५-६ मेल्याच :(

दादा कोंडके's picture

1 Jul 2012 - 5:40 pm | दादा कोंडके

अंड हे शाकाहारी असु शकत का?
म्हैती नै. पण, अंड्यात असं काही दिसलं तर माझं अंडं खानं सुटेल यात काही वाद नाही.

ड वर अनुस्वार दिल्यामुळे धन्यवाद हो बिरुटे सर. :)
धाग्याचं नाव ऐकून वृद्धीसंबंधी काही चिकित्सा आहे की काय असं वाटलं होतं.

बाकी, एखाद्या गोष्टीची चव आवडत नाही किंवा *किळस येते म्हणून न खाणं ठिक आहे. पण जीवहत्या हत्या होते म्हणून न खाणं याच्यासारखा दांभिकपणा दुसरा नाही.

*ही सुद्धा वैयक्तीक गोष्ट आहे त्यामुळे चारचौघात 'ईई' वगैरे चित्कार काढून अपमान करवून घेउ नये. आमच्या शाळेत अंड्याला 'यक', 'ईई'... करणारे आणि मटण-चिकनाला खाट-खूट म्हणणारी पोरं रामदासांची उलटी करून तीच परत खाण्याची गोष्ट भक्तीभावाने ऐकत. :)

विजय मुठेकर's picture

1 Jul 2012 - 4:28 pm | विजय मुठेकर

असे वाचले आहे की, अंड्याचे शास्त्रीय विश्लेषण करून ठरवता येते...... त्या अंड्यामध्ये जीव आहे की नाही. म्हणजे त्या अंड्यापासून पिलू यैल का नाही ते .......

ज्या अंड्यापासून जीव तयार होतो ते मांसाहारी अंडे आणि ज्या अंड्यापासून जीव तयार होत नाही ते शाकाहारी अंडे........ असे आहे ते.....

ठरवा खायचे का नाही ते.......

पियुशा's picture

1 Jul 2012 - 4:40 pm | पियुशा

@ नाना
ब्वॉर्र ब्वॉर्र ....भा.पो. ;)

अंडा खाओ अकल बढाओ.
कोणत नक्की ?वैदीक का ? :p

चिगो's picture

1 Jul 2012 - 4:46 pm | चिगो

बाकी ते अर्धवट उबलेलं अंडं हे काही देशांमधे "डेलीकसी” मानतात, असं वाचण्यात आणि टिव्हीवर बघण्यात आलं आहे..बाकी "शाकाहारी अंडे” ही मांसाहार करण्याची इच्छा असलेल्या धर्मभिरुंचा दांभिकपणा आहे, अशी काडी टाकून / सारुन मी आपली रजा घेतो..; -)

(अंडाकरीप्रेमी) चिगो..

मिपावरचा आजवरचा अत्युत्तम धागा.
माननिय गोंधळी साहेबांना विनंती आहे की त्यांनी असेच काही धागे कोंबडी, मासे, बकरे यांच्यावरही उसवावेत. जेणे करुन लोकांना अभक्षणापासुन परावृत्त करता येईल. :)
माताय काय एक एक भाव वाढवुन ठेवलेत हल्ली चिकन मटणाचे.

आमच्या पुण्यात तर उपवासाची कोंबडी देखील मिळते.
फक्त साबुदाणे, वरई, रताळे असे उपवासाचे पदार्थ खायला देउन तीला मोठी केलेली असते.
सदाशिव पेठे मधे बर्‍याच उपहारगॄहांमधे असे उपवासाचे चिकन, मटन आणि मासे मिळतात.

नितिन थत्ते's picture

1 Jul 2012 - 9:41 pm | नितिन थत्ते

अहो, पैजारबुवा,

कोंबडीने काय खाल्लं हे महत्त्वाचं नाही. :)

बटाट्याची साधी भाजी आणि उपासाची भाजी यात काय फरक असतो ?
१. ती तेलात न करता तुपात/डालडामध्ये केलेली असते.
२. तिला मोहरीऐवजी जिर्‍याची फोडणी दिलेली असते.
३. तिच्यात हळद घातलेली नसते.

एवढे केले की कोंबडीसुद्धा उपासाची होईल की. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2012 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा

शाक म्हणजे भाजी,तेंव्हा अंड शाक-आहारात येतच नाही.हां...अता इंजेक्शचं अंड जीव जन्माला घालतच नाही असं असेल तर,तर फक्त एवढच म्हणता येऊ शकतं,की "हे" अंड मांसाहारी नाही. :-)

याच न्यायाने दुध शाकाहारात बसते का ?

मन१'s picture

1 Jul 2012 - 5:28 pm | मन१

शाकाहार म्हणजे शाक + आहार. वनस्पतींपासून मिळणारे अन्न. अंडे नक्की कुठल्या झाडाला लागते म्हणून त्यास शाकाहार म्हणतात हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

अवांतर :- दूध शाकाहारी आहे का असा घिसापिटा सवाल घेउन येउ नये. दूध "प्राणिज" आहे. प्राण्यापासून मिळाले ते ते प्राणिज. जसे खोदून, खनन कर्म करून जे जे मिळाले "खनिज".
इथली एक जुनी चर्चा आठवली. http://www.misalpav.com/node/1740

जेनी...'s picture

1 Jul 2012 - 5:33 pm | जेनी...

...... ;)

:D :D

मन१'s picture

1 Jul 2012 - 5:35 pm | मन१

यूट्यूबवर एक कोरियन रेसिपी पाहिली होती. त्यात अर्धवट अवस्थेत असलेले पिलू(दिलेल्या फोटोतील शेवटून दुसरे किंवा तिसरे) तसेच अचानक अंडे फोडून तव्यावर टाकायचे, थोडे अर्धवट कच्चे भाजायचे आणि मिमस्त मिटक्या मारित खायचे.
अर्धवट बनलेले पिलू-- अर्धवट जिवंत भाजून्,किंवा जमल्यास त्याला जिवंतपणी भाजत असताना त्याच्यावर मीठ्-मिरची व जमल्यास हल्केसे तेल टाकून तापवून तापवून खायचे.
त्या चित्रफितीमधील तरुणी मिटक्या मारित खात होत्या. अशा शौकिनांना ह्या धाग्यातील फोटु बघून भूक जबरदस्त चाळवायची शक्यता आहे. मऊ मऊ, लुसलुसशित, काहिसे लिबलिबित, ताजे ताजे , कवळे कोंबडिचे पिलू...अहाहा....

नगरीनिरंजन's picture

2 Jul 2012 - 10:53 am | नगरीनिरंजन

गरजूंनी/शौकिनांनी बालुत नावाची फिलिपिनो डेलिकसीही नजरेखालून घालावी असे सुचवतो.

मोदक's picture

1 Jul 2012 - 5:40 pm | मोदक

छ्या, वाईट वाटले.. का असा धागा उघडला मी..?? :-(

संदीप सलीलला "सरीवर सर.." म्हणताना ऐकत होतो तोच जोरदार पाऊस आला..
अंडं घातलेले गरमागरम मॅगी खातोय..
Thums up - On the Rocks..

आणि असला धागा... छ्या.

गणपाचा धागा आणखी एकदा उघडावा म्हणतो... :-)

जेनी...'s picture

1 Jul 2012 - 5:45 pm | जेनी...

ह्यावर त्यांच मत ऐकायचय .
ते अंड खात असतिल तर(च) :)

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म,
फोटु दाखवून दिशाभूल केलेली आहे असे वाटते. अंड शाकाहारी असते की नसते हा वाद वेगळा पण आपण जी अंडी खातो त्यात जीव नसतो
म्हणजे दुकानात मिळणार्‍या अंड्यातून कधीही पिल्लु जन्माला येऊ शकत नाही. हे मला माहिती होतेच तरी विकीवरुन खात्री करुन घेतली. अजुनही माहिती शोधली तर नक्कीच मिळेल.

लिंक
Most commercially farmed chicken eggs intended for human consumption are unfertilized, since the laying hens are kept without roosters. Fertile eggs can be eaten, with little nutritional difference to the unfertilized. Fertile eggs will not contain a developed embryo, as refrigeration temperatures inhibit cellular growth for an extended time. Sometimes an embryo is allowed to develop but eaten before hatching as with

बहुगुणी's picture

1 Jul 2012 - 7:08 pm | बहुगुणी

"जीवनमान, विज्ञान, शिक्षण, विचार" या वर्गीकरणात लेख लिहिला आहे म्हणजे चेष्टेचा धागा नसून प्रामाणिक शंका आहे हे गृहीत धरून, आणि खाउ इच्छिता त्या अंड्यात जीव आहे की नाही हे जाणून घ्यायची इच्छा आहे अशा समजूतीने, उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आहे:

सुरूवातीला, स-जीव (fertilized) अंडे म्हणजे काय ते पाहुयातः कोंबडी ठराविक नैसर्गिक कालावधीनंतर अंडे तयार करीत व घालीत रहाते, आसपास कोंबडा असो वा नसो. कोंबडीच्या गर्भनलिकेतून (oviduct) खाली येणार्‍या अंड्याशी त्याचं कवच तयार होण्याच्या आत कोंबड्याच्या शुक्रजंतूंचा संगम झाला तर अंड्यात जीवनिर्मिती होते. असा संगम झालाच नाही, तर अर्थातच अंडे निर्जीव असते. (जर कोंबडा-कोंबडीचा संकर झाला तर त्या दिवसानंतर साधारण सात दिवसांपर्यंत घातली जाणारी अंडी ही सजीव असण्याची दाट शक्यता असते.) व्यावसायिक कुक्कुटपालन आणि अंडी पुरवठा केंद्रांमध्ये कोंबडा आसपास ठेवत नाहीत, त्यामुळे तयार होणारी अंडी ही निर्जीवच असतात. इथे आणखीही एक गोष्ट महत्वाची आहे: अंड्यात जरी जीवनिर्मिती झाली तरी त्या जीवाच्या वाढीसाठी ठराविक तपमानाची आवश्यकता असते (३७ डि. सें.), असे अंडे जर लगेचच शीतपेटीत (फ्रिजमध्ये) ठेवले तर ही प्रक्रिया मंदावून थांबते, म्हणून दुकानांमध्ये अंडी शक्यतो नेहेमी फ्रिजमध्ये ठेवतात. (बाहेर ठेवलेल्या अंड्यांचं 'वय' कसं ओळखायचं ते खाली दिलंय.)

आता स-जीव अंडी निर्जीव अंड्यांपासून कशी ओळखायची ते पाहू: Candling या साध्या प्रक्रियेने ही ओळखता येतात. एका लाकडी खोक्यातील झाकणावरील भोकावर निमुळते टोक खाली असे अंडे ठेवून अंड्याखाली तीव्र पांढरा प्रकाश धरला तर अंड्यातून बाहेर येणारा transmitted प्रकाश पाहून हे ठरवता येतं; निर्जीव अंडयापेक्षा सजीव अंडे थोडेसे अ-पारदर्शक दिसते, आणि त्याच्या वरील भागात एक पांढरे वर्तुळ दिसून त्यात बारीक रेषांसारख्या रक्तवाहिन्या दिसू शकतात (मूळ लेखातील चित्र १). [अंड्याच्या दोन्ही बाजूंना असणारे पांढरे बारीक दोरखंडांसारखे धागे म्हणजे 'जीव' नव्हे, ते धागे (chalazae) हे अंड्यातील बलकाचे नाजूक योक सॅक (yolk sac) हलून आदळून फुटू नये म्हणून 'शॉक अ‍ॅबसॉर्बिंग' योजना असते.] जर अंड्यात जीवनिर्मिती झाली तर त्या गर्भाच्या वाढीतील श्वसनप्रक्रियेने अंड्याच्या वरील भागातील air pocket मध्ये उच्छ्वसित वायूमुळे या pocket चा आकार वाढतो, आणि हा भाग आधिक अपारदर्शक दिसू लागतो.

आता निर्जीवच, पण अंडे ताजे किंवा शिळे कसे ओळखावे ते खालील व्हिडिओतील सोप्या प्रयोगावरून कळेल. पाण्यात ताजे अंडे तळाला बुडते, तर शिळे अंडे तरंगते. (हीच परीक्षापद्दती इ. कोलाय, साल्मोनेला वगैरे बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी वापरतात.)

तेंव्हा निर्जीवच अंडे खायचे असेल घरच्या घरी candling करून खात्री करून घेऊ शकता.

[तुम्हाला दुकानात मिळतात ती अंडी, 'कोंबडे आसपास नसलेल्या' कोंबड्याच देतात का हे पाहण्याचा साधा मार्ग नाही ;-) ...आता पुरुषांमुळेच 'प्रॉब्लेम' होतो असंही काही जण म्हणतील, पण तो विषय वेगळ्या धाग्याचा ;-) ]

स्पंदना's picture

2 Jul 2012 - 9:25 am | स्पंदना

हेच सांगणार होते, पोल्ट्रीच्या अंड्यात जीव नसतो, अन गाय कशी रोज दुध देते, तसच कोंबडीच पण रोज अंड घालाय्च काम असत, आता त्यात जर एखाद्या कोंबड्याने ढव़ळा ढवळ केली तर ते अंड मांसाहारी होत, नाही तर बिचारी कोंबडी तस शाकाहारीच अंड घालत असते.

sagarpdy's picture

2 Jul 2012 - 11:12 am | sagarpdy

उपयुक्त माहीती !

रमताराम's picture

2 Jul 2012 - 12:48 pm | रमताराम

बहुगुणी, तुम्ही धाग्याची भ्रूणहत्याच केली की राव. छ्या: अहो शाकाहार/मांसाहार विषयावरचे धागे शतक गाठतात कारण तसा 'भगवानचा विश आहे'. तुम्ही उगाच त्याच्या इच्छेमधे ढवळाढवळ केलीत, आता भोगा आपल्या कर्माची फळं. तुमचा पुढचा धागा प्रतिसादाविना जातो की नाही पहा.

चालू द्यायचं हो. 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' च्या घोषणेसारखं सारं जग शाकाहारी करण्याचं व्रत घेऊन (हलकट मांसाहारी लोक त्याला 'आपण मांसाहार्‍यांपेक्षा कित्ती नैतिक वैग्रे दाखवायाला' असं म्हणतील, पण आपण लक्ष देऊ नये) सार्‍या जगाला पापापासून परावृत्त करायला शाकाहारी लोक धावून येतायत, काही चांगला मार्ग दाखवत आहेत तर तुम्ही का खोडा घालताय हो.

(मिश्राहारी) रमताराम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2012 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपयुक्त माहिती

-दिलीप बिरुटे

बहुगुणीजी यांचे धन्यवाद.
खरच उपयुक्त माहिती दिली आहे. पण मला वाटत नाहि कि मी परत कधी अंड खाउ शकेन.

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2012 - 7:39 pm | प्रभाकर पेठकर

बहुगुणी प्रतिसाद.

अत्यंत रोचक आणि उद्बोधक माहिती. धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

1 Jul 2012 - 9:37 pm | नितिन थत्ते

आम्ही अंडं नुसतं कधी खात नाही. त्यात कांदा, मिरची, कोथिंबिर, टोमॅटो असे शाकाहारी पदार्ध घालूनच खातो. :)

आनंदी गोपाळ's picture

2 Jul 2012 - 2:01 am | आनंदी गोपाळ

बापरे!
हे सगळे फोटो काढण्यासाठी त्या माणसाने(!) किती वेळा कोंबडीची भ्रूणहत्या केली आहे??
सोनोग्राफी कुठे केली होती हो???

मांसाहार नसता तर २० रुपये ची मेथीजुडी १००रुपयेला मिळाली असती
एकदा चीन् ला दुष्काळ पडला असता तिथल्या लोकांनी जगन्यासाठी साप, कुत्रे, किडे, पक्षी खाण्यास सुरुवात केली.
जेव्हा वेळ जीवनमरणाचा प्रश्न येतो तेव्हा शकाहार मांसाहार हा फरक संपतो.
कोकणात दुष्काळ पडला असता देवाने मासे खान्यास एका समुदायास परवानगी दिलेली आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

2 Jul 2012 - 12:17 pm | अविनाशकुलकर्णी

ज्याना चेहेरे असतात तो मांसाहार..
ह्याम..बिफ.चिकन..ह्या मांसाहारास चेहेरे असतात.
पण अंड्यास चेहेरा नसतो.
या कारणास्तव अंन्डे शाकाहारी समजले जाते.

तिमा's picture

2 Jul 2012 - 2:54 pm | तिमा

वेगवेगळ्या विभागात खाणे व पिणे यावरचे धागे चालू आहेत. तरी आता 'पाककृती' मधे कुणी अंडे वापरुन जिलब्या कशा पाडाव्या याचे मार्गदर्शन करावे.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Jul 2012 - 10:24 pm | अविनाशकुलकर्णी

अण्डे का सच और रहस्य जिसे पढ़ कर सारा भारत देश अंडा खाना छोड देगा !

आजकल मुझे य...ह
देख कर अत्यंत खेद और आश्चर्य होता है की अंडा शाकाहार का पर्याय बन चुका
है ,...खैर मै ज्यादा भूमिका और प्रकथन में न जाता हुआ सीधे तथ्य पर आ रहा
हूँ

मादा स्तनपाईयों (बन्दर बिल्ली गाय मनुष्य) में एक निश्चित
समय के बाद अंडोत्सर्जन एक चक्र के रूप में होता है उदारहरणतः मनुष्यों में
यह महीने में एक बार,.. चार दिन तक होता है जिसे माहवारी या मासिक धर्म
कहते है ..उन दिनों में स्त्रियों को पूजा पाठ चूल्हा रसोईघर आदि से दूर
रखा जाता है ..यहाँ तक की स्नान से पहले किसी को छूना भी वर्जित है कई
परिवारों में ...शास्त्रों में भी इन नियमों का वर्णन है

इसका
वैज्ञानिक विश्लेषण करना चाहूँगा ..मासिक स्राव के दौरान स्त्रियों में
मादा हार्मोन (estrogen) की अत्यधिक मात्रा उत्सर्जित होती है और सारे
शारीर से यह निकलता रहता है ..

इसकी पुष्टि के लिए एक छोटा सा
प्रयोग करिये ..एक गमले में फूल या कोई भी पौधा है तो उस पर रजस्वला स्त्री
से दो चार दिन तक पानी से सिंचाई कराइये ..वह पौधा सूख जाएगा ,

अब आते है मुर्गी के अण्डे की ओर

१) पक्षियों (मुर्गियों) में भी अंडोत्सर्जन एक चक्र के रूप में होता है
अंतर केवल इतना है की वह तरल रूप में ना हो कर ठोस (अण्डे) के रूप में बाहर
आता है ,

२) सीधे तौर पर कहा जाए तो अंडा मुर्गी की माहवारी या मासिक धर्म है और मादा हार्मोन (estrogen) से भरपूर है और बहुत ही हानिकारक है

३) ज्यादा पैसे कमाने के लिए आधुनिक तकनीक का प्रयोग कर आजकल मुर्गियों को
भारत में निषेधित ड्रग ओक्सिटोसिन(oxytocin) का इंजेक्शन लगाया जाता है
जिससे के मुर्गियाँ लगातार अनिषेचित (unfertilized) अण्डे देती है

४) इन भ्रूणों (अन्डो) को खाने से पुरुषों में (estrogen) हार्मोन के
बढ़ने के कारण कई रोग उत्पन्न हो रहे है जैसे के वीर्य में शुक्राणुओ की
कमी (oligozoospermia, azoospermia) , नपुंसकता और स्तनों का उगना
(gynacomastia), हार्मोन असंतुलन के कारण डिप्रेशन आदि ...

वहीँ स्त्रियों में अनियमित मासिक, बन्ध्यत्व , (PCO poly cystic oveary) गर्भाशय कैंसर आदि रोग हो रहे है

५) अन्डो में पोषक पदार्थो के लाभ से ज्यादा इन रोगों से हांनी का पलड़ा ही भारी है .

६) अन्डो के अंदर का पीला भाग लगभग ७० % कोलेस्ट्रोल है जो की ह्रदय रोग (heart attack) का मुख्य कारण है

7) पक्षियों की माहवारी (अन्डो) को खाना धर्म और शास्त्रों के विरुद्ध , अप्राकृतिक , और अपवित्र और चंडाल कर्म है

8) अन्डो में से चूजा ( मुर्गी-मुर्गा ) बहार आता है ,एक निश्चित समय पर
और चूजो में रक्त-मांस-हड्डी-मज्जा-वीर्य-रस आदि होता है,चाहे उसे कही से भी काँटों,

अन्डो में से घ्रणित द्रव्य निकलता है,जब उसे तोड़ते हो,दोनों परिस्तिथियों
में वह रक्त ( जीवन ) का प्रतिक है- मतलब अंडा खाना मासांहार ही है..
इसकी जगह पर आप दूध पीजिए जो के पोषक , पवित्र और शास्त्र सम्मत भी है

साभार :- We Are Jain ( एक फेसबुक चे पेज )