तातडीने मदत हवी आहे

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
29 Jun 2012 - 9:45 am
गाभा: 

मला टाटाडोकोमोच्या सेवेतील त्रुटीची तक्रार करायची आहे.

माझा प्रीपेड मोबाइल क्रमांक मी १४ मे २०१२ ला आयडिया मधून टाटाडोकोमो मध्ये MNP द्वारे वाहून नेला. त्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता करूनही मी उत्तर भारतात गेलेलो असताना माझी सेवा २२ जून २०१२ ला अपूर्ण कागदपत्रांचे कारण देऊन बंद करण्यात आली. यासंदर्भात मी listen@tatadocomo.com आणि appellate.ap@tatadocomo.com यांना याआधी मेल लिहिले पण काही उपयोग झाला नाही. मोबाइल कंपन्यांच्या वाईट सेवांबद्धल यापूर्वी झालेली चर्चा वाचल्याचे स्मरते पण नेमका दुवा मिळत नाहीय.

मला खालील बाबींवर तातडीने मदत/ माहिती हवी आहे.

  1. संबंधित कंपनीने समस्या सोडवली नाही तर पुढे कोणाकडे तक्रार करावी?
  2. ट्राय (TRAI) किंवा इतर सरकारी संस्था कितपत सक्षम आहेत?
  3. ग्राहक न्यायालयात जावे का?
  4. संबंधित दुवे आणि विरोपाचे पत्ते
  5. इतर उपयुक्त माहिती

आंध्रप्रदेश टाटाडोकोमोमध्ये कुणी सेवेत असल्यास मदत होईल का?

-वामन देशमुख, हैदराबाद

प्रतिक्रिया

अमृत's picture

29 Jun 2012 - 10:22 am | अमृत

प्रत्येक मोबाइल कंपनीत त्या त्या राज्यासाठी एक नोडल ऑफीसर नेमलेला असतो. मी स्वतः idea व airtel च्या नोडल ऑफीसरशी संपर्क साधलेला आहे व माझ्या समस्येचे निराकरण सुद्धा केले गेले. खालील दुव्यावर आंध्राच्या डॉकोमो नोडल ऑफीसरची माहिती मिळेल.

http://www.tatadocomo.com/downloads/Nodal-team.pdf

अमृत

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 10:51 am | मराठमोळा

ही माहिती नविन आणि उपयुक्त आहे. :)
धन्यवाद.

ऋषिकेश's picture

29 Jun 2012 - 11:36 am | ऋषिकेश

+१. मलाही ही माहिती नव्हती.
आभार!

विटेकर's picture

29 Jun 2012 - 2:42 pm | विटेकर

लेखाचे शीर्षक अत्यंत चुकीचे आहे..
फोन बंद पडला यात कसली आली आहे तातडी? मला वाटले , कोणाला रक्त वगैरे हवे आहे की काय ?
असली दिशाभूल करणारी शीर्षके देऊ नयेत ...
नुसती "मदत हवी आहे "असे म्हटले असते तरी चालले असते ना ?

अमोल केळकर's picture

30 Jun 2012 - 2:06 pm | अमोल केळकर

सहमत ...
( मी ही घाबरतच हा धागा उघडला :( )

Pearl's picture

1 Jul 2012 - 3:38 am | Pearl

+१

लेखाचे शीर्षक अत्यंत चुकीचे आहे..
असली दिशाभूल करणारी शीर्षके देऊ नयेत ...

वामन देशमुख's picture

30 Jun 2012 - 1:02 pm | वामन देशमुख

अमृत आणि इतरांचे आभार.
माझ्या फोनची सेवा आठ दिवसांनंतर आज सुरु झाली आहे. appellate.ap@tatadocomo.com येथील अधिकाऱ्यांनी मला मदत केली.
संपादकांनी हा धागा उडविल्यास माझी हरकत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

1 Jul 2012 - 1:50 am | प्रभाकर पेठकर

माझे काम झाले आहे. श्री. विटेकरांच्या प्रतिक्रियेवर भाष्य कशाला करायचे? त्यामुळेच, संपादकांनी हा धागा उडविल्यास हरकत नाही.