जर एखाद्या भारतीय क्रिडापटूला भारतरत्न द्यावयाचे झाले तर ते प्रथम कोणाला द्यावे?
पर्याय - १ : हॉकीचा जादुगार ध्यानचंद (२९-८-२००५ ते ३-१२-१९७९)
क्रिकेट मध्ये जेवढा डॉन ब्रेड्मन ग्रेट व अव्दितीय तसाच हॉकीत ध्यानचंद. त्याचे गोल करण्याचे कौशल्य वादातीत होते. त्याने एकूण कारकिर्दीत १००० पेक्षा जास्त गोल केले. यापैकी ४०० गोल त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात केले होते. असे वाचले व ऐकले आहे कि तो सामन्यात सहभागी असेल तर ध्यानचंदचे जादूचे प्रयोग पहावयास अवश्य मैदानात या अशी जाहिरात त्या काळात केली जात असे. १९२८, १९३२ व १९३६ मध्ये त्याने भारतीय हॉकी संघाला ऑलिंपीक सुवर्ण पदक मिळ्वून दिले. त्याचे चेंडूवरील नियंत्रण अफलातून होते, असे म्हणतात कि लोखंड जसे लोहचुंबकाला चिकटून बसतं तद्वत चेंडू त्याच्या हातातील स्टिकला चिकटत असे. त्याने भारतीय सैन्यदलात प्रदिर्घ सेवा केली. वयाच्या ५१ व्या वर्षी तो मेजर म्हणून रिटायर झाला. १९३६ बर्लीन ऑलींपीक नंतर हिटलरने त्यला जर्मनीचे नागरिकत्व व सैन्यदलात अधिकारी होण्याची ऑफर दिली होती ती त्याने नम्रपणे नाकारली होती.
पर्याय - २ : विश्वनाथन आनंद (११-१२-१९६९ चा जन्म)
१९८८ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी ग्रा. मास्टर किताबाचा मानकरी होणारा पहिला भारतीय बुध्दीबळपटू. वर्ष २०००, २००७, २००८, २०१० व २०१२ पांच वेळा जगज्जेता. म्हणजेच २००७ पासून तो सतत ५ वर्षे चॅम्पीयन आहे. १९९१-९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरःस्काराने सन्मानीत. २८०० चे रेटींग मिळवणारा ज्गातील फक्त ६ बुध्दीबळपटू पैकी एक. बुध्दीबळाच्या सर्व चारी प्रकारच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले (एकमेव).
पर्याय - ३ : सचिन तेंडूलकर ( २४/४/१९७३ चा जन्म)
भारताचा सार्वकालीन ग्रेट फलंदाज. २३ वर्ष क्रिकेट कारकिर्द. १०० आंतराष्ट्र्रीय शतके. कसोटीत सर्वाधीक ५१ शतके. एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक ४९ शतके. जंटलमन खेळाडू.
वरील तिघेही ग्रेट खेळाडू आहेतच, तिघेही भारतरत्न साठी एलिजीबल दावेदार आहेत. पण तुम्ही भारतरत्न पुरःस्कारासाठी वरीलपैकी एकालाच प्रथम निवडावयाचे असल्यास कोणाला निवडाल.
प्रतिक्रिया
2 Jun 2012 - 4:01 pm | प्रास
हे हो काय? मग आता हेच मूळचे 'बेन्जामिन बटन' मानायचे का?
बाकी, लूक्स लैक, शिळ्या कढीला उत.....!
आमचा पास..... बोर झालं आता, या विषयावर काही लिहायला.
2 Jun 2012 - 4:03 pm | दिपक
2 Jun 2012 - 4:05 pm | रमताराम
'शाहरुख खान'चे नाव नसल्याने पास.
2 Jun 2012 - 4:13 pm | प्यारे१
तुम्हाला ज्याला द्यायचंय त्याला देऊन टाका.
तसं नसेल जमत तर नावाच्या चिठ्ठ्या टाका. हाय काय आन नाय काय!
नायतर क्रिडापटू भारतात जास्त नाहीतच. 'शिनॅरीटी' नं लाईन लावा आन दोगं दोगं दरवर्षी... होऊन जाऊ दे!
2 Jun 2012 - 4:23 pm | चिरोटा
हॉकीत ऑस्ट्रेलिया नंबर १ आहे. तिकडच्या कोणाला ऑस्ट्रेलियारत्न मिळाले आहे का? ब्रॅडमन ह्यांना सिडनीभूषण मिळाले होते का? कॅस्परॉव/कारपॉव ह्यांना रशियारत्न मिळाले आहे का?
2 Jun 2012 - 4:23 pm | प्रचेतस
एकमेव मे. ध्यानचंद.
क्रिकेटपटुला द्यायचेच झाले तर आधी गावसकर, द्रविड, कुंबळे आहेत.
भले आकडेवारीत सचिनपेक्षा सरस नसले तरी काय झाले.
2 Jun 2012 - 4:45 pm | निश
अजित आगरकर नाहीतर वेंकटेश प्रसादला द्या.
बहुतेक जगात क्रिकेट खेळणार्या देशात शुन्यावर आउट व्हायचा पराक्रम ह्याच दोन महामानवांच्या नावावर असावा.
अजुन एक राहीलाच , मणिंदर सिंग.
2 Jun 2012 - 8:57 pm | मोदक
भारतीय संघाच्या हजेरीपटावर अत्यल्पकाळ हजेरी लावल्याबद्दल खालील खेळाडूंचा पण विचार व्हावा.
डोडा गणेश
देबाशीश मोहंती
सलील अंकोला
सबा करीम
आशीष कपूर
सुनील जोशी (हा थोडे जास्त दिवस टिकला!)
बाकी आधीच्या काळातले
मदन लाल (याच्या फास्ट बॉलचा वेग पाहून याचे नाव "मॅडम लाल" असे पडले होते असे ऐकीवात आहे.)
सुनील वॉल्सन. (१९८३ च्या टीम मधला प्रवासी..)
लिस्ट मध्ये भर घालावी ही नम्र विनंती.. ;)
2 Jun 2012 - 5:39 pm | भरत कुलकर्णी
मी व भारतरत्न
देवून टाका व विसरुन जा: भारतरत्न कुणाही क्रिडापटूला देवून टाका. भारतीय जनता त्यांना विसरून जाईल. नाहीतरी सारी भारतीय जनता भारताचीच रत्ने आहेत.
हे आवर्जुन करा: 'कुणाही पुढारी, तत्ववेत्ता, आमदार, खासदार, नामदार, दमदार यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे' असे आंदोलन करण्यासाठी जी राजकीय अराजकीय संघटना आंदोलन करेल त्या आंदोलनांना मान डोलावून पाठिंबा द्या.
हे करू नका: त्या त्या संघटनांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका. या पृथ्वीतलावरून आपला अवतार समाप्त होवू शकतो.
लक्षात ठेवा: भारतरत्न हे पुढेमागे एखाद्या सोनारकाम करण्याच्या दुकानात मिळेल याची खात्री बाळगा.
नागरिकांना काय परतावा मिळेल?: आपणाला सुख शांती मिळेल. जास्त भारतरत्नाचा ध्यास घेतल्यास जास्त नुकसान होवू शकेल.
टिप: मी कोणीही जोतिष,राजकीय भविष्यवेत्ता, विचारचिंतक, अनुमोदक नाही. भारतरत्नाची मागणी ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर, आर्थीक, शारिरीक कुवतीवर करावी.
2 Jun 2012 - 7:07 pm | jaypal
लै भारी बरका !!! भरतराव
2 Jun 2012 - 7:05 pm | पक पक पक
वन अँड ओन्ली --- एस श्रिसंत....
2 Jun 2012 - 10:47 pm | बटाटा चिवडा
"अबे कुरूविला" मध्ये मी खुप वर्षापासून एक भारतरत्न पाहत आलो आहे..............
2 Jun 2012 - 10:52 pm | भरत कुलकर्णी
बाकी त्या तिथे पलिकडल्या घरात पुनम ताई पांडे यांच्या नावाची चर्चा चालू आहे भारतरत्नासाठी.
काम ही सुद्धा एक क्रिडा आहेच की.
इच्छूकांनी त्या प्रतिस्पर्ध्यांची नावे सुचवावीत.
माझे सजेशन:
राखीजी सावंतजी मॅडम
वीणाजी मलीकजी मॅडम (भारतरत्नासाठी भारतीय व्यक्तीच पाहीजे असा काही कायदा नाही हं. आधीच सांगून ठेवतो. उगाच वाद नको.)
2 Jun 2012 - 11:00 pm | जोशी 'ले'
लालुप्रसादचा मुग्गा क्रिकेट खेळतो असं ऎकुन आहे
3 Jun 2012 - 7:12 pm | पक पक पक
रिंगण खेळ्ताना १०० गोट्या जिंकल्याचा आमचा रेकॉर्ड आहे...आमचा विचार होईल का...? ;)