लागणारे साहित्य :
पाव किलो भोकरे
१ मध्यम आकाराची कैरी
२ चमचे लाल तिखट
३ चमचे मिठ
दिड चमचे मेथी
७-८ चमचे मोहरी पूड
३ चमचे हळद
१/२ छोटा चमचा हिंग
२ मोठ्या पळ्या तेल फोडणीसाठी
पाककृती:
ही अशी आधी झाडावर लटकलेली कच्ची भोकरे काढून घ्या. :हाहा:
* भोकरे व कैरी स्वच्छ धुवून पुसुन घ्यावीत. आता कैरीच्या फोडी कराव्यात. भोकरांचे सुरीने कापून दोन भाग करा.
हे मला शिंपल्यातल्या मोत्यासारख वाटत आहे :स्मित: (कैच्याकै, मला काय वाटेल त्याचा भरवसा नाही :हाहा:)
* एका भागातली बी काढून टाका. हे खुप किचकट काम आहे. कारण बी इतकी चिकट असते. की आपली बोटे चिकट होतात. पण आपल्यामध्ये चिकाटी असू द्या. :हाहा:
आता हात धुवताना कसोटी असते. २-३ वेळा साबण लावून हात धुतल्यावर एकदाचा चिकटपणा जातो.
मसाला तयार करायला घ्या. १ चमचा तेलावर मेथी तळून घ्या. गार करा व मिक्सरमध्ये पुड करा. मस्त वास येतो. (ही खटपट करायची नसेल तर सरळ मेथी पूड आणा पण चवीत थोडा फरक पडतो.)
आता मोहरीची डाळ सोडून बाकीचे जिन्नस म्हणजे हळद, मिठ, मिरची पूड हिंग एकत्र करा.
फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा चांगले गरम झाले की गॅस बंद करून भांडे खाली उतरवा आणि मग त्यात मोहरीची डाळ टाका म्हणजे ती जळणार नाही.
ही फोडणी थंड होऊ द्या. एकत्र केलेला मसाला आणि फोडणी एकत्र करून घ्या.
हा मसाला फिडींमध्ये चांगला मिसळा.
एका काचेच्या बरणीत हे लोणचे भरून ठेवा. जास्त दिवस ठेवायचे असेल तर अजुन १-२ पळ्या तेल गरम करून फोडी बुडे पर्यंत बरणीत ओता म्हणजे बुरशी चढत नाही.
प्रतिक्रिया
23 May 2012 - 12:17 pm | सुहास..
ख ल्ला स !!
( भोकरे कुठे मिळाली ? )
23 May 2012 - 12:21 pm | जागु
आमच्या उरणमध्ये मिळतात भोकरे. ही माझ्या आईने दिली.
23 May 2012 - 12:42 pm | विसुनाना
भोकरांचे लोणचेच पाठवता का? :)
इतकेच म्हणू शकतो.
23 May 2012 - 12:32 pm | प्यारे१
भोकर हे प्राण्याचं नाव पण असतं ना?
आधी वाटलं तेच की काय!
23 May 2012 - 12:51 pm | सूड
भोकर नाही, भेकर असतं ते !! त्याच रेशिप्यांच्या ढिगात ही हटके रेसिपी बघून बरं वाटलं. भोकरं फक्त ऐकूनच माहीती होती आता पाह्यली पण.
23 May 2012 - 12:45 pm | पियुशा
द्येवा , माझ काय खर नाही ब्वॉ !!!!!!!!!!!
हे भोकर नावाच प्रकरण आयुष्यात आताच पाहिल अन ऐकल मी :(
( अज्ञानी पियु )
23 May 2012 - 12:50 pm | जागु
विसुनाना तुमच्या खरड मध्ये पाठवू का ?
प्यारे भेकर प्राण्याचे नाव असते.
पण पियुषा आता तुला ज्ञान झाल आहे भोकराच.
24 May 2012 - 10:12 am | प्यारे१
धन्स सूड अॅन्ड जागुतै!
लोणचं भन्नाट दिसतंय.
23 May 2012 - 1:24 pm | उदय के'सागर
शिर्षक वाचताच वाटलं हि पाकृ नक्कीच जागुतैची असणार :)
लोणचं हा प्रकार विशेष अवडत नसुनहि हि पाकृ/फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले आहे.....!!!
23 May 2012 - 1:25 pm | सुहास झेले
ओह्ह्ह.. जबरी एकदम :) :)
23 May 2012 - 1:28 pm | प्रचेतस
झकास.
आमच्या एका नातेवाईकाच्या घरासमोर भोकराचं झाड होतं. तेव्हा ही भोकराची भाजी, भोकराचं लोणचं हे प्रकार खाल्ले होते.
23 May 2012 - 2:12 pm | जागु
सुड, उदय, सुहास धन्यवाद.
वल्ली भोकराची भाजी पिठ पेरून केली जाते.
23 May 2012 - 2:12 pm | पिंगू
जूनच्या मध्यांतरात चांगलीच १५ दिवस सुट्टी घेतली आहे.. तेव्हा भोकरे आणायला नक्कीच जाणार..
- पिंगू
23 May 2012 - 4:04 pm | स्मिता.
लोणचं बघून तोंपासु!!
भोकराचं लोणचं आधी ऐकलंय पण कधी पाहिलं नव्हतं, जागुताईमुळे खूप न पाहिलेल्या गोष्टी बघायला मिळतात :)
23 May 2012 - 7:22 pm | जागु
पिंगू तोपर्यंत भोकरे पिकतील.
स्मिता धन्यवाद.
23 May 2012 - 7:29 pm | जेनी...
मस्त :)
23 May 2012 - 7:33 pm | रेवती
रंग छान आलाय लोणच्याला!
रेसिपी आवडली.
23 May 2012 - 7:49 pm | पैसा
मस्त चटकदार दिसतय!
23 May 2012 - 7:56 pm | वेताळ
मामाच्या गावाला भोकराची खुप झाडे आहेत. लहानपणी सुट्टीला गेल्यावर भोकरे खाणे हाच धंदा होता.
23 May 2012 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा व्वा जागु तै,काय मस्त दिसतय लोणचं...!
मसाला चोळलेल्या फोडि पाहुन,दिल पानी पानी हो गया... एकदम नविन आणी मस्त प्रकार :-)
भोकरांवरुन एक अठवलं, पिकलेली भोकरं खाताना त्या बी च्या चिकटपणा मुळे तोंडातुन बी जमिनीवर टाकताना,ती अशी काही हळू खाली यायची कि त्यामुळे आंम्ही त्याला लिफ्ट म्हणायचो :-)
23 May 2012 - 10:35 pm | निवेदिता-ताई
मस्त...लहानपण आठवले....कैर्या, भोकरे खाणे .....
23 May 2012 - 10:49 pm | सानिकास्वप्निल
खूपचं चविष्ट दिसत आहे लोणचं ...भोकराचे लोणचे खूप खूप आवडतं :)
23 May 2012 - 11:28 pm | जागु
पूजा, रेवती, पैसा, वेताळ, अतृप्त आत्मा, निविदिता ताई, सानिका धन्यवाद.
24 May 2012 - 8:26 am | मदनबाण
वॉव.मस्तच ! :)
24 May 2012 - 8:58 am | प्रभाकर पेठकर
मस्तं.
भोकराचं लोणचं मस्तच लागतं. तसंच, नेपच्याचे लोणचेही करतात. ते माहीत आहे का? तेही छान असते.
24 May 2012 - 10:23 am | जागु
प्रभाकरजी नेपचा म्हणजे नेमक काय मला माहीत नाही. प्लिज सांगा.
मदनबाण धन्स.
24 May 2012 - 3:46 pm | प्रभाकर पेठकर
मलाही नक्की माहित नाही. लहानपणी खाल्लं आहे. कदाचित भोकरं, (गुजराथीतील) गुंदं, आणि नेपच्या हे एकच फळ आणि वेगवेगळी नांवे असावीत.
24 May 2012 - 4:02 pm | इरसाल
आम्च्याकडे डोळे विस्फारुन/वटारुन एखादी गोष्ट पहाणार्याला म्हणतात " काय भोकर नं मायक डोया करी देखी र्हायना ? "
आणी ज्याचे डोळे वाजवीपेक्शा मोठे त्याला " भोकर्या"
24 May 2012 - 4:22 pm | जागु
अरे वा डोळ्यांना भोकराची उपमा छान वाटते.