टवाळा आवडे विनोद ???
आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते.
स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या. इंदिरा गांधी चे मुद्दाम उदाहरण देण्याचे कारण म्हणजे त्याना तथाकथित लोक हुकुमशहा म्हणत असत.
आपल्या संसदेची साठ पुर्ण होत असताना साठी बुद्धी नाठी म्हणावे तसे वर्तन घडले आहे. १९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले.
टू जी च्या प्रकरणात उलट्या सुलट्या कोल्यांट्या मारून अजिबात न डगमगडारा कपिल सिब्बल सारखा माणुस सुद्धा प्रचंड दहशती खाली होता.
वात्सविक हा मुद्दा मांडण्यारा खासदांराची समजूत काढण्याऐवजी भाजप सारखा ’जबाबदार विरोधी पक्ष ' सुध्दा 'फिशींग इन ट्र्बल्ड वॉटर' असा वागत होता.आता त्या नव्हे तर सर्व पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रे काढण्याचा फतवा निघेल. आणि सर्वात वाईट आणि धोकादायक म्हणजे या फतव्याला विरोध करणारा हा आंबेडकर विरोधी ठरेल.
मोदींचे कौतुक करणारा जातीयवादी, इंदिरा गांधी बद्दल चार चांगल शब्द बोलले तर तो लोकशाही विरोधी, पुतळा हलविला ते बरे केले असे म्हणले की तो ब्राह्मण विरोधी अश्या ब्लॅक आणि व्हाईट रंगामध्ये रंगविले जाणार.मग मोर्चे सभा बंद तोडफोड चे चालूच.
खुन, मारामार्या, बलात्कार, भ्रष्टाचार याबद्दलच्या भावना बोथट होत असून जात, भाषा, प्रांत, आणि इतिहासातील मोठी माणसे यांच्या बद्दलच्या संवेदना चुकीच्या पद्ध्तीने टोकदार होत आहेत.
हे कुठे तरी थांबले पाहीजे.
महाराष्ट्र टाईम्स च्या अंकात
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13142817.cms प्रताप आसबे यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे.
टवाळा आवडे विनोद ???
गाभा:
प्रतिक्रिया
16 May 2012 - 6:12 am | श्रीरंग_जोशी
आपण लोक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांबद्दल, उगाच कर्णे वाजविणाऱ्यांबद्दल, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांबद्दल फारच सहिष्णू आहोत. परंतु वरील प्रमाणे एखादी गोष्ट कुणी लक्षात आणून दिल्यास लगेच तोडफोड सुरू. ईश्वर अशा लोकांना सद्बुद्धी देवो.
16 May 2012 - 9:05 am | शिल्पा ब
"आमच्यावर अन्याय होतोय, अपमान होतोय" असे विनाकारण गळे काढुन राजकारणी त्यांचं भलं अन देशाचं वाटोळ करताहेत...अन तेवढ्यापुरता लाभ हवा असणारे त्यांना उत्तेजन देताहेत.
पवारांनी मोठं केलेल्या विनायक मेट्यापासुन प्रेरणा घेउन देशभर धुडगुस घालुन देश एकदाचा विकुनच टाका म्हणावं...कमिशन मोठ्ठ मिळेल.
16 May 2012 - 9:31 am | अजातशत्रु
आंतरराष्ट्रिय दर्जाचे ख्यातनाम चित्रकार सन्माननीय हुसेन साहेब यांच्या मृतआत्म्यास शांती लाभो
हिच ईश्वर चरणी प्रार्थना !!
बाकि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्याख्ये बाबत मी काहिसा 'ढ' च आहे. :-)
.
.
.
.
.
.
.
.
.
(सदर घटनेमुळे त्याना आता 'एकटेपणा' जाणवणार नाही. अर्थात 'जन्नत'मधे )
17 May 2012 - 9:54 am | कापूसकोन्ड्या
हुसेन ने काढलेली चित्रे ही व्यंग्चित्रे या सदरात नव्हती.आपला मराठी, पंढरीचा माणूस. काढत होता काही बाही. त्याच्या वर खुप क्रिमिनल केसेस होत्या त्यामुळे भारतात आल्या आल्या त्याला अटक झालीअसती, म्हणून त्यांनी भारतात येण्याचे टाळले. असो.
17 May 2012 - 10:05 am | कापूसकोन्ड्या
वांझोट्या नै कै! त्याला विषारी फळे येतात.
16 May 2012 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले
व्यंगचित्राच्या प्रकरणावरुन उठलेला गोंधळ पाहून केवळ हताशपणा वाट्याला येतो. व्यंगचित्राचा ज्याला काही एक अर्थ कळलेला नसतांना डॉ.पळशीकरांच्या कार्यालयावर तोडफोड करणारी सोयीची मनोवृत्ती आणि व्यंगचित्र आक्षेपार्ह वाटतात म्हणून सर्व पूस्तक परत घेण्याची सोयीचीवृत्ती थोड्याफार प्रमाणात सारख्याच वाटतात. आपण अशावेळी काहीच करु शकत नसतो. असो.
-दिलीप बिरुटे
17 May 2012 - 9:57 am | कापूसकोन्ड्या
व्यंगचित्राच्या प्रकरणावरुन उठलेला गोंधळ पाहून केवळ हताशपणा वाट्याला येतो. व्यंगचित्राचा ज्याला काही एक अर्थ कळलेला नसतांना डॉ.पळशीकरांच्या कार्यालयावर तोडफोड करणारी सोयीची मनोवृत्ती आणि व्यंगचित्र आक्षेपार्ह वाटतात म्हणून सर्व पूस्तक परत घेण्याची सोयीचीवृत्ती थोड्याफार प्रमाणात सारख्याच वाटतात. आपण अशावेळी काहीच करु शकत नसतो. असो.
अगदी मान्य.
16 May 2012 - 11:07 am | JAGOMOHANPYARE
सरकारी पाठ्यपुस्तकं राजकीय व्यंगचित्र छापायची जागा कधीपासून झाली?
१९६० साली व्यंगचित्र आले होते याचा अर्थ ते पाठ्यपुस्तकात छापा आसा होत नाही.. तशी तर रामावर आणि कृष्णावर पण व्यंगचित्रे आहेत. मग एकाही रामरक्षेच्या किंवा गीतेच्या पुस्तकात आजवर व्यंगचित्रे का नाही हो छापली?
आक्षेपार्ह चित्रे पाठ्यपुस्तकात आणणार्या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. उघडपणे बाबासाहेबांचा अपमान करणं आज कुणालाही शक्य नाही, म्हणूनच हा छुपा मार्ग शोधला गेला आहे.
त्यातून जर कुणाला व्यंगचित्रे हवीच असतील तर व्यंग चित्रात गैर नाही असे म्हणणार्या भाजपाच्या खासदाराला संपर्क करावा. त्याच्या पदरच्या पैशातून तशी स्वतंत्र एडिशन छापून घ्यावीत्त. बहु संख्यांचे म्हणणे चित्र नको असे असेल तर सरकारचा पैसा, कागद, शाई का व्यर्थ वाया घालवायची? भाजपाने स्वतःच्या खर्चातून अशी एडिशन छापावी आणि जनतेला वाटावी. हे व्यंगचित्र हवे असे म्हणून इथे टाहो फोडणार्या लोकानीही स्वतःचा पैसा त्यात घातला तर आनंदच होईल.
16 May 2012 - 11:07 am | शिल्पा ब
तुम्ही कोणत्या ब्रिगेडचे म्हणायचे?
गुंडागिरी जोपर्यंत स्वत:ला फटका बसत नाही तोपर्यंत छान वाटते...मग आहेच लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र वगैरे वगैरे.
16 May 2012 - 11:10 am | JAGOMOHANPYARE
मी तोडफोडीचे समर्थन केलेले नाही.. व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात नको, इतकेच लिहिले आहे.
आणि तसेही या देशात दुसर्याचे मत पटले नाही तर साक्षात राष्ट्रपित्यालाही गोळी घालायची आणि त्याचे समर्थन करायची प्रथा आहे. तिथं ही मोडतोड किरकोळ आहे.
16 May 2012 - 11:19 am | शिल्पा ब
राष्ट्राचे तुकडे करायला समर्थन देणार्या व्यक्तिची हत्या झाली अन हत्यार्याला अन त्याच्या जातीच्या लोकांना शिक्षाही झाली. तो वेगळा विषय आहे.
मला एक सांगा, तुम्ही ते व्यंगचित्र स्वतः पाहीलंय का? दुसरं म्हणजे गांधी काय आंबेडकर काय हे राजकिय अन सामाजिक पुढारी होते... वर त्या चित्रात काय होतं हे लिहिलंय त्यावरुन का होईना अवमानकारक काय होतं हे सांगितलं तर बरं होईल.
देशाची घटना लिहिणार्या व्यक्तीचा मुद्दाम अपमान करावा असं कोणालाही वाटणार नाही...यात जातीचा प्रश्नच येत नाही...जाणुनबुजुन आणला जातोय.
अन ही मोडतोड किरकोळ आहे असं म्हणुन तुम्ही समर्थनच तर देताहात.
16 May 2012 - 11:29 am | JAGOMOHANPYARE
मी ते व्यंगचित्र पाहिले आहे.
तुम्हाला हवे असेल तर इथे आहे.......... http://www.theunrealtimes.com/2012/05/13/maneka-gandhi-now-protests-agai...
http://hayekorder.blogspot.in/2012/05/snail-cartoon-on-b-r-ambedkar-and-...
(लिंक केवळ चित्रे बघण्यासाठी दिली असे. त्यातील लिखाणाशी आमचा संबंध नाही म्हणून दिले प्रतिज्ञापत्र. :) )
16 May 2012 - 11:41 am | शिल्पा ब
चित्र पाहीलं. त्यात अवमानकारक काहीही नाही... राजकीय स्वार्थासाठी गोंधळ माजवणं चाललंय..
अवांतरः वरच्याच लिंकमधे आता मेनकाबै त्या व्यंगचित्रात गोगलगायीवर माणुस बसुन तिला हाकतोय असं असल्याने आता गोगलगायींच्या क्रुरतेविरुद्ध प्रोटेस्ट (?) करणार आहेत म्हणे!! काय तरी एकेक नग भरलेत संसदेत!!
16 May 2012 - 11:55 am | यकु
>> काय तरी एकेक नग भरलेत संसदेत!!
-- संसदेमध्ये गुपचूप विषारी साप सोडून आले पाहिजे ! मग कळेल कसं असतं ते :)
16 May 2012 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार
सापाला विनाशाच्या खाईत लोटण्याच्या प्रयत्नाचा तिव्र निषेध !
तिथल्या कोणाला चावला तर सापच मरायचा.
16 May 2012 - 12:15 pm | पैसा
सापाविरुद्ध केवढे हे क्रौर्य!
17 May 2012 - 10:03 am | कापूसकोन्ड्या
खरं म्हणजे ज्यावेळी अफझलने संसदेवर हल्ला केला तेव्हा किमान अर्धे खासदार तरी त्यातून वाचायला नको होते. संरक्षण करताना हकनाक बळी गेलेल्या शूर शिपायांना सद्गती तरी मिळाली असती.
17 May 2012 - 7:32 pm | इनिगोय
सहमत. अर्धे नाही, सगळेच.
16 May 2012 - 12:58 pm | बाळ सप्रे
कार्टूनची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद..
कार्टूनमुळे अपमान होतोय की नाही हा मुद्दा वेगळा.. पण कार्टून इतके काही छान नाही.. ( गणिताच्या पुस्तकातली शि. द. फडणीसांची चित्र खूप छान असायची.. )
आणि पाठ्यपुस्तकात हे कार्टून नक्किच सूट होत नाही..
16 May 2012 - 1:20 pm | संजय क्षीरसागर
ते संदर्भ सोडून बघीतलं जातयं म्हणून अवमानकारक वाटतय. `घटना तयार करायला ऊशीर होतोय म्हणून नेहरू रागावले आहेत' असा संदर्भ आहे. त्या वेळची वस्तुस्थिती विनोदी अंगानं दाखवल्यामुळे तसं कार्टून आहे त्यात कुणा व्यक्तीच्या (किंवा गोगलगायीच्या) अवमानाचा उद्देश नाही.
अनेक जण कार्टून मधल्या व्यक्ती कशा दिसतात या अॅंगलनं बघतायंत त्यामुळे त्यांना ते अवमानकारक वाटत असावं.
16 May 2012 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार
अहो जे घरातून निघतानाच 'काही झाले तरी मी बरोबर आहे, आणि कुठल्याही पुराव्यांपेक्षा माझी निष्ठा श्रेष्ठ आहे' असे ठरवूनच बाहेर पडलेले असतात, त्यांच्याशी वाद घालून काही उपयोग आहे का ?
16 May 2012 - 1:48 pm | बिपिन कार्यकर्ते
पण मी काय म्हणतो, आधी घरातनं निघावंच कशाला माणसानं?
16 May 2012 - 1:50 pm | पैसा
ऊन तर "मी" म्हणतंय!
16 May 2012 - 2:32 pm | संजय क्षीरसागर
पण घरात बसून काय करायच? हा प्रश्न आहेच ना!
16 May 2012 - 3:21 pm | परिकथेतील राजकुमार
आता सकाळी उठून स्वतःच्या घरी जायला नको का ?
16 May 2012 - 7:35 pm | सोत्रि
कोणाला कशाच अन बोडकीला... :D
- (सकाळी स्वत:च्याच घरी जाग येणारा ) सोकाजी
16 May 2012 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार
साला मिपावरती ही पद्धत का नाही ? निदान गोळी नाहीतर नाही, पण कंबरड्यात लाथ घालून हाकलून द्यायचे तरी स्वातंत्र्य हवे होते.
असो..
Some people are still alive because it's against the law to kill them.
16 May 2012 - 12:08 pm | JAGOMOHANPYARE
असे स्वातंत्र्य मालकाना, संपादकाना असते.. कुणाही सोम्यागोम्याला असे स्वातंत्र्य नसते.
-- सोम्याकथेतील गोमासुमार.
16 May 2012 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
अहो ज्यांचे व्यंगचित्र काढले गेले त्यांनी आक्षेप नोंदवला नाही त्यावेळी, पण आता त्यांचे नाव घेउन काही लोकं आपली अक्कल पाजळत आहेतच की आणि आक्षेप देखील नोंदवत आहेत. काही लोक लाठ्या काठ्या घेऊन, तर काही आंतरजालावरती कीबोर्ड बडवून. आता आंतरजालावरती जर अशी बेअक्कल लोकं आक्षेप नोंदवू शकतात तर मग सोम्या गोम्यानेच काय घोडे मारले आहे ?
मारोपिछेसेसारे
16 May 2012 - 12:20 pm | JAGOMOHANPYARE
हायला, असेच म्हणायचे झाले तर हुसेनच्या चित्रावर सरस्वती देवीनेही आक्षेप घेतलेला नाही. त्याचं काय करणार?
-- पराकुटील पिछेसेमार
16 May 2012 - 12:23 pm | शिल्पा ब
आंबडकर नागवे अन विकृत दाखवले आहेत का त्या व्यंगचित्रात?
16 May 2012 - 12:24 pm | यकु
बाऊंड्रीच्या बाहेर !!
16 May 2012 - 12:29 pm | JAGOMOHANPYARE
विकृत दाखवायला नागवेच दाखवाला हवे असे नाही.. हे चित्र नागवे नाही. विकृत आहे की नाही हे ज्याच्या त्याच्या नजरेवर अवलंबून आहे.
तुम्हाला हे चित्र हवे असेल तर भाजपाकडून छापवून घ्या आणि वाचा. आम्ही कुठे नको म्हणतोय? तुमच्या स्वातंत्र्याचाही आदर आहे.
-- टंका ब्र
16 May 2012 - 12:39 pm | शिल्पा ब
छापवुन घ्यायला भाजपा कशाला हवंय? लिंक तुम्हीच दिलीये की!
विकृती नजरेत असते असं तुम्हीच म्हणताय...म्हणजे दोन्हीकडुन बोलायचं पण विचार मात्र करायचा नाही..
16 May 2012 - 12:44 pm | JAGOMOHANPYARE
सॉरी, वाक्यरचना चुकली.
ज्याना व्यंगचित्र योग्य वाटते त्यानी भाजपाकडून व्यंगचित्रे असलेली पुस्तके छापून घ्यावीत असे मला म्हणायचे आहे.. दोन आवृत्त्या छापायच्या. व्यंगचित्र नसलेली आवृत्ती सरकार छपेल कारण बहुसंख्याना ते चित्र नको आहे.. ज्याना हवे आहे, त्यांच्यासाठी भाजपा एडिशन काढू दे. २ % भ्रमवृंदाच्या करमणुकीसाठी सरकारी पैसा का खर्चायचा असे मला वाटते.
16 May 2012 - 1:30 pm | अनुप ढेरे
बहुसंख्याना ते चित्र नकोय हे तुम्ही कस ठरवलं?
16 May 2012 - 1:43 pm | JAGOMOHANPYARE
मी कुठे ठरवलं? सरकारनंचं लोकानी दर्शवलेला विरोध पाहून चित्र वगळलं.. चित्र नको हे सांगणारे जसे पुढे आलेत, तसेच चित्र पाहिजेच आहे हेही सांगणारे लोक तर पुढे यायला हवेत ना? तसे आले का कुणी? आले असतील, आणि त्यांचीही संख्या जास्त असेल तर सरकारही त्यांच्यासाठी वेगळी एडिशन काढेल कदाचित.. नाहीच जमलं सरकारला, तर भाजपा आहेच की.. त्यांच्याकडून घेऊया छापून.. पण जे होईल ते शांततेने आणि आनंदाने व्हावे, नै का?
17 May 2012 - 9:48 am | कवटी
यात भाजपाचा आणि २% ब्रम्हवृंदाचा काय संबंध आहे ते स्पष्ट करणार का?
पुस्तक छापले सरकारने (जे काँग्रेसचे आहे), प्रताप आसबे वगैरे (जे शरद पवार व पर्यायाने राष्ट्रवादीच्या जवळचे) लोकांनी त्याचे समर्थन केले मग तुम्ही सारखे भाजपचे नाव का घेताय? का आपल काहीही झाले की या दोघांना शिव्या घालून कंडू शमन चालू आहे?
16 May 2012 - 7:24 pm | श्रीरंग
चालू झाला परत टुक्कार पळपुटा शब्दच्छल...
17 May 2012 - 3:55 pm | कवटी
२ % भ्रमवृंदाच्या करमणुकीसाठी सरकारी पैसा का खर्चायचा असे मला वाटते.
२% ब्रह्मवृंदांच्या "करमणुकीसाठी" हे पुस्तक सरकारने पैसे घालून छापून घेतलय हा शोध कुठून लावलात?
मुळ लेखात भाजपाने पुस्तक मागे घेण्याचे समर्थन केले म्हणून लेखक/ प्रसिद्धी माध्यमे बोंबलतायत आणि तुमच्या ओळीन ४-५ प्रतिसादात असे दिसतय की जणू भाजपानेच हे पुस्तक छापून घेतलय....
जामोप्या, तुझ्या वाकडेपणाला सलाम....
तेवढ शोध कुठून लावला ते नक्की सांगा बरका.
18 May 2012 - 12:18 pm | कौतिक राव
आज आप्ल्या देशात अल्पसन्ख्य समाज (धर्म या सन्दर्भात) हा सग्ळ्यात सेफ आहे
आणि अल्पसन्ख्य जात सगळ्यात जास्त अनसेफ आहे...
असे का असावे बरे?
16 May 2012 - 4:17 pm | अजातशत्रु
'डबक्यात' बातम्या पोहचत नाहीत असे दिसते..
मान. हुसेनसाहेब जीवे मारण्याच्या धमकीमुळे घाबरुन "मायदेशात" येत नव्हते.
बिचार्यांचा शेवटहि तीथेच झाला
बिचारे सलत राहिले असतील शेवटच्या क्षणी :-(
16 May 2012 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
श्री 'अ'जात शत्रु
आपली ज्ञानप्राप्ती तिथे झाली म्हणजे सगळे तिथलेच रहिवासी असतात असे नाही. अर्थात 'विहिरीतल्या आणि त्यापण गावकुसाबाहेरच्या बेडकाला बाहेरचे जग माहिती नसते' ह्या न्यायाने तुम्हाला असेच विचार सुचणार म्हणा.
काय सांगता काय ? मग तुम्ही काही प्रयत्न वैग्रे केलेत का नाही त्यांच्या रक्षणाचे ? निदान ह्या धमकी देणार्यांच्या कार्यालयाची तोडफोड, त्यांना मारहाण, पुस्तके वैग्रे जाळणे ? गेला बाजार संसदेत आवाज उठवायला लावणे वैग्रे ? निदान तुम्ही ह्या धमकीचा धिक्कार म्हणून चपला घालणे तरी नक्की सोडले असेल, हो ना ?
घराच्या अंगणात एक कबर घ्या बांधून त्यांची. अधे मध्ये हळहळ वाटली की घ्यायची फुले वाहून.
16 May 2012 - 7:55 pm | JAGOMOHANPYARE
'विहिरीतल्या आणि त्यापण गावकुसाबाहेरच्या बेडकाला बाहेरचे जग माहिती नसते'
-------------------------------
आणि गावातल्या विहिरीतल्या बेडकाला बाहेरचे जग माहीत असते का हो?
अजुन गाव नि गावकूस डोक्यातून गेलं नाही आणि समुद्राच्या गप्पा कशाला ठोकताय?
-- रहाटगाडग्यातील गांडूळ्कुमार
&%& चरा &%&
आमचे राज्य
All frogs have happy wells.
19 May 2012 - 4:30 pm | अजातशत्रु
+९९
_/\_ हे सुचले नव्हते, लय भारी पायचीत :-)
.
.
.
.
.
.
(गटारातील मांडूळकुमार)
18 May 2012 - 12:33 pm | कौतिक राव
अशी माती खाता ना नेहमी म्हणुन तुम्हाला शत्रू नाहीत..
अधी हा दुवा वाचा
http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-camp...
हे वाचा:
Out of the four leaders, M. Gandhi is decapitated and Hitler is naked. Husain hates Hitler and has said in an interview 8 years ago that he depicted Hitler naked so as to humiliate him as he deserves it ! How come Hitler's nudity caused humiliation when in Husain's own statement nudity in art depicts purity and is in fact an honour ! This shows Husain's hypocrisy and perversion
मग सान्गा तुमचा हुसेन कसा होता ते..
आणी ही माती खाने कमी करा
18 May 2012 - 12:54 pm | अजातशत्रु
आणि त्याचे कौतुकही नाही :-)
मात्र मला स्वतःची मतं आहेत,
अशा लिंका फिंका वाचून मी माझे मतं बनवत नसतो.
16 May 2012 - 4:23 pm | अजातशत्रु
सरस्विटीला तरी कुठे 'नागवे' दाखविले होते?
नागवेपणा हा बघणर्याच्या 'डोळ्यात' असतो..:-)
ता.क. ज्यांना कलाकृतीतले काही कळत नाही त्यांनी रविवर्म्याची चित्रे पाहण्याचे धाडस करु नये
16 May 2012 - 4:35 pm | इस्पिक राजा
आपण शिवधर्मी का काय ते दिसताय.
16 May 2012 - 4:46 pm | JAGOMOHANPYARE
आणि मी कोण हो? रिपब्लिक काय?
--- किलवर अठ्ठी
16 May 2012 - 5:13 pm | इस्पिक राजा
तुमी माझे काय बी वाकडे केलेले नाय. त्यामुळे तुमाला मी शिव्या देनार नाय.
मारोबामनसारे
17 May 2012 - 12:40 am | JAGOMOHANPYARE
धन्यवाद.
18 May 2012 - 12:34 pm | कौतिक राव
आठवले गटाचे दिसताय..
17 May 2012 - 12:59 am | शिल्पा ब
http://www.scrollindia.com/wp-content/uploads/2010/03/mf1.jpg
http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-camp...
हे वरचे दुवे त्यांनी काढलेली चित्र दाखवतात...खालचा दुवा जरूर पहा म्हणजे "खांद्यावर घेतल्यावर कानात मुतणे" काय असतं ते कळेल.
18 May 2012 - 1:21 pm | अजातशत्रु
श्री श्री नाना पाटेकर यांचा विजय असो. _/\_ :-)
भारतात कडेवर घेण्याची पद्धत आहे.
तस्लिमा नसरीनला नव्हते का आम्ही कडेवर घेतले? :stare:
18 May 2012 - 9:38 pm | शिल्पा ब
फालतुपणे विषय बदलायचा प्रयत्न करु नका...मुद्यावर बोला.
चित्रांच्या लिंका वर दिल्यात..
17 May 2012 - 1:02 am | शिल्पा ब
http://www.scrollindia.com/wp-content/uploads/2010/03/mf1.jpg
http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-camp...
हे वरचे दुवे त्यांनी काढलेली चित्र दाखवतात...खालचा दुवा जरूर पहा म्हणजे "खांद्यावर घेतल्यावर कानात मुतणे" काय असतं ते कळेल.
बाकी इंग्रजांनीही भारतातील जनतेवर एकेकाळी भयंकर अन्याय केला होता, हाल केले होते...त्यांचं काय अन कसं करायचं म्हणता? का इंग्लंडात भारतीयांसाठी आरक्षण व्हावे म्हणुन एखादी ब्रिगेड तयार करायची?
आता आमची रजा. दगडापुढे डोकं फोडुन घेण्यात काही अर्थ नाही.
17 May 2012 - 8:07 am | अर्धवटराव
>>सरस्विटीला तरी कुठे 'नागवे' दाखविले होते?
-- क्या बात है. आईला मुलं कुठल्या नावाने हाक मारतील नेम नाहि.
अर्धवटराव
18 May 2012 - 1:15 pm | अजातशत्रु
भारत -माता
राष्ट्र-माता
धरणी -माता
गो -माता
गुरु -माता
धनलक्ष्मि-माता
समृध्दि-माता
सध्याच्या लेटेस्ट फॅशन मधल्या 'माता' आहेतच,
जशा अम्मा-टम्मा-माया-ममता-छम्मक छल्लो
यात दिवसागणीक एका नविन मातेची भर पडतेय (बुवा- बाबांचे तर विचारुच नका)
या सर्व 'आयां'मुळे भारतीयांचा गोंधळ उडलेला आहे
त्यामुळे नेमके कोणाला 'आई' म्हणावे या भ्रमातून तो सुटलेला नाही
त्यामुळे स्वतःच्या 'जन्मदात्या आईला मात्र' वृद्धाश्रमात हाकलून आम्हि भारतीय मातृसंस्थेचे गोडवे जगाला सांगत फिरत असतो
हेच आमचे खरे मातृप्रेम आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
( :sad: )
18 May 2012 - 11:15 pm | अर्धवटराव
याच नाहि तर अजुन बर्याचजणी मातृलिस्ट मध्ये सामावता येतील... काय हरकत आहे? जितकी ममता (कुलकर्णी/बॅनर्जी नव्हे) जास्त तितके समाजाचे भलेच, नाहि का? आणि त्यात गोंधळण्यासारखं काय आहे? जेवताना जर पोळी, भाजी, भात, कोंबडी, माणसाचं डोकं... हे सर्व खाता येतं... कुठे गोंधळ नाहि होत.
राहिला प्रश्न भारतेयांनी आयांना वृद्धाश्रमात पठवण्याचा.... तर यामागचं कारण भावी आयाच असतात (पक्षी सुनबाई) कुर्हाडीचे दंडे गोतास काळ, आणखी काय.
अर्धवटराव
19 May 2012 - 10:02 am | अजातशत्रु
आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही.
उदा.देताना इतर शुल्लक खाण्या- पिण्याचे आणि प्राण्यांचे दाखले देणे
त्या मातेच्या मातृत्वाचा अपमान आहे असे आम्ही समजतो.
शेवटि दोष स्त्रियांनाच (सूनेला) ना? शाब्बास..
मुलगे तर आसवे गाळून सुनेच्या हाता-पाया पडून पक्षि लोटांगण घालून
वृद्धाश्रमात पाठवू नकोस म्हणून पत्नीपुढे गयावया करत असतात काय?
19 May 2012 - 10:38 am | शिल्पा ब
आपल्या तीक्ष्ण बुद्धीपुढे अन अफाट आकलनक्षमतेपुढे आमचा नमस्कार.
19 May 2012 - 4:14 pm | अजातशत्रु
अर्थात मी 'ढ' नाही.
तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेता आणि मुद्दाम अंगावर ओढता, त्रागा लक्षात येतोय तुमचा,
तुमच्या प्रयत्नांना आमचा रामराम :-)
19 May 2012 - 7:14 pm | शिल्पा ब
अर्थातच..तुम्ही "ढ" नाही तर अतिशहाणे आहात..बघा ना आम्ही काय करतो हेसुद्धा तुम्हाला समजलं.
आम्ही ढ असल्याकारणाने सगळ्या गोष्टी समजुन घ्यायचा प्रयत्न करतो.
ते एक असो..मुळ मुद्याचं सोडुन तुम्ही चर्चा भरकटवताय कारण आता तुमच्याकडे मुद्देच नाहीत. जेव्हा सुचेल तेव्हा मुद्याचं जरुर लिहा.
20 May 2012 - 11:49 am | कौतिक राव
अरे अजात्शत्रू बाळ, शिल्पा ताइ म्हणता आहेत, विषय् सध्या व्यन्ग चित्रा वर चालू आहे ना, आणि तू आधि फालतु मुद्दे दिले होतेस ना! ते सम्पले का? असे त्या विच्आरत आहेत.
मग बाळा तू असे विषयाना फाटे का बरे फोडतो आहेस? मात्रुप्रेमा विषयी बोलायला आपण एक वेगळा धागा सुरु करु ह बाळा!!
पण (तर्कशुद्ध) मुद्दे नसतीलच तुझ्या कडे तर तू तरी बापडा काय करणार म्हणा..
21 May 2012 - 8:52 am | अजातशत्रु
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या अनुषंगाने मान.हुसेनजींचा विषय येणे स्वाभाविक आहे.
आणि खेडेकरांच्या पुस्तकाचाही, तेव्हा ते विषय फालतू कसे काय ठरतात ?
अर्थात मानसिकताच फालतू असेल तर
सारे जगच फालतू वाटू शकते.
जर हे विषय फालतू होते तर ,त्यावेळी त्यासाठी इतके आकंड तांडव का बरे व्हावे?
मात्रुप्रेमा... मातृप्रेमाचा उमाळा अर्धवटरावांचा दाटून आलेला , तुम्हि त्यानाच का नाहि विचारत?
प्रतिसाद काळजीपुर्वक वाचत चला,
उगा भावनीक होऊन तोंडघशी पडू नका.
.
.
.
.
.
.
(भौतीक अभाव )
23 May 2012 - 9:04 am | कौतिक राव
भजात पर्तू..
मातृप्रेमाचा उमाळा अर्धवटरावांचा दाटून आलेला ..
आणि तुम्हाला काय तर म्हणे मान.हुसेनजींचा दाटून आलाय.. (द चा छ करु नका ;) , तेवढे उपकार करा मिपा वर)
24 May 2012 - 4:21 pm | अजातशत्रु
बाकी मान. मकबूल हुसेनजींना तुमच्या सारख्यांमुळे आजही यातना होत असतील
.
.
.
.
.
खुदा आपको मुआफ करें
21 May 2012 - 8:53 am | अजातशत्रु
अर्थात , त्यानेच करमणूक होतेय.
यात तरी निदान यश येवो हिच सदिच्छा !!
तरी म्हणले हे रडगाणे अजुन कसे चालू झाले नाही :puzzled: :smile:
मागेही माझ्या एका धाग्यावर 'स्वतःच प्रतिसाद देऊन' चर्चेला सुरुवात केलीत
आणि वर माझ्यावरच 'तो ' धागा वर आणता म्हणून आरोपही केला होतात, हे विसरलात काय?
तुम्हाला 'ढ 'म्हणने हे समस्त 'ढ विरांचा' अपमान होईल, त्यामुळे टाळत आहे.
.
.
.
.
.
.
( खप्ला ढ )
21 May 2012 - 9:01 am | शिल्पा ब
अरेरे!!! कीती आकांड तांडव करताहात!! मुद्दे नसल्यावर लोकं व्यक्तिगत चिखलफेक करतात हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
21 May 2012 - 9:32 am | अजातशत्रु
व्यक्तिगत चिखलफेकीचा आरोप हे वरच्या प्रतिसादात राहून गेले,
मी कधिही असा कांगावा केलेला नाही,
व्यक्तिगत आरोप/चर्चा कोण करते हे इथल्या प्रतिसादांवरुनही सहज कळेल
इथे किंवा इतर संस्थळांवर जरी लोक माझे नाव घेऊन बोलतात,
मला चर्चा करायची असते धुळवड खेळायची नसते.
शह -काटशह देण्याच्या नादात मग आपण काहीही बरळू लागतो
आणि शेवटचा "वार" म्हणून हे व्यक्तिगत आरोपांचे हत्यार उपसतो.त्यात काहि नवल नाही.
असो
मला माझा 'ढ'पणा आणखी सिद्ध करायचा नाही.
हा शेवटचा प्रतिसाद.
21 May 2012 - 10:02 am | शिल्पा ब
बरं!!! पण हुशारपणा दाखवुन मुळ मुद्यावर तर या!!
बाकी व्यक्तिगत कोण झालंय हे प्रतिसादांवरुन कळतंच आहे याच्याशी सहमत.
23 May 2012 - 8:57 am | कौतिक राव
भाजप शत्रू,
अहो, तुम्हाला मुद्देसूद बोलता येत नाही हे समजू शकते,
पण साधे स्त्री दाक्षिण्या सुद्धा दाखवता येवु नये म्हणजे कमाल झाली बुवा..
बाइ माणसाला काय अप्शब्द लिहिले आहेत.. अरेरे.. किबोर्ड हातात आला म्हणून काहिहि लिहित सुटलात वाटते..
24 May 2012 - 3:57 pm | अजातशत्रु
तुमचा हायपोथेसीस तुमच्याकडेच ठेवा !!
.
.
.
.
.
.
(अवचीत आव :tired:)
19 May 2012 - 7:30 pm | अर्धवटराव
>>आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही.
-- अर्थात. आणि हे मातृत्व जिथुन जिथुन स्त्रवते त्याला नाकरणे हा त्या मातृत्वाचा अपमान आहे... पण हि त्या मातृत्वाचीच थोरवी आहे कि ती मुलांचे कुठलेही अपराध माफ करते.
>>उदा.देताना इतर शुल्लक खाण्या- पिण्याचे आणि प्राण्यांचे दाखले देणे
त्या मातेच्या मातृत्वाचा अपमान आहे असे आम्ही समजतो.
-- ह्म्म्म. ज्या अन्नावर पोषण होतय, ते क्षुल्लक. जे प्राणि ते अन्न पुरवतात ते क्षुल्लक. तरीच या देशातले शेतकरी फार जास्त सुखात आहेत. भरल्या पोटी पब्लीकला असे दिव्य विचार सुचतील तर का नहि म्हणा.
>>शेवटि दोष स्त्रियांनाच (सूनेला) ना? शाब्बास..
मुलगे तर आसवे गाळून सुनेच्या हाता-पाया पडून पक्षि लोटांगण घालून
वृद्धाश्रमात पाठवू नकोस म्हणून पत्नीपुढे गयावया करत असतात
-- हा दोष मी देत नाहिए, सासवांना आणि सुनांन त्रास कुणाकडुन होतो ते त्यांच्याकडुनच जाणुन घ्या. शिवाय या सगळ्याचा मातृत्व भावनेच्या भव्यतेशी काहि संबंध नाहि.
21 May 2012 - 9:13 am | अजातशत्रु
आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही.
हे मान्य करावेच लागते..:-)
वर पुरेसे स्पष्ट झालेले आहे,तरीहि पुन्हा गाडी त्याच रुळावर?
आता शेतकर्यांचा उमाळा :-)
शेतकरी अन्न पुरवतो/ पिकवतो ते त्याचे कर्म आहे आणि त्याचे फळ/ मोबदला त्यास मिळत असतो,
माता आणि तीचे मातृत्व यात कर्म सिद्धांत येत नाही,
तीचे मुलांसाठीचे प्रेम, संगोपन जे काही , हे निर्व्याज्य असते.
मुलांनी काहि द्यावे, वृद्धावस्थेत सांभाळावे असे काही नसते. तुमचे दिव्य इचार वाचून ड्वॉळे पानावले
तुम्हि सासु-सुनांचे डेली सोप फार गंभिरपणे पाहता असे दिसते,:-)
मुलग्याचा रोल महत्वाचा असतो,
मी रक्ताच्या मातृत्वा विषयीचा दांभिकपणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे,
अर्थात तुम्हाला त्याचे महत्व किती यावर सर्व अवलंबून असते.
.
.
.
.
.
.
.
.
( विवाहित आणि सुखी )
21 May 2012 - 9:23 am | शिल्पा ब
आपली आकलनक्षमता पाहुन मन भारावुन गेले.
21 May 2012 - 8:09 pm | अर्धवटराव
>>आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही.
हे मान्य करावेच लागते..
-- हॅ हॅ हॅ. म्हणुनच तुम्ही कुठल्याली नावाने हाका मारा, तिचे मातृत्व आटत नाहि हा मुख्य मुद्दा.
>>वर पुरेसे स्पष्ट झालेले आहे,तरीहि पुन्हा गाडी त्याच रुळावर?
-- ते स्पष्ट झालय होय... चला.. मुद्दा पटला म्हणायचा.
>>आता शेतकर्यांचा उमाळा. शेतकरी अन्न पुरवतो/ पिकवतो ते त्याचे कर्म आहे आणि त्याचे फळ/ मोबदला त्यास मिळत असतो,
-- आता तुम्हाला अन्न क्षुल्लक वाटलं... तर म्हटलं बघावं थोडा शेतकर्यांचा कैवार घेऊन.
>>माता आणि तीचे मातृत्व यात कर्म सिद्धांत येत नाही,
-- कर्मसिद्धांतवर बोलायचं म्हणताय... बघा बुआ... नाहितर आम्हालाच म्हणाल कि आता कर्मसिद्धांताचा उमाळा आला म्हणुन.
>>तीचे मुलांसाठीचे प्रेम, संगोपन जे काही , हे निर्व्याज्य असते.
-- म्हणुनच तुमच्या "सरस्विटी" या दिव्य नावाचं कौतुक केलं ना आम्हि.
>>मुलांनी काहि द्यावे, वृद्धावस्थेत सांभाळावे असे काही नसते. तुमचे दिव्य इचार वाचून ड्वॉळे पानावले
-- हॅ हॅ हॅ. आपले दिव्य विचार दुसर्याच्या हवाली करण्याचा तुमच्या मनाचा मोठेपणा बघुन आमचे डोळे थोडेफार पाणावलेच बघा. असते प्रतिभा एकेकाची.
>>तुम्हि सासु-सुनांचे डेली सोप फार गंभिरपणे पाहता असे दिसते,
-- नाहि बॉ. तुमचे वृद्धाश्रमावरचे विचार वाचले... म्हटलं आपलेही दोन पैसे टाकावे...
>>मुलग्याचा रोल महत्वाचा असतो, मी रक्ताच्या मातृत्वा विषयीचा दांभिकपणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे,
अर्थात तुम्हाला त्याचे महत्व किती यावर सर्व अवलंबून असते.
-- मी मातृत्वाच्या भव्यतेची, तिच्या क्षमाशिलतेची थोरवी गायचा प्रयत्न करतोय. त्याचे तुम्हाला महत्व असावे असं पुर्वग्रह लक्षीत/दुर्लक्षीत धरुन चालतोय.. कसं...
अर्धवटराव
22 May 2012 - 10:51 am | अजातशत्रु
तुलना प्रतिकांमधे चालू होती ना ...नावाचा मुद्दा कसा काय आला? :stare:
इतर प्रतिवादहि याच पठडितले तेव्हा ..आणखी पुढे हा हा हू हू करण्यात स्वारस्य नाही.
असो
.
.
.
.
.
.
(:tired:)
22 May 2012 - 8:22 pm | अर्धवटराव
प्रतिके वगैरे विषय काढुन ( आधीच भरकटलेला) धागा (अधीक) भरकटवाचा आमचा अजीबाद (कु)उद्देश नव्हता. तुम्ही ज्याप्रेमाने (वा कुठल्याही भावनेने) "सरस्विटी" हे नाव वापरले ते आम्हाला प्रचंड भावले आणि आम्हि त्याचीच दाद दिली.
अर्धवटराव
23 May 2012 - 11:07 am | कवटी
तेवढं ते २ % ब्रह्मवृंदाच्या करमणूकीसाठी ते पुस्तक छापल होत आणि पुस्तक छापायच्या मागे भाजपचा हात होता त्याचे पुरावे देतायना?
नाही म्हण्जे तुम्ही पुरावे शोधत असाल आणि त्याला वेळ लागेल हे मान्य. पण इकडच्या कुजकट लोकांच्या नासक्या प्रतिक्रीयांना उत्तरे देतादेता विसराल म्हणून आठवण केली.
24 May 2012 - 9:53 am | कौतिक राव
अहो हे असले वाचाळ लोक .. यान्ना आज काय बोल्ले ते उद्या विचारले तर आठवणार नाही...
आणि कणीतरी सान्गुन गेलेच आहे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.. म्हणून ही लोक क्रिया कराय्च्या ऐवजी प्रतिक्रिया करतात.. आणि त्याचे परिणाम अल्प्सन्ख्य असलेल्या तुमच्या ब्रह्मवृंदाना भोगावे लागतात..
16 May 2012 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार
पण हुसेनला मारहाण झाल्याचे, त्याच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे, ते चित्र मागे घ्यायला त्याच्यावरती दबाव आल्याचे कुठे ऐकण्यात नाही बॉ. बाकी आता तुम्ही चर्चेचा मुद्दा सोडून फाटे फोडायला लागल्याने तुमचा पाठलाग बंद केला आहे.
भागोमोहनप्यारे
16 May 2012 - 3:49 pm | टवाळ कार्टा
आपण(च फक्त) सेक्कुलर ना...
16 May 2012 - 7:23 pm | गणामास्तर
>>>>>हायला, असेच म्हणायचे झाले तर हुसेनच्या चित्रावर सरस्वती देवीनेही आक्षेप घेतलेला नाही. त्याचं काय करणार?
हाच न्याय सगळीकडे लावायचा म्हणाल तर डॅनिश वृत्तपत्रामध्ये जेव्हा पैगंबरांचे व्यंगचित्र छापले गेले होते, तेव्हा तरी कुठे पैगंबरांनी आक्षेप घेतला होता?
तरी पण झालीच ना जगभर जाळपोळ...?
20 May 2012 - 11:52 am | कौतिक राव
ब्रह्मव्रुन्दा ची... सही,,,
17 May 2012 - 2:30 pm | टवाळ कार्टा
एकच प्रश्न
तुम्हाला स्वताला त्या व्यंगचित्रामधे काय खटकले ते फक्त सान्गाल काय? (माझी बुध्धी कदाचित कमी पडते आहे त्या व्यंगचित्रामधले वाइट शोधायला)
मला पण पटले तर मी सुध्धा निषेध करीन
19 May 2012 - 11:50 am | विश्वनाथ मेहेंदळे
सगळेच निर्णय बहुमताने घ्यायचे का आता ? मग असे करूया, पुढील अभ्यासक्रम कसा असावा हे ठरवण्यासाठी देशव्यापी कौल काढूया डीटेल.
आणि अहो आधीच छापून झालेल्या पुस्तकांमुळे पैसा वाया कसा जाईल ? उलट ते व्यंगचित्र काढून टाकण्यासाठी इतकी पुस्तके परत प्रिंट करावी लागतील. आता तुमच्याच तर्कशास्त्राप्रमाणे हा खर्च कुणी करायचा? बसप ने ??
19 May 2012 - 12:20 pm | JAGOMOHANPYARE
बहुसंख्य पुस्तकाना कसला विरोध होत नाही, याचा अर्थ ती बहुसंख्याना मान्य असतातच. कौल काढायची गरज नसते. पाठ्यपुस्तके एकदम ५० वर्शाची नसतात छापत, ज्या त्या वर्षाचीच असतात.. फारसे नुस्कान होणार नाही. काळल्जी नसावी.
20 May 2012 - 12:24 am | विश्वनाथ मेहेंदळे
मे महिना अर्धा झाला. पुढच्या वर्षीची पुस्तके छापून तयार असतील असा माझा अंदाज आहे. करणार बसप खर्च ??
19 May 2012 - 4:15 pm | अजातशत्रु
बहु संख्यांच्या जागी बहुजन वाचावे.
बहु संख्यांचे म्हणणे असेही आहे कि, 'शिवाजीच्या बदनामीची केंद्रे' हे पुस्तक पाठ्यक्रमास लावावे.
जेणेकरुन मुलांना इतीहास हा विषय 'समजून' घेणे सोप्पे जाईल,
असे काल कुणी तरी चेपुवर बोलत होते,
छपाई खर्च अर्थात ब्रिगेडच करेल.
इथल्या काहि स्वयंघोषित विद्वानांना " खेडेकरांचे - शिवाजीच्या बदनामीची केंद्रे" या पुस्तकाचा सोयीस्करपणे विसर पडलेला आहे असे दिसतेय. त्यामुळे आठवण करुन दिली , बाकि काही नाही :-)
.
.
.
.
.
.
( हुसेन भक्त टरकूराम )
20 May 2012 - 12:24 am | विश्वनाथ मेहेंदळे
कोण हे बहुसंख्य ? मुठभर ब्रिगेडी कुठल्याही समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. उगाच स्वत:च स्वत:ला बहुसंख्य म्हणून घ्यायचे म्हणजे कमाल आहे. पार्श्वभागाला गोमय लावल्याने वृषभ होता येत नाही राव !!
करेल नाही तर काय. हरामाचा पैसा आहे, हरामखोरीच्या कामीच खर्च होईल.
20 May 2012 - 11:56 am | कौतिक राव
अजातशत्रू आठवलेन्चा हस्तक आहे असे वाटते??
20 May 2012 - 6:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शेणाचा पो हा शेणाचा पो असतो, मग ते शेण कुठल्या गाईचे किंवा बैलाचे आहे त्यात मला रस नाही :-)
शेणाचा पो जमीन सारवायच्या किंवा खत बनवण्याच्या तरी कामी येतो. इथे त्याची उपमा दिल्याने त्याचा अपमान झाला असल्याने मी समस्त शेणाच्या पोंची माफी मागतो.
20 May 2012 - 10:05 pm | JAGOMOHANPYARE
आधी लिहायचं, मग माफीही मागायची..
हे असं करतात म्हणुनच ब्रह्मसमंध दणके खातात
19 May 2012 - 9:54 pm | कापूसकोन्ड्या
आता भाजपा कुठे आले? तुम्ही दिग्विजय सिंगचे शिष्य काय हो?
16 May 2012 - 1:27 pm | अनुप ढेरे
सरकार आठवले आदि मंडळींचा छान वापर करुन घेते. अडचणीत सापडले कि असं काहितरी काढायचं. गेली ६ वर्ष हे चित्र आहे. आत्ताच कसे हे जागे झाले?
16 May 2012 - 3:20 pm | ऋषिकेश
एकदा का 'अबक' खतरे मे है' अशी आरोळी दिली की शहानिशा न करता झुंज सुरू करायची अशी आपली प्रंपराच हाये नाहि का?' अबक' सतत बदलत असतात इतकेच!
16 May 2012 - 8:22 pm | सोत्रि
सत्यवचन
- (कुठलीही आरोळी ऐकू न येणारा) सोकाजी
20 May 2012 - 11:57 am | कौतिक राव
+१
16 May 2012 - 3:55 pm | अविनाशकुलकर्णी
त्या काळातले व्यंग चित्र त्याचे संदर्भ निराळे आताच्या काळात ते संदर्भ लागु पडत नाहि..
मात्र जुन्या काळातिल प्रथा परंपरा याम्चे आज ते जुने संदर्भ देऊन ओकलेली गरळ चालते..
ते नको तर हे पण बंद करा..
16 May 2012 - 4:12 pm | चिरोटा
एकदम टाईमपास 'ईश्यु' आहे.व्यंगचित्रविरोधवाल्यांनी ईश्यु आणखी दोन दिवस ताणून धरावा. म्हणजे रविवारच्या पुरवण्यात खालील विषयांवर लेख पाडता येतील-
१)घटना- तिचा उद्देश.
२)कोणी किती मेहनत घेतली ह्यावर एक लेख.
३)ईतकी वर्षे विरोध का नाही केला ह्यावर एक लेख(झोपले होते काय ? ).
४)हे प्रश्न चर्चेच्या माधमातूनच सुटु शकतील ह्यावर एक (युरोप्/अमेरिकेचे उदाहरण देत) एक लेख.
16 May 2012 - 4:22 pm | मृत्युन्जय
वेल नीट पाहता ते कार्टुन थोडे आक्षेपार्ह आहे हे नक्कीच. सगळ्यांनाच काही असे वाटणार नाही की नेहरु गोगलगायीच्या पार्श्वभागावर मारताहेत. काहींना थोडे वेगळे देखील वाटु शकेल.
16 May 2012 - 5:03 pm | शाहरुख
सहमत आहे...माझ्या सुमार बुद्धिला हे चित्र पुस्तकात योग्य वाटत नाही..
चित्रासोबतचा पुस्तकातला मजकूर कुणाला माहिती आहे का ?
16 May 2012 - 5:47 pm | प्रसाद प्रसाद
मला व्यंगचित्रात काहीही अयोग्य वाटत नाही कारण व्यंगचित्रासोबत दिलेला मजकूर पुढीलप्रमाणे -
हे पुस्तकात प्रथम स्पष्ट केले आहे -
The voluminous debates in the Constituent Assembly, where each clause of the Constitution was subjected to scrutiny and debate, is a tribute to public reason at its best. These debates deserved to be memorialised as one of the most significant chapters in the history of constitution making, equal in importance to the French and American revolutions.
व्यंगचित्राच्या खाली पानावर असणारा मजकूर -
Cartoonist's impression of the 'snail's pace' with which the Constitution was made. Making of the Constitution took almost three years. Is the cartoonist commenting on this fact? Why do you think, did the Constituent Assembly take so long to make the Constitution?
आणखीही शेजारी मजकूर आहे.
जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी. एन सी ई आर टी च्या या लिंक मध्ये अकरावीच्या political science चे India Contitution at work हे पुस्तक अजूनही डाऊनलोड करता येते. पृष्ठक्रमांक १८ वर (keps201 ही फाईल) संदर्भीय व्यंगचित्र आहे.
http://www.ncert.nic.in/NCERTS/textbook/textbook.htm?keps2=1-10#
16 May 2012 - 6:10 pm | इस्पिक राजा
मागे चाबूक हातात असलेले नेहरु नसले असते तर फार बरे झाले असते.
17 May 2012 - 9:06 am | मृगनयनी
मागे चाबूक हातात असलेले नेहरु नसले असते तर फार बरे झाले असते.
सहमत!...
हो..ना.. नेहरू चचा - आम्बेडकर आणि गोगलगायीच्या मानाने फारच लुकडे सुकडे आणि बर्यापैकी कुपोषित दाखवलेत!.. तसेच त्यांनी लॉन्ग नेहरूशर्टाच्या खाली सलवार घातली आहे की नाही.. ह्याबद्दल शन्का घेण्यासारखे काहीतरी त्या चित्रात आहे!
आणि नेहरूचचांच्या हातातला चाबूक / दोरी इतकी आखूड आहे, की ती गोगलगायीच्या शेपटीपर्यन्तही पोचेल की नाही.. असे वाटते.. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे नेहरूचचांच्या कोटावर/ शर्टावर गुलाबाचे फूल दाखवले गेलेले नाहीये.
त्यामुळे मी व्यक्तिशः या व्यंगचित्राचा निषेध करते! :)
16 May 2012 - 10:21 pm | टुकुल
मला सुध्दा हे चित्र योग्य वाटत नाही, लेख आणी त्यावरील प्रतिक्रिया वाचण्याच्या आधीच चित्र पाहीले होते.
--टुकुल
17 May 2012 - 12:39 am | संजय क्षीरसागर
त्या वेळी ती राज्यघटना पूर्ण आणि स्विकृत व्हायची होती आणि नेहरु पंतप्रधान होते. आज ते हयात असते तर म्हणाले असते `घ्या हा चाबूक आणि द्या ती गोगलगाय मला बसायला'
16 May 2012 - 5:16 pm | JAGOMOHANPYARE
http://ncert.nic.in/NCERTS/textbook/textbook.htm?keps2=1-10
चाप्टर १, पान १८.. इतरही अनेक चित्रे आहेत. दुतोंडी नेहरु वगैरे...
20 May 2012 - 12:03 pm | कौतिक राव
डॉक्टर झाकिर नाईक सध्या 'वेडाआहेसकारे' या नावाने मिपाकरान्ना अनुग्रह देत आहे
16 May 2012 - 5:22 pm | चिगो
व्यंगचित्र पाहीले.. लिंकमध्ये दिलेला लेखही वाचला. चांगला विवेचनपुर्ण लेख आहे. ह्या व्यंगचित्राबद्दल मला जे वाटते ते असे की, १९४९ मध्ये जेव्हा हे व्यंगचित्र काढण्यात आले होते तेव्हाच्या परीस्थितीतून त्याच्याकडे पहायला हवे. भारत स्वतंत्र होऊन जवळपास २ वर्षे झाली होती, तरी भारताचा "देश" झालेला नव्हता. संस्थाने होती, त्यांचे विलिनीकरण आणि देशांतर्गत एकत्रीकरण व्हायचे होते किंवा सुरु होते.
अश्या परीस्थितीत भविष्यातील गरजांचा पुर्वविचार करुन एक मजबूत, कणखर आणि तरीही देशातील वेगवेगळ्या घटकांचा समावेश होण्यासाठी लागणारी लवचिकता असलेले संविधान बनवणे, हे संविधान समिती पुढचे आव्हान होते. त्यामुळे वेळ लागणारच होता. आता काही लोकांच्या मते त्यांना (संविधान समितीला) फक्त "कॉपी/पेस्ट" एवढंच करायचं होतं.. पण तसं नाहीये. वेगवेगळ्या देशांच्या संविधानांमध्ये असलेल्या प्राविधानांचा /कलमांचा अभ्यास करुन त्याला भारत देशाच्या हिशेबाने सुधारणे हे कठीण काम होते..
ह्या व्यंगचित्रात मलातरी नेहरुंचे "डेस्परेशन"च दिसले. नेहरु किती डेस्परेट ;-) होते, ह्यापलिकडे त्यात कुणाचाही अपमान नाही..
18 May 2012 - 12:39 pm | कौतिक राव
नेहरुन् चा अपमान झाला तर चालेल पण आम्बेडकरान्चा होता कामा नये
18 May 2012 - 4:35 pm | चिगो
आयला, हे कधी बोललो मी?
16 May 2012 - 6:14 pm | कापूसकोन्ड्या
एक च विनंती आहे. रंगपंचमी खेळा, होळी खेळा पण त्याची धुळवड होउ देउ नका. आसबेनी लिहीलेला लेख परत एकदा संदर्भ म्हणून वाचावा ही विनंती.
धन्यवाद
16 May 2012 - 7:14 pm | संजय क्षीरसागर
त्यांना (संविधान समितीला) फक्त "कॉपी/पेस्ट" एवढंच करायचं होतं..
= आणि मूळ फाईल पीडीएफ होती त्यामुळे वेळ लागला अशी ही पुस्ती जोडतात
16 May 2012 - 9:34 pm | अँग्री बर्ड
एकंदरीत हल्ली रिपब्लिकन पक्ष गट - अ ते ज्ञ यांना काही काम पण नाहीये, मायावती पण गप्पच होती, रामदास आठवले तर बेरोजगारच होते. गल्लोगल्लीतली "पंचशील" मंडळांची अजून काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यांना एक नवीन मुद्दा मिळाला एवढेच. बाकी व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही.
17 May 2012 - 4:41 am | रेवती
एकाही लिंकेवरचे चित्र मलातरी दिसत नाही. एवढ्यात गणेशा भेटलेले नसूनही असे होत आहे.
वादात भाग घ्यायचा राहून गेला याचेच काय ते वाईट वाटते.;)
17 May 2012 - 10:09 am | प्रभाकर पेठकर
नशिबवान आहात.
17 May 2012 - 8:55 am | नाखु
जुने स्कोअर सेटल करण्याचा चानस आहे....
मि पा वर आणि संसदेत सुद्धा...
17 May 2012 - 2:35 pm | टवाळ कार्टा
१९६० मधली व्यंगचित्रे आत्ता खटकतात....मग कोमन्वेल्थ च्या वेळी जी बेइज्जती झाली ती केव्हा खटकणार? (का इथे असेच असते असे बोलुन मोकळे होणार?)
17 May 2012 - 3:44 pm | कवटी
मग कोमन्वेल्थ च्या वेळी जी बेइज्जती झाली ती केव्हा खटकणार?
ती कशाला खटकल? तिकडंच्या भरल्या पोटीच हे ब्रह्मज्ञान पाजळल जातय ना...
18 May 2012 - 12:41 pm | कौतिक राव
अजुन ६० वर्शानी खटकणार!!
18 May 2012 - 12:41 pm | कौतिक राव
अजुन ६० वर्शानी खटकणार!!
19 May 2012 - 5:56 pm | तिमा
भारत हा कायम, खरा शत्रु न ओळखता आल्यामुळे, आपापसात भांडणार्या लोकांचा देश आहे आणि तो तसाच रहाणार आहे.
19 May 2012 - 9:45 pm | कापूसकोन्ड्या
एकदम पटले
19 May 2012 - 7:53 pm | JAGOMOHANPYARE
१०० प्रतिसाद
19 May 2012 - 9:43 pm | कापूसकोन्ड्या
जामोप्या, शंभरी गाठली, की धागाकर्त्याची शंभरी भरली.
( जा मो प्या हे अद्याक्षरावरुन बनविलेले नाव असून कोणताही अधिक्षेप करण्याच उद्देश नाही.) परत माफी मागा, काढून टाका,वगैरे कुणी सांगीतले आहे?
20 May 2012 - 12:53 pm | गोंधळी
वरील सर्व प्रतिक्रीया वाचुन माझी हि प्रतिक्रीया
लोकशाहि च्या आयचा घो.... ह्या वर चित्रपट मांजरेकरांनी बनवावा.