असा आमचा गाव

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
27 Jun 2012 - 12:16 am
गाभा: 

मिसळ्पाव मंड्ळी, नमस्कार
आमच्या गावाला यायचे का ?
आता पुण्यातल्या काही गावांची नावे पहा - पण , पण हसु नका
१)हडपसर - काय पसर ? २) सिंगापुर - या नावाचा देश आहे हे माहीत असेल पण मंडळी हे पुण्याजवळ असलेल्या एका खेडेगावाचे नाव आहे बर का ३) येड (वेडे )बावधन व दगडे बावधन ४) किरकिटवाडी - आ,कुठ्ली वाडी म्हणालात
५)धाकल कों ढवे व मोट कोंढ्वे ६)अप्पर ईदिरानगर व लोअर ईदिरानगर -आता सरळ मराठीत खालचे व वरचे म्हणाना
७)वेताळनगर - मग विक्रम कुठे गेला ८)पिंपळे सौदागर -कशाचा सौदा करायचा ९) पिंप्रि सांडस १०) डायस प्लाट -
आता शहराच्या काही भागाची नावे
१)पंताचा गोट - कुठ्ला गोट २) बदामी हौद - बदामी रंगाचा की बदाम पड्लेल्या
३)निसेन हट - मला वाट्ते १९६१ च्या महापुरांनतर हा भाग वसवला गेला ४) कासार साई
मंडळी,येथे वैयक्तिक वा राजकिय वाद नाही व कुठ्ल्याही पुणेकराच्या वा अन्य गावातल्या लोकाच्या भावना दुखविण्याचा हेतु नाही
परंतु , पिढ्यान पिढ्या येथे राहण्यार्या लोकाना तरी या नावांचा ईतिहास माहीत आहे का ? ही नावे का व कधी पड्ली असावित असे तुम्हाला वाट्ते ?
तुम्ही राहता त्या गावी उदा- नासिक्, सोलापुर मधे (हे सुद्धा उदाहरणासाठी बर का) अशी नावे आहेत का?
त्या बद्दल तुम्हाला काय वाट्ते ?

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

27 Jun 2012 - 12:18 am | बॅटमॅन

तुम्ही गोवेकर की पुणेकर?

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 12:36 am | श्रीरंग_जोशी

एकदा माझा एक मित्र प्रथमच पुण्यात आला. रस्त्यात खडक पोलिस ठाणे बघून मला म्हणाला, पुण्यातले लोक फारच रुक्ष दिसतात.

त्यावर मी उत्तर दिले हे तर काहीच नाही इथल्या आणखी एका भागाचे नाव पाषाण असेही आहे.

अवांतर - काही वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुणे दौऱ्यात वैतागवाडी येथे एक कार्यक्रम होता. गावाचे नाव जरा विचित्र वाटल्याने त्यांनी आयोजकांना त्याबाबत विचारणा केली. अर्थ कळल्यावर आपल्या भाषणात त्यांनी त्याचे नाव बदलून आशाकिरणवाडी ठेवावे असे सुचविले. आता वैतागवाडीवासीयांनी खरंच नाव बदलले की नाही याबाबत काही ठाऊक नाही.

आबा's picture

27 Jun 2012 - 1:13 am | आबा

तुम्ही जे सिंगापूर म्हणताय ते, पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष "शंकरराव ऊरसळ", यांचं गाव.

शकु गोवेकर's picture

27 Jun 2012 - 1:27 am | शकु गोवेकर

१)बट्मन साहेब्,माफ करा मला प्रयत्न्य केला तरी तुमचे नाव टाईप करता आले नाही --
आम्ही गोवेकर --
पुण्याचे उदाहरण गावासाठी घेतले आहे व मी
पुण्याचे उदाहरण गावासाठी घेतले आहे पण --
गोव्यात सुद्धा कलंगुट,वास्को,बायणा,कोलवा (यातील काही नावे माशांच्या जाती आहेत )अशी गावे आहेत
२)श्रीरंग जी ,तुम्ही मागे मला संदेश पाठ्वला होता
माझ्या लिखाणात वैताग वाडी व पाषाणचा उल्लेख राहिला आहे ,पण श्रीरंगजी, हड्पसर जवळ साडेसतरा नळी हा भाग तुम्हाला ठाऊक आहे का ? त्याचा ईतिहास काय ? म्हणजे किती नळ्या कोणास ठाऊक
तसेच खडकवासला ,कळ्स व दिघी या पुण्याजवळ च्या गावांच्या नावाचा ईतिहास काय असावा ?
कोरेगाव पार्कला वयस्कर लोक अजुनही कोरेगाव चा बगिचा म्हणतात तर येरवडा जेल ला येरवडा ( कुठ्ला वडा )तुरुंग म्हणतात आता मोई व मोशी व मारुन्जी व गहुंजे ही गावे पुण्या जवळ आहेत तसेच अंदर मावळ व बाहर मावळ ही नावे कशी वाट्तात

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 1:40 am | श्रीरंग_जोशी

पुण्याच्या अमुक भागाला तमुक नाव का पडले यावर जर चर्चा सुरू झाली तर त्यावर कुणी मोठासा ग्रंथ ही लिहू शकेल.

खुन्या मुरलीधर (या मूर्तीसाठी जवळ जवळ लढाईच झाली होती म्हणे), पत्र्या मारुती, हौदाचा गणपती, खजिन्याची विहीर, कात्रज तलावातून उगम पावणारा आंबील ओढा या प्रत्येकामागे मोठा इतिहास आहे.

त्यामुळे ही चर्चा पुण्याच्या परिघाबाहेरच ठेवावी ही विनंती.

चापेकर बंधु खटल्यात जो फितूर झाला, त्याचा खून नंतर मुरलीधराच्या देवळाजवळ केला, तोच हा खुन्या मुरलीधर.

पेशवे अन त्यांचे एक सरदार यांच्यात लढाई झाली होती मुर्तीसाठी...

बादवे - चापेकर की चाफेकर?

शकुआज्जी धाग्यावर धागे काढून सगळ्यांना वात नका आणू हो :( टेक अ ब्रेक!!! आता शहाण्या मुलीसारख्या १ महीन्यानी धागा काढा बर का :) .... आधी नको!!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2012 - 6:58 am | अत्रुप्त आत्मा

मोहनराव's picture

27 Jun 2012 - 1:40 pm | मोहनराव

उत्तम प्रतिसाद!

मराठमोळा's picture

27 Jun 2012 - 7:11 am | मराठमोळा

तुम्ही ना.. फारच प्रश्न विचारलेत ब्वॉ... ;)

असो,
हे सर्व हिंदी सिनेमा काढणार्‍यांना सांगा.. कारण ते मराठी नावांची/आडनावांची जिथे तिथे उडवतच असतात त्यात ही पण भर घातली जाईल.

असो,
हे घ्या एक उदाहरण


टीपः चित्र आंतरजालावरुन साभार.

इनिगोय's picture

27 Jun 2012 - 3:28 pm | इनिगोय

कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

ममो, तुमची ही स्वाक्षरी आधी की या जिलब्या आधी?
(स्वाक्षरीचा अर्थ उदाहरणासहित सहपहष्ट करा म्हटलं तर या जिलब्यांचं ताट ठेवता येईल समोर.)

मराठमोळा's picture

27 Jun 2012 - 5:30 pm | मराठमोळा

तुमचा आयडी आणि प्रश्न दोंघांना अर्थ कळाला नाही हो..
कृपया समजावून सांगाल का?

ममो त्यांचे म्हणणे असे वाटते की - काही लोक (तुम्ही नाही ) नी टाकलेल्या जिलब्यांवरून तुम्ही ही स्वाक्षरी तयार केली का ;)

इनिगोय's picture

28 Jun 2012 - 2:52 pm | इनिगोय

थांकु शुचि, अगदी असेच म्हणायचे होते. आजकाल मिसळपाव खाता खाता मध्येच तोंडात येणार्‍या जिलब्या हा तापच झाला आहे. :p

इथला तिथला मजकूर घेऊन करत राहायचे चोप्य पस्ते
टाकून द्यायची कॉमन ओळ - 'मिपाकरांण्णा काय वाट्टे..?'

(या भयानक दोनोळीसाठी कोणीतरी माझीच खरडपट्टी काढा हो..!)

ममो, आयडीचं म्हणाल, तर ते माझं नाव आहे.

इनिगोय's picture

27 Jun 2012 - 3:27 pm | इनिगोय

.

अरे वा !! आज मेसमध्ये हे आहे का ? चान चान.

चिरोटा's picture

27 Jun 2012 - 2:01 pm | चिरोटा

दाढीवाला दत्त, भोसरी,पिंपळे निलख्,पिंपळे गुरव,तळवडे ही नावे कशी पडली?

JAGOMOHANPYARE's picture

27 Jun 2012 - 3:59 pm | JAGOMOHANPYARE

लंडन नाव कसे पडले?

( एकदा सीमावाद सुरु होता म्हणे. कर्नाटकचा पुढारी म्हणाला, बेळगाव या शब्दात पहिलि दोन अक्षरे बेळ घेतले की कन्नड शब्द होतो. बेळ / बेळि म्हणजे पांढरा. म्हणून बेळगाव कर्नाटकात पायजे.

हे ऐकताच आचार्य अत्रे म्हणाले, हाच नियम लावला तर लंडन महाराष्ट्रात आणावे लागेल. :) :D )

'किरकट'वाडी.
क्रिकेटचा हा अपभ्रंश आहे. सिंहगड रस्त्यावरील खडकवासल्याच्या अलिकडे सपाट माळरानावर ही एक छोटीशी वस्ती होती. पूर्वी ब्रिटिश ऑफिसर्स इथे क्रिकेट खेळायला येत असत, त्यावरून हे नांव पडले आहे.