विंडोज ७ नीट सुरु असतानाही मी माझ्या अंक उच्चावर ( लॅपटॉप हो! ) उबंटू ११.१० ही आवृत्ती स्थापित केली होती (झक मारलीन उबंटू इन्स्टॉल केलं असं झालंय, कारण पूर्ण सिस्टीम क्लीन करुनही उबंटूमुळं कोणतीही सिस्टिम इन्स्टॉल होऊ शकत नाहीय म्हणे :( )
त्यात पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही प्रणाली व्यवस्थित चालू होत्या. पण गेल्या काही दिवसात विंडोज ७ भ्रष्ट झाले, आणि त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी उबंटूनेही मान टाकली.
आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक घनपाठी इंजिनियर (पक्षी लॅपटॉप दुरुस्तीगीर, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि लॅपटॉप समोर अनुष्टाणाला बसवला. गेले आठ दिवस त्याचं हे अनुष्ठाण चालूच आहे पण त्याला ना मेलेल्या उबंटूला जीवंत करता येत आहे, ना विंडोज ७ ला.
बायस लॉक असल्याने लॅपटॉपमध्ये कोणतीच प्रणाली ( पक्षी: विंडोज ७, उबंटू, एक्सपी वगैरे) या क्षणी स्थापित होऊ शकत नाहिये असं तो त्याच्या लॅपटॉप दुरुस्ती अनुष्टाणादरम्यान म्हणाला, वरुन 'बहोत रिसर्च करना पडेगा' वगैरेही कुजबुजला आणि मलाही त्यानं या लॅपटॉप दुरुस्ती अनुष्ठाणात ओढ्लं आहे, म्हणून हे यज्ञकुंड पेटवलं आहे. जेणेकरुन सध्याची पीसीहीन अवस्था दूर व्हावी आणि लवकरात लवकर पूर्ववत, आरोग्यसंपन्न लॅपटॉप वापरता यावा.
उबंटू + विंडोज ७ वापरणार्या कुणाच्या मागे पूर्वी असले शुक्लकाष्ट लागले होते काय? असेल तर काय उपाय करुन लॅपटॉप पुनर्जीवित केला हे कृपया सांगावे.
१. हा घनपाठी इंजिनियर लॅपटॅप निर्माता कंपनीचा प्रतिनिधी किंवा आम्ही लॅपटॉप ज्याच्याकडून खरेदी केला तो विक्रेता नाही, भाडोत्री आहे.
२. लॅपटॉपचं दुखणंबहाणं निर्माता कंपनीकडून होऊ शकतं, पण त्यासाठी मूळ विक्रेत्याकडं ४५० कि. मी. वर जाणे आले.
तर कृपया सांगा ह्या दुखण्यावर काय उपाय करता येईल?
दुसरे,
१. ३२० जीबी स्मरणशक्ती आणि १ जीबी रॅम असलेल्या अंक उच्चावर यापुढे पार्टिशन करुन उबंटू स्थापन करावे की न करावे?
प्रतिक्रिया
16 Apr 2012 - 9:55 pm | पैसा
फक्त खिडक्याच कितीतरी वेळा भ्रष्ट होतात आणि पुनर्स्थापित कराव्या लागतात. दोन दोन प्रणाल्या पाहिजेत कशाला?
मिपावर एवढं आयटीवालं पब्लिक आहे कोण कामास येतो बघूया आता!
16 Apr 2012 - 10:07 pm | अँग्री बर्ड
तुमचा उच्च अंक कुठ्ल्या कंपनीचा आहे हेवेसांहहो.
16 Apr 2012 - 10:14 pm | पिवळा डांबिस
परिक्रमा अर्धवट केलीत ना, म्हणून!!!!
आता तो लॅपटॉप डोक्यावर घेऊन उरलेली परिक्रमा पूर्ण करा आणि प्रायश्चित्त म्हणून त्या शूलपाणीच्या जंगलातल्या आदिवासींना उबंटू शिकवा!!!!! मग बघा, कसा फटाफट चालू होतोय की नाही लॅपटॉप तुमचा!!!!
(ह्या हल्लीच्या पोरांची कशावर श्रद्धाच नाय!!!)
:)
16 Apr 2012 - 11:08 pm | गणपा
=))
दंडवत.
17 Apr 2012 - 10:05 am | कपिलमुनी
:D
16 Apr 2012 - 10:21 pm | अँग्री बर्ड
१. एक काम करा, HDD काढून घ्या, आणि CD वरून MS - DOS via boot करा. c:\WINDOWS> command टायपुन debug करा आणि registry च्या value टाकाव्यात. त्या मॉडेल नुसार बदलतात म्हणे , नंतर परत reboot करून BIOS मध्ये शिरकाव करता येतो आणि त्यातल्या setting बदलता येतात.
२. BIOS च्या पासवर्डची checksum ही FLASH ROM मध्ये साठवलेली असते. त्याकारणे अजिबात चुकीचे पासवर्ड टाकत चला, थोड्याच वेळा तुम्हाला BIOS कंटाळेल आणि error message दाखवताना Checksum value दाखवेल, तिच्यावरून पासवर्ड काढता येतो.
16 Apr 2012 - 10:24 pm | आचारी
बघा काहि मदत मिळते का ते
http://www.youtube.com/watch?v=uUgf84bdYvg"
http://blog.sudobits.com/2011/07/30/how-to-uninstall-ubuntu-1104-1010-1004
http://www.makeuseof.com/tag/how-to-safely-uninstall-ubuntu-in-windows-d..."
16 Apr 2012 - 11:16 pm | गणपा
मी उबंटू इन्स्टॉल करण्याच्या भानगडीतच नाही पडलो.
पेन ड्राईव्हमध्ये प्लग अॅन्ड प्ले फाईल्स आहेत. फक्त कांपुटर चालु करताना पेन ड्राईव्ह वरुन बुट करायचा.
हाकानाका.
असो ही झाली आधी घ्यायची खबरदारी.
सध्याच्या तुझ्या अडचणीवर हुशार मंडळी उपाय सुचवतीलच.
16 Apr 2012 - 11:46 pm | पिंगू
यकु,
सरळ लाइव सीडीवरुन बूट कर आणि बॅकअप घेऊन टाक.
लॅपटॉप कंपन्या एकाच मशिनवर दोन प्रणालींना सपोर्ट देत नाहीत. तेव्हा तो पर्याय वापरण्यापेक्षा तुला जी प्रणाली आवडते आणि जी तू जास्त वापरतोस तीच पुनर्प्रस्थापित करुन टाक.
- (लिनक्सवाला) पिंगू
17 Apr 2012 - 12:38 am | कुंदन
उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या औ. बाद कर प्रा डॉ मित्राला द्या लॅपटॉप दुरुस्त करायला.
17 Apr 2012 - 6:41 am | तुषार काळभोर
1. donhi OS ni maan taakali mhanaje nakki kaay jhala?
2. format karun taka shakya asel tar.
3. locked/password protected BIOS clear karna 10 min cha kaam aahe. 300-500 madhye karun detat lok. (tumhala laptop ughadata yet asel tar, 5 min madhye hoil. fakt motherboard chi CMOS battery kadhaychi ani 10 min nantar punha lavaychi.)
4. ithun pudhe hi bindhast Dual Boot kara. kahi prob yet nahi. fakt mag format karte veli 'partition table' udnar nahi yachi kalji ghya.
(mobile var marathi typing nahi hot, mhanun Sorry!)
17 Apr 2012 - 9:47 am | sagarpdy
उबंटू हि तशी बऱ्यापैकी घोळ असलेलीच प्रणाली आहे. ती बर्याचशा संगणकांवर एकदम 'मक्खन' चालते पण एखादी अशी तबकडी-संगणकाची जोडी असते कि जी अगदी डोक्याला वात आणते.(मी गेली ३ वर्षे ९.०४ प्रणाली वापरत होतो आणि बऱ्याच मित्रांकडे पण टाकून दिली). हल्ली आलेल्या काही अनुभवानुसार (संगणक न उघडता) एवढंच सांगेन कि अंक उच्चावर या दोन सवती सुखाने एकत्र नांदतीलच असे सागता येत नाही. विंडोज आणि लिनक्स दोन्ही हव्याच असतील तर फेडोरा अथवा सुसे चांगल्या आहेत.
राहिला प्रश्न आत्ताच्या परिस्थितीचा, काही संदेश येत असतील त्या यंत्राकडून ते डकवा ईथे. बघू काही समजतं का ते!
सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एखादी जिवंत तबकडी/पेन ड्राईव टाका, जे काही महत्वाचे कागदपत्र असतील ते एकाद्या यु.एस.बी हार्ड डिस्क वर घ्या. त्या जिवंत तबकडीवरील प्रणालीतूनच सगळी उडवा, परत हव्या त्या प्रणाली टाकून घ्या.
कळावे, लोभ असावा!
17 Apr 2012 - 11:10 am | विदर्भनिवासी
सोपा उपाय म्हणजे सरळ सरळ " VMWARE INSTALL " करा आणि पाहिजे तितक्या OS INSTALL करा मी तर उबुंतू आणि " BACKTRAK " दोन्ही पण INSATLL केलेल्या आहे आणि CRACK VERSION उपलब्ध आहे, नाही तर मूळ WEBSITE वरून DOWNLOAD करा आणि KEYGEN USE करून KEY वापरा फुकट पाहिजे असेल तर .....
17 Apr 2012 - 11:14 am | यकु
@ पैसा: :( आता एकच ठेवतोय.
@ रोहित भिडे: कॉम्पॅक, सीक्यू 42
तुम्ही सांगितलेला उपाय करुन पहातो.. अॅडव्हान्समध्ये थँक्यू.. ;-)
@ पिडां काका: जाणाराय काकानूं.. हावरा उन्हाला तर संपू द्या.. ;-)
@ गंपाशेठ, थँक्यू !
@ पिंगू: थँक्स, हे पण करुन पाहिन.
@ कुंदन: हॅहॅहॅ... येतो मे मध्ये मग ;-)
@ पैलवान साहेब:
1. donhi OS ni maan taakali mhanaje nakki kaay jhala?
म्हणजे आधी विंडो करप्ट झालं नंतर उबंटू फ्रिझ झाली.. स्टार्टअप नंतर गोठून जायला लागलं
2. format karun taka shakya asel tar.
फॉरमॅट झालंय मारुन
3. locked/password protected BIOS clear karna 10 min cha kaam aahe. 300-500 madhye karun detat lok. (tumhala laptop ughadata yet asel tar, 5 min madhye hoil. fakt motherboard chi CMOS battery kadhaychi ani 10 min nantar punha lavaychi.)
आज सायंकाळी ही खटपट करुन पहातो..
4. ithun pudhe hi bindhast Dual Boot kara. kahi prob yet nahi. fakt mag format karte veli 'partition table' udnar nahi yachi kalji ghya.
त्या शाण्यानं पार्टीशन पण क्लिअर केलंय सध्या तरी :( असो.. बघतो..
थँक्स :)
@ sagarpdy : थँक्यू..
विंडो उडली तर उबंटू असेल म्हणून ती टाकली होती तर ती बेईमान झाली.. :(
सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. :)
17 Apr 2012 - 11:18 am | स्पा
यकू??????
गोड खावस वाटतंय का?
17 Apr 2012 - 12:30 pm | kulpras
http://ubuntu-rescue-remix.org/
17 Apr 2012 - 12:55 pm | एम.जी.
उबंटू हे नावच विचित्र आहे..
मग इतके प्रॉब्लेम आले तर नवल नाही.
बाकी आम्हाला इतकं काही कळत नाही.
17 Apr 2012 - 2:43 pm | धन्या
मी म्हणतो दोन दोन संचालन प्रणाली लागतातच कशाला. एव्हढं काय रॉकेट सायंस आधारीत कॉम्प्युटींग करायचं असतं.
असो. पिंगूशेठने सुचवलेल्या उपायाने तुमची समस्या दूर व्हायला हवी. त्यानेही नाही झालं तर मग पिडा काकांनी सुचवल्याप्रमाणे लॅटपॉट डोक्यावर घेऊन परिक्रमेला जाणं हाच एक तोडगा आहे यावर.
17 Apr 2012 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार
अरे काय यक्कुशेठ..
एक काम करा,
१) लॅपटॉपची बॅटरी काढा
२) बायसची बॅटरी काढा
३) बायसच्या बॅटरी होल्डरचे कॉंटेक्टस जमिनीवरती घासून शॉर्ट करा.
४) आता दोन्ही बॅटर्या जागच्या जागी लावा आणि जादू बघा.
बाकी बायस पुढे मागे कधी पासवर्ड लॉक झालाच तर काँपॅकसाठीचा बॅकडोर बायस पासवर्ड Compaq आहे हे लक्षात ठेवा.
17 Apr 2012 - 3:18 pm | श्रावण मोडक
एकाच घरात दोघींना नांदवण्याचा (ओएस हो...) प्रयत्न करू नये, हे कळलं ना आता? ;)
17 Apr 2012 - 3:31 pm | यकु
धन्या: ठीक आहे, डोक्यावर लॅपटॉप घेऊन जातो आणि लॅपटॉपसोबतच नर्मदेत उडी घेतो म्हणे! :D हॅहॅहॅ .. तेवढीच शांतता :p
पराशेठ: थँक्यू! पासवर्डबद्दल डब्बल थँक्यू. करुन पहातो सायंकाळी.
श्रामो: अहो आजवर नीट राहिल्या आणि एक गेली की दुसरीही गेली हो ;-)
17 Apr 2012 - 3:42 pm | श्रावण मोडक
परिक्रमा अर्धवट केलीस ना! माया रे ती. माया. नीट राहणं, आणि जाणं... दोन्ही मायाच. त्या गेल्या... पण तुझ्या मनात तशाच राहिल्या आहेत. बिन लॅपटॉपचा फिरतो आहेस आता एफ1, एफ1 करत... ;)
17 Apr 2012 - 3:48 pm | यकु
>>>>>परिक्रमा अर्धवट केलीस ना! माया रे ती. माया. नीट राहणं, आणि जाणं... दोन्ही मायाच. त्या गेल्या... पण तुझ्या मनात तशाच राहिल्या आहेत. बिन लॅपटॉपचा फिरतो आहेस आता एफ1, एफ1 करत..
____/\_____ !!!!
मेलो !!
17 Apr 2012 - 11:34 pm | रामदास
दोनो गये
माया मिली ना राम ..
17 Apr 2012 - 3:42 pm | कुंदन
धाग्याचे नाव यक्कुचा घोळ असे पाहिजे होते.
उगा उबंटू ला दोष देतोयेस.
17 Apr 2012 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उंबटूची ची चकती फुकट मिळते आणि संगणकासाठी ती फार चांगली प्रणाली आहे, अशा कल्पनांवर आधारित सर्व सोपस्कार पाडून मी ही प्रणाली संगणकावर उतरवली होती. आमचे जेष्ठ मित्र विकास यांनी ओसाडगावात एक चर्चा टाकली होती. त्या चर्चेवरुन मला उंबटूचा मोह झाला होता. पण, नेट काही कनेक्ट करता आले नव्हते आणि अप्लीकेशन्स (अ वर अर्धचंद्र कसा द्यायचा ) ही टाकता येत नव्हते. पूर्ण संगणक व्यवस्थित फॉर्मेट मारल्यानंतर पुन्हा कधी उंबटूची आठवण आली नाही. आठवण आली ती आपला धागा पाहून. सांगायचे असे होते की, उंबटूच्या गावाला जाऊ नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे.
-दिलीप बिरुटे
17 Apr 2012 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार
shift + e = अॅ
17 Apr 2012 - 4:22 pm | कुंदन
काय दिवस आलेत.
17 Apr 2012 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> shift + e = अॅ
धन्स पराशेठ........!!! :)
बरहाचा वापर करीत असल्यामुळे ”shift + e ” दाबूनही अॅ उमटत नव्हते. आपल्या मार्गदर्शनामुळे चूक लक्षात आली.
-दिलीप बिरुटे
(परा सरांचा विद्यार्थी)
17 Apr 2012 - 5:14 pm | परिकथेतील राजकुमार
त्यापेक्षा बरहामध्ये सरळ ऍ = ~e वापरावे.
18 Apr 2012 - 12:47 am | पिवळा डांबिस
मिपावरचं सगळ्यात वांड कारटं हे साक्षात प्राध्यापकाला शिकिवतांना (आणि ते देखील शुद्धलेखन!!!) पाहून खरंच आनंदाने ड्वाळे पानावले!!!!
:)
18 Apr 2012 - 9:58 am | बाप्पा
उबंटु हे हार्ड डीस्क च्या Master Boot Record मधे बदल करत असल्याने तुम्हला आधि MBR साफ करावा लागेल त्यासाठी पुढील उपाय करुन पाहा.
सर्व कागदपत्रे एका वेगळ्या तबकडी वर घेतल्या नंतर खालील कमांड वापरुन फोर्मेट करा:
format /mbr
या नंतर हवी ती प्रणाली टाका. माझ्या सोबत बर्याचदा हे झालेले आहे त्यामुळे किमान मला तरी हे नवीन नाही. आपण तंत्रज्ञ असाल तरच ड्युअल बुट प्रणाली ठेवा अन्यथा इतर मार्ग वर सुचवीलेले आहेतच.
23 Apr 2012 - 5:38 pm | यकु
मित्रहो, आपणा सर्वांच्या मदतीबद्दल आभारी आहे.
आपण सर्वांनी सांगितलेले उपाय त्या दुरुस्तकाच्या कानी घातले - पण तो म्हणतोय कठीण चकती ( hard disk) कामातून गेली आहे.
मशीन वॉरंटीमध्ये असल्याने कंपनीच्या सर्व्हिस सेंटरकडे सोपवणे आले. सर्व्हिस सेंटरच्या माणसाने लॅपटॉप सुरु करुन 'हार्डडिस्क बदलनी पडेगी' म्हटलेय.
ओरिजीनल बील, त्याचं कंपनी व्हेरिफिकेशन, आणि मग हार्डडिस्क बदलून मिळण्याच्या भानगडींच्या मागे लागलेलो आहे.
दुसर्या बाजूला इथे सुचवलेले उपाय ( उदा. पराशेठने सांगितलेला बायस शॉर्ट करणे ) त्या इंजिनियरने केले नसल्याने, बिलाच्या भानगडीत ( एक वर्ष पूर्ण झालेले नाही हे नक्की, तरी पण ) कंपनीने हार्डडिस्क बदलून देण्यास असमर्थता दाखवल्यास, स्वतःच लॅपटॉप उघडून हे उपाय करुन पहावे काय या विचारात आहे.
हुश्श!! साडेसहा हजारांचा झब्बू वाचला.
कंपनीने मशीन स्वीकारले आहे.
त्यांना डिटेक्ट झालेला प्रॉब्लेम : Problem description: IN/MF/Standard (3BD)/CSRB/Compaq Presario CQ42/ hard disk test failed
पुनश्च सर्वांचे धन्यवाद ! :)
23 Apr 2012 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार
Failure ID ?
23 Apr 2012 - 6:01 pm | यकु
Failure ID नाही दिसत एचपीकडून आलेल्या मेलमध्ये :(
प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन तेवढेच दिले आहे.
27 Nov 2012 - 3:33 pm | पुष्कर जोशी
लेख दिसत नाहीये .. उडवला वगैरे कि काय .. का बरे ?
27 Nov 2012 - 3:55 pm | पुष्करिणी
लेख दिसतोय, प्रतिसाद दिसत नाहीयेत. याच नाही पण बर्याच जुन्या लेखाबाबत हे होतय.
27 Nov 2012 - 4:47 pm | पुष्कर जोशी
हम्म undated दिसले ...आता लेख दिसतोय पण असे का होत आहे कुणाच्या वाचनखुणा उचकल्या कि हमाखस काही दिसत नाही का बरे ?