देव देवळातला

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
13 Jun 2012 - 8:09 am
गाभा: 

देव देवळातला
अधु झालाय हो देव देवळातला
माणुस मेलाय हो माणसातला
रक्ताळ्लेल्या उत्सवात मस्जिदे आणी मंदिरे रंगतात
स्वप्नातल्या भाकड कथा आज आम्हाला धर्म सांगतात
धर्मग्रंथातिल सुवचने आमच्या हत्यारात लपली
धर्माच्या नावाखाली आज हिंसाही खपली
माणुस कोण ? व्यक्ति काय ?
फरक कुणी सांगेल काय ?
माणुसकी च्या मंदिरातला
देव आमचा जागेल काय ?
(साभार)
वरिल काव्य आपणास पटते काय ?कारण माणुसच माणसाला विसरत चालला आहे,या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी --

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

13 Jun 2012 - 8:58 am | अर्धवटराव

>>कारण माणुसच माणसाला विसरत चालला आहे,या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी --
का हो? प्राण्यांनी काय घोडं मारलय??

( प्राणि )अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

13 Jun 2012 - 10:57 am | प्रभाकर पेठकर

प्राण्यांमध्येही प्राणिकी राहिलेली नाही.
परवाच मी दोन कुत्र्यांना, दोन मांजरांना नंतर कुत्रा-मांजराला भांडताना पाहिलं. चिमण्या तर मेल्या, चार चार पाच पाचजणी मिळून एकीला डाफरत असतात.

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2012 - 11:06 am | पिवळा डांबिस

परवाच मी दोन कुत्र्यांना, दोन मांजरांना नंतर कुत्रा-मांजराला भांडताना पाहिलं. चिमण्या तर मेल्या, चार चार पाच पाचजणी मिळून एकीला डाफरत असतात.
म्हणूनच आम्ही फक्त कबुतरं बघतो...
सारखी नुसती "क्येम डार्लिंग!!" म्हणत असतात!!!!
त्यांचं बघून आम्हीपण आमच्या डार्लिंगला तसंच म्हणतो....
फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स!!!!
;)

प्रभाकर पेठकर's picture

13 Jun 2012 - 11:13 am | प्रभाकर पेठकर

निदान, 'फॅन्टॅस्टिक रिझल्ट्सच्या' लोभाने तरी 'ट्राय' मारून पाहायला हवा.

रमताराम's picture

13 Jun 2012 - 12:08 pm | रमताराम

म्हणूनच आम्ही फक्त कबुतरं बघतो...
सारखी नुसती "क्येम डार्लिंग!!" म्हणत असतात!!!!
=))
अवांतरः तो पुढचा गळ्यातला खास आवाज टंकला नाहीत.

अर्धवटराव's picture

13 Jun 2012 - 9:24 pm | अर्धवटराव

तरुण तुर्क....

अर्धवटरव

पाव बेकरीतला
शिळा झालाय ओ पाव बेकरीतला
मजा गेलीय हो त्या पावातली
कुस्करलेल्या प्लॅस्टिक पिशवीत बनपाव कोंबतात
इराण्याच्या हाटेलातल्या बनमस्काची स्वप्नं दाखवतात
शिळीच काकडी अन कांदे पावात लपवले
सँडचिचच्या नावाखाली ढब्बु मिरची ही खपली
व्हेज काय ? क्लब काय ?
फरक कुणी सांगेल काय ?
इराण्याच्या हाटेलातला
बनमस्का आमचा मिळेल काय ?

तुम्ही शेवटचे वाक्य विसरलात काय हो?

वरील शिळा पाव आपणास आवडतो काय ?कारण माणूसच शिळ्या पावाला विसरत चालला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jun 2012 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

फेकु धागेकर

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2012 - 11:15 am | पिवळा डांबिस

फेकु धागेकर
चिलीम भेटली तर चार झकास झुरके मारायचे सोडून ही पाणी ओतण्याची अवदसा का आठवली आज तुला?
काय प्रशासक वगैरे झालास की काय!!!!
(अहो अब्रम्हण्यम!!!!)
:)

मृत्युन्जय's picture

13 Jun 2012 - 12:17 pm | मृत्युन्जय

पिडांना अनुमोदन :)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jun 2012 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

काय प्रशासक वगैरे झालास की काय!!!!

तुमची शाळा सोडून आम्ही हुच्चभ्रुंच्या शाळेत जाऊ असे तुम्हाला वाटलेच कसे.

फेकू या शब्दावरची रा.रा. सलीम फेकू यांची मक्तेदारी मोडल्याच्या णिषेधार्थ 'परा'चा पुतळा आज चारमिनारात जाळल्या जाईल. सर्वांनी सोबत १-२ डुकरे घेऊन येणे.

अखिल चारमिनार च्या जानिबसे आपले इस्तेकबाल आहे.

(आपकेइच)
इस्माईलभाई
जहांगीर
चाऊस
मल्लेश
चिन्ना
फेरोज
अकबर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2012 - 11:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> वरिल काव्य आपणास पटते काय ?
काव्य थोडं पटतंय पण तुमच्या ओळी दोन ओळीचा वैश्विक प्रश्नांना काय उत्तर द्याव समजत नाही.

>>>माणुसच माणसाला विसरत चालला आहे
खरं आहे.

>>>या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी --
माहितीबद्दल धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

13 Jun 2012 - 11:41 am | सुहास..

अरेच्च्या ! ईतक छान छान कस लिहीत येत हो तुम्हाला ;) तुम्ही स्वताचा ब्लॉग का काढत नाही ;)

नाना चेंगट's picture

13 Jun 2012 - 11:47 am | नाना चेंगट

नको नको

तिकडे व्लॉगवर लिहितील आणि इथे एक ओळ लिहून त्याची लिंक देतील--- शकुत्सु

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2012 - 11:53 am | पिवळा डांबिस

तिकडे व्लॉगवर लिहितील आणि इथे एक ओळ लिहून त्याची लिंक देतील--- शकुत्सु
आणि वर आमच्या ब्लॉगचे वाचन 'सशुल्क' आहे असंही म्हणतील----बोंडोपंत
;)

नाना चेंगट's picture

13 Jun 2012 - 11:48 am | नाना चेंगट

>>>रक्ताळ्लेल्या उत्सवात मस्जिदे आणी मंदिरे रंगतात

म्हणूनच आम्ही सांगतो प्रभु येशुच्या मार्गाने जा !! तोच मार्ग दाखविल...

सेंट नाना पीटर

रमताराम's picture

13 Jun 2012 - 12:11 pm | रमताराम

पाश्चात्यांच्या मेकाल्यन शिक्षणपद्धतीचे बळी. पाश्चात्यांचं सगळं काही ग्रेट समजणारे.
'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' असं कुणीसं देशी माणूस (कोण बरं....अं...अं????... जाऊ दे. ते महत्त्वाचं नाही) सांगून गेलंय ते नाय आठवलं तुम्हाला.

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2012 - 12:21 pm | पिवळा डांबिस

पाश्चात्यांचं सगळं काही ग्रेट समजणारे
हाण तिच्या *यला!!
ररांच्या या वाक्यावर माननीय श्री. नाना चेंगट यांची प्रतिक्रिया वाचायला अतिउत्सुक!!!
;)

(नाना, तिच्यायला आमचे जुने धागे वर काढतो काय? आता करू का तुझं उत्खनन!!!!)
:)

नाना चेंगट's picture

13 Jun 2012 - 12:43 pm | नाना चेंगट

अहो पिडाकाका त्या रराचं काही खरं आहे का?
तो इ़कडे एक बोलतो तिकडे दुसरेच बोलतो.
महाचालू आहे तो म्हातारा... :)

बाकी आमच्या उत्खननाबद्दल तुम्हाला आक्षेप आहे का? संध्याकाळपर्यंत तुमचा अजून एक धागा बोर्डावर आणतो. हाकानाका !!

शुध्दलेखनात चांगली प्रगती केलीय.

मृगनयनी's picture

13 Jun 2012 - 4:32 pm | मृगनयनी

स्वप्नातल्या भाकड कथा आज आम्हाला धर्म सांगतात

शकु'जी .. हे वाक्य जरा सन्दर्भासहित स्पष्टीकरण देऊन सान्गाल काय?

मुळात कोणताही धर्म हा स्वप्नातल्या भाकडकथांवर आधारलेला नाही. तसेच प्रत्येक धर्म हा "माणुसकी"च शिकवितो..महम्मद पैगम्बरजी, येशुजी ख्रिस्त...यांनी देखील त्यांच्या समाजाला "माणुसकी" हाच धर्म शिकविला.

लोक त्यांच्या सान्गण्यानुसार वागत नसतील.. तर तो त्या लोकांचा दोष आहे, धर्माचा नाही..
आणि धर्मा'चे कारण पुढे करून जर लोक माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असतील.. तर अश्या लोकांना वेळीच ठेचले पाहिजे...

देव, अल्ला, जीझस... हे सगळे एकच आहेत... म्हणजे जगाचा अफाट पसारा चालवणारी ही एक दिव्य आणि अद्भुत शक्ती आहे.. त्यामुळे आपापल्या संस्कृतीनुसार या दिव्य शक्तीला देव, अल्ला, वगैरे जे काही मानले जाते.... त्यावर पूर्ण विश्वास ठेवून माणुसकीचा धर्म प्रत्येकाने आचरावा.. असे कुराअन-शरीफ, बायबल, भगवद्गीता या सगळ्यांत सांगितलेले आहे...

त्यामुळे कोणत्याही धर्मीयाने इतर धर्मीयांवर कुरघोडी करून स्वतःचा धर्म त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये.. तसे केल्यास ते आचरण माणुसकीच्या विरुद्ध होईल..

_____

त्यामुळे उगीचच कविता सेन्टीमेन्टल करण्यासाठी धर्माला बदनाम करू नये...... ही विनन्ती.. :)

अवांतर - तुम्ही गुगल अ‍ॅलर्ट मध्ये ' धर्म + मिसळपाव ' असा सर्च अ‍ॅलर्ट टाकला आहे का हो ?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2012 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

असा सर्च अ‍ॅलर्ट टाकला आहे का हो ?

आदिजोशी's picture

13 Jun 2012 - 5:57 pm | आदिजोशी

लैच्च सिरियस झालात की ताई :)

मृगनयनी's picture

13 Jun 2012 - 7:05 pm | मृगनयनी

ह्म्म आदि'जी..धर्म वगैरे सेन्सीटिव विषयांबाबत शक्यतो उलटसुलट बोलू नये!!!..... मग तो कुठला का धर्म असेना....

शैलेन्द्र's picture

13 Jun 2012 - 10:05 pm | शैलेन्द्र

"महम्मद पैगम्बरजी, येशुजी ख्रिस्त.." यांच्या जोडीला आदि'जी यांनाही बसवलत ते चांगल केलतं :)
..

५० फक्त's picture

13 Jun 2012 - 11:44 pm | ५० फक्त

ते एक पारले जी बगा ओ जुळतंय का त्यात..

बॅटमॅन's picture

14 Jun 2012 - 12:43 pm | बॅटमॅन

जी जी रं जी जी जी जी जी जी!!!

शिल्पा ब's picture

14 Jun 2012 - 2:45 am | शिल्पा ब

खरंच आहे.
म्हणुनच माणुसकीवर वगैरे जमलं नाही तरी कमीत कमी स्वतःच्याच का होईना धर्मावर विश्वास ठेवावा. पण मग लोकं बाबा, बुवा, माताजी, ठमादेवी, उमादेवी वगैरे यांच्या नादी का लागत असावेत असा एक बारीक प्रश्न माझ्या मनात उमटला इतकंच.