गाभा:
मला Graphic Design(Photoshop,Illustartor)चा कोर्स करायचा आहे. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. तरि यासंबंधि मदत हवि आहे.
मुंबई मधे Graphic Design(Photoshop,Illustartor) साठी चांगल्या प्रशिक्शन देणाय्रा संन्था, केंद्र कोणती आहेत ?
तसेच या मध्ये करीयर साठी किती स्कोप आहे?
यासंबंधि रोजगार पुरवणाय्रा व चांगले वेतन देणाय्रा कुठल्या कंपन्या आहेत मुंबई?
प्रतिक्रिया
29 May 2012 - 2:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
29 May 2012 - 2:19 pm | प्रास
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
29 May 2012 - 2:27 pm | मोहनराव
ये रे ये रे स्पावड्या....
शंका निरसन कर गड्या...
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
कॉलींग स्पावड्या....
29 May 2012 - 2:20 pm | प्यारे१
कॉलींग चौरा ....
कॉलींग चौरा ....
कॉलींग चौरा ....
29 May 2012 - 2:24 pm | चिरोटा
वरील प्रतिसाद वाचून गोंधळी अधिकच गोंधळतील.
29 May 2012 - 2:25 pm | पियुशा
स्पा कांकांना विचारा ;)
अन हो त्यांना अरे - तुरे केलेले अज्याबात खपत नै ;)
तेव्हा मोठयांचा आदर राखुन काय इचारायच ते ईचारा :)
अवांतर : भैसने अभी तक चारा नही खाया , और तुम दही बेचने की बात कर रहे हो ? ;)
29 May 2012 - 2:37 pm | स्पा
मी Graphic Designer नाही तरीही आपले चार आणे
मुंबई मधे Graphic Design(Photoshop,Illustartor) साठी चांगल्या प्रशिक्शन देणाय्रा संन्था, केंद्र कोणती आहेत ?
Graphic Design शिकवणाऱ्या संस्था गल्लो गल्ली क्लासेस उघडून बसलेल्या आहेत. शिवाय पैसाही "दबाके" घेतात
त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी बरीच चवकशी करून जा .
तिकडे शिकवणारा बरासचा स्टाफ हा.. तिथलेच भूतपूर्व विद्यार्थी असतात , ज्यांना बाहेर कुठे नोकरी मिळत नाही .
तसेच या मध्ये करीयर साठी किती स्कोप आहे?
क्लास मध्ये जे शिकवले जाते त्याचा आणि प्रोफेशनल ग्राफिक डिझाईन चा काडीचाही संबंध नसतो
चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असे आश्वासन दिले जाते , प्रत्यक्षात अशा कंपन्या म्हणजे एखाद्या सिंगल रूम मध्ये चालणारा DTP तैप कारभार असतो , ज्यात पगार ४००० ते ५००० दरम्यान दिला जातो. तोही वेळेवर मिळतो असे नाही.
नोकरी मिळवण्यासाठी स्वतःचा portfolio बनवन मोठ जिकरीच काम असत, तुमच्या डिग्रीला नाही तर कामाला पाहून लोक दाराशी उभ करतात
या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर भयानक क्रियेटीविटी , आपल ज्ञान वाढवण्यासाठी आंतरजालाचा भरपूर वापर, प्रोफेशनल लोकांची काम, त्यांचे पोर्ट फ़ोलिओ पहाण मग शिकण, अस करत करताच यशस्वी होता येईल..
यासंबंधि रोजगार पुरवणाय्रा व चांगले वेतन देणाय्रा कुठल्या कंपन्या आहेत मुंबई?
अहो आधीच पैसा हे उद्दिष्ट ठेवून चाललात तर कस व्हायचं :द
पैसा हवा असेल तर मग IT मध्ये जा ;)
असो अधिक माहिती माझा मित्र सौरभ देईलच तो सध्या मुंबईत ग्राफिक डिझाइनर म्हणून कार्यरत आहे
29 May 2012 - 2:49 pm | शैलेन्द्र
"प्रत्यक्षात अशा कंपन्या म्हणजे एखाद्या सिंगल रूम मध्ये चालणारा DTP तैप कारभार असतो , ज्यात पगार ४००० ते ५००० दरम्यान दिला जातो. तोही वेळेवर मिळतो असे नाही."
म्हणजे बघ, इथे शिकुन नोकरी करण्यापेक्षा स्वता:ची कुंपनी उघडणे सोप आहे..
उघडायची का आपण एक?
29 May 2012 - 3:05 pm | प्रभाकर पेठकर
श्री. स्पा साहेब,
सखोल प्रतिसाद. आवडला.
29 May 2012 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार
काही जुने हिशोब आठवले. ;)
असो..
बाकी श्री. स्पा ह्यांनी त्यांचा प्रतिसाद मिपावरील व्यासंगी व सर्व विषयाने ज्ञान असणार्या, तसेच समाजाच्या सर्व थरात ओळखी असणार्या ज्ञानवंत, विचारवंत, महंत अशा सदस्यांकडून तपासून घेउन मग इथे दिला आह का? तसे नसल्यास त्यांचा प्रतिसाद हा अर्धवट ज्ञानावरती आधारीत व दिशाभूल करणारा समजावा.
30 May 2012 - 11:11 pm | कुंदन
स्पांडु ,
ऑन साईटचे काही चान्सेस मिळतात का?
असल्यास ऑन साईट गेल्यावर किती डॉलर पगार मिळू शकेल ?
अवाण्तर : तु ऑन साईट साठी पासपोर्ट काढलायस की नाही अजुन? ;-)
31 May 2012 - 2:39 pm | स्पा
ऑन साईटचे काही चान्सेस मिळतात का?
इथल्याच top कंपन्यान मध्ये जॉब मिळताना मारामार
बाहेर जायला.. काम खूपच advance लेवेल वरचं लागत
31 May 2012 - 2:55 pm | ५० फक्त
तु ऑन साईट साठी पासपोर्ट काढलायस की नाही अजुन? -
साईटवर जाउन पाठीवर काच पडल्यापासुन मा. श्री. स्पाजी यांनी कोणत्याही धोकादायक साईटवर जाणे बंद केले आहे, असे आतल्याच्या आतल्या गोटातुन समजते. खरं खोटं, मन्या फेणे जाणे.
29 May 2012 - 3:41 pm | ५० फक्त
मा. श्री. स्पाजी,
माझा देखील एक प्रश्न आहे.
म* **चं लग्न झालं काय ?
29 May 2012 - 3:46 pm | उदय के'सागर
ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातील 'किएटिविटी'. तुम्ही मुळातच एक कलाकार असाल जसं कि चित्रकार वैगरे (अगदी पट्टीचे चित्रकार नाहि पण कमित कमी आवड) तर नक्किच ह्या क्षेत्रात तुम्ही खुप काहि करु शकता. ते म्हणतात ना "Out of box" विचारसरणी ति खुप गरजेची आहे इथे.
माझा सल्ला असा असेल कि सध्या तरी करीयर म्हणुन नका बघु, पहिले त्याचं निट शिक्षण घ्या, खुप खुप सराव करा - इथे सराव हि खुप महत्त्वाचा आहे. नविन -जरा हटके असे स्वतःचे डिझाईन्स बनवत रहा (आहे त्या फोटोंवर, स्वतःच्या ब्लॉग वर प्रयोग करणे. अगदी मित्राला ईमेल पाठवतांना पण संधी सोडु नका, तिथेहि काहितरी क्रिएटिव आर्ट करुन पाठवात रहा) हयातुनच तुमचं ज्ञान वाढेलच पण तुम्हाला नविन नविन कल्पना देखिल सुचतिल. (आणि तोपर्यंत 'हेच क्षेत्रं" निवडायचं का ह्या मतावरही तुम्हि ठाम निर्णय घेऊ शकाल :) ) तुमचं हे सगळं वर्क तुम्हि नोकरी शोधतांना तुमच्या "बायोडाटा" मधेहि टाकु शकता.
सुरवातीला नोकरी मिळणं थोडं अवघड आहे ह्या क्षेत्रात कारण इथे खुप अनुभवी माणसांना वाव आणि 'भाव' असतो कारण डीझाईनिंग हे कंपनीमधे 'ट्रेनिंग' देऊन 'झाला एक रिसोर्स तयार' असं नसतं. म्हणुन मग नोकरीच्याच द्रुष्टीकोनातुन पहात असाल तर एखाद्या चांगल्या संस्थेतच (शिक्षणाच्या गुणवत्तेनुसार नव्हे तर प्लेसमेंटच्या दर्जा नुसार ;) ) प्रवेश घ्या म्हणजे ह्या क्षेत्रातहि एक प्रोफेशनल म्हणुन प्रवेश करता येईल बाकि मग पुढे आहेच तुमची स्वतःची कलात्मकता - क्रिएटिविटी हो आणि त्यानुसार तुमचं ह्या क्षेत्रातलं करीयर :)
शुभेच्छा!!!
29 May 2012 - 3:59 pm | सौरभ उप्स
बरचसं स्पा ने सांगितलाय पण तरीही technically थोडफार माहिती असल्यामुळे आणि थोडाफार या क्षेत्राचा अनुभव असल्याने काही सांगू इच्छितो...
तुला या क्षेत्रात यायचं आहे हे चांगल आहे.... फक्त प्रोब्लेम असा आहे कि साध्याच market खूप विचित्र झालंय... असो हे सगळ्या क्षेत्रांच्या बाबतीत आहे हल्ली....
मुळात बघायला गेल तर मला तुला अस विचारायचं आहे पहिल्यांदा कि commerce करून आता Graphic designing का करायचं आहे???
Graphic designing चा course करून कोणी सहजा सहजी चांगल्या पगाराची आणि चांगल्या हुद्दीची नोकरी मिळालेले फार कमी आहेत...
designing म्हणजे creativity आणि पैश्याच्या दृष्टीने ग्राफिक designing करणार असाल तर ते फार घातक ठरू शकत...
माझ्या अनुभवानुसार तूला जर या क्षेत्रात मनापासून यायचं असेल तर तुला commercial आर्ट्स किंवा fine आर्ट्स केलस तर थोडातरी scope आहे आताच्या काळात.....
पगाराच विचारशील तर या क्षेत्रात तुमच्या कामावर पैसा ठरतो..... अनुभव कितीही वर्षांचा असला तरी...
दिसायला सोप्प वाटत, पैसा पण आहे म्हणून बरेचसे या क्षेत्रात येतात... पण ज्याच्यामध्ये थोडीफार तरी कला असते असेच या क्षेत्रात टिकतात....
या क्षेत्रात मेहनत खूप आहे, आणि प्रगती म्हणाल तशी ठराविक नाही, कला असलेल्याला कुठेच मरण नाही , कोणी खूप लगेच वर जात तर कोणी बर्याच वर्षांनी, म्हणजे तुमच्याकडे कमालीचा सय्यम असावा लागतो.
सलग १०-१२ तास कॉम्पुटर वर बसव लागत कधी कधी, या सगळ्याची तयारी असावी...
हे सांगतोय ते घाबरवण्यासाठी नाही पण सत्य परिस्थिती आहे...
एवढ्या स्पष्टपणे बोलण्याच कारण हेच कि तुझ्या बोलण्यावरून अस वाटल कि तू कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा बर्यच जणांकडून ऐकून हे क्षेत्र ठरवल असाव (माझा अंदाज चुकीचाही असू शकतो).
या क्षेत्रात पगार कमी मिळतो अस नाही.. पगार आहे प्रसिद्धी आहे नाव आहे पण जेन्वा तुम्ही त्या लायकी च काम करता तेवा.... म्हणून बाकीचे म्हणतायत त्याप्रमाणे जे creativity नसलेले आणि बळजबरी या क्षेत्रात आलेले ते ४०००-५००० आणि फार फार तर १५००० एवढाच कमावतात.
कंपन्या म्हणाल तर खूप आहेत असा specific सांगता येणार नाही...
आणि तुला खरच जर मनापासून इच्छा असेल तर Graphic designing साठी institutes काच्र्यासारख्या आहेत प्रत्येक गल्लीबोळात...
पण जर तुला माझ म्हणण पटल असेल तर commercial आर्ट्स कर आणि त्यासाठी ऐकिवात असे काही colleges ची नाव मिळतील,
१) जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स (४ yrs degree ) - govt .... Entrance साठी CET टेस्ट (३-४ वर्षापूर्वी एवढी माहिती होती आता अजून बराच काही असू शकत admissions साठी )
२) ल.स.रहेजा स्कूल ऑफ technical आर्ट्स & fashion designing बांद्रा - ५ वर्ष deploma ( १ year foundation then specialization.....)
३) ल.स.रहेजा स्कूल ऑफ technical आर्ट्स & fashion designing वरळी - 3 वर्ष deploma ..... ( fees जास्त आहे )
४) रचना संसद प्रभादेवी, ४ वर्ष degree ( fees अफाट)
हि colleges आहेत ऐकिवात..... बाकी बद्दल मला personally जास्त माहिती नाही....
इंटरेस्ट असेल तर आत्ताच अमलात आण कारण admissions जून पर्यंतच possible असते या colleges मध्ये.
carrier निवडताना खूप विचार करून निवड.
मी स्वतः Commercial artist आणि 3D animation artist आहे...
आणि आता चांगल्या कंपनी मध्ये Visualizer आणि Sr .Graphic designer म्हणून काम करतो.
अजून काही माहिती हवी असल्यास केंवाही विचारू शकतोस.....
29 May 2012 - 4:19 pm | गोंधळी
Graphic designing साठी चित्रकलेत प्राविण्य असने आवश्यक असते का?
29 May 2012 - 4:07 pm | स्पा
मस्त रे....
एकदम चोक्कस
29 May 2012 - 4:14 pm | चौकटराजा
सौरभ, स्पा, व उदय यांचे आभार ! कारण विरंगुळा, आवड म्हणून ही लाईन मस्त आहे. पण
व्यवसाय, उपजिविका या बाबतीत या तिघांनी जे वास्तव उभे केले आहे हे नाकारून चालणार
नाही. आमच्याच शेजारी रहाणार्या एकाने तर अॅनिमेशन वगैरे चा डिग्री कोर्स करताना बी कॉम बाहेरून केले. आता रिलायन्स मधे आहे पण सुरूवात ५००० नेच झाली आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे अथक १२ तास काम करता येणे ही महत्वाची बाब आहे ब्वॉ !
29 May 2012 - 4:27 pm | सौरभ उप्स
हम्म खर आहे चौकट राजा...
सुरुवात किती पासून होते यावर माणसाची or क्षेत्राची पूर्णपणे लायकी नाही ठरवता येत.....
पण त्याचा growth कसा होतोय हे महत्वाच असत....
"Graphic designing साठी चित्रकलेत प्राविण्य असने आवश्यक असते का? "
प्राविण्य नाही पण ६०% तरी चांगली हवी - घडण्यासाठी आणि टिकण्यासाठी..
इच्छा असेल तर ती हळू हळू devolop पण होते चित्रकला, त्याच जास्त tension घेऊ नये ...
29 May 2012 - 5:09 pm | ५० फक्त
सगळ्यात महत्वाचे म्हणजे अथक १२ तास काम करता येणे ही महत्वाची बाब आहे ब्वॉ ! - आणि ते सुद्धा मिपावर न येता,