एप्रिल च्या महिन्या अखेरीस बाजारात आंब्याच्या बाबतीत माहिती ( वर्तमानपत्रातून ) यायला सुरु होते उदा. सध्या आंबा १००० रु डझन इत्यादी इत्यादी.
याच काळखंडात जवळपासच्या एखाद्या आंब्याच्या झाडावरुन कोकिळेच्या मधुर सुरातील साद ऐकायला बरे वाटते आणि या ऋतूचे मनापासून स्वागत करायला बरेही वाटते.
या आंब्याबद्दल काही इकडुन तिकडून संग्रहित केलेली माहिती.
आंब्याच्या नावाची जन्मकहाणी तामिळ शब्दावरुन झाली आहे असे मानले जाते. तमिळ शब्द -> मॅगे किंवा मंगके.
भारतामध्ये १५२ लक्ष टन आंब्याचे उत्पादन होते. ( क्षेत्र लागवड ३६% आणि फळाच्या उत्पादनातील हिस्सा २०%).
भारताची एकुण लागवड जगाच्या बाजारात ४५% आणि दुसरा महत्त्वाचा स्पर्धक चीन.
भारत, पाकिस्तान आणि फिलिपीन्स या देशाचा राष्ट्रीय फळाचा बहुमान, वंगभुमीचा मात्र राष्ट्रीय वृक्षाचा बहुमान.
आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर लग्नसंमारभात होतो आणि त्यामागे एकच हेतु असतो नूतन दांपत्यास अशीच बहु संतती होवो.
आंब्याची फळे जास्त्तीत जास्त खाण्याने पूर्ण वर्षासाठीचा लोह पुरवठा शरीरात साठवला जातो. गर्भवती, आजारी, मुलांनी आंब्याच्या फळाचे सेवन करणे त्यांच्या साठी हितकारक.
आंब्याच्या रसात चांगले तूप टाकूनच खावे, म्हणजे रस बाधत नाही.
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंब्याच्या अनेक असलेल्या प्रजाती पैकी उत्तम आंबा कृपया सुचवा....
प्रतिक्रिया
21 Apr 2012 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार
कलंत्री काकांना बर्याच दिवसांनी बोर्डावर पाहून बरे वाटले. :)
सध्या नुसती पोच.
21 Apr 2012 - 2:55 pm | मृत्युन्जय
आंब्याच्या नावाची जन्मकहाणी तामिळ शब्दावरुन झाली आहे असे मानले जाते. तमिळ शब्द -> मॅगे किंवा मंगके.
त्यावरुन मँगो हा शब्द जन्मला असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? कारण मॅगे किंवा मंगके याच्यावरुन आंबा हा शब्द कसा जन्म घेउ शकतो कळालेले नाही
23 Apr 2012 - 2:03 pm | कलंत्री
चांगले निरिक्षण.
इंग्रजीतल्या मँगो शब्दाची व्युतप्ती असा शब्द राहुन गेला, खरे आंबे खाता येत नाही म्हणून शब्दांमधील आंबा खावुन घेतला...
21 Apr 2012 - 3:07 pm | पैसा
कशाला आठवण करून दु:ख देताय? रत्नागिरीचा हापूस आणि गोव्यातला मानकुराद हे दोनच खानदानी आंबे. ते आमच्या बजेटच्या बाहेर गेलेत. पायरी पण मस्त! पण ते फार कोणी लावत नाहीत बहुतेक. त्यामुळे बाजारात पण फार कमी. राहिले रसाचे रायवळ. तेसुद्धा किंमत ऐकली तर चटके बसतात! जाऊ द्या झालं...
21 Apr 2012 - 4:39 pm | अमोल केळकर
सहमत :)
अमोल
21 Apr 2012 - 10:42 pm | निवेदिता-ताई
सहमत मी पण
22 Apr 2012 - 12:43 am | पाषाणभेद
कुणी अजून फोटो पण नाही टाकला या फळांच्या राजाचा?
22 Apr 2012 - 8:09 am | बहुगुणी
कलंत्रींनी इतका रसाळ धागा सुरू केलाच आहे तर आंबा महोत्सव सुरू करुयात असं सुचवेन.
याच धाग्यावर आंब्याच्या निरनिराळ्या पाककृती द्याव्यात, खाद्यपदार्थ शक्यतो ताजे आंबे घेऊन केलेले, छायाचित्रांसहित असावेत, तसंच आपल्याच इतरत्र आधी प्रसिद्ध झालेल्या पाककृतीही इथल्या पाककला-कारांनी* सादर केल्या तरी आनंदच होईल.
या निमित्ताने मिपावर एका संग्रहणीय आंबा-महोत्सवाची नोंद होईल.
..
..
..
..
(* 'पाक-कलाकारांनी' अशी शब्दतोड केलेली नाही हे लक्षात घ्यावं ;-) )
23 Apr 2012 - 8:25 am | विकास
बहुगुणींशी सहमत आणि कलंत्रीसाहेबांच्या पुनरागमनाबद्दल स्वागत!
लहानपणी आमच्याकडे एक कोळीण कच्चे आंबे घेऊन येयची. भाव काय असावा यावरून बराच वाद झाल्यावर सुवर्णमध्य साधून आंबे देयची, पाटी लावायला देखील (नको असली तरी) मदत करायची... नंतर एक भैय्या देखील येऊ लागला. रडारड करायचा. भाव खरस बरोबर आहे म्हणून शपथा घेयचा, शेवटी कमी भावात देऊन जायचा. फलटणला आजोळी गावठी आंबे असायचे. त्यांची चव वेगळीच असायची. पण आवडायची. आम्ही त्याचा आंबरस काढून मग आजोबांबरोबर गावातल्या एका आईस्क्रीमच्या छोटाश्या फॅक्टरीत घेऊन जायचो. संध्याकाळी मँगो आईसक्रीमच्या कांड्या घेऊन येयचो आणि भरपूर खायचो....
गेले अनेक वर्षांत भारतात उन्हाळ्यात न आल्याने हापूस खाल्लेला नाही. गेल्याच्या गेल्या वर्षी अमेरीकेत प्रथमच हापूस आला. इथल्या किंमतीत पण बर्यापैकी महाग असून दोनदा घेतला... म्हणलं लेकीला खर्या आंब्याची चव समजेल :-) म्हणलं तर चांगला निघाला. पण मुर्ती लहान पण किंमत महान असे काहीसे. शिवाय इथे आंब्याला परवानगी देताना तो रेडीएशन मधून घालणे गरजेचे ठरवल्यामुळे त्याची चव थोडी बदलेली वाटली. मग परत कधी घेतले नाहीत. :(
हापूसच्या आंब्याचा रस येथे मिळतो खरा, पण त्यात प्रिजर्वेटीव्ह म्हणून साखर घातलेली असते. त्यामुळे जरा जास्तच कृत्रिम गोड लागतो.
येथे मेक्सिकन आंबे मिळतात. गेल्या काही वर्षात त्याची चव चांगल्यासाठी बदलेली वाटते. असे कधी कधी वाटते की या लोकांनी हापूसशी कलम वगैरे केले आहे की काय. (हापूस तो हापूस पण याची चव पण चांगली असते).
23 Apr 2012 - 2:24 pm | आर्य
कळायला लागल्या पासुन फक्त देवगड हापुस वर मानापासुन प्रेम जडले ते आज तागायत कायम आहे.
मार्च पासुनच चाहुल लागते या राजाची .........आणि दोन गोष्टी फार आठवतात,
१) लहानपणी मे महिन्यात कार्नाटकात गावी गेल्यावर आजीच्या अवती भोवती फिरायचो, कारण तिच्या कंबरेला अढीच्या खोलीची किल्ली असायची. अंबे साधे गावठी असायचे पण चव झकास अंबट-गोड आणि अन लिमीटेड अंबा .......शेकड्याने अंबे पहुडलेले असायच्याचे त्या अढीच्या खोलीत आणि घमधमाट काय वर्णावा!!! आजीला आमचे आम्र चौर्य माहीत होतेच .......तरी शिव्या घालायची ---रांडीच्यानो रात्री रसाला ठेवा. तरी बादलीने रस व्हायचा !!
२) माझ्या बाबांच आग्रह .......रस पानात सांडल्या शिवाय राहणार नाही त......आणि नियाम पहिली वाटी प्यायचीच.
आठवल्यावरही तडस लागते आज.
''' खुशखबर !!!! आमरस सुरु .......वर्षभराच्या दिर्घ प्रति़क्षे नंतर, पुन्हा एकदा धुम धडाक्यात सुरवात....खुशखबर !!!!
काल शेवटी ८०० रुपये डझन घेतल दादरमधे.