गाभा:
गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा. 'गूगल अर्थ'वरपण हे प्रदेश लाल रेघेने दाखवले आहेत. ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
आपण याबाबतीत काय करु शकतो? काय केले पाहिजे. केवळ राज्यकर्त्यांना शिव्याशाप देउन चालेल का?
निदान गूगल कंपनीकडे निषेध नोंदवता येइल का? जाणकारांनी आपले मत मांडावे.
प्रतिक्रिया
6 Aug 2008 - 1:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
याचं कारण असं आहे की आपण या भूभागांवर आपला दावा सांगतो तसेच आपले शेजारीपण! त्यामुळे जोपर्यंत उभय देशात समझोता, एकमत (किंवा इतर काही समझोता) होत नाही तोपर्यंत हे असंच रहाणार. पण त्यांनी हिमाचल,उत्तराखंड आणि चीनची संपूर्ण सीमा तुटक का दाखवली आहे ते मलाही समजलं नाही.
ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
याचा अर्थ असा होतो की या सीमांबद्दल वाद आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की हा भूप्रदेश भारतात नाही तसा आपल्या शेजाय्रांच्या देशातही या तुटक रेषेमुळे जात नाही.
पण मी काही या (आणि इतरही) विषयातली तज्ञ नाही.
6 Aug 2008 - 3:59 pm | नारदाचार्य
हे असे नकाशे खूप पूर्वीपासून आहेत. त्यावर काहीही करणं शक्य झालेलं नाहीये या देशाला. विदेशात तर असे कश्मीर तोडलेले नकाशेच सर्रास वापरले जातात. इतकंच नव्हे तर भारतातही काही प्रकाशनांमध्ये तसे नकाशे आले होते. अगदी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरही तसं झाल्याचं आठवतंय.
6 Aug 2008 - 5:14 pm | विकास
काश्मिरचे प्रकरण नवीन नाही पण अरूणाचल प्रदेशचे किमान आत्त्ता पर्यंत ऐकले तरी नव्हते. तुटक सीमारेषा म्हणजे वादग्रस्त सीमारेषा, ज्याला आंर्तराष्ट्रीय संमती कुणाच्याच बाजूने नाही. मला वाटते की जो काही संयुक्त राष्ट्रसंघाचा म्हणून नकाशा आहे तो गुगल या ठिकाणी वापरतो. चीन अरूणाचल प्रदेशला अजूनही स्वतःचा प्रदेश मानतो. अरूणाचल प्रदेशातील एक मंत्री जेंव्हा चीनला राजनैतिक भेटीवर गेले तेंव्हा त्या आधी त्यांनी राजनैतिक व्हिसा मिळवण्यासाठी चिनी वकीलातीत अर्ज भरला. उत्तर काय मिळाले असेल? - व्हिसाची गरज नाही कारण तुम्ही चिनी नागरीकच आहात!
असो. पण पंधराएक वर्षांपूर्वीचा (अप्रत्यक्ष) अनुभव : ए टी अँड टी ही अमेरीकेतील अग्रगण्य फोन कंपनी होती. त्याच्या खाली पण खूप खाली एमसीआय. स्प्रिंट कुठेशी येत होती. अशा वेळेस एटी अँड टी ने त्यांच्या जाहीरातीत (माहीती म्हणून नाही) भारताचा काश्मिर व्यतिरीक्त नकाशा दाखवला. त्यावेळेस तमाम भारतीयांनी त्यांना फोन करून फोन सर्व्हीस बदलायची धमकी दिली. एटी अँड टी ने तात्काळ माफी मागितली !
या (गुगल)संदर्भात इतकेच म्हणतो: कलामांनी राष्ट्र्पती असताना स्वतः नकाशे पाहून (आणि खात्री आहे आपल्या अधिकार्यांनी पण पाहीले असतील) त्यातील आक्षेपार्ह भाग गाळायला लावला. त्यांनी नक्कीच या बाबत जाहीर आक्षेप घेतला असता असे किमान वाटते.
6 Aug 2008 - 11:18 pm | स्वप्निल..
सीमा आणि भारत सरकारची उदासीनता या दोन्हीही गोष्टी कारणीभुत आहेत असे वाटते.
या (गुगल)संदर्भात इतकेच म्हणतो: कलामांनी राष्ट्र्पती असताना स्वतः नकाशे पाहून (आणि खात्री आहे आपल्या अधिकार्यांनी पण पाहीले असतील) त्यातील आक्षेपार्ह भाग गाळायला लावला. त्यांनी नक्कीच या बाबत जाहीर आक्षेप घेतला असता असे किमान वाटते.
विकास मला असे वाटते की डॉ. कलामांनी नकाशांमध्ये दिसणारया भारतामधील मोक्याच्या ठीकाणांबद्दल आक्षेप घेतला होता आणि गुगल ने तो मान्य पण केला आहे. नकाशांबद्दल व सीमा रेषे बद्दल नाही.
स्वप्निल..
10 Aug 2008 - 5:52 am | चित्रा
अरूणाचलच्या बाबतीत सीमा निश्चित नसणे हे कारण असावे असे वाटते. Mcmahon रेषेप्रमाणे हा प्रदेश निश्चित नसल्याने असे झाले असावे. चीनने अरूणाचल प्रदेशावर हक्क दाखवण्यास आधीच सुरूवात केली आहे.
गूगलने खोड मुद्दाम काढली नसावी, पण गूगलच्या अधिकार्यांना यासंबंधीचे धोरण विचारता येऊ शकते, असे वाटते.