अमावस्या व --

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
28 Jun 2012 - 1:30 am
गाभा: 

नमस्कार,
माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे
काही दिवसापुर्वी आमच्या मुंबईजवळ असण्यार्या नातेवाईकांकडे दोन चार दिवस राहाण्याचा योग आला
त्यांच्या मुलाचे वय साधारण बारा चौदा वर्ष असावे ,प्रक्रुती चांगली पण जेवल्यावर काही दिवशी याला ओकारी यायची का काढायचा माहित नाही,मी त्याच्या आईना विचारल्यावर त्या म्हणाल्या की - फक्त अमावस्या पोर्णींमेला असे करतो ,ईतर दिवशी अगदी नार्मल असतो आम्ही डा.कडे दाखवले पण फरक नाही
मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी ठराविक दिवशी का होतात ? त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

28 Jun 2012 - 7:11 am | अर्धवटराव

अमावस्या पौर्णीमेला तो आपला रेग्युलर ब्रॅण्ड सोडुन दुसरं काहि घेत असेल... त्याचाच हा "अंमल"

अर्धवटराव

टवाळ कार्टा's picture

28 Jun 2012 - 7:39 am | टवाळ कार्टा

_/|\_

वय १२-१४ ह्म्म
एखाद्या अमावस्येला त्याला त्याच्या मित्रांच्या बरोबर राहुदे*...मग बघा फरक पडतो कि नाही ते

*भुताला नविन झाड मिळेल ;)

शकु ताई,
तुम्ही गोव्याच्या की अलिबागच्या हो?

अर्धवटरवांशी सहमत.. ;)

उपाशी बोका's picture

28 Jun 2012 - 7:47 am | उपाशी बोका

युयुत्सूरावांना पत्रिका दाखवून बघा. अमावस्येच्या विषयात त्यांची मास्टरी आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

28 Jun 2012 - 9:25 am | अविनाशकुलकर्णी

यावरुन एक आठवले.
भोसरीत तुफान पाउस सुरु झाला होता...
कारखान्यात आडकुन बसण्याची वेळ आली..गाडी सर्विसिनंग ला टाकली होति
तेवढात मित्राची गाडी दिसली व त्याला थांबवुन रिक्षा स्टंड परयंत सोडण्याची विनंति केली..
पुण्याचे भाडे म्हटल्यावर रिक्शा वाला पण खुश..
पुल ओलांडला अन चौकात जाम होता.
रिक्षावाल्याला म्ह्टले भाऊ..खडकीवरुन होळकर पुलावरुन येरवडा मार्गे चल..
तो बोलेना..म्हटले ५-५० ज्यादा घे..
मागे वळुन तो म्हणाला १००० दिले तरी आज नाहि..
आज आमोशा..होळकर पुलावर आज हमखास अपघात होतात..गप्प बसणे आले
आजहि अमावास्येला होळकर पुलावरुन रात्री वाहने भित भित जातात ...

चौकटराजा's picture

29 Jun 2012 - 3:44 pm | चौकटराजा

वहानांची अनिस नाही . त्यामुळे त्यांचा अजुनही भुताखेतांवर विश्वास आहे. ज्या वहानांचे रजिस्ट्रेशन कोकणातील आहे ती तर दिवसाही कोणत्याही पुलावरून भीत भीतच जातात. नरेंद्र
दाभोळकर ई ई ची वहाने कमी भितात एवढेच.

चौकटराजा's picture

29 Jun 2012 - 3:46 pm | चौकटराजा

इथे भुताटकी होउन प्रतिसाद पुन्हा आला . सबब प्र का टा आ.

स्पा's picture

28 Jun 2012 - 8:35 am | स्पा

त्या पोराचं काही माहित नाही..
पण तुम्ही का दर ३- ४ दिवसांनी मानसिक/वैचारिक (?) ओकार्या काढता ?

उदय के'सागर's picture

28 Jun 2012 - 11:16 am | उदय के'सागर

+१ :D

पियुशा's picture

28 Jun 2012 - 11:16 am | पियुशा

शकु तै /मै / अक्का धागा काढण्यापुर्वी विचार करा पक्का
बादवे अमावस्येच अ.कु.म्हणतात तस पटतय ,बरेच जण अमावस्येला ठराविक रस्त्यावरुन जात नाहीत
आमच्या ओळखितले एक काका ,म्हणे एका अमावस्येला त्यांना रात्रीच्या शिफ्टवरुन परत येतांना एक बाई दिसली होती ,तीने म्हणे त्यांना पुढच्या चौकापर्यंत लिफ्ट मागीतली ,पण काकांनी गाडी काही थांबवली नाही उलट गाडीचा वेग वाढवला तर ती गाडीच्या वेगाबरोबर समांतर पळत पळत वेशीपर्यंत आली होती नंतर ती गायब झाली ,आता यात खर काय अन खोट काय ते काकालाच माहीत ,पण काका थंडीतापाने १० दिवस फणफणले होते मात्र :(
एकदा आमच्या कंपनितल्या एका सुपरवैझरला रात्री १२ ला लकडी पुलावरुन जाताना कुणीतरी नावाने हाक मारली २-३ दा,लकडी पुलावर्च्या भुता-खेताच्या स्टोर्‍र्या प्रसिद्ध आहेत म्हणौन तो ही काही थाम्बला नाही त्यानेही गाडिचा गिअर टाकला अन मागे न पाहता गाडी बुंगाट पळ्वली , त्याचा कुणीतरी पाठलाग करत होते ,मागुन जोरजोरात ए थांब मला पण येउ दे ए थांब अशा आरोळ्या येत होत्या हा खेळ घरी पोहचेपर्यंत चालु होता , शेवटी धाडस करुन त्याने गाडी थांबवली अन मोठी हिम्मत करुन मागे पाहिले अन ताडकन उडाला ,त्याचे काका होते ते ,नाइट शिफ्ट करुन घरी परतणारे ;)

महेश काळे's picture

28 Jun 2012 - 11:40 am | महेश काळे

+१

अमितसांगली's picture

28 Jun 2012 - 12:15 pm | अमितसांगली

+११

शुचि's picture

28 Jun 2012 - 3:57 pm | शुचि

मस्त ग :)

दादा कोंडके's picture

28 Jun 2012 - 11:03 pm | दादा कोंडके

...आता यात खर काय अन खोट काय ते काकालाच माहीत...

काकालाच का? ती बाई वेशीपर्यंत गाडीबरोबर वेगात पळत आली हे खरं असेल असं तुम्हाला वाटतं का?

रेवती's picture

29 Jun 2012 - 12:00 am | रेवती

अगं ए बै, माझे हसणे ऐकून मुलगा बघायला लागला. काय तरी विनोद सांगतेस गं.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jun 2012 - 11:44 am | बिपिन कार्यकर्ते

=)))))))))))))

मजा आली वाचायला! बाकी मला अमावास्येला विशिष्ट आयडीकडून व्यनि येतात! त्यावर काय उपाय करू? ;)

सुहास..'s picture

29 Jun 2012 - 12:36 pm | सुहास..

मजा आली वाचायला! बाकी मला अमावास्येला विशिष्ट आयडीकडून व्यनि येतात! त्यावर काय उपाय करू? >>>

या कुंद्याला काही कामे नाहीत ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jun 2012 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते

=))))) जबरी! समदु:खी काय रे तू? ;)

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 3:53 pm | मराठमोळा

मला मिपावर येणार्‍या अमावस्येच्या वेळी लेख उघडावेसे वाटतात, पौर्णिमेच्या वेळी मी रजेवर असतो.. मी काय करु?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2012 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा

त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ? >>> ए...आम्च्या बद्दल काय हे गैर समज पसरवणं चाल्लय रे..?

शुचि's picture

28 Jun 2012 - 3:55 pm | शुचि

आवरा!!!

खडीसाखर's picture

28 Jun 2012 - 7:51 pm | खडीसाखर

तो अमावस्या पौर्णीमेला रावडी राथोड,तेझ्,संभा (मराठी शिनेमा) इ. चित्रपट पाहत असणार!

श्रीरंग's picture

30 Jun 2012 - 11:00 am | श्रीरंग

हाहाहाहाहाहा!
संभा - आजचा छावा, वरचा क्लास आहे. काय तो हीरो, काय ती संवादफेक ("सो णाईस, मणाली", इत्या.) लाजवाब!!

शकु गोवेकर's picture

28 Jun 2012 - 8:12 pm | शकु गोवेकर

या धाग्याबद्दल मिसळ्पाव मंड्ळींचे विचार कळ्त आहेत
पण या मध्ये कोणी डाक्टर मंडळी असतील तर त्यांना काय वाट्ते ?

आनंदी गोपाळ's picture

28 Jun 2012 - 11:49 pm | आनंदी गोपाळ

कारागीर मंडळी हत्याराला हात लावीत नाहीत.
तमाम डाक्टर मंडळींनी तेच करावे अन अमुशेला (अमावस्येला) आप्रेशने बंद करावीत. तेव्ह्डाच लोकसंख्येला आळा बसेल.
हाकानाका

दादा कोंडके's picture

1 Jul 2012 - 7:19 pm | दादा कोंडके

समस्त कारागिर मंडळींनी आमुशेला हत्याराला हात लावला नाही तर लोकसंख्येला (१/३०) आळा बसेल. :)

अमावश्या करतो आणी पौर्णीमेला पण ....

त्याचे नाव बदलुन किरण वैराळे का ठेवत नाही ;)

चिरोटा's picture

28 Jun 2012 - 8:58 pm | चिरोटा

अमावास्या,पौर्णिमेला त्याची आई जेवण काय बनवते का? आदल्या दिवशीचे वरण्/भात्/२/३ दिवस जुन्या पोळ्या,फ्रीजमधले जुनाट दही ? विचारून पहा त्याच्या आईला. बायकांना रोज स्वैपाक करायचा कंटाळा असतो हल्ली.

बायकांना रोज स्वैपाक करायचा कंटाळा असतो हल्ली >>

हा अनुभव काय रे प्रसन्न ;)

चिरोटा's picture

29 Jun 2012 - 7:18 am | चिरोटा

सकाळी ८ पासून रात्री ११ पर्यंत हॉटेलवाले जोरदार धंदा करतात म्हणून वाटले.

चित्रगुप्त's picture

29 Jun 2012 - 4:11 pm | चित्रगुप्त

..होळकर पुलावर आज हमखास अपघात होतात..
पुण्यात हा होळकर पुल कुठे आहे, आणि या नावामागे काय इतिहास आहे?
यशवंतराव होळकर वा मल्हाररावांच्या वेळी इथे काही खून-खराबा झाला होता का ? कुणाला माहिती असल्यास कळवावे.

गवि's picture

29 Jun 2012 - 5:44 pm | गवि

बाँबे स्यापर्स ते खडकी अशा मार्गावर आहे. त्याच्या जवळ स्मशान्/दफनभूमी इत्यादि आहेत. तिथे काहीतरी घडतं / दिसतं हे मला पहिल्यांदाच कळतंय. मी दीड वर्ष रोज (रविवारही धरुन रोज) रात्री १२ ते पहाटे २ या दरम्यान या पुलावरुन विश्रांतवाडीला परत येत असे जुना मुंबई पुणे रस्ता सोडल्यापासून ते विश्रांतवाडी जवळ येईस्तोवर मला या दीड वर्षात कधीही त्या परिसरात मध्यरात्री मनुष्यप्राणी / गाडी माझ्यासोबत पास होताना दिसली नाही. एखाददुसर्‍या प्रसंगी एकादी बाईक दिसली असेल नसेल.. दहा वर्षांपूर्वीचा काळ आहे हा. त्यावेळी दिवसाही बरीच कमी रहदारी असायची तिथे.

पण अमानवी किंवा भयानक अनुभव म्हणावं असं शष्प काही दिसलं नाही. दीड वर्षात किमान पंचवीसेक अमावास्या तरी आल्या असतील. रात्री बारा वाजता थंडी मात्र अमानवी आणि भयानक असायची. बाईकचा क्लच पकडणं कठीण होईल इतकी बोटं गोठवणारी थंडी..

एकदा संध्याकाळच्या वेळी एक सिक्स सीटर रिक्षा कठडा तोडून पुलावरुन नदीत कोसळली. ते ऐकून तोबा गर्दी झाली होती. रात्रभर पाण्यात बुड्या मारमारुन लोक शोध घेत होते.. पण ती रिक्षा गायबच झाली.. तेव्हा एक असं गूढ वातावरण झालं होतं. नंतर कळलं की रिक्षावाला फक्त कठड्याला धडकून पळाला होता. नदीत पडलाच नव्हता.. पुढचा सर्व मास हिस्टेरिया..

हल्ली या भागात दिवसा ट्रॅफिक जाम होतो असं ऐकलंय. ऐकावं ते नवलच.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jun 2012 - 6:15 pm | बिपिन कार्यकर्ते

नंतर कळलं की रिक्षावाला फक्त कठड्याला धडकून पळाला होता. नदीत पडलाच नव्हता

=))

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 6:18 pm | नाना चेंगट

आयला अमावस्येचा काही तरी प्रताप झालेला दिसतोय... शकु गोवेकरांचे अकाऊंट गोठले. बाब्बॉ !!!

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 6:18 pm | नाना चेंगट

आयला अमावस्येचा काही तरी प्रताप झालेला दिसतोय... शकु गोवेकरांचे अकाऊंट गोठले. बाब्बॉ !!!

माझा तर अमावस्येबद्दल अगदी विचित्र अनुभव आहे.कसं काय माहिती, पण दर अमावस्येला चंद्र चक्क आकाशातून गायब होतो आणि रात्री आकाश अंधारे दिसते!!!!!!! इतकेच नाही, दर १ महिन्यातून एकदा हे होतं. नक्कीच हा अमानवी शक्तींचा प्रभाव असावा.

शकु गोवेकर's picture

29 Jun 2012 - 8:09 pm | शकु गोवेकर

आजच पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररी मधे एक पुस्तक वाचायला मिळाले
हा पुल होळ्कर महाराजे यांची छावनी पुण्यात असताना मधुराव होळ्कर पेशव्यानी बांधला आहे
होळ्करांचे राजे यांचे प्रमुख पुरुष मल्हार राव होळ्कर यानी नंतर ईदुर येथे गादी वसवली व तेथे ही राज्य केले ई.स.१६९४-१७६६ हा पुल साप्रस व मुळा नदी पंप हाउस याना जोड्तो व या पुलाची लांबी ५४८ फुट आहे व भक्कम दगडात सुमारे १७५ वर्षापुर्वी बांधला गेला याची मुख्य आठ्वण म्हणजे दि २६ जुलै १८७० रोजी महापुराचे पाणी या पुलावरुन गेले होते व त्या नंतर सुद्धा हा शाबुत राहीला व पुण्याचा पहिला भक्कम पुल म्हणता येईल
संदर्भ - 'Holkar's Bridge near Kirkee (Poonah) during a flood. 28 July 1870' -Creator: Artist : Lester, John Frederick (1825-1915)

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jun 2012 - 10:20 pm | अविनाशकुलकर्णी

एक घटना [ऐकिव]
यरवड्याच्या गुंजन सिनेमा हाऊस मधला "निल कमल" सिनेमाचा रात्रीचा शो सुटला होता..
१२- सव्वा १२ वाजुन गेले होते..एक तरुण कपल.रिक्षा मिळते का म्हणुन वाट पहात होते.
एकदाचा रिक्षावाला तयार झाला ....खडकीला जायचे होते..
कपल रिक्षात बसले व रिक्षा चालु झाली.दोघे जण पण रिक्षात गप्पा मारत होते..रात्रीची वेळ व निरव शांतता असल्याने रिक्षावाल्याच्या कानावर गप्पा पडत होत्या व तो पण गप्पांची मजा घेत होता...
होळकर पुलावरुन रिक्षा गेली अन रिक्षा वाल्याच्या ध्यानात आले कि कपल गप्पा मारत नाहि म्हणुन त्याने मागे वळुन पाहिले अन तो चाट झाला..रिक्षात कुणीच नव्हते...
रिक्षावाला घाबरला. अन साईडला रिक्षा घेतली त्याने ओळखले काहि तरी अमानवि प्रकार आहे..तो ओरडला न बेशुद्ध पडला..
पुढे हि बातमी पसरली व त्या कपल नी प्रेम सफल होत नाहि असे समल्यावर आत्महत्या केली होति असे समजले ..
निल कमल त्यांचा आवडता सिनेमा होता. व हा सिनेमा आला कि हमखास असे घडत असे.