युके कट्टा....

ब्रिटिश टिंग्या's picture
ब्रिटिश टिंग्या in काथ्याकूट
7 Aug 2008 - 2:05 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मागे काही दिवसांपुर्वी मिपाचे इस्ट-कोस्ट अन् जर्मनीत बॅक टु बॅक कट्टे झाले. त्याच धरतीवर युकेतही (परत एकदा) कट्टा भरवावा अशी अस्मादिकांना इच्छा झाली.
त्यातच भर म्हणुन की काय, मिपाचे 'निवृत्त' विडंबनाचार्य केशवसुमार यांचेही या महिन्यात युकेत आगमन होत आहे.
हा त्रिवेणी (का द्विवेणी) संगम साधत युकेत कट्टा भरविणे आणि उत्सुक असणार्‍या सभासदांबरोबर या कट्ट्याची पुर्वतयारी करणे या करिता हा सगळा प्रपंच!

असो, केसुशेठ दिनांक २३ ऑगस्ट रोजी 'मोकळे' असल्याने कट्टा याच दिवशी भरवण्याचा मानस आहे.
तरी इच्छुकांनी अधिक माहिती करिता मला अथवा केशवसुमारांना व्यनि करणे.....

सहभागी होणारे सभासद मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करु शकतात.
माझा भ्रमणध्वनी क्र. -> ०७९१८७२२२५६

निवेदन संपले!

- (ब्रिटिश) टिंग्या :)
संयोजक,
युके मिपा कट्टा क्र. २

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 Aug 2008 - 2:15 am | विजुभाऊ

मी येईन . दिसत नसलो तर माझ्या नावाचे चार शिंतोडे उडवा

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 10:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी सांगितलं असतं तर मी आले असते पण आता एक वर्ष उशीर झाला, २३ ऑगस्टला राणीच्या शहरात येण्यासाठी!
प्रश्न: राणीला बोलावणार का?

कोलकोता आहे....कोलकोता भारतात आहे

ब्योमकेश बक्षी

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2008 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते

घ्या... आत्तापर्यंत मला वाटत होतं की माझा फक्त इतिहासच कच्चा आहे... च्या मारी सामान्य ज्ञान पण सामान्यच आहे की माझं. मला वाटलं की राणी म्हणजे इंग्लंडाची आणि ती तर लंडनात असते... आज नविन माहिती कळली.... (का हे राणी मुखर्जी बद्दल म्हणताहेत?) :?

बिपिन.

II राजे II's picture

7 Aug 2008 - 5:20 pm | II राजे II (not verified)

>>आत्तापर्यंत मला वाटत होतं की माझा फक्त इतिहासच कच्चा आहे...

आमचा पण कच्चा !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... मुंबईत रहाते ना?

मी तर बाबा लंडनच्या राणीबद्दलच बोलत होते ब्वा!

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2008 - 5:31 pm | बिपिन कार्यकर्ते

मग ठरलं तर, माझं सामान्य ज्ञान नक्कीच कच्चं आहे, कन्फर्म्ड. (शेवटचा ड पूर्ण, कारण तसं माझं उच्चारज्ञान पण बेक्कारच आहे). आणि भरीत भर म्हणजे मी राणी मुखर्जी कोलकात्याला राहते असं समजत होतो.

बिपिन.

अवांतर : आत्ता पर्यंत इतिहास कच्चा म्हणून प्रियालीताईच्या वाटेला कध्धी कध्धी नाही गेलो. आता बहुतेक कोणाच्याच वाटेला जायचं नाही असंच ठरवलंय. :''(

II राजे II's picture

7 Aug 2008 - 5:40 pm | II राजे II (not verified)

भाऊ बिपिन माझं सामान्य ज्ञान तर अजून उगवलंच नाय... ;)

धन्य आहे !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2008 - 5:45 pm | बिपिन कार्यकर्ते

हे माझं अजून एक अज्ञान.... सामान्य ज्ञान उगवतं ? ~X(

देवा परमेश्वरा, अजून किती जाणीव करून देणार आहेस सत्य परिथितीची??? :''(

बिपिन.

II राजे II's picture

7 Aug 2008 - 5:51 pm | II राजे II (not verified)

देवा परमेश्वरा, अजून किती जाणीव करून देणार आहेस सत्य परिथितीची???

:)

उगी उगी !!

आता बास कर नाय तर ... आपल्याला येथून बाहेर काढतील... खुप आवांतर झाले ;)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!