प्यार्टी साठी मदत हवी आहे

Primary tabs

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
31 May 2012 - 12:05 pm
गाभा: 

नमस्कार्स.

आमच्या एका मित्रवर्यांच्या प्रगट दिना निमित्त ह्या रविवारी प्यार्टी करण्याची योजना आखणे चालू आहे. साधारण १० ते १२ लोक्स ह्या संमेलनाला हजर असतील. संमेलनाचे ठिकाण सुचवण्यासाठी मिपाकरांची मदत हवी आहे.

१) संमेलन स्थळ पुण्यापासून साधारण १.३० ते २ तासाच्या अंतरावरती असल्यास उत्तम.

२) ठिकाण शक्यतो शांत आणि थोडाफार निसर्ग आजूबाजूला असल्यास उत्तमच.

३) सर्व संमेलक हे कावेरी विद्यापीठाचे स्नातक असल्याने त्यांना मदिरा आणि गिळायला अन्न ह्याची आवश्यकता आहेच. मदिरा आपली स्वतःची आणण्याची सोय उपलब्ध असल्यास अती उत्तम.

४) स्वतःच्या गाड्या असल्याने जाण्या येण्याचा प्रॉब्लेम नाही.

५) एखादे छानसे हॉटेल, धाबा, फार्म हाऊस अथवा तुमच्या नजरेत ह्या सगळ्या सोयींनी सजलेले एखादे ठिकाण असल्यास जरुर कळवावे.

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

31 May 2012 - 12:10 pm | सुहास..

काही मुलभूत प्रश्न

१ ) पार्टीचा टायमिंग काय आहे ?

परिकथेतील राजकुमार's picture

31 May 2012 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

सकाळी निघून संध्याकाळी परत असा प्लॅन आहे.

गवि's picture

31 May 2012 - 12:14 pm | गवि

-कार्ला एम आय डी सी.

किंवा

- मुळशी लेकसाईड रिसॉर्ट

सर्व अटीत बसणारे.

विजुभाऊ's picture

31 May 2012 - 12:13 pm | विजुभाऊ

ज्येष्ठ जाणकार श्री श्री डानराव यांच्यावर प्यार्टीची तयारी सोपवल्यास बराच फरक पडेल.

नरेश_'s picture

31 May 2012 - 12:20 pm | नरेश_

नाना देणार आहेत वा नानाचे मित्रवर्य देणार आहेत, ते सपष्ट सांगा राव.
हवांतर : बारामतीकर कुठे दिसेनात हल्ली ?

गणामास्तर's picture

31 May 2012 - 12:39 pm | गणामास्तर

१) पॅराडाईज रिसॉर्ट - मुळशी धरणा जवळ

चांदणी चौकातुन पिरंगुट कडे जाणार्या रस्त्यावर पिरंगुटच्या अलिकडे तळ्याकाठी मानस रिसॉर्ट आहे,हा सुद्धा चांगला पर्याय
आहे. तळ्याच्या पलिकडे अजुन एक चांगले हॉटेल आहे त्याचे नाव आत्ता आठवत नाही.
परंतु या दोन्ही ठिकाणी स्वतःची मदिरा आणलेली चालत नाही.

+१
बेश्ट हॉटेल आहे...

धुमकेतू's picture

1 Jun 2012 - 12:00 pm | धुमकेतू

त्या हॉटेलचे नाव " सरोवर " असे आहे ......

मितालि's picture

31 May 2012 - 12:39 pm | मितालि

http://www.facebook.com/pages/Rohans-Farm-Cottage-Mulshi/153819954683714
हे फार्म हाउस बघ मुळ्शी पासुन जवळच आहे..

मितालि's picture

31 May 2012 - 12:39 pm | मितालि

http://www.facebook.com/pages/Rohans-Farm-Cottage-Mulshi/153819954683714
हे फार्म हाउस बघ मुळ्शी पासुन जवळच आहे..

मितालि's picture

31 May 2012 - 12:39 pm | मितालि

http://www.facebook.com/pages/Rohans-Farm-Cottage-Mulshi/153819954683714
हे फार्म हाउस बघ मुळ्शी पासुन जवळच आहे..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

31 May 2012 - 1:18 pm | घाशीराम कोतवाल १.२

मुमई ला या सगळी सोय करतो तयार असाल तर फोन करा

स्वगत च्यायला घाश्य एव्हड निमंत्रण देवुन पण लोक येतील का?

विनायक प्रभू's picture

1 Jun 2012 - 1:39 pm | विनायक प्रभू

सगळी सोय?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Jun 2012 - 4:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

मास्तरानु खाण्याची नि पिवाची फक्स्त
बाकि जागा दाखवु तिथे स्वताच्या पैश्यानी जावे

रमताराम's picture

31 May 2012 - 1:36 pm | रमताराम

मला आवतान आहे का? तरच फुडले इचारा नायतर फुडल्या घरी जा कसे.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 May 2012 - 1:56 pm | llपुण्याचे पेशवेll

असेच म्हनतो.

परिकथेतील राजकुमार's picture

31 May 2012 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार

गाँव बसा नही... लुटेरे पेहले आ गये.

मन१'s picture

1 Jun 2012 - 3:22 pm | मन१

गावाकल्डे म्हन्तात
दे आवतान नाय तर उगार पायतान!

स्पा's picture

31 May 2012 - 1:53 pm | स्पा

येउ का?

जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का बघा बरं ? तुम्ही घातलेल्या बहुतेक सगळ्या अटीत बसतंय.

जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का बघा बरं ? तुम्ही घातलेल्या बहुतेक सगळ्या अटीत बसतंय.

रघु सावंत's picture

31 May 2012 - 4:33 pm | रघु सावंत

स्पस्टच इचारतो आमच काय , आमाला कुनी नेनार कि नाय ?

तिमा's picture

31 May 2012 - 5:44 pm | तिमा

प्यार्टी = प्यार + टी ???
कट्टा, पार्टी व प्यार्टी यातील फरक नाही कळला.

सोत्रि's picture

31 May 2012 - 8:01 pm | सोत्रि

असो!

पर्‍या, मागच्या एका पार्टी आयोजनाचे पैसे येणे बाकी आहेत, ते देणे झाल्यास हवी असणारी सर्व माहिती आनंदाने पुरवून, पुढची सोयही करण्यात येईल ह्याची नोंद घेण्यात यावी.

- ( इव्हेंट मॅनेजर) सोकाजी

आशु जोग's picture

2 Jun 2012 - 5:40 pm | आशु जोग

सोकाजी

शब्द जपून वापरा हो !
(शब्दा शब्दात घुसणारा) जोग

--

जेनी...'s picture

31 May 2012 - 9:02 pm | जेनी...

निरागस प्रश्न , निरागस प्रतिसाद. :

कवितानागेश's picture

2 Jun 2012 - 6:04 pm | कवितानागेश

मी येउ का इंटरव्हेन्शन करायला ? :P

नाना चेंगट's picture

2 Jun 2012 - 6:47 pm | नाना चेंगट

काय झालं मग शेवटी प्यार्टीचं? जास्ती पिऊ नका हो दारु.. ;)

कुठल्याही आडवळणावर थांबा, तुम्हाला हवी ती जागा सापडेल