गाभा:
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.
एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.
मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरु झाली. आता वेळ हे आपल्या साठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस लागत असेल तर ती स्पेस आली कोठून.
कोणी वैज्ञानिक निरुपण करु शकेल का ह्या प्रश्नाचे.
प्रतिक्रिया
1 May 2012 - 2:22 pm | बिपिन कार्यकर्ते
एकोऽहं बहुस्याम!
1 May 2012 - 2:26 pm | रणजित चितळे
आध्यात्मिक उत्तर आहेत ह्या प्रश्नाला पण मी येथे वैज्ञानिक उत्तर शोधतो आहे. मला वाटते देव आहे का नाही ह्याचे उत्तर ह्या कोड्यात दडलेले आहे.
1 May 2012 - 10:24 pm | दादा कोंडके
अध्यात्मिक म्हणजे 'हू आर यू? हू इज ही' वालंच का? :)
बाकी ह्या तुमच्या अध्यात्म वाल्यांना विज्ञानाला जे प्रश्न आतापर्यंत सुटलेले नाहीत त्याचीच उत्तर कशी माहित असतात कोण जाणे, ही उत्तरं मिळाली की अजून काहितरी असेलच.
पण धागा उत्तम, प्रतिसाद वाचतोय.
1 May 2012 - 10:56 pm | विकास
अध्यात्मिक म्हणजे 'हू आर यू? हू इज ही' वालंच का?
कधीकाळी ऐकलेली एक व्याख्या: कुणाच्या अध्यात अथवा मध्यात नसण्याची वृत्ती म्हणजे अध्यात्मिक! :-)
1 May 2012 - 2:53 pm | प्रचेतस
बिग बँग होण्याआधी विश्व बिंदुवत होतं. त्या स्थितीला आजचे भौतिकशास्त्राचे कुठलेही नियम लागू पडत नाहीत. सिंग्युलेरिटी असे त्या स्थितीला म्हटले जाई. महास्फोट सिद्धांताच्या समर्थकांना महास्फोटाच्या आधीच्या स्थितीच्या कुठलेही उत्तर अजूनही सापडलेले नाही किंवा सिंग्युलेरिटी नियमबद्ध करता आली नाही.
या सिद्धांताला विरोध म्हणून फ्रेड हॉईल आणि जयंत नारळीकर यांनी स्थिर स्थिती सिद्धांताची (स्टेडी स्टेट थियरी) कल्पना मांडली.
या सिद्धांतानुसार हे विश्व पूर्वी असेच होते, सध्याही असेच आहे आणि पुढेही असेच राहील. म्हणजेच विश्वाला आदी व अंत नाही, जरी त्यात अंतर्गत फेरबदल होत असतील तरीही.
असो.
उत्तम विषय.
अदितीच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
1 May 2012 - 3:32 pm | रणजित चितळे
ही सिंग्युलेरीटी ची कल्पना (थिअरी) छान आहे. पण ह्या सिंग्युलेरीटीचे स्वरुप कसे असेल. किंवा ही सिंग्युलेरीटीचा उगम काय. किंवा कोणतीही कल्पना केली तरी ती कशातून उगम पावली ह्याचा विचार सतत पडतोच.
1 May 2012 - 3:09 pm | चिखलू
किमयागारः अच्युत गोडबोले- हे पुस्तक सध्या वाचतो आहे. या सारख्या बर्याच प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील.
उत्तम विषय. अजुन या वरची चर्चा वाचायला आवडेल.
1 May 2012 - 3:10 pm | रणजित चितळे
बद्दल अधिक माहिती दिलीत तर बरे होईल
1 May 2012 - 3:26 pm | चिखलू
यामध्ये सोप्या भाषेत सगळ्या थेअरीज समजावुन सांगितल्या आहेत.
बहुतेक २००९ चे मराठी बेस्ट सेलर होते.
http://kharedi.maayboli.com/shop/Kimayagar.html
1 May 2012 - 9:29 pm | अर्धवटराव
किमयागार खरच खुप छान पुस्तक आहे. इतके वेगवेगळे विषय एकाच पुस्तकात सोप्या भाषेत समजाऊन सांगीतले आहेत गोडबोले सरांनी.
अर्धवटराअ
1 May 2012 - 3:09 pm | पैसा
विविध मते वाचायला आवडतील.
1 May 2012 - 3:13 pm | आबा
आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे
बिगबॅन्ग च्या आधी काय होते, हे बिगबॅन्ग च्या सहाय्याने सांगता येत नाही.
यापेक्षा चांगली थियरी तयार करण्याचं काम चालू आहे.
1 May 2012 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा
1 May 2012 - 6:06 pm | jaypal
यक्कु सिंग ......कालिंग यक्क्क्कु सिंग.............
1 May 2012 - 7:15 pm | यकु
>>> बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
तथाकथित 'उत्तर' सापडले तरी अनुभवण्याच्या बाबतीत ते मानवी आवाक्याच्या बाहेरचे असेल. उदा. वर वल्लीने म्हटलंय की बिग बँग होण्याआधी विश्व बिंदूवत होते. ठिक आहे, असे मानू होते, पण या उत्तरातून काहीही अनुभूती होत नाही. बिंदुवत होते म्हणजे नेमके कसे? वगैरे मानवसुलभ जिज्ञासा (खरं म्हणजे ही विचार/जिज्ञासाच मूळ प्रश्न आहे, विश्व कसे निर्माण झाले, मग आधी काय होते वगैरे बिलकुल गैरलागू मुद्दे, एकाच जिज्ञासेची वेगवेगळी रुपे आहेत, जिज्ञासा हा घटक यामध्ये मुख्य आहे) पुढे सुरुच राहिल, ही जिज्ञासा चितळे साहेबांच्या पुढच्या प्रश्नांतूनही दिसते. युगानुयुगांपासून चालत आलेली मानवी जिज्ञासा हा खरा प्रश्न आहे, त्यामुळे जिज्ञासा का निर्माण होते, विचार का निर्माण होतात हे प्रश्न विचारणे आणि त्यांचा आपल्यापुरता धांडोळा घेणे सर्वात जास्त सोयीस्कर असे मला वाटते, कारण जगातला कुठलाही प्रश्न पडणे म्हणजे जिज्ञासाच वेगळ्या रुपात पुढे चालू राहिलेली असते.
कुणी म्हणेल विश्वनिर्मितीच्या सगळ्या थिअरीज मला समजल्या आहेत किंवा विश्व कसे निर्माण झाले त्याची मला कल्पना आहे. पण तरीही ते जे काही उत्तर किंवा विश्लेषण असेल ते अंतिमत: कुणाचे का होईना 'विचारच' असतील. आणि विश्वनिर्मिती कशी झाले त्याचे उत्तर देणार्याचा जो मुख्य विचार असेल त्याला त्याने अनेक उपविचारांचे टेकू देऊन कुठलीतरी जंजाळ थिअरी मांडली असेल, जी आपण समजून घेण्याचा खटाटोप करु. ती व्यापक थिअरी पहिल्यांदा तर समजेल की नाही हे सांगता येत नाही, आणि समजली तरी तिने जिज्ञासा शमेलच असे नाही, कारण विचार आपला असो की दुसर्याचा ती अत्यंत अस्थिर गोष्ट आहे, काल केलेला विचार आज चुकीचा वाटू शकेल. कदाचित यामुळेच वैज्ञानिकांनी मांडलेल्या थिअरीजदेखील काही काळाने गैरलागू ठरुन नवे वैज्ञानिक (न्यूटनीयन फिजीक्स - आइन्स्टाइनचा नवा विचार) त्यापुढची, वेगळी थिअरी मांडतात - म्हणजे ते पुन्हा नव्याने 'विचारच' करतात. तर विशिष्ट प्रश्न हा खरा प्रश्न नाहीच, जिज्ञासा, विचार हे त्याच्या मागचे घटक खरे प्रश्न आहेत आणि या घटकांच्या धांडोळ्याची चर्चा इथे अपेक्षित नाही म्हणून इत्यलम् .
2 May 2012 - 9:21 am | रणजित चितळे
मॅटर किंवा एनर्जी आली कोठून हा प्रश्न (जिज्ञासा म्हणा) सतावतो. तेवढ्यात जालावर इतरत्र कोणीतरी आस्तिक व नास्तिक ह्यावर चर्चा आरंभली. मला वाटले ह्या प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकले तर, देव नाही (किंवा आहे) हे सिद्ध करता येईल, व आस्तिक नास्तिकाचा प्रश्न लवकरच सुटेल. पण माझ्या ह्या जिवनात तरी ते होऊ शकणार नाही असे आता वाटयला लागले आहे. ;)
2 May 2012 - 9:52 am | संजय क्षीरसागर
हा प्रश्न (जिज्ञासा म्हणा) सतावतो
= याच उत्तर वर दिलं आहे
>तेवढ्यात जालावर इतरत्र कोणीतरी आस्तिक व नास्तिक ह्यावर चर्चा आरंभली.
= ते ओघानं येणारच
> मला वाटले ह्या प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकले तर, देव नाही (किंवा आहे) हे सिद्ध करता येईल, व आस्तिक नास्तिकाचा प्रश्न लवकरच सुटेल.
= तो श्रद्धेचा भाग आहे पण त्याचही उत्तर आज दिलंय
>पण माझ्या ह्या जिवनात तरी ते होऊ शकणार नाही असे आता वाटायला लागले आहे
= तुम्ही उत्तरं पुन्हा शांतपणे वाचल्यावर लक्षात येईल की अस्तित्व अनिर्मित असल्यानं प्रश्न व्यर्थ आहे हे समजणंच प्रश्नाच उत्तर आहे
2 May 2012 - 2:51 pm | यकु
>>>मॅटर किंवा एनर्जी आली कोठून हा प्रश्न (जिज्ञासा म्हणा) सतावतो. तेवढ्यात जालावर इतरत्र कोणीतरी आस्तिक व नास्तिक ह्यावर चर्चा आरंभली. मला वाटले ह्या प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकले तर, देव नाही (किंवा आहे) हे सिद्ध करता येईल, व आस्तिक नास्तिकाचा प्रश्न लवकरच सुटेल. पण माझ्या ह्या जिवनात तरी ते होऊ शकणार नाही असे आता वाटयला लागले आहे.
--- दोन्ही गाण्यांचा आनंद घ्या ;-)
ये जमीं जब न थी, आसमां जब ना
चांद सुरज न थे, ये जहां जब न था
तब न था कुछ यहां, तब न था कुछ यहां
था मगर तु ही तु, अल्ला हूऽऽ अल्ला हूऽऽ अल्ला हूऽऽ !!
www.youtube.com/watch?v=K0wuPt5JfUY
किंवा
सबसे पहले सत नहीं था
असत भी नही
अंतरिक्ष भी नही
आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहां किसमें ढका था
उस पल तो अगम अटल जल भी कहां था
www.youtube.com/watch?v=NyFdtM_VPAg
शब्द आठवणीतून लिहिले आहेत, म्हणून मूळ गाण्यात वेगळे शब्द असू शकतात.
2 May 2012 - 5:55 pm | रणजित चितळे
प्रतिसाद थोड्या वेळाने
1 May 2012 - 6:25 pm | संजय क्षीरसागर
शांत होता ते महत्त्वाचय कारण प्रश्न दुय्यम आहे, तुम्ही प्रार्थमिक आहात
आता दोन चित्तदशा आहेत, एक, ज्याला प्रश्नच नाही आणि दोन, ज्याला उत्तर सापडलय.
ज्याला प्रश्नच नाहीत त्याला केव्हाही प्रश्न पडू शकतो आणि अस्वस्थ करू शकतो, ज्यानं उत्तर शोधलंय त्याला प्रश्न पडण्याची शक्यताच नाही.
आता या बॅकग्राऊंडवर तुमचे प्रश्न पाहा:
>वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस लागत असेल तर ती स्पेस आली कोठून.
>आध्यात्मिक उत्तर आहेत ह्या प्रश्नाला पण मी येथे वैज्ञानिक उत्तर शोधतो आहे. मला वाटते देव आहे का नाही ह्याचे उत्तर ह्या कोड्यात दडलेले आहे.
याचं उत्तर पाच हजार वर्षापूर्वी अष्टावक्रानं दिलंय (अष्टावक्र संहिता) तो म्हणतो "अस्तित्वाला सुरूवात आणि अंत नाही ते अनिर्मित आणि स्वयंभू आहे आणि पहिल्यापासून असंच आहे"
हेच उत्तर वल्लीनं त्याच्या प्रतिसादात दिलयं
>या सिद्धांताला विरोध म्हणून फ्रेड हॉईल आणि जयंत नारळीकर यांनी स्थिर स्थिती सिद्धांताची (स्टेडी स्टेट थियरी) कल्पना मांडली.
या सिद्धांतानुसार हे विश्व पूर्वी असेच होते, सध्याही असेच आहे आणि पुढेही असेच राहील. म्हणजेच विश्वाला आदी व अंत नाही, जरी त्यात अंतर्गत फेरबदल होत असतील तरीही.
या एका उत्तरानिशी सर्व प्रश्न एका फटक्यात सुटतात:
अस्तित्व अनिर्मित आणि स्वयंभू आहे त्यामुळे ते कालबद्ध नाही (ते पूर्वीही असंच होतं, सध्याही तसंच आहे आणि पुढेही असंच चालू राहिल).
ते अनिर्मित आणि स्वयंभू (किंवा स्वयंचलित) असल्यानं ते कसं निर्माण झालं हा प्रश्न व्यर्थ आहे, आणि
अस्तित्वाच्या निर्मितीत देवालामधे आणण्याची (किंवा कुठलाही सिद्धांत मांडण्याची) गरज नाही.
शेवटची गोष्ट स्टिफन हॉकिंगजच्या निष्कर्शानं (दि ग्रँड डिझाईन)मंजूर केलीये (http://www.manogat.com/node/20662)
1 May 2012 - 6:30 pm | रणजित चितळे
वाचत आहे, उद्याला लिहिन. इंटरेस्टींग आहे आपण लिहिलेले.
1 May 2012 - 9:42 pm | अर्धवटराव
ही गरज अस्तीत्वाच्या कर्मरुपातील उपपत्तीमध्ये आढळते. म्हणजे कसे, कि "असणे" ही जर क्रीया (कर्म ) मानले तर त्याचा कर्ता ओघानेच आला. अस्तीत्वाचं इंप्लीमेंटेशन डायनामीक असल्यामुळे (सतत परीवर्तनीय) आणि त्याच वेळी अस्तीत्व अनादी/अनंत/स्थल-काल अबाधीत असल्यामुळे या दोन्ही परिमाणांना एकाच नाण्याच्या दोन बाजु म्हणुन बघण्याच्या दृष्टीकोनात देव दडलेला असावा.
अर्धवटराव
2 May 2012 - 12:10 am | संजय क्षीरसागर
आवश्यकता नाही
>अस्तित्वाच्या निर्मितीत कुठलाही सिद्धांत मांडण्याची गरज!!
ही गरज अस्तीत्वाच्या कर्मरुपातील उपपत्तीमध्ये आढळते. म्हणजे कसे, कि "असणे" ही जर क्रीया (कर्म ) मानले
= असणं ही क्रिया नाही, स्थिती आहे
>तर त्याचा कर्ता ओघानेच आला.
= कर्ता, अस्तित्वाच्या निर्मितीची संकल्पना गृहित धरल्यानं येतो
>अस्तीत्वाचं इंप्लीमेंटेशन डायनामीक असल्यामुळे (सतत परीवर्तनीय)
= वारंवारिता हा अस्तित्वाच्या स्वयंसिद्ध असण्याचा परिणाम आहे
>आणि त्याच वेळी अस्तीत्व अनादी/अनंत/स्थल-काल अबाधीत असल्यामुळे
= अस्तित्व अनिर्मित असल्यानं अकाल आहे.
>या दोन्ही परिमाणांना एकाच नाण्याच्या दोन बाजु म्हणुन बघण्याच्या दृष्टीकोनात देव दडलेला असावा.
= अस्तित्व स्वयंपूर्ण आणि अनिर्मित असल्यानं देव या संकल्पनेची आवश्यकता नाही.
2 May 2012 - 1:31 am | अर्धवटराव
= असणं ही क्रिया नाही, स्थिती आहे
-- स्थितीला धारण करणे हि क्रिया आहे आणि त्या अनुशंगाने असणं हि देखील क्रिया आहे. तसं बघायला गेलं तर मग सर्वच स्थिती आहे, क्रिया काहिच नाहि. जर स्थिती स्वयंभू आहे तर मग क्रिया देखील.
= कर्ता, अस्तित्वाच्या निर्मितीची संकल्पना गृहित धरल्यानं येतो
-- नाहि. स्थितीला धारण करणारा म्हणुन कर्त्याचे प्रयोजन आहे.
= वारंवारिता हा अस्तित्वाच्या स्वयंसिद्ध असण्याचा परिणाम आहे
--एक्झेक्ट्ली. म्हणुनच अस्तित्वाकडे कर्तेपण जाते. पण या कर्त्याची एक खासियत हि की तो या परिणामांपासुन अलिप्त आहे. म्हणुनच तो एकाच वेळी वारंवारीतेचा खेळ दाखवु शकतो आणि त्याच वेळी अस्तित्व अबाधीत ठेऊ शकतो
= अस्तित्व अनिर्मित असल्यानं अकाल आहे.
-- हो. पण तोच काळाचा जन्मदाता देखील आहे.
= अस्तित्व स्वयंपूर्ण आणि अनिर्मित असल्यानं देव या संकल्पनेची आवश्यकता नाही.
-- स्वयंपूर्ण, अनिर्मित अस्तित्व असलेलाच देव आहे. त्याला संकल्पनेची आवश्यकता नाहि.
अर्धवटराव
2 May 2012 - 9:41 am | संजय क्षीरसागर
चालू ठेवू नाही तर कुणाच्या श्रद्धांना मला अव्हेरायचे नाही. ज्यांची देव आहे ही श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेमुळे जे सुखात आहेत त्यांची मानसिकता ढवळून मला काहीही मिळवायच नाही.
लीमाउजेट नी कुणाच्या प्रतिसादाला उत्तर देताना म्हटलय(http://www.misalpav.com/node/21521) : तुम्ही निर्गुण उपासना करा. मी सगुण उपासना करतो.>> ही वैयक्तिक धारणा आहे, ती मला मंजूर आहे आणि मी त्याविषयी काही म्हणू शकत नाही.
आता या बॅकग्राऊंडवर खालील उत्तर दिलं आहे :
मी : असणं ही क्रिया नाही, स्थिती आहे
तुम्ही : > स्थितीला धारण करणे हि क्रिया आहे आणि त्या अनुशंगाने असणं हि देखील क्रिया आहे. तसं बघायला गेलं तर मग सर्वच स्थिती आहे, क्रिया काहिच नाहि. जर स्थिती स्वयंभू आहे तर मग क्रिया देखील.
= स्थितीला "धारण" करण्याची आवश्यकता नाही.
आकाश ही स्थिती आहे तीचा अंत होत नाही म्हणजे कोणत्याही दिशेला तुम्ही कितीही दूर गेलात तरी आकाश संपणार नाही ते सार्वभौम, अकाल आणि सर्वव्यापी असल्यानं सर्व आकारांच्या आत-बाहेर आकाशच आहे.
आकाश सर्व प्रकटीकरणाचा स्त्रोत, सर्व क्रियांचा आधार आणि विलीनीकरणाचं स्थान आहे, थोडक्यात सर्व उत्पत्ती, स्थिती आणि लय आकाशात आहेत.
सर्व प्रकटीकरणाचा आधारच आकाश असल्यानं निर्मितीची अंगभूत क्षमता त्यात आहे. सर्व आकार ही "आकाश या निराकार स्थितीचीच" रूपं असल्यानं प्रत्येक आकार हा मुळात निराकार आहे, बुद्धानं त्यामुळे स्थितीला किंवा आकाशाला शून्य म्हटलंय.
शून्य हे आकारांच्या प्रकटीकरण, स्थिती आणि लयीनं अनाबाधित असल्यानं अलिप्त आहे त्यामुळे ती निव्वळ उपस्थिती आहे त्या अंगानं स्थितीला अध्यात्मात "साक्षी" म्हटलंय आणि तेच सर्वव्यापी आणि अंतर्बाह्य असल्यानं उपनिषदांनी शून्याला "पूर्ण" म्हटलंय.
आकाश ही अनिर्मित स्थिती असल्यानं निर्मात्याची संकल्पना बाद ठरते आणि आकारांच प्रकटीकरण, स्थिती आणि लय ही आकाशाची अंगभूत क्षमता असल्यानं कोणत्याही निर्मितीसाठी पुन्हा नवा निर्माता शोधण्याची गरज नाही.
2 May 2012 - 9:55 pm | अर्धवटराव
>>तुम्ही भावनिक होणार नसाल तर संवाद पुढे चालू ठेवू नाही तर कुणाच्या श्रद्धांना मला अव्हेरायचे नाही.
-- छे छे. अहो भावनीक कसलं. इन फॅक्ट भावनीक झालो तर असे मुद्दे डोक्यात येतच नाहि :)
सगळ्यात महत्वाचं म्हणजे... देव हा श्रद्धेचा विषय नाहिच मुळी. श्रद्धेची गरज जीवनाला आहे, देवाला नाहि.
= स्थितीला "धारण" करण्याची आवश्यकता नाही.
-- धारण केल्या शिवाय स्थिती येऊ शकत नाहि. इथे प्रश्न "आवश्यकतेचा" नाहि तर "स्थिती" या संज्ञेचा जो अर्थ मला कळतोय त्यावरुन मी हे प्रतिपादन करतोय. कंटेण्ट असेल तर कंटेनर असलाच पाहिजे. जरी कंटेण्ट हाच कंटेनर असेल तरी त्याला आपल्या कंटेनरशीपची स्वच्छ जाणीव असायलाच हवी. त्या शिवाय ते "पूर्ण " होऊ शकत नाहि.
>>आकाश ही स्थिती आहे तीचा अंत होत नाही म्हणजे कोणत्याही दिशेला तुम्ही कितीही दूर गेलात तरी आकाश संपणार नाही ते सार्वभौम, अकाल आणि सर्वव्यापी असल्यानं सर्व आकारांच्या आत-बाहेर आकाशच आहे.
-- येस्स. अॅग्री. आणि हेच आकाश आकार देखील धारण करते. दुसरी कुठली "नॉन आकाश" वस्तु अस्तित्वात नाहि. या आकार धारण करण्याच्या क्षमतेशिवाय आणि या क्षमतेच्या जाणिवेशिवाय आकाश पूर्ण होऊ शकत नाहि.
>>सर्व प्रकटीकरणाचा आधारच आकाश असल्यानं निर्मितीची अंगभूत क्षमता त्यात आहे. सर्व आकार ही "आकाश या निराकार स्थितीचीच" रूपं असल्यानं प्रत्येक आकार हा मुळात निराकार आहे, बुद्धानं त्यामुळे स्थितीला किंवा आकाशाला शून्य म्हटलंय.
-- हि अंगीभूत निर्मीती क्षमता आणि या क्षमतेची जाणिवच आकाशाला कार्य आणि कारण या दोन्ही भुमीका वठवायला सहाय्य करते. बुद्धाची शुण्याची डेफिनेशन अॅक्झॅक्टली काय आहे याची मला कल्पना नाहि. तुम्ही म्हणता तसा तो बॅलन्स पॉईंट असेल वा "काहिच नसण्याची परमावधी" देखील असेल. यावर अधिक विवेचन वाचायला निश्चित आवडेल.
>>शून्य हे आकारांच्या प्रकटीकरण, स्थिती आणि लयीनं अनाबाधित असल्यानं अलिप्त आहे त्यामुळे ती निव्वळ उपस्थिती आहे त्या अंगानं स्थितीला अध्यात्मात "साक्षी" म्हटलंय आणि तेच सर्वव्यापी आणि अंतर्बाह्य असल्यानं उपनिषदांनी शून्याला "पूर्ण" म्हटलंय.
-- शुण्याची उपनिशदामधली पूर्णावस्था शुण्याला त्याच्या निराकार अस्तित्वाची आणि साकार रूप धारण करण्याच्या क्षमवेची जाणिव असल्यामुळे मिळाली आहे. अन्यथा निराकार तत्व आणि आकार धारण करणारं दुसरच कोणितरी अशी ड्युएलशीप होईल आणि त्यांचा एकमेकांशी संबंध नसेल तर आकारत फसलेली जाणिव निराकारापर्यंत कधी परत जाऊ शकणार नाहि.
>>आकाश ही अनिर्मित स्थिती असल्यानं निर्मात्याची संकल्पना बाद ठरते आणि आकारांच प्रकटीकरण, स्थिती आणि लय ही आकाशाची अंगभूत क्षमता असल्यानं कोणत्याही निर्मितीसाठी पुन्हा नवा निर्माता शोधण्याची गरज नाही.
-- एक्झॅक्ट्ली. निराकार, अनिर्मीत, साक्षी असणारा, त्या संबंधी पूर्ण ज्ञान /जाणीव असणार आणि आपल्या क्षमतेने विवीध आकारांचे निर्माण-क्षय सायकल चालवणारा हाच तो देव. ही आकाशत्व ज्याची स्थिती, तो देव.
अवांतर - चितळे साहेब, माफ करा हं. तुमच्या धाग्यचं प्रयोजन वेगळच आणि मी विषय भलतीकडे नेतोय.
अर्धवटराव
3 May 2012 - 10:03 am | रणजित चितळे
मी आपले सगळ्यांचे प्रतिसाद एन्जॉय करत आहे. मस्त माझ्या ज्ञानात त्या मुळे भर पडत चालली आहे.
2 May 2012 - 10:28 am | रणजित चितळे
आपले प्रतिसाद मला नेहमीच आवडतात.
याचं उत्तर पाच हजार वर्षापूर्वी अष्टावक्रानं दिलंय (अष्टावक्र संहिता) तो म्हणतो "अस्तित्वाला सुरूवात आणि अंत नाही ते अनिर्मित आणि स्वयंभू आहे आणि पहिल्यापासून असंच आहे"
जयंत नारळीकरांची थिअरी काहीशी ह्या वरच आधारीत आहे. पटले पण - मला वाटते येथेच आध्यात्म व विज्ञानाची सांगड बसते.
त्याच्या पुढे (किंवा मागे म्हणा) जाऊन मला असे वाटते की हे जे स्वयंभू आहे, अनिर्मित आहे त्याला सुद्धा काही एनर्जीचे कॅपिटल लागतच असेल की. कोणी तरी ते कॅपीटल केव्हा तरी इनव्हेस्ट केलेच असेल की. हा इनव्हेस्टर कोण आहे व ते कॅपिटल त्याने आणले कोठून.
2 May 2012 - 12:20 pm | संजय क्षीरसागर
>आपले प्रतिसाद मला नेहमीच आवडतात.
= मन:पूर्वक धन्यवाद!
>याचं उत्तर पाच हजार वर्षापूर्वी अष्टावक्रानं दिलंय (अष्टावक्र संहिता) तो म्हणतो "अस्तित्वाला सुरूवात आणि अंत नाही ते अनिर्मित आणि स्वयंभू आहे आणि पहिल्यापासून असंच आहे"
जयंत नारळीकरांची थिअरी काहीशी ह्या वरच आधारीत आहे. पटले पण - मला वाटते येथेच आध्यात्म व विज्ञानाची सांगड बसते.
= इथपर्यंत तुम्ही आला असाल तर पुढचं सोपंय
>त्याच्या पुढे (किंवा मागे म्हणा) जाऊन
= त्याच्या मागे काही नाही सर्व पुढेच आहे!
आगदी एक्झॅक्ट हवं असेल तर असं म्हणा `मागे पुढे काही नाही' पहिल्यापासून हे असंच आहे, होतं आणि राहणार
>मला असे वाटते की हे जे स्वयंभू आहे, अनिर्मित आहे त्याला सुद्धा काही एनर्जीचे कॅपिटल लागतच असेल की. कोणी तरी ते कॅपीटल केव्हा तरी इनव्हेस्ट केलेच असेल की. हा इनव्हेस्टर कोण आहे व ते कॅपिटल त्याने आणले कोठून.
= नाही! स्थिती (किंवा आकाश) निर्जीव नाही चैतन्यपूर्ण आहे आणि म्हणून प्रकटीकरणाची त्याची क्षमता अंगभूतच आहे.
एक साधं उदाहरण सर्व विवाद संपन्न करेल. एकदम सायंटिफिक नाही पोएटिक आहे, थोडं नजाकतीनं घेतलं तर कळेल.
शांतता हे आकाशाचं आणखी एक परिमाण आहे, शांतता अनिर्मित आहे, जेव्हढे तुम्ही शांत होता तितके आनंदी होता आणि आनंदी झाल्यावर सहजच गुणगुणायला लागता.
आता हे गाणं त्या शांततेचीच अंगभूत क्षमता आहे, गाणं शांततेमुळे सुरु होतं, शांततेवरच प्रकट होतं आणि शांततेतच विलिन होतं.
पुढे आणखी थोडं पोएटिक आहे, गाणं सुरु व्हायला, चालू रहायला आणि संपन्न व्हायला शांतता सक्षम आहे त्यामुळे गाणं खरं असलं तरी गायकमधे आणण्याची गरज नाही.
गायक हा गाण्याचा निर्माता वाटत असला तरी शांतताच गाण्याचा स्त्रोत आहे आणि गायक जरी स्वत:ला व्यक्ती किंवा निर्माता समजत असला तरी तो मुळात शांतताच आहे.
अस्तित्वाचं अत्यंत व्यापक प्रमाणावर पण एक्झॅक्टली असंच आहे
(आयला, एका प्रतिसादात तुम्ही मला फुल अध्यात्म व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार!)
1 May 2012 - 6:40 pm | नाना चेंगट
>>>आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे.
ती फक्त थिअरी आहे. अशा अनेक सिद्धांतांपैकी एक म्हणून त्याच्या कडे पाहीले जाते. वर कुणीतरी नारळीकरांचा सिद्धांत सुद्धा मांडला आहे. महास्फोट सिद्धांत, आकाशगंगा आणि दिर्घिका एकमेकांपासून दूर जात आहेत या निरिक्षणाला पुष्टता देतो म्हणून अनेक जण त्याला मान्यता देतात. एकमेकांपासून दूर जात आहेत हे निरिक्षण मानवी कालानुसार जरी व्यापक कालावधीत झाले असले तरी तो कालावधी त्या केवळ दूरच जात आहेत असे सिद्ध करण्यास पुरेसा नाही असे अनेक जण मानतात. भविष्यात वेगळे निरिक्षण वेगळ्या निष्कर्षाला पुष्टी देणारे असू शकते.
>>>त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.
विश्वातील प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावानुसार असायला हवी ह्या अपेक्षेने महास्फोटाच्या आधी काय होते, महास्फोटाचे कारण काय असू शकते हा मानवी बुद्धीला पडणारा प्रश्न साहजिकच आहे. परंतु महास्फोट सिद्धांतानुसार महास्फोटाच्या वेळेसच दिक आणि काल अस्तित्वात आले त्याआधी त्याचे अस्तित्व नव्हते. मानवी इंद्रियांच्या मर्यादेनुसार दिक आणि काल या मितिंमधे जे असेल त्याचे ज्ञान ग्रहण होते, म्हणून महास्फोटाच्या आधी काय असेल याची कल्पना करणे अशक्य समजले जाते.
(अध्यात्मातील समांतर कल्पना विशद करण्याचा मोह टाळला आहे.)
1 May 2012 - 6:29 pm | रणजित चितळे
वाचत आहे. इंटरेस्टींग आहे. उद्याला सविस्तर लिहिन.
1 May 2012 - 7:24 pm | नितिन थत्ते
महास्फोटापूर्वी काय होते या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही*. खरेतर महास्फोटाचेवेळीसुद्धा काय होते याचे उत्तर मिळालेले नाही.
(* उत्तर मिळणारनाही म्हणजे उत्तर असले तरी त्या उत्तरापर्यंत पोचता येणार नाही. समजा हा महास्फोट खरोखरच एखाद्या निर्मात्याने घडवला असेल तर त्या निर्मात्यापर्यंत पोचता येणार नाही).
विश्वनिर्मितीच्या अनेक थिअरीज आहेत त्यातील महास्फोटाची थिअरी ही आजपर्यंत सर्वात यशस्वी आहे. अवकाशशास्त्रज्ञांना दिसून येणार्या बहुतेक निरीक्षणे या थिअरीत नीटपणे बसतात.
[स्थिरस्थिती सिद्धांत हा आता जवळजवळ अॅबॅन्डन्ड आहे. परंतु नारळीकर अजून त्याला चिकटून आहेत. :( विकिउल्लेख- The steady state model is now largely discredited, as the observational evidence points to a Big Bang-type cosmology and a finite age of the universe.]
एक रोचक दुवा.
2 May 2012 - 12:36 am | संजय क्षीरसागर
= कारण महास्फोट हीच कल्पना आहे
>खरेतर महास्फोटाचे वेळी सुद्धा काय होते याचे उत्तर मिळालेले नाही.
= याचही उत्तर वरील प्रमाणेच
>(* उत्तर मिळणार नाही म्हणजे उत्तर असले तरी त्या उत्तरापर्यंत पोचता येणार नाही. समजा हा महास्फोट खरोखरच एखाद्या निर्मात्याने घडवला असेल तर त्या निर्मात्यापर्यंत पोचता येणार नाही).
= निर्मिती ही संकल्पनाच बाद ठरल्यावर निर्मात्याचा प्रश्नच येत नाही
>विश्वनिर्मितीच्या अनेक थिअरीज आहेत त्यातील महास्फोटाची थिअरी ही आजपर्यंत सर्वात यशस्वी आहे. अवकाशशास्त्रज्ञांना दिसून येणार्या बहुतेक निरीक्षणे या थिअरीत नीटपणे बसतात.
= कारण त्यानिर्मितीपूर्व नसून निर्मितीपश्चात अवलोकनावर आधारित आहेत पण निर्मिती ही मूळ धारणाच चुकीची असल्यानं "बीग-बॅंग थिअरी" बाद ठरते आणि स्टिफन हॉकिंग आता याच निष्कर्शाप्रत पोहोचला आहे.
2 May 2012 - 11:23 am | नितिन थत्ते
>>निर्मिती ही मूळ धारणाच चुकीची असल्यानं "बीग-बॅंग थिअरी" बाद ठरते आणि स्टिफन हॉकिंग आता याच निष्कर्शाप्रत पोहोचला आहे.
याचा संदर्भ पहायला मिळेल का?
2 May 2012 - 12:10 pm | संजय क्षीरसागर
त्यातले याहूनं दिलेले उतारे नमूद करून हा प्रतिसाद दिला आहे (http://www.manogat.com/node/20662) तुम्ही ते पुस्तक बघू शकता
2 May 2012 - 6:14 pm | नितिन थत्ते
दुवा वाचला. माझा गोंधळ होत आहे बहुधा.
तुमच्या मनोगतावरील दुव्यात बिग बँग झालाच नाही असा हॉकिंगचा निष्कर्ष असल्याचे दिसले नाही. (पण तुमच्या वरील प्रतिसादातून मात्र मला तसे वाटले).
उलट
वगैरे वाक्यांमधून बिग बँग घडला आहे पण तो देवाने (किंवा कोणीतरी) घडवला असे मानायची गरज नाही असे सूचित होते.
माझी काही गल्लत होत असेल तर सांगावे.
4 May 2012 - 12:00 pm | संजय क्षीरसागर
स्टीफन नक्की काय म्हणतो ते पाहा:
"गॉड डिड नॉट क्रिएट दि युनिव्हर्स अँड द बिग बँग वॉज ऍन इनएवीटेबल कॉन्सिक्वन्स ऑफ द लॉज ऑफ फिजीक्स"
"बिकॉज देअर इज अ लॉ सच ऍज ग्रॅविटी, दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग"
" स्पाँटेनिअस क्रिएशन इज द रिझन देअर इज समथिंग रादर दॅन नथिंग, व्हाय द युनिव्हर्स एक्झिस्टस, व्हाय वी एक्झिस्ट",
तिन्ही विधानं नीट पाहा. तो शास्त्रज्ञ असल्यानं पहिल्या विधानात तो अवकाशाच्या (किंवा आकाशाच्या) अंगभूत क्षमतेला "द लॉज ऑफ फिजीक्स" म्हणतो पण पुढच्या विधानात शून्यातून निर्मितीच्या संकल्पनेची सांगड गुरूत्वाकर्षणासारख्या पदार्थविज्ञानाच्या नियमांशी घालतो. (या नियमांना मी अस्तित्वाचे अंगभूत नियम म्हणतो)
शेवटच्या विधानात मात्र तो रहस्यवादी होतो आणि म्हणतो स्पाँटेनिअस क्रिएशन इज द रिझन आलं लक्षात?
निर्मिती ही निराकाराची किंवा आकाशाची अंगभूत क्षमताच आहे.
शास्त्रज्ञाला निराकारापेक्षा (किंवा स्थितीपेक्षा) प्रक्रियेत, घटनेत किंवा कार्यकारणात रस आहे त्यामुळे त्याची प्रथम स्टेप नेहमी हुकते कारण आकाराच्या निर्मितीसाठी निराकार प्रथम हवाच नाही तर आकार कशात निर्माण होणार?
आणि इथपर्यंत तुम्ही समजला असाल तर पुढे सोपंयः
जर प्रत्येक आकाराची, `निर्मिती, स्थिती आणि लय' निराकारात आहे तर मग आकार निर्माण करण्याची अंगभूत क्षमता निराकारातच आहे त्यामुळे वेगळा महास्फोट घडण्याची किंवा त्यासाठी देवाला मधे आणण्याची गरज नाही
4 May 2012 - 12:10 pm | गवि
अगदी अगदी..
तसंही विज्ञान हे इंटरप्रीट करणारं, दिसणार्याचा अर्थ लावणारं काहीतरी आहे.
"काय?", "कसं?" "कशाने?" वगैरे शोधून काढण्यासाठी आणि शिस्तबद्ध मांडण्यासाठी विज्ञान आहे.
मुळात "का?" चं उत्तर द्यायला कोणीच नाही.
पाण्याची वाफ का होते? या प्रश्नात का ? दिसत असला तरी त्याचं जे उत्तर विज्ञान देतं ते "कशामुळे, कशी, कोणत्या प्रक्रियेने" वाफ होते याचं उत्तर असतं.
अॅबसोल्यूट "का?" अशा अर्थाने का? चं उत्तर फिजिक्सला किंवा कोणाला नाही देता येत.
4 May 2012 - 1:00 pm | संजय क्षीरसागर
थँक्स!
व्हाय? चं उत्तर विज्ञान देतं आणि `वॉट' चं उत्तर अध्यात्म.
जगायला दोन्ही आवश्यक आहेत आणि मला दोन्ही बदल नितांत आदर असल्यानं, अध्यात्म आणि विज्ञानात कधीही परस्पर विरोध दिसत नाही.
4 May 2012 - 1:10 pm | गवि
उलट झालं .
व्हाय ऊर्फ का? ला विज्ञान उत्तर देऊ शकत नाही. व्हॉट, ऊर्फ काय ला विज्ञानात मुद्देसूद उत्तरं असतात.
अध्यात्माविषयी फार माहिती नाही. त्यामुळे ते तरी "का?" चं उत्तर देऊ शकत असेल का अशी शंका आहे..
इथे "का?" म्हणजे एकदम मूळपुरुष असतो तसा "मूळ" का.. अभिप्रेत आहे..
4 May 2012 - 1:51 pm | संजय क्षीरसागर
वस्तु खाली का पडते? याचं उत्तर विज्ञान शोधतं आणि देतं पण ज्या आकाशात (किंवा स्पेसमधे) ती खाली पडते त्या आकाशाचा वेध अध्यात्म घेतं.
आकाश ही स्थिती आहे, वॉट; आणि आकाराची त्या आकाशातली निर्मिती, स्थिती आणि लय यांचा अभ्यास विज्ञान आहे.
आकाश या स्थितीला अध्यात्मात पुरुष म्हटलय आणि त्यातल्या आकारांच्या निर्मिती, स्थिती आणि लय या प्रक्रियेला प्रकृती म्हटलय
विज्ञान प्रकृतीचा अभ्यास आहे आणि अध्यात्म पुरुषाला जाणणं आहे
4 May 2012 - 2:12 pm | गवि
तुम्ही वेगळ्या प्रकारची टर्मिनॉलॉजी मांडली आहे म्हणून तुमचं म्हणणं त्यानुसार अगदी योग्यच आहे. मी ज्याला "का?" म्हणत होतो ते तुम्ही दिलेल्या उदाहरणाने दाखवतो.
वस्तू खाली का पडते?
मनुष्यः सफरचंद खाली का पडतं?
विज्ञानः गुरुत्वाकर्षण. (कशामुळे पडतं याचं उत्तर विज्ञानाने दिलं.. का पडतं याचं नव्हे.. मोठाच फरक आहे.)
मनुष्य : गुरुत्वाकर्षण म्हणजे काय?
विज्ञान : गुरुत्वाकर्षण म्हणजे कोणत्याही दोन वस्तूंमधील आकर्षणाचे नैसर्गिकरित्या कार्यरत असलेले बल. (काय हे उत्तमरित्या सांगितलं)
मनुष्य : कोणत्याही दोन वस्तूंमधे आकर्षणाचं बल का असतं?
विज्ञान : दोन्ही वस्तूंना वस्तुमान असल्याने हे बल त्या वस्तुमानाच्या प्रमाणात असतं. (कारणमीमांसा देताना केवळ निरिक्षण केलेला नियम सांगितला आणि वस्तुमान नावाची एक निरिक्षित फॅक्ट सांगितली.. का? ते नव्हे)
मनुष्य : वस्तुमान म्हणजे काय?
विज्ञान : (काय मुळे आनंदून) वस्तुमान म्हणजे अमुक अमुक अमुक..
मनुष्य : वस्तुमान म्हणजे काय ते समजलं. धन्यवाद.. आकर्षण वस्तुमानाच्या प्रमाणात असतं हेही ठीक. ..
पण प्रत्येक वस्तूला वस्तुमान का असतं?
विज्ञान : हे माझ्या कक्षेत सांगता येणार नाही.
..............
ही प्रश्नमालिका कोणत्याही प्रश्नाबाबत अशी खाली खाली येऊन "हे माझ्या कक्षेत सांगता येणार नाही." पर्यंत येईल, याचं मुख्य कारण तो सर्वात खाली बसलेला "का" चा कातळ..
..
हे सर्व चर्हाट केवळ माझा अँगल क्लियर करण्यासाठी.. तुमच्या मताला खोडण्यासाठी नव्हे.
5 May 2012 - 1:33 am | संजय क्षीरसागर
प्रतिसाद खाली दिलाय
5 May 2012 - 5:12 am | Nile
तुम्हाला पडलेले प्रश्न म्हणजे बहुतेक ओढूनताणून केलेला शब्दच्छल आहे असे वाटते. शाब्दिक खेळात वेळ घालवण्यात मला रस नाही पण कसे ते थोडक्यात सांगतो.
सफरचंद किंवा कोणतीही वस्तू खाली पडते. तेव्हाच जेव्हा तिला खाली पडण्यापासून रोखणारी व्यवस्था नसेल तेव्हा. आणि खालीच पडते कारण कोणत्याही व्यवस्थेच्या अभावी फक्त खाली असणारे बल वरचढ ठरते.
का पडतं? याचं उत्तर तर खुपच सोपंय. दोरीला दगड बांधा आणी मग दोरी कापा. दगडाचे काय होईल.. आणी का? त्यानंतर पुढे जाऊन पुनरुत्पादन म्हणजे काय आणी पुनरुत्पादन का? प्राणी मुलांना जन्म देतात.. का? ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं आणि सफरचंद का पडतं याचं उत्तर निगडीत आहे.
हे म्हणजे चहाला चहा का म्हणतात असं झालं. हा ही शब्दच्छलच. प्रत्येक गोष्ट अणु-रेणुंपासून बनलेली आहे हे विज्ञानानं दाखवऊन दिलेलं आहे. प्रत्येक अणूला वस्तुमान आहे, म्हणजे प्रत्येक वस्तुला वस्तुमान आहे. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक अणूला वस्तूमान का आहे. हा प्रश्न विश्वाच्या निर्मितीजवळ जातो. हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न स्ट्रींग थेरी मध्ये सुरु आहे. प्रयत्न सुरु आहे म्हणून विज्ञानाच्या कक्षेत नाही असे म्हणायचे असेल तर त्याला काही अर्थ नाही.
ग्रॅव्हिटेशन का आहे? हा प्रश्नही बहुतेक अनुत्तरीत आहे. म्हणून "फिलॉसॉफी" वाल्यांच फावतं. ग्रॅव्हिटेशनच का आहे, पृथ्वीवरच सजीव सृष्टी का, वगैरे प्रश्न विचारून विज्ञानात उत्तर नाही म्हणून फिलॉसॉफी अध्यात्म म्हणजे लै भारी असा एक बनावट ऑरॉ निर्माण करता येतो.
"The purpose of theoretical physics is not just to describe the world as we find it,but to explain -in terms of few fundamental principles- why is the world the way it is."
-Steven Weinberg
5 May 2012 - 10:21 am | गवि
नाईल.. तुम्ही कट्टर विज्ञाननिष्ठ आहात म्हणून असं म्हणता.
आज विज्ञानाकडे उत्तर नाही म्हणून अध्यात्मच हे उत्तर देऊ शकेल
असं मी
म्हण तोय अअसंउगीच वा टणं हे याचंच लक्षण आहे.
अध्यात्म उत्तर देऊ शकतं असं मला वाटतच नसल्याने मी ते कुठे
म्हटलेलंही नाही.
मी कोणताच कट्टर निष्ठ नसल्याने अध्यात्माबाबत काही खास प्रेम
अजिबात नाही.
" व्हाय?" हा आपल्या
फ्रेम ऑफ रे फरन्स बाहेर असल्याने कोणत्याच शा स्त्रा ला
तो कधीच शोधता येणार नाही अशी शंका आहे.
5 May 2012 - 2:44 pm | Nile
मला तुम्ही असं म्हणताय असं वाटत नाही. तुम्हाला शंका आहे असं तुम्ही म्हणताय हे मी वाचलं. तुम्ही उल्लेखलेला मुद्दा , 'का' चे उत्तर विज्ञानात सापडत नाही, मी खोडला आहे. पण शेवटी जोडलेली पुस्ती, अशा मुळेच अध्यात्मवाल्यांच (इ.) फावतं हे माझं मत आहे. तुम्ही अध्यात्मवादी आहात असं मी म्हणलेलं नाही. कट्टर विज्ञाननीष्ठ मी आहे, म्हणूनच कोणतीही गोष्ट गृहीत धरून मी चालत नाही.
अनेक व्हायची उत्तरं विज्ञानानी शोधली आहेत आणि शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. अध्यात्मवाले फक्त न सुटलेले प्रश्न घेऊन शब्दच्छल करतात असा माझा मुद्दा आहे. तुम्ही मांडलेल्या उदाहरणात असाच शब्दच्छल आहे असे मी म्हणलेले आहे. पण तुम्ही अध्यात्मवादी आहात असे विधान मी केलेले नाही.
5 May 2012 - 3:23 pm | गवि
ठीक आहे.
खुलाशाबद्दल आभारी.
बाकी कट्टर विज्ञानवादी असल्याचा एक परिणाम असा होतो की
विज्ञानाच्या भोवती असलेली.. किंबहुना सगळ्याच्याच भोवती
असलेली अभेद्य चौकट दि सेनाशी होते.
हे सर्व का आहे याचं उत्तर आपल्याला कशानेच दे णं श क्य नाही
ही मर्यादा मान्य करणं म्हण जे वि ज्ञानाकडे
पाठ फिरवणं नव्हे.
4 May 2012 - 12:22 pm | नितिन थत्ते
>>आणि इथपर्यंत तुम्ही समजला असाल तर पुढे सोपंयः
छे, हे असं समजण्याची क्षमता माझ्यात नाही.
बिग बँग वॉज द इनएव्हिटेबल कॉन्सिक्वेन्स ..... याचा अर्थ बिग बँग झाला नाही असा लावणे मला जमेल असे वाटत नाही.
(बिग बँगपूर्वी) अवकाश अशी काही गोष्ट अस्तित्वात होती असे काही हॉकिंग सूचित करत नाही. तुम्ही मात्र हॉकिंग तसे सूचित करत असल्याचे आरोपित आहात.
दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग.... याचा अर्थ बिग बँगपूर्वीच्या निराकाराने/अवकाशाने निर्मिती केली असा अर्थ मला काढता येत नाही.
बिगबँगपूर्वी आकार होता की निराकार होता हा (विश्वात राहणार्यांसाठी) इन्डिटर्मिनेट प्रश्न आहे.
जर प्रत्येक आकाराची, `निर्मिती, स्थिती आणि लय' निराकारात आहे तर मग आकार निर्माण करण्याची अंगभूत क्षमता निराकारातच आहे असा अर्थ कुठल्याच प्रकारे मला हॉकिंगच्या कुठल्या वाक्यातून काढता येत नाही.
अधिक ठोस स्पष्टीकरण हवे.
4 May 2012 - 9:40 pm | रामपुरी
"आकार निर्माण करण्याची अंगभूत क्षमता निराकारातच आहे"
अहो हे शंभर टक्के सत्य आहे. तुम्हीच बघा कि हॉकिंगच्या तीन निरनिराळ्या वाक्यातून नसलेला अर्थ कसा काढता येतो ते. निराकारातूनच नाही का आकार निर्माण झाला?
"बिग बँग वॉज द इनएव्हिटेबल कॉन्सिक्वेन्स" याचा सरळ अर्थ "बिगबँग झाला" असा होत असला तरी बेहत्तर. "मी" म्हणेन तेच खरं ( इथे "मी" महत्वाचा. बाकी पुढचं वाक्य काय आहे याला महत्व नाही). :) :)
5 May 2012 - 12:34 am | संजय क्षीरसागर
कारण त्यांना सर्व समजलय त्यांच झालं की मी प्रतिसाद देईन.
5 May 2012 - 12:53 am | अर्धवटराव
रघुपतीराघव राजाराम !
पतीतपावन सीताराम !!
जय हो बाबा गांधिजी की
अर्धवटराव
5 May 2012 - 1:16 am | संजय क्षीरसागर
हे वाचलेलं दिसत नाही
5 May 2012 - 1:19 am | अर्धवटराव
प्रिकंडीशन मीट व्हायचे चान्सेस फार दिसत नाहित !!
अर्धवटराव
5 May 2012 - 1:36 am | संजय क्षीरसागर
कारण तुम्ही (बहुतेक आनंदानं) भजन सुरू केलय आणि त्यांना तर सर्व कळलय
5 May 2012 - 1:44 am | अर्धवटराव
>>ते आता तुम्ही आणि रामपुरी बघा
-- बळच. तुमच्या गळ्यातली धोंड आमचय गळी का उतरवताय ??
>>कारण तुम्ही (बहुतेक आनंदानं) भजन सुरू केलय
-- थोडं उलट. भजन सुरु केल्याने आनंद मिळतोय.
>>आणि त्यांना तर सर्व कळलय
-- नो कमेंट्स. पण तुम्ही म्हणताय तर असेल कदाचीत.
अर्धवटराव
1 May 2012 - 11:00 pm | निशदे
http://en.wikipedia.org/wiki/Big_Bang_theory#Timeline_of_the_Big_Bang
इथे थोड्या प्रमाणात माहिती आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे की अजून ही एक थिअरी आहे. मानवाच्या सध्याच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानानुसार ही थिअरी मांडण्यात आलेली आहे. नक्की बिग बँग कसा झाला आणि इतर प्रश्न संपूर्णपणे सुटलेले नाहीत.
2 May 2012 - 1:06 am | रामपुरी
जी गोष्ट अजून अस्तित्वातच नाही ती जालावर तरी कशी सापडेल? समर्पक उत्तराचा अजून शोधच लागलेला नाही. लागला की जालावर नक्की सापडेल (तोपर्यंत तुम्ही आम्ही अस्तित्वात असलो तर). :)
2 May 2012 - 11:22 am | sagarpdy
येथे वाचा. हे उत्तर असेल असे नाही, पण डोक्याला चांगले खाद्य आहे.
2 May 2012 - 1:44 pm | दिगम्भा
आमच्या अल्प माहितीनुसार जीवन, विश्व व सर्व काही यांचे अंतिम उत्तर ४२ हे आहे (संदर्भः रिचर्ड अॅडॅम्स, १९९७) ;)
अधिक माहितीसाठी "द हिचहायकर्स गाइड टु द गॅलॅक्सी"वाचावे.
2 May 2012 - 2:58 pm | सुधीर
लोकमान्यांचं "गीतारहस्य" वाचतोय, अजून एका प्रकरणानंतर "विश्वाची उभारणी आणि संहारणी!" हे प्रकरण आहे. बघू लोकमान्य काय म्हणतायत. खूप हळू हळू वाचतोय कारण टिळकांनी इतका सूक्ष्म विचार केलाय की मम पामराला "टकूरं खाजवावं लागतंय".
बिगबँग, स्ट्रींग, क्वांटम, रिलेटिव्हीटी थिअरीजची माहिती स्टिफन हॉकिंगजच्या "ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम" मध्ये झाली होती. हेच पुस्तक वाचूनच पहिल्यांदा मला "जग निर्माण होण्यापूर्वीच्या काळाचं काय करायच?(जग निर्माण करण्यापूर्वीच्या काळात परमेश्वर काय करतं होता? असा जरा आस्थिकांच्या धोतराला हात घालणार्या)" ह्या प्रश्नाची माहिती झाली होती. पण माझ्या "मी इथं मरायला काय करतोय?", या प्रश्नाचं उत्तर मला काही त्यावेळी मिळालं नाही. (अजूनही, सापडलं-सापडलं म्हणता शोधतो कधी कधी) काही वर्षांपूर्वी "इन्सेप्शन" पाहिला तेव्हा वाटलं वेळं अन् आयुष्य हा भास तर नसावा? सालं, कोणाच्या तरी मी स्वप्नात तर नाही ना? ड्रीम विदीन अ ड्रीम! थ्री, फोर, आणि किती लेवल ते "देवास" ठाउक.
जाउंदे, आता मी काही शोधतं नाहीए, मला ते प्रश्नही नकोत अन उत्तरही. हाथी घेतलेली कामं कशी संपवायची येवढच बघतो. त्यासाठी डेव्हीड अॅलनच "गेटिंग थिंग्स डन (जीटीडी)" कितपत उपयोगी पडतंय ते बघतो.
2 May 2012 - 3:19 pm | संजय क्षीरसागर
मला ते प्रश्नही नकोत अन उत्तरही
हाती घेतलेली कामं कशी संपवायची येवढच बघतो. त्यासाठी डेव्हीड अॅलनच "गेटिंग थिंग्स डन (जीटीडी)" कितपत उपयोगी पडतंय ते बघतो.
= खरंय
>लोकमान्यांचं "गीतारहस्य" वाचतोय, अजून एका प्रकरणानंतर "विश्वाची उभारणी आणि संहारणी!" हे प्रकरण आहे. बघू लोकमान्य काय म्हणतायत.
= कशाला?
2 May 2012 - 3:58 pm | सुधीर
बसं, लोकमान्यांची मतं (विशेषतः कर्मयोगावर) जाणून घेणे येवढेच! त्याच्याविषयी असलेला आदर, गीतारहस्य लिहिण्यापूर्वी त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना केलेला व्यासंग, वयाच्या साठीतही इंग्रज सरकारने, गीतारहस्य लिहिलेली वही जेव्हा परत देण्यास चालढकल केली तेव्हा "मी पुन्हा ग्रंथ लिहून काढेन, तो माझ्या डोक्यात आहे" अशी जबरदस्त इच्छाशक्ती आणि उत्साह (साठीत सुद्धा?) त्यामुळे मला हे पुस्तक(ग्रंथ) वाचावसं वाटलं. आत्तापर्यंत पहिली सहाच प्रकरणं वाचून संपलीएत, चांगली होती. गीतारहस्यकडे मी "थिअरी ऑफ एथिक्स" (जो विषय मला खूप कठीण वाटतो) च्या दृष्टीकोनातन जेव्हा बघतो तेव्हा ज्ञानात भर पडतेय असं वाटतं. पण १०० वर्षा पूर्वीची भाषा असल्याने थोडी समजायला कठीण (वेगळी) वाटते.
2 May 2012 - 5:48 pm | रणजित चितळे
खरे तर मला गीते पेक्षा गीता रहस्य जास्ती आवडते. किती वेळा वाचले तरी मन भरत नाही.
2 May 2012 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार
अजून धाग्यावरती देव- धर्म, श्रद्धा - अंधश्रद्धा, वेद- पुराणे, भारताची संस्कृती इत्यादी गोष्टींची टिंगल टवाळी, खालच्या भाषेतले शेरे कसे काय बरे आले नाहीत ? :)
2 May 2012 - 5:52 pm | रणजित चितळे
परा कारण येथे वैज्ञानिक चर्चा पाहीजे अशी विनंती केली होती. खरे म्हणजे एका पॉन्टवर विज्ञान, आध्यात्म व फिलॉसॉफी एक होते ते बहूतेक जण विसरुन, आस्तिक नास्तिक, देव आहे का एनर्जी आहे, आम्ही दांभिक का ते दांभिक ह्या वर येतात. :-(
2 May 2012 - 10:03 pm | अर्धवटराव
>> खरे म्हणजे एका पॉन्टवर विज्ञान, आध्यात्म व फिलॉसॉफी एक होते...
-- एकदम पर्फेक्ट मुद्दा
>> ...ते बहूतेक जण विसरुन, आस्तिक नास्तिक, देव आहे का एनर्जी आहे, आम्ही दांभिक का ते दांभिक ह्या वर येतात.
-- :( अहो विसरुन काय म्हणता... ते विचारातच न घेता गाडी सुसाट सुटते पब्लीकची. काय करणार. तसं बघितलं तर सामुहीक सुखी जीवन ही अत्यंत साधी गोष्ट आहे... पण खाजवण्यातच सुख मानत असेल कोणि तर रक्त निघणारच.
अर्धवटराव
5 May 2012 - 9:11 am | रणजित चितळे
।।।।।।।।।।।।।।।।सामुहीक सुखी जीवन ही अत्यंत साधी गोष्ट आहे... पण खाजवण्यातच सुख मानत असेल कोणि तर रक्त निघणारच.
अगदी खरे आहे आपले म्हणणे - पटले
2 May 2012 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते
आर यु शुअर मि. परा? ;)
3 May 2012 - 12:33 pm | कवितानागेश
<रटरटित निवेदकाच्या आवाजात>
"आखिर कहां गये सब वैज्ञानिक???"
"कुछही दिन पहले पाया था उनको यही किसी भीड्वाले धागोंपर!"
" लेकिन अब किसीकाभी कोई पता नहीं!"
"आखिर कहां रह गये सब वैज्ञानिक???"
" आईये ढुंढते है अल्याडपल्याडके संस्थळपर...."
"आखिर कौन है ऐसा जो सुलझाएगा इस एनर्जी मैटर को??"
"क्या आज इसी दिन इस बातका पता लग पाएगा, के किसने किया है बिग बैंग???"
"आखिर कहां रह गये सब वैज्ञानिक???"
:D
3 May 2012 - 12:40 pm | रणजित चितळे
लाईक इट
3 May 2012 - 8:30 pm | पैसा
हल्ली इंडिया टीव्ही जास्त बघतेस का ग?
(आणि अवांतरः नाझ्का लाईन्सचं शेवट काय झालं??! :D)
2 May 2012 - 6:07 pm | गवि
स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड डिझाईन पुन्हापुन्हा वाचून बर्यापैकी निराशा झाल्यावर आणि पूर्वी फिजिक्सची पदवी मिळवताना झालेल्या विज्ञानाच्या पायाभरणीवर आता (ग्रँड डिझाईनमधे न म्हटलेलं) असं नक्की वाटतं की विज्ञान (म्हणजे फिजिक्स) या गोष्टीच्या आधारे जगाची उत्पत्ती आणि तत्सम प्रश्न सोडवता येणार नाहीत.
याचा अर्थ लगेच समोरचा जे म्हणेल ते मान्य करुन किंवा देव अशी संकल्पना कंपल्सरी करुन एखाद्या श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा "विजय" झाला असं घोषित करण्याची जरुरी नाही..
माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी.
बाकी ग्रह, तारे, उंची, खोली, आई, बाबा, मित्र, डोंगर, हिरवा, मऊ, सुंदर, गार, गरम, जिवंत वगैरे वगैरे सर्व कॉन्शस असतानच्या "काळा"तला मतामताचा भाग झाला. काळ हा सुद्धा.
हे उत्तर अर्थात "शास्त्रीय" नाही. त्यामुळे चितळे ते स्वीकारतील किंवा कसे माहीत नाही.
आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल.
2 May 2012 - 6:15 pm | यकु
>>>>आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल.
---- गवि, नोट यूवर दीज सेन्टेसेस ;-)
नेमकी हीच दिशा पकडून युजींनी 'मृत्यू म्हणजे काय?' या प्रश्नाच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला आहे, तो अनुवादित करतो आहे, बहुतेक आज रात्री दोन अडीच वाजता तो अनुवाद टाकतो.
थँक्स टू युजी, काही ठिकाणी त्यांनी पटलं तर घ्या, नाहीतर चालू पडा असं म्हटलेलं नाही, उलट प्रश्न विचारणार्याला त्या प्रश्नात खोलवर शिरायला मदत केली आहे, मला ते प्रचंड आवडलं.
2 May 2012 - 6:20 pm | गवि
पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा मानूनच सगळं.. :)
युजी, त्यांची मतं, त्यांची मतं नसणं, देव, शक्ती, अस्तित्व, ई=एमसी स्क्वेअर, आईनस्टाईन, गुरुत्वाकर्षण, पुन्हापुन्हा अनुभवास येणारे विश्वाचे स्थिर नियम, फळ खालीच पडणं..
सारा सारा मतामतांचा किंवा एकमत करण्याचा भाग.
असलंच काही खरं तर फक्त आपली... आपलीही नव्हे... एकूण फक्त "जाणीव". ती नक्की आहे. बाकीचं माहीत नाही.. बाकीचा भाग मताचा.
3 May 2012 - 12:46 pm | संजय क्षीरसागर
= बिफोर आय स्टार्ट, मी इथलं माझं पहिलं विधान उधृत करतो:
प्रश्न महत्त्वाचा नाही, कोणत्या उत्तरानं तुम्ही शांत होता ते महत्त्वाचय कारण प्रश्न दुय्यम आहे, तुम्ही प्रार्थमिक आहात.
गवि, शोध ज्यावेळी प्रक्रियेच्या अंगानं घेतला जाईल तेव्हा ते विज्ञान होईल आणि प्रश्नकर्त्याच्या दृष्टीकोनातनं घेतला जाईल तेव्हा ते अध्यात्म असेल. विज्ञानाचा शोध प्रश्नकर्त्यापर्यंत कधीही पोहोचणार नाही आणि जोपर्यंत प्रश्नकर्ता शांत होत नाही तोपर्यंत सर्व वैज्ञानिक शोध जगणं सोपं करतील पण मूळ अस्वास्थ्य मिटवू शकणार नाहीत.
तुझा प्रश्न प्रश्नकर्त्याच्या अॅंगलनं आहे आणि तुझ्या दोन्ही प्रतिसादांचा सारांश असायं:
>माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी.
>आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल.
>असलंच काही खरं तर फक्त आपली... आपलीही नव्हे... एकूण फक्त "जाणीव". ती नक्की आहे. बाकीचं माहीत नाही.. बाकीचा भाग मताचा.
=या जगात फक्त एकच गोष्ट निर्विवाद आहे आणि ती म्हणजे आपलं असणं, आपण "मी नाही" असं म्हणू शकत नाही कारण "मी नाही" म्हणायला तरी मी हवाच; किंवा द अदर वे, जाणीव होणारा जाणीवेपूर्वी हजर असायलाच हवा.
"हे असणं" ही "जाणीवेपूर्वीची स्थिती" आहे; किंवा द अदर वे, हा आपल्या प्रत्येकाला सतत जाणवणारा मी, आपल्या सर्वांचा एकच आहे. तो एकच असल्यानं निराकार आहे, आदीम आहे, सर्वत्र आहे आणि मुख्य म्हणजे तो जाणीवेनं अनाबाधित आहे.
जर आपल्या निव्वळ असण्याच्या जाणीवेशी किंवा त्या जाणीवपूर्व स्थितीशी आपण सतत संलग्न राहू शकलो तर जाणीवेत घडणारी प्रत्येक घटना आपण जाणू शकू मग ती शारीरिक हालचाल असो, विचार असो, भावनांचे कल्लोळ असोत, झोप असो की मृत्यू.
ही जाणीवपूर्व स्थिती गवसण्याला किंवा तो सार्वत्रिक मी गवसण्याला सत्य गवसणं म्हटलंय आणि त्या जाणीवपूर्व स्थितीत कायमच्या स्थित झालेल्या पुरूषाला (खरं तर कुणाही व्यक्तीला, पुरुष असो की स्त्री) सिद्ध म्हटलंय.
(सध्या सॉलिड बि़झी आहे त्यामुळे इतर सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरं वेळ मिळाल्यावर देईन)
10 May 2012 - 4:50 pm | विटेकर
माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी.
दासबोध दशक ९ समास ६ गुणरुपनिरुपण
जाणीव म्हणिजे जाणतें चळण| तेंचि वायोचें लक्षण |
वायोआंगीं सकळ गुण| मागां निरोपिलें ||१९||
म्हणोन जाणीवनेणीवमिश्रीत| अवघें चालिलें पंचभूत |
म्हणोनियां भूतांत| जाणीव असे ||२०||
पूर्ण समास मूळातूनच वाचावा !
2 May 2012 - 11:51 pm | कवितानागेश
अस्सं क्काय!!!
वाचतेय..... :)
3 May 2012 - 12:09 pm | मूकवाचक
जगभरच्या शास्त्रज्ञांनी आपली 'एनर्जी' अनंत काळपर्यंत पणाला लावली तरी हे 'मॅटर' मिपापुरतेही क्लोज होईल असे वाटत नाही.
3 May 2012 - 12:59 pm | रणजित चितळे
आपले सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मला किती अजून शिकायचे (जाणून घ्यायचे) आहे त्याची ग्वीही मिळीली. छान मुद्देसूद प्रतिसाद पाहून तरी आपण कोठे आहोत व आपल्याला किती जन्म अजून घ्यावे लागणार आहेत ह्याची कल्पना आली. ;)
3 May 2012 - 5:29 pm | संजय क्षीरसागर
व आपल्याला किती जन्म अजून घ्यावे लागणार आहेत
= असा विचार करू नका, कारण समजलं नाही तरी आपण सत्यच राहतो.
सत्य समजलं तर आहे आणि न समजलं तर नाही असं नाही.
कुणाला समजो न समजो, कुणी दखल घेवो न घेवो, सत्य आहेच
कारण सत्य ही कायम स्थिती आहे.
एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा सत्य समजल्यावर जगण्यात तुफान मजाय पण सत्य समजलं नाही म्हणून निराश होण्यात अर्थ नाही, इतर अनेक गोष्टी आहेत ज्यात तुम्ही रमू शकता त्यांचा आनंद घ्या.
पण एक मात्र नक्की, जे काय असेल ते आता, या जन्मी आणि इथेच आहे, मग ते सत्य असो की लौकिक, कोणतीही गोष्ट पुढे ढकलण्यात अर्थ नाही
4 May 2012 - 11:14 pm | मराठे
ह्या विषयाशी थेट संबंध नाहीये, पण तुमच्या एका प्रतिसादात तुम्ही म्हटलंय "मला वाटते देव आहे का नाही ह्याचे उत्तर ह्या कोड्यात दडलेले आहे." त्याच्या संदर्भात पूर्वी टि.व्ही.वर पाहिलेली एक मुलाखत आठवली. कोणाची, आणि कोणी घेतलेली ते काही आठवत नाही पण त्यात मांडलेले मुद्दे मात्र लक्षात थोडेफार लक्षात आहेत.
"देवाचं कार्यक्षेत्र दिवसेंदिवस कमी होतंय. फार फार पूर्वी दिवस, रात्र, ग्रहण, पाऊस, वादळे, भूकंप हे देवाच्या कृपे/अवकृपेमुळे होतात असा समज होता. पण हळू हळू विज्ञानामुळे त्यामागची कारणं समजू लागली आणि त्यामुळे ग्रहण होतं त्यात देवाचा काही हात नाही हे समजलं. मानवाची उत्क्रांती कशी झाली हे समजल्यावर देवाने माणसाला निर्माण केलं ह्या समजाला तडा गेला. आपलं ज्ञान जसंजसं वाढत जाईल तसं तसं घडणार्या प्रत्येक गोष्टीमागील कारणमिमांसा आपल्या ध्यानात येईल आणी आपण देवाला दोष देउन गप्प बसण्यापेक्षा त्या कारणाकडे लक्ष देऊ शकू. देवावर हवाला ठेऊन जगायला सुरूवात केली तर आजूबाजूला होणारी प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने न पाहता 'देवाची करणी' असं म्हणून माणूस गप्प बसेल आणि त्याच्या बुद्धीची वाढच खुंटेल."
तुमच्या ह्या प्रश्नाचं पण तसंच आहे. जोपर्यंत विज्ञानाकडे ठाम उत्तर नाही तोपर्यंत हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी / देव आहे असा समज राहिल.
सहज आठवलं म्हणून सांगतो, कॉलेजमधे असताना मी माझ्या मित्राबरोबर आकाशदर्शनासाठी वांगणीला जात होतो. ट्रेन मधे गप्पा मारताना, त्याला म्हणालो, ज्याप्रमाणे भोवरा स्वत:भोवती फिरताना त्याचा अक्ष स्थिर नसतो, तसंच पृथ्वीचाही अक्ष स्थिर नसतो. त्यामुळे ध्रुवतारा आज जरी आपल्याला एका ठिकाणी दिसत असला तरी हजारो वर्षांपूर्वी तो तिथे नव्हता." यावर माझा मित्र म्हणाला, "म्हणजे ध्रुव बाळाला मिळालेलं अढळपद खरं नाही असं तुला म्हणायचंय का? तुझा त्यावर विश्वास नाही का?" या त्याच्या प्रश्नावर मला काय बोलावं तेच समजेना. त्याला समजावण्याच्या भानगडीत मी काही पडलो नाही. काही काही वेळा गप्प बसणंच जास्त सोयिस्कर असतं. असो.
4 May 2012 - 11:23 pm | अर्धवटराव
>>म्हणजे ध्रुव बाळाला मिळालेलं अढळपद खरं नाही असं तुला म्हणायचंय का? तुझा त्यावर विश्वास नाही का?
--ठ्ठो...
अर्धवतराव
5 May 2012 - 1:29 am | संजय क्षीरसागर
का? हा वस्तुशी -वस्तुच्या परस्पर संबंधांचा किंवा किंवा वस्तुच्या अंतर-रचनेचा शोध आहे
विज्ञान जे आहे त्याचा उलगडा करतं
हा एक मस्त ज्योक आहे ,
शिक्षिका : गुरुत्वाकर्षण हा मानवी जीवनातला अत्यंत महत्वाचा शोध आहे आणि तो न्यूटनला सफरचंद झाडावरनं खाली का पडतं ? असा विचार केल्यानं लागला
विद्यार्थी : मॅम, गुरुत्वाकर्ष्णाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंदं खालून वर जायची का?
ट्राय टू अंडरस्टँड , प्रक्रियेचा अंत शोधता येत नाही हे शास्त्रज्ञाचं शल्य आहे आणि त्या अर्थी `का'? हा अंतीम अनुत्तरित प्रश्न आहे.
ऑन एनी लाईन ऑफ इन्क्वायरी वन कम्स टू अ `कल डी सॅक'; काय कारण असेल त्याच? तर एव्हरी थींग अल्टीमेटली टर्न्स इंटू अ मिस्ट्री!
आइनस्टाईननं म्हटलय... If I would be a young man again and had to decide how to make my living, I would not try to become a scientist or scholar or teacher. I would rather choose to be a plumber or a peddler in the hope to find that modest degree of independence still available under present circumstances.”
या अर्थानं `का'? हा अंतीम अनुत्तरित प्रश्न आहे.
पण अध्यात्म हा प्रक्रियेचा शोध नाही, तो ज्यात प्रक्रिया सुरु होते, चालते आणि संपते त्या अवकाशाचा शोध आहे कारण ते सर्व प्रक्रियांचा स्त्रोत आहे आणि म्हणून रहस्यांच रहस्य आहे.
हॉकिंग जेव्हा "बिकॉज देअर इज अ लॉ सच ऍज ग्रॅविटी, दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग" म्हणतो त्या नथिंगनेसला बुद्ध शून्य म्हणतो.
शास्त्रज्ञ उलगडा होत नाही म्हणून व्यथित होईल आणि बुद्ध अंतीम रहस्य गवसल्यानं शांत होईल इतकाच फरक आहे
5 May 2012 - 9:25 am | रणजित चितळे
एकूण काय कोणी काहीही म्हणो, विज्ञानात आज तरी मला सतावणा-या प्रश्नाला उत्तर नाही. मग लोक दुसरीकडे त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. त्या दुसरीकडच्या प्रयत्नाला काही लोक अध्यात्म म्हणतात. काही लोक फिलॉसॉफी म्हणतात, तर काही लोक विज्ञान म्हणतात.
शिक्षिका : गुरुत्वाकर्षण हा मानवी जीवनातला अत्यंत महत्वाचा शोध आहे आणि तो न्यूटनला सफरचंद झाडावरनं खाली का पडतं ? असा विचार केल्यानं लागला
विद्यार्थी : मॅम, गुरुत्वाकर्ष्णाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंदं खालून वर जायची का?
अवांतर काही लोक न्यूटनला कॉन्स्टीपेशन होते का विचारतात. कारण नाही तर गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान त्याला लहानपणीच झाले असते. ;-)
प्रत्येकाला सत्याची (ऋताची) उपरती व्हावा लागते, जेव्हा होते तेव्हा मग तो न्यूटन होतो, आईनस्टाईन होतो, ज्ञानेश्वर होतो, तुकाराम होतो, रमणा होतो, बुद्ध होतो, विवेकानंद होतो, किंवा फिलॉसॉफर होतो. बाकीचे मग त्यांचे अनूयायी होतात खरे पण अर्ध्या मुर्ध्या ज्ञानावर. मग एकमेकात भांडत बसतात विज्ञान श्रेष्ठ का अध्यात्म श्रेष्ठ. खरा विषय राहातो बाजूला. जेव्हा खरा विषय कळतो तेव्हा मग उपरती होते व त्यातून नवा न्यूटन किंवा ज्ञानेश्वर तयार होतो....
5 May 2012 - 2:15 pm | संजय क्षीरसागर
एका चांगल्या चर्चेबद्दल आभार
5 May 2012 - 2:26 pm | नितिन थत्ते
स्पष्टीकरण र्हायलं की वो !!
5 May 2012 - 3:39 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला व्य. नि. पाठवलाय, तुम्ही बिन्धास्त राहा.
28 Jun 2020 - 1:38 pm | शाम भागवत
अरे वा!
:)