गाभा:
भलतच निराळ जीवनमान, आहे शहरातलं आणी खेड्यातलं आज मी दोन वर्ष झाली सागलीतल्या एका छोट्या खेड्या तुन पुन्या ला आलो आहे, जवा इथलं जीवनमान पहिलं तेव्हा गावा विषयी फारच किव वटु लागलीय पर्याय सापडेना झालाय की ही दरी कशी बुजवायचि .मग तो प्रश्न कोणता ही असो ,
प्रतिक्रिया
2 Aug 2008 - 10:45 pm | सचिन-पाताळधुंड्या
प्रश्न पडला ना हेच खुप पुरेसं आहे.
. जिवणमान वेगळं आहे आणि ते सध्यातरि वेगळ राहनारच..
शहर आनि खेडि यांच्यातिल आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक भेदाचि सिमारेषा कशि अस्पष्ट करता येईल याचा तुमच्या परिने प्रयत्न करा. गावाकडच्या मुंलामध्ये खुपच "अवेअर्नेस प्रोब्लम " असतो तो तुमच्या परिने दुर करा. मुलांना करिअर गायडंस करा.
.
आम्हिहि गावाकडचेच आहोत.
3 Aug 2008 - 4:18 pm | नोहिद सागलीकर
'अवेअर्नेस प्रोब्लेम' मुलांमधे नाही . तो प्रश्न आहे अशिक्षित पालकांचा आहे. जसा शहरांतील 'पालक' बालकावषयी जागरुक आहे ती
जागरुकता. गरजेची आहे.बरोबर आहे का?
3 Aug 2008 - 9:15 am | रविंद्र गायकवाड
गाव सोडून सगळॅच शहरात येतात. मग हा प्रश्न पडणे साहजीकच आहे.
हाच प्रश्न तुम्हाल खेड्यात राहून पडला असता का?
3 Aug 2008 - 4:09 pm | नोहिद सागलीकर
जो पर्यत मि गावात होतो ,तो पर्यत शहरं हि जशि स्वप्न वाटायची पन आता असं वाटत नाही ,गावात सोई नसतील,एखाद्या वेळेस
संध्याकाळच्या जेवनाची भ्रान्त आसेल पन .थोडसं समाधान असतं, हे खर ........
पन ते समाधान मिळवायला माझा भाऊ जितका राबतो त्याचा तितका मोबदला त्याला कधी मिळणार,माझ्या शाळेत- शिकणार्या विद्यार्थ्याला त्याचं पोट भरेल आसं शिक्षण मिळावं ,
आता..... माझ्या सारखे चारचौघे........
विचार करु लागलेत ....
गरज आहे तुमच्या मार्गदशना ची .........
3 Aug 2008 - 11:09 am | मराठी_माणूस
गावा विषयी कीव वाटण्याचे कारण काय ?
3 Aug 2008 - 11:21 am | ऋषिकेश
ही दरी कशी बुजवायचि?
माझा प्रतिप्रश्न आहे ही दरी का बुजवायची? जर तुम्हाला शहरातील लोकांना ज्या सिविधा मिळतात त्या गावातही मिळाव्यात, त्यांच राहणीमान उंचावावं, आरोग्यव्यवस्था नीट व्हावी वगैरे म्हणायचं असेल तर बरोबर आहे, मात्र गावाचे जीवनमान शहरासारखं का व्हावं? गावाला गावच ठेऊन जीवनोपयोगी सुविधा वाढाव्यात अश्या मताचा मी आहे. या गावातच खरा भारत आहे , नाहि?
गावाकडे चला!
- ऋषिकेश
3 Aug 2008 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गावाकडे जर शहरासारख्या सुविधा मिळून गाव जर गावच असेल तर मी तिकडेच जाईन, मुळची शहरातली असले तरीही! मुंबईच्या बाहेर पडेपर्यंत मला मुंबईसारखी जागा नाही असं वाटायचं. नंतर (युकेमधल्या) खेड्यात गेले आणि वाटलं की मुंबईमधे मी जे काही जगले ते सगळं किती बेकार होतं, गर्दी, प्रदूषण, सिमेंटची जंगलं! खरोखर खेड्यातलं आयुष्य खूप सुंदर होतं.
(नॉस्टॅल्जिक) यमी
3 Aug 2008 - 4:55 pm | प्रकाश घाटपांडे
शहराकडची नातेवाईक घरी यायचे तेव्हा सुरवातीला " ओहोहो काय सुंदर हवा !काय छान टेकड्या !काय छान शेत आहे तुमचं! पाट झुळु झूळु वाहतो आहे. कित्तीगडी माणसं! घरचं दुध! तुपं. खरवस खायला मिळतो.इथे च राहयला हवं काय आहे त्या पुण्यात?" असे म्हणायचे . थोडे दिवस झाले कि लगेच काहीतरी कारण सांगत पुण्याला पळ काढायचे. मला तर शहराचे जाम आकर्षणच! तिथे चहात बुडवुन पाव खायला भेटतोय, केके भेटतोय! आइस्क्रीम भेटतय ,परत रोड डामरी! सायकली बिंगवायला, शिमिट कांक्रीट ची घर आहेत. फरशा असतात अंगण सारवायला लागत नाही भुई घालायला लागत नाही. रिक्षा असत्यात बसायला, स्कुटर आसत्यात. मोटारी असत्यात. लग्नाच्या मिरवणुका मोटारीतुन होत्यात. आपल्या सारख्या बैलगाडीतुन नाई. परत ब्यांड असतुय. आपल्यासारख सुंदरी,संबळ आन ताशा नसतोय. ब्यांडवाल्यांची भरजरी कापड बघुन मला ब्यांडवाला बनाव अस वाटायचं.
अंकुशा म्हनायचा त्या ब्यांडवाल्यासमोर चिचा खाउन दाखव बरं? शहरातली बारकी बारकी प्वारं बी फुलप्यांटी घालत्यात. आन आपन पांढरा शर्ट खाकी प्यांट आन गांधी टोपी. शाळेत तेच घरी तेच. शहरात घरातले कपडे वेगळे आन शाळेतले वेगळे असतात. तिथ नळ सोडला फवार्यासारख पानी येतय फुकट. सारखी तोंड धुतात साबण लावुन. पावडरी लाउन सारस बागेत फिरायला जातात. पिक्चर पाहत्यात. विंग्रजीत शिकत्यात.
आन आमाला सांगत्यात खेडं लई भारी म्हनुन!
प्रकाश घाटपांडे
3 Aug 2008 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घाटपांडे साहेब,
आपल्या प्रतिसादाचा रोख जर आमच्या मनातला असेल, तर आम्हाला खेड्याकडे चला असे म्हणणा-याकडे आम्ही आता जरा संशयाने पाहत आहोत. बदलणारं गाव, खेड्याचं झालेलं शहरीकरण, आधुनिक समतादयी पद्धतीने उभारणी होणा-या खेड्याकडे पाहतांना, खेड्यातील बदलत्या भावात्मक जडणघडणीकडे अधिक संवेदनशिलतेने पाहिले पाहिजे. निच्छित धोरणांच्या अभावाद्वारे ग्रामीण जनता खुल्या बाजाराशी स्पर्धा करतांना कमी पडतात त्यांची मुले योग्य मार्गदर्शनाअभावी शिकूनही तिथेच अडकून पडतात. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी किती श्रीमंत होऊ शकतो त्यासाठी दिली जाणारी उदाहरणे... सबसिडींचे राजकारण , शेतक-यांना माफ झालेली कर्जाची प्रकरणे....त्याचबरोबर तरुणांनी भारतातील बदलणार्या परिस्थितीचे अवलोकन करावे, शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता शेती हा व्यवसाय यशस्वी करुन दाखवावा. तरुणांनी कष्टाला तंत्राची जोड देऊन आवडीने शेतीचा स्वीकार व्यवसाय म्हणुन करावा. हाताला काम आणि, पोटाला अन्न आणि गाठीला दाम मिळ्वून देण्याची ताकद शेतीत आहे, अशी शहरी भाषा करुन गाव जिथं आहे तिथेच आहे..........या आणि अशा गोष्टींकडे आम्हाला प्रगतीचे लक्षण म्हणुन पाहण्याची हिम्मत उरली नाही, गाव आणि शहरातली दरी वाढतच आहे, आम्ही महिन्याच्या एक तारखेला पगार घेणारे म्हणतो... गाव फार सुंदर आहे.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2008 - 1:12 am | धनंजय
तुमचा प्रतिदाद माझ्या मनातला. जिन्यातून गजबजलेल्या (पण ओळखीच्या, आपुलकीच्या) गल्लीत उतरायचे, अर्ध्या तासाच्या अंतरावर एकदोन नाट्यगृहे, डझनानी खानावळी असाव्यात, आपल्याशी मिसळणारे मित्र खूप असावेत...
गोव्यातल्या आमच्या खेड्यातून पणजीला गेल्यावर, तिथून पुण्याला गेल्यावर "अपल्याला हेच मानवते" असा भाव वाढतच गेला. आमच्या शहरातल्या वस्तीबद्दल उपनगरातून आलेले मित्रलोक टीका करतात - रात्रीही रस्त्यावरच्या गाड्यांचा गोंगाट चालू असतो, वगैरे. मला त्याचा त्रास होत नाही... मुद्दामून सुटी काढून खेड्यांकडची शांतता अनुभवायला जातो - तीही आवडते, पण ती माझी वाटत नाही.
चर्चेचा मूळ विषय गंभीर आहे. गावे ओस पडात आहेत, शहरांत गर्दीमुळे वीज-नाल्या-दळणवळण तोकडे पडू लागले आहे, हे खरेच.
तरी हे (अवांतर) माझ्या मनातले सांगितले घाटपांडे सरांनी.
3 Aug 2008 - 4:38 pm | सुधारक
राहणीमानाची मापे हाताशी आहेत म्हणून राहणीमान चांगले हे मोजता येते. उदा. घराची किंमत, जेवणावर झालेला खर्च, घरातली उपकरणांची किंमत. पण शहराकडल्या अनेक गोष्टी मोजता येत नाहीत. उदा. पाणी येण्याची वेळ माहीत नसल्यामुळे होणारी चिंता, मुलांना शाळेतून परत येताना ओलांडायला लागणारे सिग्नल बिघडलेत, सेलला सिग्नल आज मिळत नाही आहे, दुधाच्या पिशवीत भेसळ होत असल्याची शंका, भाजीला येणारा किटकनाशकाचा वास, रात्रभर ऐकू येणारा ट्रॅफिकचा आवाज - याची काहीच मोजमाप होत नाही. मोजता येणार्या गोष्टी न मोजता येणार्या गोष्टीवर विजय मिळवू लागल्या आहेत. हा विजय मापनाचा आहे. शहराचा नाही.
4 Aug 2008 - 4:01 am | चित्रा
आणि धड मोठे शहर नाही अशा वातावरणात राहिल्यानंतर मी एक म्हणू शकते - की शहरात दाटीवाटी, गर्दी असते पण संधी, मग त्या शिक्षणाच्या असोत किंवा कलेच्या, खेड्यांपेक्षा निश्चित जास्त असतात.
कालच पुलंची वार्यावरची वरात पाहिली. त्यात श्रीकांत मोघेचे " दिल देके देखो" पाहिले. खेडी बदलत चालली आहेत. त्यांनी शहरांचे रूप जसेच्या तसे घेण्याची गरज नाही, पण सोयींच्या दृष्टीने खेड्याचे रूपांतर टुमदार गावात होणे मात्र जरूरीचे आहे. हे कसे व्हावे हा मात्र केवळ बाजारपेठेशी संबंधित प्रश्न आहे. सुधारणा करून घेणारे लोक खेड्यात राहतील तेव्हा सुधारणा होतील, एवढेच म्हणता येते.
4 Aug 2008 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खेड्याचे रूपांतर टुमदार गावात होणे मात्र जरूरीचे आहे. हे कसे व्हावे हा मात्र केवळ बाजारपेठेशी संबंधित प्रश्न आहे. सुधारणा करून घेणारे लोक खेड्यात राहतील तेव्हा सुधारणा होतील,