आत्मा....

ऐका दाजीबा's picture
ऐका दाजीबा in काथ्याकूट
9 Aug 2008 - 12:12 am
गाभा: 

काही शास्त्रज्ञ छातीठोकपणे सांगतात की आत्मा नावाचा प्रकार नक्कीच अस्तित्वात आहे. असंही ऐकण्यात आहे की काही शास्त्रज्ञांनी एकदा या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलं. एक अतिवृद्ध माणूस जो की काही मिनिटांनी मरणार हे निश्चित आहे, त्याला एका काचेच्या खोलीत बंद केले. मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. काही मिनिटांनंतर जेव्हा तो वृद्ध मेला, तेव्हा काचेला तडा गेला. आणि आत्मा त्यातून निघून गेला.

माणूस जेव्हा मरतो तेव्हा असं म्हटलं जातं की तो आपल्याला सोडून गेला. जर तो देह म्हणजेच तो माणूस असेल तर तो कोठे गेला? देह तर तिथेच आहे. मग सोडून कोण गेला? हाच तो आत्मा! तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 12:19 am | विसोबा खेचर

अत्यंत गहन विषय! आपल्याला तर बा या विषयातली काहीही माहिती नाही! इतरांची मते वाचायला आवडतील! :)

तात्या.

--
वासूअण्णा (भांगेच्या नशेत) : "काकाजी, मला आत्मा सापडला! वाटून वाटून केली त्याची बारीक गोळी आणि बं भोले!" :)
(नाटक : तुझे आहे तुजपाशी -पु ल देशपांडे)

प्राजु's picture

9 Aug 2008 - 12:21 am | प्राजु

आणि थोडासा भितीदायक सुद्धा! ;)
तुझे मत काय आहे हे ऐकायला आधी आवडेल... मग माझे मत मांडेन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

9 Aug 2008 - 12:25 am | पिवळा डांबिस

वासूअण्णा (भांगेच्या नशेत) : "काकाजी, मला आत्मा सापडला! वाटून वाटून केली त्याची बारीक गोळी आणि बं भोले!"

तात्याजी, आत्मा अमर है!!! आणि मिठाईलाही आत्मा आहे!!!.......
आता जरा तेव्हढी "गोळी" शेअर करा बघू!!!!!
:)

प्रियाली's picture

9 Aug 2008 - 12:31 am | प्रियाली

एक अतिवृद्ध माणूस जो की काही मिनिटांनी मरणार हे निश्चित आहे, त्याला एका काचेच्या खोलीत बंद केले. मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. काही मिनिटांनंतर जेव्हा तो वृद्ध मेला, तेव्हा काचेला तडा गेला. आणि आत्मा त्यातून निघून गेला.

वृद्ध माणूस बाई होती का पुरूष होता? (म्हणजे, माझ्या सामान्य ज्ञानातून मला असं वाटतं की बाईही माणूस असते म्हणून विचारते.)

मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली.

अहो, आत कशाला जायला हवं? मुंगीला आतून बाहेर येता येतंय का ते पहायला हवं होतं.

असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -

आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार

ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा

प्राजु's picture

9 Aug 2008 - 12:35 am | प्राजु

अहो, आत कशाला जायला हवं? मुंगीला बाहेर येता येतंय का ते पहायला हवं होतं.

हाहाहाहाहा........... ढिश्क्यांव!!!!

असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -

आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार

ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा

=)) =)) =))

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2008 - 6:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो, आत कशाला जायला हवं? मुंगीला बाहेर येता येतंय का ते पहायला हवं होतं.
हाहाहाहाहा........... ढिश्क्यांव!!!!

तुमच्या दोघींच्या प्रतिक्रिया वाचूनच मी हसून बेजार झाले! =))

असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -
=))
आमच्याकडे (एन.सी.आर.ए.) मधे जेव्हा पी.एचडी. साठी निवडीसाठी मुलाखती असतात ना, त्यादिवशी सगळ्या (पी.एचडी. करणाय्रा) पोरांना पहाच! सगळे एकदम आंघोळ, दाढी करून, स्वच्छ कपडे घालून, डिओ मारून येतात हापिसात, नवाच्या ठोक्याला! आणि मुलाखती झाल्या की घेणाय्रांना स्टॅटिस्टिक्स विचारतात, "किती मुली होत्या, किती निवडल्या, किती येणारेत इथे!"

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Aug 2008 - 6:15 pm | बिपिन कार्यकर्ते

उच्च विषय... आणि उच्चतम प्रतिसाद... पोट दुखलं हसून हसून

बिपिन.

II राजे II's picture

9 Aug 2008 - 6:28 pm | II राजे II (not verified)

>>पोट दुखलं हसून हसून

जास्त हसू नगं !
बाय चा आत्मा मागं लागलं !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

ऋषिकेश's picture

9 Aug 2008 - 7:49 pm | ऋषिकेश

आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार

ठ्ठोऽऽ ठ्ठोऽऽ ठ्ठोऽऽ

=)) =)) =)) 8}

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -

आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार

ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा

:)) :)) :))

हो आणि यमराज म्हणाले असतील

गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?

चतुरंग

छोटा डॉन's picture

11 Aug 2008 - 7:15 am | छोटा डॉन

विषय दमदार आहे, म्हटले मस्त वाद झडतील, काही तरी नविन ऐकायला मिळेल ...
ह्यासाठी प्रतिसाद टईप करावा म्हणुन कळाफलकाची धुळ झटकली, पण हाय रे कर्मा ...
प्रियालीताईने असा छप्परफाड प्रतिसाद दिला आहे की हसुन हसुन मेलो ...
छ्या बॉ, आता आमचा सिरीअसपणाचा मुड गेला बॉ !!!

वृद्ध माणूस बाई होती का पुरूष होता?

अत्यंत योग्य आणि समर्पक प्रश्न, हा महत्वाचा मुद्दा कसा काय विचारात घेतला नाही ?
समजा आतला माणुस हा पुरुष असेल तर त्या पॅकबंद काचेच्या बाहेर त्याच्या बायकोला बसवा, मग कशाला आत्मा येतोय बाहेर ? तो म्हणेल " मरु दे तिच्यायला , आतच सुखी आहे. बाहेर जाऊन कशाला पुन्हा आत्म्याचे भजे करुन घ्यायचे" ...
थोडक्यात : व्यवस्थीत कंडीशन्स डिफाईन केल्या असत्या तर अंतिम परिणाम बदलला असता ...

आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा

ठ्ठोऽऽऽ ठ्ठोऽऽऽऽ ठ्ठोऽऽऽऽ
=)) =)) =)) =))
मेलो बॉ हसुन हसुन ...
आत्मा अजुन इथेच आहे ह्याची नोंद जरुर घ्यावी ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बबलु's picture

9 Aug 2008 - 11:28 am | बबलु

माझ्याकडे दोन आत्मे आहेत. कुणाला पाहिजे असेल तर सांगा. नाहीतरी पडूनच आहे.

...बबलु-अमेरिकन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2008 - 6:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण ते अमेरिकन आहेत का भारतीय?
आणि महत्त्वाचं, बायकांचे आहेत का पुरूषांचे? ;-)

लबाड मुलगा's picture

9 Aug 2008 - 6:15 pm | लबाड मुलगा

भावु थोडी नवटाक घे पानी न मारता
नंतर साला नमक घे फसकन सोढयात टाकुन
भाजलेले चिचोके घे चकना्ला
अन होवुन जावु दे धिंकचाक

हे आत्मा वघेरे जावु दे आत मा वरडून रायलीय जेवायला चल म्हनुन
घे हादडुन अन जाय निपचीत पडुन

अर हे आत्मा आपल्याला परवडणार परकरण नाय त्याला लय इस्टेटी फुकाव्या लागतात
ऽशान्या मानसासारख राव्ह कि जरा

ते माय म्हंती तस यंदा लगीन करुन टाक म्हंजी सकालच्या पाराला टळ टळ जागणार नायस अन हे आत्मा फित्मा परत बरळणार नायस

शाना नं बाळ

जा रडु नकको उगी उगी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2008 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काचेच्या तडकण्याचे उदाहरण अनेकदा ऐकले आहे, पण त्याचा अर्थ अजूनही समजला नाही. आत्मा म्हणजे काय ? आत्म्याचे अनेक विवेचन वेगवेगळे आपण ऐकत असतो. आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य. आत्मा ज्याच्या ठिकाणी हालचाल नाही, हालचाल नाही म्हणजे सर्व चराचर सृष्टीत तो भरुन राहिलेला असल्यामुळे त्याला हालचाल करण्यास जागाच नाही, करण्याची गरज नाही. आत्म्याच्या बाबतीत भारतीय तत्वज्ञान जड आणि चेतन असे स्वरुप मानते. सर्वसामान्य माणसे आत्मा या शब्दाकडे शक्ती ह्या अर्थाने पाहते. आत्मतत्व आणि ईश्वर हे आम्हाला तरी सारखेच वाटतात. सर्वप्राणिमात्रात आत्मतत्व पाहणे म्हणजे ईश्वराचे रुप पाहणे, त्यामुळे एखाद्या देहातून आत्मा जाणे म्हणजे शक्ती बाहेर निघून जाणे असे वाटत नाही. त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. त्यामुळे आत्म्याचे निघून जातांना एक प्रचंड शक्ती बाहेर जात आहे, आणि ती जात असतांना प्रवासातील अडथळे लिलया पार करते. म्हणुन काच सुद्धा तडकते हे काही पटत नाही. ह्या आपल्या मानवाच्या झेपणा-या कल्पना वाटतात. काचेतून आरपार सहजपणे आत्मा निघून जावू शकतो त्या चैतन्याचा,शक्तीचा विचार केला तर.... म्हणजे काचेचे तडकणे हे काही पटणारे नाही.

अवांतर : 'आत्मा' जाणे म्हणजे दिव्याची ज्योत आकाशात जाते हे चित्र डोळ्यासमोर सतत येते, त्यामुळे आत्मा सतत प्रवास करतो असे आम्हालाही वाटत असते. बाकी आत्मे भटकत असतात तोही त्याचाच भाग असावा. ;)

-दिलीप बिरुटे
(ह.भ.प.)

चतुरंग's picture

10 Aug 2008 - 5:23 pm | चतुरंग

-दिलीप बिरुटे
(ह.भ.प.)

ह्यातले (ह.भ.प.) म्हणजे "ळूच टकून रतणारा" असं आहे का? :B (ह. घ्या.)

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

का हळूच भजी पळवणारा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2008 - 6:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'हळूच भटकून परतणारा' आणि 'हळूच भजी पळवणारा '

हभपची थट्टा, विठोमाऊली बघताय ना काय थट्टा होत आहे गरिबाची :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 6:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हवेतून भगवंताला परत बोलावणारा चालेल का हो सर?
ते जरा कमी ब्लास्फेमस वाटतंय! :-)

अवलिया's picture

10 Aug 2008 - 7:35 pm | अवलिया

हरबरे भरड्ण्यात पटाइत

नाना

अवलिया's picture

10 Aug 2008 - 7:36 pm | अवलिया

किंवा

हळुच भलतीकडे पहाणारा

नाना

छोटा डॉन's picture

11 Aug 2008 - 7:17 am | छोटा डॉन

" हळुच भलतीकडे पहाणारा"
हे भारी ...

हभप - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2008 - 10:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हळुच भलतीकडे पहाणारा
=)) हे तर लय भारी हाय!

देवदत्त's picture

10 Aug 2008 - 3:52 pm | देवदत्त

काच तडकण्याबद्दल मी ही ऐकले आहे.
मलाही माहिती वाचण्यास आवडेल.

पण कोणी दोन जणं आहेत 'विक्रम सिंग' आणि 'अवधेश' म्हणून. आताच ईंडिया टिव्ही वर दाखवल्याप्रमाणे हे दोघे दावा करत आहेत की ते मेल्यानंतर पुन्हा जिवंत झालेत. त्यांना विचारू शकतो आपण :)

जनोबा रेगे's picture

11 Aug 2008 - 10:52 am | जनोबा रेगे

आम्हा॑ला वाटल॑ साल॑ आमच्या आत्मू माईणकराबद्दल आहे की काय..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2008 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
जनोबा, पुन्हा एकदा ढिश्क्यॅव!