हैदराबाद...

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in काथ्याकूट
23 Apr 2012 - 8:58 pm
गाभा: 

नमस्कार ... ब-याच दिवसांनी मिपावर लिहिन्याची संधी मिळतेय. तेव्हा नविन वस्तव्याबद्द्ल थोडेसे..
सध्या आमचा मुक्काम आहे हैदराबादला. जावा शिकन्यासाठी. शिकन्यासोबतच बरेचसे फिरणे सुद्धा झाले.
पहिल्यांदा भेट दिली ती बिरला मंदिरला.
बिरला मंदिरमध्ये गेल्या गेल्या मोबाईल वगैरे खालीच ठेवावा लागतो त्यामुळे फोटो काढन्यापेक्षा परीसर पाहन्यातच
समाधान मानावे लागते. जी की खरोखरच चांगली गोष्ट आहे.
बिरला मंदिर हे कोण्या एका विशीष्ट देवाचे मंदिर नसुन भरपुर मंदिरे एकत्रीतच आहेत. प्रत्येक देवाची विशीष्ट प्रकारे पुजा
वगैरे होत असते. प्रत्येकच मुर्ती केवळ अप्रतीम... मला आवडलेली मुर्ती म्हणजे बालाजीची . प्रत्येक मंदिरात दर्शन घेता घेता वरच्या भागाकडे जाता येते. प्रत्येक ठिकानावरुन दिसनारं द्रुश्य हे पहिल्या पेक्षा सुंदर दिसते. प्रत्येक ठिकानावरुन हुसेन सागरचे विलोभनीय द्रुश्य दिसते. सगळ्यात वरतुनतर नजरेच्या टप्प्यातले शहर केवळ अप्रतीम.
बिरला मंदिरपाठोपाठ भेट दिली सालारजंगला तिथली माहिती लिहीन्यासाठी पुन्हा कधितरी वेळ काढावा लागेल.
सालारजंगनंतर भेट दिली ती चारमिनारला .. खरं सांगायचतर गेलो नसतो तरी चाललं असतं . पाहन्यासारखं काहीच नाही . गोल गोल जिना चढुन वर जा व तसंच खाली उतरा .
कालच्या रविवारी गोवळकोंढा किल्ला पाहिला. मि पाहिलेला पहिलाच किल्ला . चांगलाच होता. परंतु दुपारच्या उन्हामुळे पुर्ण पाहु शकलोच नाहि.
बाकि शहराबद्द्ल जसं जमेल तसं सांगत राहिल. आपल्यापैकी कुणी आणखी पाहण्याजोग्या जागा सुचवा.

(माझा संगनक घरी असल्यामुले बाहेरुनच लिहितोय, त्यामुळे प्रतिकिया देउ शकनार नाहि. E5 वरुन मराठि कसं टाईप करायच ???)

प्रतिक्रिया

कृपया विसूनाना* इकडे लक्ष देतील काय? ;-)

*@ उगा काही तरीच: घायबरु नये, विसूनाना हैदराबादला रहातात म्हणून त्यांना हाळी दिलीय.

विसुनाना's picture

26 Apr 2012 - 11:57 am | विसुनाना

जरा 'तिकडे' आतल्या गड्ड्यात जाऊन आलो. म्हणून प्रतिसादाला वेळ लागला. ;)
इथे हैदराबादबद्द्ल इतकं कमी लिहिलंय म्हणजे... :(

ट्यांकबंड रस्ता पाह्यलात का? फेरीतून तलावात नेऊन, पुतळ्यापर्यंत नेऊन आणतात. गोवळकोंड्यात पूर्वी संध्याकाळी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात 'किल्ला इतिहास सांगतोय' असा लाईट आणि साऊंड शो असे. तो निदान बारा वर्षापूर्वी तरी चांगला होता. ट्यांक रस्त्याच्या जवळची बाग विसरले पण तिथे कारंज्यांचा शो असायचा. मला वाटतं नंतर तिथेच बॉम्बस्फोट झाला होता. अगदी छान शहर होते ते. आता बदलले आहे असे ऐकले. रामोजी फिल्मसिटी हेही पूर्वी तरी आकर्षण असायचे. आणखी आठवेल तसे लिहीन पण नीलकांतने तो जाऊन आल्यावर लेखन केले होते. सालारजंग संग्रहालय पाहिलेत का?

अन्या दातार's picture

23 Apr 2012 - 10:00 pm | अन्या दातार

ट्यांक रस्त्याच्या जवळची बाग विसरले पण तिथे कारंज्यांचा शो असायचा. मला वाटतं नंतर तिथेच बॉम्बस्फोट झाला होता.

एनटीआर गार्डनबद्दल बोलताय का?

अमृत's picture

23 Apr 2012 - 10:29 pm | अमृत

बद्दल बोलत आहेत पैसातै :-)

अमृत

रेवती's picture

23 Apr 2012 - 10:46 pm | रेवती

हो हो , लुंबीनी बाग.
आणि तुम्हाला कसं समजलं की पैसा हा माझा ड्यु आयडी आहे ते.;)

अमृत's picture

23 Apr 2012 - 10:55 pm | अमृत

माफी असावी रेवतीतै

अमृत

सोत्रि's picture

24 Apr 2012 - 8:06 am | सोत्रि

रेवती तै?
अमृत, तुमचे वय काय हो?

- ( रेवती आज्जीचा नातू ) सोकाजी ;)

अमृत's picture

24 Apr 2012 - 10:45 am | अमृत

नक्किच एकेरीत हाक मारण्याइतकं कमी आहे. :-) :-)

रेवती's picture

24 Apr 2012 - 7:24 pm | रेवती

धन्यवाद हो धन्यवाद. या सगळ्यांनी मला आज्जी हाक मारून नाकी नऊ आणलेत.;)
माझंही वय मेलं सोळाच्या पुढे काही सरकत नाही.

मोदक's picture

25 Apr 2012 - 12:08 am | मोदक

>>>माझंही वय मेलं सोळाच्या पुढे काही सरकत नाही

किती दशकांपासून..? :-D

निदान साठ दशकं झाली असतील.;)

कुंदन's picture

24 Apr 2012 - 12:30 pm | कुंदन

"पैसा" हा तुमचा ड्यु आयडी असु शकत नाही, फार तर "डॉलर" हा असु शकेल.

अरे देवा! कुंदन भाऊजी, पूर्वी बसलेल्या धक्क्यातून सावरला नाहीत काय अजून?;)
चालायचच, विसरा ते सारं.

अमृत's picture

23 Apr 2012 - 10:56 pm | अमृत

स्नो वर्ल्ड
रामोजी फिल्म सिटी
लुंबिनी पार्क
बुद्धाज स्टॅचू
ईट स्ट्रीट
गोळकोंडा किल्ला
सालारजंग
चौमहन्ना पॅलेस
बोटेनिकल गार्डन
झू गार्डन

खाण्यासाठी
कराची फ्रुट कुकीज
पॅराडाइज बिरयानी
फेमस आईसक्रीम
गोकूल चाट
डोलारी दानी
चटनिज मधे साऊथ इंडियन नास्ता
पिस्ता हाऊसचे हलीम

खरेदीकरीता
बेगम बाझार
पुस्तकांची खरेदी - कोटी
जनरल बाझार
मोती खरेदी - मंगतराय इत्यादी (कमीत कमी ३० % सुट)
हस्तकला खरेदी - शिल्परामम

टाइम पास
हैद्राबाद सेंट्रल
नेक्लेस रोड
प्रसादज आयमॅक्ष
एन टी आर गार्डन
जी वी के मॉल
सिटी सेंटर मॉल

मजा करा
अमृत अण्णा

५० फक्त's picture

24 Apr 2012 - 7:08 am | ५० फक्त

अरे माझ्या , आता काय म्हणु ते इंदोरचंच होत नाही अजुन काही त्यात ही हैदराबादच्या खाण्याची यादी, अवघड होत चालले आहे दिवसेंदिवस.

सुहास..'s picture

24 Apr 2012 - 10:53 am | सुहास..

चल टास्क समज ,

विजयवाडा हे नाव बर्‍याच दा एकशील, पण खरोखरच विजयवाडा ( मराठ्यांचा एक किल्ला) कुठे आहे हे शोधुन काढ ( नो गुगल ;) )

परिकथेतील राजकुमार's picture

24 Apr 2012 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार

नमस्कार ... ब-याच दिवसांनी मिपावर लिहिन्याची संधी मिळतेय. तेव्हा नविन वस्तव्याबद्द्ल थोडेसे..
सध्या आमचा मुक्काम आहे हैदराबादला. जावा शिकन्यासाठी. शिकन्यासोबतच बरेचसे फिरणे सुद्धा झाले.
पहिल्यांदा भेट दिली ती बिरला मंदिरला.
बिरला मंदिरमध्ये गेल्या गेल्या मोबाईल वगैरे खालीच ठेवावा लागतो त्यामुळे फोटो काढन्यापेक्षा परीसर पाहन्यातच
समाधान मानावे लागते. जी की खरोखरच चांगली गोष्ट आहे.
बिरला मंदिर हे कोण्या एका विशीष्ट देवाचे मंदिर नसुन भरपुर मंदिरे एकत्रीतच आहेत. प्रत्येक देवाची विशीष्ट प्रकारे पुजा
वगैरे होत असते. प्रत्येकच मुर्ती केवळ अप्रतीम... मला आवडलेली मुर्ती म्हणजे बालाजीची . प्रत्येक मंदिरात दर्शन घेता घेता वरच्या भागाकडे जाता येते. प्रत्येक ठिकानावरुन दिसनारं द्रुश्य हे पहिल्या पेक्षा सुंदर दिसते. प्रत्येक ठिकानावरुन हुसेन सागरचे विलोभनीय द्रुश्य दिसते. सगळ्यात वरतुनतर नजरेच्या टप्प्यातले शहर केवळ अप्रतीम.
बिरला मंदिरपाठोपाठ भेट दिली सालारजंगला तिथली माहिती लिहीन्यासाठी पुन्हा कधितरी वेळ काढावा लागेल.
सालारजंगनंतर भेट दिली ती चारमिनारला .. खरं सांगायचतर गेलो नसतो तरी चाललं असतं . पाहन्यासारखं काहीच नाही . गोल गोल जिना चढुन वर जा व तसंच खाली उतरा .
कालच्या रविवारी गोवळकोंढा किल्ला पाहिला. मि पाहिलेला पहिलाच किल्ला . चांगलाच होता. परंतु दुपारच्या उन्हामुळे पुर्ण पाहु शकलोच नाहि.
बाकि शहराबद्द्ल जसं जमेल तसं सांगत राहिल. आपल्यापैकी कुणी आणखी पाहण्याजोग्या जागा सुचवा.

(माझा संगनक घरी असल्यामुले बाहेरुनच लिहितोय, त्यामुळे प्रतिकिया देउ शकनार नाहि. E5 वरुन मराठि कसं टाईप करायच ???)

ओक्के !

आता अभ्यासाकडे लक्ष द्या.

Ravindra's picture

24 Apr 2012 - 4:08 pm | Ravindra

बिर्ला मंदिरांवरून एक विनोद आठवला.

एकदा जी डी बिर्ला यांना देव भेटला. त्यांनी देवाला विचारले , देवा मला स्वर्गामध्ये जागा मिळेल ना? मी तुझ्यासाठी इतकी मंदिरे बांधली आहेत. देव म्हणाला , मुर्खा , त्या देवळांमध्ये माझ नाव कोणीही घेत नाही. सगळे त्याला बिर्ला मंदिर म्हणतात. तुला स्वर्गामध्ये यायचं असेल तर लोक माझे नाव घेतील असे काहीतरी कर.

मग बिर्लांनी आम्बेसेदार गाडी बनवली. त्यामध्ये बसल्यावर लोकांना देवाचे नाव घ्यावे लागते.

चिरोटा's picture

24 Apr 2012 - 6:50 pm | चिरोटा

लकडी का पूलाजवळ हैदराबाद बिर्यानी हाऊस आहे. तिथे बिर्यानी खावा. हैद्राबादला कराची बिस्कीट्स मध्ये नानकटाई,बिस्किटे मस्त मिळतात. पेश्शल. चहात बुडवून तर एकदम मस्त.

रेवती's picture

24 Apr 2012 - 7:27 pm | रेवती

चिरोटेरावांनी केलेली बिस्कीटांची झायरात.;)
पुरानी यादें ताजा हो गयी.

स्मिता.'s picture

24 Apr 2012 - 7:51 pm | स्मिता.

हैद्राबाद म्हटलं की कराची बिस्किटांची आठवण होते. एक-एक प्रतिक्रिया वाचतांना या बिस्किटांचाच विचार करत असतांना अचानक त्यांचा फोटोच डोळ्यासमोर आला आणि मन आनंदीत झाले!

पाषाणभेद's picture

25 Apr 2012 - 12:25 am | पाषाणभेद

चला आता पुढल्या भारतवारीत हैदराबादला जाणे आले.

बाकी बिर्ला मंदीरं किंवा तत्सम मंदीरं ही चकचकीत कार्पोरेट मंदीरं आहेत. त्यात उद्योजकांनी अवाजवी कमावलेला नफा वास करत असतो.

त्यापेक्षा गावातले एखादे शांत, थोडेसे भग्न शिवमंदीर मला पाहीलेले आवडेल.

मैत्र's picture

25 Apr 2012 - 2:15 am | मैत्र

हैद्राबाद अप्रतिम शहर आहे. नीलकांतचा विसुनानांबरोबरचा लेख एकदा वाचावा ही विनंती..
चारमिनार मध्ये काही नाही.. किल्ला उन्हामुळे पाहता आला नाही इ. अनेक गोष्टींचे प्रयोजन कळाले नाही..

बाकी अमृत यांच्या झकास यादीत थोडी भरः
पाहण्यासाठी :
चौमहला पॅलेस
माधापूर (जावा शिकायला गेला आहात - हाय टेक सिटी पहायलाच पाहिजे :) )

खाण्यासाठी:
बावर्ची बिर्याणी - आर टी सी क्रॉस रोड
हैद्राबाद हाऊस जागो जागी आहेत .. तिथे बिर्याणी न खाता डबल का मीठा आणि कुबानी / खुबानी का मीठा हे दोन पदार्थ जरूर आजमावून पहा... गोड आवडत असल्यास कुबानी का मीठा विशेष आवडेल..
ओहरीज -- बशीरबाग किंवा बंजारा हिल्स रोड नं १२ --> मिंग कोर्ट --> चायनीज मस्त आहे.
बिर्याणी बफे असतो ३-४ प्रकारच्या बिर्याणीज चा... आणि त्यांचे आइसक्रीम जबरदस्त आहे.. मोठे संडेज झकास असतात आणि मूळ आइसक्रीम चा दर्जा खूप उत्तम आहे..
अनेक ठिकाणी पुण्याप्रमाणे मिळणारा चहा.. जो कॉफी सारखा.. उकळत्या चहातून थोडा चहा कपात घेऊन त्यात वरून गरम दूध घालून बनवतात.. एकदम कडक चहा..
बंजारा हिल्स - नागार्जुना हिल्स जवळ अंगीठी चा रविवारी बफे छान असतो.. तिथे शोरबा ट्राय करता येईल.. आणि इतर परंपरागत जसं रार्रा मुर्ग किंवा रोगन जोश / दो प्याजा वगैरे.. व्हेज मध्येही उत्तम प्रकार असतात.. थोडी अवधी उत्तर भारतीय चव आहे ..

काय मस्त शहर आहे.. माहीत नाही परत कधी जायला मिळेल...