गाभा:
फेसबुकवरची संस्कृती ही स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी आहे. कुठलेही गंभीर प्रश्न इथे हाताळले जात नाहीत. इथल्या सुमारे ९८ टक्के लोकांना चांगलं वाचावं , संगीताचा आस्वाद घ्यावा , चर्चा करावी असे वाटत नाही. इथे ज्ञानाचं थिल्लरीकरण चालतं , अशा शब्दांत प्रख्यात आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी फेसबुक संस्कृतीवर टीका केली आहे.
अधिक माहिती - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14420186.cms
१) वरील आक्षेप तसेच सदर लेखात आलेले मुद्दे तुम्हाला मान्य आहेत का? असल्यास तुम्ही काय उपाय सुचवता? नसल्यास का नाही?
२) वरील सर्व आक्षेपवजा मुद्दे मिपा अथवा तत्सम संकेतस्थळाला लागु पडतात का? असल्यास उपाय काय? नसल्यास का नाही?
ढिसक्लेमर - माझे फेसबुकावर अकाउंट नाही. मिपावर आहे. माझे या संबंधी मत प्रतिसादातुन मांडण्याचा प्रयत्न करेन.
प्रतिक्रिया
27 Jun 2012 - 1:48 pm | नितिन थत्ते
मी नानांच्या शब्दाबाहेर नाही. नाना म्हणतात ते बरोबरच असतं. ;)
27 Jun 2012 - 2:01 pm | गणपा
मी चच्चांच्या शब्दाबाहेर नाही. चच्चा म्हणतात ते बरोबरच असतं. ;)
27 Jun 2012 - 2:18 pm | रमताराम
मेरी मम्मी ने कहा था 'चार शहाणी लोकं म्हणत असतील ते ऐकावं' नाना, थत्तेचाचा नि गणपा म्हणताय्त ते ऐकावं
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चौथा कोण हा प्रश्न डोक्यात आलेल्या दीडशहाण्यांसाठी': चौथे खुद्द आम्ही आहोत, आम्ही! (काला पत्थर मधे तिसरा पत्ता फाडून टाकत 'तीसरे बादशाह हम हैं, मुन्ना' म्हणत मॅकमोहनला दम देणार्या शत्रुघ्न सिन्हाच्या ड्वायलाकच्या चालीवर वाचावे.)
28 Jun 2012 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्यात वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध लोकांशी असहमत होण्याची पद्धत नाही. म्हणून म्हातार्याच्या (पक्षी: रराच्या) शब्दाबाहेर आम्ही नाही.
27 Jun 2012 - 2:06 pm | नाना चेंगट
मी अजून मत न मांडताच माझ्याशी सहमती? इतकी व्यक्तीनिष्टता बरी नाही. अर्थात पडलेली सवय मोडणे कठीणच. ;)
27 Jun 2012 - 3:43 pm | नितिन थत्ते
:)
नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर असं झालं नसतं. ;)
27 Jun 2012 - 3:47 pm | नाना चेंगट
सहमत आहे.
म्हणूनच तुमची व्यक्तीनिष्टता संपून जाण्यासाठी तरी मोदी पंतप्रधान व्हायलाच हवे ;)
16 Feb 2015 - 1:22 am | आशु जोग
मोदी पंतप्रधान व्हायलाच हवे
27 Jun 2012 - 10:34 pm | श्रीरंग_जोशी
या प्रतिसादावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना माझ्याकडून चंद्रावर प्यार्टी!!
29 Jun 2012 - 10:55 pm | आनंदी गोपाळ
म्हंजे काय!
अन (प्या)र्टी केल्यावर नंतर विमानं चंद्रावं जात्यात आसं आईकलं हुतं?
16 Feb 2015 - 5:42 am | हाडक्या
चंद्रावर प्यार्टीसाठी मोदी पंतप्रधान होणे व या प्रतिसादावर प्रतिसाद देणे हे दोन्ही क्रायटेरिया आम्ही पूर्ण करत आहोत, सबब श्रीरंग्_जोशी यांनी आता प्यार्टीची तयारी करावी आणि (त्यांनी तरी) दिलेले आश्वासन पुरे करावे (इतर कोणास प्यार्टीत सामील व्हायचे असल्यास इथे प्रतिसाद देऊन ठेवणे. ;) )
16 Feb 2015 - 7:50 pm | श्रीरंग_जोशी
चंद्रावर अगत्याने येणे करावे ;-) .
16 Feb 2015 - 10:34 pm | टवाळ कार्टा
अश्लिल अश्लिल ;)
17 Feb 2015 - 4:12 pm | हाडक्या
येवढं बरं कळतं रे वाश्या.. ;)
17 Feb 2015 - 4:25 pm | टवाळ कार्टा
;)
19 Feb 2015 - 12:41 pm | मदनबाण
कोण चंद्रा ? *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
16 Feb 2015 - 2:41 pm | बॅटमॅन
मलाही चंद्रावर पार्टी पायजे!!!!!
16 Feb 2015 - 3:02 pm | टवाळ कार्टा
चंद्रावर म्हणजे नक्की कुठे?
16 Feb 2015 - 3:35 pm | हाडक्या
तुम्हाला चंद्रावरची काय काय माहिती आहे? त्याप्रमाणे पत्ता सांगण्यात येईल.
काईच माहिती नसल्यास जोशीबुवांना विचारणे. ;)
16 Feb 2015 - 4:04 pm | आदूबाळ
चंद्रा कोणे? कोणे चंद्रा?
16 Feb 2015 - 4:45 pm | अत्रन्गि पाउस
ठ्ठो !!!
27 Jun 2012 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>मी नानांच्या शब्दाबाहेर नाही. नाना म्हणतात ते बरोबरच असतं.
-दिलीप बिरुटे
[नाना गोडबोलेंचा मित्र]
27 Jun 2012 - 1:49 pm | महेश काळे
फेसबुक च नव्हे तर एकुणच ..संस्कृती ही स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी बनली आहे..
येथे फेसबुक एक माध्यम आहे.. त्याचा कीती वापर करायचा (आणी कसा) हे प्रत्येकाने ठरवावे..
गोडबोले काका जे फेसबुक बद्दल बोलले तेच प्रसारमाध्यमांना (मीडीया) सुद्धा लागु पडते..
यावर उपाय म्हणुन कोंग्रेस सरकार फेसबुक वर बंदी घालणार होती म्हणे..
..
आता हेच पहा (मटा व्रुत्त)
-जगभरात ५० कोटी फेसबुक यूजर आहेत. प्रत्येकाचे सरासरी १३० मित्र असून , जवळपास २५ कोटी यूजर दररोज लॉगइन होतात , ३०० कोटी फोटो आणि १ कोटी ४० लाख व्हिडीओ अपलोड होतात तर , ५०० कोटी घटना किंवा बातम्या शेअर केल्या जातात. १० कोटी यूजर मोबाइलवरून फेसबुकशी कनेक्ट असतात. प्रत्येक यूजर महिन्याला सरासरी ८ नवे मित्र जोडतो आणि २५ कमेंट करतो अशी रंजक माहितीही गोडबोले यांनी यावेळी बोलताना दिली.
आता ही रंजक माहीती गोडबोले काकांना कुठे मीळली.. आणी या माहीतीमध्ये रंजक असं आहे तरी काय??
27 Jun 2012 - 2:07 pm | नाना चेंगट
>>>यावर उपाय म्हणुन कोंग्रेस सरकार फेसबुक वर बंदी घालणार होती म्हणे..
यावर थत्तेचच्चांचे मत वाचायला आवडेल. :)
27 Jun 2012 - 1:52 pm | चिरोटा
माझा फेसबुकावर अकाउंट आहे पण क्वचित वापरतो. गोडबोले ह्यांनी खूप टोकाची अनुमाने काढली आहेत.
चांगले वाचणे म्हणजे नक्की काय वाचायचे? चांगले संगित म्हणजे काय? केवळ शास्त्रिय ऐकणे वा जी.ए. कुलकर्णी वाचणे म्हणजे उच्च संस्कृती का? हे ठरवायचे कोणी?
27 Jun 2012 - 2:59 pm | विनीत संखे
अगदी बरोबर
जगात काय अभिजात किंवा क्लासिक आहे ह्याची परिमाणं वेगवेगळी आहेत. शिवाय फेसबुकने इजिप्त मध्ये तिकडच्या हुकुमशाही सरकारविरूद्ध जनजागृती करवली हेही तितकेच सत्य आहे.
फेसबुक हे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांशी जोडणारे साधन आहे. अभिजातपणा जोडल्या गेलेल्या लोकांमध्ये असेल तर ते त्याप्रकारे फेसबुकचा वापर करू शकतात.
फेसबुकवर आईन्स्टाईन (असता तर) आपल्या थियर्या मांडणार नाही, पिकासो (तोही असता तर) आपल्या चित्राचा प्रिव्ह्यू दाखवणार नाही की ए. आर. रहमान आपलं नवं संगीत रिलीज करणार नाही.
पण एकदा प्रदर्शित झाल्यावर ह्या कलाकृतींची दखल आणि रसग्रहण फेसबुकवरही येनकेनप्रकारे होईलच.
27 Jun 2012 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा
जगभरात ५० कोटी फेसबुक यूजर आहेत. प्रत्येकाचे सरासरी १३० मित्र असून , जवळपास २५ कोटी यूजर दररोज लॉगइन होतात , ३०० कोटी फोटो आणि १ कोटी ४० लाख व्हिडीओ अपलोड होतात तर , ५०० कोटी घटना किंवा बातम्या शेअर केल्या जातात. १० कोटी यूजर मोबाइलवरून फेसबुकशी कनेक्ट असतात. प्रत्येक यूजर महिन्याला सरासरी ८ नवे मित्र जोडतो आणि २५ कमेंट करतो
27 Jun 2012 - 2:15 pm | संजय क्षीरसागर
त्या प्रसंगी झालेल्या वक्त्यांच्या भाषणांचा सारांश असाय :
१) फेसबुकवरची संस्कृती ही स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी आहे. कुठलेही गंभीर प्रश्न इथे हाताळले जात नाहीत. इथल्या सुमारे ९८ टक्के लोकांना चांगलं वाचावं , संगीताचा आस्वाद घ्यावा , चर्चा करावी असे वाटत नाही. इथे ज्ञानाचं थिल्लरीकरण चालतं , अशा शब्दांत प्रख्यात आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी फेसबुक संस्कृतीवर टीका केली आहे
२) फेसबुकमुळे चळवळ निर्माण होते ; मात्र क्रांती होत नाही. स्वतःला असुरक्षित समजणारे आणि चिंताग्रस्त यांच्यामध्ये फेसबुक वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याककडे गोडबोले यांनी लक्ष वेधले
३) खरं जग आणि मौज यातला फरक लक्षात घेऊनच फेसबुकच्या किती आहारी जायचे याचा विचार करावा , असे मत कौशल इनामदार यांनी मांडले. तर , संपर्कासाठी फेसबुकचे नवे माध्यम हाती असले तरी पारंपरिक मार्गही सोबत ठेवले तर जीवन अधिक समृध्द होईल , असा विश्वास अनुराधा सोवनी यांनी व्यक्त केला.
मी देखील फेसबुकवर आहे तरी याच कारणांमुळे ते वापरत नाही
संकेतस्थळावर बर्याच प्रमाणात टाइमपास हा प्रमुख उद्देश दिसला तरी विधायक लेखन होण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे लेखकाची प्रतिमा. ही प्रतिमा एका बाजूला वाचकांना प्रतिसाद द्यायला लावते आणि दुसर्या बाजूला लेखकाला दर्जा कायम ठेवायला भाग पाडते.
संकेतस्थळांची प्रगती न होण्याच प्रमुख कारण म्हणजे वांझोटे चर्चाविषय, व्यक्तीगत वादविवाद आणि झालेल्या फायद्याबद्दल अवाक्षर न काढण्याची (नो फिड बॅक) किंवा `गरज सरो, वैद्य मरो' ही मानसिकता. या त्रूटी दूर झाल्यातर संकेतस्थळं हे संवाद, साहित्य आणि ज्ञान यांच्या आदानप्रदानाचं सर्वात प्रभावी माध्यम होईल याची मला खात्री आहे.
27 Jun 2012 - 2:15 pm | शुचि
खरे आहे फेसबुक मधून सुंदर/वाचनीय दुवे पाठवा - लाइक शून्य!
मटावरचा लेख थोडा एकतर्फी वाटला - "असुरक्षित आणि चिंताग्रस्त" लोक जास्त करून फेसबुक वापरतात.
वाचनाचे वेड, संगीताचा आस्वाद, चर्चा आपल्या आपल्या जागी वगैरे ठीक आहे पण आपल्या प्रिय व्यक्ती बागेत काम करतानाचे फोटो, कुठे बाळाचा आईची पपी घेतानाचा फोटो, सणावारांना सजून काढलेले फोटो हे जे आयुष्यातील साजरे केलेले क्षण आहेत ते शेअर करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून फेसबुककडे पहा. जरुर आवडेल.
________________________________
मिपा वगैरेवर टिप्पणी - माझा पास!!
27 Jun 2012 - 2:29 pm | अमितसांगली
खरे आहे फेसबुक मधून सुंदर/वाचनीय दुवे पाठवा - लाइक शून्य........सहमत....
27 Jun 2012 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा
हल्ली जेवढ्या जाती,तेवढे कंपू .... हे ही फेसबुकचं १ वैशिष्ठ्य आहे.
27 Jun 2012 - 2:22 pm | उदय के'सागर
ह्या कार्यक्रमात "गोडबोले" सोडुन बाकिच्या मंडळिंनी किती साध्या,सोप्प्या आणि छान शब्दात सुचना / विनंती केली :)
"फेसबुकचा वापरही जपून आणि आवश्यकतेइतकाच करा , असा सल्ला सतीश राजवाडे यांनी दिला. खरं जग आणि मौज यातला फरक लक्षात घेऊनच फेसबुकच्या किती आहारी जायचे याचा विचार करावा , असे मत कौशल इनामदार यांनी मांडले. तर , संपर्कासाठी फेसबुकचे नवे माध्यम हाती असले तरी पारंपरिक मार्गही सोबत ठेवले तर जीवन अधिक समृध्द होईल , असा विश्वास अनुराधा सोवनी यांनी व्यक्त केला. "
.
.
.
शेवटी हा कधिही न संपणारा मुद्दा आहे... जसं पुर्वी टी.व्ही. पाहणे चांगले की वाईट ह्यावरुन वाद-संवाद व्हायचे तेच अता ईंटरनेट / फेसबुक बद्दल होतय. आणि ह्या सगळ्यांचं उत्तर बहुतेक एकच, हे प्रत्येकावर (इंडीव्हीजुअली) अवलंबुन आहे की तो कुठल्या गोष्टीच्या किती अहारी जातो आणि त्या माध्यमाचा/गोष्टिचा कसा फायदा वा आनंद घेतो.. आणि जोपर्यंत तुमच्या आनंदामुळे तुम्हाला आणि ईतरांना काहि त्रास होत नाहिये तर मग प्रॉब्लेमच काय आहे :)
अता मि.पा. देखील एक असे संकेतस्थळ आहे जीथे मराठी कलेचा, सहित्याचा प्रसार होतो, नवोदित लेखक, कलाकारांना (पाककला, छायाचित्रण ई. ई. कलेमधले कलाकार) वाव मिळतो, त्यांना एक आत्मविश्वास मिळतो. पण ह्याच संकेतस्थळावर (विनाकारण) डू.आय.डी. करुन टाईमपास करणारे हि आहेत, नको ते धागे काढुन /जीलब्या पाडणारे... अर्थात तो हि एक करमणुकिचा भाग आहे, कोणाला ते आवडतं कोणाला नाहि. त्याबद्दल आपण सर्रास निर्णय घेऊन मोकळे नाहि होऊ शकत....
त्यामुळे जीथे बहुमताने एखादी गोष्ट व्यवस्थीत चालु आहे, ती चांगली कि वाईट हे सांगण अवघड आहे तिथे 'आपल्याला पटत असेल तर आपणहि करावं नाहितर सोडुन द्यावं'!
27 Jun 2012 - 2:26 pm | अमितसांगली
वरील आक्षेप तसेच सदर लेखात आलेले मुद्दे मान्य आहेत. फेसबुककडे सर्वजण फक्त विरंगुळा म्हणून पाहतात. सध्या विविध लोकांची पेजेस (संस्थळ) जोरात चालू आहे. त्यांच्यामध्येही प्रचंड स्पर्धा सुरु आहे. सदस्यांची संख्या वाढविण्यासाठी फोटो शेअर करणे हा मुख्य मार्ग असल्याने वाचन व चर्चा हि संस्कृतीच तेथे नाही. सकाळ पेपर इथे चर्चा करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्याकडे पुरेसे सदस्य नसल्याने चांगला प्रतिसाद मिळत नाही. फेसबुक वापरणारे बरेच जण सुज्ञान असून त्यांच्यात पुरेशा वाचनाचा, माहितीचा अभाव आहे.
वरील सर्व आक्षेपवजा मुद्दे मिपा अथवा तत्सम संकेतस्थळाला लागु पडत नाहीत. अशा संस्थळावर मनोरंजनाबरोबर विविध प्रश्न, चर्चा चांगल्या प्रकारे हाताळल्या जातात. बुद्धीला नेहमीच पौष्टिक खाद्य मिळते.
27 Jun 2012 - 2:39 pm | रणजित चितळे
मिपा व फेसबूक बरोबरीच करता येणार नाही. साहित्य असे नसतेच फेसबूकवर.
फेसबूक वर काहीच नसते.
27 Jun 2012 - 6:47 pm | अरुण मनोहर
ह्याचा अर्थ मिपावर साहित्य असते असा घ्यावा की काय?
27 Jun 2012 - 8:03 pm | गणपा
ह्याचा अर्थ मिपावर साहित्य नसतेच असा घ्यावा की काय? ;)
27 Jun 2012 - 8:24 pm | शुचि
छान प्रतिसाद!!!
28 Jun 2012 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
नसतेच असा घ्यावा की काय? Wink
27 Jun 2012 - 3:13 pm | क्लिंटन
खरे-खोटे माहित नाही पण मटावरील या लेखात ज्या संकेतस्थळाचा उल्लेख केला आहे त्यावर सुध्दा "फेसबुकचे लाईक" बटन आहे असे एका वाचकाने त्याच लेखावरील प्रतिक्रियेत लिहिले आहे . आता याला काय म्हणायचे?कार्यालयातून ते संकेतस्थळ बघता येत नाही तेव्हा ते प्रत्यक्ष बघून खात्री करता आली नाही. तरीही हे खरे असेल तर हे पण थिल्लरीकरण नाही का?
फेसबुक ज्ञानाचं थिल्लरीकरण करते की नाही याची कल्पना नाही. पण मटा मराठी भाषेचे जेवढे थिल्लरीकरण करतो तेवढे इतर कोणतेही मराठी वर्तमानपत्र क्वचितच करत असेल. :(
27 Jun 2012 - 3:21 pm | रमताराम
फेसबुक ज्ञानाचं थिल्लरीकरण करते की नाही याची कल्पना नाही. पण मटा मराठी भाषेचे जेवढे थिल्लरीकरण करतो तेवढे इतर कोणतेही मराठी वर्तमानपत्र क्वचितच करत असेल.
सहमत. थिल्लरीकरण म्हणण्यापेक्षा 'धिंडवडे काढतो' म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. आणि त्याबाबत प्रतिक्रिया लिहिली तर प्रसिद्धच करत नाहीत असा माझा अनुभव आहे. त्या 'टाईम्स' नावाचे आपण मनानेच एवढे गुलाम होऊन बसलो आहोत की त्याबाबत कधी ओरड झालेली ऐकिवात नाही (किंबहुना हा मुद्दाच बिनमहत्त्वाचा वाटतो हल्ली). आणि सरकार एखादा निर्बंध घालणारा नियम करतं म्हटलं की इंटरनेट यूजर्स अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढतात, फेसबुक मोहिमा चालवतात. थोडक्यात, मटा/टाईम्स हा नव-उच्चभ्रूंचा 'बाब्या' आहे.
27 Jun 2012 - 4:16 pm | श्रीरंग
>>मटा मराठी भाषेचे जेवढे थिल्लरीकरण करतो तेवढे इतर कोणतेही मराठी वर्तमानपत्र क्वचितच करत असेल.
पूर्णतः सहमत.
म.टा. च्या पुरवण्यांमध्ये हिंदी / इंग्रजी सदृश्य जे काही देवनागरीत छापलं जातं, त्यात नक्की कोणत्या भाषेचं थिल्लरिकरण होतंय याचा अंदाज बांधणं पण अवघड जातं कित्येकदा.
28 Jun 2012 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll
असहमत. त्रिवार असहमत.
मराठी भाषेचे धिंडवडे काढायची चढाओढ मराठी वृत्तपत्रांमधे लागली आहे. सकाळ, दिव्य मराठी इ. त्यात हिरहिरीने सहभागी होतात.
27 Jun 2012 - 3:19 pm | आबा
"हा मजकूर फेसबुक वर शेअर करा"
अशी लिंक आहे त्या बातमी खाली :)
27 Jun 2012 - 3:50 pm | पियुशा
मुळात फेसबुक मला जास्ती आवडत नाही :)
काहीही टाका तरी लाइ़क्ड करतात बै लोक ;)
असो.................
मि.पा. अन चेपुची तुलना ? शक्य नाही
तिथे सगळ ( काहीही ) लाइ़क्ड केल जात , इथ अस काही थिल्लर असेल तर त्याची सालं काढली जातात ;)
27 Jun 2012 - 3:58 pm | टवाळ कार्टा
>>काहीही टाका तरी लाइ़क्ड करतात बै लोक
कारण तुम्ही बाइमाणुस...
27 Jun 2012 - 4:23 pm | अमितसांगली
+१
27 Jun 2012 - 3:33 pm | गवि
27 Jun 2012 - 4:23 pm | सुहास
सुप्प्पर लाईक...! ;-)
बाय द वे, मी कोणताही उपाय सुचवू इच्छीत नाही कारण "फेसबूक संस्कृती " म्हणजे काय ते (मलातरी) स्पष्ट होत नाही. उगीच कोणत्याही गोष्टीला "संस्कृती" म्हणायची आजकाल फ्याशन झाली आहे काय? २० वर्षांनी जेव्हा फेसबूक चा वापर कमी होईल, तेव्हाही हे लोक त्याला "संस्कृती" म्हणतील का हा माझा (तो एबीपी वाला नव्हे) प्रश्न आहे. माझ्यामते फेसबूक हे फक्त एक माध्यम आहे सोशलाईझ होण्याचे आणि त्याव्यतिरिक्त त्याचा फारसा उपयोग नाही. ज्या ठिकाणी फेसबूकमुळे चळवळी वगैरे झाल्या असे म्हणतात, त्या फेसबूक नसते तर झाल्याच नसत्या असे म्हणणे धाडसाचे ठरेल..
२) वरील सर्व आक्षेपवजा मुद्दे मिपा अथवा तत्सम संकेतस्थळाला लागु पडतात का? असल्यास उपाय काय? नसल्यास का नाही?
नाही. कारण मिपाची आणि फेसबूकची तुलना होऊच शकत नाही...
--सुहास
सुहास
27 Jun 2012 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> सर्व आक्षेपवजा मुद्दे मिपा अथवा तत्सम संकेतस्थळाला लागु पडतात का? असल्यास उपाय काय? नसल्यास का नाही ?
नाना, मिपावर असुरक्षित वाटतंय म्हणुन अभिव्यक्त होण्यासाठी लोक मिपावर येतात हे मला पटत नाही. किंवा काहींच्या आयुष्यात प्रचंड तणाव आणि निराशेनं घेरलेलं आहे, म्हणुन लोक मिपावर येतात हेही मला पटणार नाही.
माहितीची देवाण-घेवाण, काव्य-कथा यांचा आस्वाद, काही गप्पा, काही अद्भुत जे मला माहिती नव्हतं अशा काही विचारांची माहिती होते. प्रश्नाकंडे पाहण्याची आणि व्यक्त होण्याची दृष्टी लाभते. जगभरातल्या भटकंतीची माहिती होते. एखाद्या गाण्याचं उत्तम रसग्रहण असतं. चित्रपटांचे बहारदार परिक्षणं असतात. एखादं वाक्य, एखादा लेख, एखादा शब्द मनात कितीतरी दिवस रेंगाळत असतो. . असो, मिपा आणि तत्त्सम संकेतस्थळावर ज्ञान वाढतं इतकं मला कळतं. आता त्याचं थिल्लरीकरण कसं होतं ते मला काही सांगता येणार नाही.
-दिलीप बिरुटे
27 Jun 2012 - 4:29 pm | दिपक
ठिक आहे. पण ’ज्ञान’ ह्या शब्दाचा नविन अर्थ आजच कळाला. त्याचं काय? :-)
27 Jun 2012 - 5:02 pm | कवितानागेश
या अर्थाबद्दल धन्यवाद.
आता मनात कुठलीच शंका राहिली नाही. निरभ्र झाले मन. :)
27 Jun 2012 - 5:00 pm | Ravindra
आता माननीय अच्युत गोडबोले ठरवणार कोणाला काय आवडले पाहिजे. फेसबुक हे नेटवर्किंगचे साधन आहे. त्याला सखोल ज्ञान देण्याचे साधन का करू पाहता आहात?
जसे पूर्वी गावातले लोक कट्ट्यावर एकत्र जमत असत तसेच आता फेसबुक वर येतात. यात वाईट काय आहे हे मला समजत नाही. आणि अच्युत गोडबोले यांना शास्त्रीय संगीत आवडते म्हणजे फेसबुक वरील बहुसंख्य लोकांना ते आवडले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे काय?
पूर्वीच्या कट्ट्यांवर काय फार विचारपूर्ण चर्चा होत असे?
सध्या काहीही झाले कि फेसबुक आणि आधुनिक संस्कृती ला वाईट म्हणायचे हि पद्धत झाली आहे. याच चंगळवादी संस्कृती मुळे श्री अच्युत गोडबोले यांनी एवढे पैसे मिळवले. त्या पैशांच्या बळावर ते त्यांच्या बाकी सर्व उद्योग करु शकले. पण हि संस्कृती आणि अमेरिका या बद्दल ते नेहमी वाईट का बोलतात आणि लिहितात ?
28 Jun 2012 - 7:34 am | टवाळ कार्टा
"याच चंगळवादी संस्कृती मुळे श्री अच्युत गोडबोले यांनी एवढे पैसे मिळवले. त्या पैशांच्या बळावर ते त्यांच्या बाकी सर्व उद्योग करु शकले. पण हि संस्कृती आणि अमेरिका या बद्दल ते नेहमी वाईट का बोलतात आणि लिहितात ?"
आक्शेप...
मलातरी असे वाटत नाही
त्यानी मराठीमध्ये खुप सोप्या भाषेत पुस्तके लिहीली आहेत (इंटरनेट संबंधी)
आणि ते स्वता I.T. Professional (I guess from IIT) आहेत
उगाचच विरोध करायचा म्हणुन काहीही लिहायचे?
अवांतर - दुसर्याने मिळवलेले पैसे बघुन मराठी माणसाच्या पोटात का दुखते ;)
अती अवांतर - चंगळवादी संस्कृती मुळे पैसे कसे मिळवता येतात???
अती अती अवांतर - चंगळवादी संस्कृती म्हणजे नक्की काय? वडापाव सोडुन बर्गर खाणे की जात-पात सोडुन लग्न करणे?
27 Jun 2012 - 5:28 pm | मराठमोळा
हम्म्म्म,
चांगली चर्चा...
उद्याच्या सोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात होणार्या उलथापालथींनंतर बर्याच लोकांना ही चर्चा कामाला येईल.
27 Jun 2012 - 5:30 pm | विकास
फेसबुकमुळे चळवळ निर्माण होते ; मात्र क्रांती होत नाही.
गेल्या वर्षी इजिप्त पासून चालू झालेल्या लोकशाहीवादी चळवळीत ज्याला आता माध्यमे "अरब स्प्रिंग" असे संबोधतात, त्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रामुख्याने फेसबुक आणि ट्वीटर यांचा वापर केला गेला. इतका की इजिप्तमधे इंटरनेट वापरावर बरेच नियंत्रण आणले गेले. ब्रॉडबँड वापरता येत नाही म्हणून लोकांनी पुर्वीच्या (म्हणजे १०-५ वर्षाआधीच्या) पद्धतीने मोडम वापरायला सुरवात केली आणि त्याला युरोपातील काही देशांमधून फोनद्वारे इंटरनेट मिळवण्याची व्यवस्था केली गेली.
पुढे होस्नी मुबारक पदच्यूत झाला, इतर ठिकाणी देखील अरब साम्राज्यास हादरे बसलेले आहेत. आज देखील मरणाच्या भय असून सिरीयन लोक आसाद च्या विरोधात फेसबूकवर गोळा होतात. त्यावर कालच एक, त्याला विनोद म्हणावे का ते माहीत नाही, पण ऐकला: (अशा फेसबुक युजर्ससाठी) सिरीयात जर स्वर्गात पटकन जायचे असले तर काय करावे, फक्त रस्ता ओलांडायला जावे. (कारण आसाद चे सैनिक अशां लोकांना गोळ्या मारायला बसलेले असतात).
हे सर्व आजच्या काळासाठी घडत असलेला इतिहास (history in making) आहे. आता ही जर क्रांती नाही असे म्हणणे असले तर बोलणेच खुंटले.
अजून परमार्श वेळ मिळाल्यास - मात्र हे फेसबुकच्या बचावासाठी नसून, (फेसबुकचे) विश्लेषण करताना होत असलेल्या अपुर्या निरीक्षणासंदर्भात आहे.
बाकी यावरून गोडबोले यांचा लोकसत्तेतील (फाँट उतरवून घ्यावा लागेल) सांस्कृतिक स्किझोफ्रेनिया हा लेख आणि त्यावर झालेली उपक्रमावरील"अच्युत गोडबोले आणि आम्ही एनाराय्" चर्चा आठवली.
27 Jun 2012 - 5:38 pm | पैसा
फेसबुकवर ज्ञान मिळेल अशी अपेक्षा ठेवून कोण जातंय? मी तरी बर्याच लोकांबरोबर एकदम गप्पा मारता येतात, जुन्या मित्र मैत्रिणी सापडतात आणि सगळ्यांच्या नव्या जुन्या बातम्या, फोटो पहायला मिळतात म्हणून जाते. हे मटाचं म्हणजे बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचून ज्ञान मिळत नाही म्हणण्यासारखाच प्रकार आहे!
27 Jun 2012 - 5:56 pm | गवि
मी काय म्हणतो, अजिबात ज्ञान न देणार्या गोष्टींना हीन का मानायला हवं? असेनात काही गोष्टी ज्ञान न वाढवणार्या.
युजी म्हणून गेलेत ना की देअर इज नथिंग टू नो..
27 Jun 2012 - 6:33 pm | विनायक प्रभू
नान्या म्हणतोय तर खरेच असेल.
अत्यंत ज्ञानी माणुस.
असो.
हे फेस बुक म्हणजे काय अस्ते बॉ?
27 Jun 2012 - 6:49 pm | मुक्त विहारि
नेहमीप्रमाणेच... प्रतिसाद बराच मोठा झाला..त्यामूळे नंतर टाकीन..
27 Jun 2012 - 6:49 pm | अरुण मनोहर
आपला (मिपा) तो बाब्या आणि दुसर्याच ते कार्ट!
27 Jun 2012 - 8:11 pm | अनाम
छे छे, आपल ते मिपा दुसर्याचे ते थोपु. :D
27 Jun 2012 - 8:02 pm | सोत्रि
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात (अपवाद शोलेमधले जयकडचे जॉर्ज पंचमच्या काळातले नाणे). ज्याच्या त्याच्या समजेनुसार त्याच्या छाप आणि काट्याचे काय अर्थ लावायचे हा वैयक्तिक मामला आहे.
सोशल नेटवर्क ह्या चित्रपटात फेसबुक म्हणजे काय आणि ते चालू करण्यामागे मार्कची काय कल्पना होती हे व्यवस्थित मांडले आहे. 'Taking personal profile online and making it social. (एक़्झॅक्ट शब्द आता आठवत नाहीत)
Facebook is a social utility that connects people with friends and others who work, study and live around them इतका साधी आणि सरळ व्याख्या आहे फेसबुकची. हे समजुन न घेता उगाचच नावे ठेवण्याला काय हशील आहे, सबब ह्या चर्चेला माझा पास!
अवांतरः नाना विद्वान आहे ह्या 'नाण्या'ला मात्र शोलेमधल्या जयकडच्या नाण्याप्रमाणे एकच बाजू आहे हे जाता जाता नमूद करून जातो ;)
- (सोशल) सोकाजी
27 Jun 2012 - 9:09 pm | गोंधळी
फेसबुकचे कोणते फायदे असतात व कोणते तोटे असतात.
27 Jun 2012 - 10:38 pm | श्रीरंग_जोशी
हा विषय फार गुंतागुंतीच आहे त्यामुळे विचार करतो व जमल्यास माझे मत व्यक्त करीन.
मराठी भाषेत 'थिल्लरीकरण' हा नवा शब्द आणल्याबद्दल अच्युत गोडबोले यांचे अनेक आभार.
आम्ही आधीच तोडपाण्याच्या ओझ्याखाली दबलो आहोत साहेबांच्या कृपेने.
27 Jun 2012 - 10:37 pm | शिल्पा ब
बाकी काय असेल ते असो पण मटा भाषेचे "थिल्लरीकरण" ठरवतेय हे वाचुन अंमळ मनोरंजन झाले.
27 Jun 2012 - 10:47 pm | निनाद मुक्काम प...
आमच्याकडे काम करत असलेल्या काही इजिप्त शियन लोकांना मी हाच प्रश्न विचारला होता तेव्हा फेसबुक म्हणजे काय हे अर्ध्याहून जास्त त्यांच्या जनतेला माहितच नाही म्हणजे शहरी भागातील माणसे वगळता सोशल नेटवर्किंग ही संकल्पना माहीत नाही. फेस बुक म्हणजे आभासी चावडी मराठी संस्थालाबाबत प्राध्यापक बिरुटे ह्यांच्याशी सहमत.
28 Jun 2012 - 9:01 am | नाखु
साध आहे "सोसल" (सोशल नाही) तेव्ह्ढ च नेट वर राहा म्हणजे अशी वेळच येणार नाही..
कंपनी "धोरणाचा" फायदा घेऊन आम्ही फक्त वाचन मात्र आहोतच.
28 Jun 2012 - 3:14 pm | पंतश्री
अच्चुत गोडबोले ह्यांनी फेसबुक ह्यावर टीका केली आहे. पण त्यांचे स्वतःचे account पण आहेच की आणि मित्रांची संख्या पण कमी दिसत नाही आहे. ती चक्क १०३० आहे. १०३० मित्र ते पण स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी संकृती असलेले. ज्ञानाचं थिल्लरीकरण करणारे. ह्याला की म्हणणार? हि बघा
अच्चुत गोडबोले साहेबांना हे विचार की असल्या लोकां बरोबर तुम्ही की करत असता? टीका करण्या आधी आपले स्वतःचे account तरी delete करायचे होते. हे म्हणजे लोकासंगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण.
अच्चुत गोडबोले mhantat ते १००% खोटे नाही आहे. काही अंशी ते खरेहि आहे. पण ह्याच फेसबुक चे फायदे पण भाग की. कोणतीही बातमी लवकरात लवकर पसरवणे शक्य होते.जनजागृती शक्य होते.
मला एक सांगा जाणीव निर्माण झाली नाही तर क्रांती कशी होणार? आधी चळवळ निर्माण होते आणि मगच क्रांती होते. चळवळ शिवाय क्रांती कधी झाली आहे का ? असेल तर मला तरी माहित नाही .
अण्णा हजारेंनी ketivela उपोषण आणि तस्सम आंदोलने केली पण केती आंदोलनाना इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता?
हाय वेळी त्यांनी फेसबुक,वेब साइट अश्या मार्गानंचा वापर केला होता.हा हि थिल्लरपणा होता का?
काही चूक होत असेल तर नक्की सांगा.
28 Jun 2012 - 5:38 pm | बॅटमॅन
ढोंगीपणा आहे झालं.
28 Jun 2012 - 6:50 pm | मदनबाण
तसेच :---
http://groups.csail.mit.edu/mac/classes/6.805/student-papers/fall05-pape...
तुम्ही स्वतःकिती माहिती पुरवता हे तुमच्या हातात आहे... तेव्हा वेळ मिळेल तसा तुम्ही तुमच्या जालावरचा ट्रेस पुसुन टाका,हे आता कितपत शक्य आहे ते मला ठावुक नाही... परंतु या बाबतीत प्रयत्न नक्की करा.
बाकी कोणाला www.wanbee.org बद्धल काही माहिती असेल /ती कोणती साईट होती आणि आता का बंद आहे ? तर ती इथे द्या,माझ्या माहितीत भर पडेल.
28 Jun 2012 - 10:44 pm | सुधीर
फेसबुक काय, मिपा काय आणि इतर तत्सम संकेतस्थळं काय, अति केलं तर वेळेचा दुरुपयोग आहे. (जर ते ध्येयाचा भाग नसेल तर)
अधाशी उदय आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्याशी एकदम सहमत.
फेसबुक फक्त मैत्री स्विकारण्या पुरताच वापरतो. कधी कोणाची भिंत रंगविली नाही की कधी कोणाला लाईक केलं नाही. पण एखादा जुना दूर असलेला मित्र आपल्या बाळाचे फोटो फेसबुकवर बघायला सांगतो तेंव्हा जातो बघायला.
मिपावर तासन तास पडीक राहणही तितकंच चुकीचं. मी मिपावर येतो ते मायमराठीच्या प्रेमामुळे आणि कधी एखादा ज्ञानाचा तुकडा, कधी पाकृ, कधी भटकंती तर कधी कधी अतिशय निरर्थक धाग्यातूनपण स्मितहास्य घेऊन जाण्यासाठी. मिपा मला जास्त "लाईव्ह" वाटतं त्यामुळे इथे जास्त रमतो. मिपाला एक ठराविक वेळ देण्याचं ठरवतो खरा, पण बर्याच वेळा अधिक वेळ देऊनच बंद करतो.
29 Jun 2012 - 3:23 am | मनोहर काकडे
सर्व समाजातच थिल्लरपणा आलाय त्याचंच प्रतिबिंब फेबुवर दुसरं काय !
29 Jun 2012 - 5:01 am | अर्धवटराव
शक्यता नाकारता येत नाहि.
अर्धवटराव
29 Jun 2012 - 6:14 pm | Dhananjay Borgaonkar
मिपावर अध्यात्माच चिल्लरीकरण नाही का होत?
17 Feb 2015 - 4:22 pm | रक्तपिशाच्च
नानाभाऊ … तुम्ही एखाद्या गोष्टीकडे ज्या नजरेने पाहता, ती गोष्ट तुम्हाला तशीच दिस्ते…
18 Feb 2015 - 11:57 pm | खटासि खट
अच्युत गोडबोलेंना लाईक्स मिळत नाहीत का ?