माहिती हवे आहे.. पेट्रोल फ्रॉड पुणे - हिंजवडी

किशोरअहिरे's picture
किशोरअहिरे in काथ्याकूट
30 May 2012 - 9:31 am
गाभा: 

सध्या हिंजवडी येथे फेज १ ला जो इंडियन ओईल चा पेट्रोल पम्प आहे तिथे पेट्रोल च्या ठिकाणी हवा भरण्यात येते आणि मीटर चालू राहते :(
ह्या बद्दल कोणी काही मदत करू शकेल का?
किंवा कोठे आणि कशी तक्रार करायची हे तरी सांगू शकाल का?
जर पेट्रोल ४०० रु. च्या वर भरायचे असेल तर असा अनुभव येतो..
तिथले काम करणारे लोक.. २००-३०० रु. होई पर्यंत मीटर चालु राहिल आणी पेट्रोल पडतच नाही अश्या प्रकारे पेट्रोल टाकले जाते.. :(
आणी थोड्या वेळाने बरोबर सर्व मिटर बंद होते आणी कारण सांगतात लाईट गेली आणि आता जनरेटर वर चालु करणार..
मग ऊरलेल्या पैशाचे पेट्रोल टाकले जाते.. म्हणजे जर तुम्ही १०००रु. चे पेट्रोल सांगितले तर तुम्हाला ७००-८०० रु. इतकेच पेट्रोल मिळते..
माझ्या ऑफिस मधील तब्बल १५-२० जणांना हा सेम अनुभव आहे ..
नेमके काय करता येईल हे थांबण्यासाठी ???

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 May 2012 - 9:37 am | प्रचेतस

पंप बदला.

किशोरअहिरे's picture

30 May 2012 - 9:45 am | किशोरअहिरे

पंप बदलुन काय फायदा?? आणी किती वेळेस/ किती ठीकाणी हेच करत बसणार.???
आपल्या कडे ही मानसीकता कधी बदलेले.. स्वता : वाचलो की झाले.. बाकीचे फसले तर फसु देत..
आता मी ही पंप बदलला तर बाकीचे माझ्या सारखे फसतीलच ना?? ह्याचा विचार कुणी का करत नाही??
त्या पेक्षा पंप वाल्याला बदला किंवा बदला घ्या असे म्हणाला असता तर चांगले वाटले असते..

प्रचेतस's picture

30 May 2012 - 9:55 am | प्रचेतस

मग मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढा.

@ किशोर अहिरे
तुम्ही सरळ सरळ फोलिस तक्रार करा ,नाहीतर ग्राहक मंचाकडे जा
पेट्रोलचे भाव इतके वाढलेले असताना असा फसवा धंदा ?शिव शिव शिव काय होणार या देशाचे ?
बिचारे अण्णा हजारे !

या वल्ली अन पियुशाकडे अजिबात लक्ष देउ नका.
फोलिस काय पण करणार नाय..फारतं त्यांचा हप्ता वाढंन.

माझं ऐका..जितक्या लोकांना असा अनुभव आलाय त्यांनी मिळुन त्या पंपाचा मालक असताना जा. त्याची गच्चम धरा अन जाब विचारा. जरा आरडाओरडा करा (त्याशिवाय आपल्याकडे कैच होत नै!) अन त्या पंपाच्या बाजुला एक बोर्ड घेउन (ज्यावर मोठ्या अक्षरात संक्षिप्तपणे - पेट्रोलच्या ऐवजी हवा भरुन फ्रॉड करताहेत वगैरे- असं लिहुन) एक आठवडाभर धंद्याच्या टैमाला उभे रहा.. आपल्याकडच्या लोकांचंही कै सांगता येत नै म्हणा...बघा फरक पडतोय का.

नै म्हणजे तुम्ही बाकीच्या लोकांची सुद्धा काळजी वगैरे सामाजिक बोल्लात म्हणुन मी आपला सल्ला दिला जो उपयुक्त ठरु शकतो.

इरसाल's picture

30 May 2012 - 10:46 am | इरसाल

तुम्ही त्यांची हाडं नरम करायचा सल्ला देताय.
बोर्ड घेवुन ते पण धंद्याच्या टायमाला............बुकलुन काढतील हो.

किशोरसायेब हितं ट्राय मारा बगु
http://www.consumercourtforum.in/f17/complaint-regarding-indian-oil-corp...

Nitin Palkar's picture

14 Jul 2017 - 12:14 pm | Nitin Palkar

इरसाल भाऊ,
तुम्ही दिलेला दुवा बंद हे.
This Domain Name Has Expired - Renewal Instructions.

बाळ सप्रे's picture

30 May 2012 - 10:41 am | बाळ सप्रे

इंधन भरताना ५००/१००० रु. चे भरण्याऐवजी काटा लाल खुणेच्या खाली आल्यावर टाकी पूर्ण भरावी.
ज्यायोगे तुम्हाला नक्की सांगता येइल की किती लिटर भरल्यावर टाकी भरते. (+/- ५% अचूकतेने)..
टाकीची क्षमता आणि लाल खुणेला किती इंधन असते हे गाडीच्या माहितीपुस्तकात लिहिलेले असते.

टाकी पूर्ण भरताना सेन्सरने थांबवल्यावर थांबावे, राउंड फिगर करण्यासाठी गाडी हलवून इंधन भरू नये.

कवटी's picture

30 May 2012 - 10:45 am | कवटी

टाकी पूर्ण भरताना सेन्सरने थांबवल्यावर थांबावे, राउंड फिगर करण्यासाठी गाडी हलवून इंधन भरू नये.
का?
असे डबा हलवून पिठ भरल्यासारखे लै लोकाना पेट्रोल / डिझेल भरताना पाहिलय म्हणून विचारतोय.

बाळ सप्रे's picture

30 May 2012 - 11:06 am | बाळ सप्रे

सेन्सर एक विशिष्ट पातळी ओळखतो. त्यानंतर इंधन भरल्यास वरील इंधन मोजता येत नाही.
आणि मूळ हेतू जो आहे की "किती इंधन भरल्यावर टाकी भरते हे समजणे" तो साध्य होत नाही.

याखेरीज इंधनाच्या वाफेला जागा वगैरे मुद्दे "शिल्पा ब" यांच्या प्रतिसादामुळे समजले..

मन१'s picture

30 May 2012 - 11:16 am | मन१

माझ्या माहितीत जेवढ्यांनी तिथून पेट्रोल भरलय त्या सर्वांची अशीच वाट लाग्लिये.
आम्ही पडलो मवाळ.
आम्ही सरळ शेल च्या पंपातून भरू लागलो. थोडिशी रक्कम जास्त जाते, पण पेट्रोल पूर्ण भरल्याअचे समाधान, शिवाय अ‍ॅवरेजही चांगला येतोय बाइकचा.

एकदोन वेळा चाचणी घेऊन सिद्ध करण्यासाठी मिलीलीटरच्या खुणा केलेल्या कॅनमधे पेट्रोल घ्यावे. अर्थात ही लबाडी खरेच करत असले तर ते कॅनमधे पेट्रोल देत नाही असंच म्हणतील. कॅनमधे बिनबोभाट दिले तर मग क्वांटिटी दिसेलच.

शिवाय २००-३३० चे झाल्यावर मीटर बंद. मग लाईट गेली आहे असं सांगून जनरेटर चालू करतो असं सांगणे इत्यादि मोडस ऑपरेंडी जी तुम्ही वर्णन केली आहे ती "सबब सांगणे" या प्रकारची ऑपरेंडी आहे.. तस्मात ती एकाच पंपावर पुन्हापुन्हा आणि एकापेक्षा जास्त वेळा एकाच गिर्‍हाईकावर चालण्यासारखी नाही. पेट्रोल पंपावर सदैव गिर्‍हाईके येतजात असतात आणि त्यात रिपीट गिर्‍हाईकेही असतात.. सर्वांचे चेहरे लक्षात ठेवून ही फ्रॉडची पद्धत पाळणं कठीण आहे. तेव्हा असा प्रकार खरेच आहे का याची आधी खात्री करावी.

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2012 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार

एकदा मिपाच्या बोर्डावरती एखादा विषय आला की पार तिकडे सोनीयाबैंपासून ते ओबामापर्यंत सगळे हादरतात.

तुम्ही आज संध्याकाळी पुन्हा पंपावरती जाऊन बघा, तुम्हाला अतिशय सुखद अनुभव येईल. रादर मिपावरती हा विषय मांडणारे तुम्ही आहात हे त्या पंपवाल्याला कळाले तर चक्रवाढ व्याजाने मागचे प्याट्रोल देखील देऊन टाकेल बघा तो तुम्हाला.

भारीच बॉ इनोदी तुमी.

किशोरअहिरे साहेब, इंडीयन ऑइल च्या पुणे डीवीजन ला फोन करुन किंवा प्रत्यक्ष भेटुन त्याच बरोबर जर त्या १० ते १५ जणांच्या तक्रार पेपर वर सह्या घेउन जर तो तक्रार पेपर तिथे नेऊन दिलात तर अश्या तक्रारीवर लगेच कारवाई होते.

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 12:19 pm | कपिलमुनी

हाय काय नाय काय !!

बोला, हे सर्व नंबर पेट्रोल पंपावर दिलेले असतात. त्या मॅनेजरच नांव आणि फोन केल्याची तारीख आणि वेळ यांची नोंद ठेवा, तुमचं नांव आणि फोन नंबर बिनधास्त द्या. तुमच्या समक्ष चेकींग होईल, कंपनीच्या तिथे असलेल्या पाच लिटर कॅनमधे रितसर पेट्रोल सोडून तुम्हाला कॅन पूर्ण भरतो की नाही हे दाखवतात आणि तो भरला तर तुमची कंप्लेंट मेमोवर सही घेतात. पेट्रोल कमी भरलं तर रितसर पेपर कंप्लेंट करुन तुमच्या दृष्टीनं कमी आलेल्या (दोन-तीन महिन्यांच्या) पेट्रोलच इंडियन ऑइलकडे काँपेन्सेशन क्लेम करा. एकदम बिनधास्त रहा, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही कारण मालकाला इतक्या मोक्याच्या जागी असलेल्या पंपाच्या डिलरशिपची काळजी असते. निदान तुम्हाला तरी तिथले लोक वचकून राहतील. काही लागलं तर मला व्य. नि. करा कारण मी स्वतःही प्रोसिजर हँडल केली आहे.

इतर बाधित लोक आपल्याला मदत करतील किंवा नाही यावर अजिबात अवलंबून राहू नका, आपले प्रश्न आपल्यालाच लीड घेऊन सोडवावे लागतात

नाना चेंगट's picture

30 May 2012 - 2:19 pm | नाना चेंगट

एकावेळी ४०० रु च्यावर पेट्रोल टाकण्याची आपली ऐपत आहे हे जाहीर करण्याचा केविलवाणा प्रयत्न

संपादित

इष्टुर फाकडा's picture

30 May 2012 - 5:22 pm | इष्टुर फाकडा

इतकं चिडायला काय झालं ?

चिंतामणी's picture

30 May 2012 - 6:12 pm | चिंतामणी

चार्शे रुपड्यात किती पेट्रोल येणार? आणि पिं.चिं.म.न.पा.च्या हद्दीत पुण्यापेक्षा प्रती लिटर ५०-६० पैसे जास्त लागतात.

या हिशेबाने ५ लिटर जेमतेम मिळेल हो. जर खरेच टाकीत सोडले तर.

बॅटमॅन's picture

30 May 2012 - 6:14 pm | बॅटमॅन

इतकी जळजळ??? इनो??ओवा?हवाबाण??पुदिन हारा?

मळमळ आणि जळजळ अशा भाषेत व्यक्त केल्याबद्दल संमंने इकडे लक्ष घालावे असे सुचवतो.

कपिलमुनी's picture

30 May 2012 - 6:20 pm | कपिलमुनी

नाना , तुम्हाला एवढा त्रास का हो ??

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2012 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

येवढा का भडकला बे ?

घे आपले शटर खाली आणि ये इकडे, मारु दोन दोन घोट. कालची वाईन संपवून टाकू.

विजुभाऊ's picture

30 May 2012 - 6:34 pm | विजुभाऊ

ग्राहक संघात जा तेथे वजने मापे या विषयी मार्गदर्शन मिळेल

अविनाशकुलकर्णी's picture

30 May 2012 - 7:13 pm | अविनाशकुलकर्णी


याचा उपयोग बंद झाला अन बल्ल्या झाला.
पुर्वि नरसाळ्यात नळी टेकवायचे त्या मुळे पेत्रोल पडत आहे ते दिसत असे.

हल्ली टाकिच्या भोकात नळी घालतात त्या मुळे आत पेत्रोल किति पडते ते कळतच नाहि..
या वरुन आमचे वाद पण झाले पण माघार घ्यावी लागली.

दादा कोंडके's picture

30 May 2012 - 10:26 pm | दादा कोंडके

अश्लिल प्रतिसाद! :)

टवाळ कार्टा's picture

31 May 2012 - 7:12 am | टवाळ कार्टा

_/|\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Oct 2014 - 3:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

थोडी गंमत वाटेल पण एक नरसाळे विकत घेउन टाकतो...पेट्रोल भरायला गेले की लावले नरसाळे...सगळे समोर दिसेल

मलातर पारदर्शक टाकी बनवायचा विचार सुचला होता :)

काळा पहाड's picture

9 Oct 2014 - 4:19 pm | काळा पहाड

त्यापेक्शा पारदर्शक कारच घ्याना. हाकानाका.

आशु जोग's picture

10 Oct 2014 - 3:30 pm | आशु जोग

स्वयंसेवा दिली तर

टू विलर असेल तेव्हा तुम्ही कितीही वेळा तीनशेचं पेट्रोल भरा, तुमच्या लगेच लक्षात येईल!

दादा कोंडके's picture

31 May 2012 - 11:59 pm | दादा कोंडके

मागे बंगळुरुमध्ये एकानं (बहुतेक) तवेरा गाडी फुल टँक करायला सांगितलं. टाकीत अधिच थोडसं पेट्रोल होतं. पेट्रोल भरल्यावर मिटर ६२ लिटर्स दाखवत होतं! त्याची फ्युएल कपॅसीटी ५५ लिटर्स होती. :)
त्यानं लगेचच बोंबाबोंब केली. तिथं नियमीत ग्यास भरणारे रिक्षावाले खवळले आणि तो पंप बंद पाडला होता.

आनन्दा's picture

31 May 2012 - 10:53 am | आनन्दा

स्टिन्ग ऑपरेशन बद्दल आपले काय मत आहे?

आशु जोग's picture

9 Oct 2014 - 1:07 pm | आशु जोग

पेट्रोली धाग्यांमुळे या धाग्याची आठवण झाली

हा अतिशय माहितीपूर्ण धागा आहे

आशु जोग's picture

14 Jul 2017 - 8:11 am | आशु जोग

पेट्रोलपंपातून प्रत्यक्ष खरेदीपेक्षा कमी मापाचे पेट्रोल देऊन ग्राहकांची लुबाडणूक करण्याच्या कटकारस्थानाचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या तावडीत सापडल्यामुळे

http://www.loksatta.com/thane-news/petrol-cam-issue-in-thane-1511164/

मराठी_माणूस's picture

14 Jul 2017 - 10:33 am | मराठी_माणूस

ह्यात ज्या पेट्रोल पंप वाल्यांनी ते उपकरण बसवेले आहे तेही तितकेच किंबहुना जास्त जबाबदार आहेत . त्या सुत्रधाराने डोके लाउन उपकरण बनवले असेल पण पेट्रोल पंप मालकांनी ते का बसवु दिले.
खरा गुन्हेगार चाकु भोसकणारा की चाकु विकणारा ? (हे उदाहरण जरी चपखल नसले तरी "मुख्य सूत्रधार" ह्या शब्दां साठी दिले आहे)

संजय पाटिल's picture

14 Jul 2017 - 1:36 pm | संजय पाटिल

खरा गुन्हेगार चाकु भोसकणारा की चाकु विकणारा ?

सहमत!!!

स्थितप्रज्ञ's picture

15 Jul 2017 - 10:48 am | स्थितप्रज्ञ

आपण घाईत असल्याचा हे लोक फायदा घेतात. त्यांना खालील गोष्टींवरून समजते कि आपण किती घाईत आहोत..
१. रांगेत उभे असतानाच हातात पैसे/पाकीट/कार्ड तयार ठेवणे
२. टाकेचे झाकण आधीच उघडून ठेवणे
३. पेट्रोल भरताना गाडीवरून न उतरणे....इ इ इ

त्यापेक्षा आपल्याला कोणतीच घाई नाही असे दाखवा. शिवाय पूर्ण तसल्ली झाल्याशिवाय पैसा काढायला खिशात हातही घालू नका. "खोटेपणा पकडला गेला तर हा माणूस पैसेच द्यायचा नाही" असे psychological प्रेशर त्या कर्मचाऱ्यावर राहते.

महत्वाचे म्हणजे ते तुम्हाला बोलण्यात (जसे ऍडिटिव्ह घाला, ऑइल चेंज केले होते का, कार्ड आहे कि कॅश, इ.) किती गुंतवायचा प्रयत्न केला तरी मीटरवरून जराही लक्ष हलू देऊ नका. पेट्रोल भरायला सुरुवात केल्यानंतर ते खरंच टाकीत पडते का याची खातरजमा करा. जर शंका वाटली तर नोझल सरळ उचलून बघा (त्याचे तोंड टाकीतच ठेऊन :D ).

मी शक्यतो एकदम १००० चे भरतो. जर त्याने मधेच (५०/१००/२०० ला) थांबवले तर तिथेच थांब म्हणतो आणि झाले तेवढेच पैसे देऊन सटकतो (पेट्रोल पडत असल्याची खातरजमा आधीच केलेली असते). जर त्यांना "१०० नाही १००० सांगितले होते" असे म्हंटले तर १०० वरूनच continue करून आकडा ९०० पर्यंत नेऊन १०० रु चे पेट्रोल लंपास करण्याचा त्यांचा डाव असतो (आपल्याला १०० + ९०० = १००० झाले असे चिऊताई बनवून). पण बस कर म्हंटल्यामुळे त्यामुळे त्यांचेच नुकसान होते. नंतर दुसऱ्या पंपावर किंवा परत रिजर्वला आल्यावर पेट्रोल भरतो.

आणखी एक, कार मध्ये बसल्या बसल्या टाकी उघडून पेट्रोल भरायला लावू नका. बाहेर उतरून टाकीजवळ येऊन थांबा आणि वरील टिप्स वापरा. कारण आपण कार मध्ये जास्त प्रमाणात पेट्रोल/डिझेल भरतो त्यामुळे फ्रॉड करायची शक्यता खूप जास्त असते.