अमिरी खमण

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
17 Jun 2012 - 2:08 pm

साहित्य-
१ वाटी हरबरा डाळ, १ वाटी मूग डाळ, २ टेबलस्पून तेल,
२ पेराएवढे आले, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा, २ चमचे दही किवा अर्धी वाटी ताक,
१/२ चमचा हळद,१/२ चमचा मोहरी,१/२ चमचा जिरे,१/२ चमचा हिंग (मिसळणाच्या डब्यातील लहान चमचा),
एका मध्यम लिंबाचा रस, २ चहाचे चमचे साखर,मीठ चवीनुसार,५ते६ काजूबिया तुकडे करुन
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर,१/२ वाटी बारीक शेव +
थोडे खवलेले खोबरे, कोथिंबिर, बारीक शेव , डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी.
कृती-
दोन्ही डाळी वेगवेगळ्या ५ ते ६ तास भिजत घाला.
नंतर त्या उपसून रोळीवर काढून वेगवेगळ्या वाटा, वाटताना त्यात आले व मिरच्याही घाला.
डाळी वाटून झाल्यावर त्या एकत्र करा.
त्यात हळद,मीठ, दही/ताक घाला व ढवळा.
एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.
एका ताटलीला तेलाचा हात लावून घ्या.
डाळीच्या मिश्रणात खायचा सोडा घाला व ढवळा.
हे मिश्रण ताटलीत ओता व ही ताटली त्या पातेल्यात ठेवून वरुन झाकण ठेवा.
ढोकळ्याप्रमाणे उकडा, साधारण १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर लागतील.
कोमट झाल्यावर ते कुस्करा.
एका कढईत तेल तापत ठेवा, त्यात मोहरी घाला ती तडतडली की हिंग व जिरे घाला, काजूचे तुकडे घाला.
नंतर मिश्रणाचा कुस्करा त्यात घाला व ढवळा.झाकण ठेवून २-३ वाफा काढा.
लिंबाच्या रसात साखर व मीठ घाला व हे वरील मिश्रणात घाला.
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर व १/२ वाटी शेव घाला आणि ढवळा.
सर्व करताना वरुन शेव, ओले खोबरे,कोथिंबिर घाला. डाळिंबाच्या दाण्यांनी सजवा.

प्रतिक्रिया

जाई.'s picture

17 Jun 2012 - 2:16 pm | जाई.

सोप्प आहे एकदम
आवडेश

पा.क्रु.चविष्ट दिसतेय :)
पण हे बनवन्यासाठी फार पेंशस लागतील .

मॄदुला देसाई's picture

17 Jun 2012 - 2:21 pm | मॄदुला देसाई

मस्तच...नक्की करुन बघनार

बहुगुणी's picture

17 Jun 2012 - 2:24 pm | बहुगुणी

न ऐकलेली (म्हणून अर्थातच न खाल्लेली!) पाककृती आहे, धन्यवाद! करून बघणार नक्की. 'अमिरी खमण' म्हणजे गुजराथी/राजस्थानी पाककृती की हैदराबादी?

स्वाती दिनेश's picture

17 Jun 2012 - 3:25 pm | स्वाती दिनेश

माझ्या माहितीप्रमाणे ही गुजराथी पाककृती आहे.
स्वाती

इतकी मेहनत घेऊन केलेला ढोकळा कुस्कारायचा ? ;)
पण अमिरी खाणं खायचं तर हे करावंच लागेल. :)
फोटू कातील आहे.

मराठमोळा's picture

17 Jun 2012 - 3:28 pm | मराठमोळा

सहमत आहे,
ढोकळा बनवून झाल्यावर तो कुस्करुन हा प्रकार करेपर्यंत धीर कोण धरणार. :)
फटु मस्त.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jun 2012 - 1:45 am | प्रभाकर पेठकर

श्री. गणपा साहेब,

ही पाककृती, फरसाण विकणार्‍या गुजराथी दुकानदारांनी, आदल्या दिवशीचे उरलेले शिळे ढोकळे 'खपविण्यासाठी' शोधून काढली आहे. जसे, आपला 'फोडणीचा भात, फोडणीची पोळी'.

'अमिरी खमणला' गिर्‍हाईकांची मान्यता मिळाली तशीच फोडणीच्या भाताला आणि फोडणीच्या पोळीला (पुण्यात) 'पोटोबा' ह्या उपहारगृहाने गिर्‍हाईकांची मान्यता मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

प्यारे१'s picture

18 Jun 2012 - 11:15 am | प्यारे१

आमच्या 'कंपनी कॅन्टीन' ने शिळ्या भाताला फोडणी देऊन एम्प्लॉईंकडून मान्यता मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न वारंवार केला आहे.

५० फक्त's picture

17 Jun 2012 - 4:25 pm | ५० फक्त

जाम भारी आहे हा प्रकार, पण घरी ढोकळा करणे शक्य नसल्याने ढोकळे विकत आणुन बाकी पुढची कृती करुन पाहिली जाईल.

मृत्युन्जय's picture

18 Jun 2012 - 11:07 am | मृत्युन्जय

वार्ज्याच्या काकडे सिटीच्या अलीकडे नारायण ढोकळेवाला आहे. त्यच्याकडे मिळतो खमण. पण त्याच्याकडचा ढोकळा जास्त चांगला आहे बरे :)

बाकी पाकृ खत्रा जमली आहे. :)

Maharani's picture

18 Jun 2012 - 6:35 pm | Maharani

परवाच तिथे खमण खाल्ला..सर्व प्रकारचे ढोकळे छान असतात त्याचे...त्याची धनकवडीला सुद्धा शाखा आहे..

सहज's picture

17 Jun 2012 - 5:45 pm | सहज

वॉव दिसतेय लै भारी पण बर्‍याच स्टेप्स आहेत :-(

सध्या वाटली डाळ - ताक वर समाधान मानेन :-)

निवेदिता-ताई's picture

17 Jun 2012 - 6:16 pm | निवेदिता-ताई

सुंदर...नेहमीप्रमाणेच

मदनबाण's picture

17 Jun 2012 - 6:24 pm | मदनबाण

मस्तच ! :)

सानिकास्वप्निल's picture

17 Jun 2012 - 8:41 pm | सानिकास्वप्निल

मस्त लागतो हा पदार्थ :)

स्वातीतै, अमिरी खमणची पाककृती मंगला बर्वे यांच्या "अन्नपूर्णा" या पुस्तकात दिलेली आहे. पण तू दिलेली पाककृती थोडीशी वेगळी आणि नाविण्यपूर्ण आहे..

- पिंगू

jaypal's picture

17 Jun 2012 - 9:29 pm | jaypal

नक्की करुन बघायला हवी

ढोकळा कुस्करायचा असतो ही नवीनच माहिती.
फोटो व पाकृ मस्त आणि मस्त!

पैसा's picture

17 Jun 2012 - 10:25 pm | पैसा

ते खोबरं, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे बघूनच समाधान झालं!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2012 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा

अमृत's picture

17 Jun 2012 - 10:46 pm | अमृत

पण तुमच शुद्ध मराठीपण वाखाणण्याजोगं आहे. फक्त एक शब्द सोडला तर संपूर्ण शुद्ध मराठी धागा ;-)

अमृत

स्मिता.'s picture

18 Jun 2012 - 12:58 am | स्मिता.

पाकृ वाचून आणि फोटो बघून तर मस्तच दिसतेय. शेव, खोबरं आणि डाळींब दाण्यांमुळे छानच लागत असणार. पण स्टेप्स जरा जास्तच आहेत ;)

प्रभाकर पेठकर's picture

18 Jun 2012 - 1:52 am | प्रभाकर पेठकर

फार चविष्ट पदार्थ आहे.

काजू आणि डाळींबाचे दाणे ह्या दोन घटकांनी 'गुजराथी' पदार्थाला 'पंजाबी' शाल पांघरली आहे.

ह्यात अगदी बारीक चिरलेला लसूण फोडणीत घालून, लाल होऊ न देता, परतल्यास चवीत खुप फरक पडतो. (मला तशी चव आवडते).

प्रास's picture

18 Jun 2012 - 11:12 am | प्रास

धागा पाहिला आहे.

प्रास's picture

18 Jun 2012 - 11:12 am | प्रास

धागा पाहिला आहे.

Maharani's picture

18 Jun 2012 - 6:36 pm | Maharani

फोटो व पाकृ मस्त !!

मस्त कलंदर's picture

18 Jun 2012 - 6:55 pm | मस्त कलंदर

खल्लास!!!

स्वाती दिनेश's picture

19 Jun 2012 - 10:24 pm | स्वाती दिनेश

खवय्यांनो, धन्यवाद.
आपण नेहमीचा ढोकळा करताना डाळीचे पीठ वापरतो,त्यामुळे तसा ढोकळा करुन तो कुस्करायचा नाही तर डाळी भिजवून,वाटून, ढोकळ्याप्रमाणे उकडायच्या आणि कुस्करायच्या.
अर्थात 'ढोकळा बिघडला..'( जिलबी बिघडली.. च्या चालीवर) तर त्याचा अमिरीखमण करुन मॉडिफाय करता येईल, :)

स्वाती