पुन्हा एकदा स्मार्टफोन

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in काथ्याकूट
26 Apr 2012 - 11:12 am
गाभा: 

पुन्हा एकदा स्मार्टफोन.....
एक स्मार्टफोन घ्यायचा आहे. किंमत जास्तीत जास्त रु.२०,०००. ३जी, चांगला कॅमेरा, चांगला म्युझिक प्लेअर, बर्‍यापैकी मेमरी, शक्यतो व्हीडीओ कॉलिंग सुविधा
फार तांत्रिक गुंतागुंत नसावी. फार नाजूकही नसावा. विक्रीपश्चात सेवा उपलब्ध असावी. याआधी आंतरजालावरुन फोन घेऊन हात पोळून घेतले आहेत.
जाणकारांनी कृपया मदत करावी. स्वतःचे अनुभव सांगीतल्यास अधिक बरे होईल. लिंक्स शक्यतो देऊ नयेत.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Apr 2012 - 1:22 pm | श्री गावसेना प्रमुख

nokiaनोकिया ७०३ घेवा,३ जी,८ मेगापीक्सेल कॅमेरा, डीजीटल फ्रंट कॅमेरा,८ जि बी मेमरी,फुल मेटालीक आणी बरच काही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2012 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोकिया c7 फोन उत्तम वाटतो. गेल्या वर्षभरापासून तोच वापरतो. बेली अपडेट्स झाल्यापासून तर वापरणे अधिक सहज झाले आहे. वेगवेगळे विजिट्स मुळे तर सी-७ -०० वापरायला अधिक मजा येते.आठ मेगापिक्सल कॅमेरा, फ्रंट क्यामेराही चांगला आहे. (भांगपट्टी करायला याचा चांगला उपयोग होतो, डोक्यावर केस असतील तर ) व्हिडियो रेकॉर्डिंग उत्तम दर्जाचे होते. फोटोही उत्तम येतात. व्हिडियो कॉलिंग सुविधा, मराठी संदेश स्वच्छ दिसतात. वेलांट्या, काना, मात्रे व्यवस्थित दिसतात. इनबिल्ट मराठी संदेश टंकण्याची सुविधा नाही. मराठी टंकण्यासाठी अ‍ॅप्लीकेशन टाकावे लागते. मुझीक प्लेयर, व्हिडियो प्लेयर, या बरोबर यातला नकाशा (मॅप) खूप महत्त्वाचा आहे. कोणालाही गाडी थांबवून काचा खाली करुन अमुक-अमुक रस्ता कुठे जातो विचारायची गरज नाही. इनबिल्ट मेमरी सात जीबी आहे. ऑपेराचे व्हर्जन १२ वापरले की नेट वापरायलाही खूप सोपे आहे. अधिकचे मेमरी कार्डही टाकू शकता. नोकिया स्टोअर मधून वेगवेगळे अ‍ॅप्लीकेशन्स-थीम उतरवून घेता येतात. नोकिया सूट जर संगणकाला असेल तर बॅकप घेता येतो. नवनवीन काँटेक्ट्स संगणकावर, फोटो व्हिडियो, साठवले जातात.

खरं तर आता सी सेवन च्या किमतीत (१८००० रुपये) आता नोकिया एन८ ही येतो. तेव्हा वरच्या सर्व फॅसिलिटीसोबत अधिकच्या फॅसिलिटी जर एन८ मधे आहेत. (एनएफसी नाही) तर एन८ हा उत्तम पर्याय वाटतो. एन ८ ला कॉड लावली की, आपल्या टीव्हीवर मस्तपैकी वायफाय चालू करुन चित्रपट पाहता येतात. फोटू-बिटू टीव्हीवर पाहता येतात. बारा मेगापिक्सल कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेराही तीन-चार मे.पिचा आहे. असं बरंच काही.

असो, रावसाहेब स्मार्ट फोन घेताहेत म्हटल्यावर खूप आनंद झाला. किती माहिती सांगू आणि किती नाही असे झाले आहे. माहितीही यासाठी डकवतोय की माहितीच्या बदल्यात एखादा खत्रा, जबरा, आणि पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आला तर वाचायला आनंद वाटेल, अर्थात उत्तम लेखन वगैरे आता तसं दुर्मीळ झालंय असं म्हणतात. खरं खोटं देवाला माहिती. ;)

-दिलीप बिरुटे

नन्दादीप's picture

28 Apr 2012 - 4:46 pm | नन्दादीप

C ७ ला +१.........

चिगो's picture

26 Apr 2012 - 1:26 pm | चिगो

अ‍ॅन्ड्रॉईड बेस्ड.. सहा महीन्यांआधी ११,५०० च्या आसपास किंमत होती. किंमतीच्या मानाने मला बरा वाटला. ३जी आणि व्हिडीयो कॉलिंग उपलब्ध. कॅमेरा ५ मेपी असला तरी क्वॉलिटी इतकी चांगली नाही. इन्टर्नल मेमरी जास्त नाही पण ३२ जीबी कार्ड सपोर्ट आहे.. सॅमसंग Galaxy S, LG Optimus वगैरे बघू शकता..

नेत्रेश's picture

26 Apr 2012 - 1:37 pm | नेत्रेश

only iPhone

सर्वसाक्षी's picture

26 Apr 2012 - 2:55 pm | सर्वसाक्षी

एकदम स्मार्टफोनचा ध्यास? काही विशेष? म्हणजे भारी कॅमेरा, मुजिक, विडिओ कॉलिंग वगैरे...............

तुषार काळभोर's picture

26 Apr 2012 - 3:25 pm | तुषार काळभोर

price list

motorola defy
lg optimus
iphone 3gs

विसुनाना's picture

26 Apr 2012 - 3:41 pm | विसुनाना

सध्या 'सोनी एरिक्सन एक्सपेरिया एस' हा फोन ३१००० रुपयांना मिळतो.
'सॅमसंग ग्यॅलक्सी एस२' २६००० रुपयांना मिळतो.
'एल्जी ऑप्टिमस ब्लॅक' १८००० रुपयांना मिळतो.

हे सारे अँड्रॉईड फोन्स आहेत.

http://www.gsmarena.com/ या दुव्यावर तुम्हाला फोनमध्ये हव्या असलेल्या सर्व लक्षणांची छाननी करून त्यातून आखुडशिंगी बहुदुधी शोधता येईल.

किंवा मग आयफोन ४ वा ४एस आहेतच. (अनुक्रमे ३० हजारांच्या / ४० हजारांच्या पुढे...)

अँड्रॉईड ब्राऊझर इतक्या वेळा क्रॅश होतो की इंटरनेट ब्राउझिंगच्या दृष्टीने सपशेल कुचकामी ठरतो. साधारण चार वेळांपैकी दोन वेळा क्रॅश होतोच होतो.

मिपासारख्या ठिकाणी एकदा का पेज लोड होताहोता क्रॅश झालं की "अनरेड" प्रतिक्रियांचा आकडा/खूण नष्ट होते..

स्वीकारणीय मर्यादेपेक्षा बर्‍याच जास्त वेळा ब्राउझर विंडो हँग होऊन दोन मिनिटांनी फटकन नष्ट होते.

हा अँड्रॉईडचा अत्यंत त्रासदायक दोष आहे. मराठी टाईपता यावं म्हणून मी गॅलेक्सी घेतला. टाईप तर होतं पण जरा थोडं लिहून झालं की अक्षरं उलटसुलट जंबल व्हायला लागतात.

माझी खरेदी चुकीची ठरली. गॅलेक्सी प्रो घेऊनही तो मी ब्राउजिंगला आताशा वापरतच नाही. नोकिया सर्वोत्तम. (मराठी गमभनमधे टाईप होत नसलं तरी इंडि एसएमएस इन्स्टॉल करुन करणं फार अचूक आहे.)

चाणक्य's picture

26 Apr 2012 - 4:47 pm | चाणक्य

गवि, अ‍ॅन्ड्रोईड क्रॅश होतो हे खरं आहे. आणि देवनागरी टाईपताना तर फारच कसरत करावी लागते. मी मध्यंतरी एनीसॉफ्ट की बोर्ड अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल केलं. कसरत पुष्कळ कमी झाली आहे. अर्थात डेस्कटॉप / लॅपटॉप ची सर नाही येणार.

अँग्री बर्ड's picture

26 Apr 2012 - 4:55 pm | अँग्री बर्ड

हायला गविभाऊ.. अपुन को तो ऐसा कूच प्रॉब्लेम आयाच नई तो.. default और opera .. दोनो को बी युज किया साला लेकीन कूच झंझट न्हय. सिर्फ browsing के बाद फोन तापता हय.

विसुनाना's picture

26 Apr 2012 - 5:13 pm | विसुनाना

असेच म्हणतो. ऑपेरा मिनी किंवा अँड्रॉईड ब्राऊझर कधीच क्रॅश झाला नाही. (२.२ + २.३.४ कुठेही).
शिवाय एनीसॉफ्ट कीबोर्ड देवनागरीसाठी (आणि इतर लिप्यांसाठीही) उत्तम आहे.
नोकिया आता जुना झाला.... कदाचित त्यांचा ल्युमिना ८०० विंडोज फोन बरा असेल. माहीत नाही.

जोशी 'ले''s picture

26 Apr 2012 - 7:35 pm | जोशी 'ले'

ऒब्जेक्षन मिलॅार्ड, :-) तुम्हि ucbrowser ट्राय करा तरिही क्रॅशिंग होत असेल तर तो problem सॅमसंग चा असेल , उगा android ला दोष देउ नका. मी मिपा वर नेहमी माझ्या मोबाइल वरुन लॅागीन असतो. :-)

ऐला मग माझाच का होतो क्रॅश?

आंजावर सर्वत्र वाचले की हा न सुट लेला बग आहे.

ओपेरा नाहीक्रॅश होत. पण त्यात मराठी टाईपही होत नाही.

मला हीच अडचण 'गुगल क्रोम' वर यायची.
च्यामारी साधे दोन टॅब उघडले की लगेच क्रॅश व्हायचं.

क्रोमचं एक फोल्डर 'बॅकअप' असं रिनेम करुन ते जिथे आहे त्याच्या एक स्टेप अलिकडे पेस्ट करा असा उपाय होता हेल्प फोरम वर. एकदम लागू पडला होता.

तुमच्या मोबाईल ब्राऊझरबाबत असं काही असेल तर बघा गवि.
मी ती लिंक शोधतो.

Check whether you need a new browser user profile.
If you see this error message repeatedly, your browser user profile may be corrupted. First try moving the Default sub-folder from your User Data folder to see if that fixes the problem:

Go to Start menu > Run.
Enter one of the following directories in the text field, depending on your operating system:
Windows
Windows XP: %USERPROFILE%\Local Settings\Application Data\Google\Chrome\User Data\
Windows Vista and Windows 7: %LOCALAPPDATA%\Google\Chrome\User Data\

Click OK.
In the window that opens, rename the “Default” folder as “Backup”.
Move the “Backup” folder from the “User Data” folder up one level to the “Chrome” folder.

http://www.googlechromebrowser.com/whoa-google-chrome-has-crashed/

जोशी 'ले''s picture

26 Apr 2012 - 8:30 pm | जोशी 'ले'

ucbrowser ट्राय केलय का? नाहि तर एकदा software अपग्रेड करुन घ्या.

जोशी 'ले''s picture

26 Apr 2012 - 8:45 pm | जोशी 'ले'

पुन्हा एकदा आॅब्जेक्षन ,
मी सहसा ओपेरा वापरत नाही पण हा प्रतिसाद ओपेरा वरुनच

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2012 - 10:06 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हि ucbrowser ट्राय करा तरिही क्रॅशिंग होत असेल तर तो problem सॅमसंग चा असेल ,>++++११११

माझ्याकडे तर साधा सॅमसंगचा प्राइमो (s5610k) आहे..मी आधी ऑपेरा 4.4browser वापरत होतो..त्यावर मराठी टाइपिंगला काहिच प्रॉब्लेम नाही पण कनेक्टिविटीला खुप त्रास व्हायचा. एक/एक प्रतिसाद जायला ४/४---५/५ वेळा सोडायला लागायचा.त्यापेक्षा ucbrowser १नंबर आहे...३जी सारखा स्पीड मिळतो.खपाखप पेज ओपन होतात. मराठी टायपिंगला तर काहिच प्रॉब्लेम नाही.जबर्‍या आहे हा ucbrowser :-)

कुंदन's picture

26 Apr 2012 - 10:48 pm | कुंदन

कुठुन डाउन्लोड करावा याच दुवा द्या , अन दुवा मिळवा.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jul 2012 - 11:14 am | अत्रुप्त आत्मा

@अन दुवा मिळवा.>>> मोबॉइलवरुन-गुगलच्या पेज वरुन यु सी ब्राऊजर ८.२ किंवा ८.३ असा सर्च द्या. युसी डाऊनलोडवायच्या बर्‍याच साइट्स मिळतील. डाऊनलोड करा...इनस्टॉल करा... काम चालू :-)

अक्षरसंच (फाँट) कुठला इन्स्टॉल (मराठी शब्द?) करावा लागला? बरेच दिवस हुडकतोय... फक्त मराठीसाठी ओपेरा मिनी वापरावा लागतोय. अँड्रॉईड ब्राऊझर मध्ये बाकी काही अडचण कधी आली नाही.

जोशी 'ले''s picture

26 Apr 2012 - 9:39 pm | जोशी 'ले'

इथे फारच अवांतर होउ नये म्हणुन हा धागा पहावा http://www.misalpav.com/node/19571

स्मार्टफ़ोन कसा ओळखावा?
- ज्यात भारतीय भाषांना स्थान नाही तो वा
- ज्याची ब्याट्री एक दिवसही पूर्ण चालत नाही तो.
असं माझं स्पष्ट मत आहे. माझा एच टी सी डिझायर एच डी - एण्ड्रोइड या दोन्ही बाबतीत बकवास. मराठी लिहिण्या वाचण्याची अडचण मी सोडवली असली तरी ब्याटरीच्या नावाने जाम बोंब आहे. चुकून काही तास शहराबाहेर / शहरात फ़िरावं लागलं की ब्याट्री घसरलेली बघून तोंडात शिव्या येतात.
या दोन्ही त्रुटी टाळून नि तुम्ही लिहिलेली वैशिष्ट्ये गृहित धरून तसेच तुम्ही दिलेली खर्च मर्यादा पाहता नोकिआ एन एट चांगलाच पडावा. भरभक्कम. टेन्शन नाय. सिम्बियन ऍना कार्यप्रणालीमधे सर्व भाषांना स्थान आहे.
पण नोकिया नि बाकी कुठलाही एंड्रोइड फ़ोन यात मोठा फ़रक हा ऍप्प्स्‌ चा आहे. एंड्रोइड / ऍपलची ऍप्प्स्‌ पाह्यली की नोकिया किस झाड की पत्ती वाटू लागतो.

एल‌जीच्या पी-६९८ या एंड्रोइड फ़ोनमधे एक जीएसएम नि एक सीडीएमए अशा दोन सिमकार्डांची सोय असून ब्याटरी भरपूर (दोन दिवसांवर) टिकते नि सुस्पष्ट देवनागरी दिसते. किंमत साधरणतः १२००० रु. आहे. 'एनी सॉफ़्ट कीबोर्ड'’ हे उपकरण वापरून 'श्री एंड्रोइड' हे प्लगिन जोडून अत्यंत निरामय रीतीने मराठी लिहिता वाचता येते. तर हाही पर्याय आजमावून पहा.

पण भारतीय भाषा नि ब्याटरी या दोन गोष्टी ग्राहक नि फ़ोनवाले सगळेच दृष्टीआड करतात. ते होऊ नये हे महत्वाचे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2012 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणता स्मार्ट फोन घेतला म्हणायचा ? काय फिचर्स आहेत ?
का नुसतंच आम्हा स्मार्टफोनधारकांना कामाला लावलं होतं ?

आता अ‍ॅपलच्या आयफोन फोर एसची स्वप्न पडायला लागली आहेत.
बघू कधी जमतं ते.........

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 11:31 am | नाना चेंगट

>>>>आता अ‍ॅपलच्या आयफोन फोर एसची स्वप्न पडायला लागली आहेत.

हं थकबाकी मिळाली वाटतं? :)

>>>बघू कधी जमतं ते.........

हं ! घरून वेगळीच डीमांड आली वाटतं? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2012 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> हं थकबाकी मिळाली वाटतं ?
अजून कोणतीही थकबाकी मिळालेली नाही.

>>>>हं ! घरून वेगळीच डीमांड आली वाटतं ?
-निरंक -

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 4:35 pm | नाना चेंगट

>>>अजून कोणतीही थकबाकी मिळालेली नाही.

त्यासाठी संप कधी?

कुंदन's picture

11 Jul 2012 - 4:40 pm | कुंदन

आता तर सुटी संपलीये.
संप परिक्षा झाली की रे , पेप्र तपासायच्या वेळी.