एकादशी दुप्पट खाशी ---
साहित्य :-
उकडलेले बटाटे ३ ते ४,
चार - पाच हिरव्या मिरच्या ,
थोडे लाल तिखट,
एक छोटा आल्याचा तुकडा,
वरई पिठ एक वाटी,
शाबूदाणा पिठ पाव वाटी,
बेकिंग सोडा,
चवीनुसार मीठ,
तळणीसाठी रीफ़ाईंड तेल किंवा तूप.
कृती:-
प्रथम उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यावेत. हिरवी मिरची, आलं
मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. तेलावर हे वाटलेलं आलं, मिरची थोडसं
परतून घ्यावं. मॅश केलेला बटाटा घालावा व लगेचच
आच बंद करावी. नंतर हे सर्व एकत्र करुन या मिश्रणाचा छान गोळा करून घ्यावा
मग वरई पिठ व शाबूदाणा पिठ व
लाल
तिखट, सोडा,व मीठ हे सर्व एकत्र करावं. थोडं थोडं पाणी घालत
गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे थोडं दाटसर पीठ बनवून घ्यावं. बटाट्याच्या
मिश्रणाचे लहान मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल
तापवून घ्यावं. आच माध्यमच ठेवावी. बटाट्याचा एक गोळा पिठाच्या मिश्रणात
घोळवून तेलात सोडवा व छान खुसखुशीत वडे तळून घ्यावेत. नारळाच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावेत
प्रतिक्रिया
30 Jun 2012 - 9:21 am | चिंतामणी
पण फटु कुठे आहेत???????
30 Jun 2012 - 9:42 am | अत्रुप्त आत्मा
@एकादशी दुप्पट खाशी- हा ढिसक्लेमर समजावा काय? ;-)
आणी पा.कृँ फोटु कुठ्ठायत?
30 Jun 2012 - 11:23 am | पिंगू
आता कधीतरी का होईना, फलटण दौरा करावा म्हणतो.. ;)
30 Jun 2012 - 2:45 pm | प्रभाकर पेठकर
फोडणीत जीरं घालावं. सारणात बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, साखर, दाण्याचा कूट घालावा.
उपासाला (आमच्यात) लाल तिखट चालत नाही. ज्यांच्याकडे चालत असेल त्यांनी सारणात घालण्यापेक्षा आवरणात घालावं.
वरई आणि साबुदाण्याच्या पिठाचा पाव बनविता येतो का प्रयत्न करून पाहिला पाहिजे. उपासाचा वडापाव 'उपासकरी' जनतेला नक्कीच आवडेल.
30 Jun 2012 - 3:53 pm | पिंगू
>> वरई आणि साबुदाण्याच्या पिठाचा पाव बनविता येतो का प्रयत्न करून पाहिला पाहिजे.
काका तुमचा प्रयत्न इथे झळकला पाहिजे..
30 Jun 2012 - 4:07 pm | गोंधळी
फोटो शिवाय मजा नाय
30 Jun 2012 - 6:26 pm | निवेदिता-ताई
पण फोटो काढेपर्यंत वडे शिल्लकच राहिलेच नाहीत
30 Jun 2012 - 6:31 pm | जेनी...
:D
1 Jul 2012 - 1:58 pm | अविनाशकुलकर्णी
आता कधीतरी का होईना, फलटण दौरा करावा म्हणतो.
....................
ठरल होत ..पण शेवटी घाटगे फार्म ...
1 Jul 2012 - 6:55 pm | चिंतामणी
संधी साधलीत तर तुम्ही. ;)
1 Jul 2012 - 1:59 pm | अविनाशकुलकर्णी
आता कधीतरी का होईना, फलटण दौरा करावा म्हणतो.
....................
ठरल होत ..पण शेवटी घाटगे फार्म ...
16 Aug 2012 - 4:31 pm | सोनल मचकर
16 Aug 2012 - 5:27 pm | मदनबाण
बाय डिफॉल्ट ताई फोटो टाका की जरा !
17 Aug 2012 - 1:49 pm | सस्नेह
वर्णनावरून तर खूप टेस्टी होईल असे वाटते. उपास नसला तरी केली जाईल !
बाकी , फोटो असते तर अजून मजा आली असती, ताई.