साहित्य:- १मध्यम आकाराची मेथीची जुडी (गड्डी),१वाटी ओलखोबरं, मुठभर दाणे,१ वाटी सांडगे , १टीस्पुन लाल तिखट, १टीस्पुन कांदालसुण मसाला, १टीस्पुन हळद,१टीस्पुन हिंग, १टीस्पुन मोहरी, २टेबलस्पुन तेल,चविपुरते मीठ २ मध्यम आकाराचे कांदे.
कृती :- मेथीची गड्डी निवडुन धुवुन घेतली . पाणि निथळल्यावर बारीक चिरुन घेतली.कांदे बारिक चिरुन घेतले. दाणे भाजुन कुटुन घेतले.
एका कढईत २ टेबलस्पुन तेल घालुन सांडगे थोडेसे परतुन घेतले.
थोडेसे गार झाल्यावर थोडे ठेचुन घेउन थोडेसे पाणि घालुन कुकरमधे शिजवुन घेतले.
सांडगे परतलेल्या तेलात मोहरी, हिंग , हळद घालुन फोडणी करुन
त्यात चिरलेली मेथी घालुन परतुन घेतली.
नंतर त्यात बारिक चिरलेला कांदा घालुन परतुन घेतले .
कांदा आणि मेथी शिजल्यावर त्यात शिजवलेले सांडगे , ओल खोबरं,तिखट, कांदालसुण मसाला,मीठ घालुन परतुन घेतले.
शेवटी दाण्याचे कुट घालुन भाजी एकत्र करुन घेउन एक वाफ आणली .
सांडगे -मेथी भाजी तयार.
प्रतिक्रिया
5 May 2012 - 1:19 pm | मुक्त विहारि
हे सांडगे घालून वांग्यांची भाजी पण मस्त लागते...
5 May 2012 - 1:30 pm | चिंतामणी
मग विचार करू नका आणि चांगले लागते असे फक्त सांगु नका.
पाकृ येउ द्या.
5 May 2012 - 3:11 pm | मुक्त विहारि
पण सध्या कॅमेरा नाही आहे ही पहिली सबब आणि सौदीत सांडगे, सोडे ई. मराठी वाळवणे मिळत नाहीत ही दूसरी सबब..
त्यामूळे थोडा धीर धरा....(निदान १ वर्ष)
5 Dec 2015 - 11:14 pm | चिंतामणी
पाकृ कधी पोस्टणार??????????
5 May 2012 - 1:25 pm | गणपा
मस्त.
एकदम चविष्ट पाकृ.
21 May 2012 - 2:39 pm | सुहास झेले
यप्प... ह्येच बोल्तो :) :)
5 May 2012 - 1:33 pm | मृत्युन्जय
भाजी मस्त झाली असणार याची खात्री आहे.
फोटो तेवढे अजुन थोडे स्पष्ट हवे होते.
5 May 2012 - 3:25 pm | नेहरिन
हो बरोबर .पण काय करणार चांगला केमेरा हरवल्या मुळे मोबाईलवर फोतो काढावे लगतात.
5 May 2012 - 5:34 pm | पिंगू
सांडगे घालून केलेल्या कुठल्याही पाकृ चविष्टच असतात. ही पण त्याला मुळीच अपवाद नाही.
- पिंगू
5 May 2012 - 5:56 pm | पैसा
छान कॉम्बिनेशन आहे!
5 May 2012 - 6:02 pm | सानिकास्वप्निल
सांडगे-मेथी छानचं लागेल :)
दिसत पण सुरेख आहे
सांडगे घालून केलेली आमटी खूप आवडते :)
5 May 2012 - 9:21 pm | रेवती
छान पाकृ आहे पण एक प्रश्न.
फोडणीत आधी कांदा नाही का परतायचा? मेथी त्यामानाने पटकन शिजते.
अर्थात भाजी आयती मिळत असेल तर तुम्ही आधी काय परतलेत याकडे मी लक्ष देणार नाही.;)
5 May 2012 - 11:38 pm | सोत्रि
मला सांडगे अतिशय प्राणप्रिय आहेत!
त्यात त्याला दिलेली मेथीची जोड, इथे चेन्नैत जीव कासावीस करून गेली :(
'चिंकाकू', पुण्यात आल्यावर सांडगे खायला घरी नक्की येणार बघा :)
- ('सांड'गा) सोकाजी
अवांतर: ५० फक्त, चमच्यांची मांडणी बघून आता 'सानिकास्वप्नील'यांच्या चमच्यांपेक्षा, जवळच्या जवळ पुण्यात पर्याय उपलब्ध झाला आहे ह्याची नोंद घावी ;)
6 May 2012 - 12:52 am | कुंदन
उद्या करावी म्हणतो सांडगे+मेथी भाजी.
6 May 2012 - 9:40 pm | निवेदिता-ताई
छानच ह
7 May 2012 - 1:46 am | Mrunalini
सांडगे हे अगदी नेहमीच आवडतात. मी ते कांद्यावर परतुन करते पण असे मेथी टाकुन पहिल्यांदाच ऐकले. करुन बघायला पाहिजे.
7 May 2012 - 12:32 pm | प्यारे१
सांडगा हा पदार्थच मुळात आवडत नसल्यानं .... नुस्ती पोच!
(अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत) प्यारे ;)
7 May 2012 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार
भाजी खामंग दिसते आहे.
करंटेपणाने आम्ही ही भाजी खाण्याची संधी सोडली हा गुन्हाच झाला.
असो...
20 May 2012 - 9:27 pm | दीपा माने
सांडगे हा प्रकारच मुळात चविष्ट आहे. ही भाजीही करुन बघणार आहे. पाकृ फारच आवडली.
24 May 2012 - 2:33 am | अर्धवटराव
कच्ची पपई किसुन त्यात मसाल घालुन वाळवतात तेच का?
अर्धवटराव
24 May 2012 - 10:02 am | चिंतामणी
पण सांडगे बनवायचे अजून प्रकार आहेत. कोहळा किंवा कलींगडाचा पांढरा गर वापरूनसुद्धा सांडगे बनवतात. पण त्यातील घटक पदार्थ वेगळे असतात.
24 May 2012 - 10:59 am | नेहरिन
कच्ची पपई घालुन करतात ते सांडगे नाही. या सांडग्यांमधे हरभराडाळ आणि उडदाची डाळ असते.
24 May 2012 - 10:31 am | जागु
वा छान आत्ताच सांडगे आणले आहेत. आता मेथी आणून ही भाजी करते.