आमच्या हातात भरपूर वेळ आणि मोफत लेखणी करण्याची पर्वणी आभसी जगतात विनाशुल्क उपलब्ध असल्याने असल्यामुळे आम्ही कोणावरही काहीही खरडू शकतो. असे अनेकांना वाटते ,मलाही वाटते म्हणून ही खरडेगिरी.
सचिन ला देव मानणारे अचानक त्याने खासदारकी स्वीकारली म्हणून दानव समजू लागले आहेत, इंटर नेट वर त्याला शिव्याची लाखोली वाहिली जात आहे.
जणू काही त्याने निशाने पाकिस्तान स्वीकारले आहे असा गजहब करण्यात येत आहे. पूर्वी हा देव मातोश्री वर दर्शन द्यायचा आता कृष्ण कुंज मध्ये त्यांचे बस्तान हलल्यामुळे अपेक्षित त्या प्रतिक्रिया राजकारणी मंडळींकडून आल्या. म्हणजे विरोध आणि समर्थन.
हातवाले सुद्धा ह्या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्या पक्षात सुद्धा काही चांगले काही वाईट लोक आहेत जे सर्वच पक्षात असतात.
ह्याच लोकांनी सनदी नोकरांना सुद्धा खासदारकी दिली ,पद दिले.
निरुपम व नंदी ह्यांना उमदेद्वारी कोणी आणी का दिली हे सोयीस्कर रीत्या विसरले जाते. सचिन ने जर राजकारणात कारकीर्द करायची ठरवली तर त्याला अमक्या एका पक्षाने गृहीत का धरावे हेच कळत नाही.
मुळात क्रिकेट व्यतरीक्त तो सार्वजनिक जीवनात काय निर्णय घेतो. हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. त्याचा आजपर्यंत चा लौकिक पाहता तो ह्या संधीचा सुयोग्य वापर करेल असे मला वाटते.
हातवाल्यांनी एकेकाळी अमिताभ ला पक्षात घेतले होते. आणि नुकतेच स्वीडन च्या माजी पोलीस प्रमुखाच्या मुलाखतीमधून स्पष्ट झाले की कात्रोची सुटला आणी अमिताभ अडकला.
सचिन ला राजकारणाचीआणी राजकारणी मंडळींची नक्कीच कल्पना आहे. सर्व सामान्य माणसांपेक्षा त्यांची ह्या वर्तुळात देशातील एक प्रतिष्टीत व लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून उठबस आहे.
क्रिकेट मध्ये तरुण वयात उघड्या डोळ्याने अझर जडेजा ह्यांना पैशाच्या गंगेंत आंघोळ करतांना पाहून ह्याच्या तोंडाला पाणी सुटले नाही. त्याकाळात सुद्धा तो आपल्या परीने देशासाठी मैदानावर झुंजला. म्हणजे आपल्याच संघातून काही जणांनी माती खाल्ली आहे हे शल्य उरी बाळगून तो मैदानावर उतरला.
प्रामाणिकपणा व मध्यमवर्गीय संस्कार आयुष्यभर जपत करोडो भारतीयांचा तो देव झाला. आणी आज देवावर संशय आणी शिंतोडे उडवण्याचे घोर पातक काही तथाकथित विद्वान करत आहेत.
महापुरुषांचे पाय देखील मातीचे असतात. सर्वच पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी आपल्या सगळ्यांच्या देखत कधी ना कधी कोणत्यातरी मुद्यावर माती खाल्ली.
राजकारण केले.
सचिन ला एक संधी तर देऊन पहा.
त्याचा आजपर्यंत चा लौकिक पाहता त्याने काही ताळेबंद गृहीतके बांधून हा निर्णय घेतला असले. राजकारणात अनेक लोक पैसा आणि लोकप्रियतेची सत्तेची नशा मिळवण्यासाठी येतात. सचिन ला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे का ?
त्याने राजकारणातील ह्या संधीचा वापर केला आणी खेळाडूंची भूमिका,त्यांच्या समस्या आणि क्रीडे विषयी त्याची मते आणी योजना सभागृहात व्यवस्थित मांडल्या. तर अजून आपल्याला काय हवे.
आपल्याला काय हवे. राजीव शुक्ला किंवा मोदी ह्यांनी हातात फळी ,चेंडू काहीही न घेता क्रीडा विश्वात मुशाफिरगिरी केली. पण ह्या खेळाडूने राजकारणात डाव आजमावून पाहण्यास काय हरकत आहे.
प्रतिक्रिया
29 Apr 2012 - 8:43 pm | मृगनयनी
सचिन ग्रेट्ट आहे.. निश्चितच!.. निर्विवाद!
पण मध्यन्तरी सचिनने त्याच्या बान्द्र्याच्या ८९९८ स्क्वे. फूट बन्गल्यासाठी- अजून ४४० स्क्वे. फू. जागा मिळविण्यासाठी गवर्नमेन्टकडे FSI अॅप्लाय केला.. आणि लगेच तो मान्यही झाला!!! :| :| का तर म्हणे त्याला जिम'साठी ती जागा वापरायची होती.... :| :)
करोडोंची मालमत्ता असलेला सचिन ४४० स्क्वे. फूट जागेसाठी इतका का बरं पझेसीव होत असेल.. ?....असा प्रश्न बर्याचदा पडतो... :)
सचिनच्या भोळ्या भाबड्या चेहर्याकडे पाहिलं... की मौनम् सर्वार्थ साधनम्!!... हे सुवचन आठवत राह्ते.
:)
29 Apr 2012 - 9:32 pm | अन्या दातार
प्लॉटच्या जागेवर सरकार निर्धारीत एफएसआय वापरायची पूर्ण मुभा त्याला आहे. त्यानुसार अर्ज करणे व "नियमात बसत असल्यास" मंजूर होणे यात त्याचा कोणताही ग्रेटनेस कारणीभूत नसावा असे वाटते.
(सामान्य म्हणवणार्या लोकांनाही १००० स्क्वे.फूट प्लॉटवर १.५ एफएसआय असताना २००० स्क्वे. फूट बांधकाम केल्याचे बघितले आहे, पण ते असो)
सबब इथे हा मुद्दा पूर्णतः गैरलागू.
मूळ विषयाबद्दल: त्याने राज्यसभेवर गेल्यास काही *ट फरक पडत नाही. याआधीही लता मंगेशकर प्रभृती लोकांनी असे काय दिवे लावलेत तिथे जाऊन?
29 Apr 2012 - 10:44 pm | मृगनयनी
ह्म्म्म.. तेच्च तर ना!..
आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी ठीक आहे.. वार्षिक उत्पन्न काही लाखांमध्ये असणार्यांनी जागेसाठी "इन्च इन्च लढवणे...." आपण समजू शकतो!..
जवळ्जवळ ९००० स्क्वे. फूट जागा असताना... "जिम"चे कारण देऊन ४०० स्क्वे. फूट जागेसाठी तरसणे.. हे सचिन'सारख्या अब्जाधीश क्रिकेटसम्राटाला शोभले नाही... जरी सरकारी नियम सगळ्यांना लागू असले, तरीही.. सचिनकडून असे वागणे घडावे..हे थोडे विचित्र वाटते.. ८९९८ स्क्वे. फूट जागेव्यतिरिक्त ४०० फूट एक्सटृऑ जागेतच "जिम" बान्धणे थोडे फार खटकतेच!...
बरं मुम्बईसारख्या ठिकाणी ती ४०० Sq. Ft. जागा सोडणं.. जीवावर येत असेल.. तर मग सचिनने ती जागा जिम'साठी न वापरता त्या जागी आपल्या वॉचमनला किन्वा माळ्याला छोटेसे घर बान्धून दिले असते.. तर प्रत्येक भारतीयाच्या मनात त्याचे स्थान नक्कीच उन्चावले असते.....
असो.. ज्याचा त्याचा प्रश्न!!!
__________
बाकी लता दीदी आणि प्रभृतींबद्दलच्या मताशी सहमत!!! गाण्याव्यतिरिक्त राजकारणात त्यांनी दिवे सोडा.... पण साधी माचीस'ची काडीदेखील पेटवलेली नाही.. ;)
आणि आता तर काय राज्यसभेवर " हेमा, रेखा, जया और सुषमा" हे निरमाचं सॉन्ग / स्लोगन पूर्ण झालं!! सुषमा'जी पहिल्यापासून राजकारणात असल्याने भाजपा'साठी लढताना आपण किमान त्यांना पाहिलेलें तरी आहे.. पण या हेमामालिनी, जया भादुरी-बच्चन यांचीही स्थिती लता'जींसारखीच आहे.
आता पाहू- रेखा'जींमुळे काय सिलसिले घडताहेत? ;)
अवांतर :- प्रॉपर्टीची हाव भल्याभल्यांना आवरत नाही. मन्गेशकर कुटुम्बीयांनी देखील मध्ये काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये भालजी पेन्ढारकर / व्ही. शान्ताराम यांच्या 'जयप्रभा स्टुडिओ' वरती मालकी हक्क सान्गून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न साळसूदपणे केला होता. पण कोल्हापूरवासीयांनी एकत्र येऊन त्यांच्यावर केस करून तो प्रयत्न हाणून पाडला.. आणि लता दीदी वगैरे मन्गेशकर कुटुम्बीयींना कोल्हापूरात येण्यास बन्दी घातली होती... :|
* कधीकधी या अश्या भोळ्या भाबड्या चेहर्यामागचे / मुखवट्यामागचे दाहक सत्य रसिकांना पचवणं जड जातं...
30 Apr 2012 - 10:33 am | कपिलमुनी
मान्य झाला नाही असे वृत्त वाचल्याचे स्मरते..त्यामुळे त्याने घराच्या आराखड्यात बदल घडवून जिम आहे त्याच FSI मधे बांधली..
आणि समाज सेवेबद्दल : मध्यंतरी त्याने वॉचमन ल फ्लॅट घेउन दिला पनवेलला..त्याचा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो म्हणून... त्याला तिथे अॅकेडमी जॉइन करायची होती ..
आता
>>वार्षिक उत्पन्न काही लाखांमध्ये असणार्यांनी जागेसाठी "इन्च इन्च लढवणे...." आपण समजू शकतो!..
अहो त्याने कष्ट करून कमावलेले आहेत ते अब्जावधी रुपये ..जास्त पैसे अहेत म्हणून जागा सोडून देणे नाही पटणारे,,आणि परवानगीच मागितली होती ...बेकायदेशीर काहीच नाही ..
बाकी ईनो घ्या
30 Apr 2012 - 2:54 pm | सुहास..
याआधीही लता मंगेशकर प्रभृती लोकांनी असे काय दिवे लावलेत तिथे जाऊन? >>
एखाद्या दुसर्या कार्यक्रमात दिदी दिसल्या होत्या दिवे लावताना ;)
29 Apr 2012 - 8:44 pm | चिरोटा
घटना काय म्हणते म्हणे ? किरकेटवाल्यानी नेतागिरी करु नये असे घटनावाले म्हणतात का ?
30 Apr 2012 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार
आपला प्रश्न आतिशय चुकीचा आहे हे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छीतो.
घटना काय म्हणते हे महत्वाचे नसून, मिपाकर काय म्हणतात हे आज देशात जास्ती महत्वाचे आहे हे ध्यानात घ्यावे.
बाकी काही प्रतिक्रिया वाचून, आज पुन्हा 'एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो' ह्या जालावरच्या सुप्रसिद्ध वाक्याची प्रचिती आली.
29 Apr 2012 - 9:35 pm | निनाद मुक्काम प...
माझ्या अल्पश्या माहितीप्रमाणे त्याच्या आर्किटेक्चर ने बंगल्याचा वरचा मजला जिमसाठी बांधायला घेतला तेव्हा मनपा ने हरकत घेतली. व शेवटी त्याची जीम झाली नाही.
माझ्या मते सचिन आपल्यासारखाच भारतीय नागरिक आहे. किंबहुना आपल्याहून जास्त कर तो मनपा ला देतो. त्याने विनंती करून पहिली.
ह्यात गाजराची पुंगी .....
हा भाग मुख्यत्वे होता.
29 Apr 2012 - 9:53 pm | फारएन्ड
मूळ मुद्द्याशी सहमत, पण हे सगळे निवृत्तीनंतर करायला हवे. जोपर्यंत तो क्रिकेट खेळतोय तोपर्यंत हे डिस्ट्रॅक्शन कशाला?
30 Apr 2012 - 12:21 am | निनाद मुक्काम प...
ह्यात दाहक असे कोणते सत्य आहे.
खाली हात आये थे और खाली हाथ जाना हे हे त्रिकालबाधित सत्य प्रत्येकाला ठाऊक असून प्रत्येक जण मालमत्ता बनवतो. ह्या सामान्य माणसापासून ते अबजाधीश पण आले.
बाकी मध्यमवर्गीय सचिन ने घाम गाळून पैसा कमावला आहे. त्याला वाटते तेव्हा तो समाजकार्य नक्की करतो.
त्याने माळ्याला घर बांधून देणे वैगैरे बोलबच्चन ठीक आहेत.
सामान्य माणूस घरातील मोलकरणीला पगारवाढ देतांना केवढीतरी नाटके करतो.
कोणी त्यांच्या मुलांचा शाळेचा खर्चात वाटा उचलला आहे का ?
मराठी माणसाने मराठी माणसाची लहान सहान चुका काढण्यात धन्यता मानायची का ?
सचिन च्या समाज कार्याविषयी एकच सांगेन.
पाकिस्तानी संघाचा कट्टर पंखा क्रिकेट चाचा ज्याने पूर्ण आयुष्य क्रिकेट ला वाहिले त्याने पाकिस्तानात एका पाकिस्तानात एका मुलाखतीत पाकिस्तानी संघातील एकाही खेळाडूची दानत नाही आहे. व त्या उलट भारतात सचिन त्याच्या सासूच्या संस्थेत लहान मुलांसाठी समाजकार्य करतो हे जाहीररीत्या सांगितले.
मृगनयनी हे खास तुमच्यासाठी
(सदर चित्रफित आणी त्यातील मुलाखत खूपच उत्कृष्ट आहे. पण जर ती पूर्ण पहायची नसेन तर १४व्य मिनिट ४४ सेकेंडला प्रत्यक्ष ..ऐका.
पाकिस्तानात सुद्धा सचिन विषयी कौतुकाने बोलले जाते. आम्ही करंटे त्याला पांडित्य शिकवायला जातो.
स्वतः मिळवलेल्या पैसा व कीर्तीने तो उतला नाही व मातला नाही. तर राजकारणात तो गेल्याने काय फरक पडतो. हा निर्णय त्याने क्रिकेट खेळत असतांना घेऊन कदाचित आपल्या तमाम भक्तांना संकेत दिला असावा. देवाचे अवतार कार्य संपायला आले असून एक दिवस देव मैदानातून अंतर्धान पावले अशी बातमी येणार.
मग निवृत्त देवाने नक्की काय केले कि त्याची प्रतिमा तमाम भारतीयाच्या मनात आधीच आहे. ती आणखी पक्की होईल ह्यावर एक लेख जरूर पाडा.
अवांतर उद्या ह्या म्हणतील सामान्य माणसाने भ्रष्टाचार केला तर एकवेळ ठीक आहे. पण श्रीमंत नेत्यांनी का म्हणून घोटाळे करायचे.
जय महाराष्ट
30 Apr 2012 - 12:56 am | अनामिका
निनाद तुमच्या प्रत्येक शब्दाशी सहमत ..
विक्रमादित्य सचिनला राज्यसभेचा खासदार म्हणून नामनियुक्त करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय आणि त्या निर्णयावर रबर स्टँप राष्ट्रपतींनी उठवलेला सहमतीचा शिक्का ह्या बातम्या काल दुपारपासून माध्यमांवर धुमाकुळ माजवत होत्या...सचिनने सकाळी काँग्रेसच्या तथाकथित त्यागमुर्ती सोनिया हिची भेट घेतली व त्यानंतर एकदम बोफोर्स घोटाळ्याच्या महत्वाच्या विषयाला व बातम्यांना बगल देत माध्यमांनी सरळ सरळ सचिनचा राजकारण प्रवेश या मथळ्याखाली बातम्या चालवण्यास सुरुवात केली...मती गुंग झाली होती हे सगळ बघून सचिनचा राग तर येत होताच पण त्याच बरोबरीने त्याची किव देखिल येत होती....पण त्याहीपेक्षा भारतीय जनता म्हणून आपण किती मुर्ख आहोत याचेच जास्त आश्चर्य आणि बरोबरीने वैषम्य देखिल वाटत होते.....काँग्रेसबद्दलच्या असलेल्या आत्यंतिक तिरस्काराची जागा सचिनबद्दलच्या उद्वेगाने घेतली होती..
वैतागून दुरचित्रवाणीवर चाललेली ती माध्यमांची कलकल बंद केली आणि क्षणभरात निरव शांतता घरात पसरली....त्या शांत वातावरणाने माझ विचारचक्र पुन्हा कार्यरत झाल... पुर्वीचा काळ आठवला जेंव्हा देशात दुरचित्रवाणीच प्रस्थ इतक अवास्तव वाढ्ल नव्हत...शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला वृत्तपत्रवाचन हे बंधनकाऱक होत....घरी सकाळच वृत्तपत्र वाचण्यासाठी माझी आणि तिर्थरुपांची चढाओढ आणि वादविवाद हे रोजचच चित्र होत ...राजकारण हा आवडीचा विषय ..वडीलांशी रोजच्या घडामोडींवर चर्चा हा अत्यंत प्रिय कार्यक्रम...त्या होणार्या चर्चेतून स्वत:ची ठाम मते बनत गेली..कधी कधी तिर्थरुपांनी एखादा विषय निट मांडून सांगितला की त्या विषयावर खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती वाढीस लागली....आणि मग त्या वैचारिक मंथनातून आपल्या ठाम आणि टोकाच्या असलेल्या मतांमधे परिवर्तन करण्याची सवय देखिल जडून गेली.....पण आताचे चित्र पुर्णार्थाने बदललय ...आंतरजालावर या सगळ्या राज्यसभेच्या खासदारकीची पार्श्वभुमी अभ्यासल्यावर मी एका निष्कर्षाप्रत आले
..माध्यमांची आपापसातली जिवघेणी स्पर्धा इतकी विकोपाला गेली आहे की स्पर्धेत टिकून राहण्याचा अट्टाहास करताना आपण एखाद्या व्यक्तीचे विनाकारण चारित्र्यहनन करण्यास हातभार लावतोय याचे सारासार भान देखिल माध्यमे बाळगत नाहीत्...आता सचिनचेच उदाहरण घ्या...केंद्रातील काँग्रेसप्रणित युपिए सरकारने सचिनला राज्यसभेवर नामनियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवला....राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली ...मंजुरी न देतील तर काय? .....झाल .खरेतर अत्यंत सोपा विषय..
पण माध्यमांनी या बातमीला वेगळ आणि निरर्थक वळण देत सचिनने जणू काही काँग्रेसपक्षात प्रवेश केल्याचे चित्र जनमानसापुढे उभे केले......देशात सध्या सुरु असलेल्या काँग्रेसच्या केंद्रातील युपिए सरकराचा अनागोंदी कारभार आणि लाखो करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या काँग्रेसपक्षाच्या वळचणीला जात नाकर्त्या आणि भ्रष्ट काँग्रेसशीच सचिनने हातमिळवणी केली असल्याचा संदेश देशभारत पोहोचला आणि सचिनवर अत्यंत खालच्या शब्दात व शेलक्या विशेषणांनी सोशल मिडियामधे सचिनची बदनामी सुरु झाली....सचिनने काँग्रेसच्या सरकारचा हा प्रस्ताव स्विकारला म्हणजेच नकळतपणे सचिन भ्रष्टाचाराची गंगोत्री असलेल्या काँग्रेसच्या बरोबर असल्याचा आभास निर्माण केला गेला...आणि याचाच परिणाम म्हणून मागे फेरारीवर करसवलत मिळावी म्हणुन सचिनने केलेला अर्ज आणि मुंबईत नविन घर बांधताना अधिक चौरसफुट जागेची केलेली मागणी ,तसेच तो केवळ विश्वविक्रमासाठी व पैशासाठीच खेळतो....अश्या प्रकारचे विषय उकरुन काढून सचिनची निंदानालस्ती केली जाऊ लागलीय...ट्विटरवर तर सचिनच्या चाहत्यांच्या आणि त्याला फॉलो करणार्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली..२तासामधे जवळपास १,००,००० ने हि संख्या घटत होती...
या सगळ्या प्रकरणात सचिनचा निव्वळ आणि केवळ सन्मान करण्याची काँग्रेसची भावना आहे असे मानणे मुर्खपणाचे ठरेल...पुढिल वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन खेळली गेलेली हि एक चाल आहे ..तसे देखिल महाराष्ट्रातल्या जनतेचा अभिमान हा कुणी कधीही आणि कसाही डिवचू शकतो व समजा त्या महाराष्ट्रीय अभिमानाचा नव्हे तर दुराभिमानाचा फायदाच करुन घ्यायचा ठरवले तर मग मराठी व्यक्तीला राष्ट्रपतीपदासाठी उभे करुन मराठी माणसाच्या अभिमानाला फुंकर घालून मग सेनेसारख्या पक्षांना मुर्ख देखिल बनवता येते...राष्ट्रपती प्रतिभा पाटील या किती प्रतिभावान आहेत हे आपण बघतोच आहोत...प्रतिभा पाटील निव्वळ मराठी आहेत म्हणुन त्यांचा अभिमान बाळगावा अशी त्यांची कारकिर्द आहे का? हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ मराठीचा सार्थ अभिमान बाळगणार्या व्यक्तीने स्वत:ला प्रामाणिकपणे विचारावा.. उलट प्रतिभा पाटील या मराठी आहेत याची लाज वाटेल अशी परिस्थिती आहे...सचिनला जे राज्यसभेच खासदारपद मिळालय ते सरकारने दिलेल आहे काँग्रेसपक्षाकडून सचिन राज्यसभेवर पाठवण्यात आलेल नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे.....उत्तरप्रदेश ,पंजाब्,गोवा,,बिहार या सगळ्या राज्यांतील काँग्रेसचे झालेल पानिपत बघुन काँग्रेसचे टिनपाट युवराज राहुल गांधी यांच्यासाठी महाराष्ट्रात अनुकुल वातावरण तयार करण्यासाठी सचिन सारख्याचा वापर केला गेला हे निर्विवाद सत्य आहे...गरज आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेने जाग राहण्याची आणि येत्या निवडणु़कीत काँग्रेस आघाडीला मतपेटीतून पार उताणे पाडण्याची ....
सचिन वर डाव लावून त्याच्या प्रसिद्धीचा स्वत:साठी सवंग वापर करुन घेण्याची खेळी कुणाची असावी ?काही अंदाज बांधता येतोय का?नसेल तर मला जितक समजतय त्यावरुन मी इतक जरुर सांगू शकते हि खेळी खेळण्यामागच डोक ज्या शकुनीमामाच आहे त्याच नाव सर्वश्रुत आहे आणि तो शकुनीमामा दुसर तिसर कुणीही नसून शरद पवार हेच आहेत्...यात इतर भुमिका वठवणार्या व्यक्ती आहेत मुकेश अंबानी,आणि काँग्रेसचे चाटुकार राजिव शुक्ला......गांधी घराण्याचे भ्रष्टाचाराचे कारनामे हळू हळू बाहेर येत आहेत्..काँग्रेसने तर या देशात अक्षरश: लूट माजवली आहे ..आणि त्याचाच परिणाम म्हणुन निव्वळ जनतेची या महत्वाच्या विषयांवरुन लक्ष उडवण्याच्या हेतूने माध्यमांना हाताशी धरत सुरु असलेला हा सचिन संदर्भातला अपप्रचार आहे..
सध्या काँग्रेसचे खोल खोल गर्तेत रुतत चाललेले जहाज सचिनरुपी नांगराचा वापर करुन वाचवण्याचे हे खरेतर काँग्रेसचे निरर्थक प्रयत्न आहेत...श्रीकृष्णाने शिशुपालाचे देखिल ९९ अपराध पोटात घातले होते पण शंभराव्या अपराधानंतर श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राने शिशुपालाचा मस्तकाचा वेध घेतलाच होता....काँग्रेसने हे विसरता कामा नये......
यापुर्वी सांस्कृतीक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी राज्यसभेच खासदारपद भुषवलय यात स्वरकोकीळा लताजी,शबाना आजमी.मैथिली शरण गुप्ता ,पृथ्वीराज कपुर,जी रामचंद्रन,वैजयंतीमाला यासारख्यांची वर्णी लागते.क्रिडाक्षेत्रातला असा सचिन हा पहिलाच सदस्य नव्हे या आधी दिलीप तर्की ,दारासिंह यांची देखिल नामनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लागली आहेच फक्त क्रिकेटच्या क्षेत्रातील सचिन हा प्रथम खेळाडू आहे इतकच......या वर नमुद केलेल्या नामनियुक्त सदस्यांपैकी पैकी किती जणांनी अधिकृतरित्या काँग्रेसपक्षात प्रवेश केलाय याचा विचार जरुर करावयास हवा....लतादीदींची तर जवळीक तेंव्हा देखिल हिंदुमहासभेशी आणि शिवसेनेशी होती आणि आजही आहे...सचिनला राज्यसभेची खासदारकी हि राष्ट्रपतींच्या कोट्यातून मिळाली आहे काँग्रेसकडुन नव्हे हे कृपया लक्षात घ्या....काँग्रेसच्या भुलथापांना आणि माध्यमांच्या गोबेल्स प्रचाराला जनतेने भिक घालता कामा नये...कारण यात नुकसान जनता म्हणुन आपलेच आहे.
या प्रकरणावरुन एक मात्र निश्चित निष्कलंक सितेला देखिल एका परिटाच्या संशयामुळे अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि वनवास देखिल भोगावा लागला...सचिनचे देखिल तेच आहे..इतक्या लहान वयात सुरु केलेली आणि अथक प्रयत्न आणि परिश्रमाने यशाच्या शिखरावर नेलेली कारकिर्द केवळ या नीच काँग्रेस व माध्यमांमुळे धोक्यात आली आहे.....
सचिन आपली ही नवी भुमिका कशी पार पाडतो ?हे बघणे औत्सुक्याचे असेलच .आपले वेगळेपण जपत खर्या अर्थाने या भुमिकेला सचिन एक नविन आयाम प्राप्त करुन देईल याबद्दल विश्वास वाटतो.... सचिनच्या स्थायी असलेल्या सजग वृत्तीमुळे तो या आपल्या नव्या भुमिकेला न्याय देत आपला ठसा प्रकर्षाने उमटवेल याची खात्री आहे...आणि असे घडले तर खर्या अर्थाने निदान मला आपण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा सार्थ अभिमान वाटेल..
सचिनच्या या नव्या इनिंग साठी हार्दिक शुभेच्छा....
अतीअवांतर---प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या वेळेस मराठी म्हणुन समर्थन देणार्या शिवसेनेचा मराठीचा अभिमान सचिनच्या राज्यसभेच्या खासदारकीला विरोध करताना कुठे शेण खायला गेलाय?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
30 Apr 2012 - 2:25 pm | JAGOMOHANPYARE
..सचिनला राज्यसभेची खासदारकी हि राष्ट्रपतींच्या कोट्यातून मिळाली आहे काँग्रेसकडुन नव्हे हे कृपया लक्षात घ्या >>>>>>>>>>>>>>>>>>>>
सचिनची शिफारस काँग्रेसने केलेली आहे.
30 Apr 2012 - 3:42 pm | अनामिका
सचिनची शिफारस काँग्रेसपक्षाने नव्हे तर केंद्रसरकारने केली आहे ...
1 May 2012 - 12:20 am | JAGOMOHANPYARE
पंतप्रधानानी केली आहे... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12895843.cms
http://sports.ndtv.com/cricket/news/item/189042-now-sachin-tendulkar-as-...
30 Apr 2012 - 3:56 pm | निनाद मुक्काम प...
अनामिका तुमचा प्रतिसाद हा मूळ लेखाहून अनेक पटीने उत्कृष्ट आहे.
बाकी राजकुमारांची प्रतिक्रिया आवडली.
आपल्या बाजूने बोलणारा .लिहिणारा ,वागणारा म्हणजे शिवरायांचा निष्ठावंत मावळा. आणि अगदी त्याच्या विरुद्ध भूमिकेत कोणी असला की तो सरसकट गनीम...
अश्या वातावरणात ते हल्ली रमायला लागले आहेत. तेव्हा .........
साहेबांचे कौतुक व प्रेम आम्हालाही आहे. पण मागे झक मारली ......
त्या नंतर नाना चे एका साहित्य सभेत तुम्हाला तो अधिकार .........
त्यानंतर त्याचा घुमजाव ......... सगळा कालक्रम ताजा झाला.
लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यातील परकीय लागेबांध आणि देशातील पापभिरू जनता. आणि त्यावर मत व्यक्त करणारा मी मिपाकर सगळेच मेरा भारत महान ह्या गाथेत फिट बसतात.
मागे एकदा संजय दत्ता ला फोनोफोनी करून मी सोडवला असे एक विधान वृत्तपत्रात वाचले होते तेव्हा अमिताभ आणि सुनील दत्त हे मातोश्रीवर गेले होते.
असे आठवते
सचिन वर प्रेम करणारे आम्ही भक्त
आणि व्यावसायिक लागेबांध जपणारे ..............
1 May 2012 - 1:36 pm | अनामिका
सतत आपल्या भुमिका बदलत तळ्यात मळ्यात करणार्या सेनेचा सध्या बुद्धीभ्रंश झाला आहे हे निश्चित.....मुळात हल्ली साहेब" राजकारणात किती सक्रिय आहेत हाच संशोधनाचा विषय आहे....सेनेच्या चाणक्यांनी अर्थात रोखठोक वाल्यांनी सेनेला पार रसातळाला पोहोचविण्याचा निदान विडा तरी उचललाय किंवा कुणाची तरी सुपारी तरी घेतली आहे इतपत संशय घेण्यास जागा आहे.....ठाकरी शैलीत लिखाण केले म्हणजे आपणच आता ठाकरे झालोत या भुमिकेत सध्या त्यांचा वावर वाढलाय......जे जे होईल ते ते बघायच....
30 Apr 2012 - 11:30 pm | सुहास..
अतीअवांतर---प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या वेळेस मराठी म्हणुन समर्थन देणार्या शिवसेनेचा मराठीचा अभिमान सचिनच्या राज्यसभेच्या खासदारकीला विरोध करताना कुठे शेण खायला गेलाय? >>.
आईशप्पथ !! अनामिका ताई तु ? आणि हे वाक्य ?? बाप रे !! :(
अवांतर : वेलकम बॅक ग !
1 May 2012 - 1:26 pm | अनामिका
सुहास !
आश्चर्य वाटून घेण्याचे काय कारण ?राजकारणाकडे डोळसपणे बघणे इतकेच काय ते करावे प्रत्येकाने..आणि सेना मनसे भाजपा यांची समर्थक आहे म्हणुन त्यांच्या चुकीच्या भुमिकेची तळी उचलून धरायला माझे वैचारिक अधःपतन झालेले नाही...आपण सर्वसामान्य जनता म्हणजे शेळ्या मेंढर नव्हेत ज्यांना कळपात कोंडुन राजकारण्यांनी आणि राजकिय पक्षांनी हाकत बसावे... ह्म्म आता देशातला सगळ्यात जुना जाणता असलेला पक्ष लोकांचे लक्ष महत्वाच्या विषयांवरुन इतर विषयांकडे वळवण्यातच धन्यता मानतो हे आपण वेळोवेळी बघितलेच आहे...सचिनची खासदारकी हे त्याच खेळीचे एक प्रतिक आहे....आता हे काँग्रेसप्रणित केंद्रसरकारने सचिनचे नाव सुचवल त्यामुळे सेनेने त्रागा करण स्वाभाविक आहे आणि सेना विरोध करतेय म्हणून मनसेने समर्थन करणे त्याहुनही नैसर्गिक आहे.....बाकी सोयीनुसार मराठीच्या अभिमानाच्या गप्पा मारणार्या सेना मनसेच मी आंधळ समर्थन का कराव नाही का?
30 Apr 2012 - 8:27 am | स्पंदना
सचिन विषयी जे काही लिहिल आहे ते अतिशय आवडल. त्याचा सारखा सच्च्या दिलान फक्त क्रिकेट खेळणारा खेळाडु 'देव' या उपाधिस खरच लायक आहे.
पण काय आहे, मला तर अस वाटत की सचीनकड, चांगल ह्रद्य आहे, पण नेतृत्व म्हणतात , ते नाही आहे. खासदार होण म्हणजे नुसत बसुन आपल्या आपण काही चांगल करण नव्हे तर , बर्याचदा काही चागंल्या गोष्टींसाठी समाजाच नेतृत्व देखिल कराव लागत, अन ते करण्यासाठी लागणारे, जे एका चांगल्या नेत्याचे म्हणता येतिल असे गुण त्याच्याकडे कमी आहेत अस त्याच्या आत्तापर्यंतच्या वागणुकीवरुन वाटत.
मला विचाराल तर एका चांगल्या माणसाची या सत्तेच्या खेळात शिरुन फरफट होइल.
30 Apr 2012 - 9:59 am | मृत्युन्जय
सचिनने खासदारकी स्वीकारली म्हणुन तो एकदम दानव वगैरे झाला असे वाटत नाही. अर्रे त्याची मर्जी. त्याने स्वीकारली. मूळात काँग्रेसने त्याला ती दिलीच का? माझ्यामते तरी सचिन आता अश्या उंचीवर जाउन पोचला आहे की तिथुन आता निवृत्त होइपर्यंत तरी त्याला अजुन काही मानमरातब जाहीर केले जाउ नयेत. भारतरत्न किंवा खासदारकी त्याच्या आधी देण्यात काही अर्थच नाही आहे,
शिवाय खासदारकी साठी त्याच्याकडे वेळ तरी आहे का? जर असेल तर त्याने जरुर जावे. एक प्रामाणिक माणूस म्हणुन त्याच्याकडुन काही चांगले घडु शकले तर उत्तमच. अन्यथा जागा अडवणार्या १०० लोकांत अजुन एकाची भर एवढाच काय तो फरक पडेल. फक्त तसे घडणार असेल तर सचिनला खासदारकीचा मोह का पडला असावा हे कळत नाही.
असो. मुख्य मुद्दा हा की सचिनला निवृत्तीनंतर पण मिळवण्यासाठी काहितरी ठेवावे. खासदारकी केवळ सन्मान म्हणुन दिली जात असेल तर ती नंतरच द्यायला हवी होती. याबाबत काँग्रेस आणि सचिनका थोडा चुक्याच.
पण त्याचवेळेस शिवसेनाप्रमुखांची टीका देखील अस्थायी वाटते. ही केवळ या आयडीया बाबत कॉम्ग्रेसने शिवसेनेवर बाजी मारली याची जळजळ वाटते. पुलंना महाराष्ट्र भूषण दिल्यावर ते त्यांच्या राज्याला ठोकशाही म्हणाले त्यावर बाळासाहेबांनी असेच "झक मारली आणि पुरस्कार दिला" अशी जळजळ काढली होती. तसेच काहिसे आत्ता वाटले.
असो. निर्णय चुकीचा असला तरी त्यामुळे सचिन दानव वगैरे ठरत नाही.
30 Apr 2012 - 10:30 am | पियुशा
सचिनची इच्छा असेल राजकारणात यायची
त्याला जर रुची नसती तर त्याने हे पद मुळात स्विकारलेच नसते ,नकारही देउ शकला असता की ,अन हा निर्णय घेण्याअगोदर त्याने त्याच्याकडील टाइंम म्यानेज कसा करायचा याचाही सारासार विचार करुनच हे पाउल उचलले असेल
दानव वैग्रे काही नाही ,विरोधी पक्षाना जळ्जळ होत असेल की हा शहाणपणा आपल्याला का नाही सुचला आधी ;)
आता सचिन या पदावर राहुन काय काय करतो हे महत्वाचे :)
30 Apr 2012 - 10:45 am | ऋषिकेश
राष्ट्रपतींनी सचिनला खासदार नियुक्त केला आहे (काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून नव्हे) तेव्हा वाद अनावश्यक व गैरलागू आहे!
सचिनचे अभिनंदन!
खासदारकीची सुरवात म्हणून सचिनने 'स्पोर्ट्स बिल' वर आपले योगदान/मत द्यावे अशी अपेक्षा आहे. सदर बिल कॅबिनेटने एकदा नाकारले होते. या चांगल्या बिलाला सचिनने पाठिंबा दिला / काहि सुधारणा सुचवून पाठिंबा दिला तर काहि जुन्या खोडांना (वैयक्तीक स्वार्थापायी) विरोध करणे कठीण जाईल अशी अशा करतो.
30 Apr 2012 - 11:28 am | Madhavi_Bhave
अगदी १००% सहमत. match - fixing करणारा अझहर ह्यांना चालतो. एका माणसाचा खून करून आज उजळ माथ्याने फिरणारा नवज्योत सिद्धू चालतो. पण सचिनने मात्र फार मोठा गुन्हा केला असा आव आणणारे आपण फक्त दांभिक. सचिनने काय त्याने काय करावे व काय करू नये हे ठरवण्याचा काय ठेका दिला आहे काय लोकांना.
आणि शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यकारण करून फक्त स्वताची तुंबडी भरायची कामे केलेल्या लोकांकडून नाहीतरी दुसरी कोणती अपेक्षा ठेवणार. स्वत: काय दिवे लावले व निष्टावंत कार्यकर्त्यांना डावलून फक्त पैसे फेकणार्या लोकांना ticket देताना ह्यांना मराठी आठवले नाहीत. मला आठवते १९९२ मध्ये पाकिस्तानने World cup जिंकला होता तेव्हा इम्रान खानने सुनील गावस्करना खास आमंत्रण दिले होते तेव्हा त्याने जावू नये म्हणून असाच "बाल" हट्ट धरण्यात आला होता. अर्थात सुनील गावस्करने ह्यांच्या धमक्यांना जुमानले नाही आणि ते function attend केले होते. आणि प्रतिभाताई पाटीलच्या वेळी ह्यांनीच अगदी जाहीररीत्या पाठींबा व्यक्त केला मग सचिन काय मराठी नाही का. राजकीय सोय पाहताना कोन्ग्रेसशी चुम्बाचुम्बी करायची आणि इतर वेळी फक्त आपणच मराठी माणसाचे तारणकर्ते असा आव आणायचा ह्याला आता लोक कंटाळले आहेत.
30 Apr 2012 - 2:45 pm | JAGOMOHANPYARE
सचिनने खासदार व्हावे आणि एक दिवस भारतरत्नही व्हावे.
सचिनचे कौतुकच! भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल.
सचिन सोनियाना भेटला ही पोटदुखी असणार्याना आपण काही करु शकत नाही.. त्यांची पोटदुखी तशीच रहाणार. एखाद दुसरा कुचकट लेख, विडंबन यांचा या भ्रमवृंदी पब्लिकने पार सुकाळु माजवलाय नेटवर.. पण त्याने तेच तोंडघशी पडत आहेत. भगवा ईश्वर भगव्या आत्म्याना भगवी शांती प्रदान करो.
मुंबई कोण्या एका भाषिकांची नाही, सर्वांची आहे, हा देशच सर्वांचा आहे, हे ठणकावून सांगितलेल्या सचिनने योग्य छत्रछयेखालीच आश्रय घेतला. बर्ड्स ऑफ सेम फीदर फ्लॉक टुगेदर.
जो मनुस्श्य आपल्या चांडाळ चौकडीत येत नाही, त्याला दानव म्हणून रंगवणे ही काँग्रेस्च्या विरोधक लोकांची जुनी खासियत, सवय आहे. साक्षात महात्म्याला यानी सोडले नाही, ते सचिनला काय सोडणार? पण जन्ता या लोकाना ओळखून आहे.
कोयल बोले दुनिया डोले http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12928602.cms
30 Apr 2012 - 1:03 pm | नितिन थत्ते
अरेरे, खासदारकी देण्याचं प्रपोजल काँग्रेसकडून आल्यामुळे जास्तच जळजळ झालेली दिसते. :P
30 Apr 2012 - 1:59 pm | चिरोटा
येत्या रविवारपर्यंत 'चाहत्यां'कडून सचिनला 'अनावृत्त पत्र' नक्की..
"प्रिय सचिन,.....
.....खरतर मी तुला काही सल्ला द्यावा एवढा मी मोठा/मोठी नाही....
.........क्रिकेटचे मैदानावर तूझी बॅट तळपते... असंख्य विक्रम मोडीत काढलेस...
.......तू आउट झालास की मी टी.व्ही. बंद करायचो......
.....पण परवा तुझा राज्यसभेत(मागच्या दाराने!!) जाण्याचा निर्णय....
.....माझ्यासारखे करोडो चाहते उदास....
.....माझ्या मतदारसंघातून उभा राहिला असतास तर जीव तोडून प्रचार केला असता...
....'क्रिकेट माझा धर्म आहे' असे म्हणणारा तू, धर्माचे राजकारण करणार्यांच्या पक्षात ?
.... राजकारणाचा भल्या भल्यांना मोह आवरत नाही......
...पण सध्याचे राजकारण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे ही मी का तुला सांगायला हवे?
........
........क्रिकेटमध्ये राजकारणी शिरले आणि क्रिकेट पुरते बदलले रे...
....... आय.पी. एल. बघितले की डोळ्यात पाणी येते.......
........एखादी मराठी कविता.....
तुझाच निस्सिम चाहता/चाह्ती.
अबक
30 Apr 2012 - 2:20 pm | JAGOMOHANPYARE
:)
30 Apr 2012 - 3:02 pm | सुहास..
आम्ही मुळात . तो चांगल क्रिकेट खेळतो , हे मानतो ,देव वगैरै नाही ...त्यामुळे दानव ही मानत नाही ...उलट-पक्षी राजकारणात सचीन ने च काय सर्वांनीच यावे असे आपले स्पष्ट मत आहे ( किमान राजकारणी सगळे माजलेले ई.ई. शिव्या देण्यापर्यंत जावे लागत नाहीत.) बाकी पुर्ण देशातच सरासरी ५०% टक्के वोटिंग होत असताना ( त्यात ही सुज्ञ फक्त १५ % , ईतर ३५ % वाटपाच्या आधारवर व्होटिंग ला जातात. ) ... आंजावर अश्या गप्पा पाहिल्या की मनापासुन हसु येते ;)
30 Apr 2012 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी पुर्ण देशातच सरासरी ५०% टक्के वोटिंग होत असताना ( त्यात ही सुज्ञ फक्त १५ % , ईतर ३५ % वाटपाच्या आधारवर व्होटिंग ला जातात. ) ... आंजावर अश्या गप्पा पाहिल्या की मनापासुन हसु येते Wink>>> +++++१११११
30 Apr 2012 - 11:17 pm | मृगनयनी
+ १०८ ...
खर्या खुर्या देवांबद्दल कुणी काही चांगले लिहिले अथवा बोलले की त्याची टर उडविणारे, त्याबद्दल अविश्वास दाखवणारे किन्वा सोईस्करपणे मूग गिळून गप्प बसणारे... "सचिन" ला मात्र देव म्हणून त्याचा नको तेव्हा नको तिथे उदो उदो करताना मात्र कोणतीही कसर ठेवत नाहीत... हे खूपच मजेशीर वाटले!!! :)
चालू द्या!...
1 May 2012 - 6:59 am | रमताराम
अगदी अगदी. बादवे याबाबत तुमचं 'नासा' काय म्हणतंय?
1 May 2012 - 9:44 am | मृगनयनी
ह्म्म... "नासा" चा या प्रकरणाशी व्यक्तिशः संबन्ध नसल्याने "नासा" काहीच बोलत नाही... :)
संपादित
1 May 2012 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार
खोडरबर
1 May 2012 - 1:36 pm | निनाद मुक्काम प...
@मृगनयनी
आता तुम्ही मुद्याकडे वळला आहत. ह्या लेखाचे मुख्य प्रयोजन अनामिका ह्यांनी खरे तर अधिकी चांगल्या रीतीने मांडले आहे.
मुळात सचिन हा जगातील सर्वोत्तम खेळाडू. असामान्य नैसर्गिक गुणवत्तेला असामान्य मेहनत व सरावाची जोड देऊन कामगिरीत सातत्य राखणे. व प्रसिद्धी व पैसा ,यश ,कीर्ती ची हवा डोक्यात न जाऊ देता विद्या विनयेन शोभते ह्या सुविचाराला आचरून अस
णारे आचरण ( आमच्या शेत्रात आम्ही त्याचा हॉटेलातील वावर आणी इतर नवशिक्या खेळाडूंचा फुकाचा तोरा नेहमीच पाहत आलो आहे.)
डेविड बेकहम किंवा इतर प्रसिद्ध खेळाडू यश डोक्यात गेल्यावर कसे वागतात व पर्यायाने स्वतःचे ,देशाचे नुकसान करून स्वतःच्या चाहत्याची घोर निराशा करतात. अशावेळी सचिन चे मोठेपण त्याच्या नम्र ,सालस व्यक्तिमत्वामुळे उठून दिसते. जगात आणी भारतात सच्चा नेतुत्व्याची वानवा असल्याने सचिनला समस्त क्रिकेट विश्व व भारत आपला आदर्श मानते व त्याच्या अगदी भजनी लागते
येथेच त्याचे काही भारतीय चाहते त्याला देवत्व प्राप्त करू देतात.
येथे खर तर धोक्याची घंटा वाजते. देवत्व दिले की त्याच्याकडून सैदैव चमत्कार किंवा सैदैव भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करणे व त्यांच्या अनुसार आदर्श वर्तन करणे त्यांना अपेक्षित असते. आणी ह्याच लोकांनी दीड दमडीच्या २४ तास पडद्यावर कोकलणाऱ्या प्रसार माध्यमे ज्यांना स्वतःचे दुकान चालवण्यासाठी ध चा मा करणे किंवा मीठ मसाला लावून पराचा कावळा करून एखादी गोष्ट गोबल च्या प्रचार तंत्रानुसार लोकांच्या माथी मारायला आवडते.
छोट्या पडद्यावर एखादी घटना सारखी पाहून तिला सत्य समजणे व ज्याला आपण इतके दिवस पूजले त्याला दानव समजून शिव्यांची लाखोली व्हाहणे कितपत योग्य आहे.( जे इतके दिवस त्याची आंधळी भक्ती व अनुयाय करत होते तेच त्याला आज अर्वाच्च भाषेत शिव्याशाप देत होते हे पाहून वाईट वाटले. ह्या लोकांनी माकडाच्या हाती शेंपेन हे नाटक पाहायला हवे असे माझे प्रामाणिक मत आहे.)
सचिन ने शिवसेना किंवा मनसे असो त्यांच्या कायर्क्रमात शिवाजी पार्कात नेहमीच आवर्जून हजेरी लावली आहे. मी ह्या प्रसंगांचा साक्षीदार आहे. मात्र त्याने सोनिया ह्यांची भेट घेतली तर असा कोणता गजहब झाला.
त्याचा राजकारणासाठी हातवाले वाले वापर करून घेणार असतील तर त्याला विरोध करणारे किती धुतल्या तांदळासारखे आहेत.
आज गानकोकिळा त्याचे कौतुक करते तर तिची धाकटी बहिण त्याच्या ह्या निर्णयाचा विरोध करते. ह्यामागे त्यांच्यातील सुप्त स्पर्ध्धा व राजकीय संबंध डोकावतात. हे पाहून क्लेश होतो.
आजपर्यंत इतर कलाकार किंवा खेळाडू ह्यांनी राज्य सभेत जाऊन काय दिवे लावले हा एक ठळक मुद्दा आहे.
पण सचिन रमेश तेडुलकर हा असामान्य वयक्तिमत्व असलेला माणूस आहे.
ह्या संधीचे तो सोने करेन हे त्याचा एक आंधळा भक्त म्हणून नव्हे तर त्याच्या आजवरच्या वर्तनावरून मांडलेला माझा ठोकताळा आहे.
1 May 2012 - 3:14 pm | मृगनयनी
@मृगनयनी
आता तुम्ही मुद्याकडे वळला आहत.
नाही हो!.. मी वरच्या काही प्रतिसदांत "नासा"बद्दलच बोलत होते. ;)
( आमच्या शेत्रात आम्ही त्याचा हॉटेलातील वावर आणी इतर नवशिक्या खेळाडूंचा फुकाचा तोरा नेहमीच पाहत आलो आहे.)
ह्म्म.. तर आपण हाटेलात नौकरि करता!!! :) छान!! आजकाल पुरुष देखील महिलांया बरोबरीने उत्तम पदार्थ बनवू शकतात... यावर आमचा पूर्ण विश्वास आहे! :) .. हीच्च तर आहे ना.. स्त्री- पुरुष समानता!!! :)
डेविड बेकहम किंवा इतर प्रसिद्ध खेळाडू यश डोक्यात गेल्यावर कसे वागतात व पर्यायाने स्वतःचे ,देशाचे नुकसान करून स्वतःच्या चाहत्याची घोर निराशा करतात. अशावेळी सचिन चे मोठेपण त्याच्या नम्र ,सालस व्यक्तिमत्वामुळे उठून दिसते. जगात आणी भारतात सच्चा नेतुत्व्याची वानवा असल्याने सचिनला समस्त क्रिकेट विश्व व भारत आपला आदर्श मानते व त्याच्या अगदी भजनी लागते
येथेच त्याचे काही भारतीय चाहते त्याला देवत्व प्राप्त करू देतात.
एकदम्म सहमत!!! :)
येथे खर तर धोक्याची घंटा वाजते. देवत्व दिले की त्याच्याकडून सैदैव चमत्कार किंवा सैदैव भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करणे व त्यांच्या अनुसार आदर्श वर्तन करणे त्यांना अपेक्षित असते.
साहजिकच्च आहे!... "देव" म्हटलं.. लोकांना वाटतं.. की त्याने गरज असो नसो.. पण झक्क मारत एखादातरी छम्हत्खार केलाच्च पाहिजे!!!.. हाऊ फूलिश! :) आय अग्री विद यु! :)
* सैदैव- 'सदैव' असे हवे. :)
आणी ह्याच लोकांनी दीड दमडीच्या २४ तास पडद्यावर कोकलणाऱ्या प्रसार माध्यमे ज्यांना स्वतःचे दुकान चालवण्यासाठी ध चा मा करणे किंवा मीठ मसाला लावून पराचा कावळा करून एखादी गोष्ट गोबल च्या प्रचार तंत्रानुसार लोकांच्या माथी मारायला आवडते.
ह्म्म.. खरंय...पण त्यावरच तर त्यांचं पोट अवलम्बून असतं ना!! अर्थात यांच्या पोटासाठी सचिन'चा बळी देणं.. पटत नाही.. :)
छोट्या पडद्यावर एखादी घटना सारखी पाहून तिला सत्य समजणे व ज्याला आपण इतके दिवस पूजले त्याला दानव समजून शिव्यांची लाखोली व्हाहणे कितपत योग्य आहे.( जे इतके दिवस त्याची आंधळी भक्ती व अनुयाय करत होते तेच त्याला आज अर्वाच्च भाषेत शिव्याशाप देत होते हे पाहून वाईट वाटले. ह्या लोकांनी माकडाच्या हाती शेंपेन हे नाटक पाहायला हवे असे माझे प्रामाणिक मत आहे.)
"माकडाच्या हाती शॅम्पेन" मध्ये आणि आपण वर लिहिल्यामध्ये काही साम्य आहे.. असे वाटत नाही. मुळात "माकडाच्या हाती शॅम्पेन" हे ख्हूप्पच्च वेगळ्या धाटणीचे नाटक आहे. आनन्द इन्गळे, शर्वाणी पिल्लई, विवेक बेळे ( दिग्दर्शक सुद्धा) आणि सन्देश कुलकर्णी (अमृता सुभाषचा नवरा आणि जुन्या सोनाली'चा भाऊ) यांनी रन्गवलेले अप्रतिम नाटक!.. या नाटकाचे मूळ नाव- 'मारुति आणि शॅम्पेन'.. वास्तविक मारुति- या रामभक्त चिरन्जीवी'चा आणि शॅम्पेनचा काही सन्दर्भ नसताना मुद्दाम लोकांची उत्सुकता वाधवण्यासाठी असे नाव दिले गेले.. या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे- "सुदर्शन" रन्गमन्चावर झाला. तो माननीय आणि इन्व्हायटेड सेलिब्रिटींसाठी असल्याने आणि त्यामानाने सुदर्शन'ची जागा व खुर्च्या खुपच कमी असल्याने आम्ही "मारुति आणि शॅम्पेन"चा दुसरा शो पाहिला.. सुदर्शनलाच्च!! ...
या चारही कलाकारांचे अप्रतिम अभिनय पाहून डोळ्यांचे पारणे फिटले... नन्तर "मारुति" या नावामुळे पतितपावन सन्घटनेच्या लोकांनी नाटक बन्द पाडण्याचा प्रयत्न केला.. आनन्द इन्गळेंच्या कर्वेनगरच्या घरावर दगडफेकही झाली.. त्याला पोलिस संरक्षणही मिळाले... मग या नाटकाचे नाव बदलून "माकडाच्या हाती शॅम्पेन" असे ठेवण्यात आले.. पण तोपर्यंत त्याची विविध कारणांनी इतकी प्रसिद्धी झाली होती.. की या नाटकाला मोठे स्टेज मिळाले..प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाले.. आणि प्रचन्ड गल्ला जमला गेला...
"मारुति" हे नाव आधी नाटकात घालून मग थोडीशी तोडफोड घडवून आणणे.. हा महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचा नाटकाच्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट होता.. असेही नन्तर बोलले गेले.. :)
असो... सांगण्याचा मुद्दा इतकाच की या नाटकाच्या स्टोरीचा किन्वा मॉरलचा आपण नमूद केलेल्या कोणत्याही घटनेशी संबंध किन्वा थोडेसुद्धा साधर्म्य नाही...
* मला वाटतं... माझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेले आहे! ;)
सचिन ने शिवसेना किंवा मनसे असो त्यांच्या कायर्क्रमात शिवाजी पार्कात नेहमीच आवर्जून हजेरी लावली आहे. मी ह्या प्रसंगांचा साक्षीदार आहे. मात्र त्याने सोनिया ह्यांची भेट घेतली तर असा कोणता गजहब झाला.
ह्म्म्म.. सचिन तेन्डुलकर, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे .. हे सगळेजण सी.के.पी. (चान्द्रसेनीय कायस्थ प्रभू) या एकाच उच्च जातीतले आहेत.. त्यामुळे सचिनने त्यांचे कार्यक्रम अटेन्ड करणे साहजिकच आहे... (अर्थात काही लोक ठाकर्यांना "पाठारे प्रभू" म्हणतात.. पण सीकेपी आणि पाठारे प्रभू. यांच्यात जास्त फरक नाही..)
आणि हे सगळे लोक मुम्बईचे "मूलनिवासी" आहेत.. त्यामुळे भूमिपुत्रांना भूमिबांधवाम्बद्दल प्रेम वाटणे साहजिकच आहे.. आणि परत हिन्दुत्ववादाचाही मुद्दा येतोच्च ना... 'सोनिया' नाही म्हटलं तरी परकीयच्च!..;) सचिन' सोनिया गान्धींना मिळाला.. म्हणजे.. कॉन्ग्रेसवाल्यांना फुकट भाव येणार..त्यामुळे बाळासाहेबांनी त्यास विरोध करणे साहजिकच आहे.. :)
त्याचा राजकारणासाठी हातवाले वाले वापर करून घेणार असतील तर त्याला विरोध करणारे किती धुतल्या तांदळासारखे आहेत.
यामध्ये सचिनचे डोके, त्याची सदसदविवेकबुद्धी, समोरच्याला नक्की कश्याचा वापर करायचा आहे.. हे समजून घेण्याची त्याची कुवत.. आणि सगळ्यांत महत्वाचे महणेज.. सचिन'ला याचा होणारा फायदा...या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात..
कारण सचिनही शेवटी माणूसच आहे.. कितीही शालीन, विनयशील, सद्गुणी असला..तरी क्रिकेट आणि राजकारण यामध्ये बर्यापैकी फरक आहे... आणि पैसा तर सगळ्यांनाच आवडतो!! :)
आज गानकोकिळा त्याचे कौतुक करते तर तिची धाकटी बहिण त्याच्या ह्या निर्णयाचा विरोध करते. ह्यामागे त्यांच्यातील सुप्त स्पर्ध्धा व राजकीय संबंध डोकावतात. हे पाहून क्लेश होतो.
गानकोकिळा- लता मन्गेशकर कौतुक करतात असे म्हणावे.. त्या वयाने आणि मानाने मोठ्या आहेत. भले राज्यसभेवर येऊन त्यांनी काहीच काम केले नसेल.. तरीही संगीतक्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्याचप्रमाणे "तिची बहीण" .. हा एकेरी उल्लेखही प्रचन्ड खटकतो...ज्याप्रमाणे सचिनबद्द्ल कुणी काही बोललेले आपल्याला खपत नाही.. त्याप्रमाणे भारतरत्न- लतादीदी, आशा'जी यांच्याबद्दलही 'अरे-तुरे'च्या भाषेत बोललेले अनेक रसिकांना खपणार नाही. बाकी त्यांच्याबद्दल जे सत्य आहे.. ते आहे.. राज्यसभेबर येऊन त्यांनी खरच काहीही केले नाही.... अर्थात सचिन लतादीदींना आई'च्या जागी मानतो.. हेही विसरू नयए.. त्यामुळे कृपया आदर बाळगा!!! :)
आजपर्यंत इतर कलाकार किंवा खेळाडू ह्यांनी राज्य सभेत जाऊन काय दिवे लावले हा एक ठळक मुद्दा आहे.
पण सचिन रमेश तेडुलकर हा असामान्य वयक्तिमत्व असलेला माणूस आहे.
सहमत!..
* वयक्तिमत्व- व्यक्तिमत्व
ह्या संधीचे तो सोने करेन हे त्याचा एक आंधळा भक्त म्हणून नव्हे तर त्याच्या आजवरच्या वर्तनावरून मांडलेला माझा ठोकताळा आहे.
निनाद'जी... आत्तापर्यन्तच्या तुमच्या लिखाणावरून सचिन'बदल तुमच्या मनात खूप आदर, भक्ती भावना आहे.. असे दिसते.. पण स्वतःला "आन्धळा भक्त" म्हणवून तुम्ही तुमच्या सचिनबद्दलच्या आदराला, भक्तीला "अन्धश्रद्धा"च ठरवू पाहत आहात.. असे वाटते.. :)
अवान्तर :- आज पुण्यात सचिन'चा त्याच्या महाशतकांबद्दल सत्कार करण्यात आला.... सचिनची "डान्स इन्डिया डान्स"च्या टेरेस लेविस'सारखी हेअर स्टाईल केलेली आहे... जावेद हबीब जिन्दाबाद!!!! :)
1 May 2012 - 3:35 pm | अनामिका
भन्नाट प्रतिसाद मृगनयनी...प्रत्येक शब्दाशी सहमत आहे....
1 May 2012 - 5:51 pm | मृगनयनी
धन्यवाद अनामिका'जी! :)
1 May 2012 - 9:14 am | अप्रतिम
नास्तिक मंडळींचे या धाग्यावरील विचार विशेष चिंतनीय ठरतील.
1 May 2012 - 2:00 pm | इरसाल
अनामिका यांच्या सार्या प्रतिसादांशी हज्जारदा सहमत.
सौ सुनार की एक लुहारकी.
किंवा,
मारा दनका करा भनका.
बाकी काही जणांच्या प्रतिसादावरुन असे वाट्टेय की, एसेमेस पाठवला म्हणजे मीच सचिनला भारतरत्न दिले.
1 May 2012 - 2:24 pm | कानडाऊ योगेशु
सचिनच्या ह्या तथाकथित खासदारकीचा विरोध होण्याचे कारण हा सचिनवरील अविश्वासावरुन नसुन राजकारण्यांवरील असलेल्या अविश्वासावर आहे.आजपावेतो तरी सचिनने आधी कधी राजकारणात जाण्याची इच्छा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्यातरी बोलावुन दाखविली नव्हती.आणि एरव्ही क्रिकेटव्यतिरिक्त जीवनातही बर्याच वेळेला स्वतःच्या टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे आणि भोळसटपणामुळे मिडियाच्या हातचे खेळणे बनला होता.त्यामुळे संसदेत गेल्यावर आता ह्याचे कसे होणार हाच प्रश्न बहुतेकांना पडला असावा.बाकी गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार ह्या दोन आवश्यक गुणांमुळेच सिध्दु व अझर खासदार झाले असावेत.त्यांचे खासदार होण्यात आणि सचिनचे खासदार होण्यात नक्कीच फरक आहे.
2 May 2012 - 10:08 am | मृगनयनी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अगदी अगदी सहमत!!!
@ कानडाऊ योगेश-
काही अंशी असहमत.. बाकी बर्याच अंशी सहमत!
"सचिन"चे व्यक्तिमत्व कितीही शान्त, विनयशील असले तरीही तो "भोळा" वगैरे नाहीये. जरी मध्यमवर्गीय कुटुम्बातून तो वर आलेला असला, तरी किन्वा किम्बहुना त्याच्चमुळे तो पक्का व्यवहारी आहे. (तसेही सामान्य माणसांना व्यवहारी असावेच्च लागते... पण "देव" व्यवहारी असून चालत नाही.. म्हणून हा उल्लेख! ;) ;) )
अर्थात तो त्याच्या क्रिकेटदेवतेशी प्रचंड प्रामाणिक आणि एकनिष्ठ असल्यामुळे आपल्याला त्याचे नेहमीच कौतुक आणि अभिमान वाटत आलेला आहे.
सिद्धू आणि अझर'सारखा सचिन भ्रष्टाचारी आणि राजकारणी मुळीच नाही. अर्थात बिटविन द पिरियेड.. सचिनने तशी स्वतःसाठी राजकारणात फिल्डिन्ग लावून ठेवली असेल.. तर अजूनतरी त्याबद्दल माहित नाही.... आणि "सचिन" इतकाही भाबडा नाहीये.. की कुणीही त्याचा वापर सहज करू शकेल... त्यामुळे तो खासदार झाल्यानन्तरच बरेच पत्ते ओपन होतील! :)
माझ्या माहितीप्रमाणे मोस्ट प्रोबॅबली तो लता'जींसारखं निष्क्रिय राहणेच जास्त पसन्त करेल.. म्हणजे त्याची सभ्य-शालीन वगैरे प्रतिमाही पुसली जाणार नाही.. आणि खासदार असल्याचा जो मेन्डेटरी फायदा मिळायचा... तोही मिळेल! :)
2 May 2012 - 9:44 pm | निनाद मुक्काम प...
मृगनयनी जी आपल्या दीर्घ प्रतिसादाचे उत्तर यथावकाशात देतो. पण त्यात तुम्हाला आमचे काही मुद्दे पटले हे पाहून बरे वाटले.
तुमचा हा सदर प्रतिसाद आम्हाला पटला. मुळात हेच माझे म्हणणे होते. पण जेव्हा त्याने फक्त सोनियाजीनशी भेट घेऊन मग खासदारकी स्वीकारली म्हणून राजकारणी मंडळी सह त्याला देव मानणारे अनेक लोकांनी त्याला चक्क शिव्या घातल्या ( त्याच्या एकेरी उल्लेख करत )
सचिन ला दुनियादारी व्यवस्थित कळते.
आणी त स्वतःचा वापर करू देणार नाही हे तुम्हाला मला अनामिकाजी ह्यांना कळते पण ह्या आंधळ्या भक्तांना कसे कळत नाही.
मुळात आज सचिन ला राजकारण यायचे असेल तर भारतातील कोणताही पक्ष कोणत्याही प्रांतातून उभा करू शकतो.
आणी सचिन हमखास निवडून येऊ शकतो.
सचिन ने नारंग सह तेंडूलकर हॉटेल टाकले त्या हॉटेलचे बार व्यवस्थापन आमच्या स्तर अकेडमी कडे होते. आम्ही लंडनला पोहोचलो पण माझा दादरचा एक मित्र व सचिन चा कट्टर समर्थक मात्र जो पर्यंत हे हॉटेल आहे तो पर्यंत मी येथेच राहणार म्हणून तिथेच थांबून राहिला. का तर सचिन च्या नावाशी जोडल्या जावे.
सांगण्याचा मतितार्थ ह्या लोकांनी सचिन खासदारकी साठी हातवाल्यांना सामील झाला अशी समजूत कशी करून घेतली.