गाभा:
दोन आठवडे झाले रोज शिवारे बघुन येतो,घास खाऊ वाटत नाही....मन लागत नाही, पोट खपाटीला गेलेल्या लेकरासारखे कोरडे झालय सगळ रान.सैरभैर वाटतय...ज्वारीचे बियाणे बहुदा वाया जाणार,सर्व झाडॆ बोडखी झाली आहेत.उन्ह काही सरत नाही....आता तर आभाळ सुद्धा भरून येत नाही,डोळे मात्र भरुन येतात....व्यवसाय जेमेतेम चालतो,घरी खाणारी तोंडे अन खिसा यांचा ताळमेळ कसा बसणार? मागच्या २- ३ दिवसापासून खूप निराश वाटते आहे ,काही सुचत नाही कुठे मन लागत नाही. घरी कोणाच्याही डोळ्यास डोळा देण्याची हिंमत आता उरली नाही...कसे होणार पुढे ?
माझे गाव - सोलापुर जिल्ह्यातील उत्तर सोलापुर तालुक्यातील कोंडी हे गाव आहे ...जमीन म्हणजे काळी आई हे माझ्यासाठी पुस्तकी वाक्य नाही. बरस रे घना ,संपव माझ्या यातना ....जास्त लिहवत नाही.
प्रतिक्रिया
24 Jun 2012 - 2:00 pm | तर्री
पाउस हवाच आहे. आम्हा शहरी लोकांना शेतकऱ्यांच्या भावना कदाचित नाही समजणार !
तुमचे हे प्रकटन जरा नाटकी वाटते आहे.
24 Jun 2012 - 2:18 pm | चित्रगुप्त
??????????????????? :(
http://www.misalpav.com/node/22039
:) ???????????????????
25 Jun 2012 - 10:55 am | जोयबोय
प्रतिक्रियेंच्या संख्येवरुन्च कळते कि मिपाकर किति संवेदन्शील आहे
25 Jun 2012 - 10:59 am | शुचि
वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात
मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडीधाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला
बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा
लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतातमरून पडलेला हिरवा पांडुरंग!
कवी - दासू वैद्य
स्त्रोत - http://ek-kavita.blogspot.com
.
25 Jun 2012 - 11:07 am | जोयबोय
मस्त कविता
26 Jun 2012 - 4:08 am | अर्धवटराव
हि दु:खे आपल्याला कधि जाणवणार नाहि याचं समाधान वाटावं कि भिती ...
अर्धवटराव