गाभा:
गड , किल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव. अंतरजालात वावरताना या गड किल्ल्यांची मिळालेली ही काही चित्रे देत आहे. काही सागरी किल्ले, गड ओळखता येत आहेत. योग्य माहिती आपले गडप्रेमी मिपाकर नक्केच देतील.
चित्र १ -
चित्र २ -
चित्र ३
चित्र ४ -
चित्र ५ -
चित्र ६ -
चित्र ७ -
चित्र ८ -
चित्र ९ -
माझ्या मते
चित्र १ -विजयदुर्ग
चित्र २- सिंधुदुर्ग
चित्र ३- ? ( मला माहित नाही )
चित्र ४- मुरुड - जंजिरा
चित्र ५- - रायगड
चित्र ६- प्रतापगड
चित्र ७- ?
चित्र ८- शिवनेरी
चित्र ९- राजगड
हे माझे मत
तुम्हाला काय वाटते?
( गडप्रेमी ) अमोल
प्रतिक्रिया
2 Aug 2008 - 3:17 pm | लिखाळ
आकाशातून खाली दिसणारे गड पाहुन मजा आली.
चित्र ६- प्रतापगड
चित्र ९- राजगड
या साठी सहमत. बाकी माहिती नाही.
-- (मेघदूत) लिखाळ.
2 Aug 2008 - 4:07 pm | प्रियाली
चित्र १ - हे जंजिर्याचे आहे.
चित्र २ - सिंधुदुर्ग
चित्र ३ - विरारजवळील अर्नाळ्याचा किल्ला
चित्र ४- अलीबागचा किल्ला. ओहोटीच्या वेळेस समुद्रातून चालत किल्ला गाठता येतो.
चित्र ७ - बहुधा पुरंदर
2 Aug 2008 - 4:21 pm | झकासराव
चित्र क्र. ५--------- रायगड
चित्र क्र. ६--------- प्रतापगड
चित्र क्र. ७--------- पुरंदर
चित्र क्र. ८ --------- शिवनेरी / राजगड / तोरणा (ह्या तीन मधला एक नक्कि)
चित्र क्र. ९ -------- राजगड
बाकीचे ओळखता येत नाहीत.
सगळी चित्र मस्त आहेत :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
2 Aug 2008 - 4:30 pm | II राजे II (not verified)
हे सर्व फोटो.... राज ठाकरे अथवा उध्दव ठाकरे ह्यांनी काढली आहेत असे कोठे तरी वाचले होते योग्य माहिती द्यावी !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
2 Aug 2008 - 5:10 pm | झकासराव
बहुतेक करुन उद्धव ठाकरे यानी अशा प्रकारचे फोटो काढले आहेत.
पण असे फोटो काढण्याची ही पहिलीच वेळ नव्हे.
ह्या आधी देखील असे छायाचित्रण झाले आहे.
मी असच एक प्रदर्शन पाहिले होते "गोपाळ बोधे" यांचे.
त्यानी देखील एरीयल फोटोग्राफीमध्ये बरीच भर घातली आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
2 Aug 2008 - 4:39 pm | वरद
अधिक माहिती साठी खालील दुव्यावर क्लिक करवी..
http://www.funonthenet.in/content/view/150/31/
“to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
2 Aug 2008 - 4:40 pm | विद्याधर३१
हे सर्व उध्दव ठाकरे यानी काढलेले फोटो आहेत.
चित्र १ - जंजिरा
चित्र २ - सिंधुदुर्ग
चित्र ३ - अर्नाळ्याचा किल्ला
चित्र ४- अलीबागचा किल्ला.
चित्र ५ -रायगड
चित्र ६-प्रतापगड
चित्र ७ -पुरंदर
चित्र ८-लोहगड
चित्र ९- राजगड
आपला
(दुर्गप्रेमी) विद्याधर
2 Aug 2008 - 4:53 pm | झकासराव
चित्र ८-लोहगड>>>>>.
अरे हो की राव. थोडासा गंडलो मी आधी.
ते जे टोक पुढे गेलेले दिसत आहे ते विंचु काटा, आणि एक मस्जिद दिसत आहे.
शिवाय नानाच्या नावे असलेल तळ (टाकं) दिसत आहे.
अगदि बरोबर विद्याधर. तो लोहगडच आहे. :)
(लोहगडावर मस्जिदपासुन विंचु काट्याला जाताना धुक्यामुळे चकवा होउन गडावर ५ फेर्या मारलेला) झकास :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
2 Aug 2008 - 4:57 pm | अमोल केळकर
हा लोहगड कुठे आहे ?
कसे जायचे?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
2 Aug 2008 - 5:08 pm | झकासराव
लोहगड पुण्याच्या जवळ आहे.
साधारण ६० किमी असेल.
लोकलने गेल तर मळवली स्टेशनला (लोणावळ्याच्या आधीचे स्टेशन) उतरुन डावीकडे पाहिले तर लोहगड आणि विसापुर हे स्वराज्याचे दोन बुलुन्द गड दिसतील :)
जाता जाता भाजे येथील बौद्ध लेणी बघता येतील.
गाडीने जात असाल तर जुन्या मुम्बई पुणे हायवे ने जायच. एक चौक असा येइल जिथुन उजवीकडे गेल तर कार्ल्याच्या एकवीरा देवीकडे जाण्यास रस्ता आहे.
तर डावीकडे गेले तर लोहगड, विसापुर, भाजे इथे पोहचाल.
लोहगड हा अप्रतिम सुन्दर आहे. :)
पावसाळ्यात पायर्यांवर थोदस निसरट असत पण तेवड्।आ त्रास होत नाही. मी गेलो होतो त्याला आता ४ वर्ष उलटुन गेली. त्यावेळी तरी फारशी गर्दी नसायची गडावर. फक्त अस्सल दुर्गप्रेमीच वर दिसायचे. (बरोब्बरच आहे वर आयत खायची सोय होत नाही मग तिथे कशाला येतील पिताडे) आता काय सिच्युएशन आहे माहीत नाही.
पण सप्टेबर मध्ये ह्या वेळी लोहगडास परत जायचा विचार आहेच. जमल्यास विसापुर देखील करायचा आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
2 Aug 2008 - 5:30 pm | ऋषिकेश
विसापूर कराच!.. लोहगडाइतकी सरळ धोपट वाट नसली.. तरी अजिबात कठीण नाहि. फक्त दाड झाडी असल्याने वाट चुकायला होते.. पहिल्यांदा जाताना वाटाड्या घ्या
बाकी वरील यादि बरोबर वाटली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
2 Aug 2008 - 5:46 pm | भडकमकर मास्तर
रायगड, प्रतापगड, पुरंदर,राजगड ओळखले...
उत्तम फोटोंसाठी धन्यवाद...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Aug 2008 - 5:55 pm | शितल
सर्व गडांचे फोटो सुंदरच आहेत. :)
काही गड ओळखळे काही नाही. ;(
2 Aug 2008 - 6:56 pm | प्राजु
बरेचसे आले ओळखू. काही नाही. लोहगडाच्या माहीती साठी झकासराव धन्यवाद. प्रियालीने आणि विद्याधर ने सगळेच नीट ओळखले. अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Aug 2008 - 9:39 pm | चतुरंग
बुलंदकाम बघून मनोमन आनंद झाला! सर्व प्रकाशचित्रे रमणीय आहेत.
चतुरंग
3 Aug 2008 - 11:42 pm | डॉ.प्रसाद दाढे
एकेक फोटो पाहिला की उर भरून येतो. शत्रूच्या छातीत धडकी का भरत असेल याचा थोडा-फार अ॑दाज येतो.
छायाचित्रा॑साठी अनेक आभार
5 Dec 2008 - 8:13 pm | सन्दिप निगडे
१.जंजिरा
२.सिंधुदुर्ग
३.अर्नाळ्याचा किल्ला
४.अलीबागचा किल्ला
५.रायगड
६.प्रतापगड
७.पुरंदर
८.लोहगड
९.राजगड
वरिल ७ किल्ले मी फिरुन आलो आहे. २,विषय मि खात्रि देऊ शकत नाहि. क्रुपया फिरण्याचि आवड असणार त्याने माझ्या मेलवर मेल करा.