गाभा:
लवकरच न्यूयॉर्कला भेट द्यायचा बेत आहे.
तर आवर्जून पहावी अशी अशी कोणकोणती ठिकाणं आहेत, आणि miss करू नयेत अशा काय काय गोष्टी आहेत. लहान मुलांसाठीची काय काय attractions आहेत.
आणि कशाकशाचे (कोणजोणत्या पर्यटन स्थळांचे) आधी बुकिंग करावे लागते?
यावर जाणकार काही माहिती देऊ शकतील का?
तस नेटवर बर्याच साइटसवर ही ठिकाणांची यादी आहे. पण आपले (मिपावरचे) NY ला जाऊन आलेले किंवा NY च्या आसपास रहाणारे जास्त नीट सांगू शकतील असं वाटतं म्हणून इथे विचारत आहे.
प्रतिक्रिया
24 May 2012 - 5:32 am | अमेय देव
खूप काही करण्यासारखा आहे. एम्पायर स्टेट एमारत, स्वातंत्र देवतेचा पुतळा आणि टाइम स्केअर हे तर बघाच. मँनहटन, सेंट्रल पार्क, ब्रूकलिन पूल, वॉल स्ट्रीट आणि त्या वरील न्यूयॉर्क स्टॉक ची एमारत, इथे पण भेट द्या. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध भुयारी रेल्वेनी प्रवास करा.
टाइम स्केअर पाशी वेगवेगळी प्रसिद्ध प्रदर्शने जसे मँडम ट्यूसॅडस, रीपलिस बिलीव इट ऑर नॉट ई ई आहेत. त्याच परिसरात हार्ड रोक कॅफे आहे, इतर अनेक प्रसिद्ध रेस्टरोन्टस् आहेत. खरेदी साठी न्यू यॉर्क मधल्या सगळ्यात मोठ्या मेसीज् मधे जाऊ
शकता.
24 May 2012 - 8:16 am | Pearl
धन्यवाद अमेय.
रीपलिस बिलीव इट ऑर नॉ, हार्डरॉक कॅफे ही माझ्यासाठी नवी माहिती आहे.
मेसीज तर माझं आवडतं दुकान आहे. त्यामुळे त्या सगळ्यात मोठ्या मेसीज मध्ये पण चक्कर टाकेन.
24 May 2012 - 8:27 am | चित्रगुप्त
न्यूयॉर्क स्टेट मधे सुद्धा जाणार आहात, की फक्त न्यूयॉर्क सिटीत?
संग्रहालये बघायची आवड असेल, तर मेट्रोपॉलिटन म्यूझियम.
24 May 2012 - 1:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
न्यू-योर्क सिटी पास काढ़ा. एक ते तीन दिवसांचा असतो. त्यात बरीच स्थळे included असतात. शिवाय काही काही ठिकाणी तिकिटासाठी रांग पण लावावी लागत नाही.
हा घ्या दुवा http://www.newyorkpass.com/?aid=12&gclid=CNf9qYW6mLACFQ176wodGxbF2w
24 May 2012 - 12:18 pm | llपुण्याचे पेशवेll
वॉल स्ट्रीट, ट्रिनीटी चर्च, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अवशेष, टाईम स्क्वेअर हे म्हणजे तिथले चारधाम आहेत म्हणे.
24 May 2012 - 1:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आणि एम्पायर स्टेट बिल्डींग यांना पहिल्या तिघांपेक्षा जास्त भाव आहे (पर्यटक म्हणून हां). पण मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सेन्ट्रल पार्क आणि मेट्रो (हिचा प्रवास चुकत नाही ). शिवाय या सीझन मध्ये 2-3 तासांची क्रुझ राईड पण घ्यावी, संध्याकाळची.
अस्सल मुंबईकर न्यूयोर्क च्या प्रेमात पडल्याशिवाय राहतच नाही :-)
न्यूयोर्क मधील सौंदर्य स्थळे हा खास वेगळा विषय आहे. पर्ल तैंना फार जिव्हाळ्याचा विषय नसावा म्हणून राहू देत. त्यातून आत्ता उन्हाळा नुकताच सुरु होत असल्याने ही स्थळे शक्य तितकी कमी झाकलेली असतात... असो, तो विषय परत कधीतरी ;-) खूप त्रासदायक विषय आहे :-)
24 May 2012 - 11:44 pm | नंदन
>>> अस्सल मुंबईकर न्यूयोर्क च्या प्रेमात पडल्याशिवाय राहतच नाही
--- सहमत! :)
25 May 2012 - 12:43 am | जेनी...
>>> अस्सल मुंबईकर न्यूयोर्क च्या प्रेमात पडल्याशिवाय राहतच नाही
सहमत सहमत सहमत :)
24 May 2012 - 1:14 pm | पांथस्थ
आधुनिक कला संग्रहालय (MoMA - Meuseum of Modern Art) - इथे अनेक प्रथितयश कलाकारांचे कलाविष्कार बघावयास मिळतील - Claude Monet चे Water Lilies, Salvador Dalí चे The persistence of memory etc.
24 May 2012 - 3:09 pm | ऋषिकेश
आता विचारलच आहात तर (भोगा आपल्या कर्माची फळं ;) ) जरा 'अमेरिकायण!' ची जाहिरात करतो :P
हे वाचा:
न्यूयॉर्क ओळख
मध्य-न्यूयॉर्क - १
मध्य-न्यूयॉर्क - २
वॉल स्ट्रीट
सर्व दुवे मनोगत.कॉमवर घेऊन जातात
25 May 2012 - 3:51 pm | बेसनलाडू
जगाच्या राजधानीतून - १
जगाच्या राजधानीतून - २
जगाच्या राजधानीतून - ३
जगाच्या राजधानीतून - शेवट
24 May 2012 - 7:02 pm | Pearl
सर्वांचे खूप खूप आभार :-)
@चित्रगुप्तः फक्त न्यूयॉर्क सिटी पहायला जाणार आहे.
@पुण्याचे पेशवे: ट्रिनिटी चर्च लिस्टमध्ये नव्हते. आता गुगल करून पाहिन. धन्यवाद.
@वि.मे. : संध्याकाळची क्रूझ राइड चे ऑप्शन पाहिले. पण ६ ला निघते क्रूझ. (आणि जवळजवळ ८ वाजेपर्यंत उजेड असतो आजकाल)त्यामुळे रात्रीच्या लाइट्स ची मजा नाहि येणार :-/
@पांथस्थ : MoMA पण नवीन आहे मला. धन्स.
@ऋषिकेशः सर्व दुव्यांबद्दल धन्यवाद. अमेरिकायण चे पारायण करेन आता):-)
24 May 2012 - 7:59 pm | संदीप चित्रे
वेळ असेल तर म्हणण्यापेक्षा वेळात वेळ काढून 'लायन किंग' हा Broadway show आवर्जून बघा.
डोळ्याचं पारणं फिटणं, पैसा वसूल, बच्चा भी खूष - पेरेंट्स भी खूष इ. सगळं काही एकाच ठिकाणे अनुभवता येईल.
(अर्थात 'लायन किंग' Broadway show पाहिला नाहीये हे गृहित धरतोय).
पर्सेस, पर्फ्युम इ. गोष्टी स्वस्तात मस्त पाहिजे असतील तर Broadway and between 32nd street - 25th street इथे भरपूर दुकाने आहेत. देसी लोकांची बरीच दुकाने असल्याने घासाघीस वगैरेही नीट करता येते असे ऐकिवात आहे :)
(अर्थात अशा प्रकारच्या खरेदीसाठी वेळ काढणार आहात हे ही गृहित धरतोय :))
मी Park Avenue and 24th Street ह्या ठिकाणी काम करतो.
ह्या भागात आलात आणि तुमच्या न्यू यॉर्क दर्शनाच्या धावपळीत वेळ मिळाला तर भेटूया.
व्यनिने माझा संपर्क क्रमांक पाठवतो.
24 May 2012 - 11:42 pm | Pearl
माहितीबद्दल धन्यवाद संदीप.
लायनकिंग नक्की पाहिन. आणि खरेदीच्या ठिकाणांना पण भेट देईन.
>>ह्या भागात आलात आणि तुमच्या न्यू यॉर्क दर्शनाच्या धावपळीत वेळ मिळाला तर भेटूया.>>
ओके. वेळ मिळाला तर भेटू. तुमचा संपर्क क्रमांक व्य.नि. करून ठेवा.
तसे आपण याआधी प्रत्यक्ष भेटलो आहोत याच वर्षी .
आणि १-२ मिनिटं बोललो पण आहोत ;-)
24 May 2012 - 8:06 pm | जेनी...
टायिम स्क्वेअर , आणि मेसिज ....बस्स
24 May 2012 - 9:47 pm | पिवळा डांबिस
वर इतरांनी अनेक चांगली स्थळे सुचवली आहेतच...
त्यात नसलेलं अजून एक म्हणजे जमलं तर युनायटेड नेशन्स ला भेट द्या..
एक चांगला एक्सपिरियन्स आहे तो...
24 May 2012 - 11:45 pm | चतुरंग
न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी अशा दोन्ही बाजूंनी जाता येते.
तुम्हाला शक्य असेल तर न्यू जर्सीच्या बाजूने जा. तिकडे पार्किंगसाठी भरपूर जागा आहे आणि तिकिटांसाठी रांगसुद्धा न्यूयॉर्कपेक्षा कमी असते! :)
लहान मुले/वयस्कर व्यक्ती असतील तर शक्यतोवर उन्हे फार चढण्याआधीच जाऊन येणे श्रेयस्कर. भरपूर वेळ हातात ठेवून जावे. ३ तासात पाहून येऊ मग पुढे लगेच दुसरा प्रोग्रॅम अशी धावपळ नसेल तर जास्त सुखकर होते असा अनुभव आहे! :)
एंपायर स्टेट रात्री दीड पर्यंत उघडे असते (वेबसाईटवर पुन्हा तपासून घ्या) त्यामुळे तिकडे रात्री जाऊ शकाल.
-रंगा
25 May 2012 - 12:37 am | रेवती
अस्सल मुंबईकर न्यूयोर्क च्या प्रेमात
प्रचंड सहमत.
मी गेलीये दोन तीन वेळा.....फिरण्याची फारशी आवड नसल्याने नावे लक्षात नाहीत म्हणून पर्ल्ततैंना काही सुचवण्याचे धाडस करणार नाही.
मेसीज तर माझं आवडतं दुकान
कसं काय बुवा तुम्हा सगळ्यांना (माझ्या सग्गळ्या मैत्रिणींना) मेसीज् मध्ये सामान मिळतं.
मला आजपर्यंत एकही आवडेल असा कपडा, वस्तू मिळाली नाहिये.
आताशा तर चुकून मेसीज् मध्ये घुसले तर जाणं होतं नाहीतर गेल्या तीनेक वर्षात तरी तिकडे गेले नाहिये.
25 May 2012 - 12:53 am | विकास
न्युयॉर्कमध्ये आभारदीनाच्या (thanksgiving) दुसर्या दिवशी मेसीज् आणि एकूणच टाईम्सस्क्वेअर बघण्यासारखा असतो.
वर बरेच सांगून झाले आहे. अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे: युनायटेड नेशन्स. तेथे गायडेड टूर्स देखील असतात. तसेच वास्तूशास्त्र आवडत असेल, तर पैसे खर्च न करता "ग्रँड सेंट्रल टर्मिनस" पण बघण्यासारखे आहे.