दोनच दिवसाआधी पेपरात एक बातमी वाचली, की विकासाच्या क्षेत्रात बिहारने इतर सगळ्या राज्याना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. एक वेळ अशी होती की लालु गुंडाराज व बाहुबली राज मुळे बिहार देशात विकासात एकदम मागे होता. अतिशय गरीबी, बेकारी , गुंडगिरी , लाचखोरी, अपहरण, स्त्रियांविरोधी वाढते अत्याचार याने बिहारच नाव भारतात व जगातही अतिशय बदनाम झाल होत. अश्या वेळी २००५ मध्ये नितिश कुमार ह्यानी बिहारमध्ये लालु प्रसाद यादवांचा न भुतो न भविष्यति असा निवडणुकीत पराभव केला व बिहारची सत्ता संपादीत केली. मग त्यानी धडाडीने एक एक वि़कासाच्या योजना राबवायला सुरुवात केली. व त्या योजनांच्या अमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष दिले.
आज बिहार मध्ये त्यानी आणलेली परदेशी व देशी गुंतवणु़क ही त्यांच्या व्यवहारी पणाची साक्ष आहे. आज बिहारचा विकास जलद गतीने झाला तर बिहारी लोकांच्या परराज्यात नोकरी करता जाणारा लोंढा आटोक्यात येणार आहे. त्यामुळे ईतर राज्यातील लोकाना त्यांच्या स्वताच्या राज्यात नोकर्या मिळण सोप्प होणार आहे. व भुमिपुत्र व बिहारी लोक ह्यात होणारा त्या त्या राज्यातील नोकरी साठीची भांडण कमी होतील.
म्हणुन नितिशकुमार करत असलेल्या विकासाला माझा मानाचा सलाम.
प्रतिक्रिया
4 Jun 2012 - 4:21 pm | पियुशा
व्वा व्वा चला आता राज ठाकरेंचे काम कमी होइल आता ;)
महाराष्ट्राने बिहारकडुन शिकण्यासारखे आहे कै तरी ;)
बाकी चुकुन आधी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार ह्यांच निधन वाचल होत ,त्याबद्द्ल क्षमस्व :)
4 Jun 2012 - 4:24 pm | निश
पियुशा जी, सही लिहिल आहात.
तुमची पहीली दोन विधान एकदम अचुक सटीक आहेत.
4 Jun 2012 - 4:28 pm | पियुशा
धन्यवाद निशजी :)
असेच वरचेवर धागे काढत जा ,जेणेकरुन मि.पा अन मि.पा.वाचक विचाराने सम्रुद्ध होतील.
5 Jun 2012 - 10:44 am | शैलेन्द्र
मस्त खवट शेंगदाना.. :)
4 Jun 2012 - 6:38 pm | नाना चेंगट
आमच्या काही मित्रांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील :)
4 Jun 2012 - 6:46 pm | रमताराम
गण्याला मागच्या वर्षी पाचवीच्या वार्षिक परिक्षेत १०% गुण मिळाले होते तर गणपाला ९० प्रतिशत. यावर्षी गण्याला पाचवीत ३०% गुण मिळाले तर गणपाला सहावीच्या परिक्षेत ९५% गुण मिळाले होते. आपली गुणवत्ता तिप्पट करून सर्वाधिक गुणवत्ता-वाढीचा वेग राखला म्हणून शाळेने गण्याचा सत्कार केला तर गणपाने चौथीतून पाचवीत जाताना ८०% कडून ९०% वर उडी मारली होती तो वाढीचा वेग (१०%) या वर्षी निम्म्यावर आल्याने मुख्याध्यापकांनी गुणवत्ता-वाढीचा वेग कमी झाल्याबद्दल त्याचा नंबर खाली नेला.
शेवटः गण्या अजून पाचवीतच आहे, गणपा आता सातवीत शिकतोय.....
4 Jun 2012 - 6:50 pm | नाना चेंगट
च च च
हे असले सांखिकी सिद्धांत सांगू नका आम्हाला. ;)
4 Jun 2012 - 7:38 pm | परिकथेतील राजकुमार
आम्हाला असले काही कळत नाही. आम्हाला फक्त किती बिहारी आले आणि किती परत गेले ते सांगा. गेला बाजार बिहार मधला प्याट्रोलचा रेट आणि महाराष्ट्रातला प्याट्रोलचा रेट सांगा. ते नाही सांगता आले तर निदान तिकडे गणपतीला पावसाळ्यात रेनकोट वैग्रे घालतात का ते तरी सांगा.
आणि हो आंतरजालवरती राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि देशांच्या तुलनेत भारत हा कायम मागासलेलाच असतो हे लक्षात ठेवून ह्यापुढे विधाने करत जा.
4 Jun 2012 - 7:51 pm | विकास
आणि हो आंतरजालवरती राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि देशांच्या तुलनेत भारत हा कायम मागासलेलाच असतो हे लक्षात ठेवून ह्यापुढे विधाने करत जा.
=))
नाहीतर उद्याची महाराष्ट्रातील पिढीस नुसतेच "सांगे वडीलांची किर्ती" असे वागायची वेळ येयची... ;)
जोक अपार्ट, आज अमेरीकेत भारत-चीन यांचे विकासदर वगैरे वरून बरेच कौतुक होते पण स्वतः यामुळे मागे पडणार नाहीना आणि आपले श्रेष्ठत्व कसे जगात टिकेल याबद्दल चर्चा होते, आपणच कसे श्रेष्ठ आहोत आणि हे (भारत-चीन) चिल्लर आहेत अशी आत्ममग्नता न ठेवता...
4 Jun 2012 - 7:24 pm | श्रीरंग_जोशी
प्रगतीच्या वेगाची तुलना संयुक्तिक नाही. संख्याशास्त्रीय परिमाण आपल्या जागी ठीक आहेत.
काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानचा विकासदर २२% वर पोचला होता अन त्या वर्षी अमेरिकेचा १% ही नव्हता ; -).
महाराष्ट्राने थोडा आळस दाखवला तरी शेजारच्या राज्यांची भरपूर प्रगती होते ; -).
4 Jun 2012 - 7:33 pm | विकास
गण्या अजून पाचवीतच आहे, गणपा आता सातवीत शिकतोय.....
उदाहरणासंदर्भातील या "तात्पर्याशी" सहमत.
पण सांख्यिकीक्षेत्रात काम करणार्यास विकासाचा दर वाढतो आहे का कमी होत आहे ह्याचे प्रोजेक्शन बघायचे असते हे नक्कीच माहीत असेल. :-) त्या प्रोजेक्शन मध्ये जर महाराष्ट्राचा ग्रोथ रेट डिक्लाइनिंग असेल तर व्यवहारात वरील उदाहरण पटणार नाही.
बाकी मुळ चर्चाविषयासंदर्भातः
बिहार मधे जर अशा सकारात्मक घटना घडत असल्या आणि तसे गेले काही वर्षे, (नितिशकुमार आल्यापासून) ऐकत आहे, तर ते चांगलेच आहे. बिहारसाठीच नाही तर सगळ्या देशासाठी... मात्र, आत्ता महाराष्ट्र आणि बिहारची तुलना करण्याची गरज नाही कारण ती तुलना म्हणजे संत्रे आणि सफरचंदाची तुलना ठरले. अथवा वास्तवातील उदाहरणच देयचे झाले तर, आज अमेरीकेचा वार्षिक जीडीपी ग्रोथ रेट हा १.९% आहे तर भारताचा ५.३% म्हणून आपण अमेरीकेपेक्षा (आत्ताच्या घडीस) जास्त विकसीत आहोत असे म्हणण्यासारखे होईल...
4 Jun 2012 - 7:58 pm | प्रदीप
सहमत.
लेखाच्या सर्वासाधारण भावाशी सहमत. नितीशकुमार चांगले कार्य करीत आहेत. पण
ह्याविषयी , विशेषतः बिहारमधे नेमकी कुठली परदेशी गुंतवणूक केली गेली आहे, ह्याविषयी माहिती करून घेण्यास आवडेल.
4 Jun 2012 - 7:42 pm | जेनी...
पर्याची मतं जरा विस्तारित अशी वाच्चायला जाम आवडतिल :D
5 Jun 2012 - 5:55 am | शिल्पा ब
सारखं आपलं कै झालं की अमेरीकेशी तुलना!
एकदम सगळंच कसं मिळणार कायम प्रयत्न केले तर कैतरी होईल...
5 Jun 2012 - 10:59 am | चिरोटा
म्हणजे बेरोजगार तरुणांना भडकावण्याच्या संधी कमी होतील. असो. दोन्ही राज्यांची महाप्रचंड लोकसंख्या हा एकंदरितच चिंतेचा विषय राहिला आहे.उत्तर प्रदेश्,महाराष्ट्र आणि बिहार ह्या राज्यांची एकूण लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १/३ आहे! त्यामुळे ह्या तिन्ही राज्यांपैकी सा़क्षरता,रोजगारी वाढली तर ते भारताच्या फायद्याचेच असणार आहे.
5 Jun 2012 - 12:53 pm | अमितसांगली
यांना रणवीर सेनेचा पराक्रम बहुतेक माहित नाहि अजून.....असो ....माहित झाल्यावर अजून एक धागा काढतील....